२७ मार्च, दिवस ८६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १०२१ ते १०३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२७ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २७ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २७ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०२१ ते १०३२ चे पारायण आपण करणार आहोत.


२७ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १०१ ते १२५,

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-8
चंडवातेही न मोडे । ते गगनचि की फुडे । वाचूनि जरे होईल मेहुडे । तरी उरेल कैचे ॥101॥
झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील ?
102-8
तेवि जाणणेया जे आकळिले । ते जाणवलेपणेचि उमाणले । मग नेणवेचि तया म्हणितले । अक्षर सहजे ॥102॥
त्याचप्रमाणे, ज्ञान्याला जे समजले ते ज्ञानाच्या मापांत आले म्हणून ते क्षर (नाशवंत) होय; मग, जे जाणण्यास अशक्य, त्याला सहज अक्षर (अविनाशी) असे म्हणतात.
103-8
म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयाते अक्षर । जे प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥103॥
म्हणून वेदपारंगत पुरुष ज्याला अक्षर (ब्रह्म) असे म्हणतात, व जे मायेच्या पलीकडील असुन सच्चिदानंदरूप आहे,
104-8
आणि विषयांचे विष उलंडूनि । जे सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी ॥104॥
आणि विषयांची इच्छा टाकुन व सर्व इंद्रियांचे दमन करुन देहरूपी झाडाच्या तळी उदासीनवृत्तीने बसलेले
105-8
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जे ॥105॥
त्याप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पहात असतात व जे नेहमी निरिच्छ लोकांना आवडते,


106-8
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रिये करिती ॥106॥
ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्यादि संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात,
107-8
दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥१०७॥
असे जे दुर्लभ आणि अगाध असलेले ब्रम्हपद, ज्याचा अंत नाही आणि ते वेदांनाही जाणता आले नाही. वेद अलिकच्या काठावर गंटागळ्या खात राहिले आहेत. . . .
108-8
ते ते पुरूष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगो ॥108॥
असे जे दुर्लभ पद – ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही, त्या पदाला, मी सांगीतल्याप्रमाणे जे देह ठेवतात, ते प्राप्त होतात, म्हणून, पार्था, त्याबद्दल आणखी एकवार तुला सांगतो.
109-8
तेथ अर्जुने म्हणितले स्वामी । हेचि म्हणावया होतो पा मी । तव सहजे कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो का ॥109॥
त्या वेळेस अर्जुन म्हणतो, ” हे गुरो, मी आपल्यास आता हेच विचारणार होतो, तो आपण मजवर कृपा केली. तर आता सांगण्यास सुरवात करावी;
110-8
परि बोलावे ते अति सोहोपे । तेथे म्हणितले त्रिभुवनदीपे । तुज काय नेणो संक्षेपे । सांगेन ऐक ॥110॥
परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. ” त्या वेळी, त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले :- तुला का आम्ही ओळखीत नाही ? तुला संक्षेपाने सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


111-8
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हे हृदयाचिया डोही बुडे । तैसे कीजे ॥111॥
तर मग, मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभावीक सवय मोडून, ते ह्रदयातच स्थिर राहील, असे कर.

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥8. 12॥

112-8
परी हे तरीच घडे । जरी संयमाची अखंडे । सर्वद्वारी कवाडे । कळासती ॥112॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयातच निर्विकल्प असते.
113-8
तरी सहजे मन कोंडले । हृदयीचि असेल उगले । जैसे करचरणी मोडले । परिवरू न संडी ॥113॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयातच निर्विकल्प असते. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडीत नाही,
114-8
तैसे चित्त राहिल्या पांडवा । प्राणाचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथे आणावा । मूर्ध्निवरी ॥114॥
त्याचप्रमाणे अर्जुना, चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ॐकाराचे ध्यान करावे; मग प्राणवायु क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रांपर्यंत आणावा
115-8.
तेथ आकाशी मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळे । जव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबी ॥115॥
मग, अकार, उकार व मकार ही त्रयी अर्धमात्रेत मिळेपर्यंत, धारणाशक्तीच्या बलाने, प्राणवायु ब्रह्माकाशांत मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा;


116-8
तंववरी तो समीरु । निराळी कीजे स्थिरू । मग लग्नी जेवि ॐकारू । बिंबींचे विलसे ॥116॥
तोपर्यंत तो वायु मस्तकाकांशांत स्थिर करावा; नंतर ॐकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर, मुळ स्वरुप जे ब्रह्म त्यात तो रममाण होतो.

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥8. 13॥

117-8
तैसे ॐ हे स्मरो सरे । आणि तेथेचि प्राणु पुरे । मग प्रणवांती उरे । पूर्णघन जे ॥117॥
त्याबरोबर ॐकाराचे स्मरण बंद पडते, आणि तेव्हांच प्राणाचा शेवट होतो; मग ॐकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंदस्वरूप तेच बाकी राहते.
118-8
म्हणोनि प्रणवैकनाम । हे एकाक्षर ब्रह्म । जो माझे स्वरूप परम । स्मरतसांता ॥118॥
एकाक्षर ब्रह्म आहे, त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असता
119-8
यापरी त्यजी देहाते । तो त्रिशुद्धी पावे माते । जया पावनया परौते । आणिक पावणे नाही ॥119॥
जो त्या स्थितीतच देहत्याग करितो, तो निश्चयाने मजप्रत पावतो. कारण, त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गतिच नाही.
120-8
तेथे अर्जुना जरी विपाये । तुझ्या जीवी हन ऐसे जाये । ना हे स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥120॥
अर्जुना, कदाचित् तुझ्या मनात जर अशी शंका येईल की, कायहो, मरणसमयी माझे स्मरण कसे व्हावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-8
इंद्रिया अनुघडु पडलिया । जीवितचे सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हे ॥121॥
जिविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्युचिन्हे उघड दिसू लागल्यावर त्या वेळेस उठून बसावे कोणी ?
122-8
ते वेळी बैसवेचि कवणे । मग कवण निरोधी करणे । तेथे काह्याचेनि अंतकःरणे । प्रणव स्मरावा ॥122॥
इंद्रियांचे संयमन करावे कोणी ? आणि कोणत्या अंतःकरणाने ॐकाराचे स्मरण करावे ?
123-8
तरि गा ऐशिया ध्वनी । झणे थारा देशी हो मनी । पै नित्य सेविला मी निदानी । सेवकु होये ॥123॥
तर बाबारे, असल्या संशयास तू आपल्या अंतःकरणात थारा देऊ नको. असे पहा की, माझी जो नित्य सेवा करितो, त्याच्या निदानीच्या समयी मी त्याचा दास बनून राहतो.

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥8. 14॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥8. 15॥

124-8
जे विषयासि तीळांजळी देऊनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी । माते हृदयी सूनी । भोगताती ॥124॥
जे विषयांला तिलांजलि देऊन, विषयाविषयी होणाऱ्या इच्छा आवरून व मला ह्रदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात,
125-8
परि भोगितया आराणुका । भेटणे नाही क्षुधादिका । तेथ चक्षुरादि रंका । कवण पाडु ॥125॥
त्यांना त्या समाधानांत क्षुधा वैगेरेची आठवणही रहात नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्रादिकाचा तेथे काय पाड !

दिवस ८६ वा, २७, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०२१ ते १०३२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग – १०२१
अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन ॥१॥
येथे नसता वियोग । लाभ उणे काय मग ॥धृपद॥
छंद हरीच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ॥३॥
अर्थ
आपल्या हृदया मधे नित्य निरंतर हरीचे चिंतन करणे हाच काळ सर्व शुभ शकून जाणावा. या हरीचे चिंतन करत असताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नसेल तर लाभाला कोणत्याही प्रकारची उणीव आहे काय ? या आपल्या वाणीला हरिनामाचा नित्य निरंतर छंद लागलेला असेल तर ती वाणी सुचिर्भुत असते पवित्र असते असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या दासांना सर्वकाळ व सर्व दिशा या शुभ असतात.
अभंग – १०२२
ब्रम्हरूपाची कर्मे ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥धृपद॥
नानाभाषामते आळविता बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायी ॥२॥
तुका म्हणे माझे नमन जाणतिया । लागतसे पाया वेळोवेळा ॥३॥
अर्थ

ब्रम्‍हरूप असलेल्या व्यक्तीने कोणतेही कर्म केले तरी ते ब्रम्‍हरूप असते. त्याने ते कर्म कोणताही प्रकारचा संकल्प करून केलेले नसते व त्या कर्मांमध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान स्वहित नसते त्यामुळे ते कर्म सहज होतात आणि जातात. स्पटिक मनी हा कोणत्याही रंगापासून ठेवला की तो अगदी त्या रंगाप्रमाणे दिसतो त्या रंगां पासून तो भिन्न असतो अगदी तसेच ज्ञानी मनुष्य असतो त्याने कोणतेही कर्म करू परंतु तो त्या कर्मापासून अलिप्त असतो. लहान मुलाला इतर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही नावाने हाक मारू द्या पण त्याला ते समजत नाहीपण त्याला त्याच्या आईने हाक मारली की त्याला ते लगेच समजते लगेच कळतेतसेच या ज्ञानी असते त्याला इतर कोणीही कोणत्याही नात्याने हाक मारू द्या पण त्याला ते समजत नाही तो त्या ब्रह्मा शिवाय कोणालाही ओळखत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा आत्मस्वरूप जाणणाऱ्या माणसाला मी वेळोवेळा नमस्कार करतो आणि त्याचे चरणही वेळोवेळी धरतो.
अभंग – १०२३
नाही सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनी शुद्ध होता ॥१॥
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचे नारायण ॥धृपद॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयी तव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाही पुन्हा ॥३॥
अर्थ

सुगंध उत्पन्न करण्याकरता कोणत्याही प्रकारची पेरणी करावी लागत नाही तर जसे फुल असेल तसे सुगंध आपोआप तयार होतो अगदी त्याचप्रमाणे मन शुद्ध झाले की सद्गुण ही आपोआप तयार होते. सद्गुण व कीर्ती हे दोन्ही गुण चांगल्या मनुष्याचे जसे सुगंध वाऱ्यासारशी पसरते तसे त्यांचे सज्जन व्यक्तीचे हे सद्गुण आणि कीर्ती वाऱ्यासारशी पसरते व त्यांची व कीर्ती सांगणारे मुखही नारायणाचे चसते. सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही वेगवेगळे आहेत काय तर नाही याला सर्व लोकही साक्षी आहेत तसेच सज्जन व्यक्ती तो जेथे जेथे जात असतो तेथे त्याची कीर्ती व सद्गुण हे आपोआपच प्रसारित होतात. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला सायास करायचेच असेल तर सत्यासाठी सायस करा कारण ज्याप्रमाणे नमिताचा नाश होत नाही त्याचप्रमाणे तर त्याचाही कधीच नाश होत नाही.
अभंग – १०२४
तीर्थाटणे एके तपे हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पाया एक ॥धृपद॥
अक्षरे आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावे ॥२॥
तुका म्हणे विधिनिषधाचे डोही । पडिले त्या नाही देव कधी ॥३॥
अर्थ

काही मनुष्य तीर्थ करतात तप करतात व त्याविषयी अभिमान धरून गुरगुर करत असतात. पण हे विष्णुदास बिचारी तसे नसतात ते याउलट एकमेकांचे चरण धरत असतात. वेदशास्त्रांचे अध्ययन करणारे असे अनेक लोक आहेत कि त्यांच्या मनांमध्ये अशी इच्छा करतात की लोकांनी आपला मानसन्मान करावा आपल्याला पूज्य मानावे. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक विधी निषेधाचा डोहामध्ये बुडालेले आहेत कर्मकांडाच्या अभिमानाचा अडकलेले आहेत बुडालेले आहेत त्यांना देवाची प्राप्ती कधीच होत नाही.
अभंग – १०२५
पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी । लागो नेदू अंगी पापपुण्य ॥१॥
निर्भर अंतरी सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवे ॥धृपद॥
बळिवंत जेणे रचिले सकळ । आम्हा त्याचे बळ अंकितांसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही देखत चि नाही । देवाविण काही दुसरे ते ॥३॥
अर्थ
या विश्वामध्ये आम्ही एकच असे शुर शिपाई दांडपट्टा खेळणारे आहोत कि जे अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. आम्हा विष्णुदासांच्या अंतःकरणामध्ये सदासर्वकाळ आनंद भरलेला आहे व आमच्या योगक्षेम आता भारही या देवाने घेतलेला आहे. जो सर्वशक्तीमान आहे ज्याने या जगाची निर्मिती केली आहे त्याचेच शक्ती आम्हा हरिदासांना आहे. तुकाराम महाराज म्हणतात या देवा वाचून आम्ही दुसरे काही जाणत नाही व पाहत नाही.
अभंग – १०२६
कथेचा उलंघ तो अधम अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥धृपद॥
निद्रेचा आदर जागरणी वीट । त्याचे पोटी कीट कुपथ्याचे ॥२॥
तुका म्हणे दोन्ही बुडविली कुळे । ज्याचे तोंड काळे कथेमाजी ॥३॥
अर्थ

ज्याला हरिकथा आवडत नाही आणि जो हरीचे नाम हे ओळखत नाही घेत नाही तो अधमातील अधम आहे असे जाणावे. असा कृतघ्न मनुष्य मातेच्या पोटी येऊन भूमीला भार का झाला असेल ? अशा माणसांना निद्रा असते हरी जागरणात ते कधीही येत नाहीत व यांच्या पोटामध्ये या कारणाने पाप व वासनारूपी किट उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला हरिकथेची आवड नाही त्याने आपल्या आईचे व बापाचे हे दोन्हीकुळ बुडविले असे समजावे.
अभंग – १०२७
सांडोनीया दो अक्षरा । काय करू हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणे दातारा नातुडेसी ॥१॥
म्हणोनि बोबड्या उत्तरी । वाचे जपे निरंतरी ।
नाम तुझे हरी । भवसागरी तारू ते ॥धृपद॥
सर्वमय ऐसे वेदांचे वचन । श्रुति गर्जती पुराणे ।
नाही आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥
शेवटी ब्रह्मार्पण । याचि मंत्राचे कारण ।
काना मात्रा वायाविण । तुका म्हणे बिंदली ॥३॥
अर्थ

हे दातारा तुझे हे दोन अक्षरी नांव म्हणजे “हरी” हे सोडुन बाकी पसारा मी कशासाठी घालू ? मी जर विधिनिषेधाचा भार घेतला तर मी कर्मकांडामध्ये अडकेल व त्यामुळे मला तुझी प्राप्ती होणार नाही. म्हणूनहे हरी तुझे नाम मी माझ्या बोबड्या शब्दाने जपत आहे. कारण तुझे नामहरी आहे आणि तेच या भवसागरातून तारणारे आहे. तू सर्वत्र व्यापून उरलेला आहे हेच वेदाचे वचन आहे आणि उपनिषदे पुराने हेच गर्जून सांगतात. म्हणून हे हरी मी तुझ्या नामावाचून दुसरे कोणतेही नांव घेत नाही तुझ्या वाचून इतर कोणतेही साधनांची मला आवड नाही. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही वैदिक कर्म केल्यानंतर शेवटी ओम तत्सत ब्रम्हार्पनमस्तु हे वाक्य म्हणण्याची गरज आहे, कोणतेही वैदिक कर्म करताना मंत्र उपचार करताना त्याचा काना मात्रा वेलांटी चुकले तर ते वैदिक कर्म निष्फळ ठरते परंतु तुझे नाम घेतल्याने कोणतेही कर्म अगदी सहजच सफल होते असा तुझा नामाचा महिमा आहे.
अभंग – १०२८
हरीनामाचे करूनि तारू । भवसिंधुपार उतरलो ॥१॥
फावले फावले आता । पायी संता विनटलो ॥धृपद॥
हरीनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥
हरीनामाची धनुष्यकांडे । विन्मुख तोंडे कळिकाळ ॥३॥
येणे चि बळे सरते आम्ही । हरीचे नामे लोकी तिही ॥४॥
तुका म्हणे जालो साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
अर्थ
मी या हरिनाम रुपी नामाची नौका करून हा भवसिंधु पार उतरलो आहे. मला हे सर्व काही प्राप्त झाले ते केवळ संतांमुळे कारण मी त्यांच्या पायी लागलो आहे. हरी नाम रूप वेगवान घोडा आणि ज्ञानरूप शस्त्र घेऊन आम्ही या गाढ संसाराचा समूळ छेद केला आहे. हरी नाम रूप बाणामुळे कळिकाळ देखील तोंड विन्मुख करून पळून गेला. या हरिनामाचा बळामुळेच आम्ही तिन्ही लोकामध्ये मान्यतेला प्राप्त झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या विठ्ठलाचे भक्तीभावपूर्ण सेवक झालो आहोत.
अभंग – १०२९
नव्हे हो गुरुत्व मेघवृष्टिवाणी । ऐकावी कानी संतजनी ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥धृपद॥
देहपिंड दान दिला एकसरे । मुळिचे ते खरे टांकसाळ ॥२॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
अर्थ

हे लोकांनो मी कोणालाही माझा गुरु पणा दाखविण्यासाठी उपदेश वाणी करत नाही तर मेघवृष्टी ज्या प्रमाणे सर्वाना सारखीच होते त्याप्रमाणे सर्वाना माझी उपदेश वाणी मी सांगत आहे तुम्हा संत जणांना ऐकावी. माझे शब्द बोबडे जरी असले तरी ते देवाचेच आहे आणि मी जे काही बोलतो आहे ते तोच मला बोलवीत आहे. मी माझा देह या हरीला केव्हाच अर्पण केलेला आहे त्यामुळे मी जे काही बोलतो आहे ते सर्व हा हरीच बोलत आहे कारण तो माझ्याशी एकरूप झालेला आहे आणि मी जे काही बोलतो ते शब्द माझ्या टाकसाळीतून बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून हरिनाम रुपी नवनीताचा झरा स्रवत आहे आणि जे कोणी हे नवनीत सेवन करीन ते तृप्त होतील समाधानी होतील.

अभंग – १०३०
घटी अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवी । जीवसाक्षीवर्तने ॥१॥
भोग ज्याचे तया अंगी । भिन्न प्रारब्ध जगी । विचित्र ये रंगी । रंगे रंगला गोसावी ॥धृपद॥
देह संकल्पासारिखे । एक एकासी पारिखे । सुख आणि दुःखे । अंगी कर्मे त्रिविध ॥२॥
तुका म्हणे कोडे । न कळे तयासी साकडे । त्याचिया निवाडे । उगवे केले विंदान ॥३॥

अर्थ नाही टाका तपासा
अभंग – १०३१
सद्गदित कंठ दाटो । येणे फुटो हृदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥धृपद॥
नेत्री जळ वाहो सदा । आनंदाचे रोमांच ॥२॥
तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
अर्थ

अहो विठ्ठला मला तुमच्या चिंतनाने सद्गतीत होऊन कंठ दाटून येवो व माझे ह्दय फुटून जावो. माझ्या चित्तामध्ये नेहमी तुमच्या चिंतनाचा छंद लागो. अहो विठ्ठला तुमच्या चिंतनाने मला आनंद होवो व डोळयातून प्रेम अश्रू वाहोत व अंगावर रोमांच उभे राहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारचे कृपादान तुम्ही मला दयावेत व अशी इच्छा मला मनामध्ये आहे. ”
अभंग – १०३२
जेथे देखे तेथे उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥
डोळा बैसले बैसले । ध्यान राहोनि संचले ॥धृपद॥
सरसावले मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥
तुका म्हणे सवे । आता असिजेत देवे ॥३॥
अर्थ

जिथे पाहावा तिथे आकाशाचा गाभा तो हरी उभा असलेलाच दिसतो. आणि हेच हरीचे रुप माझ्या डोळयामध्ये वसले आहे व याचेच ध्यान माझ्यामध्ये संचरले आहे. याचे ध्यान करण्याकरता माझे मन सरसावले आहे व हे ज्ञान बघूनच मी माझे डोळे शुध्द केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता असे झाले आहे की आम्ही जिकडे जावो तिकडे हा हरीच आमच्याबरोबर असतो. ”

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading