२२ मार्च, दिवस ८१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १७६ ते २१० सार्थ तुकाराम गाथा अभंग ९६१ ते ९७२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२२ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २२ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २२ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९६१ ते ९७२ चे पारायण आपण करणार आहोत.


२२ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १७६ ते २१०,

176-7
तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रे परब्रह्मे फळे । जया पिकलेला रसु गळे । पूर्णतेचा ॥176॥
त्यांना त्याचा तो प्रयत्न फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते, व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात.
177-7
ते वेळी कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे । कर्माचे काम सरे । विरमे मन ॥177॥
त्या वेळी, आम्ही धन्य आहो, असे त्यांना वाटून सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो,
178-7
ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमी मी ॥178॥
नंतर आत्मज्ञानाची हौस पुरी होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्याचे मन शांत होते.
179-7
तयाते साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥179॥
हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो; कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारांत भांडवल मीच आहे. त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धि होते, यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही रहात नाही.

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥7. 30॥

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु
180-7
जिही साधिभूता माते । प्रतीतीचेनि हाते । धरूनि अधिदैवाते । शिवतले गा ॥180॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-7
जया जाणिवेचेनि वेगे । मी अधियज्ञु दृष्टी रिगे । ते तनूचेनि वियोगे । विरहे नव्हती ॥181॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला, ज्यांच्या ज्ञानाच्या वेगाने मला अधियज्ञ या दृष्टीने पाहिले, त्यांना शरीराच्या वियोगाने (मरणसमयी) दुःख होत नाही
182-7
येऱ्हवी आयुष्याचे सूत्र विघडता । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥
येऱ्हवी, आयुष्याची दोरी तुटावयाचे बतांत आली असता प्राण्यांची जी खळबळ उडून जाते, ती पाहून, न मरणारांच्या चित्ताला सुद्धा युगांत ओढवल्यासारखे नाही का होत ?
183-7
परी नेणो कैसे पै गा । जे जडोनि गेले माजिया आंगा । ते प्रयाणीचिया लगबगा । न सांडितीच माते ॥183 ।
परंतु जे मद्रूप झाले, ते प्राणांतीही मला सोडीत नाहीत. हे कसे होते ते मला सांगता येत नाही.
184-7
येऱ्हवी तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंत:करण- । युक्त योगी ॥184॥
येऱ्हवी असे पक्के समज की, जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत, तेच अंतःकरणापासून माझे ऐक्य पावले आहेत.
185-7
तव इये शब्दकुपिकेतळी । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळी । मागाचि होता ॥185॥
हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळ नव्हती. कारण त्याचे लक्ष क्षणभर दुसरीकडे होते.


186-7
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळे । जिये नानार्थरसे रसाळे । बहुकाते आहाति परिमळे । भावाचेनि ॥186॥
त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादक वाक्ये हीच फले पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती, व त्यांचा भक्तिरूप सुवास चोहींकडे पसरला होता.
187-7
सहज कृपामंदानिळे । कृष्णद्रुमाची वचनफळे । अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिली ॥187॥
त्या वेळी कृष्णकृपारूप मंद वाऱ्याच्या योगाने, श्रीकृष्णरूप वृक्षापासुन वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली !
188-7
तिये प्रमेयाचीच हो का वळली । की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळिली । मग तैसीच का घोळिली । परमानंदे ॥188॥
ती फळे वेदांतसिद्धांतांचीच बनलेली, ब्रह्मरसाच्या सागरांत बुचकळलेली, व तशीत परमानंदरूप साखरेत घोळलेली होती.
189-7
तेणे बरवेपणे निर्मळे । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥189॥
अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे, त्याच्या अर्थरूपी गर्भाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला.
190-7
तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचा जीवी गुतकुलिया । होत आहाती ॥190॥
अशा रीतीचे सुख झाल्यावर तो स्वर्गसुखाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या अंतःकरणात गुदगुल्या होऊ लागल्या.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-7
ऐसे वरचिलीचि बरवा । सुख जावो लागले फावा । तंवरसस्वादाचिया हावा । लाहो केला ॥191॥
याप्रमाणे त्या फळाचे बाहेरील स्वरुप पाहुन त्याचा आनंद वाढू लागला. त्या वेळेस त्या फळांची चव घेण्याची जिभेला इच्छा उत्पन्न झाली.
192-7
झाकरी अनुमानाचेनि करतळे । घेऊनि तिये वाक्यफळे । प्रतीतिमुखी एके वेळे । घालू पाहिली ॥192॥
म्हणून लवकर अनुमानरूप हस्तावर ती श्रीकृष्णवाक्यरूप फले घेऊन ती तो अनुभवरूप मुखात एकदम घालू लागला.
193-7
तव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांही दशनी न फुटती । ऐसे जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥193॥
त्या वेळी विचाररूप जिभेने ती घेता येईनात, व हेतूरूप दातांनी फुटेनात असे जाणून, सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लावीना.
194-7
मग चमत्कारला म्हणे । इये जळीची मा तारांगणे । कैसा झकविलो असलगपणे । अक्षरांचेनि ॥194॥
मग चमत्कार वाटून असे म्हणतो की, ” अहो, पाण्यात दिसणाऱ्या नक्षत्रांप्रमाणे या अक्षरांच्या सुदरपणाने अक्षरांना फळ समजुन मी कसा फसलो !
195-7
मगइये पदे नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मती बुडलिया । थाव न निघे ॥195 ।
ही अक्षरांची पदे नसुन केवळ आकाशाच्या घड्या आहेत व यात आमच्या बुद्धीने कीती जरी बुड्या मारल्या, तरी काही थांग लागावयाचा नाही. “


196-7
वाचूनि जाणावयाची के गोठी । ऐसे जीवी कल्पूनि किरीटी । तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥196 ।
(तेव्हा ही फले घेता येत नाहीत तर) मग ती जाणता कशी येतील ? असे अर्जुनाने मनात आणून पुनः यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले.
197-7
मग विनविले सुभटे । हा हो जी ये एकवाटे । सातही पदे अनुच्छिष्टे । नवले आहाती ॥197॥
मग अर्जुनाने देवास विनंति केली की, ” देवा, ही जी एकवटलेली सात पदे, त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही, हे मोठे आश्चर्य आहे.
198-7
येऱ्हवी अवधानाचेनि वहिलेपणे । नाना प्रमेयांचेउगाणे कायl श्रवणाचेनि आंगणे । बोलोलाहाति ॥198॥
एरवी, लक्षपूर्वक ऐकत नसता, केवळ श्रवणाच्या जोरावर (लक्ष नसता श्रवण केले तर) अनेक (साधारण) सिद्धांतांचे तात्पर्यार्थ तरी बोलून दाखविता येतील का ? (नाही. )
199-7
परी तैसे हे नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥
आणि त्यातूनही, देवा, आपले हे बोलणे काही साधारण नव्हे. ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटले.
200-7
कानाचेनि गवाक्षद्वारे । बोलाचे रश्मी अभ्यंतरे । पाहेना तव चमत्कारे । अवधान ठकले ॥200॥
कानाच्या झरोक्यातुन बोलरुपी किरण आत शिरले नाहीत, तोच चमत्कार वाटुन माझे लक्ष खुंटले (मति चालेना).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


201-7
तेविचि अर्थाची चाड मज आहे । ते सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहे । किजो देवा ॥201॥
त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यात जो वेळ चालला आहे, तोही मला सहन होत नाही. म्हणून, देवा लवकर सांगा
202-7
ऐसा मागील पडताळा घेऊनी । पुढा अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविचि माजी शिरऊनि । आर्ती आपुली ॥202॥
याप्रमाणे, मागील प्रत्यंतर घेऊन, पुढल्या अभिप्रायावर दृष्टि ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले.
203-7
कैसी पुसती पाहे पा जाणीव । भिडेची तरी लंघो नेदी शीव । येऱ्हवी कृष्णहृदयासी खेंव । देवो सरला ॥203॥
अर्जुनाची प्रश्न करण्याची काय शैली आहे पहा ! की मर्यादेचे उल्लंघन न करिता श्रीकृष्णाच्या ह्रदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला !
204-7
अगा गुरूते जै पुसावे । तै येणे माने सावध होआवे । हे एकचि जाणे आघवे । सव्यसाची ॥204 ।
अहो, श्रीगुरूंना ज्या वेळेस पुसावयाचे, त्या वेळेस अशाच मर्यादेने पुसावे लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सव्यसाची अर्जुनच जाणतो.
205-7
आता तयाचे ते प्रश्न करणे । वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे । हे संजयो आवडलेपणे । सांगेल कैसे ॥205 ।
आता त्यांचे ते प्रश्न करणे, आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरिचे उत्तर देणे, हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा.


206-7
तिये अवधान द्यावे गोठी । बोलिजेल नीट मऱ्हाटी । जैसी कानाचे आधी दृष्टी । उपेगा जाये ॥206॥
जी गोष्ट नीट मराठी भाषेत सांगितली जाईल, तिच्याकडे नीट लक्ष द्या. असे की, ज्या योगाने कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल,
207-7
बुद्धिचिया जिभा । बोलाचा न चाखता गाभा । अक्षरांचियाचि भांबा । इंद्रिये जिती ॥207॥
बुद्धिरूप जिभेने त्या शब्दांचा रस न चाखता अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तगतील.
208-7
पाहा पा मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळे । परी वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥208॥
पहा की, मालती पुष्पाच्या कळ्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल, परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का ?
209-7
तैसे देशियेचिया हवावा । इंद्रिये करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गावा । लेसा जाईजे ॥209॥
त्याचप्रमाणे, मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील, व मग त्वरीत सिद्धांताच्या गावाला जातील.
210-7
ऐसेनि नागरपणे । बोलु निमे ते बोलणे । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥210॥
अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते, ते ऐका, असे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात.
॥इति श्रीज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकायां विज्ञानयोगोनाम सप्तमोऽध्यायः॥7॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 30॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 210॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ८१ वा, २२, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९६१ ते ९७२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९६१
ठेवा जाणीव गुंडून । येथे भावचि प्रमाण ॥१॥
एका अनुसरल्या काज । अवघे जाणे पंढरिराज ॥धृपद॥
तर्कवितर्कासी । ठाव नलगे सायासी ॥२॥
तुका म्हणे भावेविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥
अर्थ

हे अहंकारी ज्ञान्यानो आहो तुमचे शहाणपण गुधाळून ठेवा कारण देवाच्या प्राप्ती साठी येथे फक्त भक्तिभावाच प्रमाण आहे. त्या पंढरीनाथाला सर्व भावे शरण जा मग तुमचे सर्व मनोरथ तो पूर्ण करील. तुम्ही तर्क वितर्क करून काहीच उपयोग नाही उगाच तुमचे कष्ट वाया जातील. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही भक्तीभाव न ठेवता इतर काही गोष्टी कराल तर तो सारा शिन ठरतो.
अभंग क्र. ९६२
येथे दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रिते कलेवर ॥धृपद॥
षडउर्मी हृदयात । यांचा अंत पुरवूनि ॥२॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथे वास करी तो ॥३॥

अर्थ नाही टाका तपासा
अभंग क्र. ९६३
मुक्त तो आशंका नाही जया अंगी । बद्ध मोहोसंगी लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकात दंभ करी ॥२॥
तुका म्हणे लागे थोडाच विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
अर्थ

ज्याच्या चित्तात कुठल्याही प्रकारची शंका नाही तो मुक्त आहे व ज्याच्या चित्तात मोह लज्जा चिंता आहे तो बद्ध होय. एकांत धरून राहिलात तर सुख प्राप्त होते परंतु लोकांमध्ये राहून दम केला तर मात्र दुखः प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात सुखाच्या प्राप्ती साठी थोडा विचार करावा लागतो परंतु अनेकहे लोक प्रकार करून फसवितात.
अभंग क्र. ९६४
कानी धरी बोल बहुतांची मते । चाट त्यापरते आणीक नाही ॥१॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥धृपद॥
शब्दज्ञानी एक आपुलाल्या मते । सांगती वेदात भिन्नभावे ॥२॥
तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडी ॥३॥
अर्थ
जो मनुष्य बहुत सांगणाऱ्या माणसाचे ऐकतो त्याच्या सारखा मूर्ख दुसरा कोणीही नाही. ज्या प्रमाणे ओढाळ जनावर कायम त्याच्या पाठीवर अनेक मार बसतात त्या प्रमाणे अज्ञानी माणसांच्या पाठीवर यम दंड बसतात. असे अनेक लोक आहेत कि ते वेदात त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात पण जर एका हरी विषयी मनात भाव धरला नाही तर त्याच्या तोंडात शेवटी माती पडते.
अभंग क्र. ९६५
देवा ऐके हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हेचि सुख आगळे ॥१॥
या या वैष्णवाचे घरी । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारी । कर जोडूनि तिष्ठती ॥धृपद॥
नको वैकुंठीचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥२॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघशामा । तुका म्हणे आम्हा । जन्म गोड यासाठी ॥३॥
अर्थ
हे देवा माझी एक विनंती ऐक मला मुक्ती नको रे सद्गातीची इच्छा देखील मला नाही मला फक्त भक्तिप्रेमसुख हवे आहे. अरे हे भक्ती प्रेम सुख या वैष्णवांच्या घरी आहे ज्याची मी इच्छा करत आहे. या वैष्णवांच्या द्वारी रिद्धी सिद्धी तिष्टत हात जोडून उभ्या आहेत. हे देवा मला वैकुंठाचा वास नको कारण ते सुख नाशिवंत आहे पण हरिकीर्तन करताना जो आंनदरस आहे तो अद्भुत आहे तो रस मला दे. तुकाराम महाराज म्हणतात हे मेघश्याम तुझ्या नामाचा महिमा तुला माहित नाही तुला कळतही नाही अरे या नामासाठी आम्ही जन्म घेणे गोड समजतो.
अभंग क्र. ९६६
न पूजी आणिका देवा न करी त्यांची सेवा । न मनी त्या केशवाविण दुजे ॥१॥
काय उणे जाले मज तयापायी । ते मी मागो काई कवणासी ॥धृपद॥
आणिकाची कीर्ती नाइके न बोले । चाड या विठ्ठलेंविण नाही ॥२॥
न पाहे लोचनी श्रीमुखावाचूनि । पंढरी सांडूनि न वजे कोठे ॥३॥
न करी काही आस मुक्तीचे सायास । न भे संसारास येता जाता ॥४॥
तुका म्हणे काही व्हावे ऐसे जीवा । नाही या केशवाविण दुजे ॥५॥
अर्थ

मी या केशवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा व सेवा करणार नाही व माझ्या मनात कोणताही पांडुरंगा शिवाय दुसरा देव नाही. या केशवाच्या ठिकाणी मला काय कमी पडले म्हणून मी ते इतर देवाशी मागावे. मी या विठ्ठलावाचून इतर कोणत्याही देवाची कीर्ती ऐकणार नाहि व गाणार नाही. या विठ्ठलावाचून मला दुसरी कोणतीही चाड (इच्छा) नाही. माझ्या या डोळ्यांनी मी या श्रीमुखावाचून दुसरे काहीच पाहणार नाही व पंढरी सोडून मी दुसर्‍या कोणत्याची तीर्थी जाणार नाही. मी कुठल्याही प्रकारची इच्छा व मुक्ती साठी प्रयत्न करणार नाही व या संसारास मी कधी हि भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या जीवाला या केशावाशिवाय दुसरे काही प्राप्त व्हावे असे मला वाटत नाही.
अभंग क्र. ९६७
नव्हे खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे । परिपाकी खरे खोटे कळे ॥धृपद॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥
तुका विनवणी करी जाणतिया । बहुमते वाया श्रमो नये ॥३॥
अर्थ

नास्तिक लोक हे उपदेश करता परंतु त्याला सत्याचा आधार नसतो पण माझे शब्द म्हणजे सत्यावर आधारित असते. माझे व नास्तिकाची मते हे मनाला साक्ष ठेऊन पहा म्हणजे खारे कोणते व खोटे कोणते ? हे सहज तुमच्या लक्षात येईल. आहो माझे शब्द हे एकागी नसू संपूर्ण ब्रम्हांडाला गवसणी घातलेले शब्द आहेत. तुकाराम महाराज म्हणतात माझी तुम्हा सर्व जाणतिया लोकांना विनंतीती आहे कि तुम्ही बहुमत असणऱ्या नास्तिक लोकांचे शब्द ऐकून उगाच तुमचे श्रम वाढवू नका.
अभंग क्र. ९६८
कथा करोनिया द्रव्य देती घेती । तया अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥धृपद॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सापडले हाती यमाचिया ॥३॥
अर्थ

हरी कथा करून जे द्रव्य घेतात व जे द्रव्य देतात त्या दोघाची अधोगती होऊन त्या दोघाना नर्क प्राप्ती होते. रौरोव व कुंभपाकाच्या नर्क यातना ते भोगतात व त्याची करून नारायणला देखिला येत नाही. तलवारीच्या धारी प्रमाणे असलेले गावात हे त्यांचे शरीर छेदतात व त्यांना तप्त भूमी वर लोळवतात. तुकाराम महाराज म्हणतात या अश्या लोकांच्या नर्क यातना कधीही चुकत नाही ते प्रत्येक्ष यमाच्या हातीच सापडलेले असतात.
अभंग क्र. ९६९
नाइकावे कानी तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वाखाणी अद्वैत भक्तीभावेविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥धृपद॥
अहं ब्रम्ह म्हणोनि पाळितसे पिंडा । नो बोलावे भांडा तया सवे ॥२॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचे काळे तोंड संतांमध्ये ॥३॥
तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरीष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥
अर्थ

हरीचे वर्णन जो भक्तीभावावीणवीण घेते व सांगतो ब्र्म्हज्ञानाच्या नुसत्या कोरड्या गोष्ठी करतो त्याचे शब्द कानाने एकू देखील नाही. आपल्या वाणी द्वारे अद्वैताचे वर्णन व त्याचे ज्ञान भक्तिभावा विन जो कोणी सांगतो तो स्वतः दुखी होतो व श्रोत्यांनाही शीण करतो. तो स्वतःला अहं ब्र्म्हस्मी म्हणवू घेतो व शरीराची जोपासन अतिषय लाडाने करतो अश्या भांड खोरव्यक्तीशी बोलू देखील नाही. वेदबाह्य बोल हा नास्तिक सांगत असतो पण तो संता मध्ये काळ्या तोंडाचा म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज म्हणतात जो देव आणि भक्त याच्या मध्ये खंडन आणतो त्याच्या पेक्षा वरिष्ठ हे देवाचा धावा करणारी जनवरी आहेत.
अभंग क्र. ९७०
वेदविहित तुम्ही आइका हो कर्मे । बोलतो ती वर्मे संतांपुढे ॥१॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगी । पापपुण्य भागी विभागिले ॥धृपद॥
प्रथम पाउली पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाही ॥२॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणे भिन्न अग्नी एक ॥३॥
तुका म्हणे मन उन्मन जो होय । तोवरी हे सोय विधि पाळी ॥४॥
अर्थ

वेदाने जे कर्मे सांगितले आहेत त्यांचे वर्म मी आज संता पुढे तुम्हाला सांगत आहे. एका देवा पासून चार वेद निर्माण झाले व ते आपापल्या पापपुण्य या गुणाने विभागले गेले. जगाची उत्पत्ती हि हरी मुळे झाली आहे व हरीच्या ठिकाणी आदी मध्य अंत असा कोणताही भेद नाही. आंबे बोरी वड बाभूळ चंदन हे जरी वृक्ष भिन्न असले त्यांचे गुण जरी वेगवेगळे असले जरीपण त्यांचा संबंध अग्नीशी आला कि ते सर्व एकच होतात. तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत मन उन्मन अवस्थेत जात नाही तो पर्यंत मानाने फक्त वेदाने सांगितलेल्या विधी मार्गाचा अवलंब करावा.
अभंग क्र. ९७१
तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ । ब्रम्ह ते केवळ पंढरिये ॥१॥
ते आह्मी देखिले आपुल्या नयनी । फिटली पारणी डोळियांची ॥धृपद॥
जीवाचे जीवन सुखाचे शेजार । उभे कटी कर ठेवूनिया ॥२॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीना लोभपार दुष्टा काळ ॥३॥
सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी । आकार निर्गुणी तोचि असे ॥४॥
तुका म्हणे नाही श्रुती आतुडले । आम्हा सापडले गीती गाता ॥५॥
अर्थ
सर्व तीर्थांचे व व्रतांचे जे मूळ आहे ते ब्रम्ह हे पंढरपूरला आहे. व ते ब्रम्ह आम्ही आमच्या डोळ्यांनी पहिले व आमच्या डोळ्यांची पारणे फिटले गेले. सर्व जीवाचे जीवन हे आमच्या शेजारी कटी कर ठेऊन विटेवर उभे आहे. आहो तो विश्वाचा निर्माता आहे कृपेचा सागर आहे दिनाचा दयाळ आहे पण दुष्टांचा कर्दनकाळ आहे. त्याचे सर्व देव चिंतन करतात सर्व मुनी त्याचे ध्यान करतात असा तो निर्गुण निराकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे श्रुतीलाही समजले नाही ते आम्हाला त्याचे गीत गायल्याने साफाडले आहे.
अभंग क्र. ९७२
माझे मनोरथ पावले जै सिद्धी । तई पायी बुद्धी स्थिरावली ॥१॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हे ॥धृपद॥
त्रिविध तापाचे जालेसे दहन । सुखावले मन प्रेमसुखे ॥२॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगी संग अखंडित ॥३॥
जीवनाचा जाला ओलावा अंतरी । विश्व विश्वंभरी मावळले ॥४॥
तुका म्हणे माप भरु आले सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥
अर्थ

माझे मनोरथ तेंव्हाच सिद्धीला जाईल जेंव्हा माझी बुद्धी हरी चरणी स्थिर होईल. या हरीच्या स्मरणाने माझा जीव समाधान पावला असून निश्चल झाला असून माझी सर्व हळहळ संपली. हरीच्या प्रेम सुखाने माझे मन सुखावले असून त्रिविध तापाचे दहन झाले आहे. पांडुरंग रुपी महालाभ मला झाला व नामरूपाने तो माझ्या जिभेवर वसला व सर्वांगामध्ये तोच अखंडित पणे व्यापून राहिला आहे. माझ्या जीवनाच्या अंतरंगात ओलावा निर्माण होऊन या विश्वाचा विश्वंभर माझ्या अंतरंगात राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या प्रमाणे माप भरल्यावर जसे सिग लागते जसे गंगेला अनेक प्रवाह मिळून पूर येतो त्याप्रमाणे माझ्या हरी प्रेमाला पूर आला आहे.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading