७ जानेवारी, दिवस ७, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी १५१ ते १७५, सार्थ तुकाराम गाथा अभंग ७३ ते ८४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 January

राम कृष्ण हरी आज दिनांक 7 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

151-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥1. 17॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक् ॥1. 18॥
स घोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥1. 19॥

भावार्थ :-
हे राजा ! महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुमनं तसेच विराट राजा, अजिंक्य असा सात्यकी ॥17॥
द्रुपद राजा आणि द्रौपदीचे पाच पुत्र, सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वानी आपले वेगवेगळे शँख वाजविले. ॥18॥
त्या भयंकर अश्या तुंबळ ध्वनीने आकाश व पृथ्वी दणाणून गेली. त्यामुळे धृतराष्टराच्या पुत्राची हृदये विदीर्ण झाली. ॥19॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ॥1-151॥
त्या पांडवसैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पाच पुत्र इत्यादी अनेक वीर, महाशक्तिशाली काशीराज होते. ॥151॥
152-1
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥1-152॥
त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, नृपश्रेष्ठ दृष्टदुम, शिखंडी, ॥152॥
153-1
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिही नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥1-153॥
तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते, त्यांनी आपापली शंख वाजविण्यास प्रारंभ केला. ॥153॥
154-1
तेणे महाघोषनिर्घाते । शेष कूर्म अवचिते । गजबजोनि भूभाराते । सांडू पाहती ॥1-154॥
त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कुर्मदेखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले ॥154॥
155-1
तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥1-155॥
या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डलमळू लागले. मेरू व मांदार पर्वत पुढे-मागे हलू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या. ॥155॥


156-1
पृथ्वीतळ उलथो पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥1-156॥
पृथ्वी उलथू पाहत होती. आकाशाला मोठंमोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय, असे वाटू लागले. ॥156॥
157-1
सृष्टी गेली रे गेली । देवा मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकी ॥1-157॥
सृष्टी गेली रे गेली, देव आता निराधार झाले, अशी सत्यलोकामध्ये एकच आरोळी उठली. ॥157॥
158-1
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु जाहला । तिन्ही लोकी ॥1-158॥
दिवसाच सूर्य स्तब्ध झाला. प्रलयकाळाप्रमाणे तिन्ही लोकात मोठा हाहा:कार झाला. ॥158॥
159-1
ते देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणे होय पा अंतु । मग लोपिला अद्‍भुतु । संभ्रमु तो ॥1-159॥
ही परिस्तिथी पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले, कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल, हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. ॥159॥
160-1
म्हणौनि विश्व सांवरले । एर्‍हवी युगांत होते वोडवले । जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकी ॥160॥
त्यामुळे जग सावरले गेले; नाही तर श्रीकृष्णादिकांनी जेव्हा मोठे शंख वाजविले, त्याच वेळी महाप्रलंय होण्याची वेळ आली होती. ॥160॥


161-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तो घोष तरी उपसंहरला । परी पडसाद होता राहिला । तेणे दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥161॥
तो महानाद शांत झाला; परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता, त्यामुळे कौरव सैन्याची दाणादाण उडाली. ॥161॥
162-1
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयाते भेदितु । कौरवांचिया ॥162॥
सिहं हत्तीच्या कळपात गेला, तर त्यांच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरव सैनेची हृदये विदीर्ण झाली. ॥62॥
163-1
तो गाजत जव आइकती । तव उभेचि हिये घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ॥163॥
तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या-उभ्याने धैर्य सोडले, तरी पण एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. ॥63॥
164-1
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥1. 20॥

भावार्थ :-
धृतराष्टराचे पुत्र युद्धासाठी सज्ज झालेले पाहून एकमेकांवर शस्त्र चालविण्याचा प्रसंग प्राप्त झाला. त्या वेळी ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे, अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती घेतले. ॥20॥
तेथ बळे प्रौढीपुरते । महारथी वीर होते । तिही पुनरपि दळाते । आवरिले ॥164॥
त्या रणांगणावर बलाढ्य व धैर्ययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देऊन पुनः सैन्याला सावरले. ॥64॥
165-1
मग सरिसेपणे उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडी क्षोभले । लोकत्रय ॥165॥
त्यावेळी ते सैन्य युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसून आले. ॥65॥


166-1
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयात जलधर । अनिवार का ॥166॥
प्रलयकालाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. ॥66॥
167-1
ते देखलिया अर्जुने । संतोष घेऊनि मने । मग संभ्रमे दिठी सेने । घालीतसे ॥167॥
हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पहिले. ॥67॥
168-1
तव संग्रामी सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । तव लीलाधनुष्य उचलले । पंडुकुमरे ॥168॥
त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले. अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले. ॥68॥

169-1
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥1. 21॥
यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥1. 22॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥1. 23॥

भावार्थ :-
हे राजा ! त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥21॥
युद्ध करण्यासाठी उभे असलेल्यांचे मी निरीक्षण करतो आणि मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे, ते पाहतो. ॥
22॥
दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावे, या हेतूने जे योद्धे आले आहेत, त्यांना मी पाहतो. ॥23॥

ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा । आता झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्ये घालावा । दोही दळा ॥169॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर ॥69॥
170-1
जव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥170॥
येथे युद्धासाठी जे आलेले आहेत, त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे, तोपर्यंत तू रथ येथे उभा कर. ॥170॥


171-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एथ आले असती आघवे । परी कवणेसी म्या झुंजावे । हे रणी लागे पहावे । म्हणौनिया ॥171॥
येथे सर्व आले आहेत; पण मी या रणांगणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरूर आहे. म्हणून (मी पाहतो) ॥171॥
172-1
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवेवीण हाव । बांधिती झुंजी ॥172॥
फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून त्यांच्या राज्यात सुबत्ता असूनही ते निष्कारण युद्धाची हाव धरतात. ॥172॥
173-1
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामी धीर नव्हती । हे सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥
हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे म्हणाला — ॥173॥

174-1
सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥1. 24॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥1. 25॥
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥1. 26॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥1. 27॥
भावार्थ :-

संजय म्हणाला, ” हे भरतकुलोत्पना धृतराष्ट्र, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी (तो) उत्तम रथ थांबवून. ॥24॥
भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे त्यांच्या समोर म्हणाला, ” हे पार्था, जमलेल्या या कौरवाना पाहा. ॥25॥
त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरू, मामा, बंधू, पुत्र, नातू, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही या सर्वाना दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाने पाहिले. पहिले. ॥26॥
येथे जमलेले आपले बांधवांच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला, ॥27॥
आइका अर्जुन इतुके बोलिला । तव श्रीकृष्णे रथु पेलिला । दोही सैन्यांमाजी केला । उभा तेणे ॥174॥
हे राजा एका ! अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्यांनी दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. ॥74॥
175-1
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥175॥
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण इत्यादी आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, ॥75॥

दिवस ७ वा, ७ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७३ ते ८४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. ७३
माया ब्रम्ह ऐसे म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयी लंपट शिकवी कुविद्या । मनामागे नांद्या होऊनि फिरे ॥धृपद॥
करुनी खाता पाक जिरे सुरण राई । करिता अतित्याई दुःख पावे ॥२॥
औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनिया गुळा दृष्टीपुढे ॥३॥
तरावया आधी शोधा वेदवाणी । वांजट बोलणी वारा त्यांची ॥४॥
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण । न घडे नारायण भेट तया ॥५॥
अर्थ

समाजात काही पढतमुर्ख, धर्मपंडित माया आणि ब्रम्ह यावर बडबड करुण सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलुन ते स्वत:ची तर फजीती करतात परंतु दुसर्‍याची दिशाभुल करुन त्यांचीही फजीती करतात. विषयलंपट इतरांना कुविद्या, अधर्म शिकवितो, त्याच्यामागे लोक फिरत असतात. सुरन आणि मोहरी शिजवुन खाल्ल्याने लाभ होतो, तर कच्चे खल्ल्याने अपचन होते. आजारी मुलाला कडु औषध देताना आई त्याला गुळाच्या खडयाचे आमिष दाखवते. प्रपंचाच्या भवसगरातून तरुन जाण्यासाठी वेदाचे संशोधन करुन त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे, त्यातील त्रुटि काढून टाकल्या पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वता:च्या देहाविषयी आसक्त असतो, त्याला देव भेटने कठिण आहे.
अभंग क्र. ७४
मृगजळ दिसे साचपणा ऐसे । खोटियाचे पिसे ऊर फोडी ॥१॥
जाणोन का करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाही ॥धृपद॥
संचित सांगाती बोळवणे सवे । आचरले द्यावे फळ तेणे ॥२॥
तुका म्हणे शेखी श्मशान तोवरी । संबंध गोवरी आगी सवे ॥३॥
अर्थ

उन्हाच्या झळया हरणाला पाण्याप्रमाने भासतात म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते, मृगजळ हा एक भास आहे. मानविजिवन हे तसेच आहे, प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळामागे धावतो. आपले पूर्वसंचित ज्या प्रमाणे आहे त्याप्रमानेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात, मानवी देहाचा शेवट श्मशानात होतो तेथे अग्नि, गोवर्‍यांशी त्याचा समंध येतो तेव्हा मानवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे.
अभंग क्र. ७५
गौळीयाची ताकपिरे । कोण पोरे चांगली ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥धृपद॥
काय उपास पडिले होते । कण्याभोवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥
अर्थ

गोकुळातील गवळ्यांची ताक-दूध पीणारी मुले मनाने चांगली होती. म्हणून प्रत्यक्ष श्रीकृणाला त्यांच्याशी नाते जुळवायला आवडले. विदुराघरी प्रेमाने दिलेल्या ताककण्यांचा आस्वाद घेतला ते, श्रीकृष्णला प्रेमळअन्नाची कमतरता भसली होती म्हणून नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत कुरूप, अष्टवक्रा कृब्जादासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णला ती प्रिय झाली होती.
अभंग क्र. ७६
आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥धृपद॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥३॥
अर्थ

तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्व:ताच्या हाताने नाश करू नका. या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा; या साठी ते सर्वाना दंडवत घालून विनंती करतात. एकाग्र मन करुण भगवंतचे चिंतन करा. तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार करा.
अभंग क्र. ७७
भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ॥१॥
शोभविले येर येरा । सोने एके ठायी हिरा ॥धृपद॥
देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥
तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ॥३॥
अर्थ
भक्तावाचुन देवाची सगुण भक्ती कोण करेल ? भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते. हीरा सोन्याच्या कोंदनातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे. देवाशिवाय भक्ताला निष्कामभक्ती शिकविणारा कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात की, आई आणि मुलाचा जसे प्रेमाचे नाते असते त्याप्रमाणे देव व भक्त यांचे नाते आहे.
अभंग क्र. ७८
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥धृपद॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त चांगले ॥३॥
अर्थ

या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो. तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो. परमेश्वर निष्काम असूनही गोपीना त्याचा वेध लागला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असुन व्यक्त, सगुन साकार रूपामधे आला आहे.
अभंग क्र. ७९
काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा ॥१॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृपद॥
आडविले दासी । तरि का मरती उपवासी ॥२॥
तुका म्हणे हाती । कळा सकळ अनंती ॥३॥
अर्थ

सूर्योदयासमयी कोबडा आरवतो व त्यासमायी सूर्य उदयाला येतो, म्हणून कोबड्याने सूर्योदय घडऊन अणला, असे होत नाही. माझी योग्यता नसताना हे विठ्ठला, तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस ? एखादी श्रीमंत व्यक्ती दासिच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या आधीन आहे.
अभंग क्र. ८०
जेविताही धरी । नाक हागतियेपरी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥धृपद॥
सांडावे मांडावे । काय ऐसे नाही ठावे ॥२॥
तुका म्हणे करी । ताक दुधा एकसरी ॥३॥
अर्थ

काही मुर्ख माणसे प्रात:विधीवेळी(शौच्याच्या वेळेस) वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतनाही लावतात. कोणत्या वेळी काय करावे, काय करू नाही याचे ज्ञान त्यांना नसते. त्यामुळे ते आपलिच फजीति करुण घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही.
अभंग क्र. ८१
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळो आले खट्याळसे । शिवो नये लिंपोदोषे ॥धृपद॥
फोडावे मडके । मेले लेखी घाये एके ॥२॥
तुका म्हणे त्यागे । विण चुकी जे ना भोगे ॥३॥
अर्थ

परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तो संबंध तोडून टाकावा. या नातेवाईकांना आपल्यापासून दूर केले असता त्यांचा दोष आपल्याला लागत नाही. एखाद्या मनुष्या मृत्यु झाला म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडले जाते, त्याप्रमाणे सार्‍या नातेवाइकाचा संबंध तोडूंन टाकावा. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही.
अभंग क्र. ८२
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकाचे देखी । सांगता नव्हे सुखी साखरेसि ॥धृपद॥
कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेविण नका वाव घेऊ ॥३॥
अर्थ

एक मुर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते. इतर प्रसुत झालेल्या स्त्रीयांच्या क्रीया पाहुन तिही प्रसुतीचे चाळे करते, तसे साखरेची गोडी सांगुण कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्याचप्रमाने न जेवताच ढेकर देणाराहि जेवनाने तृप्त झाल्याचा देखावा करुन स्वत:लाच कष्टि करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, त्याचे नाटक करता येत नाही, आणि तसे केले असता फजीतीच होते.
अभंग क्र. ८३
जेणे घडे नारायणी अंतराय । होत बाप माय वर्जावी ती ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती ती दुःखा पात्र शत्रु ॥धृपद॥
प्रल्हादे जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरते केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
अर्थ

नारायणाचि भक्ती करतांना प्रत्यक्ष जन्मदाते बाप माय जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे. पत्नी, पुत्र, धन यांनाही पमार्थापासून दूर ठेवावे, परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रु आहेत. प्रल्हादाने आपल्या माता पित्यांचा, बिभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वधर्म हरिच्या पायाशी असतांना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचे मूळ आहेत.
अभंग क्र. ८४
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हेचि देवाचे दर्शन । सदा राहे समाधान ॥धृपद॥
शांतीची वसती । तेथे खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडे आहे ॥३॥
अर्थ

परमार्थमार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान, अभिमान गुंधळून ठेवावे. चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे. जेथे शांति असते तेथे काळही थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच्यातील सर्व कामविकारांच्या उर्मि शांतपणे सहन करणे म्हणजे परमार्थमार्गाची वाटचाल करणे होय.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading