आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ जानेवारी, दिवस ५, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी १०१ ते १२५, सार्थ तुकाराम गाथा अभंग ४९ ते ६०
“५ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 5 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
101-1
हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा ॥1-101॥
दुर्योधन पुन्हा म्हणाला, हे द्रोणाचार्य ! सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू पाहा. ॥101॥
102-1
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥1-102॥
शिवाय, द्रौपदीचे पुत्रही रणांगणात आले आहेत. हे सर्वही योद्धे महारथी आणि शूरवीर आहेत. पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत हे मला माहित नाही; परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत. ॥102॥
103-1
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥1. 7॥
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥1. 8॥
भावार्थ :ऱ्हे द्विजश्रेष्ठा ! आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत, त्यांची नावे आपल्या माहिती साठी सांगतो, तरी श्रवण करावे. ॥7॥
स्वतः पितामह भीष्मांचार्य, कर्ण, सदैव विजयी असे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, आणि युद्धजेता सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा हे आहेत. ॥8॥
आता आमुच्या दळी नायक । जे रूढवीर सैनिक । ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥1-103॥
आता आमच्या सैन्यातील प्रसिद्ध असे शूर सैनिक, सेनाप्रमुख जे आहेत त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो, ते आपण ऐकावे. ॥103॥
104-1
उद्देशे एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जे ॥104॥
तुम्ही आदी करून जे प्रमुख वीर आहात, त्यापैकी एक-दोन नावे थोडक्यात सांगतो. ॥104॥
105-1
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥1-105॥
पराक्रमाने सूर्यासारखा तेजस्वी असणारा असा हा गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला जणू काही सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आपल्या सेनेमध्ये आहे. ॥105॥
106-1
या एकेकाचेनी मनोव्यापारे । हे विश्व होय संहरे । हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥1-106॥
या एकाच्याही फक्त मनात आले, तर या विश्वाचा संहार होऊन जाईल. एवढेच काय, एकटे कृपाचार्यदेखील हे कृत्य करू शकतील. ॥106॥
107-1
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहे । याचा आडदरु सदा वाहे । कृतांतु मनी ॥1-107॥
येथे विकर्ण महावीर आहे. तो पाहा, पलीकडे अश्वत्थामा आहे. काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते. ॥107॥
108-1
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥1. 9॥
भावार्थ :-
याशिवाय अनेक महावीर आहेत, जे माझ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांच्याजवळ विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्धकलेमध्ये निपुण आहेत. ॥9॥
समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयाचिया बळा मिती । धाताही नेणे ॥1-108॥
त्याचप्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा व त्यासारखे असे आणखीन खूप महावीर आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रम्हदेवालाही समजू शकत नाही. ॥108॥
109-1
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो का जे अस्त्रजात । एथूनि रूढ ॥109॥
हे अस्त्रविद्येमध्ये तरबेज आहेत, जणू काही मंत्रविद्येचे प्रत्येक्ष अवतारच आहेत. यांच्यापासूनच अस्त्रविद्देचा प्रसार होऊन ती रूढ झाली आहेत. ॥109॥
110-1
हे अप्रतिमल्ल जगी । पुरता प्रतापु अंगी । हे अप्रतिमल्ल जगी । पुरता प्रतापु अंगी । परी सर्व प्राणे मजलागी । आरायिले असती ॥1-110॥
या जगात हे अप्रतिम योद्धे आहेत. त्यांच्या अंगी पुरेपुर बळ, सामर्थ्य आहे. असे हे सर्व वीर असूनही ते जिवावरती उदार होऊन माझ्या बाजूला येऊन मिळालेले आहेत. ॥110॥
111-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पतिव्रतेचे हृदय जैसे । पतिवाचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ॥1-111॥
ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय शुद्ध असते, ते मनाने देखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे. ॥111॥
112-1
आमुचिया काजाचेनि पाडे । देखती आपुले जीवित थोकडे । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥1-112॥
आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचेदेखील काही वाटत नाही. ते प्राणाची पर्वा करत नाहीत. ते निस्सीम स्वामिभक्त आहेत. ॥112॥
113-1
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती । हे बहु असो क्षात्रनीति । एथ ोनिया ॥113॥
हे सर्व युद्धकलेत कुशल आहेत; त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत. क्षात्रधर्म मुळात त्यांच्यापासूनच निर्माण झाला आहे. ॥113॥
114-1
ऐसे सर्वापरि पुरते । वीर दळी आमुते । आत काय गणू याते । अपार हे ॥1-114॥
याप्रमाणे युद्धकलेत परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही ॥114॥
115-1
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥1. 10॥
भावार्थ :-
आमचे सैन्य अमर्यादित असून तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवाचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे. ॥10॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगी सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पै ॥1-115॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥
116-1
आता याचेनि बळे गवसले । हे दुग जैसे पन्नासिले । येणे पाडे थेकुले । लोकत्रय ॥1-116॥
भीष्माचार्यांनी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की, सुरक्षिततेसाठी जणू काही मजबुत असे किल्लेच उभारले आहेत. यांच्यासमोर त्रैलोक्यदेखील तोकडे वाटते. ॥116॥
117-1
आधीच समुद्र पाही । तेथ दुवाडपण कवणा नाही । मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥1-117॥
समुद्र हा मुळातच सर्वाना भीतिदायक आहे आणि त्या समुद्राला जर वडवानळाने साहाय्य केले, तर तो अधिकच भयानक होणार. ॥117॥
118-1
ना तरी प्रळयवन्ही महावातु । या दोघा जैसा सांधातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥1-118॥
प्रलयकाळचा महान अग्नी आणि प्रलयकाळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा, त्याप्रमाणे हा गंगापुत्र आहे; आणि त्याला सेनापतिपद मिळालेले आहे. ॥118॥
119-1
आता येणेसि कवण भिडे । हे पांडवसैन्य कीर थोकडे । परि वरचिलेनि पाडे । दिसत असे ॥1-119॥
तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढू शकेल ? आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवाचे सैन्य अपुरे दिसत आहे. ॥119॥
120-1
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसे बोलोनिया मातु । सांडिली तेणे ॥1-120॥
शिवाय युद्धातील कैशल्य न जाणणारा भीम हा पांडव-सैन्याचा अधिपती झाला आहे. दुर्योधनाने एवढे बोलून सैन्याचे वर्णन थांबविले. ॥120॥
121-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥1. 11॥
भावार्थ :-
म्हणून सर्व प्रवेश मार्गावर आपापल्या नेमलेल्या जगी उभ्या असलेल्या आपण सर्वानी पितामह भीष्माचार्याचे रक्षण करावे. ॥11॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितले । आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥1-121॥
मग पुन्हा दुर्योधन सर्व सेनांप्रमुखाना म्हणाला, आता आपापल्या सैन्याला सज्य करा. ॥121॥
122-1
जया जिया अक्षौहिणी । तेणे तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथीया ॥1-122॥
ज्या प्रमुख सेनापतीँच्या सत्तेखाली ज्या अक्षौहिणी सेना आहेत, त्यांनी आपल्या सेनेवर युद्ध संपेपर्यंत पूर्ण नियंत्रण ठेवावे. विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत. ॥122॥
123-1
तेणे तिया आवरिजे । भीष्मातळी राहिजे । द्रोणाते म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥1-123॥
त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी. तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील, त्याप्रमाणे वागावे. दुर्योधन एवढे बोलून द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वावर लक्ष ठेवावे. ॥123॥
124-1
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणे दळभारु आघवा । साचु आमुचा ॥1-124॥
भीष्माचार्याचे सर्वानी मिळून रक्षण करावे. माझ्याप्रमाणे त्याना रक्षणीय मानावे. त्यांच्यामूळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे. ॥124॥
125-1
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥1. 12॥
भावार्थ :-
दुर्योधनाच्या मनात हर्ष निर्माण करणारे, कौरवांत वडील असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंहासमान गर्जना केली आणि शंखनिनाद केला. ॥12॥
या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणे केला । सिंहनादु ॥125॥
दुर्योधन राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्याना संतोष झाला आणि त्यांनी सिहंनादासमान गर्जना केली. ॥125॥
दिवस ५ वा, ५ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४९ ते ६०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ४९
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥१॥
काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥धृपद॥
हरीहरा नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥२॥
तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥
अर्थ
जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहित ? काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्वच संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणा विषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते काही मला कळतच नाही.
अभंग क्र. ५०
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥धृपद॥
परपीडे परद्वारी सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥२॥
न मळिता निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडे । विषाचे ते कीडे दुग्धी मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥
अर्थ
ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर दुःखाने आक्रोश करत असतात. अश्या पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही ? त्याची माता वांझ का राहिली नाही ? अश्या पुत्राला तिने का बरे जन्म दिला ? अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते. त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाणे वाटते. परोपकार, पूण्य यांचे त्याला वावडे असते जसे विषारी कीडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति असतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांतीचा लवलेश नसतो.
अभंग क्र. ५१
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥
नाही भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥धृपद॥
माणसासि भुंके । विजातीने द्यावे थुंके ॥२॥
तुका म्हणे चित्त । मळिण करा ते फजित ॥३॥
अर्थ
शीघ्रकोपि मनुष्य स्वता::च्या नाश करून घेतो, तो कुत्र्यप्रमाणे असतो. ज्याला दुसर्याचा आदर करता येत नाही, आणि ज्याच्याकडे धैर्य नसते, त्याला उपदेश व दुध पचतच नाही ते वाया जातो. माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात. तुकाराम महाराज म्हणतात, आशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजीती करावी.
अभंग क्र. ५२
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोका । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर का नाही घातली ॥धृपद॥
भूमि कापे त्याच्या भारे । कुंभपाकाची शरीरे । निष्ठुर उत्तरे । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगाते विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥३॥
अर्थ
आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला. तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही. ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते, जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा त्याच्या संगतीत विटाळ होतो, अशा खळप्रवृत्तीचा धिक्कार असो.
अभंग क्र. ५३
नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा ॥१॥
नेणे राग वेळ काळ घात मात । तुझे पायी चित्त ठेवी देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाही जना । तुज नारायणा वाचूनिया ॥३॥
अर्थ
मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही.
अभंग क्र. ५४
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥
तव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडिता ॥धृपद॥
उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती ॥३॥
अर्थ
आपल्या काव्यात काव्यगुण नसतांना कहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दरोदारी जाउन लोकांना सांगतात. जे जाणकार आहेत, ते त्यांची योग्य पारख करतात मग तेथून जातांना त्या स्वत:ला कवी म्हणावणारर्याची मान लाजेने खाली जाते. उष्ठावळी जमा करुण बळेच प्रेमाचे आव आणतात. तुकाराम महाराज म्हणतात अश्या वरकर्णि भगवंतभक्तिचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत.
अभंग क्र. ५५
उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा । नेदू आता पीडा आतळो ते ॥१॥
काशासाठी हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥धृपद॥
काय नाही देवे करूनि ठेविले । असे ते आपुले ते ते ठायी ॥२॥
तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हा आपपर बोळविले ॥३॥
अर्थ
प्रायश्चित्ताने संसार रुपी उपाधीचे निवारण करता येते, तद्ववत प्रपंच्यातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा उडवुन घेतला आता प्रपंच्याची पीडा मला मी शिवु देणार नाही. भक्तिमार्ग हाती घेतलेला असतांना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तुस स्पर्श करुण हात धुवावे. या विश्वामधे भगवंतने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे माझा अहंकार गेला म्हणजे आपले-परके हा भेदच संपला.
अभंग क्र. ५६
योगाचे ते भाग्य क्षमा । आधी दमा इंद्रिये ॥१॥
अवघी भाग्ये येती घरा । देव सोयरा जालिया ॥धृपद॥
मिरासीचे म्हूण सेत । नाही देत पीक उगे ॥२॥
तुका म्हणे उचित जाणा । उगी सिणा काशाला ॥३॥
अर्थ
योगाचे भाग्य हे क्षमा आहे जो इंद्रियांचे दमन करतो ज्याच्या चित्तामधे क्षमा असते तो योगी असतो. त्या मुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते. ज्या प्रमाणे ईनामी मिळालेल्या शेतातसुद्धा कष्ट केल्याशिवाय पिक येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, योग्य अयोग्य जाणुन घ्या, नाहीतर वृथा शिण होईल.
अभंग क्र. ५७
न ये नेत्रा जळ । नाही अंतरी कळवळ ॥१॥
तो हे चावटीचे बोल । जन रंजवणे फोल ॥धृपद॥
न फळे उत्तर । नाही स्वामी जो सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जव नाही दृष्टादृष्टी ॥३॥
अर्थ
ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरि भक्तीचि तळमळ नाही. त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविणारे असतात. आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात. ज्याच्या मना मध्ये आपल्या स्वामी हरी, गुरु विषयी आदर नसतो त्यांनी उपदेश फल्द्रुप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो पर्यंत समोरा समोर भेट होत नाही तो पर्यंत आम्ही भेटलो म्हणणे उपयोगाचे नाही.
अभंग क्र. ५८
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायी ॥१॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥धृपद॥
विषयांचे चरवणी । केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा । नाही दया देव धोंडा ॥३॥
अर्थ
एका ढोंगी, कर्मठ मनुष्याने आपल्या माता-पित्याचे श्राद्ध घातले, आईसाठी सवासिन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राम्हण म्हणून आपणच बसला. त्या मुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले; कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत. असे विषयलोलुपता गृहस्थ स्वत:च्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे पाखंडी, अहंकारी लोक दगडालाच देव मानतात (अर्थ तपासा)
अभंग क्र. ५९
दाने कापे हात । नावडे तेविशी मात ॥१॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरी मिथ्या फोल ॥धृपद॥
नव जाती पाप । तीर्था म्हणे वेचू काय ॥२॥
तुका म्हणे मनी नाही । न ये आकाराते काही ॥३॥
अर्थ
ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व् ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर अवडत नाही. ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलने आवडते, दुधात हींग घातले असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगिपणाचे असते. त्याचे पाय तीर्थ यात्रेला वळत नाहीत; कारण तो गरीब, दरिद्रयाचे ढोंग करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ठ त्यांच्या हातून कधीच घडत नाही.
अभंग क्र. ६०
वळिते जे गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥
निवे भावाचे उत्तरी । भलते एके धणी वरी ॥धृपद॥
न लगती प्रकार । काही मनाचा आदर ॥२॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवे दीना ॥३॥
अर्थ
गाई-गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लगत नाही त्यांना कर्मकांडाची आवशकता भासत नाही. त्याच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहुन परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो. परमेश्वराला वश करुण घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ पणाची त्यांना गरज नसते. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून हरीला शरण जातो, त्याला परमेश्वर वश होतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















