२ जानेवारी, दिवस २, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १, ओवी २६ ते ५०, सार्थ तुकाराम गाथा अभंग १३ ते २४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 January

राम कृष्ण हरी
आज दिनांक 2 जानेवारी असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १ ते १२ चे पारायण आपण करणार आहोत.
२ जानेवारी, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी २६ ते ५०,


26-1
का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी । ना तरी अमृतरसास्वादनी । रस सकळ ॥1. 26॥
एका समुद्र स्नानामुळे त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वाचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते. ॥1-26॥
27-1
तैसा पुढतपुढती तोचि । मिया अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥1. 27॥
तसे एका सद्गुरूंना वंदन केले असता, सर्वाना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात. ॥1-27॥
28-1
आता अवधारा कथा गहन । जे सकळा कौतुका जन्मस्थान । की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥1. 28॥
आता सखोल विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वाच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे. ॥1-28॥
29-1
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥1. 29॥
ही महाभारतातील गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे. ॥1-29॥
30-1
की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजाता वसौट । अशेषांचे ॥1. 30॥
किंवा महाभारताच्या रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे. ॥1-30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-1
ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्‍नभांडार । शारदेचे ॥1. 31॥
महाभारत हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ॥1-31॥
32-1
नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोनि महामती । व्यासाचिये ॥1. 32॥
सरस्वती महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली. ॥
33-1
म्हणौनि हा काव्यारावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसा झाला आवो । रसाळपणाचा ॥1. 33॥
हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥1-33॥
34-1
तेवीचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधी कोवळीक । दुणावली ॥1. 34॥
तसेच, या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ॥1-34
35-1
एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥1. 35॥
या महाभारतात चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले. ॥1-35


36-1
माधुर्यी मधुरता । श्रुंगारी सुरेखता । रूढपण उचिता । दिसे भले ॥1. 36॥
माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या. ॥1-36
37-1
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥1. 37॥
यातील कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले. ॥1-37
38-1
आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक । गुणा सगुणपणाचे बिक । बहुवस एथ ॥1. 38॥
सुक्षमबुद्धीने महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचे सामर्थ्य प्रगट झाले. ॥

39-1
भानुचेनि तेजे धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले । तैसे व्यासमति कवळिले । मिरवे विश्व ॥1. 39॥
सूर्याच्या तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले. ॥
40-1
का सुक्षेत्री बीज घातले । ते आपुलियापरी विस्तारले । तैसे भारती सुरवाडले । अर्थजात ॥1. 40॥
उत्तम जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ॥1-40
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-1
ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होईजे । तैसे व्यासोक्तितेजे । धवळत सकळ ॥1. 41॥
ज्याप्रमाणेनगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ॥1-41
42-1
की प्रथम वयसाकाळी । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥1. 42॥
तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो. ॥1-43
ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासौनि अपाडे । जियापरी ॥1. 43॥
43-1
वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते. ॥1-43
44-1
नानाघनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळिता साधारण । मग अलंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥1. 44॥
लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते. ॥1-44
45-1
तैसे व्यासोक्ति अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले । ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥1. 45॥
महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे. ॥1-45


46-1
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागी । सानीव धरूनि आंगी । पुराणे आख्यानरूपे जगी । भारता आली ॥1. 46॥
आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली. ॥1-46
47-1
म्हणौनि महाभारती नाही । ते नोहेचि लोकी तिही । येणे कारणे म्हणिपे पाही । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥1. 47॥
म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. ‘व्यासोंच्छिष्ट जगतत्रय’ असे म्हणतात. ॥1-47
48-1
ऐसी जगी सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥1. 48॥
अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली. ॥1-48
49-1
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥1. 49॥
श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे. ॥1-49
50-1
आता भारती कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥1. 50॥
महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे. ॥1-50
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २ रा, २ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२ ते २४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १२
हरिच्या जागरणा । जाता का रे नये मना ॥१॥
कोठे पाहासील तुटी । आयुष्य वेच फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तो मोकलिती अंती ॥२॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
अर्थ

हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही ?. या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्यासाठी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामध्ये आहे याचा विचार कर.
अभंग क्र. १३
धर्माची तू मूर्ती । पाप पुण्य तुझे हाती ॥१॥
मज सोडवी दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥धृपद॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥
जिवीच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
अर्थ

हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ति आहेस, पाप-पूण्य घडवुन आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे.
या प्रपंच्यातील कर्मापासून माझी सोडवणुक करा. हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय ? तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे.
अभंग क्र. १४
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ॥१॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥धृपद॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
अर्थ

अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते. मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन.
अभंग क्र. १५
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥धृपद॥
विठो माउलिये हाचि वर देई । संचरोनि राही हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे काही न मागे आणीक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥३॥
अर्थ

हे माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असो अरे तुझे नाम व रूप इतके गोड आहे कि ते मला सदा सर्व काळ प्रेम देते व तू मला नित्य प्रेम दे. हे विठू माऊली मला हाच वर दे कि तू माझ्या हृदया मध्ये संचारून राहशील. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुला दुसरे काही मागत नाही तुझ्या पायाशीच सर्व सुख आहे.
अभंग क्र. १६
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥धृपद॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतिले सकळही ॥२॥
कासे सोनसळा पाघरे पाटोळा । घननीळ सावळा बाईयांनो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ॥४॥
अर्थ

राजस, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेज्यात लपल्या आहे. त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे गळ्यात वैजयंती माळा रूळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पाघरला आहे बायानो असा हा विठुराया सवळया रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बयांनी एका बाजुला व्हा मझ्या आड येउ नका, श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही.
अभंग क्र. १७
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसे रूप हरी दावी डोळा ॥धृपद॥
कटी पीतांबर कास मिरवली । दाखवी वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेचि रूप ॥३॥
झुरोनी पाजरा होऊ पाहे आता । येई पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ॥५॥
अर्थ

विठुराया कमरेवर हात ठेऊन, गळ्यात तुळशिमाळा धारण करून उभा आहे, हे हरी असे रूप मला वारंवार दाखव. दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव. गरुड पारावार उभे असलेले तुझे रूप मला नेहमी अठवते. या गोड सरूपाच्या आठवानीने माझे शरिर अस्थिपंजर बनु लागले आहे तेव्हा हे पंढरी राया, मला भेटायला ये. तुकाराम महाराज म्हणतात, की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्राथनेचा अव्हेर करू नये.
अभंग क्र. १८
गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥
बरविया बरवंटा घनमेघ सावळा । वैजयंतीमाळा गळा शोभे ॥धृपद॥
मुगुट माथा कोटि सूर्यांचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥२॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहीकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकासारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥
अर्थ

गरुडरूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पीतांबर नसलेले, मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहीन ? उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे गळ्यात वैजयंती माळा शोभत आहे. त्याने मस्तकावर कोटि सूर्‍याच्या तेज्याप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभुन दिसत आहे. सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून, त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे. त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर ‍हे उभे आहेत सनकादिक त्याच्या किर्तीचे गुणगान करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाहि नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे.
अभंग क्र. १९
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥धृपद॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाही । इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥
बैसलिये ठायी लागले भरते । त्रिपुटीवरते भेदी ऐसे ॥३॥
हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी । नारायण अंगी विसावला ॥४॥
तुका म्हणे बहु लाटे हे भोजन । नाही रिता कोण राहत राहो ॥५॥
अर्थ

ब्रम्हादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत, म्हणून बलवान आहोत. आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्ति मुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे. कामधेनुच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जी प्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते, तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो. परमेश्वरप्रेमाचे असे भरते आमच्या मनामधे निर्माण झाले आहे, की त्यामुळे त्रिपुटिंचाहि भेद करता येतो. आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आसल्यामुळे आम्हाला हार मनण्याची माहित नाही; कारण आम्ही विष्णुदास आहोत. या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे.
अभंग क्र. २०
दुजे खंडे तरी । उरला तो अवघा हरी । आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुले जाणावया जाणा । कोड तरी मने मना । पारधीच्या खुणा । जाणतेणेचि साधावे ॥धृपद॥
देह आधी काय खरा । देहसंबंधपसारा । बुजगावणे चोरा । रक्षणसे भासते ॥२॥
तुका करी जागा । नको चाचपू वाउगा । आहेसि तू अगा । अंगी डोळे उघडी ॥३॥
अर्थ

ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे, हे ध्यानात येते; त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो. हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामची ओळख पटउन घेतली पाहिजे ज्या प्रमाणे पारध्याची कला पारध्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते. विषयवासनेमधे गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंमंधीचा पसारा खारा की खोटा हे लक्ष्यात येते जसे शेतीतिल बुजगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटउन घे; कारण तूच परमेश्वरस्वरूप आहेस.
अभंग क्र. २१
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥धृपद॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
अर्थ

हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे. हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या. आपल्या हातून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे. तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे.
अभंग क्र. २२
आम्ही जरी आस । जालो टाकोनि उदास ॥१॥
आता कोण भय धरी । पुढे मरणाचे हरी ॥धृपद॥
भलते ठायी पडो । देह तुरंगी हा चढो ॥२॥
तुमचे तुम्हापासी । आम्ही आहो जैसी तैसी ॥३॥
गेले मानामान । सुखदुःखाचे खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्ती । नाही वागवीत खंती ॥५॥
अर्थ

आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो. हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही.
अभंग क्र. २३
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हे ही नाही ते ही नाही । वेगळा दोही पासुनी ॥धृपद॥
देहभोग भोगे घडे । जे जे जोडे ते बरे ॥२॥
अवघे पावे नारायणी । जनार्दनी तुकयांचे ॥३॥
अर्थ

या जगात आपली कुणी स्तुति करो वा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही. कारण निंदा व स्तुति या दोन्ही गोष्टी पासून मी निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देहभोग मी निमुटपने भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलरूप असल्यामुळे माझे देह भोग मी विट्ठलालाच अर्पण करीत आहे.
अभंग क्र. २४
जन विजन जाले आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥
पाहे तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥धृपद॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुके ॥३॥
अर्थ

भक्तीचेप्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल-रखमाईच दिसते. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही; कारण माझे मन देहावर नाही सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामधे तन्मय झालो त्यामुळे मला सूखदुःखाची आठवनहि राहत नाही.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading