३० जानेवारी, दिवस ३०, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४९ ते ३६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३० जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 30 January

राम कृष्ण हरी आज दिनांक ३० जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

76-3
तू मानसा नियमु करी । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रिये ही व्यापारी । वर्ततु सुखे ॥76॥
तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत.
77-3
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥3. 8॥
भावार्थ :-

तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्यकर्म कर (म्हणजेच आपले विहित असे जे कर्म आहेत ते तू करीत जा). कारण, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ (अधिक चांगले) होय. तसेच, कर्मच जर केले नाहीस, तर तुझा शरीरनिर्वाहही (शरीराची जी कार्य आहेत, यात्रा आहे) उत्तम प्रकारे सिद्ध होऊ शकणार नाही.
म्हणशी नैष्कर्म्य होआवे । तरी एथ ते न संभवे । आणि निषिद्ध केवी राहाटावे । विचारी पा ॥77॥
कर्माचा त्याग करून कर्मातीत व्हावे म्हणशील (विहित कर्म करणे टाकून), तर ते मानवास संभवत नाही, मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे, याचा तूच विचार कर.
78-3
म्हणोनि जे जे उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त । ते कर्म हेतुरहित । आचर तू ॥78॥
म्हणून जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल, ते ते तू फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. (ते कर्म करीत जा)
79-3
पार्था आणिकही एक । नेणसी तू हे कवतिक । जे ऐसे कर्म मोचक । आपैसे असे ॥79॥
अर्जुना ! आणखी एक म्हणजे, या निष्काम कर्माचे कौतुक तू जाणत नाहीस. ते हे की, निष्काम कर्म हे प्राण्यांना (सहजपणे) कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते.
80-3
देखे अनुक्रमाधारे । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणे व्यापारे । निश्चित पावे ॥80॥
पाहा, जो वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने मोक्षाची निश्चित प्राप्ती होते.


81-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥3. 9॥
भावार्थ :-

ईश्वरार्पण बुद्धिवाचून फळाच्या इच्छेने केलेल्या कर्माने मनुष्य बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पा । म्हणोनि वर्तता तेथ पापा । संचारु नाही ॥81॥
अरे बाबा, आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पाप प्रवेश करत नाही.
82-3
हा निजधर्मु जै सांडे । कुकर्मी रति घडे । तैचि बंधु पडे । संसारिकु ॥82॥
स्वधर्मचा त्याग केला, तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते आणि वाईट कर्म केले, की माणूस जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो.
83-3
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्त्रयाजन । जो करी तया बंधन । कहीच नाही ॥83॥
म्हणून स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ-याजन करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीसुद्धा बंधन होत नाही.
84-3
हा लोकु कर्मे बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनिया ॥84॥
जो माणूस आपल्या नित्य यज्ञाला चुकला; तो कर्माने बध्द होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन होऊन पापकर्माने बांधला जातो.
85-3
आता येचिविशी पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जै सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥85॥
पार्था ! या विषयी मी तुला एक कथा सांगतो. ती अशी की, ब्रम्हदेवाने उत्पत्ती, स्थिती, लय असा सृष्टीचा आकार निर्माण केला.


86-3
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥3. 10॥
भावार्थ :-

प्रजापती ब्रम्हदेवाने कल्पाच्या आरंभी (यज्ञासह) प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हटले की, तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करील.
ते नित्ययागसहिते । सृजिली भूते समस्ते । परी नेणतीचि तिये यज्ञाते । सूक्ष्म म्हणऊनी ॥86॥
त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही गोष्टी त्यांनी बरोबर उत्पन्न केली. परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते. कारण, स्वधर्मरूप यज्ञाचे स्वरूप आहे.
87-3
ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हा । तव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥87॥
त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रम्हदेवाला विनंती केली की, देवा, या लोकात आम्हाला आधार काय ? त्यावेळी (कमळापासून ज्याची उत्पत्ती झाली) असा तो ब्रम्हदेव लोकांना म्हणाला,
88-3
तुम्हा वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्मुचि विहिला असे । याते उपासा मग आपैसे । काम पुरती ॥88॥
तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्म सांगितला आहे. त्याचे आचरण करावे, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतील.
89-3
तुम्ही व्रते नियमु न करावे । शरीराते न पीडावे । दुरी केही न वचावे । तीर्थासी गा ॥89॥
याशिवाय तुम्हाला व्रत- नियम करण्याची काही आवश्यकता नाही. अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही. तसेच, दूर कोठे तीर्थयात्रेस जाण्याची जरुरी नाही.
90-3
योगादिक साधने । साकांक्ष आराधने । मंत्रयंत्रविधाने । झणी करा ॥90॥
योग वगैरे साधने, सकाम उपासना तसेच, मंत्रतंत्रादिक अनुष्ठाने करण्याची गरज नाही.


91-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देवतांतरा न भजावे । हे सर्वथा काही न करावे । तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे । अनायासे ॥91॥
स्वधर्म सोडून इतर देवतांची पूजा अर्चा करण्याचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही; तुम्ही सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरणरूप यज्ञाचे आचरण करावे.
92-3
अहेतुके चित्ते । अनुष्ठां पा ययाते । पतिव्रता पतीते । जियापरी ॥92॥
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा.
93-3
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हा एकु । ऐसे सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥93॥
अशा प्रकारे तुम्हाला हाच एक स्वधर्मरूप यज्ञ आचरण्यास योग्य आहे, असे सत्य लोक अधिपती ब्रम्हदेव म्हणाले.
94-3
देखा स्वधर्माते भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमते सदा ॥94॥
जर, तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल, तर हा धर्म कामधेनुप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. प्रजाजन हो, मग हा स्वधर्म (स्वधर्मरूपी कामधेनू) तुम्हाला कधीही सोडणार नाही.
95-3
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥3. 11॥
भावार्थ :-
स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवाचे पूजन केले असता ते देव तुम्हाला प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्पराना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्याल.
जे येणेचिकरूनि समस्ता । परितोषु होईल देवता । मग ते तुम्हा ईप्सीता । अर्थांते देती ॥95॥
कारण या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल; आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छित भोग देतील.


96-3
या स्वधर्मपूजा पूजिता । देवतागणा समस्ता । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥
या स्वधर्मरूपी पूजेने सर्व देवतागणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम निश्चितपूर्वक चालवतील.
97-3
तुम्ही देवतांते भजाल । देव तुम्हा तुष्टितील । ऐसी परस्परे घडेल । प्रीति तेथ ॥97॥
तुम्ही स्वधर्माद्वारा देवांची भक्ती कराल, तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील. असे एकमेकांचे एकमेकांवर जेंव्हा प्रेम जडेल,
98-3
तेथ तुम्ही जे करू म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचे ॥98॥
तेंव्हा तुम्ही जे करू म्हणाल, ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
99-3
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमते मागतील । महाऋद्धि ॥99॥
तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल (तुम्ही बोलाल ते खरे होईल म्हणजेच वाचासिद्धी). आणि तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही महासिद्धीला (महाऋषी) काही मागून घेण्याएवजी, ही महासिद्धीचं तुम्हाला हवे ते मागतील. (महाऋषीच तुम्हाला तुमची इच्छा विचारतील)
100-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येंसी ॥100॥
(ऋतूपती) वसंत ऋतूचे द्वारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फळपुष्पभाराच्या लावण्याने सदैव वास करीत असते,

दिवस ३० वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४९ ते ३६०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 349
बोल बोलता वाटे सोपे । करणी करिता टीर कापे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारे । मज बोलता न वाटे खरे ॥धृपद॥
विष खावे ग्रासोग्रासी । धन्य तोचि एक सोसी ॥२॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवी ॥३॥
अर्थ

वैराग्याच्या गप्पा मारणे हे सोपे आहे पण प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण आहे त्या वेळेस ढुंगण फाटते. वैराग्य सोप्पे नाही रे बाबा आहो आम्हाला जर कोणी म्हटले आम्ही वैराग्यशील आहोत तर ते आम्हाला खरे वाटणार नाही. प्रत्येक घासाघासाला विष सहन करावे लागते आणि जो कोणी ते सहन करतो तो धन्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि जो कोणी असे करून दाखवीन त्याचे पाय मी माझ्या चित्तातधारण करेल.


अभंग क्र. 350
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचे नाम ॥धृपद॥
हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥
तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥
अर्थ

हे देवा मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईल. मुखाने विठोबाचे नाम घेणे हा माझा मुख्य धर्म आहे व हाच माझा नित्य नेम आहे. संतांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवणे हिच माझी उपासना आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि हे देवा हिच माझी भोळी सेवा आहे.


अभंग क्र. 351
सांठविला हरी । जीही हृदयमंदिरी ॥१॥
त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥धृपद॥
हरी आला हाता । मग कैची भय चिंता ॥२॥
तुका म्हणे हरी । काही उरो नेदी उरी ॥३॥
अर्थ

ज्यांनी कोणी या हरिला आपल्या हृदयरूपी मंदिरात आत्मतत्वाने साठविले आहे, त्यांची जन्ममरण रुपी येरझार संपली व त्यांनी केलेले सर्व व्यवहार हे सफल झाले. प्रत्यक्ष जर हरीच हातात आला म्हणजे हरी आपला झाला तर मग कसली भय आणि कसली चिंता. तुकाराम महाराज म्हणतात तो हरी जर प्रसन्न झाला तर मग तो भक्तांचे मागे कोणतेही कर्म व विकार उरू देत नाही.


अभंग क्र. 352
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ॥धृपद॥
आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥
तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटी ॥३॥
अर्थ

हे देवा तुमचा तो असणारा मोक्ष तुमच्या जवळच ठेवा. मला त्या मोक्षाचे अंतरापासून आवड नाही मला फक्त तुमच्या भक्तीची आवड आहे. हे देवा तुमच्याजवळ असे विविध प्रकारचे मोक्ष असतील किंवा अनेक प्रकारचे दान असतील ते तुम्ही तुमच्या जवळच ठेवा ते तुम्हीच जतन करून ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात मला शेवटी तुमचे दर्शन तुमची भेट होणे एवढेच महत्त्वाचे आहे.


अभंग क्र. 353
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हे सुख सगुणी अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा । भक्ताचिया मना मोक्ष नये ॥धृपद॥
द्यावे घ्यावे ऐसे येथे उरे भाव । जाय ठाया ठाव पुसोनिया ॥२॥
तुका म्हणे आता अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिले ऐसे ॥३॥
अर्थ

हरीच्या सगुणरूप भक्तीमार्गात एक वेगळाच आनंद आहे तो म्हणजे हरी नामरूपी मोत्याची माळ ओवली जाते. म्हणूनच तर आम्हीही निर्गुणाच्या विषयी उदास झालो आहे कारण आम्हाला मोक्ष हा मुळीच आवडत नाही. देवा तुझ्या ह्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला देण्या-घेण्याचा व इतर कोणताही व्यवहार करता येतो पण जर एकदा तुझ्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान झाले तर मग तुझ्या सगुण स्वरूपाचे जे व्यवहार करतो ते सर्व व्यवहार त्याचा ठावठिकाणा पुसून जाते. तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा मला असे अभय द्या कि “मी तुला अभयदान दिले” असे तुम्ही एकदा मला म्हणा म्हणजे मला सर्व मिळाले असे समजणे योग्य.


अभंग क्र. 354
भवसिंधूचे काय कोडे । दावी वाट चाले पुढे ॥१॥
तारू भला पांडुरंग । पाय भिजो नेदी अंग ॥धृपद॥
मागे उतरिले बहुत । पैल तिरी साधुसंत ॥२॥
तुका म्हणे लाग वेगे । जाऊ तयाचिया मागे ॥३॥
अर्थ
अरे जर स्वतः पांडुरंग परमात्माच आपल्याला या भवसागरातून तारण्यासाठी आपल्या पुढे चालत आहे मग तुला यापलीकडे जाण्यासाठी काय अवघड आहे ? हा पांडुरंग परमात्मा एक उत्कृष्ट नावाडी आहे तो तुला या भावासागारातील पाणी तुझ्या अंगालाच काय तर हात पाय यांनासुद्धा लावू देणार नाही थोडेदेखील पाणी तुझ्या हाता व पायांना लागणार नाही. यांच्या आधाराने तर पूर्वी अनेक साधुसंत हा भवसागर तरुन गेलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आपणही त्या पांडुरंगाच्या मागे तत्परतेने धावत जाऊ.


अभंग क्र. 355
नाही साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असे तुमचा रजरेण । संता पायी वाहाण ॥धृपद॥
नाही स्वरूपी ओळखी । भक्तीभाव करी देखी ॥२॥
नाही शून्याकारी । क्षर ओळखी अक्षरी ॥३॥
नाही विवेक या ठायी । आत्मा अनात्मा काई ॥४॥
काही नव्हे तुका । पाया पडने हे ऐका ॥५॥
अर्थ

हे संत हो तुम्ही मला दिलेला सन्मानरूपी अलंकार हा खूप मोठा आहे पण तो अलंकार मला शोभत नाही. अहो मी तर तुमच्या पायाच्या धुळीचा कण आहे तुमच्या पायाची वाहन आहे. मला तुमच्या सारखी ब्रम्हस्वरूपाची ओळख नाही पण दुसऱ्याचा भक्तीभाव पाहून तसा वागत आहे. मला शून्याकार भाव म्हणजे समाधी अवस्था समजत नाही तसेच क्षर व अक्षर हेही मला समजत नाही. आत्मा व अनात्मा याचा विवेक माझ्या चित्तात शिरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही कळत नाही समजत नाही हे मात्र नक्की पण मला मात्र एक समजते की तुमच्या संतांच्या चरणांवर लोटांगण घ्यावे तुमचे दर्शन घ्यावे.


अभंग क्र. 356
सत्य साचे खरे । नाम विठोबाचे बरे ॥१॥
येणे तुटती बंधने । उभयलोकी कीर्ती जेणे ॥धृपद॥
भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥
तुका म्हणे भोळा । जिंकु जाणे कळिकाळा ॥३॥
अर्थ

या जगतामध्ये सत्य बरोबर आणि खरे काही असेल तर ते विठोबाचे नाम आहे आणि तेच बरे आहे. या नामाने संसारातील भावबंधन तुटतात व इह परलोकी आपली कीर्ती राहते. ज्याच्या मनामध्ये हरी विषयी विठ्ठला विषयी विश्वास दृढ आहे त्यालाच हरीची भेट त्वरित होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतरामध्ये विठ्ठला विषयी भोळी भक्ती असते त्याला कळीकाळाला कसे जिंकावे हे चांगले समजते.


अभंग क्र. 357
सत्य तो आवडे । विकल्पाने भाव उडे ॥१॥
आम्ही तुमच्या कृपादाने । जाणो शुद्ध मंद सोने ॥धृपद॥
आला भोग अंगा । न लवू उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥
अर्थ

जे सत्य म्हणजे हरी आहे ते आवडते पण जे सत्य आहे याविषयी संशय धरला तर त्यावरील विश्वास उडतो. तुमच्या कृपादाना मुळेच तर आम्हाला ह्या गोष्टी समजल्या आहेत शुद्ध सोने कोणते व अशुद्ध सोने कोणते हे समजल्यावर अशुध्दाचा त्याग केला जातो. त्यामुळे आता आम्हाला खरे सुख व खोटे सुख कळून आले आहेत. खोटे सुख आम्हाला लाभले तर त्याचा त्याग आम्ही पटकन त्याग करू कोणताही उशिरा लागू देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा खरे खोटे समजण्याकरता बुद्धी रुपी डोळ्यांमध्ये विवेकरुपी अंजन असणे गरजेचे आहे आणि त्याकरिता तुझीच सेवा करणे आवश्यक आहे.


अभंग क्र. 358
करावे चिंतन । तेचि बरे न भेटून ॥१॥
बरवा अंगी राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥धृपद॥
दर्शणाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे सकळ कारण ॥३॥
अर्थ

देवाला न भेटता त्याचे चिंतन करत रहावे हेच उत्तम. देवाला न भेटता देवाचे चिंतन करणे हा जो अंगी असलेला भक्तीभाव आहे तो सर्वोत्तम आहे कारण तो भक्तीभाव देवाला भेटण्याकरता आतुर झालेला असतो व असे ज्याच्या मनी असेल त्यालाच देव समजावे. देवाची भेट झाली नसल्यामुळे देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे मन आतुर झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चिंतन व देवाचे ध्यान हे देवाच्या वियोगातच होते म्हणजे त्याची भक्ती होते व ती भक्ती इतकी प्रबळ असते कि तो भक्त भक्तीनेच देव होतो हे सर्व होण्याला कारण म्हणजे मन असते कारण मनाला देवाच्या भेटीची आवड लागलेली असते.


अभंग क्र. 359
जे जे जेथे पावे । ते ते समर्पावे सेवे ॥१॥
सहज पूजा याचि नावे । गिळत अभिमाने व्हावे ॥धृपद॥
अवघे भोगिता गोसावी । आदी आवसानी जीवी ॥२॥
तुका म्हणे सिण । न धरिता नव्हे भिन्न ॥३॥
अर्थ

या संसारामध्ये जे जे काही प्राप्त होईल तेते देवाच्या सेवेकरता देवाला समर्पण करावे. यालाच सहज पूजा असे म्हणतात आणि हीच पूजा घडण्याकरता आपला अभिमान मात्र गळून गेला पाहिजे. जीवाच्या आधीपासून अंती पर्यंत सर्व भोग हा श्रीहरीच भोगत आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे मी भोक्ता आहे व हे सर्व भोग माझे आहेत हा अभिमान बाजूला ठेवला तर भगवंता मध्ये व आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही.


अभंग क्र. 360
नसे तरी मनी नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनी । विठ्ठलनामसंकीर्तनी ॥धृपद॥
दंभस्फोट भलत्या भावे । मज हरीजन म्हणावावे ॥२॥
तुका म्हणे काळांतरी । मज सांभाळील हरी ॥३॥
अर्थ

एखाद्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल तरी चालेल परंतु त्याच्या वाणीमध्ये भगवंताचे नामस्मरण चालू पाहिजे. विठ्ठलाचे नामस्मरण करीत त्याचे नाम चिंतन करीत माझा देह पडावा अशी माझी इच्छा आहे. मग मला लोकांनी दांभिक म्हटले तरी चालेल परंतु तुझे नामस्मरण नित्य माझ्या वाणीत वसु देलोकांनी मी तुझा हरिभक्त आहे असे म्हंटल्यावर मला नांव ठेवले तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात येवढेच जरी केले तरी काही काळानंतर माझा सखा हरी हा माझे रक्षण करील असा विश्वास मनात ठेवावा.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading