आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३ नोव्हेंबर, दिवस ३०७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४५१ ते ४७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६७३ ते ३६८४
“३ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
३ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४५१ ते ४७५,
451-18
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । की शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥451॥
अर्जुना, अग्नी वर अग्नि पडला तर तो भाजतो का ? किंवा शास्त्र आपणच आपल्याला कधी रुतेल काय ? 451
452-18
तैसे आपणपयापरते । जो नेणे क्रियाजाताते । तेथ काय लिंपवी बुद्धीते । तयाचिये ॥452॥
त्याप्रमाणे, आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तिथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल ? 452
453-18
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हे स्वरूपचि जाहले जया । नाही शरीरादिकी तया । कर्मी बंधु ॥453॥
म्हणून तो कार्य, कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरादिका पासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. 453
454-18
जे कर्ता जीव विंदाणी । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणी । आउती दाहे ॥454॥
कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्या कर्ता समजून दहा इंद्रियांच्या साधनांने पांच हेतू धारण करतो; 454
445-18
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेवो । कर्मभुवने ॥455॥
आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो. 455
456-18
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥456॥
पण या मोठ्या कृत्यात आत्मा हा सह्यकर्ता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको. 456
457-18
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो का निरोपु । आपणचि दे ? ॥457॥
तो साक्षीभूत व ज्ञानस्वरूप आहे; तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो, त्याला तो का आज्ञा देईन ? 457
458-18
तरी कर्मप्रवृत्तीहीलागी । तया आयासु नाही आंगी । जे प्रवृत्तीचेही उळिगी । लोकुचि आथी ॥458॥
तर जी जी कर्मे करण्याकरिता सर्व लोक श्रम करीत असतात, ती ती कर्मे करण्याविषयी त्यांच्या शरीरासआयास पडत नाहीत, 458
459-18
म्हणौनि आत्मयाचे केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाही बंदिशाळ । कर्माचि हे ॥459॥
म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरुपी झाला आहे, त्याला ही कर्माची बंदिशाळा नाही. 459
460-18
परी अज्ञानाच्या पटी । अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे का ॥460॥
परंतु अज्ञानाच्या पटावर जो दैवज्ञानाचे चित्र काढतो तो तेथे चित्र, चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी स्पष्ट आहे, ती तुला सांगतो. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥18. 18॥
461-18
जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हे जगाचे बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥461॥
कारण ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून, इच्यापासून कर्माची नि:संशय प्रवृत्ती होते, असे समज. 461
462-18
आता ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइके धनंजया । करू रूप ॥462॥
हे धनंजया, आता ह्याच त्रिपुटी ची निरनिराळी स्वरूपी उघड करून सांगतो, ती ऐक 462
463-18
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिके पांचे । धावोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥463॥
तर जीव रुपी सूर्यबिंबाचे ज्ञानेन्द्रियादी पंचेंद्रियरुपी किरण विषयरुपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात; 463
464-18
की जीवनृपाचे वारु उपलाणे । घेऊनि इंद्रियांची केकाणे । विषयदेशीचे नागवणे । आणीत जे ॥464॥
अथवा जीवरूपी राजा, हा शरीररूपी रुपी उपलाणी म्हणजे खोगीराशिवाय घोड्यावर बसून हातात इंद्रियरुपी भाले घेऊन विषयरुपी देशातून लूट आणतात 464
465-18
हे असो इही इंद्रियी राहाटे । जे सुखदुःखेसी जीवा भेटे । ते सुषुप्तिकाली वोहटे । जेथ ज्ञान ॥465॥
फार काय, जो या इंद्रियात वागत असून जीवाला सुख व दुःख भोगावयास देते व जे ज्ञान गाढ झोपेत जेथे नाहीसे होते, 465
466-18
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जे हे सांगितले आता । तेचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥466॥
त्या जीवाला अर्जुना, ज्ञाता असे म्हणतात, आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात, असे तू समज. 466
467-18
जे अविद्येचिये पोटी । उपजतखेवो किरीटी । आपणयाते वाटी । तिही ठायी ॥467॥
अर्जुना, जे अज्ञानाच्या पोटात उपजताक्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते, 467
468-18
आपुलिये धावे पुढा । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडा । ज्ञातृत्वाते ॥468॥
आपल्या वृत्ती पुढे जाणावयाचा विषयरुप ज्ञेयाचा दगड घालून आपल्या मार्गाचे बाजूस ज्ञात्याला उभे करते, 468
469-18
मग ज्ञातया ज्ञेया दोघा । तो नांदणुकेचा बगा । माजी जालेनि पै गा । वाहे जेणे ॥469॥
मग ज्ञाता ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञानामध्ये राहते. 469
470-18
ठाकूनि ज्ञेयाची शिव । पुरे जयाची धाव । सकळ पदार्था नांव । सूतसे जे ॥470॥
ज्ञेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थांना नाव ठेवते. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-18
ते गा सामान्य ज्ञान । या बोला नाही आन । ज्ञेयाचेही चिन्ह । आइक आता ॥471॥
त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती ऐक. 471
472-18
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥472॥
तर शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे धर्म आहेत. 472
473-18
जैसे एकेचि चूतफळे । इंद्रिया वेगवेगळे । रसे वर्णे परीमळे । भेटिजे स्पर्शे ॥473॥
जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो; म्हणजे आंबा या शब्दाने कानात समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यात समजतो, वासाने नाकास समजतो, आणि स्पर्शाने त्वचेस समजतो. 473
474-18
तैसे ज्ञेय तरी एकसरे । परी ज्ञान इंद्रियद्वारे । घे म्हणौनि प्रकारे । पांचे जाले ॥474॥
तसेच ज्ञेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्यांजविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते पाच प्रकारचे झाले आहे. 474
475-18
आणि समुद्री वोघाचे जाणे । सरे लाणीपासी धावणे । का फळी सरे वाढणे । सस्याचे जेवी ॥475॥
समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो, मुक्कामास गेल्यावर चालणे संपते, अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते; 475
दिवस ३०७ वा. ३, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६७३ ते ३६८४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३६७३ (कालावखेळयासंबंधीचेअभंग)
हा रस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचे संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥धृपद॥
काय पाहाता हे भाई । हरुषे नाचा धरा घाई । पोटभरी काही । घेता उरी न ठेवा ॥२॥
जे सुख दृष्टी आहे । तेच अंतरी जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ ते बापुडे ॥३॥
अर्थ
हरिनामाचा जयघोष करण्याच्या भक्तिरसात मोठा आनंद भरलेला आहे जो भाग्यवान असेल, त्याच्या वाटेल तो येईल. अनेक जन्माची पुण्याई असलेला भक्तिचा अधिकारी होईल. अरे बंधुनो, नुसते बघत राहु नका आता घाई धरा आणि आनंदाने नामाच्या छंदात नाचा भक्तिरसाने मन तृप्त होईपर्यंत त्याचे सेवन करा त्यात संकोच करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या सगुण रूपाच्या दर्शनाने सुख अंत:करणात ठसेल कळिकाळहि त्याच्यापुढे हतबल आहे.
12:30
अभंग क्र. ३६७४ (कालावखेळयासंबंधीचेअभंग)
अवघे गोपाळ म्हणती या रे करू काला । काय कोणाची सिदोरी ते पाहो द्या मला ।
नका काही मागे पुढे रे ठेवू खरे च बोला । वंची वंचला तोचि रे येथे भोवंडा त्याला ॥१॥
घेतल्या वाचून झाडा रे नेदी आपुले काही । एका एक ग्वाही बहुत देती मोकळे नाही ।
ताक सांडी येक रे येकरे काला भात भाकरी दही । आले घेतो मध्ये बैसला नाही आणवीत ते ही ॥धृपद॥
एका नाही धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आता ऐसे चि घाटा ॥२॥
एकी स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकाच्या फांकल्या वोढाळा फेरे भोवती घेती ।
एके चाराबोरा गुंतली नाही जीवन चित्ती । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥
एकी एके वाटा लाविली भोळी नेणती मुले । आपण घरीच गुंतले माळा नासिली फुले ।
गाठीचे ते सोडू नावडे खाय आइते दिले । सापडले वेठी वोढी रे भार वाहाता मेले ॥४॥
एक ते माया गुंतले घरी बहुत काम । वार्ता ही नाही तयाची तया काही च ठावे ।
जैसे होते शिळे संचित तैसे लागले खावे । हातोहाती गेले वेचुनि मग पडिले ठावे ॥५॥
एकी हाती पायी पटे रे अंगी लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।
एक ते आळसी तळी रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वाचून बुद्धि रे केला अवघ्या वाखा ॥६॥
तुका म्हणे आता कान्होबा आम्हा वांटोनि द्यावे । आहे नाही आम्हापाशी ते तुज अवघे चि ठावे ।
मोकलिता तुम्ही शरण आम्ही कवणासि जावे । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तो खावे ॥७॥
अर्थ
12:31
अभंग क्र. ३६७५ (कालावखेळयासंबंधीचेअभंग)
बैसवुनि फेरी । गडिया मध्यभागी हरी । अवघियांचे करी । समाधान सारिखे ॥१॥
पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषे झेली कर । कवळ मुखी देती ते ॥धृपद॥
बोले बोलतिया सवे । देतील ते त्यांचे घ्यावे । एक एका ठावे । येर येरा अदृश्य ॥२॥
तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटो नेदी विषम ॥३॥
अर्थ
गोलाकार फेर धलेल्या गोपाळांच्या समवेत श्रीहरि मध्यभागी बसला. त्यामुळे त्याने सर्व गोपाळाचे सारखे समाधान केले. जो कुणी हरिकडे पाहत होता त्या प्रत्येकाला हरी आपल्या समोरच आहे, असे वाटत होते, प्रत्येकाच्या शोदोरित ज्या ज्या प्रकारचे अन्न होते, ते ते सेवन करीत होता. काही सवंगडी श्रीकृष्णच्या मुखात घास भरवित होते व तो घास ते हि खात होते. श्रीकृष्ण बोलणाऱ्या गोपालां बरोबर बोलत होता, ते जे काही प्रेमाने देतील, ते घेत होता. काहींना श्रीहरिच्या तात्विक स्वरुपाच्या खुणांचे ज्ञान होत होते. काहिना ते समजने शक्य होत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, देवांना गोपाळांच्या प्रेमाची खुप आवड होती. त्यामुळे कोणाच्याही जीवाला परकेपना वाटत नव्हता.
12:31
अभंग क्र. ३६७६ (कालावखेळयासंबंधीचेअभंग)
आम्हा निकट वासे । कळो आले जैसे तैसे । नाही अनारीसे । कान्होबाचे अंतरी ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥धृपद॥
खेळ खेळे न पडे डाई । ज्याचा भार त्याच्या ठायी । कोणी पडतील डाई । कोणी कोडी उगवीती ॥२॥
तुका म्हणे कवळ । हाती घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचे बळ । त्यासि तैसा विभाग ॥३॥
अर्थ
आम्ही श्रीकृष्णाच्या जवळ राहत असल्यामुळे श्रीकृष्णाचे मन कसे आहे, ते आम्हाला कळाले आहे त्याच्या मनात कुनाबद्दल विषम भाव नाही. ज्याच्या अंगी जी भावना असेल, त्या प्रमाणे ती त्याला पीड़ा देते तो भगवंत सर्व कर्मांचा साक्षी आहे साऱ्या लीला तो कौतुकाने पाहत असतो. तो सर्व खेळ खेळतो; पण डावात अडकवत नाही ज्याचा त्याचा भार ज्याच्या त्याच्याजवळ ठेवतो कुणी डावात सापडतात, तर कुणी त्या डावाच्या कोडयातुं सुटून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळाने काल्याचा घास घेऊन ज्याचे जैसे बळ होते, त्यानुसार त्यांना त्यांचा भाग दिला.
12:31
अभंग क्र. ३६७७ (कालावखेळयासंबंधीचेअभंग)
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आता वेळ । म्हणती आणा सिदोर्या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडा । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरी मेळी ॥धृपद॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनिया गोडी । हरी मेळवी त्यात ते ॥२॥
भार वागविला खांदी । नव्हती मिळाली जो मांदी । सकाळाचे संदी । वोझी अवघी उतरली ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी का रे कुडी । येथे मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादे । कैसे धाले ब्रम्हानंदे । तुका म्हणे पदे । या रे वंदू हरीची ॥५॥
अर्थ
आपापले काम आटोपुन सर्व गोपाळ एका ठिकाणी जमले. आता जेवनाची वेळ झाली. आपल्या शिदोर्या आना. सर्वानी आपापल्या पापपुण्याचा हिशोब त्याच्या जवळ दिला इंद्रियरूपि गाईना अंत:करनिरूपि गोठ्यात बसविले. हरिच्या सोबत दोंदिल, बोबडा, वाकडया, पेंद्द्या या नावाचे गोपाळ होते. आपल्या आवडिप्रमाणे त्यांनी पंगतित मुद्रा बांधल्या. हरिने आपली आवडती शिदोरि खोलुन त्यात स्वत:चि गोड़ी मिळवली. पाप-पुण्यात्मक शिदोरिचा भार त्यांनी शुद्ध भक्तिभाव समुदायाचा योग आला नव्हता तो पर्यन्त आपल्या माथि वागविला. परमार्थ लक्षणाचा योग सगळ्यांच्या ठिकाणी आलेला पाहुन श्रीहरींने सर्वाच्या पाप-पुण्याची शिदोर्यांची ओझी उतरविली. जो घाइने, उतावीळ पणाने मागतो, त्याच्यावर बाकीचे सवंगडी रागवतत व त्याला म्हणतात, मला मिळेल की नाही, अशी खोटी भावना मनात का ठेवतोस ?. त्यांचा एकमेकांशी जो संवाद झाला, त्याने ते गोपाळ ब्रम्हनंदात तृप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात, ते गोपाळ म्हणू ला�
अभंग क्र. ३६७८ (काला व खेळया संबंधीचे अभंग)
यमुने पाबळी । गडिया बोले वनमाळी । आणा सिदोर्या सकळी । काला करू आजी ।
अवघे एके ठायी । करूनि स्वाद त्याचा पाही । मजपाशी आहे ते ही । तुम्हामाजी देतो ॥१॥
म्हणती बरवे गोपाळ । म्हणती बरवे गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पावे आनंदे ।
खडकी सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनिया वाटा । गडिया देतो हरी ॥ध्रु. ॥
एकापुढे एक । घाली हात पसरी मुख । गोळा पावे तया सुख । अधिकचि वाटे ।
म्हणती गोड झाले । म्हणती गोड झाले । आणिक देई धाले । नाही पोट आमुचे ॥२॥
हात नेतो मुखापासी । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।
देऊनिया मिठी । पळे लागतील पाठी । धरूनि काढितील ओठी । मुखामाजी खाती ॥३॥
म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घासा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठी तयाच्या ।
अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलो ॥४॥
एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरी । म्हणे पुरे आता ।
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळो आता नीती । सांगो आदरिले ॥५॥
आनंदाचे फेरी । माजी घालुनिया हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगे पावे ।
वाकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढे । बहु भाविक ते ॥६॥
करी कवतुक । त्यांचे देखोनिया मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हासे ।
एक एकाचे उच्छिष्ट । खाता न मानिती वीट । केली लाजता ही धीट । आपुलिया संगे ॥७॥
नाही ज्याची गेली भुक । त्याचे पसरवितो मुख । अवघिया देतो सुख । सारिखे चि हरी ।
म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आता चाळविसी तरी । न वजो आणिका सवे ॥८॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जाले यमुनेचे स्थिर । जळ वाहो ठेले ।
देव पाहाती सकळ । मुखे घोटूनिया लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग झालो आम्ही ॥९॥
म्हणती कैसे करावे । म्हणती कैसे करावे । यमुनाजळी व्हावे । मत्स्य शेष घ्यावया ।
सुरवरांचे थाट । भरले यमुनेचे तट । तव अधिक ची होट । मटमटा वाजती ॥१०॥
आनंदे सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेत हात । नका धुऊ कोणी ।
म्हणती जाणे जीवीचे । लाजे त्यास येथे कैचे । शेष या कृष्णाचे । लाभ थोरिवे ॥११॥
धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालो रे सकळ । तुझिया नि हाते ।
मानवले गडी । एक एकांचे आवडी । दही खादले परवडी । धणीवरी आजी ॥१२॥
तुझा संग बरवा । नित्य आम्हा द्यावा । ऐसे करूनि जीवा । नित्य देवा चालावे ।
तव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आता जाऊ खेळीमेळी । गाई चारावया ॥१३॥
आजि झाला आनंदु । न वर्णावे ब्रम्हानंदु । चाले परमानंदु । सवे आम्हासहित ।
तुका म्हणे प्रेमे धाली । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यासरी ॥१४॥
अर्थ
यमुनातिरि उभे राहून श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाले, तुम्ही सारेजन आपापल्या शिदोर्या घेऊन या. आज आपण काला करू. सर्व शिदोर्या एकत्र करून मी प्रथम त्याचा स्वाद घेतो. नंतर मझ्याकाडिल शिदोरि त्यात घालतो व तुम्हाला वाटतो. बरे झाले, बरे झाले, असे सारे सवंगडि म्हणतात, ते सारेजन आनंदाने मोहरी, पावे वाजउ लागले, सर्वाणि आनंदाने खडकावर आपली शिदोरि सोडली. सर्व एकत्र केली. त्याचा काला करून तो श्रीकृष्ण सर्वाना देऊ लागला. सरे जन एकापुढे एक, आपले तोड, हात पसरु लागले. काल्याचे कवळ मिळाले की सुखी झाले. काल्याचा तो गोळा अधिकाधिक मिळावा असे त्यांना वाटू लागले. ‘खुप गोड लागते. गोड वाटते’, असे श्रीकृष्णला म्हणत ‘आमचे पोट भरले नाही’, ‘आणखी दे’, असे म्हणू लागले. भगवंताने आपला हात मुखाजवळ नेला इतरांना आशा वाटू लागली व ते तोंड वासु लागले. तो स्वतः खाउ लागला. इतरांना वाकुल्या दाखउ लागला, त्यांनी त्याला धरले. अरे, कान्हा लबाड आहे. घासासाठी आपल्या रानात फिरतो. त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला पकडिल तो शहाना. माझी माय असलेला कृष्ण सर्वाचे घास खातो. आकाशातील देवहि हाय हाय करू लागले व म्हणाले, आम्ही या सुखाला अंतरलो. गोपाळ एकमेकांच्या ढुंगनावर, पाठीवर, तोंडावर गोळे मारू लागले. ते हरीला सहन होईना. आता पुरे झाले. आपण आता चांगले खेळ खेळू, असे तो सांगू लागला. सर्वानी मोठ्या आनंदाने हरीला मधे घेतले व फेर धरला. काहीजण स्वतःभवती फिरु लागले. काही शिंग, बासरी वाजउ लागल. वाकडे, बोबडे, मुके, लुळे, खुजे सवंगडि होते; परंतु ते अत्यंत भाविक होते. ते कान्होबाचे खुप आवडते होते. श्रीकृष्ण त्या सर्वच गोपजनांचे मनापासून कौतुक करत असे. त्यांचे मुख पाहुन हरीला खुप आनंद होत असे. निर्मल, प्रांजल भावनेने तो खदखदा हसत असे. एकमेकांचे उष्टे खान्यास त्यांना कधी कंटाळा येत नसे. जे कोणी लाजरे-बजरे होते. त्यांना हरिने आपल्या संगतीत धीट केले. ज्यांची भूक भागत नव्हती, त्यांचे तोड उघडून भरविले. सर्वाना सारखे सुख दिले. गोपाळ म्हणाले, ‘हे हरी, भला रे भला. तुझी सांगती खरच खुप चांगली आहे रे ! तू टोलवाटोलावि केलीस तरी आम्ही इतर कुनासोबत जाणार नाही. गाई वैरण खाणेच विसरून गेल्या. पक्षी, पशु यांची तीच गत झाली, यमुना नदि वाहान्याची थांबली. मुखात लाळ घोटवित देव हे सारे पाहत होते. गोपाळ धन्य आहे, आमचा धिक्कार असो ! . आता कसे करावे, कसे करावे याचा विचार ते करू लागले. यमुनेतिल मासे होऊन त्यांचे उष्टे सेवन करण्यास जावे, देवांच्या समुदायाने यमुनेचे तट भरून गेले. गोपाल आपले पोट पटपट वाजउ लागले. गोपीनाथ आपल्या सावंगड्यांबरोबर क्रीडा करत होता. त्याने देवांना पाहिले. तो गोपाळांना म्हणाला, तुम्ही यमुना तिरि आपले हात धुवू नका, कान्होबा सगळयांच्या मनातले ओळखतो. कृष्णच्या उच्छिष्टाचि थोरवि जाणून, त्याचे हाव धरून ते येथे कशे प्राप्त होईल ?. गोपाल म्हणाले आजचा दिवस खरोखर धन्य आहे. आज भगवंत दिसला. आम्ही सर्व तुझ्या हातचा काला खाऊन तृप झालो. एकमेकांच्या प्रेमामुळे सर्व संतृष्ट झाले. त्याच्या पंगतित पोटभर दही खाल्ले. भगवंता, तुझी मैत्री चांगली आहे. आम्हाला ती नित्य लाभों. आमच्या जीवाला नेहमी असाच आनंद देत जावा. त्यावर कृष्ण म्हणाला. ”अरे, आता आपल्या काठ्या-कांबळी घ्या, हसत खेळत आपण गाई चारायला घेऊन जाउ. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व प्रेमाने समाधान पावले होते. कोणालाही पुढे चलवेना. हरिने गाई- गोपाळांना आपल्यासारखे केले. आजचा हा आनंद म्हणजे ब्रम्हानंद आहे. त्याचे वर्णन करता येत नाही. परमानंद आपमच्याबरोबर स्वतःच जातीने हजर आहे.
अभंग क्र. ३६७९ (गौळण)
या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहळा आजि वृंदावनीचा ॥१॥
वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनी चित्त झाले चंचळ ॥धृपद॥
उरले ते सांडा काम नका करू गोवी । हीच वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचे श्रीमुख पाहाता । बोलती ते आता घरची सोसू वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड काही नावडे आणीक । लाज तरी लोक मन झाले उदास ॥४॥
एकाएकी चालिल्या सादावीत सवे । तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय ॥५॥
अर्थ
गोकुळातील गोपिका ऐमेकांना म्हणु लागल्या बायांनो, या. आपण सार्याजनी जाऊ आणि वृंदावनी काल्याचा सोहळा पाहू. भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवित आहे. त्या वेणुनाद कानी पडला व त्यामुळे तिकडे जाण्यासाठी मन आतुर झाले आहे. हा विलंब मला सहन होत नाही. संसारातील काम राहीले असतील तर राहुद्यात. त्यात अडकून राहु नका; कारण मानवी आयुषातील श्रीकृष्णभेटीची हीच वेळ आहे, मला याची खत्री आहे. भगवान श्रीकृष्णचे रूप बघुन डोळे निवतील. घरची अडचणी आणणारे कामे तशीच सोसु. कृष्णभेटिच्या आड आलेले काहीही, कोणीही मला सहन होत नाही. लोक मर्यादा पाळावी हे जरी खरे असले, तरि मला ते मान्य नाही. संसाराविषयी माझे मन उदास झाले आहे. त्याला काय करावे ?. तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका एकमेकिंना वृंदावानात येण्यासाठी सूचना देत जात आहेत; कारण भगवंतने आपल्या सुंदर, सुकुमार रूपाने त्यांना तद्रूप करुण टाकले आहे.
अभंग क्र. ३६८० (फुगड्या)
फुगडी फू फुगडी घालिता उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥
फुगडी गे अवघे मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥धृपद॥
मागे जे शिकलीस होतीस पोटी । तेचि विचारूनि आता उच्चारी ओठी ॥२॥
त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठी । सावरूनि धरी घाली मूळबंदी गाठी ॥३॥
आगळे पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥
तुका म्हणे तुजमजमध्ये एक भाव । सम तुके बार घेऊ पावो उंच ठाव ॥५॥
अर्थ
संसाराची फुगड़ी खेळतांना (प्रपंचिक क्रिया) मोकळी, मुक्त रहा. सर्व लाज सोडून एकातत एकालाच पहा. अगं, सर्व संसाराची फुगड़ी ‘फु’ करून मोडून टाक. तू जर संसार तोडुन टाकला तर खेळात खरी गोडी आहे. मातेच्या पोटात असताना जे काही शिकलिस, ते आठव, त्याचा उच्चार कर. तुझ्या पाठीवर त्रिगुणवृत्तिचि वेणी उडत आहे. तिला सावरुन धर. मुळबंधाजवळ तिची गाठ बांध. पुढे पाउल टाकत एक- एक भूमिका जींकुन घे, म्हणजे तेथे तुला मान मिळेल. तिन्ही लिकांत तुला मान मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या-माझ्यात एकच भाव आहे, अशा सम स्तितिमध्ये आपण उच्च स्थनी पोहचु.
अभंग क्र. ३६८१ (फुगड्या)
फुगडी फू सवती माझे तू । हागुनि भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥
फुगडी घेता आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥धृपद॥
हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळिता लागे माती ॥२॥
सात पाच आणिल्या हरी । वाचुनी काय तगसी पोरी ॥३॥
सरला दम पागले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥
तुका म्हणे आझुन तरी । सांगितले ते गधडी करी ॥५॥
अर्थ
गोपी म्हणते सखे – फुगडि – फु मला विरोध करणारी तू, माझी सवत आहेस; कारण तुला प्रपंच्याची आवड आहे. विक्षेप, आवरण या मलाने तुझे डुंगन भरले आहे, ते धूउन टाक; नाहीतर तुझ्या तोंडावर थू. माझ्याशी फुगड़ी खेळतानि तुला हार खावि लागली, म्हणून जगाशि संबंध ठेवणारी स्रीये, येथून उठून जा. प्रपंच्याची फुगड़ी खेळशील तर म्हातारपणी तुझे हात पाय थकतिल. प्रपंच्यात मनरूपी मलिन ढुंगन घोळत बसशील आणि तुझ्या ढुंगानाला कामक्रोधाची माती लागेल. हे पोरी अंग पंचप्राण, पंचज्ञानेंद्रीय, मन, बूद्धि या पाच सातांना जिंकल्याशिवाय तू मझ्याबरोबर परमार्थाच्या फुगडित कसा टिकाव धरणार आहे ? प्रपंच्याची फुगडि खेळतांना तुझा दम संपला आहे. पाय लुळे-पागळे झाले आहे. तुझी ही अशी वाईट अवस्था झाली आहे. हे मलिन मनरूपी ढुंगन पुन्ह: पुन्हा का घोळत बसली आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, ए गधडे, अंग, आता तरि मी संगीतल्या प्रमाणे कर. जागी हो ! .
अभंग क्र. ३६८२ (हुंबरी)
तुशी कोण घाली हुंबरी । साही पागल्या अठरा चारी ॥धृपद॥
सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविले ॥१॥
चेंडुवासवे घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥
अशुद्ध पीता करुणा नाही । तुवा आपुली माउशीही मारियेली ॥३॥
रावणाचे घर बुडविले सारे । त्याची रांडापोरे मारियेली ॥४॥
जाणो तो ठावा आहेसि आम्हा । तुवा आपुला मामा मारियेला ॥५॥
याशी खेळता नाश थोरू । तुकया स्वामी सारंग धरू ॥६॥
अर्थ
देवा तुझ्याशी हुंबरी (तोंडाने गुरगुर आवाज करने) कोण खेळतो ? चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराने हा खेळ खेळताना सारे दमुन गेले. भगवंता, सहस्त्रमुखे असलेले शेष. पण तोहि वर्णन करताना थकुन गेला. चेंडूसह डोहात उडी मारलिस आणि उडी घेऊन कालियाला पराभूत केलेस. अशुद्ध, मलिन रक्त पिताना तुला दया आली नाही. पूतना मावशीचे रक्त पिउन तु तीला ठार मारलेस, हे आम्हाला ठाउक आहे. तू स्वत: मामा कंस याला मारलेस, तेहि आम्हाला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सारंगधर माझा स्वामी आहे. त्याच्याशी जो कोनी खेळ खेळतो केला तर प्रपंच्यात हानी होते.
अभंग क्र. ३६८३ (हमामा)
मशी पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार ॥१॥
पोरा हमामा रे हमामा रे ॥धृपद॥
मशी हमामा तू घाली । पोरा वरी सांभाळी खाली ॥२॥
तरीच मशी बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥
मशी घेता भाष । जीवा मीतूपणा नाश ॥४॥
मज सवे खरा । पण जाऊ नेदी घरा ॥५॥
आमुचिये रंगी । दुजे तगेना ये संगी ॥६॥
तुकयासवे भास । हरी जीवा करी नास ॥७॥
अर्थ
पोरा, माझ्याशी एकदा हमामा ( विशिष्ट प्रकारचा खेळ ) खेळ म्हणजे तुझे खालचे अधोगतीचे दार मिटऊंन टाकिन. ए पोरा, अरे हमामाऱ्हमामा खेळ. माझ्याशी हमामा खेळताना तू खाली-वर सांभाळ. पोरा, अरे, तुझ्या आत जिव्हाळ्याचा ओलावा असेल, तरच माझ्याशी बोल. माझ्याशी बोलताना तुझ्या मी- तु पणाचा नाश होईल. तू माझ्या बरोबर आहेस खरा, पण तुला प्रपंच्याकडे फिरु देणार नाही. आमच्या रंगाच्या संगतित व्दैत टिकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याशी भाषण केले तर मी जीवपणाचे हरन करतो व त्याचा नाश करतो.
अभंग क्र. ३६८४ (हमामा)
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालिता ठकले पोर । करी येरझार चौर्यांशीची ॥१॥
पहिले पहारा रंगासि आले । सोहं सोहं से बार घेतले । देखोनि गडी ते विसरले । डाई पडिले आपणची ॥धृपद॥
दुसर्या पहारा महा आनंदे । हमामा घाली छंदछंदे । दिस वाडे तो गोड वाटे । परि पुढे नेणे पोर काय होते ते ॥२॥
तिसर्या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोसे सोस करिता डाईं पडसी । सत्य जाणे हा निर्धार ॥३॥
चौथ्या पहारा हमामा । घालिसी कापविसी हातपाय । सुर्यापाटिलाचा पोर यम्या । त्यांचे पडलीस डाईं रे ॥४॥
हमामा घालिता भ्याला तुका । त्याने सांडिली गड्याची सोई । यादवाचा मूल एक । विठोबा त्यासवे चारितो गाई रे ॥५॥
अर्थ
पोरा, हमामा रे हमामा हमामा खेळतांनी जर तू फसलास तर चौर्यांशी लक्ष योनीची येरझार करीत राहशील. गर्भावस्थेचा पहिल्या प्रहरात रंगात येउन तु ‘सोऽहं ‘सोऽहं ” चा छंद घेतलास, नंतर संसारातले गडी दिसले तेव्हा सोऽहं विसरलास आणि स्वत: होऊन त्या प्रपंच्याच्या डावात पडलास. बालपनणाच्या दुसऱ्या प्रहरात महानंद छंद घेऊन तू हामामा घालू लागलास दिवस जात होते तस तसे गोड वाटत होते; पण पुढे काय होणार, हे कळत नव्हते. तारुण्याच्या तिसऱ्या प्रहरात अहंपणाचा छंद लागला व त्यामुळे एक ठिकाणी पाय स्थीर राहिना प्रपंच्याचा हव्यस करता करता प्रपंचाच्या डावत पडशील, हे मात्र नक्की समज. म्हातारपणाच्या चौथ्या प्रहरात हमामा करतांना हात पाय लटपटू लागले सूर्यदेव पाटलाचा यम हा पोरगा आहे त्याच्या डावात पडशील रे बाबा ! . तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच्याचा हामामा घालताना मी भीउन �
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















