आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

११ नोव्हेंबर, दिवस ३१५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६५१ ते ६७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७६९ ते ३७८०
“११ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७६९ ते ३७८० चे पारायण आपण करणार आहोत.
११ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६५१ ते ६७५ ,
651-18
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषा । घरटा जाला ॥651॥
त्याप्रमाणे वस्तूत: पाहिले असता ही जगांतील सर्व कामाची पाय धुण्याची जागा होय, 651
652-18
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मी चांगु । रोहो मांडी ॥652॥
म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो, 652
653-18
आणि आपण जालिये जोडी । उपखो नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥653॥
आणि संपादन केलेल्या पदार्थांपैकी एका कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थांवरून आपला जीव ओवाळून टाकतो. 653
654-18
कृपणु चित्ती ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥654॥
कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो, 654
655-18
आणि गोवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळे तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥655॥
आणि बोरीचे झाड जशी जवळ गेले असता वस्त्र अडकून गुंतविते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता त्यात काही सार नाही, 655
656-18
तैसे मने वाचा काये । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधिता न पाहे । पराचे हित ॥656॥
तसे काया-वाचा-मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही; 656
657-18
तेवीचि आंगे कर्मी । आचरणे नोहे क्षमी । न निघे मनोधर्मी । अरोचकु ॥657॥
तसेच स्वतः जे कर्म आरंभिले ते निरंतर चालविण्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याच्या मनात कंटाळा येत नाही, 657
658-18
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वे जो ॥658॥
धोत्र्याच्या फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो; 658
659-18
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखे जगा यया । वांकुलिया वाये ॥659॥
आणि अर्जुना, केलेल्या कर्माची फळ प्राप्ती झाली असता त्या आनंदाच्या भरात दुसऱ्यासं वेडावून दाखवितो, 659
660-18
अथवा जे आदरिले । हीनफळ होय केले । तरी शोके तेणे जिंतिले । धिक्कारो लागे ॥660॥
अथवा आरंभिलेले कर्म फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो; 660
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-18
कर्मी राहाटी ऐसी । जयाते होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥661॥
अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस कर्ता होय, असे खचित खचित समज. 661
662-18
आता यया पाठी येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करू गोचरु । तामस कर्ता ॥662॥
आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस कर्ता, याची लक्षणे तुला कळतील, अशी सांगतो. 662
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥18. 28॥
663-18
तरी मिया लागलिया कैसे । पुढील जळत असे । हे नेणिजे हुताशे । जियापरी ॥663॥
आपल्या स्पर्शामुळे समोर येणारी जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही, 663
664-18
पै शस्त्रे मिया तिखटे । नेणिजे कैसेनि निवटे । का नेणिजे काळकूटे । आपुले केले ॥664॥
अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो, हे जसे शस्त्राला समजत नाही; किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकुट विषाला समजत नाही, 664
665-18
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो का ॥665॥
तसा हे धनंजया, ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल, अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो; 665
666-18
तिया करिताही वेळी । काय जाले हे न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥666॥
ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्मे करतेवेळी, यात काय लाभ झाला याची तो काळजी बाळगीत नाही, 666
667-18
पै करणिया आणि जया । मेळु नाही धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैची त्राय ? ॥667॥
हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मिळत नसतो, असल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे ? 667
668-18
आणि इंद्रियांचे वोगरिले । चरोनि राखे जो जियाले । बैलातळी लागले । गोचिड जैसे ॥668॥
आणि बैलाचे कासरे गोचीड अगदी चिटकून राहतात, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो, 668
669-18
हांसया रुदना वेळु । नेणता आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥669॥
ज्याप्रमाणे लहान मुलास हासण्यास व रडण्यास वेळ लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा कृतीत काही मिळत नसतो; 669
670-18
जो प्रकृती आंतलेपणे । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरे धालेपणे । उकरडा जैसा ॥670॥
प्रकृतीचे आधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो, तसा जो कुकर्माचा तृप्तीने फुगलेला असतो; 670
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-18
म्हणौनि मान्याचेनि नांवे । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणे न मनवे । डोंगरासी ॥671॥
म्हणून गर्वाच्या भरांत ईश्वरास ही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगराला ही तुच्छ करतो; 671
672-18
आणि मन जयाचे विषकल्लोळी । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥672॥
ज्याचे मन म्हणजे केवळ विषयांच्या लाटा होत; ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वरकांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेश्यांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी होय; 672
673-18
किंबहुना कपटाचे । देहचि वळिले तयाचे । ते जिणे की जुंवाराचे । टिटेघर ॥673॥
किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे, व त्याचे आयुष्य जुगाराचे वाईट कृत्याचे माहेरघरच होय; 673
674-18
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गावो । म्हणौनि नये येवो जावो । तया वाटा ॥674॥
त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिल्लाचे गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये. 674
675-18
आणि आणिकांचे निके केले । विरु होय जया आले । जैसे अपेय पया मिनले । लवण करी ॥675॥
आणि दुसर्याचे चांगले झालेले पाहून ज्या स्वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यास अयोग्य होते; 675
दिवस ३१५ वा. ११, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७६९ ते ३७८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७६९ (गवळणींचीअवस्था)
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥
चोरिले नवनीत बांधविला गळा । जे तुम्ही गोपाळा छंद केले ॥धृपद॥
मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे । केली ते गोविंदे क्रीडा गाऊ ॥२॥
मायबापा लाडे दाखविले कौतुक । ते या आणू सुख अंतरासी ॥३॥
निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी । ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी ॥४॥
तुका म्हणे सरशी असो येणे बोधे । जाणोनि संबंधे सर्वकाळ ॥५॥
अर्थ
मी त्या भगवान श्रीकृष्णाचे चरित्र लीला व पोवाडे गायीन ज्याने आपल्या सवंगडयासहीत काही गोपाळाचे रक्षण केले. हे गोपाळा तुम्ही गोकुळामध्ये जे नवनीत चोरले व ते गळयाला बांधले व अनेकही जे काही छंद केले ते सर्व मी वर्णन करीन. ज्या पावा म्हणजे वेणूच्या नादाने गोपीका मोहित झाल्या आणि जे चरित्र भगवंताने केले व ज्या रासक्रीडा भगवंताने केल्या त्याचे आम्ही पोवाडे गावू. या श्रीकृष्णाने आपल्या मायबापाला नंद यशोदेला जे काही कौतुक दाखविले असेल ते सर्व मी माझ्या ह्दयामध्ये आणून ठेवीन. ज्याने दुष्टांना निर्दाळून भक्तांचा सांभाळ केला अशा बलवान हरीस आम्ही आमचा स्वामी म्हणवून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे आम्ही देवापुढे या बोधानेच नेहमी राहू आणि हरीशी सर्वकाळ ऐक्यरुपाने संबंध ठेवू. ”
12:55
अभंग क्र. ३७७० (गवळणींचीअवस्था)
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांती एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिले ॥३॥
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथे नका आम्हापाशी ॥४॥
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाही । या चोरोनि तीही खेट केली ॥५॥
भेऊनिया जना एकी सवा झाल्या । वाती विझविल्या दाटोबळे ॥६॥
कृष्णसुख नाही कळले मानसी । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥
अंतरी कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानी ॥९॥
हरीरूपी दृष्टि कानी त्याची गोष्टी । आळंगिती कंठी एका एकी ॥१०॥
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥११॥
विसरल्या मागे गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥
अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी झाल्या कृष्णरूपा ॥१३॥
कृष्ण म्हणोवूनी देती आलिंगन । विरहताप तेणे निवारेना ॥१४॥
ताप कोण वारी गोविंदावाचूनि । साच तो नयनी न देखता ॥१५॥
न देखता त्यांचा प्राण रिघो पाहे । आजि कामास ये उशिर केला ॥१६॥
रित्या ज्ञानगोष्टी तया नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥
मागे काही आम्ही चुकलो त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥
आठविती मागे पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥
अनुतापे झाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥
जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥
होउनी प्रगट दाखविले रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥
निवाल्य�
12:55
अभंग क्र. ३७७१ (गवळणींचीअवस्था)
स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशी सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथे चि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशी करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःशामे जळधर वोल । रसी उतावळि हृदय सखोल वो ॥धृपद॥
एक विषय तो सकळांचा हरी । त्याच्या आवडीने आवडी इतरी ।
अंध बहिर हे प्रेत लोका चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥
स्तुति पराविया मुखे रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवी आदर ।
परस्परे हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥३॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।
दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरी वो ॥४॥
तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे वोसंडून ।
पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयी चरण वो ॥५॥
अर्थ
हरीसुखाचा जो अनुभव गोपीकांना आला तोच अनुभव त्या एकमेकींपाशी सांगत होत्या. हा हरी एकाच वेळेस सर्वाच्या ठिकाणी सर्वाना समाधानी करतो या गोष्टीचे गवळणींना आश्चर्य वाटत होते आणि सर्व साक्षी असलेल्या हरीच्या ठिकाणीच गवळणींचा जीव होता. गवळणी एकमेकींशी या गोष्टीविषयी नवल व्यक्त करत होत्या परंतू हरीच्या वर्णनाविषयी एकमेकांशी वादविवाद करण्याचे ते काही सोडत नव्हत्या. एका मेघश्याम वर्ण असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रती गवळणींचा अतिशय जिव्हाळा होता त्याचा आनंदरस भोगण्याकरता त्यांचे मन उतावीळ झाले होते व त्यांनी मन गंभीर केले होते. एका हरीच्याविषयीच सर्व गवळणींना आवड होती आणि त्याची प्राप्ती होईल अशी सर्व साधने देखील �
12:55
अभंग क्र. ३७७२ (गवळणींचीअवस्था)
आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरी चित्ती वो ॥१॥
सर सर परती झालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायी झाला खंड वो ॥धृ ॥
होते तैसे उमटले वरी । बाह्य संपादनी अंतरीची चोरी ।
नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदी देह काम करी वो ॥२॥
नाही करीत उत्तर कोणा सवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचल सावरावा ठावे । देखो उदासीन तुझे गे देह भाव वो ॥३॥
कोठे नेणो हा फावला एकांत । सदा किलकील भोवती बहुत ।
दोघे एकवत बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासू सुना ।
पराभक्ती हे शुध्द तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे या जना वो ॥५॥
अर्थ
सासू सुनेला म्हणते आज तू अशी दु:श्चित का दिसत आहे उदास का दिसत आहे तुला काहीही काम सांगितले तरी तुझे चित्त त्या कामावर मला असलेले दिसत नाही. अगं तुझ्या हातात काही दिले की तू ती वस्तू जिथे ठेवायची तिथे ठेवत नाहीये म्हणजे तुझ्या चित्तामध्ये तो हरी तर बसलेला नाही ना ? हे भांड स्त्री चल तू आता माझ्यापासून दूर हो दूर हो आता तुझे काळे तोंड जगाला काय दाखवतेस ? अगं तू तुझ्या अशा कर्माने जन्म दिलेल्या आईला देखील लाजेने मान खाली घालावयास लावली या कर्मामुळे तू आता तुझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीही ठिकाणी उरली नाहीस तुला दोन्ही ठिकाणी थारा राहिलेला नाही. तुझ्या अंत:करणामध्ये जे काही होते ते आता वर प्रकट झाले आहे. बाह्यरुपाने तू जरी चांगल्या वागण्याचे �
12:55
अभंग क्र. ३७७३ (गवळणींचीअवस्था)
भरिला उलडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट ।
चाले झडझडा उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥
चाळा लावियेले गोप गोपीनाथे । जाणे आवडीचे रूप जेथे तेथे ।
दावी बहुतांच्या बहुवेषपंथे । गुणातीते खेळ मांडियेला येथे वो ॥धृपद॥
मनी आवडे ते करावे उत्तर । काही निमित्ताचा पाहोनि आधार ।
उगा राहे का मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥
धरिली खोडी दे टाकोनिया मागे । न ये विनोद हा कामा मशी संगे ।
मिठी घालीन या जीवाचिया त्यागे । नाही ठाउकी पडिली तुझी सोंगे रे ॥३॥
सुख अंतरीचे बाहय ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।
तुज मज काय सोयकरी ऐसी । नंदानंदन या थोरपणे जासी रे ॥४॥
करी कारण ते कळो नेदी कोणा । सुख अंतरीचे बाह्य रंग जाना ।
मन मिनले रे तुका म्हणे मना । भोग अंतरीचा पावे नारायणा वो ॥५॥
अर्थ
एका गवळणीला गोविंदाची इतकी आवड लागली होती की, गोविंदाला भेटण्याची तिची इच्छा झाली व तिने घरात भरलेला घट रिकामा केला व कोणाला काहीच कळू नये यासाठी ती पाणी भरण्याच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडली. गोविंदाला पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी ती पटापटा चालू लागली इकडे तिकडे गोविंदाला पाहू लागली तोच तिला समोर तो गोविंद नीट उभा असलेला दिसला. अशा प्रकारे गोपाळांना व गोपीकांना भगवंताने आपला चाळा लावला होता आपला छंद लावला होता गोपाळ व गोपी यांना जे रुप आवडत होते ते रुप हरी घ्यायचा व त्यांच्यासमोर जायचा. अशा प्रकारे भगवंताने येथे अनेक प्रकारचे खेळ मांडले होते स्वत: गुणातीत असून देखील ज्या गोप गोपींना ज्या प
12:55
अभंग क्र. ३७७४ (गवळणींचीअवस्था)
आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हे ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥
गेले होउनि न चले आता काही । साद घालिता जवळी दुजे नाही ।
अंगी जडला मग उरले ते काई । आता राखता गुमान भले बाई वो ॥धृपद॥
बहुत कामे मज नाही आराणूक । एक सारिता तो पुढे उभे एक ।
आजि मी टाकोनि आले सकळिक । तव रचिले आणिक कवतुक वो ॥२॥
चिंता करिता हरीली नारायणे । अंगसंगे मिनता दोघेजणे ।
सुखे निर्भर झालिये त्याच्या गुणे । म्हणे तुका खुंटले येणे जाणे वो ॥३॥
अर्थ
परमार्थरुपी रानामध्ये मी आले तर काय नवल पाहा नंदाचा कान्हा अवचितच मला त्या रानामध्ये भेटला. मला सर्व लोक सांगतच होते की तू त्या रानामध्ये गेली की नंदाचा कान्हा तुला भेटेलच परंतू आता काय करावे माझे संचितच असे की मला त्या संचिताने या परमार्थरुपी रानात आणले आहे. आता झाले ते झाले होऊन गेले येथे आता कोणाचेच काही चालणार नाही. जरी मी कोणाला साद घातली तरी जवळ माझ्या दुसरे कोणीही नाही म्हणजे व्दैतच शिल्लक राहिला नाही अव्दैत स्थिती प्राप्त झाली. आता कृष्ण माझ्या अंगाशी जडला आहे म्हणजे कृष्ण व मी एकरुप झाली आहे आता येथे माझे काय चालणार आहे आणि हे बयांनो ही गोष्ट मी गुह्य ठेवणे हेच चांगले आहे. संसारामध्ये मला खूप कामे होते विश्रांती तर नव्हतीच एक काम झाले की दुसरे काम पुढे उभेच होते. आज मी ते सर्व काम बाजूला सारुन या रानात आले तर कृष्णाने हे असले अनेक प्रकारचे कौतुक पुढे रचलेले होते. तुकाराम महाराज म्हणतात, “ती गोपीका लोकनिंदेचा विचार करु लागली तर नारा�
12:56
अभंग क्र. ३७७५ (गवळणींचीअवस्था)
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आये हाट ॥१॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखे गोपाल ॥धृपद॥
काहा पग डारू देखे आनेरा । देखे तो सब वोहिन घेरा ॥२॥
हुं तो थकित भईरे तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
अर्थ
गोरस विकण्यासाठी एक गवळण बाजारहटात आली व ती म्हणते की मी आता घरी जाण्याचा मार्गच विसरुन गेली आहे. त्या बाजारहाटात मला गोपाल दिसला आणि मग काय मी सर्वकाही विसरुन त्याचेच नांव घेऊ लागले त्याला म्हणू लागले हे कान्हा मनमोहना नंदलाला. मी माझा पाय कोठे ठेवू हे मला काही कळेना कारण जिकडे पाहावे तिकडे मला तूच दिसू लागला सर्व जागा त्यानेच व्यापून टाकलेली मला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “पुढे ती गोपी म्हणते हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि माझ्या मनातील संसाराविषयी असणारे सर्व भयच नाहीसे झाले. ”
12:56
अभंग क्र. ३७७६ (गवळणींचीअवस्था)
हरीबिन रहिया न जाये जिहिरा । कबकी थाडी देखे राहा ॥१॥
क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥धृपद॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारू उसपर तन ॥२॥
तुका प्रभु कब देखे पाऊ । पासी आऊ फेर न जाऊ ॥३॥
अर्थ
माझ्या जीवाला हरीवाचून करमतच नाही राहूशीच वाटत नाही त्यामुळे तर किती वेळ झाला तशी हरीची वाट पाहात आहे. हे नंदलाल माझ्याकडून काही चूक घडली आहे की काय त्यामुळे तू माझ्याकडे येण्यासाठी एवढा वेळ लावला आहे ? एखादी माझी सखी जर हरीला बोलावण्यासाठी जात असेल तर मी तिच्यावरुन माझे शरीर ओवाळून टाकीन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे प्रभू केवळ मी तुमचे पाय पाहीन एकदा की तुमच्या पायाचे दर्शन झाले की पुन्हा मी मागे प्रपंचाकडे वळून जाणार नाही. ”
12:56
अभंग क्र. ३७७७ (गवळणींचीअवस्था)
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥
आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे मान्हा ॥धृपद॥
उनसुं कलना नव्हे तो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥
तुका प्रभु परवली हरी । छेपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥
अर्थ
हे नंदाच्या मुला तू खूप चांगला आहेस आता आमची लाजही तूच राख. हे देवा कान्हा तुम्ही थोडे अलीकडे या आम्ही तुमच्या भेटीसाठी घरदार सोडून रानात आलो आहोत. अहो देवा मी इकडे तुमच्या भेटीसाठी आले आहे हे माझ्या अहंकाररुपी नवऱ्याला कळले नाही तरच चांगले कारण तो खूप वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी तुम्ही तर परम बलवान आहात माझ्या अहंकाररुपी नवरा तुमच्यापुढे काय करणार आहे मीही तुमच्या नीजस्वरुपामध्ये लपून जगापेक्षा वेगळी झाली आहे. ”
12:56
अभंग क्र. ३७७८ (गवळणींचीअवस्था)
नका काही उपचार माझ्या शरीरा । करू न साहावे बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृपद॥
कळो नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।
एकाएकी साक्षी येथे आपुले चित्त । कोण्या काळे नेणो होईल भाग्य उदित वो ॥२॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।
अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापे आले जीवन वो ॥३॥
अर्थ
एक गोपी आपल्या सख्यांना म्हणते की हे सखयांनो मला श्रीकृष्णाचा वियोग झाला आहे त्यामुळे माझ्या शरीराचा कोणताही उपचार म्हणजे शरीराची कोणत्याही प्रकारची सेवा करु नका मला ती सहन होत नाही याउलट माझ्या शरीराचा दाहच होत आहे. माझ्या मनाला व्यथा झाली आहे माझ्या मनाला केवळ नंदाच्या मुलाचाच वेध लागला आहे त्यामुळे काहीही करु नका केवळ त्या नंदाच्या बाळाला माझ्याकडे लवकर आणा. हे माझ्या सखयांनो मैत्रिणींनो तुम्ही तर माझ्या प्राणप्रिय सख्या आहात माझ्या अंत:करणातील आर्तभूत इच्छा मी तुमच्यापुढे निवेदन केली आहे. हे सखयांनो मला कृष्णभेटीचे वेध लागले आहेत त्यामुळे त्या श्रीकृष्णाची सावळी प्रभा माझ्या अंगी उमटली आहे व माझ्या अंत:करणात जो क्षोभ मला होत आहे जी अवस्था माझी निर्माण झाली आहे त्यावरुनच मला हे सर्व कळत आहे. माझ्या मनाची अवस्था दुसरे कोणालाही कळणार नाही माझी आणि कृष्णाची एकातात गाठ पडावी अशी माझी तीव्र उत्कंठता �
12:56
अभंग क्र. ३७७९ (गवळणींचीअवस्था)
पडिली भुली धावते सैराट । छंद गोविंदाचा चोजविते वाट ।
मागे सांडोनि सकळ बोभाट । वंदी पदांबुजे ठेवुनि ललाट वो ॥१॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होते वाहिले लपाला आता खांदी ।
कोठे आड आली हे देहबुद्धी । धावा आळवी करुणा कृपानिधी वो ॥धृपद॥
मागे बहुतांचा अंतरला संग । मुळे जयाचिया तेणे केला त्याग ।
पहिले पाहाता ते हरपले अंग । खुंटली वाट नाहीसे जाले जग वो ॥२॥
शोके वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषाचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥
अर्थ
कृष्ण भगवंताबरोबर रासक्रीडा करत असताना गोपीकांना अभिमान झाला की साक्षात परमात्मा आपल्याबरोबर रासक्रीडा करत आहे त्यावेळी कृष्णाने त्या सर्वाचा त्याग करुन एका गोपीकेला खांदयावर घेऊन चालू लागले व खांदयावर बसलेल्या गोपीकेला अभिमान झाला की भगवंताने सर्वाना सोडून केवळ मलाच खांदयावर घेतले आहे. त्यावेळी कृष्णाने तिलाही सोडून दिले व अदृश्य झाले त्यावेळी ती गोपीका कृष्णाला शोधण्यासाठी सैराट धावू लागली ती भ्रमात पडली तिला गोविंदाचा छंद लागला होता व त्यालाच शोधीत मार्गाने चालत होती. तिने आपल्या प्रपंचाचा मागचा सर्व विचार टाकून दिला आणि केवळ कृष्णाच्याच छंदात ती रमली होती कृष्णाचा शोध करत असताना जेथे जेथे श्रीकृष्णाचे चरणांबुज तिला दिसत तेथे तेथे ती आपला माथा टेकून वंदन करीत होती. ती गोपीका त्रागा करु लागली व रानातील वृक्षवेलींना म्हणू लागली की मला कोणीतरी गोविंदाचा शोध घेण्यासाठी साहाय्य करा त्या गोविंदाने आताच मला खांदयावर घे
12:56
अभंग क्र. ३७८० (गवळणींचीअवस्था)
काय उणे का करीतोसी चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परेपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसू या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हेचि नित्यानित्य । तूचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृपद॥
बहुत कामे मी गुंतलिये घरी । जासी डोळा तू चुकावूनि हरी ।
करिता लाग न येसी चपळ भारी । नाही सायासाची उरो दिली उरी वो ॥२॥
तुज म्हणीये मी न संगे अनंता । नको जाऊ या डोळिया परता ।
न लगे जोडी हे तुजविण आता । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण गोकुळात चोरी करु लागले त्यावेळी अनेक गवळणी यशोदेकडे तक्रार करु लागल्या त्यावेळी यशोदा कृष्णाला म्हणते अरे कृष्णा आपल्या घरी काय कमी आहे तू चोरी का करतोस हे हरी तुला कितीही सांगितले तरी तू ऐकत नाहीस. अरे कृष्णा तू असा आहेस की परावाणीच्या पलीकडेही जाऊन लपतोस तुला धरताही येत नाही आणि लौकिकामध्ये पाहिले तर तू कोणालाही आवरल्या जात नाहीस. पुढे यशोदा माता कृष्णाला म्हणते अरे कान्हा मी तुझ्यावर इतके प्रेम करते तरी देखील तू बाहेर चोरी करतोस चोरी करु नकोस म्हणून मी तुला किती वेळा करुणा भाकते या गवळणी कितीतरी मला तुझ्या तक्रारी येऊन सांगतात मी किती या जगाचे आघात सोसू. किती आघात सहन करु ? हे कृष्णा मी अरे रोज रोज या तक्रारी ऐकून त्रासले आहे मला आता या गोष्टीचा त्रास होत आहे त्यामुळे तूच आता तुझे चित्त स्थिर कर आणि मला या आघातातून सोडव मी घरामध्ये कामात गुंतलेली असले की हे हरी तू माझी नजर चुकून पळून जातोस. हे हरी तुला पकडण्यासाठी आम्ही तुझा प�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















