६ नोव्हेंबर, दिवस ३१० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५२६ ते ५५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७०९ ते ३७२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“६ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७०९ ते ३७२० चे पारायण आपण करणार आहोत.
६ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५२६ ते ५५०,

526-18
परी विश्वींची आघवी मांदी । जेणे भेदलेनि गुणभेदी । पडिली ते तव आदी । ज्ञान सांगो ॥526॥
परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो. 526
527-18
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेही चोख सुजे । तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे । सर्वही शुद्ध ॥527॥
कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते; त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते. 527
528-18
म्हणौनि ते सात्विक ज्ञान । आता सांगो दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥528॥
म्हणून सात्त्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे, असे कैवल्यगुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. 528

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥18. 20॥
529-18
तरी अर्जुना गा ते फुडे । सात्विक ज्ञान चोखडे । जयाच्या उदयी ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसी ॥529॥
तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की, ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. 529
530-18
जैसा सूर्य न देखे अंधारे । सरिता नेणिजती सागरे । का कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥530॥
ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नद्यांची ओळखही नसते, अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता सापडत नाही. 530
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


531-18
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥531॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवता पर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही; 531
532-18
जैसे हाते चित्र पाहाता । होय पाणिये मीठ धुता । का चेवोनि स्वप्ना येता । जैसे होय ॥532॥
भिंतीवरील चित्रे सावरून पाहिले असता, किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते 532
533-18
तैसे ज्ञाने जेणे । करिता ज्ञातव्याते पाहाणे । जाणता ना जाणणे । जाणावे उरे ॥533॥
तसेच ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता, व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते; 533
534-18
पै सोने आटूनि लेणी । न काढिती आपुलिया आयणी । का तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसे ॥534॥
परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी घ्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत, 534
535-18
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । ते ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥535॥
तसा सर्व दृश्य वस्तूंच्या ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही, त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. 535


536-18
आरिसा पाहो जाता कोडे । जैसे पाहातेचि का रिगे पुढे । तैसे ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जे ॥536॥
आरसा पाहू गेले असता जसे पहाणाराचेच प्रतिबिंब त्यात दिसते, तसेच ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो. 536
537-18
पुढती तेचि सात्विक ज्ञान । जे मोक्षलक्ष्मीचे भुवन । हे असो ऐक चिन्ह । राजसाचे ॥537॥
हेच सातवी ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो; आता तुला ‘राजस’ ज्ञानाची लक्षणे सांगतो, ती ऐक. 537

पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥18. 21॥
538-18
तरी पार्था परीयेस । ते ज्ञान गा राजस । जे भेदाची कास । धरूनि चाले ॥538॥
तर पार्था, तेज ज्ञान राजस होय, की जे भूतमात्रांच्या भेदभाव मानून चालते, समजलास ? 538
539-18
विचित्रता भूताचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणे ॥539॥
ज्या ज्ञानाने भूतमात्रांच्या ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठीकर्‍या(वेगळेपणा) करून घेतल्या आहेत ज्ञात्याला चकवून सोडले आहे; 539
540-18
जैसे साचा रूपाआड । घालूनि विसराचे कवाड । मग स्वप्नाचे काबाड । ओपी निद्रा ॥540॥
ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे आड ज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय सिथ्ती आणते, 540
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


541-18
तैसे स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या मही खळी । तिही अवस्थांचिया वह्याळी । दावी जे जीवा ॥541॥
त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवतुन मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसविते, 541
542-18
अलंकारपणे झाकले । बाळा सोने का वाया गेले । तैसे नामी रूपी दुरावले । अद्वैत जया ॥542॥
लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरुपाच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते; 542
543-18
अवतरली गाडग्या घडा । पृथ्वी अनोळख जाली मूढा । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठी ॥543॥
अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखविली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते, 543
544-18
का वस्त्रपणाचेनि आरोपे । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥544॥
किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखविले असता तंतूंची ओळख पटत नाही, अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याची ओळख नसते, 544
545-18
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥545॥
तसे भूतमात्र भिन्नभिन्न आहे, या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्य बोधाची भावना नाश पावली आहे. 545


546-18
मग इंधनी भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । का जळभेदे शकलु । चंद्रु जैसा ॥546॥
मग लाकडे पेटल्यावर त्यांच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे, चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते हालल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत, 546
547-18
तैसे पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आतले ते राजस । ज्ञान येथ ॥547॥
तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे, अथवा वेषा वरून लहान व मोठा हा भेद आहे या समजुतीने जे भरलेले ज्ञान, ते राजस ज्ञान होय. 547
548-18
आता तामसाचेही लिंग । सांगेन ते वोळख चांग । डावलावया मातंग- । सदन जैसे ॥548॥
आता, गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरता जसे वाटसरास जसे बजावून सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव.

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥18. 22॥

548
549-18
तरी किरीटी जे ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥549॥
तर अर्जुना, जे ज्ञान विधी रुपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करिते आणि म्हणूनच ते नग्न असल्यामुळे, सर्व शास्त्रांची ‘माता’ जी श्रुती तिला पाठमोरी असते; 549
550-18
येरींही शास्त्र बटिकरी । जे निंदेचे विटाळवरी । बोळविलेसे डोंगरी । म्लेंच्छधर्माच्या ॥550॥
इतर शास्त्रांनीही त्या ज्ञानात बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल, म्हणून म्लेंच्छ धर्मरूपी डोंगराकडे ज्यांची बोलवण केली, (त्याला वाळीत टाकले.); 550
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३१० वा. ६, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७०९ ते ३७२०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३७०९ (खेळावरीलरूपके:टिपरी)
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
यतिस्पद राखो जेणे टिपरिया घाई । अनुहाते वाये मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥धृपद॥
सा चहू वेगळा अठराही निराळा । गाऊ वाजवू एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा नेणे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥
आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानी रे ।
आंधळ्यासि डोळे पागुळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥३॥
अर्थ
टिपरीच्या खेळात बारा किंवा सोळा संतरूपी गडयांचा आपण मेळ जमवु. भगवंत हा सतरावा गडी आहे. टिपर्यांच्या नादात तालबद्ध पदे राखु व मृदुंगातून ध्वनि निघत आहे. अरे, आपण खेळत, नाचत पंढरीला जाऊ. विठ्ठल-रूखुमाइचे दर्शन घेऊ रे. चार वेद, सहा शास्र, अठरा पुराणे यात वर्णन केल्यापेक्षा ते वेगळे आहे त्याला गाऊ. भजन छंदात टाळ्या वाजऊ. अश्या आनंदात पक्षी चारा खाने विसरतात, तरुण वर्गहि देहभान विसरतो. तुकाराम महाराज म्हणतात, तेथे असा आंनद असतो की, त्यात मुका बोलू लागतो. बहिरा एकु लागतो. आंधळयाला दृष्टी प्राप्त होते. पागळयाला पाय येतात. वृद्ध लोक तरुण होतात रे.

अभंग क्र. ३७१० (खेळावरीलरूपके:टिपरी)
दोन्ही टिपरी एकचि नाद । सगुण निर्गुण नाही भेद रे ।
कुसरी अंगे मोडितील परी । मेळविति एक एका छंदे रे ॥१॥
काहीच न वजे वाया रे । खेळिया एकचि बसवंत अवघिया रे ।
सम विषम तेथे होऊंच नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥धृपद॥
संत महंत सद्धि खेळतील घाई । तेच सांभाळी माझ्या भाई रे ।
हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरी मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥
वितालाचे अवघे जाईल वाया । काय ते शृंगारूनि काया रे ।
निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥
प्रकाराचे काज नाही सोडी लाज । निःशंक होउनिया खेळे रे ।
नेणती नेणतींच एके पावली मान । विठ्ठल नामाचिया बळे रे ॥४॥
रोमांच गुढिया डोलविती अंगे । भावबळे खेळविती सोंगे रे ।
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगे रे ॥५॥
अर्थ
दोन टिपऱ्या जर एकमेकांवर वर आदळल्या तर दोन्हीचा नाद एकच येतो त्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचे स्वरूप हे सारखेच आहेत यामध्ये भेद नाही. नृत्य करताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नृत्य करेल परंतु नृत्य करणे म्हणजे एक नृत्य कलेचा अविष्कार करणे असते. त्याप्रमाणे तुम्ही कोणताही खेळ खेळा तो वाया जाणार नाही जाणार नाही कारण देव सर्वत्र एकच आहे. त्याप्रमाणे देव सर्वत्र एकच आहे हे जाणून घ्यावे आणि सम व विषम मनामध्ये येऊ देऊ नये हे जाणून घेऊन खेळ खेळत राहावे. हे माझ्या भावांनो संत, महंत, सिद्ध, साधू हे ज्या प्रकारे हा खेळ खेळले आहेत त्या प्रकारे तुम्ही खेळ खेळा आणि त्या प्रकारे तुम्ही खेळून त्याचा सांभाळ करा. संत, साधु, मुनी, सिद्ध यांनी स्वरूप व ऐक्य�

अभंग क्र. ३७११ (खेळावरीलरूपके:टिपरी)
या रे गडे हो धरू घाई जाणता ही नेणता । नाम गाऊ टाळी वाहू अपुलिया हिता ॥१॥
फावले ते घ्यारे आता प्रेमदाता पांडुरंग । आजि दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥धृपद॥
हिंडती रानोरान भुजंग ते कांट्यावन । सुख तयांहून आम्हा गाता नाचता रे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हादिका सांवळे दुर्लभ सुखा । आजि येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी ॥३॥
अर्थ
सवंगड्यानो, आपण जानते, नेनते कसेही असलो तरी त्वरित परमार्थाचा मार्ग धरुया. स्वहितासाठि हरिनाम घेत टाळी वाजवु. आजचा दिवस सोन्याचा रंग घेउनच आला आहे तो तुम्ही घ्यावा श्रीरंगाचा जो रंग लाभला आहे, तो प्रेम देणारा पांडुरंग आहे. कित्येक साधक संसाररूपी रानावानात हिंडतात तेथे काम क्रोध रूपी भुजंग आहेत पण आम्हाला हरिचे नाम गाताना, नाचताना अत्यंत सुख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, जे ब्रम्हादिकांना दुर्लभ आहे ते श्रीकृष्णचे सावळे रूप आहे, परंतु आज कीर्तनात त्याचे नांव घेतले व त्याचा लाभ झाला आहे.

अभंग क्र. ३७१२ (खेळावरीलरूपके:टिपरी)
भीमातीरी एक वसविले नगर । त्याचे नांव पंढरपुर रे ।
तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।
पुढे गेले ते निघाई झाले । वाणितील त्याची सीमा रे ॥धृपद॥
बळिया आगळा पाळी लोकपाळा । रीघ नाही कळिकाळा रे ।
पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥
संतसज्जनी मांडिली दुकाने । जे जया पाहिजे ते आहे रे ।
भुक्तिमुक्ति फुकाच साठी । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
न वजो म्हणती आम्ही वैकुंठा । जिही देखिली पंढरी रे ॥४॥
बहुत दिस होती मज आस । आजि घडले सायासी रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्ये । भेटी तया पायासी रे ॥५॥
अर्थ
अरे, भीमा नदीच्या काठी एक नगर वसले आहे. त्याचे नांव पंढरपुर आहे. तेथील मोकाशाला चार हात सोळा हजार बायका आहे. अरे खेळीया, आपण त्याच्या गावाला नाचत नाचत जाऊ. तो आपल्याला सुख आणि विसावा, दोन्ही देईल. जे पुढे गेले आहेत, ते काळजीपासून मुक्त झाले. त्यांच्या तेथे काळीकाळाला प्रवेश नसतो. पुडंलिक पाटलाने त्याच्याशी कुळवाडि म्हणजे त्याची भक्ती केली आहे. तो भवदुःख पासून दूर झाला आहे. अरे, संतांनीही परमार्थचे दुकाने घातली. ज्याला जे हवे असेल, ते त्याला तेथे प्राप्त होते, भुक्ति- मुक्ति फुकटच मिळतात ; तरीही त्यांच्याकडे कुणीही पाहत नाही. अरे, पंढरित आषाढ़ी-कार्तिकेत खुप मोठे बाजार भारतात. असंख्य वारकरी तेथे जमतात. ते म्हणतात, आम्ही पंढरी पाहिली आहे त्यामुळे आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा नाही. तुकाराम महा�

अभंग क्र. ३७१३ (काला)
ब्रम्हादिका न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥१॥
मोहरी पावा वाहे काठी । धावे पाठी गाईचे ॥धृपद॥
उच्छिष्ट जे न लभे देवा । ते हे सदैवा गोवळ्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली । ते हे माउली आमुची ॥३॥
अर्थ
ब्रम्हादिकांना ज्याची महिमा कळाली नाही आशा अगम्य स्वरूपाची, दगडी खोळ विठ्ठलाने धारण केली आहे. मोहरा, पावा, काठी घेऊन तो गाईच्या पाठी धावु लागला. जे उष्टे देवांना मिळाले नाही, ते ह्या भाग्यवान गावळ्यांना मिळाले. तुकाराम महाराज म्हणतात, गावळ्यांना ज्या देवाची जोड़ी मिळाली. सांगत लाभली, तोच देव म्हणजे आमची विठू माउली आहे.

अभंग क्र. ३७१४ (दळण)
शुद्ध दळणाचे सुख सांगो । मानवत असे सईबाई ॥१॥
शुद्ध ते वळण लवकरी पावे । डोलविता निवे अष्टांग ते ॥धृपद॥
शुद्ध हे जेविता तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक शुद्धचीत्त चांगला । अविट तयाला नाश नाही ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा । भ्रतार वेगळा न करी जीवे ॥४॥
अर्थ
हे सईबाई, शुद्ध आचरणपूर्वक हरिनामरूपी दळणाचे सुख किती व कसे असते म्हणून सांग ? ते आम्हाला मानवले नाही. असे शुद्ध दळन लवकर होते, दळणात अंग डोलू लागते, त्यामुळे अष्टांग शांत होते. जेवन जेवतांना विवेकरुपी इंधन कमी लागते. ते जेवण तन- मन शांत करते. जेवण (स्वयंपाक) शुद्ध व चांगला झालेला आहे. ते अविट आहे. त्याचा नाश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे शुद्ध असते ते सर्वाना आवडते. शुद्ध पाक तैयार करणाऱ्या स्त्रीला तिचा नवरा प्रेमपूर्वक, जीवाभावाने आपलेसे करतो, कधीच दूर लोटत नाही.

अभंग क्र. ३७१५ (काला)
कान्होबा तू आलगट । नाही लाज बहु धीट । पाहिले वाईट । बोलोनिया वोखटे ॥१॥
परि तू न सांडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पडिसी रोकडी । तुटी माये आम्हासी ॥धृपद॥
तू ठायीचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटू डांगोरा ॥२॥
जरी तुझी आई । आम्ही घालू सर्वा ठायी । तुका म्हणे ते ही । तुज वाटे भूषण ॥३॥
अर्थ
हे कान्होबा, कृष्णा तू फार खोडकर आहेस. तुला लाज नाही. तू अतिशय धीट आहेस. तुला आम्ही खुप वाईट-साइट बोलून पाहिले. परंतु तू काही आपला खोडकर स्वभाव बदलत नाहीस. पुनःपुन्हा त्याच खोडया करतोस आणि आमच्या अविद्यांचा नाश करतोस. हे देवा, तू गुराखी आहेस आणि अविचारी, आडदांड, चोरटा, शिंदळ आहेस, असा डांगोरा आम्ही जगभर पिटवु. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे शारीर निर्माण करणारी मायारूपी आई, तिचा सर्वाणी उपभोग घेतला, तरी देखिल तुला त्याचे भूषण वाटते, इतका तू निलाजरा आहेस.

अभंग क्र. ३७१६ (काला)
भोजनाच्या काळी । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा ।
देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥
कैसा आळी घेसी । नव्हे ते चि करीसी । घेई दुसरे तयेसी । वारी म्हणे नको ॥धृपद॥
आता काय करू । नये यासि हाणू मारू । नव्हे बुझाविता स्थिरू । काही करिताही ।
हातेची केले एके ठायी । आता निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरीसि म्हणे माता ॥२॥
त्याचे तयाकुन । करविता तुटे भान । तव झाले समाधान । उठोनिया बैसे ।
माते बरे जाणविले । अंग चोरूनि आपुले । तोडियले एका बोले । कैसे सुखदुःख ॥३॥
ताट पालवे झाकिले । होते तैसे तेथे केले । भिन्नाभिन्न निवडिले । अन्ने वेगळाली ।
विस्मित जननी । भाव देखोनिया मनी । म्हणे नाही ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥
हरुषली माये । सुख अंगी न समाये । कवळूनि बाहे देती आळींगन । आनंद भोजनी ।
तेथे फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥
अर्थ
एके दिवशी ताटात वाढलेली सर्व अन्नपदार्थ कृष्णने एकत्र कालविले आणी नतर हट्ट धरून म्हणाला, आई, हे एकत्र केलेले अन्नपदार्थ निवडून पूर्वी होते तसे दे; नाहीतर मी जेवणार नाही. असे म्हणून तो जमिनीवर लोळण घेऊ लागला. यशोदामाता म्हणाली, कृष्णा, तू भलताच हट्ट करतो आहेस. जे अशक्य आहे तेच करायला लावतो आहेस. अरे, वेगवेगळ्या पदार्थांचा काला केल्यानंतर ते पुन्हा पूर्वीसारखे कसे काय करता येईल ?. यशोदा म्हणाली, आता काय करावे ? त्याला मारू नये, याची समजुत घालावि. म्हणून समजूत घालत ती म्हणाली, ” आपल्याच हाताने सर्व अन्नपदार्थ कालाविलेस, आता तूच ते नि�

अभंग क्र. ३७१७
चला वळू गाई । बैसो जेऊ एके ठायी ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥धृपद॥
खांदी भार पोटी भुक । काय खेळायाचे सुख ॥२॥
तुका म्हणे धावे । मग अवघे बरवे ॥३॥
अर्थ
गोपाळ म्हणाले, ” सवंगड्यानो, चला. आपण इंद्ररूपि गाईना अंतर्मुख करू आणि एके ठिकाणी बसून आनंदात जेवू. आत्तापर्यंत खुप वनवन झाली. पयपिट करून फार शिण आला आहे. खांद्यावर भार आणि मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात काय सुख आहे ?. तुकाराम महाराज म्हणतात, गडयांनो, आता जेवनाची घाई करा. त्यातच आपले कल्याण आहे.

अभंग क्र. ३७१८
नेणो वेळ काळ । धालो तुझ्याने सकळ ॥१॥
नाही नाही रे कान्होबा भय आम्हापाशी । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥धृपद॥
तुजपाशी भय । हे तो बोलो परी नये ॥२॥
तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवे फोल ॥३॥
अर्थ
हे परमेश्वरा देवा, तुझ्या सहवासात किती आणि कसा वेळ गेला आम्हाला कळाल नाही. कान्होबा, आता आमच्याजवळ थोड़ेसुद्धा भय राहिले नाही. गाईला वळवून तू पोटभर खायला दिलेस. गाई वळून झाल्यावर ‘भय’ आहे, असे म्हणणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या संगती भय नाहीच, उलट सुख आहे. आम्ही याचा अनुभव घेतला आहे; त्यामुळे इतरांचे बोलने व्यर्थ आहे.

अभंग क्र. ३७१९ (विटूदांडू)
सारा विटूदांडू । आणीक काही खेळ मांडू ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाही कोठे पाव ॥धृपद॥
कोली हाणे टोला । झेली तेणे तो गोविला ॥२॥
एकमेका हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आले नांव । फेरा न चुकेचि धाव ॥४॥
पुढे एक पाटी । एक एके दोघा आटी ॥५॥
एका सोस पोटी । एक धावे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आता । खेळ मोडावा परता ॥७॥
अर्थ
गडयांनो, आता विटीदांडुचा खेळ जरा बाजूला ठेवून आपण दूसरा एखादा खेळ खेळु. पुष्कळ डाव आंगावर आले. या प्रपंचरूपी खेळात आपले पाय कुठेच स्थिर राहिले नाही. (वधूपितारूपि) एक गडी (कन्यारूपी) वीटी कोलून तिला ( लग्नरूपि) टोला मारतो. दुसरा (जावाईरुपि) गड़ी ती झेलतो, त्याने ती वीटी झेलली आहे, तोच या डावात गुंततो. डावात आलेल्या लग्न झालेल्या त्या स्त्रीसह सारे एकमेकांना हका मारतात. एखादा गाड़ी पळून जायला लागल्यावर त्याला पकडून ठेवतात. एकदाकि या प्रपंचिक गाड्यांच्या रांगेत नांव लागले की जन्म-मृत्यु च्या फेऱ्या आणि संपत्तिचि हाव कधीच चुकत नाही. या रांगेत मुलगा, नातू, पंतू हे पुढे असतात व बाप, आजोबा, पंजोबा हे गड़ी मागे असतात. एकमेकांच्या पालनपोषणाचा दोघानाहि प्रयत्न करत राहावा लागतो. विटीदांडूच्या या खेळाविषयी काहीच्या मनात फार हाव्यास असतो. त्यामुळे धनलोभाकडे धाव घेतात. त्यातून थोडाफार फायदा झाला की आनंदाने टाळ्या पिटतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता हा खेळ सोडा आणि दुसरा खेळ मांडा.

अभंग क्र. ३७२०
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण ते बरे । येथे करा कारण ॥१॥
हा गे हा गे हरी । करिता सापडला चोरी । घाला गाठी धरी । जीवे माय त्रासाया ॥धृपद॥
तेचि पुढे आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावे ॥२॥
संशयाचे बिरडे । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आता घेता फावेल ॥३॥
तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासीचि निवाड । आम्ही भारवाहिका ॥४॥
अर्थ
गोपी म्हणतात, “हे सखयांनो हरीला आपण माजघरात कोंडू म्हणजे आपल्या ह्दयात कोंडून ठेवू व त्याचेच रक्षण करु तेच चांगले आणि हेच काम आता आपण करु या. ” तो पाहा तो पाहा तो हरी आपल्या घरी चोरी करताना सापडला आहे त्याच्या मायेला त्रास देण्याकरता आपण आता त्याच्यात व आपल्यात ऐक्य करुन घ्यावे. हा हरी काय करतो तर तो ज्या गोपीला ज्या गोष्टीचा लोभ आहे ती गोष्ट मायेच्या रुपाने तिच्यापुढे आणून ठेवतो आणि त्या गोष्टीविषयी प्रतिबंध करुन तिला नागवून सोडतो. ज्या गोष्टीमध्ये गोपीकेचा लोभ आहे त्या गोष्टीत तिचा हात गुंतवून ठेवतो आणि तिला तळमळ करायला लावतो व तेथून पळून जातो. पूर्वी हरी व आमच्यामध्ये जे संशयाचे बिऱ्हाड होते ते हरीच्या भेटीने पूर्णपणे नाश पावले आहे आता हरी नेहमी आमच्याजवळच राहाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुम्हाला काकूळतीला येत आहे हे माझ्या सखयांनो तुम्ही तुमच्या माथ्यावर संसाराचा व्यर्थ भार वाहू नका तुम्ही हरीशी संबंध ठेवा हरीशी संबंध ठेवला की तुमच्या संसाराचा भार नाहीसा होईल. ”

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading