आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ नोव्हेंबर, दिवस ३१७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७०१ ते ७२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७९३ ते ३८०४
“१३ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १३ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७९३ ते ३८०४ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७०१ ते ७२५,
701-18
येतुलेनि ते कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥701॥
अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. 701
702-18
ऐसे करी तो भला । संसारभये सांडिला । करणीयत्वे आला । मुमुक्षुभागा ॥702॥
अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो, तो संसार भयापासून मुक्त होतो वया आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोहोचतो. (मोक्षमार्गास लागतो) 702
703-18
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥703॥
या नित्यकर्म वर भरवसा ठेवून ती बुद्धी त्याच्या आचरणात विषयी निश्चय करते, तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेली आहे, 703
704-18
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळी । इये कर्मी बुडकुळी । द्यावी की ना ? ॥704॥
म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मांत बुडी का न मारावी ? 704
705-18
तृषार्ता उदके जिणे । का पुरी पडलिया पोहणे । अंधकूपी गति किरणे । सूर्याचेनि ॥705॥
तहानलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर, पुरात पडलेल्यास पोहता येत असतांना, अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर, 705
706-18
नाना पथ्येसी औषध लाहे । तरी रोगे दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥706॥
अथवा पथ्यासह औषध घेतली असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला, 706
707-18
तरी तयाच्या जीविता । नाही जेवी अन्यथा । तैसे कर्मी इये वर्तता । जोडेचि मोक्षु ॥707॥
तर त्याच्या जिवासी असे भय नाही, तसे ह्या नित्य कर्माचे आज केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते, 707
718-18
हे करणीयाचिया कडे । जे ज्ञान आथी चोखडे । आणि अकरणीय हे फुडे । ऐसे जाण ॥708॥
हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते, आणि हे बघ, खरोखरच योग्य नव्हतं, 708
709-18
जी तिथे काम्यादिके । संसारभयदायके । अकृत्यपणाचे आंबुखे । पडिले जया ॥709॥
अशी जी काम्यादिक कर्मे, जी संसारभय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्ध पणाचा शिक्का आहे, 709
710-18
तिये कर्मी अकार्यी । जन्ममरणसमयी । प्रवृत्ति पळवी पायी । मागिलीचि ॥710॥
त्या अनाचारणीय व जन्ममरणदायक अशा वाईट कर्मांपासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवितो; 710
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
711-18
पै आगीमाजी न रिघवे । अथावी न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवी ॥711॥
अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही, व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही, 711
712-18
का काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥712॥
अथवा फुसकारे टाकीत असलेला काळा नाग दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही, 712
713-18
तैसे कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥713॥
त्याप्रमाणे निषिद्ध कर्म पाहूनच ज्या बुद्धीत निश्चयकरून भय उत्पन्न होते, 713
714-18
वाढिले रांधूनि विखे । तेथे जाणिजे मृत्यु न चुके । तेवी निषेधी का देखे । बंधाते जे ॥714॥
विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चूकता नाही, असे निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाही. 714
715-18
मग बंधभयभरिती । तिये निषिद्धी प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥715॥
मग निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते; 715
716-18
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥716॥
रत्नपारखी खऱ्याखोट्याचा निर्णय करितो, तसा कार्य व अकार्य यांच्याविषयी प्रवृत्तीनिवृत्ती रुप मापाने जी निर्णय करिते; 716
717-18
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तू जाण ॥717॥
तसेच, ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्ट समजते, ती सात्त्विक बुद्धी होय असे समज. 717
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥18. 31॥
718-18
आणि बकाच्या गावी । घेपे क्षीरनीर सकलवी । का अहोरात्रींची गोवी । आंधळे नेणे ॥718॥
आणि बगळ्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्र घेतले जाते; किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही; 718
719-18
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठे कोरू धावे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवी ॥719॥
ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करता येतो; तोच लाकूडही करण्यास प्रवृत्त होतो; परंतु याचा भ्रमर पणा काही नष्ट होत नाही, 719
720-18
तैसी इये कार्याकार्ये । धर्माधर्मरूपे जिये । तिये न चोजविता जाये । जाणती जे का ॥720॥
त्याप्रमाणे धर्म-अधर्म रूपाने असणारी जी कार्याकार्ये, त्यांची निवड न करिता जी बुद्धि त्यांचे आचरण करीते, 720
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
721-18
अगा डोळांवीण मोतिये । घेता पाडु मिळे विपाये । न मिळणे ते आहे । ठेविले तेथे ॥721॥
अरे, परीक्षेशिवाय मोती घेतला असता किंचित चांगली मिळतीलच असा नेम नाही; पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र निश्चित आहे; 721
722-18
तैसे अकरणीय अवचटे । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवी जाणे एकवटे । दोन्ही जे का ॥722॥
तसे निषिद्ध कर्म सहाजिकपणे प्राप्त न झाले तरच रहाते, एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानले जातात; 722
723-18
ते गा बुद्धि चोखविषी । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥723॥
जसे सर्व समाजात योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंध बुद्धी ती राजस बुद्धी होय. 723
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥18. 32॥
724-18
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । का राक्षसा दिवो पाहे । राती होऊनि ॥724॥
आणि राजा ज्या मार्गांनी जातो, ते चोरास जसे आडमार्ग होत, (राजमार्ग जसे चोरांच्या उपयोगी नाहीत, ) तेव्हा राक्षसाला रात्री जसे उजाडते; 724
725-18
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पै असते आपणपे जीवा । नाही जाले ॥725॥
अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशांची रास दिसते; म्हणून धन जवळ असतांना त्याला नाही सारखे होते, 725
दिवस ३१७ वा. १३, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७९३ ते ३८०४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७९३ (गवळणींचीअवस्था)
ये रे कृष्णा खुणाविती खेळो भातुके । मिळालिया बाळा एके ठायी कवतुके ।
कळो नेदी माया त्यासचि ते ठाउके । खेळतोंसे दावी लक्षलक्षापे मुके ॥१॥
अखंडित चटे त्यांनी लावियेला कान्हा । आवडे तया ते वाहाती संकल्प मना ।
काया वाचा मने रूपी गुंतल्या वासना । एकाताचे सुख जाती घेवोनिया राणा ॥धृपद॥
अवघियांचा जाणे झाला मेळासा हरी । मिळोनिया जावे तेथे तया भीतरी ।
कळो नेदी घरिच्या करी गोवूनीया चोरी । हातोहाती नेती परेपरत्या दुरी ॥२॥
आनंदे निर्भर आपणाशी आपण । क्रीडतील बाळा त्यजिले पारिखे जन ।
एकाएकी तेथे नाही दुसरे भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वाचून ॥३॥
अर्थ
काही गवळणी एकत्रित येऊन लाडाने कौतुकाने एकमेकांना खुणवून कृष्णाला म्हणू लागल्या की कृष्णा चल ये आपण भातूकलीचा खेळ खेळू या. असे म्हणून सर्व गवळणी व कृष्ण एकत्रित येऊन खेळ खेळू लागल्या कृष्ण तर त्यांच्याशी खेळू लागला पण त्याचे मुख्य लक्ष्य होते चोरी करणे त्या लक्ष्याकडेच कृष्णाचे लक्ष होते आणि गवळणींना त्याची लीला माहित न करु देता तो केवळ त्यांच्याशी खेळ खेळण्याचे सोंग दाखवित होता. कृष्णाने अखंडितपणे त्यांच्या मनाला स्वत:ची चटक लावली होती. कान्हाच गवळणींना सारखा आवडता होता त्यामुळे त्याचाच संकल्प त्या गवळणी मनात वाहात होत्या. कायावाचामनाने सर्व गवळणी कृष्णाच्या रुपाच्या वासनेत गुंतल्या होत्या त्याचे एकातात सुख भोगण्यासाठी त्याला रानात ठेवून जात होत्या. सर्व गवळणींचा मेळा एकत्रित जमा झाला आणि कृष्ण देखील त्यांच्यामध्ये तात्पुरता थोडया पुरताच मिळून �
12:59
अभंग क्र. ३७९४ (गवळणींची अवस्था)
खेळता मुरारी जाय सरोवरा तिरी । तव नग्नचि या नारी तेथे देखियेल्या ।
मांडिले विंदान ख्याल सुखाचे संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पाया पडता रे न सोडी नेदी साउलां रे ॥धृपद॥
साड्या साउली पातळे गोंडे कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे ।
खांदी धरूनिया करी दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हासे ॥२॥
आनंदे कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळा । एकी एकीहूनि म्हैस वेल सुर काडी ।
एकी उगविती कोडी । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥३॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडे तव नारी । म्हणे नाही नेले चोरी काय जाणो केव्हा ।
केला सकळी हाकारा तव आलिया बाहेरा । आता म्हणतील घरा जावे कैशा परी ॥४॥
तव हासे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळी मागे पुढे हात ।
लाज राखावी गोपाळा आम्हाजणींची सकळा । काय मागसी ये वेळा देऊ गुळवाटी ॥५॥
जोडोनिया कर या गे सकळी समोर । वाया न बोलावे फार बडबड काही ।
भातुके भूषण नाही चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशी ॥६॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनिया राहे । म्हणे चला आता सये जाऊ तयापाशी ।
जोडोनिया हात कैशा राहिल्या निवांत । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥७॥
अर्थ
खेळता खेळता मुरारी म्हणजे कृष्ण सरोवराच्या तीरी गेला तर त्याला तेथे काही स्त्रिया नग्न अवस्थेतच दिसल्या. मग काय कृष्णाने ठरवले की यांची गंमत करायची स्वत:चे अंग लपवून मान खाली घालून वृक्षाकडे तो त्वरेने चालू लागला. कृष्णाने त्यांचे सर्व वस्त्र चो�
12:59
अभंग क्र. ३७९५ (गवळणींचीअवस्था)
धरिला पालव न सोडी माझा येणे । काही करिता या नंदाचिया कान्हे ।
एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राने रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगता नाही उरी रे ॥धृपद॥
सखिया वेशिया होत्या । तुज फावले रे फांकता तयांसी ।
होते अंतर तई सांपडते कैसी । एकाएकी अंगी जडलासी रे ॥२॥
ऐसी भागली हे करिता उत्तर । शक्ति मावळल्या आसुडिता ।
स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
अर्थ
एक गवळण म्हणते या नंदाच्या कान्हाने माझा पदर धरला हा माझा पदर धरील असे मला माहितच नव्हते. मला जर पूर्वीच माहित असते तर मी या अवघड रानामध्ये आलेच नसते मला काय माहित की हे रान इतके अवघड आहे. हे हरी माझा पदर सोड मला जाऊ दे जर मला घरी जाण्यास वेळ लागला तर माझे घरचे माझ्यावर रागावतील. अरे माझे सासू सासरे नवरा हे फार निष्ठूर आहेत त्यांना जर या गोष्टी सांगितल्या तर तुझे आणि माझे काही खरे नाही बरे. अरे कृष्णा इतक्या वेळ माझ्या प्रिय सख्या माझ्याजवळच होत्या आणि त्या काही निमित्याने जिकडे तिकडे गेल्या तर तुला लगेच फावले लगेच येऊन तू माझा पदर धरला आहेस. अरे कान्हा आपल्या दोघामध्ये उपाधीमुळे खूप अंतर पडले होते परंतू एकेकीच तू कसा येऊन माझ्या अंगाशी झटला आहेस बघ. तुकाराम महाराज म्हणतात, “ती गवळण बोलता बोलताच दमून गेली कृष्णाच्या हातातून हात सोडून घेता घेताच तीची शक्ती अगदी कमी झाली. ” महाराज म्हणतात, “माझा स्वामी भोग भोगणाऱ्या लोकांमध्ये फार चतुर होता तो गवळणींचा भोगही भोगी�
12:59
अभंग क्र. ३७९६ (गवळणींचीअवस्था)
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखावया हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥धृपद॥
चिरे चोळीया त्या धुता विसरती । ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती । कोणा नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळा नेत्रा पाती वो ॥२॥
दंत धावनाचा मुखामाजी हात । वाद्ये वाजती नाईके जनमात । करी श्रवण श्रीकृष्णवेणूगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥३॥
अर्थ
जगजेठी श्रीकृष्ण गाई व गोपाळांसह यमुनेतिरि पाणी पिण्यासाठी आला; त्यानंतर सवंगडी वाटून वळवंटात चारि दिशांनी चेंडूचा खेळ खेळू लागले. त्या वेळी श्रीकृष्णला पाहन्याच्या ओढिनि गौळणी म्हणाल्या, ” चला आपण तिकडे हरिला पाहू ” . त्या गोपिका कामातुर झाल्या होत्या. हरिच्या दर्शनासाठी त्यांचे चित्त कासाविस झाले होते. पाणी आनंयाच्या किंवा धुने धुन्याच्या निमित्ताने बाहेर पडायचे, असे बारा-सोळा गौळणींनि ठरवून ठेवलेले होते. परंतु पानी भरने, धुने धुने ही कामे त्या पूर्णपणे विसरून गेल्या. त्यांचे लक्ष् कृष्णकडे लागलेले होते. आपले कुळ, गोत्र, जात, कुटुंब या कशाचेच त्या कुणाल भान उरले नव्हते. कृष्णकडे पाहताना सार्यांची दृष्टी तटस्थ झाली. तुकाराम महाराज म्हणतात, काही गुळणींना दात घासन्यासाठी तोंडात हात घातला होता. , तो तसाच राहिला. त्या वेळी दूर वाद्यांचा आवाज येत होता. लोकाचा गलबलाही चालला होता; परंतु त्यांना काहीही एकु येत नव्हते. श्रीहरिच्या मुखातून येणारे �
12:59
अभंग क्र. ३७९७ (गवळणींचीअवस्था)
कोठे मी तुझा धरू गेले संग । लावियेले जग माझ्या पाठी ॥१॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावू चाळा खोटा येथे ॥धृपद॥
रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती । न देखे भोवती मी ते माझी ॥२॥
तुकयाचा स्वामी माझे जीवींच बैसला । बोलींच अबोला करूनिया ॥३॥
अर्थ
एक गौळण म्हणते, की कृष्णा तुझी सांगत करण्याची बुद्धी मला कोठुन झाली असे वाटते; कारण त्या मुळे सारे लोक (वेडी म्हणून) माझ्या पाठीसी लागले आहे. हे गोपाळा, माझ्यापसुन दूर सरक. खोते छंद आम्हाला लावू नकोस. तुझ्या रूपलावन्याने माझी चित्तवृत्ति हरपली आहे. पाती, पुत्र हे देहसंबंधी ही मी विसरून गेले. त्यांचे भान मला राहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बोलता बोलताच अबोल करून माझे स्वामी अभेदाने माझ्या प्राणात जावून बसला आहे.
12:59
अभंग क्र. ३७९८ (गवळणींचीअवस्था)
गोड लागे परी सांगताचि नये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥
वेधले वो येणे श्रीरंगरंगे । मी हे माझी अंगे हारपली ॥धृपद॥
परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायी । विसावोनि पायी ठेले मन ॥२॥
तुकयाच्या स्वामीसवे झाली भेटी । तेव्हा झाली तुटी मागिलाची ॥३॥
अर्थ
एक गोपी आपल्या सखीला म्हणते हे सखे हरीच्या स्वरूपाची गोडी लागली तर त्या गोडी चे वर्णन सुद्धा करता येणार नाही इतकी गोड हरीच्या स्वरुपाची गोडी लागते. आणि चित्ताला त्याची म्हणजे हरीच्या स्वरूपाची मिठी अगदी घट्ट बसली आहे. या हरिच्या म्हणजे श्री रंगाच्या रंगाने मला इतके वेढून टाकले आहे की मी माझ्या देह बुद्धीला देखील हरपले आहे, देहाची देखील शुद्ध मला राहिली नाही. मी माझे मन व दृष्टी हरीच्या पायाच्या ठिकाणी ठेवले आहे आणि ते तेथेच विश्रांत पावले आहे त्यामुळे आता ते परत माघारी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या स्वामीची माझ्याबरोबर भेट झाली आहे त्यामुळे मला मागीला संसाराची तूट झाली आहे.
1:00
अभंग क्र. ३७९९ (गवळणींचीअवस्था)
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥
बैसला तो माझे मनी । नका कोणी लाजवू ॥धृपद॥
जीवी आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥
झाले विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥
अर्थ
देवाचे रुप आकाशात देखील अगदी शोभून दिसत आहे. असा माझा कृष्ण देव माझ्या मनात बसला आहे त्यामुळे मला कोणीही लाजवू नका. तो कृष्ण माझ्या जीवाहूनही अधिक मला आवडतो आहे आणि माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा स्वामी विश्वंभराची दासी असलेली ती गवळण माझ्या स्वामी सारखीच झाली. ”
1:00
अभंग क्र. ३८०० (गवळणींचीअवस्था)
कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥
देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृपद॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥
तुका म्हणे हासे जन । नाही कान ते ठायी ॥३॥
अर्थ
कोणती तरी एक गवळण हरीच्या रुपावर इतकी भुलली की ती बाजारात गोरस विकण्यासाठी गेली गोरस घ्या असे म्हणायचे तर ती हरी घ्या असे म्हणू लागली. हरीला डोळयाने पाहिले लगेच तो मनात इतका ठसला की मनामध्येच विराजमान झाला आणि तोच मुखाद्वारे उच्चार रुपाने बाहेर येऊ लागला. आपल्या स्वत:लाही ती विसरुन गेली व गोविंदाच्या रुपाचे कौतुक ती गवळण करु लागली. तुकाराम महाराज म्हणतात, “ती गवळण गोरस घ्या म्हणण्याऐवजी हरी घ्या म्हटली की सर्व लोक तिला हसत परंतू त्या गवळणीचे कान मात्र त्या लोकांच्या हसण्याकडे मुळीच लागलेले नव्हते. ”
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
अभंग क्र. ३८०० (गवळणींचीअवस्था)
कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥
देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृपद॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥
तुका म्हणे हासे जन । नाही कान ते ठायी ॥३॥
अर्थ
कोणती तरी एक गवळण हरीच्या रुपावर इतकी भुलली की ती बाजारात गोरस विकण्यासाठी गेली गोरस घ्या असे म्हणायचे तर ती हरी घ्या असे म्हणू लागली. हरीला डोळयाने पाहिले लगेच तो मनात इतका ठसला की मनामध्येच विराजमान झाला आणि तोच मुखाद्वारे उच्चार रुपाने बाहेर येऊ लागला. आपल्या स्वत:लाही ती विसरुन गेली व गोविंदाच्या रुपाचे कौतुक ती गवळण करु लागली. तुकाराम महाराज म्हणतात, “ती गवळण गोरस घ्या म्हणण्याऐवजी हरी घ्या म्हटली की सर्व लोक तिला हसत परंतू त्या गवळणीचे कान मात्र त्या लोकांच्या हसण्याकडे मुळीच लागलेले नव्हते. ”
12:11 Sdm:
अभंग क्र. ३८०१
अभंग क्र. ३८०१
करूनी आइती सत्यभामा मंदिरी । वाट पाहे टळोनि गेली रात्री ।
नये देव येतील काम लहरी । पडिली दुश्चिती तव तो कवाड टिमकारी वो ॥१॥
सर परता तुझा कळला भाव । कार्या पुरते हे दाविसी लाघव ।
बोल बोलतोसी ते अवघी तुझी माव । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥धृपद॥
मीच वेडी तुजला बोल नाही । दानावेळे विटंबणा झाली काय ।
मागुती रुद्रासि भेटी दिली तई । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी नाही रे ॥२॥
भ्रम होता तो अवघा कळो आला । मानवत होते मी भला भला ।
नष्टा क्रिया नाही मां तुझीया बोला । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसल्या रे ॥३॥
अर्थ
श्रीकृष्ण महाला मंदिरात येणार आहे सत्यभामेला समजल्यावर सत्यभामेने श्रीकृष्णाच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवली श्रीकृष्णाची वाट पाहत होती परंतु रात्र टाळून गेली, तरीही श्रीकृष्ण अजून काही येईना कृष्णा अजूनही येत नाही हे पाहून सत्यभामा दुश्चित मनाने पडून होती कामवासनेच्या लहरी तिच्या अंतकरणात उमटत होत्या तोच कृष्णाने दरवाजाला हीत दिल्याचा आवाजाट आला. त्यावेळी कृष्ण महाल मंदिरात आला व सत्यभामे जवळ गेला त्यावेळी सत्यभामा देवाला म्हणाली आता तुमच्या अंतःकरणातील सत्य भाव आम्हाला समजला आहे तुम्ही केवळ तुमचे कार्य पूर्ण होईपर्यंत आमच्याशी गोड बोलत असतात देवा. तुम्ही जाणून-बुजून सूर्य उदयाच्या वेळी आत मध्ये आला आहात या अर्थी तुमच्यावर बोल नाही तुमचे सर्व बोलणे म्हणजे मायिक आहे. देवा मीच वेडी आहे ज्यावेळी नारदाने तुमचे दान मला मागितली त्यावेळी मी तुमचे दान दिले आणि नंतर मारुतीला ज्यावेळी तुम्ही भेट दिली त्यावेळी माझी किती विटंबना झाली हे �
12:12 Sdm:
अभंग क्र. ३८०२
तव तो हरी म्हणे निजांगने वो । लाइ नीच के देसील दोहणे वो ।
मजपे दुजे आले ते देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥
पाहा मनी विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करी स्थिर बुद्धि वो ।
तंट केले हे माझे तुझे उपाधी वो । उघडी डोळे आझुनि तरी धरी शुद्धि वो ॥धृपद॥
कोठे तरी दुनियात वर्तिले वो । स्त्रियांनी भ्रतारा दाना दिले वो ।
कैसा भला मी नव्हे ते सोसिले वो । रुससी तू उफराटे नवल झाले वो ॥२॥
काय सांग म्या दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वे आणविले हनुमंतासि वो ।
कष्टी केले मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरे खोटे नव्हे यासि वो ॥३॥
अर्थ
ज्यावेळी श्रीकृष्ण महाल मंदिरात येणार हे सत्यभामेला समजले त्यावेळी सत्यभामा ने श्रीकृष्णाच्या स्वागताची तयारी केली परंतु रात्र निघून गेली व सत्यभामेच्या अंतकरणात कामवासनेचा लहरी उत्पन्न होतं होत्या पण श्रीकृष्ण काही लवकर आले नाही दिवस उजेडता श्रीकृष्ण आले त्यावेळेस सत्यभामा त्यांना टोमणे देऊ लागली त्यावेळी श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाले हे सखे तू मला असे टोमणे का देत आहेस, तूच माझी सखी आहेस हे सखे माझ्याकडे दुसरे कोणी आले असेल तर ते देवालाच माहीत तू मला असे उगाच उणे दुणे शब्द का बोलत आहेस. तू या गोष्टीचा स्वतःच्या मनाशीच विचार करून पहा आणि देह भ्रांती टाकून देऊन तुझी बुद्धी स्थिर कर. हे सखे तू उपाधीमुळे आजपर्यंत माझे तुझे असे करत आली आहेस परंतु आता तुझे विवेक रुपी डोळे उघड आणि आतातरी शुद्धीवर तू यावेस. तू आज पर्यंत कुठे असे ऐकले आहे की आपल्या पत्नीने आपल्या स्वतःच्या पत्नीचे कोणाला द��
12:12 Sdm:
अभंग क्र. ३८०३
तव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिले तुम्ही म्हणा आपणासि वो ।
तरी का वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरे संपादूं जाणतोसि वो ॥१॥
सर परता आता वो हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी ।
जाणते मी या शब्दाच्या कुसरी । ऐसेच करून ठकविले आजिवरी वो ॥धृपद॥
भावे गेले म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरी व्हावा संग ।
तव त्वां केले हे पाठमोरे जग । ऐसे काय जाणे वो तुझे रंग ॥२॥
काय करू मज या नागविले कामे । लागले तयास्तव इतुके सोसावे ।
नाही तरी का नव्हती ठावी वर्मे । परद्वारी ऐसा हाकलिती प्रसिद्ध नावे वो ॥३॥
काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी ऐसा निष्ठुर निर्गुण ।
आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण वो ॥४॥
इतुकियावरी म्हणे वैकुंठाचा राणा । होऊन गेले ते नये आणू मना ।
आता न करी तैसे करी क्रिया । आणा भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा वो ॥५॥
अर्थ
देवाचे ते बोल एकूण सत्यभामा म्हणते, देवा, ऐका तुम्ही स्वता:चा लौकिक सांगा किंव्हा चांगले म्हणा. जर आपली दृष्ट सर्वत्र सामान आहे, तर अशी वंचना का होते ? तर हे तुमचे सारे सोंग आहे आणि त्याचे संपादन करणे तुम्ही अगदी चांगल्या प्रकार जानता. असे कृत्य करुण तुम्ही मला आजपर्यंत फसविले. हे देवा, तुमचा कधीही वियोग होवू नये म्हणून भावपूर्वतेने मी तुमच्याकडे आले. पूर्वजन्मी माझी अशी इच्छा होती, की उत्तरजन्मात आपली साथ-संगत लाभावी; पण तुम्ही मला जगाला पारखे केले. तुम्ही असे कराल असे तुमचे ढंग काय मी जानत होते ?. त्याकरिता मला इतके दुःख सोसावे लागले. देवाची अशी कृती मला ठाऊक नव्हती का ? कार�
12:13 Sdm:
अभंग क्र. ३८०४
कान्हो एकली रे तुजसवे चुकले रे । भय वाटे जनी मज अबळा धाकली रे ॥१॥
निघता घरी आई बा वारी । तुजसवे का आलिये हरी ॥धृपद॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलिये ॥२॥
पिकल्या बोरी झाले सामोरी । काय जाणा कोठे राहिला हरी ॥३॥
आड खुंट झालिया जाळी । काय जाणो कान्हे मांडिली रळी ॥४॥
तुका म्हणे जाऊ आलिया वाटा । पाहो हरी पायी न मोडे काटा ॥५॥
अर्थ
हे कान्होबा मी एकटी आहे तुझ्याबरोबर मी रानात आले हेच माझे चुकले. मला खूप भीती वाटत आहे मी अबला आहे त्यातल्या त्यात मी खूप लहान आहे. हे हरी घरातून निघल्याबरोबर माझ्या आईबापानी मला सांगितले की जाऊ नकोस तरी देखील मी तुझ्याबरोबर का आले असेल ? लोक मला सांगत होते की, कृष्णाच्या वाटेने जाऊ नकोस तो खोटा आहे त्याची संगती करु नकोस परंतू काय करावे मला तुझी चट लागलेली होती. ज्यावेळी माझ्यासमोर पिकलेल्या बोरी आल्या त्यावेळी हा हरी कोठे राहिला काय माहित ? माझ्यासमोर लाकडी खुंटा वेलींच्या जाळया आल्या त्यापुढे या कृष्णाने माझी चेष्टाच आरंभिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे गवळणी तू घाबरु नकोस मी तुझ्याबरोबर आहे आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने हरीजवळ जाऊ म्हणजे आपल्याला स्वर्ग व नरकाचे काटे पायात मोडणार नाहीत. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















