आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१४ नोव्हेंबर, दिवस ३१८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७२६ ते ७५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८०५ ते ३८१६
“१४ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १४ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८०५ ते ३८१६ चे पारायण आपण करणार आहोत.
१४ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७२६ ते ७५०,
726-18
तैसे धर्मजात तितुके । जिये बुद्धीसी पातके । साच ते लटिके । ऐसेचि बुझे ॥726॥
तसे, शास्त्रांत सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात; 726
727-18
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥727॥
जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करिते व जे गुण म्हणून आहेत, त्या सर्वास दोष मानते; 727
728-18
किंबहुना श्रुतिजाते । अधिष्ठूनि केले सरते । तेतुलेही उपरते । जाणे जे बुद्धी ॥728॥
किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही सर्व बुद्धीला विपरीत भासतात; 728
729-18
ते कोणातेही न पुसता । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥729॥
त्या बुद्धीला अर्जुना, कोणालाही न विचारता, बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय ? 729
730-18
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ॥730॥
याप्रमाणे आत्मज्ञानरुप कमळाला विकसित करणाऱ्या चंद्रा अर्जुना, तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले. 730
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
731-18
आता ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजाती । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥731॥
आता, याच बुद्धीला कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो, तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचे तीन प्रकार आहेत. 731
732-18
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देई ॥732॥
त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे. 732
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥18. 33॥
733-18
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसि थोके अंधारु । का राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवी ॥733॥
सूर्योदय होताच जसा चौर्यकर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो, 733
734-18
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेसी बोभाटु । सांडिती मेघ ॥734॥
किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनासह नाहीतसे होतात, 734
735-18
का अगस्तीचेनि दर्शने । सिंधु घेऊनि ठाती मौने । चंद्रोदयी कमळवने । मिठी देती ॥735॥
अथवा अगस्ती ऋषीं च्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्य विकासिनी कमळे आपोआप मिटतात; 735
736-18
हे असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खाला । गर्जोनि पुढा जाला । सिंहु जरी ॥736॥
फार काय सांगावे ? गर्जना करून सिंह पुढे आला मदोन्मत्त हत्तीलादेखील उचललेला पायाखाली ठेवण्याचे सुचत नाही, 736
737-18
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिके व्यापारु । सांडिती उभी ॥737॥
तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन prअnअv, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्याजागी बंद पडतात, 737
738-18
इंद्रिया विषयांचिया गाठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटी । रिगती दाही ॥738॥
अर्जुना, इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात. 738
739-18
अधोर्ध्व गूढे काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजी ॥739॥
प्राणाचे जी 9 प्रकारचे भेद आहेत, ते सर्व मोडून व एकत्र करून त्यात सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकिते; 739
740-18
संकल्पविकल्पांचे लुगडे । सांडूनि मन उघडे । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥740॥
मनाचे संकल्प-विकल्प रुपी वस्त्र फेडून मन उघडे करिते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्त बसते, 740
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
741-18
ऐसी धैर्यराजे जेणे । मन प्राण करणे । स्वचेष्टांची संभाषणे । सांडविजती ॥741॥
याप्रमाणे जो धैर्यराज, मन, प्राण व इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्ठांची भाषणे बंद पाडितो; 741
742-18
मग आघवीचि सडी । ध्यानाच्या आंतुल्या मढी । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥742॥
मग सर्वाचा घेऊन त्यास व्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो; 742
743-18
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जव हाती । तव लांचु न घेता धृती । धरिजती जिया ॥743॥
परंतु चक्रवर्ती जो परमात्मा, त्याच्या ताब्यात त्यात देईपर्यंत त्याजपासून लांच न घेता त्यांना जो धैर्यराज सोडीत नाही. 743
744-18
ते गा धृती येथे । सात्विक हे निरुते । आईक अर्जुनाते । श्रीकांतु म्हणे ॥744॥
लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात; असे जे धैर्य, ते केवळ सात्विक धैर्य होय, असे समज. 744
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥18. 34॥
745-18
आणि होऊनिया शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोही घरी । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपाये ॥745॥
आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग व संसार या दोहोत धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी आनंदाने वास करतो; 745
746-18
तो मनोरथांच्या सागरी । धर्मार्थकामाच्या तारुवावरी । जेणे धैर्यबळे करी । क्रिया-वणिज ॥746॥
तो मनोरथ सागरात धर्मार्थकामरूपी नौकेवर ज्या धैर्यबळाने कर्माचा व्यापार करीत, 746
747-18
जे कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढे सायास साहे । जया धृती ॥747॥
जे कर्मरुपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने सहास कर्म करतो, 747
748-18
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आता आइक तामस । तिसरी जे का ॥748॥
त्या धैर्यास अर्जुना, राजस धैर्य असे म्हणतात. ता तिसर्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती ऐक. 748
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥18. 35॥
749-18
तरी सर्वाधमे गुणे । जयाचे का रूपा येणे । कोळसा काळेपणे । घडला जैसा ॥749॥
जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे स्वरूप सर्व अधम गुणांनी भरलेले असते अधर्म. 749
750-18
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही की गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ? ॥750॥
अहो, प्राकृत (जड) आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय ? 750
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३१८ वा. १४, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८०५ ते ३८१६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३८०५
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतो सोकरा नंदाचा मी ॥१॥
बहु दिसी झाली यासी मज भेटी । आता वाटे तुटी न परावी ॥धृपद॥
कोवळे बोलतो मना आवरते । डोळियाचे पाते ढापवेना ॥२॥
आजि सकळांसी आले चोलुनिया । का गो पाठी वाया पुलविली ॥३॥
तुमचे ते काय खोळंबले काज । बल्या का गो मज कोंडा घरी ॥४॥
तुकयाचा धनी वैकुंठनायक । सरा काही एक बोलतो मी ॥५॥
अर्थ
एक लहान बोबडी गवळण आपल्या आईला म्हणते की काय गं आई तू सारखे मला खेळू नको व घरात जा असे म्हणतेस नंदाचा मुलगा आणि आम्ही खेळत आहोत तरी आम्हाला खेळू दयावे. खूप दिवस झाले याची आणि माझी गाठभेट नव्हती आता गाठभेट झाली तर आमच्यामधे अंतर पडू नये असेच मला वाटते. तो कान्हा खूप कोवळा व सुंदर मनाला आवडेल असे शब्द बोलतो त्याला पाहाताना डोळयाचे पाते सुध्दा झाकावेसे वाटत नाही. आज मी सगळयांना चोरुन कृष्णाबरोबर खेळण्यास आले तर तू माझ्या पाठीमागे का व्यर्थ आली आहेस ? माझ्यावाचून तुमचे कोणते काम खोळंबले आहे तुम्ही सर्व शहाणे आहात तरी देखील मला घरामधे का कोंडून ठेवता ? तुकाराम महाराज म्हणतात, “ती गवळण पुढे म्हणते की, मी तुकारामाचा स्वामी वैकुंठाचा नायक याच्याशी बोलत आहे तुम्ही सर्वजणी बाजूला व्हा. ”
12:14 Sdm:
अभंग क्र. ३८०६
आता न ये मागे । मी आले याच्या रागे । काय माझे जगे । कोपोनिया करावे ॥१॥
का गो कलित्या कोल्हाळा । तुम्ही भलत्याच सकळा । वेचाला ते बोला । झुटे होती बोलिले ॥धृपद॥
याचे भेटी माझे मन । स्वरुपी ठाकले लोचन । वेगळे ते क्षण आता होऊ नावरे ॥२॥
काज काम नको झाले । बीजे नावरे बोलिले । याचिया भेदिले । कामबाणी अंतर ॥३॥
या वेगळे होणे । आता जळो तैसे जिणे । घेतले ते मने । आता मागे न फिरे ॥४॥
आता मोटी वार । माझी नका धरू चार । सवे तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलो ॥५॥
अर्थ
एक गवळण म्हणते आता मी माघारी येणार नाही मी कृष्णाच्या प्रेमाने या ठिकाणी आली आहे. माझ्यावर कितीही जग चिडले रागावले तरी त्याचे मला काय करायचे आहे ? तुम्ही सर्व परके आहात मग व्यर्थ तुम्ही कोलाहल का करत आहात ? मग तुम्ही जे काही बोलाल ते सर्व खोटेच होईल. या कृष्णाच्या स्वस्वरुपाच्या भेटीने माझे मन आणि लोचन त्याच्या ठिकाणीच स्थिरावले आहेत. आता एक क्षणभर देखील त्याच्यापासून वेगळे होणे मला आवडणार नाही. कोणतेही काम करणे मला नकोसे झाले आहे कोणी माझ्याशी बळजबरीने बोललेले देखील मला आवडत नाही. कृष्णाच्या कामबाणाने माझे अंत:करण भेदले गेले आहे. कृष्णापासून वेगळे होऊन जगणे असेल तर त्या जगण्याला आग लागो. आता मनाने जे काही घेतले आहे त्याचा स्वीकार केला आहे त्याच्यापासून माघारी फिरणे हे जमणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ती गवळण पुढे म्हणते हे लहान थोरांनो आता तुम्ही माझी अपेक्षाच धरु नका. आता तुकारामाचा स्वामी आणि मी एकाच सेजेवर निजलो आहोत. ”
12:14 Sdm:
अभंग क्र. ३८०७
हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥
अवघ्या अंगे सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥धृपद॥
वाचा वाच्यत्वासि नये । कोठे काय करावे ॥२॥
तुका म्हणे देवा ऐशा । देव पिशा उदारा ॥३॥
अर्थ
हरीशी एकरुप झालेल्या त्या गवळणी देहभानावर येतच नव्हत्या. सर्वोत्तम असा हरी सर्वांगाने त्या स्त्रीयांचा सर्वांगाने भोग भोगीत होता. हरीचे सुख भोगत असताना गवळणींची वाचा वाच्यत्वापर्यंत पोहोचतच नव्हती आता कोठे जावून तरी काय करावे अशीच त्यांची अवस्था झाली होती. तुकाराम महाराज म्हणतात, “त्या गवळणी देव वेडया झाल्या देहावर उदार झाल्या त्यामुळे त्या देखील देवासारख्याच झाल्या. ”
12:14 Sdm:
अभंग क्र. ३८०८
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखो आज । सांपडवुनी माजघरात धरुनी कोंडूंनी ।
उघडे कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पाचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥
नित्य सोंकवला नेदी । सांगो चित्त बोला । आता सांपडता याला कोण सोडी जीवे ॥धृपद॥
जाणोनिया हरी त्याच घरा आला चोरी । गडिया ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारे शिरे ।
त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोवताले । पाहे तव देखियेले नवनीत पुढे ॥२॥
उतरोनि सिंके । पाहे चाखोनिया निके । गोड ते चि एका एके । हाती लांबवितो ।
जाणे राखती तयासि । तेथे अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥३॥
जाणोनिया नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरात धरीयेला ।
का रे नागविसी । माझे मुळी लागलासी । आणवीन तुजपासी । मागे खादले ते ॥४॥
दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणे ।
तुका म्हणे मुख । त्याचे वाढो नेदी दुःख । दसवंती कवतुक । करुनी रंजविल्या ॥५॥
अर्थ
कृष्णाच्या खूप चोऱ्या वाढू लागल्या त्यावेळी काही गवळणी म्हणाल्या चला या आज आपण राखणच करु या. आज आपण त्याला धरुच त्याला सापडून त्याला माजघरात कोंडून ठेवू. रात्री त्या गवळणी काळोख्याच्या आड आपआपल्या दरवाजाच्या पुढे उभ्या राहिल्या. सात पाच गवळणी एकमेकीला भिडून शांततेने उभ्या राहिल्या. कृष्ण रोज चोरी करण्यासाठी चांगलाच सोकवला आहे त्याला कितीही समजून सांगितले तरी कोणाचेही बोलणे तो मनावर घेत नाही. आता तो सापडल्यावर जीवाशी एकरुप केल्याशिवाय त्याला कोण सोडील आज आपल्याला पकडण्यासाठी गवळणी एकत्रित जमल्या आहेत हे हरीला समज
12:15 Sdm:
अभंग क्र. ३८०९ (बाळकोडेचेअभंग)
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
आम्हा शरणागता तुझाचि आधार । तू तव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामे । जाळतील कर्मे दुस्तरे ती ॥५॥
ते फळे उत्तमे तुझा निजध्यास । नाही गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाही त्या बंधन संसाराचे ॥७॥
संसार ते काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥८॥
क्षणमात्रे जाळी दोषाचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करी ब्रिदे साचे आपले आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकाचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी । पुरविता होसी मनोरथा ॥१२॥
अर्थ
हे देवाधिदेवा त्रैलोक्याच्या जीवना हे केशवा माझी एक विनंती तुम्ही पूर्ण करा. माझी वाणी सतत तुझे गुण आणि नामाचेच वर्णन करत राहीन अशा प्रकारे प्रेम आणि कला तुम्ही मला दयाव्यात. देवा तुझ्यावरच आमचे जीवन अवलंबून आहे तुझ्याजवळ सर्व कला आहेत आणि जे उचित आमच्यासाठी असेल तेच तुम्ही आम्हाला करुन दयावे. देवा आम्ही तुला शरण आलो आहोत आणि आम्हाला आता तुझाच एक आधार आहे तू तर एक प्रकारचा समुद्र आहेस तोही कृपेचा समुद्र आहेस. देवा तुझे नाम सतत घेत राहिले तर भवसमुद्र तरुन जाण्यास पायवाट तयार होते आणि भयंकर असे कर्मे महादोष तुझ्या नामाने जळून जातात. देवा तुझ्या नामाचे सतत चिंतन केले असता उत्तम प्रकारचे फळ मिळते व जन्ममरणाचे गर्भवास प्राप्त होत नाहीत. �
12:15 Sdm:
अभंग क्र. ३८१० (बाळकोडेचेअभंग)
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाही भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयाच्या आला नारायण । तुटले बंधन आपेआप ॥६॥
आपेआप बेड्या तुटल्या शृंखळा । बंदाच्या आर्गळा कुलुपे कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगता ॥८॥
न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरी ॥९॥
नंदाघरी जाता येता वसुदेवा । नाही झाला गोवा सवे देव ॥१०॥
सवे देव तया आड नये काही । तुका म्हणे नाही भय चिंता ॥११॥
अर्थ
गोकुळातील लोकांच्या जशा इच्छा तुम्ही पूर्ण केल्या अगदी तशाच माझ्या मनातील इच्छा देखील देवा तुम्ही पूर्ण कराव्यात. भक्ताचे ऋण फेडण्याकरता भगवंताने अवतार घेतला अविनाशी असा परमात्मा निर्गुण निराकार असून देखील भक्तांसाठी सगुण साकार होऊन आकाराला आला. वसुदेव देवकीला कंसाच्या बंदीखान्यात फार त्रास झाला. दुराचारी कंसाने वसुदेव देवकीचे याआधी सहा बाळे मारली होते. दुराचारी व्यक्तीच्या ठिकाणी भूतदया नसते त्याच्या ठिकाणी आपले परके पापपुण्य या भावनाच नसतात. वसुदेव व देवकीचे पुण्य उदयाला आले व प्रत्यक्ष देवच देवकीच्या गर्भामध्ये येऊन देवकीच्या पोटी जन्माला आले. देवकीच्या पोटी प्रत्यक्ष् नारायण जन्माला आले आणि त्यांच्या हातात कंसाने बांधलेल्या साखळयांचे बंधन आपोआप तुटून गेले. वसुदेव व देवकीच्या हाती असलेल्या बेडया व पायात असले�
12:16 Sdm:
अभंग क्र. ३८११ (बाळकोडेचेअभंग)
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवे ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गावा । धन्य त्याच्या दैवा दैव आले ॥२॥
आले अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनाचे पाळण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळी आनंद प्रगटले सुख । निर्भर ते लोक घरोघरी ॥५॥
घरोघरी झाला लक्ष्मीचा वास । दैन्य दारीद्रयास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयाच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोका ॥७॥
लोका गोकुळींच्या झाले ब्रम्हज्ञान । केलियावाचून जपतपे ॥८॥
जपतप काय करावी साधने । जे त्या नारायणे कृपा केली ॥९॥
केली नारायणे आपुली अंकित । तोचि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही.ाही ॥११॥
नाही भक्त दुजे तिही त्रिभुवनी । एका चक्रपाणीवाचूनिया त्या ॥१२॥
त्याच्या सुखसंगे घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनिया ॥१३॥
अर्थ
देवाने गोकुळात प्रवेश केला आणि गोकुळातून चिंताच पळून गेली. देव नंदाच्या घरी आला नंदाच्या घरीच नाही तर गावाला आला त्यांचे दैव धन्य म्हणून देव त्यांच्या गावी व घरी आले. अविनाशी असे परब्रम्ह सगुण साकार होऊन आकाराला आले केवळ दैत्यांचा संहार करण्यासाठी. भक्तजणांचे पालन पोषण करण्यासाठी बलराम व श्रीकृष्ण गोकुळात आले. गोकुळामध्ये आनंद व सुख प्रकटले होते त्यामुळे घरोघरी लोक आनंदी व निर्भर (आनंदभरीत) झाले होते. गोकुळामध्ये घरोघरी लक्ष्मीचा वास होऊ लागला त्यामुळे दैन्य आणि दारिद्रय यांना तेथे त्रास होऊ लागला. तेथील लोकांच्या अंतरंगात नारायण आला होता त्यामुळे त्यांच्या अं��
12:16 Sdm:
अभंग क्र. ३८१२ (बाळकोडेचेअभंग)
त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंही तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिंही अंतर्बाह्यसुखे । मेळवूनि मुखे चुंबन दिले ॥२॥
दिले त्यासी सुख अंतरीचे देवे । जिंही एका भावे जाणितला ॥३॥
अर्थ
जाणितला तिही कामातुर नारी । कृष्ण भोगावरी चित्त ज्यांचे ॥४॥ @
ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ @
विष तया झाले धन मान जन । वसविती वन एकांती त्या ॥६॥ @
एकांती त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ @
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणे । अंतरीचा देणे इच्छा भोग ॥८॥ @
भोग त्याग नाही दोन्ही जयापासी । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥
12:17 Sdm:
अभंग क्र. ३८१२ (बाळकोडेचेअभंग)
त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंही तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिंही अंतर्बाह्यसुखे । मेळवूनि मुखे चुंबन दिले ॥२॥
दिले त्यासी सुख अंतरीचे देवे । जिंही एका भावे जाणितला ॥३॥
अर्थ
जाणितला तिही कामातुर नारी । कृष्ण भोगावरी चित्त ज्यांचे ॥४॥ @
ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ @
विष तया झाले धन मान जन । वसविती वन एकांती त्या ॥६॥ @
एकांती त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ @
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणे । अंतरीचा देणे इच्छा भोग ॥८॥ @
भोग त्याग नाही दोन्ही जयापासी । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥
12:17 Sdm:
अभंग क्र. ३८१३ (बाळकोडेचेअभंग)
शिळा स्फटिकाची न पालटे भेदे । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावे ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कौंसादिक ॥४॥
अदिक नाही देणे अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठे राहे हरी आठविता । भक्ती द्वेषे चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धावे भक्ता पाठोवाठी । उच्चारिता कंठी मागेमागे ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धावे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
अर्थ
स्फटिक मणी ज्या रंगावर आपण ठेवू त्या रंगा प्रमाणे स्फटिक मण्याचा रंग बदलतो परंतु त्याचे मूळ रुप काही बदलत नाही. अगदी त्याप्रमाणे देव गोकुळामध्ये जसा भक्ताचा भक्तिभाव असेल त्याप्रमाणे क्षणाक्षणाला आपले स्वरुप बदलित होता त्यांच्या इच्छा पूर्ण करत होता परंतु तिथे आपल्या मूळ स्थितीतच होता. गोपाळ गवळणी मायबाप सर्वाच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठीच देवाने अवतार धारण करुन पृथ्वीवर आला होता. चाणूर, कंस इत्यादी दुष्टांचा वध करुन कृष्णाने मायबापाला बंदीखान्यातून सोडविले होते. एवढेच नाही देवाने कंसाला व चाणूराला वधलेच नाही तर त्यांना मुक्तही केले, बालकंटक पूतनेला देखील त्याने मुक्ती दिली कारण देवाला कोणत्याही भावनेने भजले मग तो शत्रू असो की मित्र असो कोणीही देवाला कोणत्याही कारणास्तव भजले तर देव त्यांना मुक्तीच देतो. एवढेच नाही तर ज�
12:18 Sdm:
अभंग क्र. ३८१४ (बाळकोडेचेअभंग)
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हाती गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणी । पाया चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरी रिघे चोरावया लोणी । रिते पाळतूनि शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनिया नवनीत खाये । कवाड ते आहे जैसे तैसे ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारी । म्हणउनि चोरी नसापडे ॥५॥
नसापडे तया करिता खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानी कृष्णध्याने ॥८॥
नये क्षणभरी योगियांचे ध्यानी । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसापडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानावे । तुका म्हणे भावे चाड एका ॥११॥
अर्थ
ज्याची किर्ती चारही वेद वर्णन करतात असा कृष्ण गवळणीच्या हातून स्वत:ला बांधून घेतो. यशोदेने कृष्णाला उखळाला बांधण्यास तयारी केल्यानंतर इतर गवळणीही यशोदेला मदत करु लागल्या गवळणीने कृष्णाच्या गळयाला दावे बांधले व त्याला उखळाला बांधू लागले तर तो चक्रपाणी त्यांना विनवणी करु लागला व त्यांच्या पाया पडू लागला व म्हणू लागला मला बांधू नका. हा श्रीकृष्ण गवळणीच्या घरी चोरी करण्यासाठी जात असे व लोणी चोरी करण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवून रात्री त्यांच्या घरी शिरत असे. कृष्ण माजघरामध्ये शिरुन लोणी खात असे आणि गवळणींना समजले की, गवळण त्याला पाहण्यासाठी येत परंतु गवळणींना दार तर तसेच्या तसे लावलेले दिसत असे. प्रत्येकाच्या आतर बाहय रंगात कृष्ण होता त्यामुळे चोरी सापडत नव्हती. हरीला सापडण्या
12:18 Sdm:
अभंग क्र. ३८१५ (बाळकोडेचेअभंग)
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरी । आचरणे बरी नाही म्हुण ॥२॥
नसापडे इंद्रचंद्रब्रम्हादिका । अभिमाने एका तळिमात्रे ॥३॥
तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यासी करिती यातना । नाही नारायणा भजिलेंजे ॥७॥
जे नाही भजले एका भावे हरी । तया दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । का रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हा कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धराच चित्ती सांगितले ॥११॥
सांगितले संती तुम्हा उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥
दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा याणे करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामे रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्या ॥१५॥
अर्थ
जे अनन्य भक्त आहेत त्यांची आवड नारायण धरतो व तो भक्त रंक जरी असला तरी त्याला आपल्या समान उच्च पदावर बसवून सर्व मान्य करतो. जे राजे अशुध्द आचरणाचे आहे ते यमाच्या घरी जाऊन दरीद्री होतात कारण त्यांचे आचरण वेदविहीत क्रमानुसार नसते म्हणून. इंद्र, चंद्र ब्रम्हादी देवाच्या ठिकाणी तीळमात्रही अभिमान असेल तरी हरी त्यांना सापडत नाही. तीळमात्र जरी भक्ताच्या ह्दयामध्ये अभिमान उत्पन्न झाला तरी तो देवासाठी पर्वताप्रमाणे भारभूत ठरतो. संपूर्ण पृथ्वीचा भार देवाने वाहिला आहे परंतु दुष्ट आणि मुर्ख लोकांच�
12:19 Sdm:
अभंग क्र. ३८१६ (बाळकोडेचेअभंग)
वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमे ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंते । जिही चित्तवित्ते समर्पिले ॥२॥
समर्थ ते गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णे केले कौतुक गोकुळी । गोपाळाचे मेळी गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पावा वाहे पाठी । धन्य जाळी काठी कांबळीते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥६॥
सुख ते अमुप लुटिले सकळी । गोपिका गोपाळी धणीवरी ॥७॥
धणीवरी त्यासी सांगितली मात । ज्याचे जैसे आर्त तयापरी ॥८॥
परी याचे तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनिया घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेचि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुके । शिव्या देता सुखे हासतुसे ॥११॥
हासतसे शिव्या देता त्या गौळणी । मरता जपध्यानी न बोले तो ॥१२॥
तो जे जे करि ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपे ॥१३॥
अर्थ
वैकुंठातील लोकांना हरी जनांचे दर्शन फार दुर्लभ आहे कारण भूलोकातील हरी जनांच्या सोबत नेहमी नारायण वास्तव्य करतो त्यामुळे वैकुंठातील लोकांना हरी जनांची भेट व्हावी असे वाटते. ज्या भक्तांनी चित्त आणि वित्त अनंताला समर्पित केले आहेत त्यांचीच संगती हरी नेहमी धरतो. जे समर्थ आहे तेच हरीच्या किर्तीचे पोवाडे गातात मग इतर राव राजे जरी असले आणि ते हरीचे किर्तीचे वर्णन करत नसले तर ते बापुडेच म्हणावे लागतील. बलराम व श्रीकृष्ण भगवंताने गोकुळामध्ये अनेक प्रकारचे कौतुक केले सामान्य गोपाळांसमवेत ते गाई चारत होते. कृष्ण गोकुळामध्ये गाई चारण्यासाठी रानात जायचा त्या�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















