आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

४ नोव्हेंबर, दिवस ३०८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४७६ ते ५०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६८५ ते ३६९६
“४ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ४ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६८५ ते ३६९६ चे पारायण आपण करणार आहोत.
४ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४७६ ते ५००,
476-18
तैसे इंद्रियांच्या वाहवटी । धावतया ज्ञाना जेथ ठी । होय ते गा किरीटी । विषय ज्ञेय ॥476॥
ज्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असणे असे म्हणतात. 476
477-18
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिही रूप केले धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥477॥
याप्रमाणे धनंजया, ज्ञाता; ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी तीन प्रकारच्या सर्व कर्मांचा कारणीभूत आहे. 477
478-18
जे शब्दादि विषय । हे पंचविध जे ज्ञेय । तेचि प्रिय का अप्रिय । एकेपरीचे ॥478॥
कारण शब्दादि पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणतीतरी एक असते. 478
479-18
ज्ञान मोटके ज्ञातया । दावी ना जव धनंजया । तव स्वीकारा की त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥479॥
हे धनंजया, ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो, 479
480-18
परी मीनाते देखोनि बकु । जैसा निधानाते रंकु । का स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥480॥
परंतु, माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास लावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहताच क्षणी तो घेण्यात दरिद्री धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामिक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो; 480
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-18
जैसे खालारा धावे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणी । नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पा ॥481॥
जसे पाणी उतरत्या जमिनीकडे राहते, भ्रमर पुष्पाचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याचे वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते; 481
482-18
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेवी माणुसी । वारत्या लावीजती आकाशी । यागांचिया ॥482॥
अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरुपी शिड्या लावतात; 482
483-18
पै पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटी । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळे ॥483॥
अथवा अर्जुना, पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहतांच एकदम सगळे अंग टाकून तीज जवळ येतो; 483
484-18
हे ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धावचि घे ॥484॥
इतकेच नव्हे, तर मेघांची गर्जना होताक्षणीच मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास (विषयास) पाहून उडी घालतो. 484
485-18
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्ता । प्रवृत्ति येथ ॥485॥
म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते; 485
486-18
परी तेचि ज्ञेय विपाये । जरी ज्ञातयाते प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥486॥
आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता असला, तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही. 486
487-18
नातरी अवचटे । तेचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥487॥
अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला, तर त्याचा त्याग करण्याविषयी एकेक क्षण त्याला युगांप्रमाणे भासतो, 487
488-18
व्याळा का हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥488॥
सर्प असून नीलमण्यांचा हार आहे, या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावताक्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते, 488
489-18
तैसे ज्ञेय प्रियाप्रिये । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारी वाहे । व्यापाराते ॥489॥
त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय हे पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते; आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते. 489
490-18
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसावी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥490॥
जो कुस्तीचा षोकी आहे, त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर, तो जरी सर्वसैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो. 490
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-18
तैसे ज्ञातेपणे जे असे । ते ये कर्ता ऐसिये दशे । जेविते बैसले जैसे । रंधन करू ॥491॥
तसा ज्ञाता म्हणून असतो, तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्या कर्ता असे म्हणवितो. ते त्याचे कर्तेपणास येणे, ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणार्या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे; 491
492-18
का भंवरेचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥492॥
किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग् लावण्याची खटपट करावी अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू हावे, देवांनी देवळात स्वस्थ बसणे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे 492
493-18
तैसा ज्ञेयाचिया हावा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥493॥
तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो, तेथे अर्जुना, त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. 493
494-18
आणि आपण होऊनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथे ज्ञेयचि स्वभावता । कार्य होय ॥494॥
आणि आपण जो ज्ञाता, तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण(साधन) करतो, मग येथे ज्ञेय हे सहज कार्य होते. 494
495-18
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा राती । पालटे जैसी ॥495॥
हे सुमते, ज्ञानाच्या स्वरूपगतीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्राचे तेज रात्री उपयोगी पडत नाही; 495
496-18
का अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठी शीतांशु । पालटे जैसा ॥496॥
किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचे विलास बदलतात; अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एकेक कलेने कमी होत जातो- 496
497-18
तैसा चाळिता करणे । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणे । तेथीची तिये लक्षणे । ऐक आता ॥497॥
त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवीत असता ज्ञाता हा कर्तेपणाचा अभिमानात गुंततो नातं, त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो, ती ऐक. 497
498-18
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हे चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचे ॥498॥
तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे; (अंत:करणाच्या ह्या चार आवृत्ती आहेत; ) 498
499-18
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हे पंचविध जाण । इंद्रिये गा ॥499॥
आणि त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक अशी पाच प्रकारची इंद्रिय आहेत. 499
500-18
तेथ आंतुले तव करणे । कर्ता कर्तव्या घे उमाणे । मग तै जरी जाणे । सुखा येते ॥500॥
त्याठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीच्या योगे जिवाच कर्म करण्यास विषयी स्फुरण येते; मग या कर्मापासून सुख प्राप्ती होईल असे वाटू लागले. 500
दिवस ३०८ वा. ४, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६८५ ते ३६९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३६८५ (कांडण)
सिद्ध करूनिया ठेविले कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥
आठव हा धरी मज जागे करी । मागिले पाहारी सेवटिचा गे ॥धृपद॥
सम तुके घाव घाली वो साजणी । मी तुजमिळणी जीवे मिळे ॥२॥
एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥
सरले कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचे ॥४॥
उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥
तुका म्हणे मज माहेरी आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केले ॥६॥
अर्थ
शुद्ध बुद्धिच्या संगतीणे एक कांडन मी सिद्ध करून ठेवले आहे. कांडायला मदत करणारी निष्काम कर्म-भक्ती यांचे संस्कार असलेली शुद्ध बुद्धि, त्या बुद्धिला मी आगोदरच सांगून ठेवले आहे, की. तू मागील प्रहार स्मरणात ठेव आणि शेवटच्या प्रहरात जागे कर. हे साजणी, कांडत असताना समतुकाचा (सर्वत्र सम) एक घाव घाल म्हणजे तुला ब्रम्हस्वरुपाची प्राप्ति होईल. स्थूलदेह पाखडून त्याला आत्म्यापासून दूर कर. नंतर सुक्ष्मदेहाला निवड त्यानंतर कारण देहाला मात्र ‘मी ब्रम्ह आहे’ अशी वृत्ति देखील शिल्लक न ठेवता चांगले सडून काढ़. सखे, आता कांडन संपले आहे. आता ब्रम्ह रसाचा स्वयंपाक कर. त्यात प्रेमरूपी दूध भक्तीरुप साखर घाल. मग आता या ठिकाणी उध्दव आणि अक्रुर हे दोघेजण व माझा बाप नारायण जेवायला येणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या आई बापाची आवड आहे म्हणुणच मी लवकर बोलवण्याची तातडी केली आहे.
अभंग क्र. ३६८६ (कांडण)
सावडी कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥
मुसळ आधारी आवरूनि धरी । सांवरोनि थोरी घाव घाली ॥धृपद॥
वाजती कांकणे अनुहात गजरे । छंद माहियेरे गाऊ गीति ॥२॥
कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तो ॥३॥
तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्यासारिसा सिद्ध झाला ॥४॥
अर्थ
नारायणाची ओवी गात कांडन करा. भुस आणि सार यांची स्वतः निवड करा. विवेकाचे मूसळ घट्ट धरून, मन बुद्धि स्थिर ठेऊन वैराग्याचे सारखे घाव घाला. अनाहत नावाचे कंकण वाजत आहेत. त्या नादात गाने गात बाहर जाऊ. ‘तुझे माझे’ हा भाव बाजुला राहील तो पर्यंत कांडत असताना थाकायला होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसे आरश्यात आपले रूप प्रकट होते, तशी या कांडनासोबत निजस्वरुपाची पाकसिद्धि झाली आहे.
अभंग क्र. ३६८७ (काला)
उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहींभात ॥१॥
वैकुंठी तो ऐसे नाही । कवळ काही काल्याचे ॥धृपद॥
एकमेका देऊ मुखी । सुखी घालू हुंबरी ॥२॥
तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट उत्तम ॥३॥
अर्थ
दहिभाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ. हा मधुर काला वैकुंठाताहि मिळत नाही. आम्ही हे काल्याचे घास एकमेवांच्या मुखात घालु त्यापासून मिळणाऱ्या आनंदात हुंबरि घालू. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी वाळवंट हे स्थान उत्तम आहे.
अभंग क्र. ३६८८ (काला)
याल तरी या रे लागे । अवघे माझ्या मागे मागे ॥१॥
आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी ॥धृपद॥
हळू हळू चाला । कोणी कोणाशी न बोला ॥२॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणे नका भरू पोटे ॥३॥
अर्थ
तुम्हा सवंगड्यांना यायच असेल तर माझ्या मगोमाग या. तुम्ही ‘पुरे’ म्हणोपर्यंत मी तुम्हाला पोटभर जेवण देतो. मात्र माझ्याबरोबर हळूहळू चला, एकमेकांशी बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात, संसाररूपी कच्च्या कण्या टाकून दया. त्यानी पोट भरू नका.
अभंग क्र. ३६८९ (काला)
शिंके लावियेले दुरी । होतो तिघांचे मी वरी ॥१॥
तुम्ही व्हारे दोहीकडे । मुख पसरूनि गडे ॥धृपद॥
वाहाती त्या धारा । घ्यारे दोहीच्या कोंपरा ॥२॥
तुका म्हणे हाती टोका । अधिक उणे नेदी एका ॥३॥
अर्थ
गोरसाचे शिंकाळ फार उंच लावले आहे. त्यात हात घालण्यास मी तुम्हा तिघांच्या खांद्यावर चढतो. गड्यांनो, तुम्ही आपले दोन बाजूंना तोंड उघडून नीट उभे रहा. दोन्ही कोपर्यातून शिंक्यातील धारा वाहतील, त्या धारा नीट तोंडात घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हाताकडे लक्ष दया. सर्वाना मी सारखे देणार आहे.
अभंग क्र. ३६९० (काला)
पळाले ते भ्याड । त्यासि येथे झाला नाड ॥१॥
धीट घेती धणीवरी । शिंकी उतरितो हरी ॥धृपद॥
आपुलिया मती । पडली विचारी ती रिती ॥२॥
तुका म्हणे घ्या रे पया । कै पावाल या ठाया ॥३॥
अर्थ
जे घाब्रट होते, ते पळून गेले. त्यांचा भित्रेपणा त्यांच्या हिताच्या आड आला. हरीने शिंकाळी उतरवली. जे धाडसी होते, त्यांना भरपूर मिळाले. जे स्वतः च्या बुध्दीने विचार करात बसले, ते उपाशी राहिले. तुकाराम महाराज म्हणतात, अरे’ तुम्ही ‘दूध घ्या पुन्हा इथे कधी यायला मिळणार आहे ?
अभंग क्र. ३६९१ (काला)
धाले मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलो अबोलण्या खुणा ॥धृपद॥
खांद्यावरी भार । ती शिणती बहु फार ॥२॥
तुकयाच्या दातारे । नेली सुखी केली पोरे ॥३॥
अर्थ
हे भगवंता, आमचे पोट भरले. आता पुरे झाले, असा बोभाटा गोपाळांनी सुरु केला. नारायणा, ये आपल्याला ज्या विषयी बोलने अवडत आहे, अश्या वस्तुच्या खुणांविषयी बोलुया, ये रे, त्या साठी ये. खांद्यावर ज्यानी भार घेतला ती फार थकली होती. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दात्याने त्या सर्व पोराना आपल्या सोबत नेउन त्यांना आपल्यासारखेच सुखी केले.
अभंग क्र. ३६९२ (काला)
पाहाती गौळणी । तव पालथी दुधाणी ॥१॥
म्हणती नंदाचिया पोरे । आजि चोरी केली खरे ॥धृपद॥
त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥
सवे तुक्या मेला । त्याणे अगुणा आणिला ॥३॥
अर्थ
दुधाची सर्व भांडी पालथी घालून ठेवलेली गौळणीनी पाहिली. त्या म्हणाल्या, नंदाच्या मुलाचे हे काम आहे. त्यानेच ही चोरी केली. दुधाची अशी नासाडी दूसरे कुणी करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा मेला तुक्या त्यांच्याबरोबर होता, त्यानेच निर्गुण अश्या इश्वराला बरोबर आणले असले पाहिजे.
अभंग क्र. ३६९३ (काला)
आता ऐसे करू । दोघा धरूनिया मारू ॥१॥
मग टाकिती हे खोडी । तोंडी लागली ते गोडी ॥धृपद॥
कोंडू घरामधी । न बोलोनि जागो बुद्धी ॥२॥
बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥
अर्थ
आपण आता त्या नंदाच्या मुलाला आणि तुक्याका चांगला मार देऊ. मगच ते ही चोरी करण्याची वाईट खोड टाकून देतील त्यांना दही-दुधाची चटक लागली आहे. ते चोरी कण्यासाठी घरात आले की आपण त्याना कोंडुन ठेउ. तुकाराम महाराज म्हणतात, की मी साऱ्या सवंडयांना गोळा केले आहे आणि देवाला बोलावितो आहे.
अभंग क्र. ३६९४ (लखोटा)
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केले साहे । आता माझे पाहे ॥१॥
हातोहाती गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडी बोल फिका ॥धृपद॥
अंगीकारी हरी । नको पडो फेरी । लाज धरी भांडे । जग झोडी रांडे ॥२॥
बैस भावा पाठी । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडी गोहो । धरी येथे मोहो ॥३॥
पाठिमोरा डोल । आवरी ते बोल । पागलीस बाळा । पुढे अवकळा ॥४॥
आता उभी ठायी । उभाउभी पाही । नको होऊ डुकरी । पुढे गाढव कुतरी ॥५॥
नामा केले खरे । आपुले म्या बरे । तुका म्हणे येरी । पागविल्या पोरी ॥६॥
अर्थ
सामाधिअवस्थेपर्यंत पोहचलेली एक स्त्री आपल्या प्रपंच्यासक्त मैत्रीणीला म्हणते, मळबंधनाच्या जागी मी कासोटा घातला आहे. भक्तीभावाचे सहाय्य केले आहे. आता माझ्याकडे बघ. हा (लाखेने चिटकाविलेले एकीकरण झालेला) लाखोटा मी घेतला आहे. यमनियम इत्यादि अंगाचा अभ्यास करता करता सहजच अगदी हातोहात माझी वृत्ती हरिच्या ठिकाणी गुंतली, जीवपणाला ती वृत्ती मुकली, माझे हे धाडस चांगलेच आहे. तेव्हा हे सखी, क्रियेविण असलेला तुझा हा वाचाळपणा सोडून दे. मझ्यासारखा तुही हरिनामाचा अंगीकार कर. जन्ममरणाच्या फेऱ्यात उगीच पडू नकोस. अंग भांडखोर, नीर्ल्लज बाई, थोडितरि लाज बाळाग. नावर्याला (संसार) सोडून दे आणि भक्तिभाव मनात बाळगुण, भगवंताचा मोह बाळग. अगं पुरे, बडबड बंद कर. पाठमोरी हो. तू ऊगीचच पागली आहेस, पहा, नाहीतर तुला पुढे अवकळा प्राप्त होईल. तू आहे ईथेच उभी रहा; उभ्या उभ्या देवाला पहा. डुक्कर, गाढव, कुत्री अशी पुढे जन्म घेऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अगं सखी, मी नामामुळे कल्याण करूण घेतले. इ�
अभंग क्र. ३६९५
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तू चढी ॥१॥
आम्ही न खेळो न खेळो । आला भाव तुझा कळो ॥धृपद॥
न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥
तुका आला रागे । येऊ नेदी मागे मागे ॥३॥
अर्थ
सवंगडयानि रडी खाल्ली आणि आरडाओरड केला की हे कान्होबा, तू आम्हाला कधी चढण्याची संधि देत नाहीस. आम्ही आता तुझ्याशी खेळणार नाही. तू स्वार्थी आहेस. तुझा भाव आम्हाला समजला आहे. आता तुझा भार आम्हाला सहन होत नाही. आम्हाला उशीर होतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला राग आला म्हणून मी कान्होबाला माझ्या बरोबर येऊ दिले नाही.
अभंग क्र. ३६९६
यमुनेतटी मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियासि ॥१॥
हाल मांडा हाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥धृपद॥
नावे ठेवूनि वाटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥
तुका म्हणे कान्हो तिळया-तांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥
अर्थ
यमुनाकाठी वाळवंतात खेळ मांडला. श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाला, बाबांनो कोठे खेळ खळायचा हे निश्चिंत करा. त्याचे नियम ठरवा मगच खेळा. मोकाटपणे स्वैराचारि खेळण्यात काय मजा आहे ? या गड्यांपैकि मुमुक्षु कोण. मुक्त कोण, विषयी कोण, पापी कोण हे त्यांच्या लक्षणांवरुन ठरवा, त्यांना तशी नावे दया आणि गडी वाटून दया म्हणजे ते रडी जाणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, कामक्रोधादि रूपातील तिळ-तांदळाला जो जिंकून घेतो, त्यालाच श्रीकृष्ण आपल्याबरोबर खेळनारा गडी मानतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















