आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१६ नोव्हेंबर, दिवस ३२० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७७६ ते ८०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८२९ ते ३८४०
“१६ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १६ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८२९ ते ३८४० चे पारायण आपण करणार आहोत.
१६ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७७६ ते ८००,
776-18
तेवी जालेनि सुखलेशे । जीवु भाविलिया अभ्यासे । जीवपणाचे नासे । दुःख जेथे ॥776॥
त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोचा अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते; 776
777-18
ते येथ आत्मसुख । जाले असे त्रिगुणात्मक । तेही सांगो एकैक । रूप आता ॥777॥
ते आत्मसुखहि गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झाले आहे, त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो. 777
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥18. 37॥
778-18
आता चंदनाचे बूड । सर्पी जैसे दुवाड । का निधानाचे तोंड । विवसिया जेवी ॥778॥
आता चंदनाचे बुड सर्पामुळे जसे भयंकर झालेले दिसते अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकाचा प्रतिबंध असतो; 778
779-18
अगा स्वर्गीचे गोमटे । आडव यागसंकटे । का बाळपण दासटे । त्रासकाळे ॥779॥
अरे, स्वर्गीचे उत्तम भोग मिळविण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत्त्व कट महत्संकट आहे, किंवा बालदशेमध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो 779
780-18
हे असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधी । नातरी तो औषधी । जिभेचा ठावो ॥780॥
हे राहो, पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, किंवा औषधाचा कडवटपणा जिभेस सोसावा लागतो, 780
781-18
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥781॥
त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदामादिक साधनांचे दुःख सोसावे लागते. 781
782-18
देत सर्वस्नेहा मिठी । आगी ऐसे वैराग्य उठी । स्वर्ग संसारा काटी । काढितचि ॥782॥
देहादिकांवरील प्रीतीचा त्रास करणारे असे अग्नीप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उपटून टाकते. 782
783-18
विवेकश्रवणे खरपुसे । जेथ व्रताचरणे कर्कशे । करिता जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥783॥
तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचरण करताना जिथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात; 783
784-18
सुषुम्नेचेनि तोंडे । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढे । भारी जेथ ॥784॥
सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूचा रोध करावा लागतो. याप्रमाणे सुरवातीस देते महत्कष्ट आहेत; 784
785-18
जे सारसांही विघडता । होय वोहाहूनि वस्त काढिता । ना भणंगु दवडिता । भाणयावरुनी ॥785॥
चक्रवाक पक्षांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितांस (भुकेलेला) पानावरून उठवून लावले असता; 785
786-18
पै मायेपुढौनि बाळक । काळे नेता एकुलते एक । होय का उदक । तुटता मीना ॥786॥
अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढिले असतात जसे दुःख होते, 786
787-18
तैसे विषयांचे घर । इंद्रिया सांडिता थोर । युगांतु होय ते वीर । विराग साहाती ॥787॥
तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते; परंतु वैराग्यसंपन्न शूर तेही दुःख सहन करतात. 787
788-18
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥788॥
असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे, तो जो सहन करील, त्याला जसा क्षिराब्धीचे मंथन करतेवेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला तसा परमसुखाचा लाभ होतो. 788
789-18
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृते सोहळा । पाहे जेथे ॥789॥
प्रथम वैराग्यरूप गरळ ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विकधैर्यरुपी शंभू जेव्हा आ करील, तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सांपडतो. 789
790-18
पै कोलिताही कोपे ऐसे । द्राक्षांचे हिरवेपण असे । ते परीपाकी का जैसे । माधुर्य आते ॥790॥
हे पहा द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलीतासही मागतो सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात. 790
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
791-18
ते वैराग्यादिक तैसे । पिकलिया आत्मप्रकाशे । मग वैराग्येंसीही नाशे । अविद्याजात ॥791॥
वैराग्य आत्मप्राशनाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्यादीक सर्व दुःखांचा नाश होतो. 791
792-18
तेव्हा सागरी गंगा जैसी । आत्मी मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥792॥
समुद्राला गंगा मिळाल्यावर जशी सुस्वरूप व होते, बुद्धी आत्म्याचे ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंदरुपी सुखाची खाण उघडते. 792
793-18
ऐसे स्वानुभवविश्रामे । वैराग्यमूळ जे परिणमे । ते सात्विक येणे नामे । बोलिजे सुख ॥793॥
याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम होय, त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. 793
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥18. 38॥
794-18
आणि विषयेंद्रिया । मेळु होता धनंजया । जे सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥794॥
आणि अर्जुना, विषय व इंद्रिये यांचा संबंध झाला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा पूर येतो; 794
795-18
अधिकारिया रिगता गावो । होय जैसा उत्साहो । का रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥795॥
अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो; किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा; 795
796-18
नाना रोगिया जिभेपासी । केळे गोड साखरेसी । का बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥796॥
अथवा रोग्याला साखर, केळी ही कुपथ्य असूनही जशी गोड लागतात; किंवा बचनाग खाते वेळेस जसा गोड लागतो; 796
797-18
पहिले संवचोराचे मैत्र । हाटभेटीचे कलत्र । का लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥797॥
संवचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते किंवा बाजारातील स्त्रियांचे (वेश्यांदिकांचे) आचरण प्रथम सुखकर वाटते; किंवा नटाचे आविर्भाव जसे आल्हादकारक वाटतात. 797
798-18
तैसे विषयेंद्रियदोखी । जे सुख जीवाते पोखी । मग उपडिला खडकी । हंसु जैसा ॥798॥
तसे विषय व इंद्रिये यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते, ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादि चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत. अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता, रत्न प्राप्ति न होता तसा तो प्राणास मुकतो, 798
799-18
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गाठी ॥799॥
तशी ज्यायोगे सुकृत्याने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते; आणि विषय सुख मिळण्याकरिता संपादिलेल्या सर्व पुण्य रुपी धनाचाहि नाश होतो; 799
800-18
आणिक भोगिले जे काही । ते स्वप्न तैसे होय नाही । मग हानीच्याचि घाई । लोळावे उरे ॥800॥
आणि भोगलेले जे विषय तेही स्वप्नाप्रमाणे नाहीतसे होतात. मग दुःखाच्या राशीत लोळणे; हीच त्याच्या वाट्यास राहते. 800
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३२० वा. १६, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८२९ ते ३८४०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३८२९ (बाळकोडेचेअभंग)
संचित उत्तम भूमि कसूनिया । जाऊ नेदी वाया पेरि त्याचे ॥१॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥
गाई दवडुनि घालिती बाहेरी । तव म्हणे हरी बांधा त्या ही ॥३॥
त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वांड्यातुनि ॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायी । सहज तेथे नाही घालमेली ॥६॥
मेली ही शाहाणी करिता सायास । नाही सुखलेश तुका म्हणे ॥७॥
अर्थ
भूमी चांगल्या प्रकारे कसून त्यामध्ये उत्तम प्रकारचे बी पेरले की, ते कधीही वाया जाणार नाही अगदी त्याप्रमाणे पूर्वसंचित जर चांगले असेल तर तेही कधी वाया जाणार नाही. ज्याने भूमी चांगली कसून उत्तम प्रकारे बी त्यात पेरले त्याला चांगल्या प्रकारे पीकही येते त्याप्रमाणे गोपाळांच्या पूर्व पुण्याईमुळे त्यांच्या घरी पुष्कळ गाई असून देखील ब्रम्हदेवाने आणखी त्यांच्या घरी गाई पाठवून दिल्या. काही गाई आपल्या इथे नवीन आहेत हे पाहून गोपाळ त्या गाई बाहेर पाठवून देऊ लागले तर त्यावेळी हरी त्यांना म्हणाला की, ज्या गाई नवीन तुमच्या इथे आल्या आहेत त्याही बांधा. ज्या गाई तुमच्या गाईसारख्या अगदी शांत आहेत त्यांना तुम्ही तुमच्या गोठयात बांधा आणि ज्या ओढाळ गाई आहेत त्यांना तुमच्या वाड्यातून तुम्ही हाकलून दया असे भगवान गोपाळांना म्हणू लागले. सर्व सूत्रधारी नारायण असतांना परके व ओढाळ गाई कोणाच्याही घरी येतीलच कशा ? ज्या ठिकाणी स्वत: नारायण नांदेल त्या ठिकाणी चांगल्या वाईट गाई मिश्रीत होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जे अती श�
12:29 Sdm:
अभंग क्र. ३८३० (बाळकोडेचेअभंग)
तुका म्हणे सुख घेतले गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥१॥
करूनिया टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडांचे ॥२॥
दगडांचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गाता छंद ताल नाही ॥३॥
ताल नाही गाता नाचता गोपाळा । घननीळ सावळा तयामध्ये ॥४॥
मध्ये जया हरी ते सुख आगळे । देहभाव काळे नाही तया ॥५॥
तयासि आळंगी आपुलिया करी । जाती भूमीवरी लोटांगणी ॥६॥
निजभाव देखे जयांचिये अंगी । तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥७॥
अर्थ
तुकाराम महाराज म्हणतात, “गोपाळांना कृष्णाने आपले फार सुख दिले ते कांबळीला ध्वजा करुन एकदा नाचत होते. आपल्या टि-यांचे मृदुंग आणि दगड्यांचे टाळ करुन ते गोपाळ वाजवत होते. अहो भगवंताचे एक गीत गाताना ते टाळ वाजवत होते त्या टाळांना कोणत्या प्रकारचा नाद होता व कोणत्याही प्रकारचा छंद व तालही नव्हता. भगवंताचे गीत गाताना गोपाळांना कोणत्याही प्रकारचा ताल आणि छंद नव्हता परंतु प्रत्यक्ष घननीळ सावळा श्रीकृष्ण् त्यांच्यामध्ये होता. ज्या गोपाळांच्या मध्ये प्रत्यक्ष हरी आहे मग त्या हरीचे सुख सर्वापेक्षा वेगळेच आहे त्या सुखापुढे त्यांना देहभाव आणि काळवेळ काहीच कळत नाही. जे गोपाळ भूमीवर लोटांगण घेऊन हरीजवळ जात होते त्यांना हरी आपल्या हाताने उठून आलिंगन देत होता. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या अंगी आपल्या विषयी खरा भक्तिभाव देवाला दिसत असे त्याच्याबरोबर देव खेळ खेळत असे. ”
12:29 Sdm:
अभंग क्र. ३८३२ (बाळकोडेचेअभंग)
केला पुढे हरी अस्तमाना दिसे । मागे त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी ॥२॥
सोयी लागलिया देवाची आवर्ती । बोलविता येती मागे तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तेचि सुख ॥४॥
सुख नाही कोणा हरीच्या वियोगे । तुका म्हणे जुगे घडी जाय ॥५॥
अर्थ
एकदा सुर्यास्त झाला की सर्व गाई गोपाल कृष्ण मागे घराकडे फिरे पुढे कृष्ण पाठीमागे गाई गोपाल असा थाट चालत असताना दिसे. असा थाटात चालत असताना पुढे कृष्ण व बलराम आणि पाठीमागे गाई गोपालांचा समुदाय चालत असे. ज्यांना देवाची सवय लागलेली आहे त्यांना देवाने बोलावले नाही तरी ते देवाच्या मागे मागेच येत असतात. त्या गोपाळांच्या चित्तामध्ये एक हरीच बसलेला असतो. ते नेहमी नेहमी हरीचे सुखच घेत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यांना कोणालाही हरीच्या वियोगाने वेळ जात नाही सुखच मिळत नाही हरी वाचुन प्रत्येक क्षण त्यांना युगाप्रमाणे जातो. ”
12:30 Sdm:
अभंग क्र. ३८३३ (बाळकोडेचेअभंग)
जाय फाकोनिया निवडोनी गाई । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळाचे जीव गोविंदापे ॥२॥
गोविंदे वेधिले तुका म्हणे मन । वियोगे ही ध्यान संयोगाचे ॥३॥
अर्थ
गोपाळ आपआपल्या सोयीनुसार आपआपल्या गाई म्हशी निवडून आपआपल्या घरी जात असे. घरी जाण्याच्या निमित्तानेच गोपाळ गोविंदाच्या घर अंतरले परंतू गोपाळांचा सर्व जीव गोविंदाजवळच होता. तुकाराम महाराज म्हणतात, “गोविंदाने गोपाळाचे मन पूर्णपणे वेधून घेतले होते त्यामुळे जरी गोविंदाचा वियोग गोपाळांना झाला तरी वियोगाच्या निमित्ताने गोविंदाचे चिंतन गोपाळांना व्हायचे व त्यानिमित्त गोविंदाचा पुन्हा त्यांना संयोग घडायचा. ”
12:30 Sdm:
अभंग क्र. ३८३४ (बाळकोडेचेअभंग)
संयोग सकळा असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिले ॥धृपद॥
उतरूनि हाते धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥२॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥३॥
लहान हा थोर जीवजंतु भूते । आपण दैवते झाला देवी ॥४॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हा थोर देव हरी ॥५॥
हरी तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥६॥
अर्थ
गोपाळांना गोविंदाचा वियोग जरी झाला तरी त्याचे चिंतन करुन गोविंदाचा संयोग गोपाळांना घडायचा परंतू तिकडे गोविंदाला त्याच्या भक्तांवाचून करमत नव्हते त्यामुळे तो उदास होत असे. गाई चारुन एकदा की कृष्ण घरी आला की मग यशोदा म्हणत असे की माझ पोर अतिशय गुणवान आहे असे म्हणून त्याच्यावरुन लिंबलोण यशोदा उतरवून टाकीत असे. कृष्णाची हनुवटी धरुन यशोदा त्याची दृष्ट काढीत असे. जो विश्वाचा जनक आहे त्या श्रीकृष्णाला भक्तांच्या सुखाचा फार हव्यास होता आणि अशा या कृष्णाची दृष्ट यशोदा काढत होती. जेवढी काही लहान भूते देव आहेत देवी आहेत त्या सर्व कृष्णाच्याच रुप होत्या. महिषासूरमर्दिनी, देव, मुंजोबा, खेचर, भूत, पिशाच्च सर्व लहान मोठे देव देवी हा स्वत: हरीच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व जगात एक हरीच व्यापलेला आहे तरी देखील भक्तांसाठी हा देव गोकुळामधे लहान बाळ झाला आहे. ”
12:31 Sdm:
अभंग क्र. ३८३५ (बाळकोडेचेअभंग)
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनिया धरिले मोहन । माय म्हणे कोण येथे दुजे ॥धृपद॥
दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥२॥
देवापाशी पुसे देव काय झाला । हासे आले बोला याचे हरी ॥३॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिके मानिती साच खरे ॥४॥
लटिके ते साच साच ते लटिके । नेणती लोभिके आशाबद्ध ॥५॥
सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तव ते ब्रम्हांड देखे माजी ॥६॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणे । तो भक्तांकारणे बाळलीला ॥७॥
लीळा कोण जाणे याचे महिमान । जगाचे जीवन देवादिदेव ॥८॥
देव कवतुक दाखविले तया । लागतील पाया मायबापे ॥९॥
मायबाप म्हणे हाचि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥१०॥
तो हि त्यांचा देव दिला नारायणे । माझे हे करणे तो हि मी च ॥११॥
मी च म्हणउनि जे जे जेथे ध्याती । तेथे मी श्रीपति भोगिता ते ॥१२॥
ते मज वेगळे मी तया निराळा । नाही या सकळा ब्रम्हांडांत ॥१३॥
तद्भावना तैसे भविष्य तयाचे । फळ देता साचे मी च एक ॥१४॥
मी च एक खरा बोले नारायण । दाविले निर्वाण निजदासा ॥१५॥
निजदासा खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूती नारायण ॥१६॥
अर्थ
एक दिवस यशोदेची भक्ती पाहाण्यासाठी कृष्ण उगाच काहीतरी हट्ट धरुन यशोदेपुढे रडत बसून जेवण मागू लागला. त्यावेळी यशोदा म्हणाली आधी देव्हाऱ्यातील देवाला नैवेद्य दाखवील व नंतर तुला भोजन देईन असे म्हटल्यावर कृष्णाने देव्हाऱ्यातील देवच गिळून टाकला मग यशोदेने पाठीमागे देव्हाऱ्यात पाहिले तर देव दिसेनासे झाल्यावर यशोदा कृष्णाला म्हणाली, �
12:31 Sdm:
अभंग क्र. ३८३६ (बाळकोडेचेअभंग)
नारायण भूती न कळे जयासि । तया गर्भवासी येणे जाणे ॥१॥
येणे जाणे होय भूताच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥धृपद॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ देहबुद्धी ॥२॥
बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळी । हरी जळी स्थळी तया चित्ती ॥३॥
चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥४॥
तयामाजी हरी जाणिजे त्या भावे । आपुले परावे सारिखे चि ॥५॥
चिंतने जयाच्या तरती आणीक । जो हे सकळिक देव देखे ॥६॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥७॥
काया वाचा मने पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनिया ॥८॥
यासि कवतुक दाखविले रानी । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥९॥
गोपाळाचे डोळे झांकविले हाते । धरिले अनंते विश्वरूप ॥१०॥
पसरूनि मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटा सांदी ॥११॥
संधि सारूनिया पाहिले अनंता । म्हणती ते आता कळलांसी ॥१२॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१३॥
तो तया कळला आरुषां गोपाळा । दुर्गम सकळा साधनांसि ॥१४॥
शीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकासि साचा भाव दावी ॥१५॥
अर्थ
सर्व भूतमात्रामधे एक नारायण आहे असे ज्यांना कळत नाही त्यांना गर्भवास व जन्ममरणाच्या खेपा कराव्या लागतात. सर्व भूतमात्रामध्ये एक देव व्यापलेला आहे त्यामुळे कोणत्याही भूतमात्रांचा मत्सर करु नये आणि जो सर्व भूतमात्रांचा मत्सर करतो त्यांना जन्मरुपी येरझा-या कराव्या लागतात. सर्वत्र एक देव आहे असे ज्यांना कळले आहे त्यांचे संसारातील सर्व तळमळ आणि देहबुध्दी नाहीशी होते. हरीच जळी स्थळी भरलेला आहे असे ज्यांच्या बुध्दीम
12:32 Sdm:
अभंग क्र. ३८३७ (बाळकोडेचेअभंग)
भाव दावी शुद्ध देखोनिया चित्त । आपल्या अंकिता निजदासा ॥१॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होते । वांचलो जळते आगी हाती ॥२॥
आजि आम्हा येथे राखियेले देवे । नाही तरी जीवे न वंचतो ॥३॥
न वंचत्या गाई जळतो सकळे । पूर्वपुण्यबळे वांचविले ॥४॥
पूर्वपुण्य होते तुमचिये गाठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥
गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका म्हणे करवी आपण । द्यावे थोरपण सेवकासि ॥७॥
अर्थ
एकदा रानामध्ये वनवा पेटला तेव्हा हरि ने स्वत: विश्वरुप धारण केले. नंतर कृष्णाने आपले मुख् पसरवून सर्व ज्वालाग्नी गिळून टाकला व आपल्याला अंकित असलेल्या आपल्या निजदासांचा गोवळयांचा शुध्द भक्तिभाव पाहून देवाने त्यांना एक वेगळाच अभिप्राय दाखवला. गोपाळांना कृष्ण म्हणाला की, हे गोपाळांनो तुमचे काही तरी पूर्व पुण्य होते म्हणूनच आपण आज वनवेच्या मुखातून वाचलो. आज आपल्याला देवानेच वाचवले नाहीतर आज आपण वाचलोच नसतो आपला जीव दिला असता. हे गोपाळांनो तुमचे पूर्व पुण्य फार बलवंत होते त्यामुळेच आपण आज वाचलो नाहीतर गाया देखील वाचल्या नसत्या आपण सर्व जळून गेलो असतो. तुमच्या पदरी काहीतरी पूर्व पुण्य होते असे जगजेठी कृष्ण गोपाळांशी बोलू लागला. वैकुंठनायक भगवान गोपाळांना म्हणतो की, तुम्ही फार पुण्यवंत आहात. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कर्ताकरविता देव आहे परंतु आपल्या भक्तांना आपल्या सेवकांना मोठेपणा दयावा हा हेतू देवाचा होता.
12:33 Sdm:
अभंग क्र. ३८३८ (बाळकोडेचेअभंग)
काय आम्हा चाळविसी वायांविण । म्हणती दुरून देखिलासि ॥१॥
लावूनिया डोळे नव्हतो दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आत उघडी आमची । बाहेरी ते वाचि कुची झाकु ॥३॥
झालासि तु थोर थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदे नाचती भोवताली ॥५॥
भोवती आपणा मेळविली देवे । तुका म्हणे ठावे नाही ज्ञान ॥६॥
अर्थ
ज्यावेळी वनवा देवाने विझवला त्यावेळी आपल्या सेवकांना मोठेपणा देण्यासाठी देवाने गोपाळांची स्तुती केली की, तुमच्या पुण्याईमुळे आज वनवा विझला परंतु गोपाळ देवाला म्हणू लागले हे गोपाळा तू आम्हाला व्यर्थ का चाळवितोस तूच वनवा गिळून घेतलास हे आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळयांनी देखिले आहे. देवा तू आम्हाला डोळेझांक म्हणला परंतु आम्ही डोळे झाकलेले नव्हते आम्ही डोळे झाकण्याचे नाटक केले बोटाच्या फटीतून तू विश्वरुप धारण केलेले आम्ही पाहिले आणि वनवा गिळलेलाही आम्ही पाहिले तू काय करतोस याच्याकडे आमचे चित्त होते. बाहेरुन आम्ही केवळ डोळयावर हात ठेवले परंतु आतमधे आमचे डोळे उघडेच होते. पुढे ते गोपाळ म्हणू लागले देवा तू फार मोठा झाला आणि मोठे तोंड उघडून तु आपल्या मुखाने धूर आणि आग गिळून टाकलास हे आम्ही पाहिले. आमचा सखा सोबती आग खाणारा आहे असे म्हणुन सर्व गोपाळ कृष्णाच्या भोवती आनंदाने नाचू लागले. तुकाराम महाराज म्हणतात “देवाने अशा प्रकारे आपल्या भोवती अनेक गोपाळ जमा केले परंतु गोपाळांना देवाचे खरे ज्ञानच माहिती झाले नाही. ”
12:33 Sdm:
अभंग क्र. ३८३९ (बाळकोडेचेअभंग)
नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतिया सवे येऊ नेदी हरी । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करिता या सवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीही हरीसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
अर्थ
गोपाळ आपल्या वाचून दुसरे काहीही जाणत नाही याविषयी वैकुंठनायकाला कोणतीच शंका नव्हती. ज्ञानीपणाचा अभिमान असणा-या लोकांना हरीने आपल्या जवळ कधीही येऊ दिले नाही. तर्कवादी लोकांना तर हरीने केव्हाच दूर केले होते. नेहमी मतमतांतरावरुन वाद करणा-या लोकांना भेद, अहंकार व निंदा हे आहेर देऊन त्यामध्येच गुंतवून देवाने त्यांना आपल्यापासून दूर ठेवले होते. अशाबद्ध् असणा-या कुटूंबाची सेवा करणा-या लोकांना देवाने आपल्यापासून दूरच ठेवलेले आहे. ज्यांच्या चित्तामधे धन, दारा, पुत्र, संपत्ती आहे त्यांना तो पशूसमान समजतो. जे देवाला विसरुन गेले त्यांनी नरक प्राप्त करुन घेतला असून भवनादीमधेच ते बुडाले आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात “ज्यांनी संसारात राहून हरीची संगती केली त्यांनी मनुष्य जन्मात येऊन आपला जन्म सफल केला सार्थकी केला. ”
12:34 Sdm:
अभंग क्र. ३८४० (बाळकोडेचेअभंग)
खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशी ॥१॥
मातेपाशी एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिले तिने करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुका कानी आइकता त्यांचे । बोलता ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहता । न साहे लवता आड पाते ॥६॥
तेव्हा कवतुक कळो आले काही । हळुहळु दोही मायबापा ॥७॥
हळुहळु त्यांचे पुण्य झाले वाड । वारले हे जाड तिमिराचे ॥८॥
तिमिर हे तेथे राहो शकेकैसे । जालिया प्रकाशे गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तो क्षणामाजी एका ॥१०॥
अर्थ
सर्व गोपाळांसोबत गोपीनाथ खेळीमेळीने घरी आले व मातेपाशी जाऊन बसले. मग सर्व गोपाळानी यशोदा मातेजवळ घडलेले नवल सांगितले व कृष्णाने कसा वनवा गिळून टाकला याची ख्याती यशोदा मातेजवळ सर्व गोपाळांनी जाऊन सांगितली. यशोदेने कृष्णाची आरती काढून दृष्ट कृष्णाची काढली व पुढे काय काय घडले ते सर्व गोपाळांना विचारले. यशोदेने घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा गोपाळांना विचारला व गोपाळानेही कौतुकाने पुन्हा पुन्हा तेच सांगितले. यशोदेला कृष्णाचे कौतुक ऐकताना आणि गोपाळांना कृष्णाचे कौतुक सांगताना वाचेला वीटच येत नव्हता. कृष्णाचा एवढा मोठा पराक्रम ऐकून यशोदा कृष्णाकडे एकसारखे पाहू लागली आणि पाहाताना डोळयाचे पाते जरी आडवे तरी तिला सहन होत नव्हते. तेव्हा कोठे यशोदा आणि नंदाला कृष्णाचे कौतुक हळूहळू कळू लागले होते. हळूहळू त्यांचे पुण्य वाढत गेले आणि गडद अज्ञानरुपी अंध:कारा�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















