27. कुळ भाट म्हणजे काय ? 96 कुळी मराठा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

KUL BHAT MHANJE KAY?
HELAVI VANSHAVAL

कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या ?
या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.

कुळ भाट म्हणजे आपल्या कुळाची वंशावळ आणि कुळातील नातेसंबंध याची खरीखरी माहितीचा विश्वासू स्रोत होय.

भाट नावाची अशी एक जात आहे. कि ते आपल्या कुळा बद्दल संपूर्ण माहिती ठेवत असत. ते वर्षातून एकदा येत असतात.

घरातील नवीन जन्मलेली आणि लग्न झालेली. वारलेले माणसांची नावे लीहून घेत आणी त्या बदल्यात त्यांना दान दिल्या जात होत. गायी, तांब्याची भांडी, जमिनीचा तुकडा, धान्य, नाणे दिल्या जात होते प्रत्येक कुळाचा वेगळा भाट असतो.

१. भाट प्रामुख्याने कुळाची कामे खालीलप्रमाणे करतो.
२. कुळातील नवीन जन्म झालेल्या बाळकाची नोंदणी,
३. मरण पावलेल्यांची नोंदणी,
४. लग्न झालेल्यांची नोंदणी, (लग्न करून गेल्याल्या मुलींची)
५. लग्न झालेल्यांची नोंदणी, (लग्न करून आलेल्या मुलींची)

या सगळ्या नोंदी वर्षातून एकदा येवून सर्व परिवारातील लोकांच्या नोंदण्या करून तो परत जातो. भाट शक्यतो पावसाळा संपला कि हिवाळ्याच्या दिवसात शक्यतो नोंदणी साठी फिरत असतात.

त्या नोंदणीच्या बदल्यात त्यांना जुन्या काळी गाय, बैल, सोने, चांदी, रत्न, कपडे, जमीन, बक्षीस, इत्यादी देत. सांप्रत काळी फक्त पैसे दिल्या जातात. दिली जाणारी रक्कम 1000 ते 20000 रुपयांपेक्षा सुद्धा अधिक असू शकते.

https://www.youtube.com/embed/J4RSIsuiX8U?si=kcklb5KbqoIeGe8x

उत्तर भारतात यांना भाट म्हणतात.

भाट कोण आहेत ?

  1. भाट कोण आहेत ?
    उत्तर भारतात यांना भाट म्हणतात.
    दक्षिण भारत्तात यांना हेळवी म्हणतात. पण दोन्ही मध्ये फरक आहे. (त्यासाठी हेळवी म्हणजे कोण ? हा व्हिडिओ पहा)
    राजदरबारात राजाची स्तुति करत ज्यांना “स्तुति पाठक” त्यांनाही भाटच म्हणत.
    “सुत” असा दुसरा शब्द ही भाटांसाठी आहे. 
    “कुळ भाट” म्हणजे जे वंशावळी ठेवतात. ह्या ज्ञातीचे लोक किशनगड, राजस्थान मध्ये आहेत.

कुळ भाट कोणत्या महिन्यात येतात ?.

जेष्ठ ते कार्तिक महिन्यात घरी शेतीचे काम झाल्यावर दिवाळीच्यानंतर वंशावळ वाचण्यासाठी. व वंशावळी नोंद ठेवण्यासाठी बाहेर पडतात.

भाटाचे कामे :- वंशावळ वाचणे व वंशावळ नोंद करणे.

भाटाचे कामे
वंशावळ वाचणे व वंशावळ नोंद करणे.
वंशावळ वाचण्याचे काम.

वंशाचा दिवा

मुलांना वंशाचा दिवा का म्हटले जाते?
भाट बांधव आपल्या पत्नीसह माहितीचं गाठोडं डोक्यावर घेऊन जात असत. ठरल्याप्रमाणे त्या त्या कुटुंबाच्या घरी घरमालकाच्या संमतीने चार- पाच दिवस मुक्काम करत.
या दिवसांत घरात नवीन जन्मलेल्या मुलांच्या,
नवीन सून म्हणून आलेल्या,
मुलगी सासरी गेलेल्या तसेच मयत झालेल्या घरातील सदस्यांच्या तारीखवर नोंदी करणे.
तसेच
जुन्यांची माहिती घरमालकाला देणे इत्यादी कामे केली जायची.

त्यावेळी त्यांचे जेवण, पाहुणचार, राहण्याची व्यवस्था, घरमालक उत्साहाने व आदराने करायचे.

सांगावयाची माहिती भाट आपल्या खास आणि काव्यमय शैलीत सांगत असत.

पुर्ण खात्री झाल्याने वंशावळीचे वाचन करायचे आहे. त्यासाठी दिवा लावा लागणार आहे. त्या दिव्याला वंशाचा दिवा म्हणतात. तो तुमची मुलगी किंवा मुलगा वंशांचा दिवा म्हणुन त्यांच्या हातून लावायचा असतो.

वंशावळ वाचणे

  • वंशावळ वाचणे

    ब्रम्हभट – श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata श्री. कैलास ब्रम्हभट (वंशावळ वाचणारे)

    ते त्यांच्या वडिलांपासून असणारे हे काम सांभाळतात. आल्यानंतर चहापाणी झाला.
    अन त्यांनी आमची वंशावळी वाचायला सुरूवात केली.
    वंशावळ वाचण्याच्या आधी त्यांनी गणेश व इतर देवतांना वंदन केले,
    अन
    मग एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचू लागले.
    कोण व्यक्ति कुठे होता,
    त्याला मुलगे किती,
    मुली किती,
    सुनबाई कोणत्या कुळातली,
    तिचे माहेरचे गाव कोणते आदी उल्लेख त्यात येत गेले.
    अगदी शंभर वर्षे च्या वरचा उल्लेख त्यात आला होता. नंतर नंतर जेव्हा पणजोबा, आजोबांचा उल्लेख त्यात आला तेव्हा ओळख पटायला लागली. एक प्रकारचा आपल्या कुळाचा इतीहासच होता तो. त्यानंतर त्यात आताच्या नविन पिढीची/ मुलांची नावे लिहील्या गेली
    संपूर्ण माहितीची देवाणघेवाण झाल्यावर नंतर त्या पोथीची पुजा करून व दक्षिणा अन शिधा देवून समाप्ती झाली.
    पोथीची पूजा करून भाट परतीच्या प्रवासाला निघाले की त्यांना साडीचोळी, कपडे, शेला, नारळ, दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला जायचा.

    तत्कालीन ‘तहसीलदार’ म्हणून ओळखले जाणारे भाट बांधव काही वर्षांपूर्वी गावोगाव हिंडताना दिसत होते. काळाच्या ओघात आता मोजकेच भाट बांधव फक्त माहिती देण्यापुरते संबंधित कुटुंबात जातात. माहिती दिल्यावर गावातील मंदिरात किंवा धर्मशाळेत मुक्काम करतात. हे भाट आता कालबाह्य झाले.

वंशावळी नोंद ठेवणे.

  • २. वंशावळी नोंद ठेवणे.
  • भाट ही राजस्थानातील एक प्राचीन जात आहे जी शेतीची कामे आटोपून काही महिने देशाटन करायला निघतात आणि देशभरातील प्रदेशानुरूप वेगवेगळ्या लोकांच्या वंशावळी संकलित करून पिढीजात त्यांचा संग्रह करतात.

वंशावळी कुठे सापडेल

  • वंशावळी कुठे सापडेल .

    तीर्थक्षेत्र ठिकाणी काही पुरोहित (पंडे) आपल्या कुळातील जर कुणी तीर्थाला गेले असल्यास त्यातील कुणी जर पूजा केली असेल तर त्याची नोंद तिथे असते. जसे नाशिक, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, प्रयागराज, कशी-बनारस, बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथपुरी, द्वारका, इत्यादी ठिकाणी वंशावळ सापडू शकते. त्यासाठी मागील किमान ५ पिढ्याची नांवे माहित असावी, मूळ गावासह.

भाटाची भाषा

  • भाटांच्या दप्तरात ‘सांकेतिक’ लिपीत नंद.  मोडी लिपीत आणि डिंगल, नंद भाषा भाषा लिहिण्यासाठी वापरता.

बाड म्हणजे काय ?

  1. ही भाट मंडळी आपापसात प्रांत वाटून घेऊन त्यानुसार या सर्व माहितीचा मोडी लिपीत आणि डिंगल भाषेत समुच्चय करत. जमवलेल्या माहितीस ते बाड म्हणतात.

छत्रपती शिवाजी म.जांनी आपली वंशावळ शोधण्यास चिटणीस बल्लाळ/बाळाजी आवजी चित्रे यांना उदयपुरला पाठवले

  1. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली वंशावळ शोधण्याकरिता आपले चिटणीस बल्लाळ/बाळाजी आवजी चित्रे यांना उदयपुरला पाठवल्याचे सप्तप्रकारणात्मक बखरीत नमूद केलेले आहे. किशनगढचे भाट यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत.

भाटांकडची माहिती प्रमाणित असते का ?

  1. भाटांकडची माहिती प्रमाणित असते का ?
     तरी एकदा भाटाचा एक पुरावा कोर्टाने ग्राह्य मानला होता, हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.

    यवतमाळ जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाची ही सत्यकथा. नगराध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते आणि तत्कालीन नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गातील अर्थात मराठा असल्याची चर्चा होती. त्यामुळे पराभूत झालेल्या एका उमेदवाराने याविरुद्ध कोर्टात याचिका सादर केली. मात्र विराजमान नगराध्यक्षाने आपण ओबीसी (कुणबी) असल्याचे अनेक पुरावे सादर केले, त्यात त्यांनी त्यांच्या भाटाकडे जाऊन त्यांचे पूर्वज कोण होते, कोणत्या जातीचे होते वगैरे माहिती काढली व कोर्टात सादर केली. तेव्हा कोर्टाने ही माहिती मान्य करून त्यांचे नगराध्यक्षपद कायम ठेवले होते. सदर खटला नागपूर उच्च न्यायालयात सन 2000 साली चालला होता.

    भाट लोकांकडून वंशावळ कशी मिळवावी? त्यांच्याकडून मिळालेली वंशावळ खरंच विश्वसनीय असते का?

    आपल्या कुळाचे पूर्ववृत्त जाणणे आजमितीला अव्यावहारिक तथा निरुपयोगी वाटत असले तरीही भावनाप्रधान भारतीय संस्कृतीत पितृऋण फेडण्यार्थ कधी कधी आवश्यक असते. आपल्या घराण्याच्या इतिहासाचा आढावा घ्यायला सर्वप्रथम तर आपली वंशावळ ज्ञात असणे अनिवार्य असते. ही वंशावळ मिळवण्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक उपाय आहे भाटांचा.

भाटाची दुसरी बाजू :- संशयी

  1. भाटाची दुसरी बाजू :- संशयी

    इंग्रजी अमलात भाट ह्यांना Nomads म्हणून गणल्या गेले कारण राजे महाराजे खालसा झाल्यानंतर भाट बेरोजगार झालेत. मात्र त्यांनी आपली स्तुती करण्याची कलेला आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून अवलंबिले आणि दारोदार फिरून भीक मागू लागलेत. म्हणून त्यांना भिक्षुक पण म्हटल्या गेले. अजूनसुद्धा बरेच भाट हे भीक मागून आपली उपजीविका साधतात. आपल्या ठराविक लोकांकडे जाऊन त्यांची स्तुती करून भीक मागतात. त्यानी धनी लोकांविषयी माहिती काढून सात आठ पिढ्यांचा इतिहास गोळा करून ठेवला आणि जसा सुताणे स्वर्ग गाठतात त्याच प्रकारे यजमानाच्या पूर्वजांचे खोटे नाटे गोडवे गातात. स्तुती मग ती खोटी का असेना कुणालाही हुरळून जाण्यास भाग पाडते. भाट मनुष्याच्या ह्याच भावनेचा फायदा घेऊन आपल्या पूर्वजांची स्तुती ऐकतात. भट जेव्हा स्तुती करतो तेव्हा बरेच बघेपण असतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर ते पण विश्वास ठेवतात. त्या अनुषंगाने यजमानाला आपली फुशारकी मारायला वाव मिळतो.

कंजारभाट.

  1.  कंजारभाट.

    महाराष्ट्रात भाटांची एक शाखा आहे कंजारभाट. ते आता भटके राहिलेले नाहीत आणि स्थायिक झालेले आहेत. त्यांच्यात एक प्रथा आहे. नाव विवाहित पत्नीची ‘ कुमारिका परीक्षा ‘ [ Virginity Test ]’. ह्या परीक्षेत लग्नानंतर जोडप्याला एक नवीकोरी पांढरी चादर दिली जाते जिच्यावर झोपून नवविवाहित आपला प्रथम संबंध स्थापित करतात. जर चादरीवर रक्ताचे डाग दिसलेत तर वधू उत्तीर्ण होते अन्यथा डाग दिसले नाहीत तर मुलीने विवाहपूर्व यौन संबंध स्थापित केलेत असा निष्कर्ष काढला जातो. मात्र मैदानी खेळ खेळल्याने, मोटारसायकल चालविल्याने, आणि अजून बऱ्याच कारणाने Hymen क्षतिग्रस्त होऊ शकते आणि त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकत नाही. हि गोष्ट आता त्या समाजाला समजू लागली असल्यामुळे जुनी प्रथा मोडकळीस येत आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात चंद्रभाट (चंदकवी)

  1. १५.  पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात चंद्रभाट (चंदकवी)


काळाच्या ओघात भाट बांधव आता शिक्षणाकडे वळल्याचे दिसून येते.

  1. १६. काळाच्या ओघात भाट बांधव आता शिक्षणाकडे वळल्याचे दिसून येते.

वंशावळ खर्च किती ?

  1.  वंशावळ खर्च किती ?

    प्रारंभी आपल्याला त्यांना ४,०००/५,००० ₹ द्यावे लागतात ज्याच्या बळावर ते मोडी लिपी आणि डिंगल भाषेच्या तज्ज्ञास नेमून आपली वंशावळ उपलब्ध आहे का हे बघतात, याचा तपास घेण्यासाठी आपल्याला त्यांना आपल्या काही पिढ्या, मूळ गाव, जात, गोत्र, देवक इत्यादि पैकी जी माहिती असेल ती द्यावी लागते. जर आपली वंशावळ सापडली नाही तर ते आपले द्रव्य आपल्याला परत करतात, परंतु जर वंशावळ सापडली तर मात्र ते राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी, मुद्रा असलेले प्रमाणपत्र बनवून देतात आणि तत्पश्चात उर्वरित निधी (५,०००-१०,००० ₹) आपल्याला त्यांना द्यावा लागतो.

भाटांना कसे भेटावे ?

  1.  रागावले किंवा कबूल केलेली दक्षणा दिली गेली नाही, किंवा अपमान, हेळसांड केल्यास आडनांव बदलतात उदा. जाधव चे दानमोडे केले माझ्या स्वतः च्या गावात.
    इथे एक गोष्ट मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवावी की मानधन द्यायची पूर्ण सिद्धता असल्यासच या लोकांशी संपर्क करावा अथवा हे जमदग्नीचे अवतार आपले बाड नष्ट सुद्धा करू शकतात. व्यक्तिशः माझा अनुभव असा की ही सर्व पद्धत जाणून झाल्यावर मी त्यांना आठवड्याभराचा अवकाश मागितला असता त्यांनी तिसऱ्याच दिवशी मला निर्णय विचारला आणि तो अद्याप घेतलेला नाही हे कळताच त्यांनी माझे काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

    विश्वसनीयतेसंदर्भात भाष्य करायचे झाल्यास माझ्या परिचितांना भाटांनी दिलेली त्यांची वंशावळ योग्य मिळाल्याचे त्यांनी ऐतिहासिक पत्रांवरून बनवलेल्या वंशावलीत शहानिशा करून मला सांगितले. परंतु अपेक्षित मानधन न मिळाल्यास हे भाट वंशावळीत फेरफार करतात असेही माझ्या ऐकण्यात आहे, याविषयी खात्रीपूर्वक ज्ञान मलाही नाही. तसेच एक विलक्षण गोष्ट अशी की हे भाट सगळ्या ब्राह्मणेतर समाजांच्या कथा कुठल्यातरी कपोलकल्पित राजांशी नेऊन जोडतात ज्यांना ऐतिहासिक, पौराणिक किंवा वैदिक आधार तस्सूभरही नसतो.

    इत्यर्थ इच्छुक मान्यवरांनी भाटांशी उपरोल्लेखित सर्व गोष्टी लक्षात घेऊन सारासार विचार करूनच संपर्क साधावा.

मराठी चित्रपटात भाट – हेळवी

  1.  ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला. हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज

………………………………………………………………………………………………………….

राजदरबारात राजाची स्तुति करत ज्यांना “स्तुति पाठक” त्यांनाही भाटच म्हणत.


“सुत” असा दुसरा शब्द ही भाटांसाठी आहे.

 “कुळ भाट” म्हणजे जे वंशावळी ठेवतात. ह्या ज्ञातीचे लोक किशनगड, राजस्थान मध्ये आहेत.

‘भाट’ हा शब्द मराठीत ‘स्तुतिपाठक’ या अर्थाने रुढ आहे. हा एक भटका समाज असून ‘भाट’ किंवा ‘पुस्तके’ या नावानं ओळखला जातो. पूर्वजांच्या किंवा आपल्या मालकाच्या वंशावळी, त्या संदर्भातील इतर नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे हा भाटांचा पिढीजात व्यवसाय आहे.

वंशावळ वाचण्याचे काम हा समाज करतो. वंशावळीस ‘नामावळी’ किंवा ‘वडलोपजी’ असेही म्हणतात. एकप्रकारे कुळाचा इतिहासच त्यांच्याकडे अभिलेख म्हणून जतन केलेला असतो. ही कामे वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून केली जातात.

मी इयत्ता तिसरीत असतांना माझ्या वडिलांच्या आग्रहास्तव व विनंतीवरून भाट आमच्या गावी आले होते. तसेच घरी काही दिवस मुक्कामी होते. त्यावेळी त्यांची खूप सरबराई करण्यात आल्याचे मला आठवते. तेव्हा त्यांनी माझी जन्मतारीख, नाव इत्यादी तपशील त्यांच्याकडील दस्तऐवजात नोंदवून घेतला होता.

भाटांकडे असणाऱ्या नोंदींची वैशिष्ट्ये-

आपले पूर्वज कोण होते? त्यांचे मूळ गाव, त्यांचं नाव, जात-पोटजात, पूर्वज कोठे राहत होते? कुलदैवत कोणते? अगदी खापर पणजोबा काय करायचे, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? परिवार या गावात कसा आला? इत्यादी रंजक माहितीचा इतिहास या ‘पुस्तक्यांकडे’ सापडतो की अशी माहिती शासनाच्या कोतवाल बुकातही सापडणार नाही.

भाट लोक वंशावळ वाचण्याच्या आधी श्रीगणेश व इतर देवतांना वंदन करून वाचायला सुरुवात करतात. एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचून दाखवतात. नवीन पिढीतील मुलांची नावे याची नोंद करतात.

भाटांच्या दप्तरात ‘सांकेतिक’ लिपीत लिहिलेला बहुतेकांचा लेखाजोखा आजही उपलब्ध आहे. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय इतर कुणीही करू नये, म्हणून सांकेतिक लिपीत नोंदी करण्याची त्यांची पध्दत असावी. खरं तर असा प्रकार असतो किंवा होता, याबाबत आजही फारसे कुणाला माहीत नाही.

पूर्वीची भाटांची कार्यपद्धती-

पूर्वी भाट बांधव आपल्या पत्नीसह माहितीचं गाठोडं डोक्यावर घेऊन जात असत. ठरल्याप्रमाणे त्या त्या कुटुंबाच्या घरी घरमालकाच्या संमतीने चार- पाच दिवस मुक्काम करत. या दिवसांत घरात नवीन जन्मलेल्या मुलांच्या, नवीन सून म्हणून आलेल्या, मुलगी सासरी गेलेल्या तसेच मयत झालेल्या घरातील सदस्यांच्या तारीखवर नोंदी करणे तसेच जुन्यांची माहिती घरमालकाला देणे इत्यादी कामे केली जायची. त्यावेळी त्यांचे जेवण, पाहुणचार, राहण्याची व्यवस्था, घरमालक उत्साहाने व आदराने करायचे. सांगावयाची माहिती भाट आपल्या खास आणि काव्यमय शैलीत सांगत असत. संपूर्ण माहितीची देवाणघेवाण झाल्यावर तसेच पोथीची पूजा करून भाट परतीच्या प्रवासाला निघाले की त्यांना साडीचोळी, कपडे, शेला, नारळ, दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला जायचा.

तत्कालीन ‘तहसीलदार’ म्हणून ओळखले जाणारे भाट बांधव काही वर्षांपूर्वी गावोगाव हिंडताना दिसत होते. काळाच्या ओघात आता मोजकेच भाट बांधव फक्त माहिती देण्यापुरते संबंधित कुटुंबात जातात. माहिती दिल्यावर गावातील मंदिरात किंवा धर्मशाळेत मुक्काम करतात. हे भाट आता कालबाह्य झाले तरी एकदा भाटाचा एक पुरावा कोर्टाने ग्राह्य मानला होता, हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.

यवतमाळ जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाची ही सत्यकथा. नगराध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते आणि तत्कालीन नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गातील अर्थात मराठा असल्याची चर्चा होती. त्यामुळे पराभूत झालेल्या एका उमेदवाराने याविरुद्ध कोर्टात याचिका सादर केली. मात्र विराजमान नगराध्यक्षाने आपण ओबीसी (कुणबी) असल्याचे अनेक पुरावे सादर केले, त्यात त्यांनी त्यांच्या भाटाकडे जाऊन त्यांचे पूर्वज कोण होते, कोणत्या जातीचे होते वगैरे माहिती काढली व कोर्टात सादर केली. तेव्हा कोर्टाने ही माहिती मान्य करून त्यांचे नगराध्यक्षपद कायम ठेवले होते. सदर खटला नागपूर उच्च न्यायालयात सन 2000 साली चालला होता.

वरील घटनेवरून ‘भाट’ बांधवांचे समाजातील स्थान व महत्व अधोरेखित होते. त्यांच्याकडे अनेक पिढ्यांचा माहितीचा खजिना असे. पूर्वजांचे ‘रेकॉर्ड’ जतन करून ठेवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले हे मात्र नाकारता येणार नाही.

१. भाट ह्याचा अर्थ स्तुती करणारा. पूर्वी राजे महाराजे आपली स्तुती ऐकून घेण्यासाठी राजदरबारी भाटांची नेमणूक करायचेत.

२. इंग्रजी अमलात भाट ह्यांना Nomads म्हणून गणल्या गेले कारण राजे महाराजे खालसा झाल्यानंतर भाट बेरोजगार झालेत. मात्र त्यांनी आपली स्तुती करण्याची कलेला आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून अवलंबिले आणि दारोदार फिरून भीक मागू लागलेत. म्हणून त्यांना भिक्षुक पण म्हटल्या गेले. अजूनसुद्धा बरेच भाट हे भीक मागून आपली उपजीविका साधतात. आपल्या ठराविक लोकांकडे जाऊन त्यांची स्तुती करून भीक मागतात. त्यानी धनी लोकांविषयी माहिती काढून सात आठ पिढ्यांचा इतिहास गोळा करून ठेवला आणि जसा सुताणे स्वर्ग गाठतात त्याच प्रकारे यजमानाच्या पूर्वजांचे खोटे नाटे गोडवे गातात. स्तुती मग ती खोटी का असेना कुणालाही हुरळून जाण्यास भाग पाडते. भाट मनुष्याच्या ह्याच भावनेचा फायदा घेऊन आपल्या पूर्वजांची स्तुती ऐकतात. भट जेव्हा स्तुती करतो तेव्हा बरेच बघेपण असतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर ते पण विश्वास ठेवतात. त्या अनुषंगाने यजमानाला आपली फुशारकी मारायला वाव मिळतो.

३. महाराष्ट्रात भाटांची एक शाखा आहे कंजारभाट. ते आता भटके राहिलेले नाहीत आणि स्थायिक झालेले आहेत. त्यांच्यात एक प्रथा आहे. नाव विवाहित पत्नीची ‘ कुमारिका परीक्षा ‘ [ Virginity Test ]’. ह्या परीक्षेत लग्नानंतर जोडप्याला एक नवीकोरी पांढरी चादर दिली जाते जिच्यावर झोपून नवविवाहित आपला प्रथम संबंध स्थापित करतात. जर चादरीवर रक्ताचे डाग दिसलेत तर वधू उत्तीर्ण होते अन्यथा डाग दिसले नाहीत तर मुलीने विवाहपूर्व यौन संबंध स्थापित केलेत असा निष्कर्ष काढला जातो. मात्र मैदानी खेळ खेळल्याने, मोटारसायकल चालविल्याने, आणि अजून बऱ्याच कारणाने Hymen क्षतिग्रस्त होऊ शकते आणि त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकत नाही. हि गोष्ट आता त्या समाजाला समजू लागली असल्यामुळे जुनी प्रथा मोडकळीस येत आहे.

४. भाट , भाटिया इत्यादी इतर जाती भारतातील इतर प्रदेशात तथा पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान इत्यादी देशात पण आहेत. कालांतराने त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून आता शेती आणि इतर उद्योगधंदे सुरु केलेत.

पूर्वजांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणारा भाट

‘भाट किंवा पुस्तके या नावानं ओळखला जाणारा हा एक भटका समाज. आपल्या पूर्वजांच्या नोंदी लेखी स्वरूपात ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करणारा हा समाज खर तर तत्कालीन तहसीलदार होता असं म्हटल्यास चूक ठरू नये.

record maittaining technique

पूर्वजांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणारा भाट

‘भाट किंवा पुस्तके या नावानं ओळखला जाणारा हा एक भटका समाज. आपल्या पूर्वजांच्या नोंदी लेखी स्वरूपात ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करणारा हा समाज खर तर तत्कालीन तहसीलदार होता असं म्हटल्यास चूक ठरू नये. शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आऊट ऑफ रेकॉर्ड झाला असं खेदानं म्हणावं लागते.

आपले पूर्वज कोण होते? त्यांच नाव काय… गाव कोणतं…? त्यांची जन्मतारीख कोणती? खरी जात कोणती? पोटजात कोणती? कोठे राहत होते? ते काय करत होते? कुलदैवत कोणते? अगदी शिवशाहीत वा मोगलाईत आपला खापर पणजा कोणाच्या बाजूने लढले होते किंवा कोणत्या दलात होते? ही रंजक माहिती आपल्याला शासनाच्या तहसील कार्यालयातील कोतवाल बुकात सापडणार नाही. पण पुस्तक्यांकडे मात्र अख्या कुटुंबाचा इतिहासच सापडतो… तोही लिखित स्वरूपात.

भाटांच्या सांकेतिक लिपीत आजही बहुतेकांचा लेखाजोगा भाटांकडे उपलब्ध आहे. हा व्यवसाय अन्य कुणीही करू नये म्हणून सांकेतिक लिपीत लिहिण्याची ‘आयडिया’ कदाचित त्यामागे असावी. खरं तर हा प्रकार असतो किंवा होता. याबाबतही आज फारसे कुणाला माहीत नाही. प्रत्येक परिवाराचा इतिहास लिहिणाऱ्या भाट बांधवांचाही इतिहास पाहणे आणखी रंजक ठरेल.

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील भाऊराव दहिदळे या वयोवृद्ध भाट बांधवासोबत चर्चा केली असता, त्यांनी भाटाला समृद्ध इतिहास असल्याचे सांगून एक आख्याय‌िका सांगितली. खर तर या आख्याय‌िकेतील अर्धा भाग इतिहासात सापडतो, नंतरचा अर्धा भाग जिज्ञासू इतिहासकारांनी शोधावा असे यानिमित्त आवाहन.

ती आख्याय‌िका अशी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात चंद्रभाट (चंदकवी) नावाचा भाट होता आणि तो पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासू होता.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या साम्राज्यावर म. घोरीने १७ वेळ आक्रमण केले, परंतु पृथ्वीराज चव्हाणने सतराही वेळेस घोरीचा पराभव केला. त्यामुळे घोरी चिडून होताच. एकदा पृथ्वीराज चव्हाण जंगलात फक्त चारपाचच सोबती घेऊन शिकारीला गेला. ही खबर घोरीला मिळाली आणि त्याने प्रचंड फौजफाटा घेऊन पृथ्वीराज चव्हाणला पकडले, आणि आपल्या दरबारात घेऊन आला. तेथे घोरीने त्याचे डोळे फोडले. शिवाय त्याचे हातपाय साखळदंडाने बांधले व त्याला जम‌िनीत गाडले, मात्र पृथ्वीराज चव्हाण मरू नये म्हणून श्वास म‌िळण्यासाठी जम‌िनीला छिद्र ठेवले. याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांना आणखी वेदना होण्याच्या उद्देशाने एक भाला त्यांच्या पोटात खूपसून त्याचे दुसरे टोक जम‌िनीवर काढले व त्याला एक झेंडा लावला, आणि लोकांनी त्या झेंड्याला लाथ मारावी असे फर्मान सोडले. दरम्यान पृथ्वीराज चव्हाणच्या शोधात चंदभाट (चंदकवी) तेथे आला आणि ‘महाराज आप कहा हो’ असे जोरजोरात विचारले तेव्हा हा आवाज पृथ्वीराज चव्हाण यांनी ओळखला व ‘अरे चंद मै इदर जमीन में हू’ असं म्हणून आवाज दिला, तेव्हा चंदभाटाने ‘महाराज आप इतने बहादूर हो और यहा क्या कर रहे हो’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांना म. घोरीच्या विरोधात लढण्यास प्रेरीत केले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण जोरदार उसळी मारून खड्याच्या बाहेर आला… हे सर्व बुरुजावरून म. घोरी बघत होता आणि हसत होता, कारण आपण त्याचे डोळे फोडले आहे तेव्हा हा आता आपल काहीच बिघाडू शकत नाही, असे घोरी समजत होता. मात्र पृथ्वीराज चव्हाणने चंदभाटाला, ‘हे चंद तू सिर्फ मुझे घोरी कहापे इतला बता दे’ असे म्हटलं आणि चंदने आपल्या खास शैलीत अर्थात काव्यात ‘चार बास चोवीस गज… अंगुर अष्ट प्रधान इत्तेपर है सुलतान’ अस सांगितले तेव्हा पृथ्वीराज चव्हाणने क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेने एक बाण सोडला आणि म. घोरीच्या मस्तकाच्या चिंधड्या उडविल्या. (पृथ्वीराज चव्हाण ‘लक्षवेधी’ होता अस इतिहासाचे अभ्यासक सांगतात) यानंतर म. घोरीचे सैन्य आपल्या मारणार या विचाराने त्याने चंदभाटाला सांगितले की ‘चंद मुझे किसीभी हालात मे दुश्मनके हातसे मरना नही इसलिये तू मेरी गर्दन उडा, मै तेरी उडाता…’ तेव्हा चंदभाट ऐकत नव्हता मात्र पृथ्वीराज चव्हाणने ‘तुझे भवानी माँ की कसम है’ असे म्हटले तेव्हा रडत रडत चंदने पृथ्वीराज चव्हाणची मान उडविली आणि त्याही स्थितीत पृथ्वीराज चव्हाणने चंदची. अशी ही आख्याय‌िका आहे. (याबाबत अभ्यासू इतिहासकारांनी संशोधन करण्याची गरज आहे.)

भटक्या जमातीमध्ये मोडणारा ‘भाट’ समाज सध्या मात्र उपेक्षेचे जीवन जगत आहे. भाट बांधव आपल्या पत्नीसह मोहिमेवर ‘भाट’ समाज सध्या मात्र उपेक्षेचे जीवन जगत आहे. भाट बांधव आपल्या पत्नीसह मोहिमेवर निघतात. ठरल्याप्रमाणे त्या त्या परिवाराच्या ‘इतिहासाचं’ अर्थातच माहितीच गाठोडं (गठ्ठा) डोक्यावर घेऊन संबंधित घरी सरळ-सरळ डेरा टाकतात. घर मालकाची परवानगी काढून त्या ठिकाणी चार-पाच दिवस मुक्काम ठोकतात. या दिवसांत नवीन अर्थात जन्मलेल्या मुलांच्या, नवीन सून म्हणून आलेल्या, मुलगी सासरी गेलेल्या, तथा मयत सदस्यांच्या तारीखवार नोंदी करणे. जुन्यांची माहिती यजमानाला देणे इत्यादी कामे यथावकाश केली जायची. यावेळी त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था घरमालक मोठ्या उत्साहाने व आदराने करायचे. आज हयात असलेल्या व्यक्तीचा आजोबा कोण?… पणजोबा कोण?… खापर पणजोबा कोण? त्याचा पणजा कोण? खापर जणजी कोण? तुमचे कुटुंब मूळचे कुठले? हा परिवार इथे कसे आला? इत्यादी सर्व माहिती पुराव्यानिशी मुक्काम असलेल्या घरमालकाला दिली जायची. किंबहुना दिली जाते. ही माहिती भाट आपल्या खास शैलीत, एखाद्या कविसारखे काव्यात सांगतात, साधुसंताचे दोहे म्हणून दाखवितात. संपूर्ण माहितीची देवाणघेवाण झाल्यावर भाट बांधव परतीच्या प्रवासाला निघाले की त्यांना साडीचोळी, शेला नारळ देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान केला जायचा (जातो). विशेष म्हणजे या मंडळींनी कामाची विभागणी केली असल्याचेही दिसून येते, जसे एका भाट परिवाराने एक परिवार निवडला की दुसरा भाट तेथे घुसखोरी करायचा नाही. दुसरा भाट दुसर कुटुंब निवडायचा, ज्यामुळे एकाच भाटाकडे त्या त्या कुटुंबाची माहिती मिळते. तत्कालीन तहसीलदार म्हणून गणल्या जाणारे भाट बांधव काही दिवसांपूर्वी गावोगाव हिंडतांना दिसत होते. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमधला ‘मुक्काम’ आता कोणालाही नकोसा झाला आहे. त्यांच्या जेवण्या-राहण्याची व्यवस्था कुणी करावी? हा प्रश्न उपस्थित झाला. आम्ही आता ग्लोबल झालो, दिवसेंदिवस माणसाचा कुणावरच विश्वास राहिला नाही. सासुला सून घरात नको आहे, सुनेला सासू घरात नको झाली आहे. भावाला भाऊ, बापाला लेक, लेकाला बाप घरात नकोसा झाला आहे, इतकच काय, घरी आलेला व्यक्ती कधी निघून जातो असे घरच्या व्यक्तीला वाटत असते, अशा परिस्थितीत या अनोळख्या भाटांना कोण घरात घेईल, तेही मुक्कामी? शक्यच नाही! त्यामुळे या मंडळींना आता कुणी घरी घेईनासे झाले… याचमुळे भाट बांधव कोणाकडेही येईनासे झाले. ते हद्दपार झाले. मात्र याही परिस्थितीत काही मोजके भाट बांधव फक्त माहिती देण्यापुरते संबंधित कुटुंबाकडे जातात, आणि माहिती वगैरे दिल्यावर गावातील धर्मशाळेत वा मंदिरात मुक्काम करतात. खरं तर माहितीचा हा ‘खज‌िना आपल्या पुर्वजांच्या इतिहासाचा ‘लेखा-जोखा’, आपणच ठोकरला, अस म्हटल्यास चूक ठरू नये. त्यामुळे भाट तर कालबाह्य झाले, परंतु आपण आपले पूर्वज कोण होते? अथवा ते काय करायचे? इ. माहितीपासून आपन वंचीत राहिलो असे खेदान म्हणाव लागते.

भाटाचा ‘तो’ कोर्टाने पुरावा ग्राह्य मानला

यवतमाळ जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाची ही सत्यकथा, नगराध्यपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते, आणि ‌तत्कालीन नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गातील अर्थात मराठा असल्याची चर्चा गावात होती. त्यामुळे पराभूत झालेल्या एका उमेदवाराने याविरुद्ध कोर्टात याच‌िका सादर केली. मात्र विराजमान नगराध्यक्षाने आपन ओबीसी (कुणबी) असल्याचे अनेक पुरावे सादर केले, त्यात त्यांनी त्यांच्या भाटाकडे जाऊन त्यांचे पूर्वज कोण होते, कोणत्या जातीचे होते वरैगेर माहिती काढली व कोर्टात सादर केली, तेव्हा कोर्टाने ही माहिती मान्य करून त्यांचे नगराध्यक्षपद कायम ठेवले होते. सदर खटला नागपूर उच्च न्यायालयामध्ये सन २००० साली चालला होता.

काळाच्या ओघात भाट बांधव आता शिक्षणाकडे वळल्याचे दिसून येते. अगदी थोडा अपवाद वगळता भाट बांधवांची भटकंती आता थांबलेली दिसते. भाट बांधवांनी टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांचे ‘रेकॉर्ड’ ठेवले, परंतु त्यांचा रेकॉर्ड मात्र शासन दरबारही नाही. भाट बांधवच आता आऊट ऑफ रेकॉर्ड झाले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. भावी पिढी मात्र एका रंजक आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाला मुकणार ही एक शोकांतिकाच म्हटली पाहिजे. असे असले तरी काही भाट बांधव आजही भटकत आहेत आणि घेत आहेत शोध भाकरीचा…!

………………………………………………………….

वंशावळी : एक ओळख

मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार

आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट – श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata

श्री. कैलास ब्रम्हभट (वंशावळ वाचणारे)

ते त्यांच्या वडिलांपासून असणारे हे काम सांभाळतात. आल्यानंतर चहापाणी झाला. अन त्यांनी आमची वंशावळी वाचायला सुरूवात केली. वंशावळ वाचण्याच्या आधी त्यांनी गणेश व इतर देवतांना वंदन केले अन मग एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचू लागले. कोण व्यक्ति कुठे होता, त्याला मुलगे किती, मुली किती, सुनबाई कोणत्या कुळातली, तिचे माहेरचे गाव कोणते आदी उल्लेख त्यात येत गेले. अगदी शंभर वर्षे च्या वरचा उल्लेख त्यात आला होता. नंतर नंतर जेव्हा पणजोबा, आजोबांचा उल्लेख त्यात आला तेव्हा ओळख पटायला लागली. एक प्रकारचा आपल्या कुळाचा इतीहासच होता तो. त्यानंतर त्यात आताच्या नविन पिढीची/ मुलांची नावे लिहील्या गेली. नंतर त्या पोथीची पुजा करून व दक्षिणा अन शिधा देवून समाप्ती झाली.

Vanshaval

वंशावळीतील एक पान

Vanshaval-2

वंशावळीतील एक पान

कैलास ब्रम्हभट यांच्याशी केलेल्या गप्पामधून बरीच माहिती मिळाली. कैलास यांचे पणजोबा/ आजोबा हेच काम करत असत. वंशावळीसच नामावळी किंवा वडलोपाजी असे म्हणतात. आता ते मध्यप्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राचा प्रदेश या वंशावळ वाचण्यासाठी सांभाळतात. जोडीने ते एका मोटरसायकल ने घरून दिवाळीनंतर निघतात अन जुन पर्यंत ते फिरत राहतात. एखाद्या गावात ते एखाद्या घरी राहतात अन मग त्या गावातल्या समाजबांधवांच्या घरी वंशावळी वाचत फिरतात. त्यानंतर जवळच्या गावात चक्क्कर असतो. असे जुन पर्यंत चालू असते. आमच्या घरचे वाचन संपल्यानंतर ते गल्लीतील दुसर्‍या समाजबांधवांकडे जाणार होते. त्यांचे नाव सांगितल्याबरोबर त्यानी ते कोठले, त्यांचे भाऊबंद कोण याचा उल्लेख बरोबर केला. प्रत्येक कुळाच्या वह्या स्वत्रंत्र असल्याने व शेजारच्यांच्या वह्या आणल्या नसल्याने त्यांच्याकडे वाचन होवू शकले नाही. पुर्वी मोटरगाडीने प्रवास व्हायचा पण आता मोटरसायकल घेवूनच प्रवास केला तर परवडतो. जुन नंतर ते परत राजस्थान (मदनगंज ता किशनगंज, जि अजमेर) ला जावून त्यांच्या स्व:ताचा इलेक्ट्रीकलचा व्यवसाय बघतात.

आता शहरात कुलवृत्तांत जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. कुलसंमेलने पण होतात.

जोशीकुलोत्पन्न खुप प्रमाणात असल्याने त्यांचा कुलवृत्तांत फारच मोठा असणार

प्रकाश घाटपांडे

घृष्णेश्वराच्या मंदीरात गेलो होतो तेव्हा उपाध्यांनी अशीच माहीती दिली होती ते आठवले.

आपले माहीती नसलेले नातेवाईक शोधून काढण्यास/आपल्या कुटुंबाची माहीती जपून ठेवण्यास आंतरजालाचा कसा उपयोग करता येईल याचा विचार करतो आहे.अशी काही माहीती असल्यास सुचवावे.

नाशिक येथेही असलीच वंशावळ १० व्या च्या वेळी तेथील ब्रांम्हणांकडे पहायला/ अद्यावत करायला मिळते. असलेच काही काशी येथेही असावे. अर्थात या ठिकाणी जो जातो त्याला हे पहायला भेटते.

परदेशातील बरेच जण आपल्या आडनावाची वेबसाईट बनवतात. आपल्याकडचा वंश फारच ‘मोठा’ (lengthy) असू शकल्याने असला प्रकार कोणी केला नसावा.

……………………………………………………..

माझ्या गावी देखिल अशा  जमाती होत्या त्यांना “हेळवी” म्हणत असत. हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय असे. हा एक प्रकारचा डेटाबेस आहे ज्याचा उपयोग मुख्यतः लग्नकार्य करताना मुलाचा / मुलीचा (वंश) इतिहास पहाणे हा असायचा. तेंव्हा पैसे घेत नसत तर ४/५ माप जोंधळे देऊन आजोबा हा इतिहास तपासत.

वंशावळ !!!

मला आमची घरीच लिहिलेली family tree diagramसापडली घरी बरीच जुनी पुराणी कागदपत्रे होती त्यामध्ये हि १.मी भाट लोकां साम्भार्धात काहीच नवते ऐकले.त्या वंश वृक्षा मुले मला बरेच नातेविक माहिती आहेत पण त्यांना काय सांगू कळत नाही.खरे तर आमच्या कॉलेज चे डिरेक्टर माझे दूर दूर चे नातेवाईक आहेत(नाते माझ्या वर ची ५ वि पिढी आणि त्याची वरची ३ री पिढी हे एकमेकांचे भाऊ).आता लास्ट सेम झाले कि त्यांना भेटणार आहे मी.काय बोलतील काहीही कल्पना नाही.

भावड्या लास्ट सेम नंतर भेटून काय उपेग? आताच भेटलास तर मार्कांना आन मास्तरांवर भाव मारायला कामात येईल. आता लगेच भेट भावा.

आत्ता भीती वाटते. ते हि शेवटी आमचेच रक्त!!! किती लोकांशी पंगे घेतलेत काय माहिती??लोक कदाचित माझ्या वर खुन्नस काढतील .

जमेल तिथे भाव मारतोच,आणि आत्ता भेट्लो अणि मार्क्स विचारले मन्जे फाटेल ना!

एक शंका आहे – या वंशावळी लिहिणाऱ्या किंवा वाचणार्या लोकांना एवढी सगळी माहिती कुठून मिळते? आणि कशासाठी ते हे करत असतील?

***********************************************************

एक शंका आहे – या वंशावळी लिहिणाऱ्या किंवा वाचणार्या लोकांना एवढी सगळी माहिती कुठून मिळते? आणि कशासाठी ते हे करत असतील?

आम्ही पण या लोकांना “हेळवी” म्हणतो. हा यांचा परंपरागत धंदा आहे. म्हणजे यांच्या जाती कडे थोडे थोडे वंश विभागुन दिले जातात. आपल्या वाडवडिलांची माहिती यांच्या वाडवडिलांनी लिहिली, अस प्रत्येक पिढीला ही माहीती गोळा करुन आपल्याला पुरवली जाते.यात खोटेपणाला फार कमी जागा असते असा माझा तरी अनुभव आहे.

अतिशय माहीतीपुर्ण लेख.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,

ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

धन्यवाद.

पण अशी माहिती काढताना ते आपल्याकडेच येतात कि डिटेक्टीवगिरी करतात ? म्हणजे एकाच नावाची २ पेक्षा जास्त माणसं असू शकतात…कोणाच कोण ते कसं शोधायचं? लोक आजकाल देश आणि विदेशात पांगलेले असताना हे कसे शक्य होते? आणि मुख्य म्हणजे त्यांना या सगळ्या उपद्व्यापाचा काय फायदा?

हे सगळे प्रश्न गंभीरपणे विचारलेले आहेत.

***********************************************************

गेल्या पिढीतील एका ज्येष्ठ विचारवंतांनी स्वतःच्या (ज्यात अनायसे आम्हीदेखिल आलो!) कुलाचा सुमारी चारशे वर्षांचा वंशवृक्ष (family tree) बनवला होता. पार सोळाव्या शतकापासून ते माझ्या आजोबांपर्यंतच्या सगळ्यांची नावे त्यात आहेत.

………………………………………………………….

वंशावळी सांगणाऱ्या भाट लोकांविषयी जास्त माहिती कुठे मिळेल?

नासिक येथे गंगेवर जिथे आपण घरातील कुणाच्या अस्थी घेऊन जातो तिथे त्याच्या विषयी माहिती मिळू शकते.

………………………………………………………….

भाट लोकांकडून वंशावळ कशी मिळवावी? त्यांच्याकडून मिळालेली वंशावळ खरंच विश्वसनीय असते का? —

आपल्या कुळाचे पूर्ववृत्त जाणणे आजमितीला अव्यावहारिक तथा निरुपयोगी वाटत असले तरीही भावनाप्रधान भारतीय संस्कृतीत पितृऋण फेडण्यार्थ कधी कधी आवश्यक असते. आपल्या घराण्याच्या इतिहासाचा आढावा घ्यायला सर्वप्रथम तर आपली वंशावळ ज्ञात असणे अनिवार्य असते. ही वंशावळ मिळवण्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक उपाय आहे भाटांचा.

भाट ही राजस्थानातील एक प्राचीन जात आहे जी शेतीची कामे आटोपून काही महिने देशाटन करायला निघतात आणि देशभरातील प्रदेशानुरूप वेगवेगळ्या लोकांच्या वंशावळी संकलित करून पिढीजात त्यांचा संग्रह करतात. ही भाट मंडळी आपापसात प्रांत वाटून घेऊन त्यानुसार या सर्व माहितीचा मोडी लिपीत आणि डिंगल भाषेत समुच्चय करत. जमवलेल्या माहितीस ते बाड म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली वंशावळ शोधण्याकरिता आपले चिटणीस बल्लाळ/बाळाजी आवजी चित्रे यांना उदयपुरला पाठवल्याचे सप्तप्रकारणात्मक बखरीत नमूद केलेले आहे. किशनगढचे भाट यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत आणि भाट लोक[1]

स्वातंत्र्योत्तर काळी भाट लोकांनी आपला हा पिढीजात व्यवसाय बंद केला होता जो सांप्रत पुनरपि सुरू केला आहे. आजकाल भाट लोक परत देशाटन करून लोकांचा वंशविस्तार नोंदवून घेतात. पूर्वी श्री एकनाथ वाघ सरांनी घरी येऊन भाट लोक कसे माहिती गोळा करतात यावर एक उत्कृष्ट उत्तर दिले होते जे मी खाली सामायिक करतो.

………………………………………………………….

मुलांना वंशाचा दिवा का म्हटले जाते?

मुलांना वंशाचा दिवा का म्हटले जाते, याबद्दल माझ्या अनुभवातून माहिती सांगत आहे. ही २००६ मधील घटना आहे. पत्नीची तब्येत ठीक नसल्याने दवाखान्यात ऍडमिट होती. मुले पण शाळेत गेली होती. सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान मी पत्नीला चहा नाश्ता देऊन घरी आलो. तेवढ्यात बाजूच्या इमारती मधील माझ्याच आडनावाचे एक गृहस्थ एका अनोळखी गृहस्थाला माझ्या कडे घेऊन आले. मला सांगितले, हे पुरणमल भाट (राजस्थान ) येथून आले आहेत, व तुमच्या ऐवजी चुकून माझ्या कडे आले ! मी एकटाच घरात होतो. नंतर त्या पुरणमल भाटांनी मी तुमची वंशावळ सांगण्यासाठी आलो आहे, तरी मला एक वेळचे भोजन आणि तुम्हाला वाटेल तशी दक्षिणा द्या. मला पण वंशावळ ऐकण्याची उत्सुकता होती. मग त्यांनी आपले बाड काढले, आणि मला वाघ आडनावतील माझे पंजोबांचे नाव विचारले , मी सांगितले , “श्री लक्ष्मण सावळाराम वाघ” . नंतर तो संदर्भ घेऊन त्यांनी आजोबा, आणि वडिलांचे नाव सांगितले. आजीचे माहेर, आजीचे मामा, आईचे नाव, आईचे मामा अशी माहिती सांगितली. वरील माहिती खरी होती. नंतर त्यांनी मागे जात – जात बरीच माहिती सांगितली. नंतर मला म्हणाले मुलगी किंवा मुलगा आहेत का ? मी सांगितले, मुले १०:३० ला शाळेतून येतील. फक्त १० मिनिटे बाकी आहेत. मी विचारले, ते कशाला पाहिजे, घरातील प्रमुख तर मीच आहे. तेव्हा त्यांनी सांगितले, आता तुमच्या मुळ वंशाची उत्पती ही भगवान शंकरापासुन झाली आहे. नागाई माता तुमचे कुलदैवी आहे. काल भैरव कुलदैवत आहे. तरी पुर्ण खात्री झाल्याने वंशावळीचे वाचन करायचे आहे. त्यासाठी दिवा लावा लागणार आहे. त्या दिव्याला वंशाचा दिवा म्हणतात. तो तुमची मुलगी किंवा मुलगा वंशांचा दिवा म्हणुन त्यांच्या हातून लावायचा असतो. लगेच १० मिनीटात मुले शाळेतून आली. नंतर मुलाच्या हातून तो वंशाचा दिवा लावला, आणि पुरणमल भाट यांनी कुलदेवी नागाई माता, कुलदैवत काल भैरव यांची प्रार्थना करून, पोथी स्वरूपात वंशावळ वाचायला सुरुवात केली ; “पुराण काळातील एक कथा आहे. काशीखंड प्रांतात एक तीलमल नावाचा व्यापारी रहात होता. तो शंकराचा निस्सीम भक्त होता. एकदा भक्तीने प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले …….” अशा प्रकारे वंशांच्या दिव्याकडून, वंशांचा दिवा लावुन, पुर्ण वंशावळ वाचली. थोडक्यात मुलगा किंवा मुलगी जे ते दिवा लावतील, त्यांना हे ब्रीद लागते. परंतु आता पर्यंत फक्त मुलगा हाच वंशाचा दिवा आहे, असा संभ्रम निर्माण झाला.

हे झाले भाट लोक घरी आल्यावर मिळणारे ज्ञान पण जर आपल्याला समोरून आपला वंशवेल जाणून घ्यायचा असेल तर काय ?

मी स्वतः आमच्या कुळाचा वंशवृक्ष जाणून घ्यायला मला माझ्या परिचित व्यक्तीकडून मिळालेल्या किशनगढच्या विजयकुमार नामक एका भाटाशी संपर्क केला ज्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांचे बाड आहे. हे विजयकुमार भाट अखिल भारतीय भाट संघटनेचे प्रमुख असून ते एखाद्या पुणेकराने बोलावे असे अस्खलित मराठीत बोलत होते जे बघून क्षणभर मी अक्षरशः अवाक झालो. विजयकुमार भाटांनी सांगितले की

प्रारंभी आपल्याला त्यांना ४,०००/५,००० ₹ द्यावे लागतात ज्याच्या बळावर ते मोडी लिपी आणि डिंगल भाषेच्या तज्ज्ञास नेमून आपली वंशावळ उपलब्ध आहे का हे बघतात, याचा तपास घेण्यासाठी आपल्याला त्यांना आपल्या काही पिढ्या, मूळ गाव, जात, गोत्र, देवक इत्यादि पैकी जी माहिती असेल ती द्यावी लागते. जर आपली वंशावळ सापडली नाही तर ते आपले द्रव्य आपल्याला परत करतात, परंतु जर वंशावळ सापडली तर मात्र ते राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी, मुद्रा असलेले प्रमाणपत्र बनवून देतात आणि तत्पश्चात उर्वरित निधी (५,०००-१०,००० ₹) आपल्याला त्यांना द्यावा लागतो.

इथे एक गोष्ट मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवावी की मानधन द्यायची पूर्ण सिद्धता असल्यासच या लोकांशी संपर्क करावा अथवा हे जमदग्नीचे अवतार आपले बाड नष्ट सुद्धा करू शकतात. व्यक्तिशः माझा अनुभव असा की ही सर्व पद्धत जाणून झाल्यावर मी त्यांना आठवड्याभराचा अवकाश मागितला असता त्यांनी तिसऱ्याच दिवशी मला निर्णय विचारला आणि तो अद्याप घेतलेला नाही हे कळताच त्यांनी माझे काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

विश्वसनीयतेसंदर्भात भाष्य करायचे झाल्यास माझ्या परिचितांना भाटांनी दिलेली त्यांची वंशावळ योग्य मिळाल्याचे त्यांनी ऐतिहासिक पत्रांवरून बनवलेल्या वंशावलीत शहानिशा करून मला सांगितले. परंतु अपेक्षित मानधन न मिळाल्यास हे भाट वंशावळीत फेरफार करतात असेही माझ्या ऐकण्यात आहे, याविषयी खात्रीपूर्वक ज्ञान मलाही नाही. तसेच एक विलक्षण गोष्ट अशी की हे भाट सगळ्या ब्राह्मणेतर समाजांच्या कथा कुठल्यातरी कपोलकल्पित राजांशी नेऊन जोडतात ज्यांना ऐतिहासिक, पौराणिक किंवा वैदिक आधार तस्सूभरही नसतो.

इत्यर्थ इच्छुक मान्यवरांनी भाटांशी उपरोल्लेखित सर्व गोष्टी लक्षात घेऊन सारासार विचार करूनच संपर्क साधावा.

………………………………………………………….

माझे अडनाव ‘वैद्य’ आहे. माझ्या वंशावळीची माहिती कुठे मिळेल? मला असे एकण्‍यात आहे की आम्‍ही मुळचे गोंदिया जिल्ह्यातील होतो परंतु नक्‍की माहित नाही. मागे एकदा नाशिकवरुन एक पत्र आले होते परंतु त्‍याकडे चुकून दूर्लक्ष झाले. कोणी मला मदत करू शकेल का? —

………………………………………………………….

लंडन संसदेत पुस्तक प्रकाशित करणारा पहिला भारतीय 3 वर्षे

आपणांस आपली जात गोत्र वैगरे माहीत असेल तर नाशिक व त्रंबकेश्वर येथे जे क्षेत्रपाल राहतात त्यांच्या कडे वंशावळी असतात तिथे फिरून चौकशी करा .नशीब चांगलं असेल तर तुमचा क्षेत्रपाल सापडला तर सर्व मिळून जाईल त्या आगोदर जास्तीत जास्त जेव्हढ्या पूर्वजांची नाव मिळत असतील तेव्हढी मिळवा .कारण खंडित झालेली नावांचा दुवा शोधण्यासाठी तुमच्या जवळ पण काही तरी माहिती असायला हवी.

संबंधित प्रश्न

माझी वंशावळ मला माहिती करून घ्यायची आहे. ती कोठे व कशी पाहायला मिळेल?

माझ्या माहितीप्रमाणे नाशिक येथे सर्व लोकांच्या वंशावळी असतात, त्याबद्दल माहिती मिळेल का?

वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा या पुढील वंशावळ सांगता येईल का?

माझ्या माहितीप्रमाणे नाशिक येथे सर्व लोकांच्या वंशावळी असतात, त्याबद्दल माहिती मिळेल का? —

………………………………………………………….

गंगघाटा वरील किंवा त्र्यंबकेश्वर येथील पुरोहिता कडे असलेल्या बाडात मिळू शकेल, पण तुम्हाला तुमच्या घराण्याचा पुरोहित शोधावा लागेल आणि ते काही फार कठीण काम नाही.

मात्र अगदी खात्रीशीरच (authenticate) पाहिजे असल्यास किशनगड, राजस्थान ला जावे. तेथे प्रत्येक हिंदू समाजाचे व जिल्हा प्रमाणे भाट आहेत. त्यांचेकडे संपुर्ण माहिती मिळेल.

माझ्या कुटूंबाची संपुर्ण वंशावळी मी त्यांचे कडून प्राप्त केली आहे. आता तर भाट सुध्दा टेक्नोसॅव्ही झाले आहेत. सर्व माहिती लॅपटाॅप वर ठेवतात.

तुम्हाला तुमची वंशावळ (फॅमिली ट्री) कितपत माहिती आहे? —

………………………………………………………….

वंशावळ सांगणाऱ्या हेळवी समाजाबद्दल माहिती देऊ शकता का? —

दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. आता हेळव्यांना या कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे आलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांना खुद्द भगवान शंकरांनी दिले!

चित्रस्रोत : खासरे .कॉम

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

चित्रस्रोत : खासरे .कॉम

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे.

प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मूळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे कूळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरू म्हणतात.

मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळ जवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे केंद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे केंद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर ; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते.

चित्रस्रोत : खासरे .कॉम

दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहवी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच राजस्थानातुन वंशावळ सांगायला येणारे भाट कमी झाले आहेत किंवा येत नाही, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा हेळव्यांनी हे काम आपल्याकडे घेऊन वंशावळी ची नोंद ठेवावी अशी अपेक्षा आहे.

स्रोत :-

वंशावळीचे जतन करणारा हेळवी/भाट समाजाबद्दल तुम्हाला हि माहिती आहे का? – Khaas Re

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज- प्रणव पाटील (मूळ लेख – त्रैमासिक ‘इतिहास शिक्षक’ .) दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला. हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज […]

हेळवी समाजाबद्दल यापूर्वी मराठी कोरा वर एकदा माहिती येऊन गेली आहे त्यानुसार हा समाज महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावातील कुटुंबांचे वंशावळ वंशावळीची नोंद ठेवतो हेळवी समाज गोकाक परिसरात राहतो

………………………………………………………….

वंशावळीचे दाखले कुठे मिळतील? —

मूलतः उत्तर दिले: वंशावलिचे दाखले कुठे मिळतील?

वंशावळी चा दाखला नसतो तो आपनच तयार करुन द्यायचा असतो आपले पुर्वजांची संपूर्ण माहिती जसे आपन वडील, आजोबा, पंजोबा, त्यांचे वडील खापर पणजोबा त्यांचे वडील या प्रमाने रक्तातील नातवाईक यांची माहिती आपल्याला आपलेच जुने मानसं देवु शकता गावाकडील जुनीजाणती माणसे यांच्याकडून आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते ती एकत्र करून आपला जातीचा दाखला तयार करू शकतो

………………………………………………………….

………………………………………………………….

माझे आडनाव ‘रेठे’ आहे, माझ्या आडनावाचे फक्त माझेच कुटुंब आहे, असे मला वाटते. या आडनावाबद्दल काही माहिती आहे काय? —

मूलतः उत्तर दिले: माझे आडनाव ‘रेठे’ आहे,माझ्या आडनावाचे फक्त माझेच कुटुंब आहे,असे मला वाटते. या आडनावाबद्दल काही माहिती आहे काय?

रेठे हे आडनाव महाराष्ट्रातील एक दुर्मिळ आडनाव आहे. हे आडनाव महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अधिक आढळते. रेठे हे आडनाव रत्ने म्हणजेच हिरे या शब्दापासून आले आहे. हे आडनाव रत्ने विकणाऱ्या किंवा रत्ने तयार करणाऱ्या लोकांनी घेतले असावे.

तुमच्या आडनावाचे फक्त तुमचेच कुटुंब आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर ते शक्य आहे. रेठे हे एक दुर्मिळ आडनाव असल्याने, तुमचे आडनाव घेतलेले इतर कुटुंब तुम्हाला माहित नसतील.

रेठे हे आडनाव असलेले काही प्रसिद्ध व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत:

डॉ. जयंत रेठे, भारतीय शास्त्रज्ञ

जयवंत रेठे, मराठी नाटककार आणि लेखक

सुधीर रेठे, मराठी गायक

तुमच्या आडनावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या सदस्यांशी किंवा तुमच्या गावातल्या जुन्या लोकांशी बोलू शकता.

अभिषेक किसनराव रेठे

मूलतः उत्तर दिले: माझे आडनाव ‘रेठे’ आहे,माझ्या आडनावाचे फक्त माझेच कुटुंब आहे,असे मला वाटते. या आडनावाबद्दल काही माहिती आहे काय?

रेठरे गाव,तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथे आहे.याच गावाच्या नावावरून तुमचे रेठे आडनाव झाले आहे. रेठरे गावात सहकारी व राष्ट्रीयकृत व्यावसायिक बैंका नाहीत.

खुप पुर्वी काही कृतीमुळे असे संबोधण्यात येत असे त्यावरुन पुढे तेच आढनाव म्हणून प्रचलित होवून राहत असेल आता आपल्याला ते नाव आवडत नसेल तर बदलता येईल.

………………………………………………………….

एकेकाळी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शकांचे वंशज अजूनही महाराष्ट्रात राहतात का? —

भारतावर खूप जुन्या काळापासून विविध आक्रमकांनी आक्रमण केलेले आहे

यामध्ये ग्रीक शक कुशाण इत्यादी लोकांचा समावेश होतो

काही काळानंतर ते लोक इथल्या संस्कृती शी एकरूप होऊन गेले

इथल्या लोकांशी रोटी बेटी संबंध होऊन ते आपल्यात मिसळून

गेले

आपल्यापैकी कुणीही त्यांचा वंशज असू शकतो

पण स्वतंत्र शक म्हणून भारतात कोणतीही जात धर्म किंवा पंथ सद्या सापडत नाही..

(चंगेज खान चे वंशज संपुर्ण आशिया खंडात पसरले आहेत..)

………………………………………………………….

………………………………………………………….

चाफेकर बंधूचे वंशज आहेत का? —

चापेकर हे त्यांचे आडणाव आहे. चापेकरांच्या जन्मशताब्दी च्या कार्येक्रमासाठी त्याचे ७०-८० वर्ष वयाचे नातु / पणतु चिंचवड ला आले होते.

देशहितासाठी एक अख्खी पिढी देणाऱ्या चापेकरांच्या वारसदाराने देशाच्या / समाजाच्या उपयोगी काम कुणी करणार असेल तर मी अजूनही काही जमिन दान करेन ही घोषणा त्यांनी केलेली आठवते.

………………………………………………………….

मला आमच्या “डोके” या आडनांचा संपुर्ण इतिहास, वंशावळ याची माहिती पाहिजे. मी हे पंधरा वर्षापासुन शोधत आहे. पण काहीच संदर्भ मिळत नाहीत. माहिती कुठे मिळेल?

वंशावळ समाजाचे’ उपाध्ये (भाट)यांचे कडे असते. प्रतेक समाजाचे वंशावळीचे बाड जतन करून ते वेळोवेळी अपडेट करण्यासाठी घरोघर ५ ते दहा वर्षातून येत असतात.घरातील जुन्या जेष्ठ व्यक्तीस हे सांगता येईल.तुम्ही नोकरीचे धंद्या निमित्ताने मुळ गावी रहात नसल्याने किंवा तुम्हाला तुमचे मूळगाव माहित नसल्याने कदाचित हे समस्या भेडसावत असावी.

डोके आडनावाचे लोक जुन्नर तालुक्यात आळे इथे जास्त प्रमाणात वास्त्व्यास आहे.त्या गावात डोके बहु संखेने असावेत . मुख्य व्यवसाय शेती असून पुणे मुंबई व स्थानिक ठिकाणी सुधा शेती बरोबर उद्योग व्यापारात आहे. काही लोक नोकरी निमित्ताने हि मुंबई पुणे इथे स्थाईक झाले आहेत.जुन्नर तालुक्यात कुमशेत ,निरगुडे ,ओतूर ,बेलसर,जुन्नर उदापूर,या सारख्या गावात हि काही प्रमाणात वास्तव्य करून आहे.

आळे गावातून नगर जिल्ह्यात काही भागात शेती व्यवसाया (शेत मजुरी) निमित्त स्थाईक झालेले डोके यांना नावाचे अपभ्रंशमुळे डोखे नावाने ओळखले जाते.आता पर्यंत डोके व डोखे आडनाव माळी समाजात असल्याचे दिसून येते .

पाटील ही जात आहे की उपाधी? —

पनवेल येथे राहतात (2016–सध्या)1 व

पाटील, ठाकूर, नाईक, सरनाईक, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे ही सगळी पदे आहेत. ह्या आडनावांचे लोक कोणत्याची जातीचे असू शकतात.

आमच्या कॉलेजात आगरी, कोळी, ९६ कुळी मराठा, आणि कुणबी अश्या विविध जातीचे लोक पाटील आडनाव वापरायचे.

माझ्या आधीच्या पिढींची माहिती, वंशावळ कुठे मिळेल?

मूलतः उत्तर दिले: माझ्या आधीच्या पीढींची माहिती (वंशावळ) कुठे मिळेल?

माझ्या माहिती नुसार राजस्थान मधील भाट लोक ही माहिती संकलीत करून, त्या माहीतीला “बाड” असे म्हणतात.

ही २००६ मधील घटना आहे. पत्नीची तब्येत ठीक नसल्याने दवाखान्यात ऍडमिट होती. मुले पण शाळेत गेली होती.

सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान मी पत्नीला चहा नाश्ता देऊन घरी आलो.

तेवढ्यात बाजूच्या इमारती मधील माझ्याच आडनावाचे एक गृहस्थ एका अनोळखी गृहस्थाला माझ्या कडे घेऊन आले. मला सांगितले, हे पुरणमल भाट (राजस्थान ) येथून आले आहेत, व तुमच्या ऐवजी चुकून माझ्या कडे आले !

मी एकटाच घरात होतो. नंतर त्या पुरणमल भाटांनी मी तुमची वंशावळ सांगण्यासाठी आलो आहे, तरी मला एक वेळचे भोजन आणि तुम्हाला वाटेल तशी दक्षिणा द्या.

मला पण वंशावळ ऐकण्याची उत्सुकता होती.

मग त्यांनी आपले बाड काढले, आणि मला वाघ आडनावतील माझे पंजोबांचे नाव विचारले , मी सांगितले , “श्री लक्ष्मण सावळाराम वाघ” .

नंतर तो संदर्भ घेऊन त्यांनी आजोबा, आणि वडिलांचे नाव सांगितले. आजीचे माहेर, आजीचे मामा, आईचे नाव, आईचे मामा अशी माहिती सांगितली.

वरील माहिती खरी होती. नंतर त्यांनी मागे जात – जात बरीच माहिती सांगितली. नंतर मला म्हणाले मुलगी किंवा मुलगा आहेत का ?

मी सांगितले, मुले १०:३० ला शाळेतून येतील. फक्त १० मिनिटे बाकी आहेत.

मी विचारले, ते कशाला पाहिजे, घरातील प्रमुख तर मीच आहे.

तेव्हा त्यांनी सांगितले, आता तुमच्या मुळ वंशाची उत्पती ही भगवान शंकरापासुन झाली आहे. नागाई माता तुमचे कुलदैवी आहे. काल भैरव कुलदैवत आहे. तरी पुर्ण खात्री झाल्याने वंशावळीचे वाचन करायचे आहे. त्यासाठी दिवा लावा लागणार आहे. त्या दिव्याला वंशाचा दिवा म्हणतात. तो तुमची मुलगी किंवा मुलगा वंशांचा दिवा म्हणुन त्यांच्या हातून लावायचा असतो.

लगेच १० मिनीटात मुले शाळेतून आली. नंतर मुलाच्या हातून तो वंशाचा दिवा लावला, आणि पुरणमल भाट यांनी कुलदेवी नागाई माता, कुलदैवत काल भैरव यांची प्रार्थना करून, पोथी स्वरूपात वंशावळ वाचायला सुरुवात केली ;

“पुराण काळातील एक कथा आहे. काशीखंड प्रांतात एक तीलमल नावाचा व्यापारी रहात होता. तो शंकराचा निस्सीम भक्त होता. एकदा भक्तीने प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले …….”

अशा प्रकारे वंशांच्या दिव्याकडून, वंशांचा दिवा लावुन, पुर्ण वंशावळ वाचली. अशा प्रकारे आमच्या कुळाची वंशावळ राजस्थानातील भाट लोकांकडे आज पण आहे.

वंशावळ कुठे मिळेल ….

आता इतर काही अनुभवी लोक सांगतात की, वाराणशी, गया, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पण असे वंशावळीचा लेखा -जोखा सांभाळणारे पुरोहित आहे. तरी काही संदर्भ असल्यास वरील ठिकाणी वंशावळ मिळण्याची शक्यता आहे.

मला आमच्या देशमुख कुटुंबाची वंशावळ मिळवायची असल्यास ती कुठे मिळेल? चे

नाशिक किंवा त्रंबकेश्वर ला शोधा तिथे नक्की मिळेल.पण आपणांस निदान मूळ गाव ,गोत्र,थोडी फार वाडवडिलांची नाव माहीत हवीत .

जन्म म्रत्यु नोंद कार्यालयात अर्ज करून पहा व जसा एखाद्या जमिनीच्या नोंदीचा सर्च रिपोर्ट मिळवता येतो तश्याच प्रकार चा विनंती अर्ज करून स्वतः च्या वडिलांचे त्यांच्या वडिलांचे वडिलांचे असे करत जिथं पर्यत जाता येईल तिथ पर्यंतची माहिती मिळवणे शक्य आहे.

मला कुलकर्णी कुळाचा इतिहास हवा आहे किंवा वंशावळीचा माहिती हवी आहे. कोणी देईल का? —

मूलतः उत्तर दिले: मला कुलकर्णी कुळाचा इतिहास हवा आहे किंवा वंशवेल माहिती हवी आहे कोणी देईल काय?

कुलकर्णी कुळ एकच नाही।

माझ्या अंदाजाप्रमाणे कमीतकमी 100 हुन जास्त मूळची कुलकर्णी कुळे असतील।

मुळात कुलकर्णी हे आडनाव नसून ही पदवी किंवा हे एक अधिकारी पद होते ते अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी पण अस्तित्वात होते।

जे प्रत्येक गावाचा शेती आणि शेतसाऱ्याचा हिशोब ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी असत त्याना कुलकर्णी म्हणत असत।

त्यांचे गोत्र कुळ वेगवेगळे असत असे।

म्हणून नेमक्या तुमच्या कुळापूरते हवे असेल तर नाशिक इत्यादी तीर्थक्षेत्र ठिकाणी काही लोक अशी वंशावळ नमूद करून ठेवत असत। मुळात हा त्यांचा व्यवसाय च आहे। हेच वाराणसी, प्रयागराज किंवा त्रिम्बकेश्वर अशा जागी असत।

तिथे जाऊन चौकशी केल्यास कळू शकेल।

संपूर्ण-माहिती-पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading