आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

44. गोत्र किती आहेत ? 96 कुली मराठा
How many gotras are there?
Gotra Ktiti Aahet ?
96 कुळी मराठा समाजात गोत्रांची संख्या 96 नाही.
तुमचा प्रश्न खूप सामान्य आहे आणि अनेकांना याबद्दल संभ्रम असतो. तो दूर करणे महत्त्वाचे आहे.
फरक समजून घ्या:
- ९६ कुळी (96 Kulas): ‘९६’ हा आकडा मराठा समाजातील प्रमुख कुळांचा (Clans/Surnames) आहे. कुळ म्हणजे तुमचे आडनाव (उदा. जाधव, मोरे, पवार, शिंदे, भोसले इत्यादी).
- गोत्र (Gotra): गोत्र हे एका ऋषींच्या नावाने चालत आलेले वंश/वंशावळ आहे. एकाच गोत्रामध्ये अनेक कुळे असू शकतात. गोत्र हे कुळापेक्षा मोठे आणि व्यापक आहे.
तर गोत्र किती आहेत?
मराठ्यांच्या एकूण 64 गोत्रांपैकी पुढील 28 गोत्र 96 कुळी मराठ्यांच्या वाट्याला आली आहेत,
एकाच गोत्रात अनेक कुळे येतात.
सूर्यवंश, चंद्रवंश, शेषवंश उर्फ नागवंश, आणि ब्रम्हवंश उर्फ यदुवंश, उर्फ हरिवंश या क्षत्री अंशात सुप्रसिद्ध ऋषी व मंत्र उर्फ यदुवंश उर्फ हरिवंश, या क्षत्रिय वंशात सुप्रसिद्ध ऋषी व मंत्रद्रष्टे म्हणजे वेद मंत्र रचनारे ऋषी होऊन गेलेत त्यांच्या नावावरून त्या वंशाची गोत्रे चालू झाली,
गोत्र ऋषी म्हणजे कुळाचा मूळ ऋषी होय, प्रवर म्हणजे ज्यांनी ऋग्वेदातील सूक्ते रचिली व त्या सुक्तांनी अग्नीची स्तुती केली असे गोत्र ऋषींचे वंशज त्या कुळांचे पूर्वज.
बहुदा वेकाळापासून आज सुमारे हजारो वर्षांपेक्षा म्हणजे भरत काळाच्या पूर्वीपासून क्षत्रियांनी आपल्या वंश उत्पत्तीची स्मृती कायम ठेवली व तसे कायम वागत गेले हे आश्चर्यच आहे.
कोणत्याही धर्म कृत्यास जसे लग्न श्राद्ध, पूजा, संकल्प, तर्पण, तिलांजली, उत्तर क्रिया इत्यादी जसे लग्न श्राद्ध पक्ष उत्तर क्रिया इत्यादी आरंभ करण्यापूर्वी आपल्या गोत्राचा उच्चार करून पूर्वजांचे पुण्यस्मरण करून धर्मकार्य आरंभ करतात,
गोत्र बहुतेक क्षत्रिय आहेत पण भृगु, वशिष्ठ, व वाल्मिकी, वगैरे ब्राह्मण गोत्रे आहेत.
बरेच क्षत्रीय ऋषी अग्निहोम करत असल्यामुळे त्यांच्या समावेश ब्राह्मण गोत्रात झाला. तरी पुरातन काळी ब्राह्मण व क्षत्रीय मधील मध्य रेषा फार पातळ असल्यामुळे बरेच क्षेत्रीय ऋषी अग्निहोम करत असल्यामुळे त्यांच्या समावेश ब्राह्मण गोत्रात झाला तरी पुरातन काळी ब्राह्मण व क्षेत्रीय मधील मध्य रेषा फार पातळ असल्यामुळे त्यांची आपसात खूप आदलाबदल होण्याची शक्यता आहे गोत्र आणि प्रवर ऋषींची विवरण खालील प्रमाणे आहे
| 64 GOTRA | LIST |
|---|---|
| 1. अगस्त्य 2. अगस्ती 3. अगस्तीय 4. अत्री 5. अत्रेय 6. अनावृकाक्षा 7. अलव्यायम 8. अव्य 9. कण्व 10. कपिल 11. कांचन 12. काण्वायन 13. कात्यायन 14. काश्यप 15. कुत्स 16. कुशिक 17. कृष्णात्रीय 18. कौंडिन्य 19. कौशिक 20. गर्ग 21. गौतम 22. जमदग्नी 23. जैमिनी 24. दुर्वासा 25. धृतकौशिक 26. नारद 27. पाराशर 28. पुर्तीमास 29. पुलस्त्य 30. प्रल्हाद 31. बकदाल्भ्य 32. बृहस्पती | 33. भारद्वाज 34 मंकिम 35. मांडव्य 36. मानव्य 37. मार्कंडेय 38. माल्यवंत 39. मुद्गल 40. याज्ञवल्क्य 41. रोहित 42. लोमश 43. वत्स 44. वशिष्ठ 45. वाजपेयी 46. वासुकी 47. विश्वामित्र 48. विश्वावसु 49. विष्णू 50. वैजवाप-वाजपेयी 51. व्याघ्रप 52. व्याघ्रपाद 53. व्यास 54. शक्ती 55. शांडिल्य 56. वृद्धी 57. शुनक. 58. शोपायन 59. शौकलीन 60. शौनक 61. शौनल्य 62. सांकृत्य 63. सावर्णी 64. हरित |
या 64 गोत्रांपैकी पुढील २८ गोत्र 96 कुळी मराठ्यांच्या मध्ये मराठ्यांच्या वाट्याला 28 गोत्रे आली आहेत, त्याचा वापर 96 कुळी लोक अर्थात मराठा समाजातील लोक व्यवहारात चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे जगातील सर्वात पवित्र (क्लीन) ही मराठा समजल्या जाते.
| 1. अगस्ती 2. अत्री 3. कपिल 4. काश्यप 5. कौंडिन्य 6. कौशिक 7. गर्ग 8. गौतम 9. जमदग्नी 10. दुर्वासा 11. पाराशर 12. भारद्वाज 13. मांडव्य 14. मानव्य | 15. मार्कंडेय 16. माल्यवंत 17. याज्ञवल्क्य 18. लोमश 19. वत्स 20. वशिष्ठ 21. वाजपेयी 22. विश्वामित्र 23. विश्वावसु 24. विष्णू 25. वैजवाप-वाजपेयी 26. शांडिल्य 27. शौनल्य 28. शौनक |
- थोडक्यात:
९६ कुळी मराठा समाजात ९६ कुळे (आडनावे) आहेत, परंतु गोत्रांची संख्या १० ते १५ च्या आसपास आहे. प्रत्येक कुळाचे एक विशिष्ट गोत्र असते आणि अनेक कुळांचे गोत्र एकच असू शकते
संपूर्ण-माहिती-पहा
संबंधित पोस्ट पाहा.
धनंजय महाराज मोरे
9422938199















