आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२६ नोव्हेंबर, दिवस ३३० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०२६ ते १०५०+ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९४९ ते ३९६०
“२६ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २६ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२६ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०२६ ते १०५०,
1026-18
अशनाचेनि पावके । हारपता प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटके । अशन करी ॥1026॥
जठराग्नि शांत असला (क्षधा निवारण झाली) म्हणजे प्राणांचे रक्षण किंवा समाधान असते इतक्याच बेताने त्याचा आहार असतो. 26
1027-18
आणि परपुरुषे कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसे ॥1027॥
(यतवाक्कायमानसः) आणि परपुरुषाने इच्छा दर्शविली असता कुलवधू जशी त्यास केव्हांही वश होत नाही, तसे ज्याचे आसन (बैठक) निद्रा व आलस्य यांच्या केव्हांही ताब्यात जात नाही. 27
1028-18
दंडवताचेनि प्रसंगे । भुयी हन अंग लागे । वाचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥1028॥
नमस्कार करण्याच्या प्रसंगींच (साष्टांग) ज्याचे शरीर भुईला लागते; एऱ्हवी वाटेल त्या प्रसंगी अविचाराने जो कधीही आडवा होत नाही. 28
1029-18
देहनिर्वाहापुरते । राहाटवी हातांपायाते । किंबहुना आपैते । सबाह्य केले ॥1029॥
देहधारण अथवा निर्वाह ह्यांना आवश्यक इतकाच हातापायांचा करितो किंबहुना कमेंद्रिये, मन आदि सर्व त्याने स्वाधीन ठेविली आहेत. 29
1030-18
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखो नेदी वीरा । तेथ के वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥1030॥
आणि अर्जुना, ज्याच्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही (हद्दीपर्यंतही) येण्याची बोली नाही, (सोय) तेथे बोलणे चालणे वगैरे व्यापारांन अवकाश कोठचा असणार ? 1030
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1031-18
ऐसेनि देह वाचा मानस । हे जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिले आकाश । ध्यानाचे तेणे ॥1031॥
(ध्यान) अशाप्रकारे शरीर, वाचा व मन ह्यांच्या बाह्य व्यापारांस जिंकून ज्याने ध्यान आपल्या स्वाधीन करून घेतले. 31
1032-18
गुरुवाक्ये उठविला । बोधी निश्चयो आपुला । न्याहाळी हाती घेतला । आरिसा जैसा ॥1032॥
गुरुवाक्योपदेशाने झालेला आत्मनिश्चय, आरशांत मुख पहावे त्याप्रमाणे, त्यांच्याच बोधवाक्यरूप आरशांत पडताळून पहातो. 32
1033-18
पै ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारी । ध्येयत्वे घे हे अवधारी । ध्यानरूढी गा ॥1033॥
ध्यान करणारा आपणच असूनही आपल्या ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयत्वाने आपल्याच पुढे घेतो, असा त्याच्या ध्यानाचा प्रकार असतो. 33
1034-18
तेथ ध्येय ध्यान ध्याता । यया तिही एकरूपता । होय तव पंडुसुता । कीजे ते गा ॥1034॥
ते ध्यान अर्जुना, ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या त्रिपुटीचा लय होऊन त्यांना एकरूपता येईतोपर्यंत ते करावे लागत. 34
1035-18
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानी जाला दक्षु । परी पुढा सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥1035॥
(योगपरः) म्हणून (अशाप्रकारच्या ध्यानसिद्धीसाठीं) तो आत्मज्ञाना विषयी दक्ष असणारा मुमुक्षु योगाभ्यासाचा आश्रय करितो. 35
1036-18
अपानरंध्रद्वया । माझारी धनंजया । पार्ष्णी पिडूनिया । कांवरुमूळ ॥1036॥
अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य, टांचेने दाबून मूळबंध करितो. 36
1037-18
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥1037॥
अधोभाग आकुंचन करून, व मूळबंधादि तिन्ही बंध देऊन, आणि प्राणापानादि निरनिराळे वायु एकत्र करून, 37
1038-18
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥1038॥
कुंडलिनी जागी करून, सुषुम्ना नाडीचा विकास करून, आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून ऊर्ध्व जातो 38
1039-18
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषे वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनिया ॥1039॥
मग ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलरूपी मेघांपासून अमृतवृष्टि होते, तो अमृतवर्षाव मूलाधारचक्रापर्यंत आणून, 39
1040-18
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरी । मनपवनाची खीच पुरी । वाढूनिया ॥1040॥
आज्ञाचक्ररूपी पर्वतावर संचार करणाच्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रांत मन व प्राण ह्यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून. 1040
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1041-18
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढा । ध्यान मागिलीकडा । स्वयंभ केले ॥1041॥
अशाप्रकारे हा योगसाधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्यायोगे ध्यान निश्चित करितो. 41
1042-18
आणि ध्यान योग दोन्ही । इये आत्मतत्वज्ञानी । पैठा होआवया निर्विघ्नी । आधीचि तेणे ॥1042॥
(वैराग्य) आणि ध्यान योग हे दोन्ही निविघ्नपणे आत्मतत्त्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या अगोदर, 42
1034-18
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवे चाले ॥1043॥
जो वैराग्यासारखा मित्र जोडून ठेविला असतो तो सर्व भूमिकांवर साधकाचा सांगाती असतो. 43
1044-18
पहावे दिसे तंववरी । दिठीते न संडी दीप जरी । तरी के आहे अवसरी । देखावया ॥1044॥
पहावयाची असलेली वस्तु दिसेपर्यंत जर दिव्याचे सहाय्य असेल तर ती वस्तु प्राप्त होण्यास कितीसा अवकाश लागणार ? 44
1045-18
तैसे मोक्षी प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मी जाय लया । तव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥1045॥
त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाच्या साधकाची वृत्ति ब्रह्मवस्तूमध्ये लय पावेपर्यंत तिला वैराग्याची जोड असेल, तर त्याच्या मोक्षप्राप्तीला प्रतिबंध कसला ? 45
1046-18
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥1046॥
म्हणून, जो भाग्यवान् वैराग्यासह ज्ञानाभ्यासाला लागला, तो आत्मलाभाला योग्य होतो. 46
1047-18
ऐसी वैराग्याची आंगी । बाणूनिया वज्रांगी । राजयोगतुरंगी । आरूढला ॥1047॥
असे वैराग्याचे मजबूत कवच अंगावर घेऊन जो राजयोगरूपी अश्वावर आरोहण करितो. 47
1048-18
वरी आड पडिले दिठी । साने थोर निवटी । ते बळी विवेकमुष्टी । ध्यानाचे खांडे ॥1048॥
शिवाय, जे दृश्य दृष्टीस पडेल, त्यातील लहान, थोर असा भेद निवारण करण्यासाठी विवेकरूप मुष्टींत ध्यानरूप तीक्ष्ण खड्ग घेतो. 48
1049-18
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारी सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागी ॥1049॥
ह्याप्रमाणे, अंधकारांत जसा सूर्याने प्रवेश करावा, तसा मोक्षरूपी विजयश्रीला माळ घालण्यासाठी हा साधक संसाररूपी रणांगणात (निःशंक) प्रवेश करितो. 49
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥18. 53॥
1050-18
तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजी पहिले । देहाहंकारु ॥1050॥
(अहंकार) तो अशा विश्वासाने चालला असता, त्याला अडविण्यासाठी जे दोषरूप शत्रू मध्ये आले, त्यांचा त्याने समाचार घेतला; त्यातील पहिला वैरी देहाहंकार हा होय. 1050
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३० वा. २६, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९४९ ते ३९६०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९४९
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥
विठोबाची वेडी आम्हा आनंदु सदा । गाऊ नाचो वाहु टाळी रंजवू गोविंदा ॥धृपद॥
सदा सन सांत आम्हा नित्य दिवाळी । आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥
तुका म्हणे नाही जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक हे तो आमुचे कवतुक ॥३॥
अर्थ
आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली आहे ज्या गोविंदाला श्रृती, नेती नेती म्हणत आहेत त्या गोविंदाची प्राप्ती आम्हाला झाली आहे. आम्ही विठोबाची वेडी मुले आहोत त्यामुळे आम्हाला नेहमी आनंदच आहे आम्ही विठोबाचे नाम गाऊ, त्याच्या आनंदात नाचू, नृत्य करु व टाळी वाजवून गोविंदाला रंजवू. आनंददायक दिवाळीसारखा सण आमच्याजवळ नेहमीच आहे अशा प्रकारे आमच्या ठिकाणी गोविंदाचा आनंद परिपूर्ण भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हाला जन्ममरणाचे भयच नाही संत सनकादिक हेच आमचे कौतुक आहेत. ”
1:14
अभंग क्र. ३९५०
विठ्ठल कीर्तनाचे अंती । जय जय हरी जे म्हणती ॥१॥
ते चि सुकृताचे फळ । वाचा रामनामे निखळ ॥धृपद॥
बैसोनि हरीकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥
तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवश्रम ॥३॥
अर्थ
विठ्ठलाच्या कीर्तनाच्या शेवटी जय जय हरी असे जे म्हणतात, तेच त्यांच्या सुकृताचे फळ आहे वाचेने ते केवळ रामनामच घेतात. हरीकथेला बसून चित्त सावध करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे असे वागतात “त्यांचा जन्म सफल झाला आणि त्यांचे भवश्रम नाहीसे झाले. ”
1:15
अभंग क्र. ३९५१
प्राणिया एक बीजमंत्र उच्चारी । प्रतिदिनी रामकृष्ण म्हणे का मुरारि ॥१॥
हेचि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे ॥धृपद॥
उपास पारणे न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाग्नितापणे ॥२॥
सुखाचे फुकाचे काही न वेचे भांडार । कोटीयज्ञांपरिस तुका म्हणे हे सार ॥३॥
अर्थ
हे प्राण्या तू प्रतिदिनी प्रत्येक दिवशी रामकृष्ण मुरारी या बीजमंत्राचाच उच्चार कर. हेच तुझ्या सर्व सिध्दीचे साधन आहे वाचेने गोपाळाचे नामस्मरण सतत करत राहावे. या व्यतिरिक्त उपास पारणे किंवा वनात जाऊन रहाणे हे काहीही लागत नाही पंचाग्नीता तसेच धुम्रपान हे देखील काहीही करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे प्राण्या सुखाचे आणि फुकटचे असे, हरीचे नाम आहे त्या हरीनामाचा भांडार तुम्ही लुटा यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावे लागत नाही कोटी यज्ञापेक्षा सारभूत हरीचे एक नाम आहे. ”
1:15
अभंग क्र. ३९५२
न चलवे पंथ वचन नसता पालवी । शरीर विटंबिले वाटे भीक मागावी ॥१॥
न करी रे तैसे आपआपणा । नित्य राम राम तुम्ही सकळहि म्हणा ॥धृपद॥
राम म्हणविता रांडा पोरे निरविशी । पडसी यमा हाती जाचविती चौऱ्यांशी ॥२॥
मुखी नाही राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाही तया गंव्हारा ॥३॥
अर्थ
कोणत्याही गावाकडे मार्गस्थ असताना जर आपल्याजवळ वचनाचे गाठोडे नसेल तर आपल्याला मार्ग चालवणार नाही म्हणजे मार्ग चालत असताना कुणाला विचारल्याशिवाय आपल्याला हव्या त्या गावाकडे जाता येणार नाही आणि आपल्याजवळ जर आपली शिदोरी नसेल तर वाटेत आपली फजिती होऊन आपल्याला भीक मागावी लागेल. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या ठिकाणी असे करुन घेऊ नका म्हणजे तुम्ही जीवनमार्ग चालत असताना नुसते चालू नका तर मुखाने राम राम असे सर्वकाळ तुम्ही सर्वजण म्हणत राहा. एखादया मनुष्याला जर सांगितले की, तू राम राम स्मरण करत राहा तर तो म्हणतो की, आमच्या बायका पोरांचे पालनपोषण तुम्ही करा मग आम्ही राम राम असे म्हणू परंतु जर त्याने नामस्मरण जर केले नाही तर त्याला चौ-याऐंशी लक्ष योनीच्या फे-या जाचवतील. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या मुखामध्ये रामनाम स्मरण नाही तो आत्महत्यारा असून त्या गावंढळाला कोणत्याही प्रकारची लाज, लज्जा नाही. ”
1:15
अभंग क्र. ३९५३
थडियेसी निघता पाषाणांच्या सांगडी । बुडता मध्यभागी तेथे कोण घाली उडी ॥१॥
न करी रे तैसे आपआपणिया । पतंग जाय वाया जीवे ज्योती घालूनिया ॥धृपद॥
सावधपणे सोमवल वाटी भरोनिया प्याला । मरणा अंती वैद्य बोलावितो वहिला ॥२॥
तुका म्हणे करी रे ठायीचाचि विचार । जंवे नाही पातला यमाचा किंकर ॥३॥
अर्थ
पाषाणाच्या होडीची मदत घेऊन जर एखादा नदीमध्ये मध्यभागी जर बुडत असेल तर त्याच्यासाठी कोण उडी घालील ? अरे पतंग जसा दिव्यावर उडी घालून जीवानिशी जातो त्याप्रमाणे तू आपल्याविषयीच आपण घात करुन घेऊ नको. एखादा मनुष्य सावधपणामध्ये सोमल नावाचे विष वाटीभरुन प्याला आणि मरणाच्या वेळेस वैदयाला कोणी बोलवा रे असे म्हणून ओरडू लागला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जोपर्यंत यमाचे दूत तुझ्याजवळ आले नाहीत तोपर्यंतच तू तुझ्या हिताचा विचार कर. ”
1:15
अभंग क्र. ३९५४
शंख करिशी ज्याच्या नावे । त्याचे तुज नाही ठावे ।
ऐक सांगतो एका भावे । सापडे घरी ते जीवउनि खावे रे विठ्ठल ॥१॥
टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविले जग ।
पसरी हात नाही त्याग । दावी दगड पुजी भग रे विठ्ठल ॥२॥
राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ।
वासने हाती बांधवी नळी । त्यासि येउनि काळ गिळी उगळी रे विठ्ठल ॥३॥
कोण ते राहडीचे सुख । वरते पाय आरते मुख ।
करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकी परी न पळे चि मूर्ख रे विठ्ठल ॥४॥
सिकला फाक मारी हाका । रांडा पोरे मेळवी लोका ।
विटंबी शरीर मागे रुका । केले ते गेले अवघे चि फुका रे विठ्ठल ॥५॥
कळावे जना मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी ।
फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळी रे विठ्ठल ॥६॥
फुकट खेळे ठकली वाया । धरुनि सोंग बोडक्या डोया ।
शिवो नये ती अंतरी माया । संपादणीविण विटंबिली काया रे विठ्ठल ॥७॥
धुळी माती काही खेळो च नका । जवादी चंदन घ्यावा बुका ।
आपणा परिमळ आणिका लोका । मोलाची महिमा फजिती फुका रे विठ्ठल ॥८॥
बहुत दुःखी जालिया खेळे । अंगी बुद्धि नाहीत बळे ।
पाठीवरी तोबा तोंड काळे । रसना द्रवे उपस्थाच्या मुळे रे विठ्ठल ॥९॥
काय सांगतो ते ऐका तुका । मोडा खेळ काही अवगो च नका ।
चला जेवू आधी पोटी लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका रे विठ्ठल ॥१०॥
अर्थ
ज्याच्या नावाने तू शंख करत आहे त्या विठ्ठलाच्या बाबतीत तुला काहीच माहिती नाही. त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगतो तू ती भक्तिभावपूर्वक ऐक तुझ्या घरामध्ये दैववशाने जे काही अन्न शिजले असेल तुला जे काही अन्न साफडेल त्या�
1:15
अभंग क्र. ३९५५ (कावडे)
आहा आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।
ठेवुनि गुरुचरणी मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरीहरांचे पवाडे ॥१॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासे दासत्वे आगळी ।
पान्हेरीने मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥
जे या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जे पातळ ।
प्रेमामृत रसाळ । ते हे सेवा अहो भाग्याचेनु ॥३॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।
धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥
काळा घेऊ नेदी वाव । आला तो राखे घावडाव ।
शुद्ध सत्वी राखोनि भाव । म्हणा महादेव हरीहर वाणी गर्जो द्या ॥५॥
पराविया नारी माउली समान । परधनी बाटो नेदी मन ।
जीवित्व ते तृणासमान । स्वामिकाजी जाण शूर म्हणो तया आम्ही ॥६॥
शक्ति वेचाविया परउपकारा । खोटे खोट्याचा पसारा ।
सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतो ॥७॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरीजागर ।
पुण्य ते असे गाता नाचता बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे ॥८॥
संग संतांचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।
पंथ तो सुपंथे चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।
पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥
अर्थ
अरे भाईंनो प्रथम विनयकाला नमन करु आणि गुरचरणावर मस्तक ठेवू. मग प्रसादिक वाणीने हरीहराचे पोवाडे वर्णन करु. हरिदासाचेही दास्यत्व करायचे अशी माझी सर्वापेक्षा वेगळी ब्रीदावळी आहे. मार्गाने मार्गस्थ असलेल्या लोकासाठी मी कावडीमध्ये पाणी घेऊन मी त्यांना पाणी पाजत आहे म्हणजेच मी परमार्थरु
1:16
अभंग क्र. ३९५६
आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे सत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथी अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥१॥
यावे तेणे घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे ।
पात्र शुद्ध पाहिजे बरवे । मंगळभावे सकळ हर म्हणा रे ॥२॥
नव्हे हे काही मोकळे । साक्षी चौघांचिया वेगळे ।
नेदी नाचो मताचिया बळे । अणु अणोरणीया आगळे । महदि महदा साक्षित्वे हर म्हणा रे ॥३॥
हे हरी नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांति कल्पतरूची साउली । सकळा वर्णा सेविता भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरीदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदू शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शने ॥५॥
अर्थ
अरे भाईंनो सन्मार्गाने जाणा-या सर्व यात्रेकरुंसाठी आम्ही अन्नदानाचे छत्र घातले आहे आणि त्यांची तहान भागवण्यासाठी हरीभजनाच्या पाणपोया सर्वत्र आम्ही घातल्या आहे. जे सन्मार्गाने चालले आहेत त्यांच्यासाठीच आम्ही मार्गाने त्यांचे इच्छाभोजन पूर्ण करण्यासाठी हे कार्य केले आहे. ज्याला वाटत असेल त्याने यावे आणि त्याने याचा लाभ घ्यावा, सदाशिवाने कधीही संपणार नाही असे केले आहे. परंतु घेणा-याचे पात्र हे शुध्द आणि चांगले पाहिजे त्यासाठी मंगलकारक भक्तिभावांने सर्वानी हरहर असे म्हणा. हे नाम चार वेदांच्या साक्षीत्वाने असून त्यापासून ते वेगळे नाही. हे नाम कोणालाही आपआपल्या मताच्या बळाने नाचू देत नाही अणू रेणू यांच्या पोटात देखील ते साक्षीत्वाने आहे आणि महादाकाशमहतत्वाहून हे नाम श्रेष्ठ आहे त्यामुळे सर्वानी हरहर असे म्हणा. संपूर्ण जगाचे पोट भरेल इतकी या हरीनामाची आंबिली केली आहे. हे �
1:16
अभंग क्र. ३९५७
आहा आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कली क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥धृपद॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥२॥
विद्याबळे वाद करोनिया छळी । आणिकासि फळी मांडोनिया ॥३॥
गाविंचिया देवा नाही दंडवत । ब्राम्हण अतीत घडेचि ना ॥४॥
सर्वकाळ करि संताचिया निंदा । स्वप्नी ही गोविंदा आठवीना ॥५॥
खाचेमध्ये धन पोटासि बंधन । नेणे ऐसा दानधर्म काही ॥६॥
तुका म्हणे नटे दावुनिया सोंग । लवो नेदी अंग भक्तिभावे ॥७॥
अर्थ
हे माझ्या भाईंनो कलियुगामध्ये जे कोणी क्रियाहीन, भ्रष्टहीन आहेत त्यांचा उध्दार करण्याची मी ब्रीदावळी केली आहे. त्या पापी लोकांच्या तोंडावर थुंका म्हणजे ते चांगल्या मार्गाला लागतील आणि जे स्वत:चेच वर्णन व्यर्थ करतात त्यांना बाहेर घालवून दयावे. जो मनुष्य नेहमी बायकोच्या आधीन असतो आणि आई वडिलांविषयी उदास असतो, त्याच्या दारात एखादा भिकारी भीक मागण्यासाठी दारात आला तर त्या भिका-याला तो भीक घालत नाही. एखादी विद्या ग्रहण करुन गर्वापोटी काहीतरी पैंज लावून दुस-यांचा तो छळ करत असतो. हे लोक गावातील देवताला कधी नमस्कार करीत नाही, ब्राम्हण अतिथींना तर कधीही नमस्कार, सत्कार करत नाहीत. ते सर्व काळ संतांची निंदा करतात त्यांना स्वप्नात देखील गोविंदाची आठवण त्यांना येत नाही. जमवलेले धन जमिनीत पुरुन ठेवतो. पैसे खर्च होतील यासाठी तो पोटाला अन्न खाण्यासही टाळाटाळ करतो आणि दानधर्म म्हणजे काय आहे हे देखील त्यांना माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे लोक साधुसंतांचे स�
1:16
अभंग क्र. ३९५८
आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थपंथे चालती तयांसी । येती बोळवित त्यासी नमो ॥२॥
नमो तया संतवचनी विश्वास । नमो भावे दास्य गुरुचे त्या ॥३॥
नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्यवदे ॥४॥
नमो तया जाणे आणिकाचे सुखदुःख । राखे तहान भुक तया नमो ॥५॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियासि ॥६॥
तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथे सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
अर्थ
हे भाईंनो जे देहभावाविषयी उदासीन झाले आहे त्यांना नमस्कार करु आणि जे देवाला आळवित आहे त्यांना आपण नमस्कार करु. जे लोक तीर्थयात्रेच्या मार्गाने चालतात त्यांना नमस्कार करु आणि जे त्यांना वाटे लावण्यासाठी त्यांच्याबरोबर जातात त्यांनाही नमस्कार करु. ज्यांचा संतांच्या वचनावर विश्वास आहे त्यांनाही नमस्कार असो आणि भक्तिभावपूर्वक गुरुचे जे दास आहेत त्यांनाही नमस्कार असो. जे मातापितांचा सांभाळ करतात त्यांना नमस्कार असो आणि जे नेहमी सत्य बोलतात त्यांनाही नमस्कार असो. जे इतरांचे सुख दु:ख जाणून घेतात व त्यांना तहान भूकेची बाधा होऊ देत नाही त्यांना नमस्कार करो असो. जे पुण्यवंत नेहमी दुस-यावर परोपकार करतात त्यांना नमस्कार असो आणि ज्यांनी इंद्रियांचे दमन केले आहे त्यांना देखील नमस्कार असो. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासांच्या ठिकाणी माझा नमस्कार असो कारण त्यांच्या ठिकाणी माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे. ”
1:16
अभंग क्र. ३९५९
आहा आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पै गा । पाषाण म्हणो नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥
काठी म्हणो नये वेतु । अन्न म्हणो नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणो शब्द हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणे । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥
कूर्म नव्हे कासव । डुक्कर नव्हे वराह । ब्रम्ह नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोने नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाही नाही चर्मांआतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळे नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेने ॥९॥
गाव नव्हे द्वारावती । रणछोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शने ॥१०॥
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ॥११॥
अर्थ
हे भाईंनो गंगा ही इतर जळाप्रमाणे सामान्य नाही आणि वड व पिंपळ हे इतर वृक्षांप्रमाणे सामान्य नाही. तुळशी आणि रुद्राक्ष हे इतर माळेप्रमाणे नसून त्या इतरांपेक्षा श्रेष्ठ असून देवाच्याच विभूती आहेत. समुद्र हा नदयांसारखा नाही आणि महादेवाच्या लिंगाला पाषाण म्हणू नये. जगामध्ये संत हे इतर सामान्य मनुष्याप्रमाणे समजू नये ते श्रेष्ठ आहेत. वेताला सामान्य काठी म्हणू नये आणि सातूला सामान्य अ
1:16
अभंग क्र. ३९६० (सौरि, स्वैरिणी)
वेसन गेले निष्काम झाले नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांच्या फेरी ॥१॥
त्याचा वेध लागला छंद हरी गोविंद वेळोवेळा । आपुलेमागे हासत रागे सावले घालिती गळा ॥धृपद॥
जन वेषा भीते तोंडा आमुच्या भांडणा । कर कटी भीमा तटी पंढरीचा राणा ॥२॥
वेगळ्या याति पडिलो खंती अवघ्या एका भावे । टाकियेली चाड देहभाव जीवे शिवे ॥३॥
सकळांमधी आगळी बुद्धि तिची करू सेवा । वाया तुवा मुंडासवे भक्ति नाचो भावा ॥४॥
म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा । बहु झाले सुख कामे चुकलिया काजा ॥५॥
अर्थ
माझ्या संसाराचे व्यसन गेले त्यामुळे मी निष्काम झाले आता मी नरही नाही आणि नारीही नाही मी आपल्या घरदाराचा संबंध तोडून परपुरुषाची भेट घेतली आहे आणि संतांसारख्या सोयरनींच्या संगतीत मी राहू लागले आहे. मला त्या परपुरुषाचा वेध लागला आहे व त्यामुळेच त्याच्या छंदामध्ये मी वारंवार हरीगोविंद असे म्हणत असते. काही लोक हसत आमच्या मागे लागतात तर काही रागाने आमच्याकडे पाहातात कारण आम्ही हरीचे लुगडे नेसून त्याचा पदर खांदयावर घेतो. लोक आमच्या वेशभूषेला भितात आमच्या तोंडाला ते लागत नाही कारण आम्ही खूप भांडखोर आहोत म्हणून आम्ही ज्याच्याशी रत झालो आहोत तो पंढरीचा राणा कटेवर कर ठेवून भीमेच्या तटी उभा आहे. आता आम्ही परपुरुषाशी रत झालो त्यामुळे वेगळया जातीमध्ये आम्ही पडलो आहोत व त्याच्याशीच आम्ही एकनिष्ठ भक्तिभाव ठेवत आहोत त्यामुळे संसाराची खंत आमची नाहीशी झाली असून आम्ही देहभावाची आवड टाकून दिली आहे व आमचे जीवशीव ऐक्य झाले आहे. आता आमची बुध्दी सगळयापेक्षा �
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















