२१ ऑगस्ट, दिवस २३३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७८५ ते २७९६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२१ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २१ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २१ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७८५ ते २७९६ चे पारायण आपण करणार आहोत.
२१ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १०१ ते १२५

101-15
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरी घेती धाव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचे ॥101॥
शरीरातील त्वचेइंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्श रुपी अंकुर येतो. त्यावेळी नव्या नव्या विकारांची खुपच पुष्कळ वाढ होते.
102-15
पाठी रूपपत्र पालोवेली । चक्षु लांब ते कांडे घाली । ते वेळी व्यामोहता भली । पाल्हाळी जाय ॥102॥
ज्याप्रमाने पुढे रुप नावाचे पान फुटते. आणि मग डोळा हा भ्रमाने त्याची गोडी चाखण्यासाठी धाव घेत असतो.
103-15
आणि रसाचे आंगवसे । वाढता वेगे बहुवसे । जिव्हे आर्तीची असोसे । निघती बेंचे ॥103॥
आणि पाण्यापासुन तयार झालेल्या रसांच्या साली खुप वेगाने वाढत असतात. त्यावर जिभेच्या इच्छारुपी पानांचे पुष्कळ झुंबाडे निघत असतात.
104-15
तैसेचि कोंभैलेनि गंधे । घ्राणाची डिरी थांवु बांधे । तेथ तळु घे स्वानंदे । प्रलोभाचा ॥104॥
त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो.
105-15
एवं महदहंबुद्धि । मने महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासन्निजे ॥105॥
याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते.


106-15
किंबहुना इही आठे । आंगी हा अधिक फाटे । परी शिंपीचियेवढे उमटे । रुपे जेवी ॥106॥
फार काय सांगावे ? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु (हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही). जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते.
107-15
का समुद्राचेनि पैसारे । वरी तरंगता आसारे । तैसे ब्रह्मचि होय वृक्षाकारे । अज्ञानमूळ ॥107॥
अथवा समुद्रावर तयार होणार्‍या लाटा ज्याप्रमाने समुद्राएवढ्याच असतात. त्याप्रमाणे ब्रह्मच हे अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते.
108-15
आता याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपे स्वप्नी परिवारु । येकाकिया ॥108॥
अर्जुना संपुर्ण विक्ष्व हे अज्ञानाचा विस्तार असुन त्यावर त्याचा सर्व पसारा भासत आहे. ज्याप्रमाने स्वप्नात मनुष्य एकटा असुन जेवढे काही तो स्वप्न पाहतो.
ते सर्व आपणच होऊन जातो.
109-15
परी ते असो हे ऐसे । कावरे झाड उससे । यया महदादि आरवसे । अधोशाखा ॥109॥
परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्‍हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात.
110-15
आणि अश्वत्थु ऐसे ययाते । म्हणती जे जाणते । तेही परिस हो येथे । सांगिजेल ॥110॥
या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्य़ाचे कारण आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय ? तेही येथे सांगण्यात येईल, ऐक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


111-15
तरी श्व: म्हणिजे उखा । तोवरी एकसारिखा । नाही निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥111॥
तर क्ष्व: म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही. म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात.
112-15
जैसा न लोटता क्षणु । मेघु होय नानावर्णु । का विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥112॥
ज्याप्रमाने एक क्षण लोटला नाही तोच मेघ विविध रंगांचा होतो अथवा वीज ही निमिषभर देखील पुर्णपणे टिकत नाही.
113-15
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाही जळा । का चित्त जैसे व्याकुळा । माणुसाचे ॥113॥
ज्याप्रमाने कमळाच्या हालणार्‍या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते.
114-15
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययाते म्हणती । अश्वत्थु हा ॥114॥
त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात.
115-15
आणि अश्वत्थु येणे नांवे । पिंपळु म्हणती स्वभावे । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥115॥
आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही.


116-15
एऱ्हवी पिंपळु म्हणता विखी । मिया गति देखिली असे निकी । परी ते असो काय लौकिकी । हेतु काज ॥116॥
एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे ? भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे.
117-15
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥117॥
म्हणून आता या संसारवृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले जाते.
118-15
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥118॥
आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजेच नित्य या नावाने प्रसिद्ध आहे; परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे.
119-15
जैसा मेघांचेनि तोंडे । सिंधु एके आंगे काढे । आणि नदी येरीकडे । भरितचि असती ॥119॥
(संसारवृक्ष विनाशी असून याला अविनाशी का म्हणतात)
ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचे बाष्पिकरण होऊन वाफेद्वारे मेघाना जाऊन मिळतात. व तेच मेघ पाऊसाचा वर्षाव करुन नदीपाञात ओढे, नाल्या द्वारे ते नद्याना भेटुन त्या सर्व नद्दा पुन्हा समुद्रास जाऊन भेटतात.
120-15
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जव नुघडे । मेघा नदींची ॥120॥
त्याचप्रमाने तो समुद्र कमी होत नाही अथवा जास्त होत नाही, असा चारही बाजुंनी परिपूर्णच आहे, असे वाटते, परंतु त्याचे परिपूर्णत्व, जोपर्यंत मेघ आणी नदी यांचे उपसने आणि भरणे, हे स्वरुप स्पष्ट झालेले नाही. तेवढ्या पुरताच समुद्र भरलेला आहे असेच वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-15
ऐसे या रुखाचे होणे जाणे । न तर्के होतेनि वहिलेपणे । म्हणौनि ययाते लोकु म्हणे । अव्ययु हा ॥121॥
त्याप्रमाणे या संसारवृक्षाची वाढ व लय अति प्रचंड गतीने होत असल्यामुळे त्याचा तर्क करता येत नाही, म्हणून सामान्य लोक याला अविनाशी असे म्हणतात.
122-15
एऱ्हवी दानशीळु पुरुषु । वेचकपणेचि संचकु । तैसा व्ययेचि हा रुखु । अव्ययो गमे ॥122॥
ऐरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाशी असा भासतो.
123-15
जाता वेगे बहुवसे । न वचे का भूमी रुतले असे । रथाचे चक्र दिसे । जियापरी ॥12॥
ज्याप्रमाने रथाचे चाक अती वेगाने फिरत असताना देखील ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते.
124-15
तैसे काळातिक्रमे जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥124॥
त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसारवृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसारवृक्षास फुटतात.
125-15
परी येकी केधवा गेली । शाखाकोडी केधवा जाली । हे नेणवे जेवी उमलली । आषाढ अभ्रे ॥125॥
ज्याप्रमाने आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या हे कळत नाही

दिवस २३३ वा. २१, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७८५ ते २७९६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७८५
का जी आम्हा होते दोषाचे दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥धृपद॥
का जी आम्हावरी आणिकाची सत्ता । तुम्हासी असता जवळिके ॥२॥
तुका म्हणे पायी केले निवेदन । उचित ते दान करी सत्ता ॥३॥
अर्थ
देवा तुला आम्ही आमचा देहभान सर्व अर्पण केला तरी देखील आम्हाला लोकांमध्ये दोष का दिसत आहेत ? हे कृपाळू दयावंत पांडुरंगा सर्व सत्ता तू तुझ्या हातात तू धारण केले आहे. देवा आम्ही तुझ्या जवळ असून देखील आमच्यावर काळाची विकारांची सत्ता का चालते ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझी सर्व स्थिती तुझ्या पायाजवळ निवेदन केली आहे तरी तू तुझ्या सत्तेने जे योग्य मला देता येईल ते दान द्यावे.
अभंग क्र. २७८६
निंदावे हे जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
होते तैसे आले फळ । गेले निवडूनि सकळ ॥धृपद॥
दुसऱ्याच्या मता । मिळेनासे झाले चित्ता ॥२॥
तुका झाला सांडा । विटंबिती पोरे रांडा ॥३॥
अर्थ
लोकांनी माझी निंदा करावी असेच भाग्य माझ्या वाट्याला आले आहेत. जे फळ माझ्या प्रारब्धानुसार मला मिळणार होते ते माझ्या वाटेला आले आहे इतर सर्व फळे निवडून गेले आहे. माझे चित्त दुसऱ्याच्या मतांमध्ये मिळेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता इतका निरुपयोगी झालो आहे की रांडा पोरे देखील माझी विटंबना करीत आहेत.
अभंग क्र. २७८७
माझे माथा तुझा हात । तुझे पायी माझे चित्त ॥१॥
ऐसी पडियेली गाठी । शरीरसंबंधाची मिठी ॥धृपद॥
येरयेरांपाशी । सांपडोन गेलो ऐसी ॥२॥
तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या माथ्यावर तुझा हात आहे आणि तुझ्या पायावर माझे चित्त आहे. देवा अशा प्रकारे आपली गाठ पडली असून असा आपला शरीरसंबंध झाला आहे. अशाप्रकारे आपण एकमेकांजवळ एकमेकांना सापडलो गेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझी सेवा आहे आणि तुमची माझ्यावर कृपा आहे.
अभंग क्र. २७८८
सत्य त्यागाचि समान । नलगे वेचावे वचन ॥१॥
नारायणा ऐसे दास । येरयेरांचीच आस ॥धृपद॥
मळ नाही चित्ता । तेथे देवाचीच सत्ता ॥२॥
तुका म्हणे जाण । तेच भल्याचे वचन ॥३॥
अर्थ
सत्य हे त्यागाच्याच बरोबरीचे आहे यासाठी वेगळे काही शब्द वापरावे लागणार नाही. जे नारायणाचे दास झाले आहे त्यांना नारायणाची व नारायणाला त्यांची आवड निर्माण होते. ज्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकारांची पापाची विविध गुणाचा मळ नाही त्यांच्या चित्तामध्ये देवाचीच सत्ता असते. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि हेच वचन पूर्वी संतांनी सांगितलेले आहे हे तुम्ही समजून घ्यावे. ”
अभंग क्र. २७८९
माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे ते ॥१॥
सूत्रधारी तू हे सकळ चाळिता । कासया अनंता भार वाहो ॥धृपद॥
वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊ देहबुद्धीवरी नयों ॥२॥
तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतू पांडुरंग आवरूनि ॥३॥
अर्थ
देवा माझ्या बुध्दीचा आता उपाय खुंटला आहे तू काय करशील ते आता मी पाहाणार आहे. हे अनंता तू सर्व जगाचे सूत्र चालवणारा सूत्रधारी आहेस मग मी कशाला व्यर्थ भार वाहात राहू ? देवा मी आतापर्यंत जे काही संकल्प केले ते सिध्दीपर्यंत तर गेलेच नाही त्यामुळे मी आता देहबुध्दीवर येऊ नये हेच चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मला या संसारातील अनेक विकारांचे तरंग फार दु:खी करीत आहेत ते आता आवरुन पाडूरंगाचे चिंतन करु. ”
अभंग क्र. २७९०
देखिले ते धरिन मने । समाधाने राहेन ॥१॥
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥धृपद॥
बोळवीन एकसरे । उत्तरे या करुणेच्या ॥२॥
तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसील ॥३॥
अर्थ
देवा तुझे रुप मला एकदा की दिसले मग ते मी पाहीन माझ्या मनात ते कायमस्वरुपी धारण करीन आणि समाधानी राहीन. देवा तू जगज्जीवन आहेस तुझे ज्ञान होण्यासाठी माझ्या ह्दयामध्ये मी शुध्द भक्तीभावाने तुला साठवून धरीन. एकदा की देव सगुण साकार झाला की चांगल्या करुण गोड वचनाने संभाषण करीन व त्याला आळवीन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझ्या बापा पाडूरंगा तू सगुण साकार रुपात न येऊन नुसताच निर्गुण स्वरुपात काय करशीन ? ”
अभंग क्र. २७९१
वाया जाय ऐसा । आता उगवावा फासा ॥१॥
माझे परिसावे गाऱ्हाणे । सुखदुःखाची वचने ॥धृपद॥
हाचि आम्हा ठाव । पायी निरोपाया भाव ॥२॥
तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार ॥३॥
अर्थ
देवा ज्या भवसागराच्या पाशामध्ये मी वाया जाणार आहे तो पाशच तोडून टाक. देवा मी जी तुम्हाला सुखदु:खरुपी गाऱ्हाणे सांगणार आहे ते तुम्ही ऐकावे. देवा आमचा भक्तीभाव सांगण्याचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे तुमचे पाय. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्यापासूनच उत्पन्न झालो आहे त्यामुळे माझा सर्व योगक्षेमाचा भार तुझ्यावरच असणे हे साहाजिकच आहे. ”
अभंग क्र. २७९२
खादलेंच खावे वाटे । भेटले भेटे आवडी ॥१॥
वीट नाही पांडुरंगी । वाटे अंगी आर्त ते ॥धृपद॥
ह्रदयांची हाव पुरे । परि हे उरे चिंतन ॥२॥
तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढे ॥३॥
अर्थ
आवडीचे पदार्थ खाल्ले की पुन्हा खावेसे वाटते तसे आवडीचे मनुष्य सखे भेटले की ते पुन्हा भेटावेसे वाटते. त्याप्रमाणे पाडूरंगाचा कधीही वीट येत नाही उलट अंत:करणामध्ये त्याची आवड वाढतच जाते. पाडूरंगाची भेट झाली की सर्व इच्छा पूर्ण होतात परंतू त्याचे चिंतन करण्याची इच्छा ह्दयामध्ये मागे उरतच असते. तुकाराम महाराज म्हणतात, “पोट भरले तरी पुढे भूक शिल्लकच राहाते त्याप्रमाणे पाडूरंगाचे कितीही चिंतन केले तरी पुढे चिंतन करावेसेच वाटते. ”
अभंग क्र. २७९३
सत्य आठविता देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
न लगे काही करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥धृपद॥
भावे भाव राहे पायी । देव तै संनिध ॥२॥
तुका म्हणे कृष्णनामे । शीतळ प्रेमे सर्वासी ॥३॥
अर्थ
खरा भक्ती भाव मनात ठेवून देवाची आठवण केली तर कोणत्याही प्रकारचे भय असले तरी ते भय पळून जाते. मग आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही कारण देवाकडे सर्व सत्ता असतात. खऱ्या भक्तीभावाने देवाच्या पायाच्या ठिकाणी श्रध्दा ठेवली तर देव आपल्या सान्निध्यात राहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “कृष्ण नामाचा उच्चार केला की कायावाचामन हे शीतळ होऊन त्याला समाधान प्राप्त होते. ”
अभंग क्र. २७९४
ब्रीद ज्याचे जगदानी । तोचि मनी स्मरावा ॥१॥
सम पाय कर कटी । उभा तटी भींवरेच्या ॥धृपद॥
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवी जडोनि ॥२॥
तुका म्हणे भक्तिकाजा । धावे लाजा लवलाहे ॥३॥
अर्थ
जगाला दान देणे हे ज्याचे ब्रीद आहे त्याचेच मनात स्मरण करावे. असा तो श्रीविठ्ठल आपले दोन्हीही पाय समान ठेवून विटेवर आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. ज्याला पाहिल्यानंतर त्याचे रुपाचे लगेच तो आपल्याला वेध लावतो आणि जीवामध्ये जडून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि भक्तांच्या कामाकरता तो श्रीविठ्ठल सर्व लज्जा सोडून तात्काळ भक्तांकडे धावत जात असतो. ”
अभंग क्र. २७९५
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥
पाय चित्ती रूप डोळांच बैसले । चिंतने गोविले मुख सदा ॥धृपद॥
अवघियांचा झाला विसर हा मागे । वेध हा श्रीरंगे लावियेला ॥२॥
तुका म्हणे कानी आइकली मात । तोचि झाला घात जीवपणा ॥३॥
अर्थ
माझ्या मनाला एका हरीचीच आवड लागली आहे आणि त्याच्याशिवाय एक क्षण देखील माझे मन विसावा घेत नाही. हरीच्या पायाच्या ठिकाणी माझे चित्त आणि रुपाच्या ठिकाणी माझे डोळे गुंतले असून माझे मुख देखील त्याच्या चिंतनामध्येच सदा सर्वकाळ गोवले गेले आहे. या श्रीरंगाने मला त्याचे असे वेड लावले आहे की मी देहाने देहासंबंधीचे सर्व भोग विसरुन गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझ्या गुरुच्या मुखातून माझ्या कानामध्ये हरीच्या रुपाची किर्ती ऐकली आणि माझ्या जीवपणाचा (देह अभिमानाचा) घातच झाला आहे. ”
अभंग क्र. २७९६
याची कोठे लागली चट । बहु तट जालेसे ॥१॥
देवपिसी देवपिसी । मजऐसी जग म्हणे ॥धृपद॥
एकाताचे बाहेर आले । लपविले झाकेना ॥२॥
तुका म्हणे याचे भेटी । झाली तुटी आपल्यांसी ॥३॥
अर्थ
एक गोपी म्हणते या श्रीरंगाची चटक मला कोठून लागली हे मला काही कळत नाही परंतू यामुळे माझी बदनामी झाली आहे. मला सर्व जग देव वेडी देव वेडी असे म्हणत आहे. आजपर्यंत मी एकातात जी गोष्ट लपून ठेवली होती ती आता बाहेर आली आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा झाकण्याचा प्रयत्न केला तरी ती झाकल्या जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “या श्रीकृष्णाची आणि माझी भेट झाली आणि माझा देह व माझी ताटातूट झाली. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading