१७ ऑगस्ट, दिवस २२९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७३७ ते २७४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१७ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १७ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७३७ ते २७४८ चे पारायण आपण करणार आहोत.
१७ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १ ते २५ ,

॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ॥
अथ पञ्चदशोऽध्यायः अध्याय पंधरावा ॥
पुरुषोत्तमयोग ॥


अध्याय पंधरावा
1-15
आता हृदय हे आपुले । चौफाळुनिया भले । वरी बैसऊ पाउले । श्रीगुरूंची ॥15-1॥
( सद्गुरुस्तवन)
आता आपले अंत:करण शुद्ध करुन त्या चौरंगावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करु.
2-15
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी । भरूनिया पुष्पांजुळी । अर्घ्यु देवो ॥2॥
श्रीगुरू व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण कर्मेद्रिय- ज्ञानेद्रियरूपी फुलाच्या अनंत भावरुपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ.
3-15
अनन्योदके धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ॥3॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी एकनिष्ठ असलेली जी वासना, तेच जणुकाय चंदन आहे असु मानुन श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू.
4-15
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळूनि नूपरे । लेवऊ सुकुमारे । पदे तिये ॥4॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्‍यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार चरणकमलामध्ये घालू.
5-15
घणावली आवडी । अव्यभिचारे चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळिया ॥5॥
अनन्य भावाने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच जणु रणजोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या बोटात घालू.


6-15
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचे मुकुळ । ते उमलले अष्टदळ । ठेऊ वरी ॥6॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या चरणावरी वाहू.
7-15
तेथे अहं हा धूप जाळू । नाहं तेजे वोवाळू । सामरस्ये पोटाळू । निरंतर ॥7॥
देहादिकाचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ.
8-15
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊ श्रीगुरुचरण । करू भोगमोक्ष निंबलोण । पाया तया ॥8॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकु
9-15
इया श्रीगुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥9॥
ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होवो.
10-15
ब्रह्मीचे विसवणेवरी । उन्मेख लाहे उजरी । जे वाचेते इये करी । सुधासिंधु ॥10॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-15
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापे कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षराते ॥11॥
कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते.
12-15
सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ॥12॥
ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
13-15
नादब्रह्म खुजे । कैवल्यही तैसे न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणे दैवे ॥13॥
ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तसा (व्याख्यानासारखा) शोभत नाही
14-15.
श्रवणसुखाच्या मांडवी । विश्व भोगी माधवी । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥14॥
श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतुचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते.
15-15
ठावो न पवता जयाचा । मनेसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥15॥
ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन करता येते) हे केवढे आश्चर्य आहे ?


16-15
जे ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जे नागवे । ते अगोचर फावे । गोठीमाजी ॥16॥
जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते.
17-15
येवढे एक सौभग । वळघे वाचेचे आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जै का ॥17॥
गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते.
18-15
तरी बहु बोलू काई । आजि ते आनी ठाई । मातेवाचूनि नाही । ज्ञानदेवो म्हणे ॥18॥
तर या संबंधाने फार काय सांगू ? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्‍या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
19-15
जे तान्हेनि मिया अपत्ये । आणि माझे गुरु एकलौते । म्हणौनि कृपेसि एकहाते । जाले तिये ॥19॥
कारण की मी श्रीगुरूचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. (म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे). म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो.
20-15
पाहा पा सरोवरी आघवी । मेघ चातकासी रिचवी । मजलागी गोसावी । तैसे केले ॥20॥
पहा चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-15
म्हणौनि रिकामे तोंड । करू गेले बडबड । की गीता ऐसे गोड । आतुडले ॥21॥
म्हणून माझे रिकामे, शास्त्र वगैरे न शिकलेले, तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले.
22-15
होय अदृष्ट आपैते । तै वाळूचि रत्ने परते । उजू आयुष्य तै मारिते । लोभु करी ॥22॥
दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.
23-15
आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥23॥
श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात.
24-15
तयापरी श्रीगुरु । करिती जै अंगीकारु । तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥24॥
त्याप्रमाणे श्रीगुरू जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते.
25-15
पाहा पा श्रीनारायणे । तया पांडवाचे उणे । कीजेचि ना पुराणे । विश्ववंद्ये ? ॥25॥
गुरुस्तवनांतर्गत श्रीकृष्ण स्तवन असे पहा की त्या
पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्यांची (त्या पांडवांच्या वैगुण्यांची) पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय ?

दिवस २२९ वा. १७, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७३७ ते २७४८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७३७
न करी रे मना काहीच कल्पना । चिंती या चरणा विठोबाच्या ॥१॥
येथे सुखाचिया अमुपची रासी । पुढे कल्पनेसी ठाव नाही ॥धृपद॥
सुखाचे ओचिले साजिरे श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाही ॥२॥
तुका म्हणे येथे होईल विसावा । तुटतील धावा पुढिलिया ॥३॥
अर्थ
हे मना तू कोणत्याही प्रकारच्या कल्पना करु नकोस केवळ या विठोबाचे चरणाचे चिंतन कर. अरे मना या विठोबाच्या चरणाजवळ अमूप सुखाच्या राशी आहेत आणि सुखाच्या राशीपुढे कोणत्याही कल्पनेला ठावच राहणार नाही. या विठोबाचे श्रीमुख म्हणजे सुखाचे उरलेले साजिरे स्वरुपच आहे आणि ते स्वरुप पाहिले की शोक मोह दु:ख हे नाश पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मना विठोबाच्या चरणाजवळच तुला विसावा मिळेल आणि जन्ममरणाचे पुढे धावाच तुटून जातीन. ”
अभंग क्र. २७३८
काय करू मज नागविले आळसे । बहुत या सोसे पीडा केली ॥१॥
हिरोनिया नेला मुखीचा उच्चार । पडिले अंतर जवळीच ॥धृपद॥
द्वैताचिया कैसा सापडलो हाती । बहुत करती ओढाओढी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सवे । न्यावे मज देवा सोडवूनि ॥३॥
अर्थ
काय करावे मला या आळसाने फार नागवे म्हणजे माझे फार नुकसान केले आहे आणि प्रपंचाच्या हव्यासाने तर मला फार पीडा दिली आहे. काय करावे या आळसाने आणि प्रपंचाच्या हव्यासाने माझ्या मुखातून हरीनामाचा उच्चारच नेला आहे देव माझ्याजवळ असून देखील आमच्यात अंतर पडले आहे. मी व्दैताच्या हाती कसा सापडलो हे माझे मलाच कळले नाही आणि ते माझी खूपच ओढाओढ करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही मला या सर्व म्हणजे आळस व्दैत आणि प्रपंचाचा हव्यास यातून सोडून आपल्याबरोबर न्यावे. ”
अभंग क्र. २७३९
नाही देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥
त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥धृपद॥
घोकुनी अक्षरे । वाद छळणा करीत फिरे ॥२॥
म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥३॥
अर्थ
देवावर ज्याचा विश्वास नाही आणि संतांचा जो उपहास करत असतो, त्यांच्या तोंडात माती पडत असते आणि ते सर्व लोक हीन शुक्रांच्या जातीचे असतात. वेदातील शास्त्रातील अक्षरे घोकून त्याचे पाठांतर करुन जे वाद करीतात आणि इतरांना त्रास देत फिरत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारचा भावहीन मनुष्य देवाच्या मूर्तीला पाषाण म्हणत असतो. ”
अभंग क्र. २७४०
हेचि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वाया ॥१॥
हेचि एक सर्वसाधनांचे मूळ । आतुडे गोपाळ येणे पंथे ॥धृपद॥
न लगती काही तपाचिया रासी । करणे वाराणसी नाना तीर्थे ॥२॥
कल्पना हे तिळ देही अभिमान । नये नारायण जवळी त्याच्या ॥३॥
तुका म्हणे नामे देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होटी कुष्ट होय ॥४॥
अर्थ
विठ्ठलाचा मंत्रजप करणे हेच सर्व सुख आहे विठ्ठलाच्या नामस्मरणावाचून एकक्षण एक पळ देखील वाया घालवू नये. हेच एक सर्व साधनांचे मूळ आहे या मार्गाने चालल्यानंतर गोपाळ आपल्याला प्राप्त होत असतो. हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी केवळ विठ्ठलाच्या नामाचा जप करत राहावा त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तपाच्या राशी किंवा विविध प्रकारची तीर्थे वाराणसी करण्याची आवश्यकता नाही. विविध प्रकारच्या कल्पना आणि देहामध्ये अभिमान हे तीळभर जरी असले तरी नारायण त्याच्याजवळ येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जे आपल्या ओठाने असे म्हणतील की विठोबाचे नामस्मरण केल्याने देव भेटत नाही त्याच्या ओठाला कुष्ठरोग होईल. ”
अभंग क्र. २७४१
माझे विषयी तुज पडतो विसर । नको धरू दूर पांडुरंगा ॥१॥
तुझा म्हणवितो हेचि लाज तुला । आता झणी मला विसरेसी ॥२॥
तुका म्हणे तुझी माझी नाही उरी । आता केली खरी देवराया ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा माझ्याविषयी तुला सारखा विसर पडत आहे असे मला तू तुझ्यापासून दूर धरु नकोस. अरे मी स्वत:ला तुझा दास म्हणून घेतो याची तरी तू थोडीसी लाज धर यामागे विसरलास हे ठीक परंतू यापुढे मला विसरु नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवराया आता तुझ्यात आणि माझ्यात जर अंतरच तू उरु दिले नाहीस तर हेच खरे कृपा केल्यासारखे होईल. ”
अभंग क्र. २७४२
अभक्तांचे गावी साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडा गाय सांपडली ॥१॥
कसाबाचे आळी मांडिले प्रमाण । बस्वण्णाची आण तया काई ॥धृपद॥
मोतियाची गोणी माळे वोळी नेदी । पुसती केली केवढ्या पासरी हे ॥२॥
केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथे ॥३॥
तुका म्हणे खीर केली काऱ्हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथे ॥२॥
अर्थ
अभक्तांच्या गावात साधू म्हणजे काय हेच माहित नसते जसे वाघाच्या कळपामध्ये गाय सापडल्यावर तीची जशी अवस्था होते त्याप्रमाणे अभक्तांच्या गावी साधू गेला की त्या साधूची अवस्था त्या गाईप्रमाणे होते. कसायाच्या आळीमध्ये जाऊन प्राण्यांची हिंसा करु नये असे वेदाचे प्रमाण जरी लिहून ठेवले आणि त्यांना बैलाची जरी शपथ दिली तरी त्यांना ती काही कळणार आहे काय ? भाजीबाजारामध्ये मोत्याची गोणी नेऊन तेथे विकण्यास ठेवली तर तेथे लोक विचारतील हे मोती कसे पावशेर दिले ? केळी आणि बोरे हे कितीही दिवस शेजारी ठेवले तरी त्यांच्यामध्ये संवाद घडेल काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “कडू कारल्याची खीर केली तर त्या ठिकाणी शुध्द गोडी निर्माण होईल काय त्याप्रमाणे शुध्द अभक्ताच्या गावामध्ये साधूचे महत्व कधी पटेल काय, तर नाही. ”
अभंग क्र. २७४३
भागल्यांचा तू विसावा । करी गावा निंबलोण ॥१॥
परमानंदा पुरुषोत्तमा । हरी या श्रमापासूनि ॥धृपद॥
अनाथांचा अंगीकार । करिता भार न मनिसी ॥२॥
तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥३॥
अर्थ
हे देवा तू थकलेल्या लोकाचा विसावा आहेस विश्रांतीस्थान आहेस त्यामुळे मी तुझी दृष्ट काढून तुझ्यावरुन लिंबलोण उतरेन. हे परमानंदा पुरुषोत्तमा तू मला या संसाराच्या श्रमापासून सोडव. देवा तू अनाथांचा अंगीकार करतोस त्यांचा कोणत्याही प्रकारचा भार तू मानत नाहीस. हे विठाबाई माझे आई तू सर्वाची इच्छा पूर्ण करु शकतोस असा सर्व समर्थ तू आहेस.
अभंग क्र. २७४४
घालूनिया कास । बळे आलो मागायास ॥१॥
प्रेमे देई पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥धृपद॥
होई रे शाहाणा । कळो नेदावे या जना ॥२॥
तुका म्हणे पायी । जडलो मग उरले काईं ॥३॥
अर्थ
देवा मी माझे सेवारुपी कर्ज तुमच्याकडेच दिले होते त्याचा मोबदला मागण्यासाठी तुमच्याकडे सर्व ताकद पणाला लावून कंबर कसून आलो आहे. हे पाडूरंगा तू सेवाऋणी आहेस आमच्या सेवेचे तुझ्यावर ऋण आहे त्यामुळे त्याच्या मोबदल्यात आम्हाला तुझे प्रेम पाठवून दयावे. देवा तू लवकर शहाणा हो तू माझा ऋणी आहेस हे लोकांना कळू देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुला कर्ज देऊन देखील मी तुझ्या पायाशी जणू राहिलो आहे आता यापेक्षा मग अजून काय करायचे राहिले आहे. ”
अभंग क्र. २७४५
लागे तुझी सोय करी ऐसे काही । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥
पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥ध्रु॥
नाही तरी ब्रीद टाकी सोडूनिया । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
बोलियेला बोल करावा साचार । तरी लोक बरे म्हणतील ॥३॥
करावा संसार लोक लाजे भेणे । वचनासी उणे येऊ नेदी ॥४॥
तुम्हा आम्हा तसै नाही म्हणे तुका । होशील तू सखा जीवलग ॥५॥
अर्थ
हे विठाबाई माऊली माझी आई तुझी प्राप्ती मला होईल असे तू काहीतरी करावे. तू स्वत:ला जर पतित पावन असे म्हणून घेत असशील तर माझा अव्हेर तू करु नकोस. जर तुला माझ्यावर प्रेमच धरायचे नसेल तर तुझे ब्रीद तू सोडून टाक. देवा तू गीतेमध्ये जे काही तुझे वचन बोलला आहेस ते तू खरे करुन दाखव तरच लोक तुला चांगले म्हणतील. कोणत्याही प्रकारचे काम करायचे असेल तर लोकलज्जेने का होईना व्यवहार चांगला करावा त्यामुळे देवा तुझे वचन गीतेमध्ये सांगितले आहे त्याचे तू व्यवस्थित पालन कर त्याला कोणत्याही प्रकारचा उणेपणा येऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू जर माझा जिवलग सखा झाला तर तुम्हीही पतितपावन ठराल आणि मला देखील तुमची प्राप्ती होईल व त्यामुळे आपल्या दोघाना कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. ”
अभंग क्र. २७४६
भेटीलागी पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥१॥
कधी कृपा करिसी नेणे । मज दीनाचे धावणे ॥धृपद॥
सीणले माझे मन । वाट पाहाता लोचन ॥२॥
तुका म्हणे भूक । तुझे पाहावया मुख ॥३॥
अर्थ
हे पंढरीनाथा तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला तळमळ व व्यथा लागली आहे. तू माझ्यावर कृपा कधी करशील आणि माझ्यासारख्या दीनाने तुला आवाज दिल्यावर कधी धावत येशील हे मला काही कळत नाही. देवा माझे मन आणि डोळे तुझे वाट पाहून पाहून शीणले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझे मुख पाहावे केवळ एवढीच एक भूक मला लागली आहे. ”
अभंग क्र. २७४७
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पाया ॥१॥
शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥धृपद॥
आलो लोटांगणी । रुळे तुमचे चरणी ॥२॥
तुका म्हणे शीर । ठेवियेले पायावर ॥३॥
अर्थ
हे देवा मी माझे शरीर तुझ्या पायावरुन ओवाळून टाकले आहे. हे नारायणा मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्हाला शरण आलो आहे माझ्यासारख्या दीनाचा तुम्ही अंगीकार करा. देवा मी लोटांगण घालीत तुमच्या चरणाजवळ आलो आहे आणि तुमच्या चरणाजवळच आता रुळलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी माझे शीर तुमच्या पायावर ठेवले आहे. ”
अभंग क्र. २७४८
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलू दातारा ॥१॥
धरणे घेतले द्वारांत । नको धरूनी उठवू हात ॥धृपद॥
घातली मुरकुंड । झालो शिरोमणी लंड ॥२॥
तुका म्हणे जगजीवना । ब्रीद पाहे नारायणा ॥३॥
अर्थ
हे दातारा मी तुझा दारचा कुत्रा आहे मला तू मोकार सोडू नकोस. देवा मी तुझ्या दारात धरणे धरुन बसलो आहे त्यामुळे माझा हात धरुन तू मला उठवून देऊ नकोस. देवा मी माझी मान दोन्ही गुडघ्याच्यामध्ये घालून म्हणजे मुरकुंडी मारुन बसलो आहे आणि इतका निर्लज्ज झालो आहे की, तु मला बळेच काढून जरी दिले तरी मी जाणार नाही इतका मी निर्लज्जाचा शिरोमणी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे जग्गजीवना नारायणा मी कसाही वागलो तरी तू आपल्या ब्रीदाचा विचार करावा. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading