आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१५ जानेवारी, दिवस १५, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी ७६ ते १००, सार्थ तुकाराम गाथा अभंग १६९ ते १८०
“१५ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 15 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
76-2
(दुसरे उदाहरणं देऊन माऊली सांगत आहेत)
तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरु । वणवला का ॥76॥
किंवा कडक उन्हाळ्यात (तीव्र उन्हामुळे जंगलात लागलेली आग) मोठा पर्वत वणव्याने व्यापला जावा. तसा तो धूनर्धारी अर्जून दुःखाने अगदी जर्जर (पिडीत) झाला होता.
77-2
म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥77॥
म्हणून जो सहजच नीलवर्ण आहे आणि स्वभावाने कृपामृताने भरलेला असा श्रीगोपाळ रुपी (महामेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी) अर्जूनाकडे वळला.
78-2
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥78॥
त्याठिकाणी (श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी) शुभ्र दातांची कांती हिच जणू काही चमकणारी वीज होती. आणि त्याचे गंभीर बोलणे हाच मेघ गर्जनेचा (गडगडाटाचा) थाट होता.
79-2
आता तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥79॥
आता तो श्रीकृष्णरूपी कृपाळु (उदार)मेघ कसा वर्षाव (शब्दांचा) वर्षाव करेल आणि दुःखाने पेटलेला अर्जून रूपी (मोठा) पर्वत कसा शांत होईल, आणि ब्रम्हज्ञानाचा नवीन अंकूर त्याच्या ठिकाणी कसा फूटेल,
80-2
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥80॥
ती कथा समाधान वृत्तीने, (शांत चित्ताने, मन हळुवार असायला हवं) श्रवण करा. आणि पुढे काय घडते ते पाहा, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
। अध्याय पहिला ।
श्रीज्ञानदेव म्हणतात,
57-1
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अति हळूवारपण चित्ता । अणुनिया ॥57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥57॥
श्रीज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून इथं म्हणतात गीता त्यांनी कशी ऐकावी हे ते सांगत आहेत. ते श्रोत्यांना विश्वासात घेतात त्यांच्या रासिकतेला आवाहन करतात, ते म्हणतात, ” हा मोठा आल्हाद देणारा विषय आहे, तो ऐकण्यात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, सौंदर्याचं आगळंवेगळं दर्शन तुम्हाला घडणार आहे. सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मन हळुवार असायला हवं, कस हळुवार हवं ? तर ज्ञानदेव खूप सुंदर उत्तर देतात, ते म्हणतात, शरद ऋतूतील रात्र आहे. स्वच्छ अशा आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशमान झाला आहे. त्या चंद्राचे शीतल किरण पृथ्वीवर बरसत आहेत. सगळीकडं टिपूर चांदण पडलेल आहे. चकोर पक्षी चांदण पिऊन जगतो म्हणतात. चकोरची छोटीछोटी पिलं चंद्ररकिरणांचे जणू अमृताचे असावेत असे कोवळे कण जमिनीवरून अलगदपणे टिपून घेतात. तसं आपलं मन श्रोत्यांनी अगदी हळुवार करावं आणि या गीतासंवादरूप कथेत भगवान श्रीकृष्णा जे काही सांगत आहेत त्याचा अनुभव घ्यावा. . .
संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।
न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णी बभूव ह ॥2. 9॥
भावार्थ :-
संजय म्हणाला, ” हे राजा धृतराष्टरा, अर्जुन अंतर्यामी श्रीकृष्णाला असे बोलून पुनः त्या श्रीगोविंदला ‘मी युद्ध करणार नाही’ असे स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला.
81-2
ऐसे संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥81॥
याप्रमाणे संजयाने धृतराष्टरास सांगितले. तो म्हणाला, हे राजा, तो अर्जुन पुनः शोकाकुल होऊन काय म्हणाला. ते ऐका ! !
82-2
आइके सखेदु बोले श्रीकृष्णाते । आता नाळवावे तुम्ही माते । मी सर्वथा न झुंजे एथे । भरवसेनी ॥82॥
तो खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णास म्हणाला, आत्ता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका, काहीही झाले तरी यावेळी मी युद्ध करणार नाही, हे निश्चित ! !
83-2
ऐसे येकि हेळा बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते ॥83॥
याप्रमाणे एकदम बोलला, पुढे काही न बोलता तो स्तब्ध (मौन) राहिला. ही त्याची अवस्था पाहून श्रीकृष्णास आश्चर्य वाटले.
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥2. 10॥
भावार्थ :-
हे भरतवंशी धृतराष्टरा ! दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करत बसलेल्या (अर्जुनास) त्याला श्रीकृष्ण प्रसन्न मुखाने असे म्हणाले की. .
84-2
मग आपुला चित्ती म्हणे । एथ हे कायी आदरिले येणे । अर्जुन सर्वथा काही नेणे । काय कीजे ॥84॥
भगवान मनात म्हणाले, अर्जुनाने याप्रसंगी हे भलतेच काय सुरु केले आहे ? याला मुळीच काही कळत नाही. काय करावे ?
85-2
हा उमजे आता कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी का ॥85॥
आता याला कोणत्या उपायाने (काय केल्याने) समजेल ? कशाने धीर धरील ? जसा एखादा मांत्रिक (भूतबाधा घालविताना) विचार करतो;
86-2
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥86॥
किंवा असाध्य रोग झाले असता, वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृतासमान दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो,
87-2
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥87॥
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने आपले शोक टाकील ?(भ्रम कसा सोडून देईल) याचा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, भगवान श्रीकृष्ण विचार करत होते.
88-2
ते कारण मनी धरिले । मग सरोष बोलो आदरिले । जैसे मातेच्या कोपी थोकुले । स्नेह आथी ॥88॥
तो मोह, भ्रम कसा नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि अर्जुनास रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने बोलली तरी तिच्या मनात प्रेम असते.
याआधी अर्जुनास समजावण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे केला पण गोड शब्दांनी अर्जुन ऐकत नाही, हे भगवंताच्या ध्यानी आले म्हणून रागावण्याचं नाटक त्यांना करावं लागलं. (किंवा अर्जुनाच्या मनातील अविचार घालवण्यासाठी भगवंतांनी केलेली युक्ती समजावी)
89-2
की औषधाचिया कडुवटपणी । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणी । प्रकट होय ॥89॥
किंवा औषधाची चव कडू असली तरी त्यामध्ये अमृताचा साठा असतो; हे वरून पहिले तर दिसत नाही, पण (त्याचे सेवन केल्यानंतर) गुणांच्या रुपाने ते नंतर स्पष्ट होते,
90-2
तैसी वरिवरी पाहता उदासे । आत तरी अतिसुरसे । तिये वाक्ये हृषीकेशे । बोलो आदरिली ॥90॥
त्याप्रमाणे श्रीकृष्णाची वाणी वरकरणी कठोर, पण आत हितकर (हिताचा उपदेश देणारे शब्द) असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥2. 11॥
भावार्थ :-
श्रीभगवान म्हणाले, ” शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक करत आहेस. आणि पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस. पण(विद्वान) विवेकी लोक (मृत्यू)मेलेल्या बद्दल किंवा न मेलेल्या बद्दल (जिवंत) शोक करत नाहीत.
91-2
मग अर्जुनाते म्हणितले । आम्ही आजि हे नवल देखिले । जे तुवा एथ आदरिले । माझारीचि ॥91॥
श्रीकृष्ण म्हणाले, ” तू युद्ध करण्याचे सोडून हे जे तू मधेच आरंभिले (सुरु केले) आहेस, हे आश्चर्य आम्ही पाहत आहोत.
92-2
तू जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेते न संडिसी । आणि शिकवू म्हणो तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥
तू स्वतःला ज्ञानी (विद्वान) तर म्हणवितोस, पण अज्ञानाच्या (मूर्खपणा) गोष्टी मात्र सोडत नाहीस. बरे तुला काही शिकवायचे म्हंटले की, मोठमोठ्या (पांडित्याच्या) गोष्टी सांगतोस. ! !
93-2
जात्यंधा लागे पिसे । मग ते सैरा धावे जैसे । तुझे शहाणपण तैसे । दिसतसे ॥93॥
जन्मांधाला वेड लागले म्हणजे, ते जसे सैरावैरा धावते, तसे तुझे हे शहाणपण (बोलणे) दिसते आहे.
94-2
तू आपणपे तरी नेणसी । परी या कौरवाते शोचू पहासी । हा बहु विस्मय आम्हासी । पुढतपुढती ॥94॥
तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवाबद्दल शोक करतोस, याचा मला वारंवार(विस्मय)आश्चर्य वाटत आहे.
95-2
तरी सांग पा अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? । हे अनादि विश्वरचना । ते लटके कायी ? ॥95॥
हे अर्जुना ! मला सांग, तुझ्यामूळे या त्रिभूवनाचे अस्तित्व आहे काय. ?या विश्वाची रचना अनादि आहे, ते खोटे आहे काय. ?
96-2
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूते होती । तरी हे वायाचि काय बोलती । जगामाजी ? ॥96॥
या विश्वाला चालविणारा सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून पंचमहाभूते, प्राणी उत्पन्न होतात, असे जे हे साधू संत (बोलतात) सांगतात, ते खोटे आहे काय. ?
97-2
हो का सांप्रत ऐसे जाहले । जे हे जन्ममृत्यु तुवा सृजिले । आणि नाशु पावे नाशिले । तुझेनि कायी ॥97॥
आज यामध्ये काही बदल झाला आहे काय. ? या विश्वातील जन्म-मृत्यू चे चक्र तू निर्माण केले आहेस काय ? आणि तू मारले, तरच त्यांचा नाश होणार आहे काय. ?
98-2
तू भ्रमलेपणे अहंकृती । यासि घातु न धरिसी चित्ती । तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥98॥
तू (अज्ञानाने) अहंकारामुळे झालेल्या भ्रमाणे तू कौरवांचा नाश करण्याचा मनात आणले नाहीस, तर मला सांग, ते चिरंजीव होतील का. ?
99-2
की तू एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणे चित्ता । येवो देसी ॥99॥
किंवा तू एक मारणारा आणि बाकी सगळे लोक मरणारे, असा भ्रम कदाचित तुझ्या चित्ताला होईल, त ते होऊ देऊ नकोस.
100-2
अनादिसिद्ध हे आघवे । होत जात स्वभावे । तरी तुवा का शोचावे । सांगे मज ॥100॥
हे सगळे आपोआप होते व जातें. असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्यहात चालू आहे, तर मग तू शोक का कारावास ? मला सांग.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १५ वा, १५ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६९ ते १८०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 169
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनी धरी ॥१॥
धिग त्याचे साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥धृपद॥
नाही वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवी आस ॥२॥
हे ना तैसे जाले । तुका म्हणे वाया गेले ॥३॥
अर्थ
देवाचे भजन-पूजन हे माझ्या नाशिबि नाही, असे म्हणत, संसाराची आसक्ती धरणारे लोक असतात. अश्या साधुच्या साधुत्वाचा तुकाराम महाराज धिग(धिक्कार) करतात, त्याचे मन विटाळले आहे, असे म्हणतात. अश्या साधुच्या ठिकाणी वैराग्याचा लवलेशही नाही; त्याच्या ठिकाणी उलट धनाची अपेक्षा असते. तुकाराम महाराज म्हणतात, साधुच्या या आसक्तीमुळे त्याचा जन्म वाया जातो.
अभंग क्र. 170
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरीकीर्तन । ते समान विष्णूशी ॥धृपद॥
अशुद्ध विटाळसीचे खळ । विडा भिक्षता तांबूल । सापडे सबळ । काळाहाती न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना । अणिका वारी जाता कोणा । त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महामेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥
अर्थ
एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे. एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत. एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल. त्याला काळ खाऊन टाकिल. या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील. या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो.
अभंग क्र. 171
करविता व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघा एक मान । चोरासवे कोण जिवे राखे ॥धृपद॥
आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनिया ॥२॥
देऊनिया वेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडू नये ॥४॥
अर्थ
एखाद्या व्यक्तीने दुसर्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरि होतो, पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात. सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केली की मानसंन्नमान मिळतो, चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते. आपल्या जवाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये, आपले हित ओळखावे. सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वाराणसीला जाण्यास मदत करावी-पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ (चोरीची वेळ) सांगू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्त्रयाग हे भक्तीमार्ग आहेत. हे कधी सोडु नये.
अभंग क्र. 172
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥धृपद॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥३॥
अर्थ
पंढरी क्षेत्र ही भक्तांच्या इनामाची पेठ आहे, तेथील सर्व मार्ग भक्तांनि भरून वाहत आहेत. मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारि पुरुषार्थ स्वरुप या पेठेत विकावयास आले आहेत, त्याचा लाभ होण्याचे शुभ शकुन होत आहेत. या पेठेतील व्यापार्याच्या सर्व समस्या दूर झाल्याने देणे-घेणे सहजसोपे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात कि, या पेठेत् येणाऱ्या भक्ताना आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो.
अभंग क्र. 173
वेदाचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येर ॥१॥
विठोबाचे नाम सुलभ सोपारे । तारी एक सरे भवसिंधु ॥धृपद॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥३॥
अर्थ
वेदपठण करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतोच असे नाही, इतरांना वेद पाठणाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही. विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पार करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपुर्णरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजणार ?. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांमधील विधिनिषेध लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीणा दूसरा पर्याय नाही.
अभंग क्र. 174
विधीने सेवन । विषयत्यागाते समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्ती । आदि अवसानी अंती ॥धृपद॥
बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावे । कृपा करीजेते देवे ॥३॥
अर्थ
ज्या प्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगीतलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागाच असतो. सर्वात मुख्य धर्म म्हणजे चित्ता मध्ये भगवंत असणे होय. व तो हि आदी अंती असावा. तर्क आणि कुतर्क यांना अनेक वाटा आहे पण त्या अतिशय खोट्या आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणी पूर्ण पणे भाव असेल तर तो नक्की कृपा करणार.
अभंग क्र. 175
येथीचिया अलंकारे । काय खरे पूजन ॥१॥
वैकुंठीच्या लावू वाटा । सर्व साटा ते ठायी ॥धृपद॥
येथीचिया नाशवंते । काय रिते चाळवू ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥३॥
अर्थ
पृथ्वीतलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे. खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याच मार्गाकडे वाळवु, तेथे शास्वत सुखाचा भांडार मिळतो. इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी त्याविषयी अधीक काही सांगुन तुम्हाला त्याच्या मोहात पाडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालविणारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत.
अभंग क्र. 176
उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोले बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥धृपद॥
तरी मनी नाही शंका । बळे एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हा । पुढे कामा गाबाळ ॥३॥
अर्थ
मी प्रपंच्याकडून परमर्थाकडे जाणारी वाट उजळविण्यासाठी व सत्य-असत्य सांगण्यासाठी आलो आहे. माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे. तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो. त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी गबाळ साधने आम्हाला चालणार नाही.
अभंग क्र. 177
बोलावे ते धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठी खावे शेण । जेणे जन थुंकी ते ॥धृपद॥
दुजे ऐसे काय बळी । जे या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणी । गांढे मनी बुरबुरी ॥३॥
अर्थ
बोलताना डोळसणाने, धर्मसंकेतानुसार बोलावे. नाही तर बोलू नये ते आणि जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील. आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ?. तुकाराम महाराज म्हणतात, शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढाया मारतो.
अभंग क्र. 178
बरे देवा कुणबी केलो । नाही तरि दंभेचि असतो मेलो ॥१॥
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥धृपद॥
विद्या असती काही । तरी पडतो अपायी ॥२॥
सेवा चुकतो संताची । नागवण हे फुकाची ॥३॥
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥४॥
तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ॥५॥
अर्थ
बरे झाले देवा, तू मला कुणबी मध्ये जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो. थोर केले नाहीस हे बारे झाले, आता मी तुझ्या पायाशी नाचू शकतो. माझ्याजवळ कोणतीही विद्या असती तर मला अहंकार झाला असता. त्या अहंकारामुळे माझ्या हातून संतासेवा घडली नसती आणि हा नरदेह वाया गेला असता. त्या विदयेच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व, ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, थोरापणामुळे अभिमान, अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो.
अभंग क्र. 179
दाता नारायण । स्वये भोगिता आपण ॥१॥
आता काय उरले वाचे । पुढे शब्द बोलायाचे ॥धृपद॥
देखती जे डोळे । रूप आपुले ते खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद । झाला अवघा गोविंद ॥३॥
अर्थ
मनुष्याला सर्व सुख देणारा नारायण आहे आणि उपभोगणाराहि तोच आहे. त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागच् राहिली नाही. आपले डोळ्यांना दिसणारे रूप हे सर्व काही तोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुखातून निघणारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे.
अभंग क्र. 180
कृपा करुनी देवा । मज साच ते दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥धृपद॥
पाहोनिया डोळा । हाती ओढवाल काळा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझा करावा कुढावा ॥३॥
अर्थ
हे देवा माझ्यावर कृपा करुन जे खरे आहे ते मला दाखवा. असे जर केले नाही तर तुम्ही दयावंत कसले पण तुम्ही दयावंत आहात हि तुमची कीर्ती तर सर्व जगामध्ये आहे. देवा आम्हा भक्तांना जर तुम्ही तुमच्या डोळया देखत काळाच्या हाती आम्हाला देत असाल तर तुमची कीर्ती ति कसली ? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे रक्षणखरोखर तुम्ही करा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















