८ जुलै, दिवस १८९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६०१ ते ६२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २२५७ ते २२६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“८ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ८ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२५७ ते २२६८ चे पारायण आपण करणार आहोत.
८ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६०१ ते ६२५,

601-13
महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसे । जयाच्या ठायी ॥601॥
15) चित्ताचे समत्व
आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात (म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही.
602-13
का तिन्ही काळ होता । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखी चित्ता । भेदु नाही ॥602॥
अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दु:खाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दु:खी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही.
603-13
जेथ नभाचेनि पाडे । समत्वा उणे न पडे । तेथ ज्ञान रोकडे । वोळख तू ॥603॥
कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या हानी अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज.

(श्लोक 10)
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥13. 10॥
अर्थ माझ्या ठिकाणी अनन्ययोगाने अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात रहाणे व जनांच्या समुदायाची खंती ॥13-10॥
604-13
आणि मीवाचूनि काही । आणिक गोमटे नाही । ऐसा निश्चयोचि तिही ? जयाचा केला ॥604॥
अव्यभिचारिणी भक्ती
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे.
605-13
शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश । एक मीवाचूनि वास । न पाहती आन ॥605॥
ज्याचे शरीर वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे (प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे) आणि एक माझ्यावाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत.


606-13
किंबहुना निकट निज । जयाचे जाहले मज । तेणे आपणया आम्हा सेज । एकी केली ॥606॥
फार काय सांगावे ! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे).
607-13
रिगता वल्लभापुढे । नाही आंगी जीवी सांकडे । तिये कांतेचेनि पाडे । एकसरला जो ॥607॥
पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे.
608-13
मिळोनि मिळतचि असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होऊनि मज तैसे । सर्वस्वे भजती ॥608॥
गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात.
609-13
सूर्याच्या होण्या होईजे । का सूर्यासवेचि जाइजे । हे विकलेपण साजे । प्रभेसि जेवी ॥609॥
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो.
610-13
पै पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुके । ते लहरी म्हणती लौकिके । एऱ्हवी ते पाणी ॥610॥
पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


611-13
जो अनन्यु यापरी । मी जाहलाही माते वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पै गा ॥611॥
जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच ते मूर्तिमंत ज्ञान होय.
612-13
आणि तीर्थे धौते तटे । तपोवने चोखटे । आवडती कपाटे । वसवू जया ॥612॥
17) एकांत
आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास रहावयास आवडते,
613-13
शैलकक्षांची कुहरे । जळाशय परिसरे । अधिष्ठी जो आदरे । नगरा न ये ॥613॥
डोंगराच्या बगलेतील गुहामधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने रहातो आणि शहरात येत नाही,
614-13
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंती । जाण मनुष्याकारे मूर्ती । ज्ञानाची तो ॥614॥
ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकाचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज.
615-13
आणिकहि पुढती । चिन्हे गा सुमती । ज्ञानाचिये निरुती- । लागी सांगो ॥615॥
हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो.

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥13. 11॥
अर्थ अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय.
616-13
तरी परमात्मा ऐसे । जे एक वस्तु असे । ते जया दिसे । ज्ञानास्तव ॥616॥
(18) अध्यात्मज्ञानाचे नित्यत्व मानणे.
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते.
617-13
ते एकवाचूनि आने । जिये भवस्वर्गादि ज्ञाने । ते अज्ञान ऐसा मने । निश्चयो केला ॥617॥
त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो,
618-13
स्वर्गा जाणे हे सांडी । भवविषयी कान झाडी । दे अध्यात्मज्ञानी बुडी । सद्भावाची ॥618॥
स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेऊन त्यात रममाण होतो.
619-13
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे । निघिजे जेवी नीटे । राजपंथे ॥619॥
जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने निघावे,
620-13
तैसे ज्ञानजाता करी । आघवेचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । आत्मज्ञानी ॥620॥
त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


621-13
म्हणे एक हेचि आथी । येर जाणणे ते भ्रांती । ऐसी निकुरेसी मती । मेरु होय ॥621॥
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरु (आधार) होते.
622-13
एवं निश्चयो जयाचा । द्वारी आध्यात्मज्ञानाचा । ध्रुव देवो गगनीचा । तैसा राहिला ॥622॥
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव तार्‍याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो.
623-13
तयाच्या ठायी ज्ञान । या बोला नाही आन । जे ज्ञानी बैसले मन । तेव्हाचि ते तो ॥623॥
त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या (भगवंताच्या) बोलण्यात आडपडदा आहे असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला.
624-13
तरी बैसलेपणे जे होये । बैसताचि बोले न होये । तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥624॥
तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे.
625-13
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जे एक फळ । ते ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥625॥
आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते.

दिवस १८९ वा. ८, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२५७ ते २२६८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २२५७
येथील जे एक घडी । तये जोडी पार नाही ॥१॥
किती त्यांचा सासुरवास । कैचा रस हा तेथे ॥धृपद॥
अवघे दिवस गेले कामा । ही जन्मा खंडण ॥२॥
तुका म्हणे रतल्या जनी । सोडा झणी कान्होबा ॥३॥
अर्थ
हरीच्या बरोबर एक वेळ, एक क्षणदेखील गेला तरी त्या वेळेच्या लाभाला दुसरी उपमा नाही. गोपिकांना प्रपंचात किती सासरवास होता हरीच्या प्रेम रसा सारखा रस तेथे (प्रपंचात) कसा असेल ? आपल्या आयुष्यातील सर्व दिवस हे काम करण्यातच जातात परंतु त्यामुळे जन्ममरणाची परंपरा खंडित होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे कान्होबा त्या सर्व गवळणी तुमच्याशी एक रत झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना कधीही सोडू नका.

अभंग क्र. २२५८
चिंता नाही गावी विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥
नारायण घरी साठविले धन । अवघे चि वाण तया पोटी ॥धृपद॥
सवंग सकळा पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥
तुका म्हणे येणे आनंदी आनंदु । गोविंदे गोविंदु पिकविला ॥३॥
अर्थ
विष्णुदासांच्या गावाला कोणत्याही प्रकारची चिंता नसते कारण तेथे अखंड हरिनामाचा घोष व जयजयकार चालू असतो. नारायण रूपी धन त्यांच्या घरामध्ये साठवलेले असते त्यामुळे जगातील सर्वच गोष्टी त्यांच्या घरी असतात. विष्णुदासांच्या घरी नर, नारी, बाळ सर्वच नारायणाचे नांव सेवन तृप्ती होईपर्यंत करतात. तुकाराम महाराज म्हणतात या गोविंदाने सर्वत्र स्वतःलाच गोविंद रूपाने विकून टाकले आहे म्हणजे सर्वत्र गोविंदच गोविंद झालेला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद झाला आहे.

अभंग क्र. २२५९
करिती तया वेवसाव आहे । येथे व्हा रे साहे एक एका ॥१॥
गाता आइकता समान चि घडे । लाभे लाभ जोडे विशेषता ॥धृपद॥
प्रेमाचे भरते भाते घ्यावे अंगी । नटे टाळी रंगी शूरत्वेसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥३॥
अर्थ

ज्यांना परमार्थरूपी व्यवहार करायचा असेल त्यांनी खुशाल करावे आणि हा व्यवसाय करताना एकमेकांना साह्य करावे. हरी चे गुणगाण ऐकले किंवा गायले तरी पुण्य समानता होते आणि लाभाने लाभ जोडून विशेष फळाची प्राप्ती होते. आपल्या हृदयामध्ये हरीचे प्रेमसुख भरून घ्यावे म्हणजे हृदयाचे भाते हरीच्या प्रेम सुखाने भरून घ्यावे आणि शुर शिपाई जसा रणांगणामध्ये विविध अलंकार चढवून शस्त्र घेऊन तयार होतो त्याप्रमाणे हरिकीर्तनात आपण हरीचे प्रेम, नाम घेऊन रंगात रंगून टाळी वाजवावी. तुकाराम महाराज म्हणतात असे केल्याने तुमच्या अनेक युगाचे जन्ममरण खंडित होईल आणि सर्व शीणभाग निवारून जाईल.

अभंग क्र. २२६०
जीव जीती जींवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥१॥
जया चित्ती जैसा भाव । तया जविळ तैसा देव ॥धृपद॥
सकळा पाडीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
अर्थ
जगातील सर्व प्राणिमात्र हे पाण्यावरचं जीवन जगत असतात परंतु असे असले तरीदेखील मासा पाण्यातून बाहेर काढला की पाण्याच्या वियोगाने लगेच तो मरण पावतो म्हणजे त्याला त्याचा वियोग सहन होत नाही. म्हणजेच सर्व तर देवाला मानतातच परंतु खरा जो परमर्थिक आहे त्याला देवा वाचुन जमतच नाही याचा अर्थ असा की ज्याचा जसा भाव असेल तशा प्रकारचा देव त्याच्या जवळ असतो. सर्वाना सूर्यकिरण तर लागतेच परंतु सूर्यकिरणांपासून उमलनारे कमळ सूर्यकिरण अंगावर पडल्या वाचून उमलत नाही म्हणजे त्याचे जीवनच सूर्यकिरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांची काळजी त्याच्या आईलाच असते त्याप्रमाणे जो जसा देवाला भजतो तशा प्रकारची काळजी देव त्याची घेतो.

अभंग क्र. २२६१
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥१॥
याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धावे हिता आपुलिया ॥धृपद॥
उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥
व्याधी पिडिला धावे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥
तुका म्हणे जया आपुले स्वहित । करणे तोचि प्रीत धरी कथे ॥४॥
अर्थ
मुंगी च्या घरी जाऊन कोणी मुंगीला बोलवणे पाठवले आहे काय केवळ गुळ पाहिला ती लगेच त्याच्यावर धाव घालते. याचका वाचून दात्याचे काही खोळंबलेले असते काय परंतु आपले हित व्हावे यासाठीच याचक दात्याकडे धाव घेत असतो. पाणी आणि अन्न कधी कोणाला म्हणते का मला खा किंवा प्या, तर नाही ज्याला भूक लागलेली असते तो त्याच्या आवडीनुसार बरोबर त्यांच्याकडे जात असतो. व्याधीने पीडित असलेला मनुष्य आपल्या दुःखाचा परिहार व्हावा याकरता वैद्याच्या घरी धावतच जात असतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपले स्वहित करायचे असेल तोच हरी कथेविषयी प्रेम धरील.

अभंग क्र. २२६२
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्याने ते ॥१॥
वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥धृपद॥
पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरी ॥२॥
तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलाचा ॥३॥
अर्थ
काही लोक उच्चवर्णात जन्माला आले असले तरी देखील मागच्या जन्मी ते परीट किंवा न्हावी म्हणून जन्मले असावेत बहुतेक त्यांना त्यांची जात आठवत असेल. कारण त्यांचे बोलणेच इतके कठोर असते की असे वाटते त्यांची जीभ म्हणजे न्हाव्याचा वस्ताराच आहे आणि तोंड म्हणजे परीटकाच्या घरचे कपडे धुण्याची सौंदनीच आहे. त्यांचे या जन्मात शिखासूत्र वगैरे इत्यादी कर्म असतात परंतु त्यांच्या अंतरंगात मागच्या जन्मातील मलमुत्र तसेच असतात. तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्यांची निंदा करून त्यांचे पाप धूण्याचे काम हे उच्च वर्णतील लोक करत असतात.

अभंग क्र. २२६३
नामदुषी त्याचे नको दरुषण । विष ते वचनवाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाईकावी कानी । निंदेची पोहणी उठे तेंथे ॥धृपद॥
काय साच लभ्य त्याचिये वचनी । कोण त्या पुराणी दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावू त्याचिया तोंडासी । आता या जिभेंसी काय करू ॥३॥
तुकाम्हणे संत न मानिती त्यास । घेउं पाही ग्रास यमदूत ॥४॥
अर्थ
जे हरिनामाला दूषण देतात निंदा करतात त्यांचे तोंडही मला पाहुशी वाटत नाही त्यांचे बोलणे म्हणजे मला कडवट विषा प्रमाने वाटतात. त्यांची अमंगळवाणी कानाने ऐकू देखील वाटत नाही कारण त्यांच्या वाणीतून निंदेची दुर्गंधी येत असते. त्याचे म्हणणे असते की हरिनाम हे चांगले नाही जर त्याचे खरे आहे तर मग आतापर्यंत पुराणाने तरी कोठे याविषयी ग्वाही दिली आहे. अशा निर्लज्ज मनुष्याच्या तोंडाला मी काय आड लावू त्याचे तोंड तरी कसे बंद करू आता त्याच्या जीभेला तरी मी काय करू ? तुकाराम महाराज म्हणतात अशा अधम मनुष्याला संत मान्यता देत नाहीत या मनुष्याला यमदूत गिळू घेऊ पाहत असतात.

अभंग क्र. २२६४
येऊनि नरदेहा झाकितील डोळे । बळेचि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनिया ॥धृपद॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढे नाही ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊ सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
अर्थ
काही लोक नरदेहा सारख्या उत्तम योनीला जन्माला येऊन देखील डोळेझाकपणा करून बळेच आंधळे होतात. ज्ञानाच्या मदतीने हे लोक का जाणून घेत नाहीत की पुढे हा नरदेह आपल्याला मिळणार नाही आणि परमार्थाची वाट तरी हे का चालत नाहीत ? चौऱ्यांशी लक्ष योनी च्या फेऱ्याचा वळसा घालून मग कुठेतरी आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे याचा जर आपण योग्य वेळी फायदा करून घेतला नाही तर पुढे या प्रकारचा लाभ आपल्याला होणार नाही हे यांच्या का बरं लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना अशा प्रकारचे उपदेश करून सावध करत वाटेने चालत जात आहे जर माझा उपदेश ऐकणारा मला कोणी भेटला तर भेटला.

अभंग क्र. २२६५
नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥
बिळया माझा पंढरिराव । जो या देवाचा ही देव ॥धृपद॥
रंडी चंडी शक्ती । मद्यमांस भिक्षती ॥२॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाठी देव ॥३॥
गणोबा विक्राळ । लाडुमोदकाचा काळ ॥४॥
मुंज्या म्‍हैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे ॥५॥
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥६॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥७॥
अर्थ
माझा देव जाखाई जोखाई, मायरानी, मेसाबाई या शुद्र देवता सारखा तर नाहीच मुळी. माझा देव पंढरीराव आहे तो फार बलवंत आहे तो या सर्व देवाचा ही देव आहे. रंडी, चंडी, शक्ती या ज्या देवता आहेत त्या मांसभक्षण करतात. भैरव, खंडेराव म्हणजे खंडोबा हे तर रोटी मलिदा खाण्यासाठीच देव झालेले आहेत. गणोबा म्हणजे गणपती हे विक्राळ वक्रतुंड आहेत आणि ते लाडू मोदकांचे काळच आहेत. मुंजोबा म्हसोबा हे तर लहान मुलेच आहेत पोरेच आहेत त्यांना कोण मान देतो. आणि वेताळे फेताळे तर जळून जावो त्याची तोंड काळे होवो. तुकाराम महाराज म्हणतात जे खरे भक्त आहेत त्यांनी केवळ रुक्माई चा पती पांडुरंगच चित्तात धरा.

अभंग क्र. २२६६
पडता जड भारी । दासी आठवावा हरी ॥१॥
मग तो होऊ नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥धृपद॥
नामाच्या चिंतने । बारा वाटा पळती विघ्ने ॥२॥
तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥
अर्थ
मोठ्या संकटात जर पडले तर दासांनी हरीची आठवण काढावी. मग तो हरी भक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही संकट आणि भक्त यामध्ये सुदर्शन चक्र तो आडवे घालतो. हरी नामाचे चिंतन केले असता भक्तांचे सर्व विघ्ने बारा वाटणे पळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच तुम्ही आपले प्राणदेखील देवाला अर्पण करा मग तो तुमच्या साठी काहीही करेल.

अभंग क्र. २२६७
माये मोकलिले कोठे जावे बाळे । आपुलिया बळे न वाचे ते ॥१॥
रुसोनिया पळे सांडुनिया ताट । मागे पाहे वाट यावे ऐसी ॥धृपद॥
भांडवल आम्हा आळी करावी हे । आपणे माये धावसील ॥२॥
तुका म्हणे आळी करुनिया निकी । देसील भातुकी बुझाऊनि ॥३॥
अर्थ
एखाद्या लहान मुलाला जर त्याच्या आईने मोकाट टाकले तर त्याने कोठे जावे कारण तो स्वतःच्या जीवावर जगू शकत नाही. लहान मुलं रुसले की ते काय करते तर वाढलेले ताटदेखील बाजूला सारते आणि रुसून एखाद्या कोपर्‍यात जाऊन बसते परंतु ते अशी वाट पाहते की आईने यावे आणि आपली समजूत काढून आपल्याला घेऊन जावे. त्याप्रमाणे हे देवा आम्ही तुझ्यापाशी हट्ट करावा एवढेच एक भांडवल आमच्या जवळ आहे आणि आम्ही रूसुन कोठे बसलो की तु आपण होऊनच आमच्या पाठी मागे धावत येतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही योग्य प्रकारचा हट्ट तुझ्याकडे करू मग तु आमची काहीतरी समजूत काढून आम्हाला खाऊ देशीलच.

अभंग क्र. २२६८
नागर गोडे बाळरूप । ते स्वरूप काळीचे ॥१॥
गाईगोपाळांच्या संगे । आले लागे पुंडलीका ॥धृपद॥
ते हे ध्यान दिगांबर । कटी कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगे चि उभे । भक्तीलोभे राहिले ॥३॥
नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभे ॥४॥
सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥
मोहरी पावा गांजिवा पाठी । धरिली काठी ज्या काळे ॥६॥
रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥
भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥
तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तंपासी राहिला ॥१०॥
अर्थ
या विठ्ठलाचे बाळ रूप हे अतिशय गोंडस आहे. विठ्ठलाचे म्हणजे श्री कृष्णाचे लहानपणीचे सावळे रूप आता पुंडलिका करता गाई गोपाळ गौवळण संगेच पंढरीला आले आहे. ते ध्यान दिगंबर स्वरूप आहे आणि कटेवर कर ठेवून अतिशय शोभत आहे. अज्ञानपणा घेऊन उगाचच कटेवर कर ठेवून भक्तांच्या लोभाकरता ते उभे राहिलेले आहेत. त्याला मान सन्मानाची अपेक्षा नाही व ते तो जाणत ही नाही तो केवळ विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे. त्याचे हात कटेवर आहे व हातात दहीभाताची शिदोरी आहे, ज्याच्या हातात बासरी, पावा, शिदोरी आहे आणि ती पाठीवर टाकलेली आहे आणि त्या काळी त्याने गाईचे रक्षण करण्यासाठी काठीही हातात धरली आहे. असा पांडुरंग, आता क्रीडा करण्यासाठी याने चंद्रभागेचे रम्य स्थळ निवडले आहे. भीमा दक्षिण मुख होऊन वाहते आहे आणि तो पांडुरंग आपली दृष्टी समोर ठेऊन पाहतो आहे. अज्ञानी लोकाचा उद्धार देखील करील असे वचन पुंडलिकाला त्यांने दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग वैकुंठवासी आहे परंतु भक्त पुंडलिकासाठी त्�

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading