७ जुलै, दिवस १८८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५७६ ते ६००, सार्थ तुकाराम गाथा अभंग २२४५ ते २२५६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ७ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२४५ ते २२५६ चे पारायण आपण करणार आहोत.
७ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५७६ ते ६००,

576-13
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणी । देखे मग मनी । विटे जो गा ॥576॥
असा पुढे येणार्‍या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पहातो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो.
577-13
म्हणे पाहे हे येईल । आणि आताचे भोगिता जाईल । मग काय उरेल । हितालागी ? ॥577॥
तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे ?
578-13
म्हणौनि नाइकणे पावे । तव आईकोनि घाली आघवे । पंगु न होता जावे । तेथ जाय ॥578॥
म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो, आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थान, तीर्थ वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो.
579-13
दृष्टी जव आहे । तव पाहावे तेतुले पाहे । मूकत्वा आधी वाचा वाहे । सुभाषिते ॥579॥
जेथपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे ते बोलून घेतो.
580-13
हात होती खुळे । हे पुढील मोटके कळे । आणि करूनि घाली सकळे । दानादिके ॥580॥
हात लुळे होतील, ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


581-13
ऐसी दशा येईल पुढे । तै मन होईल वेडे । तव चिंतूनि ठेवी चोखडे । आत्मज्ञान ॥13-581॥
अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो.
582-13
जै चोर पाहे झोंबती । तव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचता कीजे ॥582॥
जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी,
583-13
तैसे वार्धक्य यावे । मग जे वाया जावे । ते आताचि आघवे । सवते करी ॥583॥
त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. जे करावयाचे ते सर्व केले.
584-13
आता मोडूनि ठेली दुर्गे । का वळित धरिले खगे । तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला की ? ॥584॥
आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय ? (तो नागवला जात नाही. )
585-13
तैसे वृद्धाप्य होये । आलेपण ते वाया जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणो कैचा ॥585॥
तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण (शंभर वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे काय ? (की नाही) कोणास ठाऊक ?


586-13
झाडिलीचि कोळे झाडी । तया न फळे जेवी बोंडी । जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई ? ॥586॥
तीळाचे कोळ (तीळाचे उपटलेले झाड) एकदा झाडून त्यातील सगले तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नी जरी असला, पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय ?
587-13
म्हणौनि वृद्धाप्याचे आठवे । वृद्धाप्या जो नागवे । तयाच्या ठायी जाणावे । ज्ञान आहे ॥587॥
(त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील ?) असे वृद्धावस्थेत होणार्‍या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे.
588-13
तैसेचि नाना रोग । पडिघाती जव पुढा आंग । तव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥588॥
व्याधी = त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो.
589-13
सापाच्या तोंडी । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥589॥
सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो,
590-13
तैसा वियोगे जेणे दुःखे । विपत्ति शोक पोखे । ते स्नेह सांडूनि सुखे । उदासु होय ॥590॥
त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ती ठेऊन उदास होऊन रहातो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


591-13
आणि जेणे जेणे कडे । दोष सूतील तोंडे । तया कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥591॥
आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्‍या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो.
592-13
ऐसाइसिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥592॥
अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना, ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज.
593-13
आता आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥593॥
आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक.

श्लोक 9
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥13. 9॥
अर्थ देहासंबधी अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे ॥13-9॥
594-13
तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारी । बैसला आहे ॥594॥
अनासक्ती-
तर बिर्‍हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिर्‍हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो.
595-13
का झाडाची साउली । वाटे जाता मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाही ॥595॥
अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते.


596-13
साउली सरिसीच असे । परी असे हे नेणिजे जैसे । स्त्रियेचे तैसे । लोलुप्य नाही ॥596॥
अलोलुपता
आपली सावली आपल्याबरोबरच नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते,
597-13
आणि प्रजा जे जाली । तिये वस्ती कीर आली । का गोरुवे बैसली । रुखातळी ॥597॥
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी, प्रजेसंबंधी उदास असतो.
598-13
जो संपत्तीमाजी असता । ऐसा गमे पंडुसुता । जैसा का वाटे जाता । साक्षी ठेविला ॥598॥
अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टीविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो, तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते.
599-13
किंबहुना पुंसा । पांजरियामाजी जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥599॥
फार काय सांगावे ? राघू जसा पिंजर्‍यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो.
600-13
एऱ्हवी दारागृहपुत्री । नाही जया मैत्री । तो जाण पा धात्री । ज्ञानासि गा ॥600॥
एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १८८ वा. ७, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२४५ ते २२५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २२४५
कथा देवाचे ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसे पुण्य आणीक नाही सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥धृपद॥
मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना । म्हणता नारायणा क्षणे जळती महा दोष ॥२॥
भावे करिता कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका ॥३॥
अर्थ
हरिकथा करणे म्हणजेच देवाचे ध्यान केल्यासारखे आहे आणि हरी कथेसारखे इतर कोणतेही श्रेष्ठ साधन नाही. कारण हरीकथेसारखे पुण्य इतर कोणत्याही साधनांमध्ये नाही. कथेमध्ये साक्षात देवच उभा आहे असा खरा शुद्ध भक्तिभाव मनात असावा. हरी कथेमध्ये मनात हरीचे ध्यान करून वाचेने नाम मंत्राचा उच्चार करणे हे सर्वासाठीच अगदी सोपे आहे. मुखाने केवळ नारायणाचे नामस्मरण जरी केले तरी क्षणात महादोषा सारखे पातके जळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रद्धेने हरिकीर्तन करतो तो स्वतःही तरतो आणि इतर लोकांनाही तारत असतो. मग त्याला नारायणाची भेट होते यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.

अभंग क्र. २२४६
कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथीचे उत्तम चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥धृपद॥
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा ॥२॥
अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णु या सुखा ॥३॥
अर्थ
कथेमध्ये देवभक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम असतो. कथेमध्ये असणाऱ्या हरी भक्तांचे चरणरज वंदन करणे हे फारच उत्तम आहे. शुद्ध आणि पवित्र हरी कथा ऐकल्यानंतर अनेक महा पापाचे महा दोषाचे डोंगर जळून जातात आणि त्याने नर नारी हे सर्व शुद्ध होतात. पण जे पवित्र हरी कथा करतात आणि हरी कथा चालू असताना हरी चे गीत गातात हरीचे वर्णन ऐकतात आणि कथेमध्ये जे आदराने बसतात तेच खरे शुद्ध होतात. हरिकथा ज्या ठिकाणी चालू असते तेथे सर्व प्रकारचे तीर्थ पवित्र होण्यासाठी येतात. हरिकथा करणारे वैष्णवांच्या पायाच्या तळाखाली पर्वकाळ नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी कथेचा महिमा अनुपम्य आहे आणि हरी कथेला जगामध्ये कोणतीही उपमा देता येत नाही. ब्रम्‍हदेव देखील हरी कथेच्या सुखाचे वर्णन करू शकत नाही.

अभंग क्र. २२४७
सांडूनि कीर्तन न करी आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥१॥
आवडीचे आर्त पुरवी पंढरिराया । शरण तुझ्या पाया या चि लागी ॥धृपद॥
टाळी वाहूनिया विठ्ठल म्हणेन । तेणे निवारीन भवश्रम ॥२॥
तुका म्हणे देवा नुपेक्षावे आम्हा । न्यावे निजधामा आपुलिया ॥३॥
अर्थ
कीर्तन सोडून मी कोणतेही काम करणार नाही आणि देवा तुझ्या रंगात मी निर्लज्ज होऊन नाचेल. हे पंढरीराया माझी आर्त भावना तु आता पूर्ण कर यासाठीच मी तुला शरण येऊन तुझ्या पायाला येऊन लागलो आहे. मी टाळी वाजवून केवळ विठ्ठलाचे नामस्मरण करील त्यामुळे माझे सर्व भवश्रम नाहीसे होतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तु आमची उपेक्षा करू नकोस आम्हाला तुझ्या निज स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन जावे.

अभंग क्र. २२४८
जळती कीर्तने । दोष पळतील विघ्ने ॥१॥
हेचि बिळवंत गाढे । आनंद करू दिंडीपुढे ॥धृपद॥
कली पापाची हे मूर्ती । नामखड्ग घेऊ हाती ॥२॥
तुका म्हणे जाऊ । बळे दमामे ही लावू ॥३॥
अर्थ
हरी कीर्तनामुळे सर्व दोष जळून जातात आणि विघ्ने पळून जातात. अशा प्रकारचे बल या हरी कथेत आहे आम्ही आनंदाने हरिकथा करू दिंडी पुढे वीणा घेऊन नाचू. कली म्हणजे पापाचीच मूर्ती आहे आणि त्याला मारण्यासाठी आम्ही नाम रुपी तलवार हातात घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात हरिकीर्तन करून आपण तर वैकुंठाला जाऊच परंतु हरिकीर्तनाने वैकुंठाला जाता येते असा नगाराही आपण पिटऊ.

अभंग क्र. २२४९
यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता । जेथे होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा । सुदर्शन येवा घरटी फिरे भोवती ॥धृपद॥
चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारी । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे ॥३॥
अर्थ
यम आपल्या दूतांना सांगतो की मी तुम्हाला जेथे जेथे सांगेल तेथे तेथे तुम्हाला जाण्याची सत्ता नाही. ती जागा म्हणजे जेथे हरिकथा चालू आहे आणि जेथे नेहमी हरिनाम चालू असते तेथे तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. अशा वैष्णवांच्या गावाला तर काय त्या गावाची हद्द जेथे संपते त्या शिवेपर्यंत सुद्धा जाऊ नका. कारण त्या गावाच्या भवताली भगवंताचे सुदर्शन चक्र सुरक्षा कवच म्हणुन फिरत असते. हरी खुद्द त्यांच्या द्वारात शंखचक्र घेऊन उभे असतात. अशा नामधारक वैष्णवांच्या घरी लक्ष्मी रिद्धी सिद्धी सहित काम करणारी दासी म्हणून कामाला असते. तुकाराम महाराज म्हणतात या पृथ्वीतलावर सर्वात बलवानाचेही शिरोमणी हरिभक्त आहेत. अशी कीर्ती हरी भक्तांची आणि नामधारकाची यम आपल्या दूतांना कानात सांगतो.

अभंग क्र. २२५०
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एक वेळे ॥१॥
काय मोकलिले वनी । सावजांनी वेढिले ॥धृपद॥
येथवरी होता संग । अंगे अंग लपविले ॥२॥
तुका म्हणे पाहिले मागे । एवढया वेगे अंतरला ॥३॥
अर्थ
विराहात असलेली एक गौळण कान्हाला म्हणते हे जग जेठि कान्हया मला एक वेळ तरी तु भेट दे. तु मला या प्रपंचरुपी आरण्यात एकटे आणि मोकाटपणे का टाकून दिले आहेस येथे मला सावजानी म्हणजे काम-क्रोधादी हिंस्र पशूंनी वेढले आहे. हे हरी तुझा संग मला इथपर्यंत लागला परंतु आता तु अचानक तुझे शरीर तुझ्या निज स्वरूपात लपून टाकले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी नुसते बहिरमुख होऊन थोडेसे या प्रपंचाकडे पाहिले तर तु एवढ्या वेगाने माझ्यापासून लगेच अंतरलास.

अभंग क्र. २२५१
आपुल्या आम्ही पुसिले नाही । तुज काही कारणे ॥१॥
मागे मागे धावत आलो । काही बोलो यासाठी ॥धृपद॥
बहुत दिस होते मनी । घ्यावी धणी एकांती ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । कान्हो पाहे मजकडे ॥३॥
अर्थ
देवा तुझ्याकडे काही कारणास्तव येतांना आम्ही आम्हाला देखील विचारले नाही. तुझ्याबरोबर काहीतरी बोलावे यासाठी आम्ही तुझ्या मागे मागे धावत आलो. खूप दिवसापासून मनात होते की एकातामध्ये तुझे सुख भोगावे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात हे कान्हा आम्ही तुझ्या मागे मागे आलो परंतु तु थोड्यावेळ तरी उभा राहून माझ्याकडे पहा.

अभंग क्र. २२५२
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरी दारी नांदती ॥१॥
चोरूनिया तुजपाशी । येता त्यासी न कळता ॥धृपद॥
दोन्ही ठायी समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥
अर्थ
गोकुळातील स्त्रिया, नारी, सर्व बया धन्य आहेत की ज्या घरी ही सुखाने नांदतात आणि तुझे दर्शनही सुखाने घेतात. आणि घरी कोणालाही कळू न देता चोरून तुझ्या जवळ येत असत. देवा त्यांना तुझ्या ठिकाणी आणि संसारात दोंही ठीकाणी सारखेच समाधान मिळत होते, खरे तर दोन्हीकडे सारखे समाधान मिळणे हे पुष्कळ जनांसाठी कठीण असते. तुकाराम महाराज म्हणतात आपला जीव अर्पण करून देवाची भेट घेणारे जगामध्ये दुर्लभच आहेत.

अभंग क्र. २२५३
उदासीना पावल्या वेगी । अंगा अंगी जडलिया ॥१॥
वेटाळिला भोवता हरी । मयोरफेरी नाचती ॥धृपद॥
मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥
तुका म्हणे नारायणी । निराजनी मीनलिया ॥३॥
अर्थ
काही गवळणी संसाराविषयी उदासीन झाल्या आणि त्या कृष्णाकडे धावत जाऊन कृष्णाच्या अंगाला अंग देऊन त्याच्या स्वरूपात जोडून गेल्या. त्यांनी हरीच्या भोवती वेढा घातला आणि मयूरा प्रमाणे फेरी करून नाचू लागल्या. त्या गवळणी मनाला येईल तशा क्रीडा करू लागल्या त्या अनेक होत्या परंतू हरी हा एकटा होतातरी देखील हरीने अनेक रूप धारण करून सर्वाच्या इच्छा पूर्ण केल्या. तुकाराम महाराज म्हणतात या सर्व गवळणी नारायणाच्या स्वरूपामध्ये मिसळून गेल्या.

अभंग क्र. २२५४
विषमाची शंका वाटे । सारिखे भेटे तरी सुख ॥१॥
म्हणऊनि चोरिले जना । आल्या राणा एकांती ॥धृपद॥
दुजियासी कळो नये । जया सोय नाही हे । ॥
तुका म्हणे मोकळे मन । नारायण भोगासी ॥३॥
अर्थ
विषमस्वभाव असलेल्या मनुष्याशी व्यवहार करताना आपल्याला शंका उत्पन्न होते परंतु सारखा स्वभावाचा माणूस भेटला की सुख वाटते. म्हणून गवळणी लोकांना चोरून रानामध्ये एकातात आल्या होत्या. हरीचे सुख हे किती गोड आहे हे दुसऱ्याना कळू नये यासाठी ते रानात येत असत. तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा सुख भोग जर घ्यायचा असेल तर मन षड विकारांपासून तसेच कोणत्याही दुष्ट कल्पना वाचून भरलेले नसून मोकळे असावे लागते.

अभंग क्र. २२५५
आळिंगन कंठाकंठी । पडे मिठी सर्वांगे ॥१॥
न घडे मागे परते मन । नारायण संभोगी ॥धृपद॥
वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियात ॥२॥
तुका म्हणे अंतर्ध्यानी । जीव जीवनी विराल्या ॥३॥
अर्थ

रास क्रिडा करत असताना काही गोपिका हरीच्या कंठाला कंठ तर काही गोपिकांची हरीच्या सर्वांगाला मिठी पडत होत्या. नारायणाचा संभोग घेत असताना पुन्हा घराकडे मन मागे फिरणे हे शक्य नव्हते. गोपिका कृष्णाच्या बोलण्यामध्ये आपले बोलणे एकत्रित करीत होत्या तर काही गवळणी कृष्णाच्या डोळ्यांमध्ये आपले डोळे मिसळत होत्या. तुकाराम महाराज म्हणतात तर काही गोपी अंतरंगांमध्ये हरीचे ध्यान करून जीवाचे जीवन असणाऱ्या हरी मध्ये विरून गेल्या होत्या.

अभंग क्र. २२५६
कोणी सुना कोणी लेकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥धृपद॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आले जीवावर तरी ॥३॥
अर्थ
गवळणी मध्ये कोणी सुना कोणी लेकी तर कोणी सासवा होत्या म्हणजे तीन प्रकारच्या, एक मुक्त दुसरी मुमुक्षु आणि तिसरी विषयासक्त, हया सर्व गवळणी हरीच्या रूपाला भुलल्या होत्या. त्यामुळेच तर त्या सर्व गवळणींची जगात निंदा झाली आणि त्यांची चेष्टा सर्व लोक करू लागले. त्या सर्व गवळणी घरी आई बाप पती घरच्या कोणालाही न विचारता चोरून चोरून देवाला येऊन भेटत असत. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्या गवळणी प्रमाणे हरिची सेवा करावी जरी जीवावर काही आले तरी देखील देवाची सेवा करावी.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading