११ जुलै, दिवस १९२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६७६ ते ७०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २२९३ ते २३०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“११ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ११ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ११ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
११ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६७६ ते ७००,

676-13
येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामी झाला ॥676॥
एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील,
677-13
हा ठायवरी । तया नामाचे भय हरी । मग म्हणे अवधारी । आणिके चिन्हे ॥677॥
गुरुभक्ताच्या नावाच्या उच्चार येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय (दोष) हरण करतो, मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक, असे देव म्हणाले.
अज्ञानाची लक्षणे = कर्म करण्य़ाविषयी आळस
678-13
तरि आंगे कर्मे ढिला । जो मने विकल्पे भरला । अडवीचा अवगळला । कुहा जैसा ॥678॥
तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय.
679-13
तया तोंडी कांटिवडे । आंतु नुसधी हाडे । अशुचि तेणे पाडे । सबाह्य जो ॥679॥
त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात (पाणी नसते). त्या आडाप्रमाणे जो आतबाहेर अमंगल असतो.
680-13
जैसे पोटालागी सुणे । उघडे झाकले न म्हणे । तैसे आपले परावे नेणे । द्रव्यालागी ॥680॥
ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


681-13
इया ग्रामसिंहाचिया ठायी । जैसा मिळणी ठावो अठावो नाही । तैसा स्त्रीविषयी काही । विचारीना ॥681॥
कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करत नाही.
682-13
कर्माचा वेळु चुके । का नित्य नैमित्तिक ठाके । ते जया न दुखे । जीवामाजी ॥682॥
विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही,
683-13
पापी जो निसुगु । पुण्याविषयी अतिनिलागु । जयाचिया मनी वेगु । विकल्पाचा ॥683॥
पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय नि:संग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते.
684-13
तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळा । वित्ताशेते ॥684॥
जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज.
685-13
आणि स्वार्थे अळुमाळे । जो धैर्यापासोनि चळे । जैसे तृणबीज ढळे । मुंगियेचेनी ॥685॥
आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो,


686-13
आणि स्वार्थे अळुमाळे । जैसे थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवे । गजबजे जो ॥686॥
डबक्यात पाय घातल्या बरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो.
687-13
मनोरथांचिया धारसा । वाहणे जयाचिया मानसा । पूरी पडिला जैसा । दुधिया पाही ॥687॥
वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते,
688-13
वायूचेनि सावाये । धू दिगंतरा जाये । दुःखवार्ता होये । तसे जया ॥688॥
पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्याओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज.
689-13
वाउधणाचिया परी । जो आश्रो कहीचि न धरी । क्षेत्री तीर्थी पुरी । थारो नेणे ॥689॥
वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर रहात नाही व जो क्षेत्रात तीर्थांचे ठिकाणी अथवा सप्तपुर्‍यांपैकी कोण्या एका पुरीत कायम रहाण्याचे जाणत नाही.
690-13
का मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥690॥
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


691-13
जैसा रोविल्याविणे । रांजणु थारो नेणे । तैसा पडे तै राहणे । एऱ्हवी हिंडे ॥691॥
ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल, तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो.
692-13
तयाच्या ठायी उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्ये भावंड । मर्कटाचे ॥692॥
जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे.
693-13
अणि पै गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाही वोढावारा । संयमाचा ॥693॥
अज्ञानाची लक्षणे = निग्रह नाही आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही.
694-13
लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरंडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥694॥
ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्माला तोंड देण्यास भीत नाही,
695-13
व्रताते आड मोडी । धर्माते पाये वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥695॥
व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच रहात नाही.


696-13
नाही पापाचा कंटाळा । नेणे पुण्याचा जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥696॥
ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो.
697-13
कुळेसी जो पाठमोरा । वेदाज्ञेसी दुऱ्हा । कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥697॥
जो आपल्या कुळातील आचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास कर्म कोणते, यातील निवड जो जाणत नाही,
698-13
वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निरंजणी ॥698॥
अज्ञानाची लक्षणे= (विषयात गुंतलेला) सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट पाहिजे तिकडे वहात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वहात असतो.
699-13
आंधळे हातिरू मातले । का डोंगरी जैसे पेटले । तैसे विषयी सुटले । चित्त जयाचे ॥699॥
आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते.
700-13
पै उबडा काय न पडे । मोकाटु कोणा नातुडे । ग्रामद्वारीचे आडे । नोलांडी कोण ॥700॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पण उघड्यावर काय काय पडत नाही ? मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही ? गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडत नाही ?

दिवस १९२ वा. ११, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२९३ ते २३०४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २२९३
भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी समाधान ॥१॥
म्हणऊनी मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु वेळोवेळा ॥धृपद॥
आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचितावाचूनिया ॥२॥
तुका म्हणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥
अर्थ
पूर्व कर्मा मुळेच सुख दुःखादी भोग घडत असतात या विचाराने मन समाधानी करावे. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा खेद माणू नये वेळोवेळी सारखे गोविंद गोविंद असे म्हणत राहावे. आपल्या संचित कर्मा वाचून कोणतेही भोग घडत नाहीत त्यामुळे काहीही झाले तरीही इतरांवर रुसू नये. तुकाराम महाराज म्हणतात जर नारायणा वरचं सर्व रक्षणाचा व्यवहाराचा भार घातला तर तोच तुमचा कैवारी होईल. <

अभंग क्र. २२९४
निर्वैर व्हावे सर्वभूतांसवे । साधन बरवे हेचि एक ॥१॥
तरीच अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेविण ॥धृपद॥
सोइरे पिशुन समान चि घडे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केले होय ॥३॥
अर्थ
या पृथ्वीतलावर जेवढे काही भूतमात्रा आहेत त्यांच्याशी वैर धरू नये एवढेच एकच साधन चांगले आहे. असे केले तरच नारायण आपला अंगीकार करील नाही तर कितीही परमार्थिक बडबड केली तरी ती व्यर्थ शिणच होईल. ज्याला सोयरे सज्जन भूतमात्र हे सर्व एकसमान म्हणजे देवा सारखेच वाटतात आणि ज्याचे चित्त परोपकार करण्यासाठी ओढ घेतात त्यांचाच नारायण अंगीकार करील. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की चित्त निर्मळ झाले की सर्व केलेले कर्म सार्थकी होतात.

अभंग क्र. २२९५
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥
रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥धृपद॥
मानदंभांसाठी । पडे देवासवे तुटी ॥२॥
तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या निर्दैवा ॥३॥
अर्थ
एखाद्या तपासव्याने आपल्या वाचेणे एखाद्याला शाप किंवा आशीर्वाद दिला तर त्याने मागे केलेल्या तपाचा क्षय होतो. तपसव्यांच्या घरी रिद्धी सिद्धी येतात आणि त्यांचे किर्तीचा फापटपसारा वाढवीत असतात. मानदंभासाठी तपसव्याने देवापासून अंतर पाडून घेतलेले असते म्हणजे देवापासून तो अंतरतो. तुकाराम महाराज म्हणतात मेवा आणि मिठाईचा भार वाहणाऱ्या वेठ कामगारांना त्याचा लाभ कसा होईल त्याप्रमाणे जे तपस्वी वाचासिद्धी तसेच रिद्धी सिद्धी आणि मानदंभासाठी जगतात त्यांना देवाच्या समाधानाचे सुख कसे प्राप्त होईल तर होणारच नाही.

अभंग क्र. २२९६
तापल्यावाचून नव्हे अळंकार । पिटूनिया सार उरले ते ॥१॥
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति । नासे शत्रु होती मित्र ते चि ॥धृपद॥
कलेवर बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ॥२॥
तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरी ॥३॥
अर्थ
सोने तापवले की त्यातील हिणकस पदार्थ निघून जातो मग त्याला ठोकून त्याचे अलंकार केले जाते. असे जर केले नाही तर सोने कधीही शुध्द जातीचे होत नाही त्याप्रमाणे मन शुद्ध केले तरच मनुष्य देवरूप होतो म्हणजे जे पूर्वी आपल्याला शत्रू वाटत होते तेच आता मित्र वाटतात. शरीराला संचित कर्मानुसार जसे भोग येतील तसे भोगत रहावे. जसे शरीराला गळू झाला की तो गळू कापल्याशिवाय रोग बरा होणार नाही त्यामुळे तो गळु कापु द्यावा थोडे दुख: होईल पण तो गळू एकदा कापला की रोग बरा होईलच त्याप्रमाणे आपले भोग आपण भोगावेत त्याविषयी दुख वाटू देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात मन दृढ करावे म्हणजे स्वयंपाक करणारा जसा अन्न शिजेपर्यंत त्या अग्नीची धग सहन करतो त्याप्रमाणे साधकाने साधना करताना पुष्कळ गोष्टी सहन कराव्यात.

अभंग क्र. २२९७
पाठेळ करिता न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥
आपणा आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटी विरो द्यावे ॥धृपद॥
नवनीत तोवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पाया जन मग ॥३॥
अर्थ
घोडा किंवा बैल हे पाठेळ म्हणजे पाठीवर ओझे वाहणारे जनावर आहे ते लहान असताना त्यांच्या अंगावर साधा वारा जरी आला तरी ते त्यांना सहन होत नव्हते पण एकदा कि ते मोठे झाले, त्यांच्या अंगी सहनशक्ती आली मग त्यांच्या अंगावर कितीही मोठी गोणी टाकली तरी ते सहजच घेऊन चालत असतात. आपल्या अंतःकरणामध्ये आनंद झाला किंवा क्रोध उत्पन्न झाला तर तो बाहेर प्रगट करू नये तो आपल्याच पोटात विरून द्यावा हीच खरी कसोटी असते. लोणी कढवण्यास ठेवले तर जोपर्यंत त्याच्यात लोण्याचा अंश आहे तोपर्यंत ते कडकड असा आवाज करते परंतु एकदा की त्याचे तूप झाले की ते निश्चल होते शांत होते. तुकाराम महाराज म्हणतात एखादा सामान्य दगड आहे व त्याला मूर्तिकारांनी टाकीचे घाव घातले कि तो दगड देवाच्या मूर्तीत बदल होईपर्यंत व्यवस्थित राहिला तर त्याला नंतर देव पणा येऊन लोक त्याच्या पाया पडतात.

अभंग क्र. २२९८
कावळिया नाही दया उपकार । काळिमा अंतर विटाळते ॥१॥
तैसे कुजनाचे जिणे अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥धृपद॥
कडु भोंपळ्याचा उपचारे पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥
तुका म्हणे विष सांडू नेणे साप । आदरे ते पाप त्याचे ठायी ॥३॥
अर्थ
कावळ्याला कोणाची दया येत नाही व कोणी त्याच्यावर उपकार केले तर त्याची जाणीवही त्याला नसते कारण त्याचा रंग ही काळा असतो व त्याचे अंतकरण ही काळेपणाने विटाळलेले असते. तसेच काही माणसे असतात कि जे नेहमी दुसऱ्याचे वाईटच पहात असतात कुत्सित असतात त्यांचे जिने म्हणजे अमंगळ असते ते आपल्या तोंडाने नेहमी अमंगल म्हणजे वाईटच बोलत असतात. कडू भोपळयला कितीही उत्कृष्ट पदार्थात टाकून केला तरी तो कडूच होतो आणि त्याचे सेवन केल्यास डोक्यात तिडिक उटते. तुकाराम महाराज म्हणतात सापाला केव्हा ही आपल्या अंगातून कायमस्वरूपीचे विष बाहेरून काढून टाकावे असे वाटत नाही उलट त्याला विषा विषयी आदरच वाटतो.

अभंग क्र. २२९९
लाभ खरा नये तुटी । नाही आडखळा भेटी ॥१॥
जाय अवघिया देशा । येथे संचलाची तैसा ॥धृपद॥
मग न लगे पारखी । अवघी सकट सारखी । तुका म्हणे वोळे । रूपे भुलविले डोळे ॥३॥
अर्थ
पंढरीला जर गेले तर कोणत्याही प्रकारचे नुसकान होत नाही उलट मोक्षाचा लाभ होतो आणि देवाची भेट होण्यास कोणताही अडथळा येत नाही. मग तु कोणत्याही देशाला जा, तु जेथे जाशील तेथे सर्वत्र पांडुरंगचं संचारून भरलेला आहे असाच तुला अनुभव येईल. मग तुला काय चांगले किंवा काय वाईट याची पारक करण्याची देखील गरज पडणार नाही कारण तुला सरसकट सर्व काही देवासारखेच दिसेल. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे स्वरूपच सगळीकडे प्रकट झाले असून त्याने डोळ्याला मोहित केले आहे भूलविले आहे त्यामुळे त्याला शरण जावे.

अभंग क्र. २३००
नको आता पुसो काही । लवलाही उसंती ॥१॥
जाय वेगी पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥धृपद॥
वचनाचा न करी गोवा । रिघें देवासी शरण ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
अर्थ
तु आता जास्त काही विचारू नकोस लवकर आवर. तो पांडुरंग दिनाचा सोयरा आहे त्यामुळे तु लवकर पंढरपूरला जावे. तु जास्त काही बोलण्याच्या नादाला लागू नको तु देवाला शरण लवकर जा. तुकाराम महाराज म्हणतात त्या कृपावंत पांडुरंगाला दीन जणांची खूप चिंता आहे.
अभंग क्र. २३०१
अभंग क्र. २३०१
बुद्धिहीना जडजीवा । नको देवा उपेक्षूं ॥१॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हा दीना दासांची ॥धृपद॥
चिंतूनिया आले पाय । त्यासी काय वंचना ॥२॥
तुका म्हणे पुरुषोत्तमा । करी क्षमा अपराध ॥३॥
अर्थ
देवा बुद्धीहीन जड जीवांची तू उपेक्षा करू नकोस. एवढे अम्हा दिन दासाची विनंती देवा कृपया करून ऐका. जे फक्त तुझ्या पायाचे चिंतन करत करत तुझ्याजवळ सेवेसाठी आलेत त्यांची उपेक्षा करणे म्हणजे त्यांची वंचना केल्यासारखेच नाही काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे पुरुषोत्तमा तुला शरण आलेल्या, तुझ्या जवळ आलेल्या भक्तांचे काही आपराध झाले असेल तर ते क्षमा करा.
3:42

अभंग क्र. २३०२
म्हणऊनि काकुळती । येतो पुढत पुढती । तुमचिया असे हाती । कमळापती भांडार ॥१॥
फेडू आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥धृपद॥
कोठे न घाली धाव । याजसाठी त्यजिली हाव । घेऊ नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥
कारणांच्या गुणे । वेळ काळ तोही नेणे । तुमच्या कीर्तने । तुका तुम्हा जागवी ॥३॥
अर्थ
हे कमळापती मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का काकुलती येतोय, कारण तुमच्या जवळ सर्व द्रव्याचे भांडवल आहे. देवा तुम्ही भक्ताचे दारिद्रय फेडण्याचे मनात जरी आणले तरी त्याला काहीच उशीर लागणार नाही. तुम्ही नुसते हाताने आम्हाला अभय जरी दिले तरी आम्हाला ते खूप झाले. देवा तुमच्या वाचून मी कुठेही धाव घालत नाही व त्यामुळेच मी सर्व हाव टाकून दिली आहे. आणि मनात जरी खोटी हाव धरून धावण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या मनाला विरोध केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आमचे कल्याण व्हावे यासाठी आम्ही वेळ काळ काही ही न पाहता तुमचे कीर्तन करून तुम्हाला जागवीत आहे.
3:43

अभंग क्र. २३०३
बहु नावे ठेविली स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥
बहु सोसे सेवन केले बहुवस । बहु आला दिस गोमटयाचा ॥धृपद॥
बहुता पुरला बहुता उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥
बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां ॥३॥
अर्थ
देवा मी तुझी स्तुती करण्याच्या आवडीने तुला पुष्कळ नावे दिली आहेत आणि त्या नामाने माझ्या ब्रम्ह रसाच्या आनंदात आणखी भर पडली आहे. मी ते तुझे नाम खूप आवडीने पुष्कळ सेवन केले व त्यामुळे प्रत्येक दिवस फारच चांगल्या प्रकारे उदयास आले आहेत. देव हा पुष्कळ भक्तांना पुरून पुष्कळ भक्तांसाठी उरला आहे आणि या देवाने अनेक रूपे धारण करून अनेक भक्तांचा उद्धार ही केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाला खूप काकुलतीला येऊन तुझ्या खूप निकट आलो आहे आणि त्या हरीच्याच ठिकाणी माझी वृत्ती स्थिर केली आहे.
3:43

अभंग क्र. २३०४
इहलोकी आम्हा वस्तीचे पेणे । उदासीन तेणे देहभावीं ॥१॥
कार्‍यापुरते कारण मारगी । उलंघूनि वेगी जावे स्थळा ॥धृपद॥
सोंगसंपादणी चालवितो वेव्हार । अत्यंतिक आदर नाही गोवा ॥२॥
तुका म्हणे वेच लाविला संचिता । होईल घेता लोभ कोणा ॥३॥
अर्थ
हे इहलोक म्हणजे पृथ्वी एक मुक्कामाचे ठिकाण आहे आणि आपला मुक्काम संपला की हा देह आपल्याला सोडावा लागणार आहे हे आम्हाला माहीत झाले त्यामुळे आम्ही देहाविषयी उदासीन झालो आहोत. भगवत प्राप्तीचे मुख्य कार्य आमच्या डोळ्यापुढे आहे आणि मनुष्य देह हा एक प्रकारचा भगवत प्राप्ती करण्याचा मार्गच आहे. आणि त्याच्या साह्याने आम्ही लवकरच या स्थळाला उल्लंघून भगवंताच्या नीज स्वरूपापर्यंत जाणार आहोत. जसा नट एखादे सोंगाचे संपादन करतो त्याप्रमाणे मी या भवसागरात व्यवहार चालवीत आहे आणि याची मला असक्ती देखील राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःचे संचित कर्म स्वतः लाच भोगावे लागते यामध्ये कोणी सहभागी होऊ शकत नाही आणि जरी झाले तरी त्याचा कोणालाही लाभ होणार नाही किंवा हानी होणार नाहीहे लक्षात ठेवावे.
3:43

अभंग क्र. २३०४
इहलोकी आम्हा वस्तीचे पेणे । उदासीन तेणे देहभावीं ॥१॥
कार्‍यापुरते कारण मारगी । उलंघूनि वेगी जावे स्थळा ॥धृपद॥
सोंगसंपादणी चालवितो वेव्हार । अत्यंतिक आदर नाही गोवा ॥२॥
तुका म्हणे वेच लाविला संचिता । होईल घेता लोभ कोणा ॥३॥
अर्थ
हे इहलोक म्हणजे पृथ्वी एक मुक्कामाचे ठिकाण आहे आणि आपला मुक्काम संपला की हा देह आपल्याला सोडावा लागणार आहे हे आम्हाला माहीत झाले त्यामुळे आम्ही देहाविषयी उदासीन झालो आहोत. भगवत प्राप्तीचे मुख्य कार्य आमच्या डोळ्यापुढे आहे आणि मनुष्य देह हा एक प्रकारचा भगवत प्राप्ती करण्याचा मार्गच आहे. आणि त्याच्या साह्याने आम्ही लवकरच या स्थळाला उल्लंघून भगवंताच्या नीज स्वरूपापर्यंत जाणार आहोत. जसा नट एखादे सोंगाचे संपादन करतो त्याप्रमाणे मी या भवसागरात व्यवहार चालवीत आहे आणि याची मला असक्ती देखील राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःचे संचित कर्म स्वतः लाच भोगावे लागते यामध्ये कोणी सहभागी होऊ शकत नाही आणि जरी झाले तरी त्याचा कोणालाही लाभ होणार नाही किंवा हानी होणार नाहीहे लक्षात ठेवावे.
3:44

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading