३ जुलै, दिवस १८४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४७६ ते ५०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २१९७ ते २२०८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१९७ ते २२०८चे पारायण आपण करणार आहोत.
३ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४७६ ते ५००,

476-13
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत । जे स्फटिकगृहीचे डोलत । दीप जैसे ॥476॥
म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियांद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात.
477-13
विकल्प जेणे उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीची बीजे । अंकुर घेती ॥477॥
ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते).
478-13
ते आइके देखे अथवा भेटे । परी मनी काहीचि नुमटे । मेघरंगे न काटे । व्योम जैसे ॥478॥
अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत.
479-13
एऱ्हवी इंद्रियांचेनि मेळे । विषयांवरी तरी लोळे । परी विकाराचेनि विटाळे । लिंपिजेना ॥479॥
एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही.
480-13
भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळे तियापरी । राहाटो जाणे ॥480॥
वाटेवरून ब्राह्मण स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही वा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोहोंपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


481-13
का पतिपुत्रांते आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाच्या आंगी । न रिगे कामु ॥481॥
एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते. परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो.
482-13
तैसे हृदय चोख । संकल्पविकल्पी सनोळख । कृत्याकृत्य विशेख फुडे जाणे ॥482॥
त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंत:करण पक्के जाणते.
483-13
पाणिये हिरा न भिजे । आधणी हरळु न शिजे । तैसी विकल्पजाते न लिंपिजे । मनोवृत्ती ॥483॥
जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही.
484-13
तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण । हे देखसी तेथ जाण । ज्ञान असे ॥484॥
अर्जुना, यास पुरे शुचित्व असे म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील तेथे ज्ञान आहे असे समज.
485-13
आणि स्थिरता साचे । घर रिगाली जयाचे । तो पुरुष ज्ञानाचे । आयुष्य गा ॥485॥
8) स्थैर्य
आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे.


486-13
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसीची ॥486॥
त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विस्कटतत नाही.
487-13
वत्सावरूनि धेनूचे । स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥487॥
गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही (वासरावरून हलत नाही), सती जाणार्‍या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगांकडे येत नाही.
488-13
का लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये । तैसा देहो चाळिता नव्हे । चळु चित्ता ॥488॥
अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी रहातो. त्याप्रमाणे त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते.
489-13
जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥489॥
इकडून तिकडे फिरणार्‍या मेघाबरोबर आकाश धावत नाही, अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही,
490-13
पांथिकाचिया येरझारा । सवे पंथु न वचे धनुर्धरा । का नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥490॥
अर्जुना, वाटसरूंच्या येण्या-जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


491-13
तैसा चळणवळणात्मकी । असोनि ये पांचभौतिकी । भूतोर्मी एकी । चळिजेना ॥491॥
त्याप्रमाणे चलन वलन करणार्‍या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणार्‍या क्षुधादि षडूर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही.
492-13
वाहुटळीचेनि बळे । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रव उमाळे । न लोटे जो ॥492॥
वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही.
493-13
दैन्यदुःखी न तपे । भवशोकी न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ॥493॥
दारिद्र्यापासून होणार्‍या त्रासामुळे दु:खी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही.
494-13
अर्ति आशा पडिभरे । वय व्याधी गजरे । उजू असता पाठिमोरे । नव्हे चित्त ॥494॥
कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांचे भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही.
495-13
निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥495॥
निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही.


496-13
आकाश हे वोसरो । पृथ्वी वरि विरो । परि नेणे मोहरो । चित्तवृत्ती ॥496॥
आकाश नाहीसे होवो आथवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते.
497-13
हाती हाला फुली । पासवणा जेवी न घाली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेली । शेलिला सांता ॥497॥
हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही.
498-13
क्षीरार्णवाचिया कल्लोळी । कंपु नाही मंदराचळी । का आकाश न जळे जाळी । वणवियाच्या ॥498॥
क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही.
499-13
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतीही ॥499॥
त्याप्रमाणे शोकमोहादि षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामधे (चित्तस्थिरतेमधे) गडबड उडत नाही. फार काय सांगावे ? कल्पांतसमय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो.
500-13
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणया ॥500॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज.

दिवस १८४ वा. ३, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१९७ ते २२०८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २१९७
तुम्हासाठी आम्हा आपुला विसर । करिता अव्हेर कैसे दिसे ॥१॥
विचारा जी आता ठायीचे हे देवा । आम्हा नये हेवा वाढविता ॥धृपद॥
आलो टाकोनिया सुखाची वसती । पुढे माझ्या युक्ती खुंटलिया ॥२॥
तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुमच्यासाठी आमचा सर्वस्वाचा विसर पाडला आहे आणि असे असून देखील तुम्ही आमचा अव्हेर करता हे कसे दिसेल ? हे देवा आता याविषयी तुम्ही स्वतःशीच विचार करून पहा आम्ही तर तुमचे भक्त आहोत त्यामुळे आम्हाला तुमच्याशी द्वेष मत्सर वाढवता येणार नाही. देवा सर्व सुखाच्या वस्ती तुझ्याजवळ आहे म्हणून मी तुझ्या कडे आलो आहे आणि तरीही मला जर सुख मिळत नसेल तर मग तुझ्याकडे माझ्या युक्त्या खुंटल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जो काही वृतांत तुला सांगायचा होता तो सगळा सांगितला म्हणून मी तुला नमस्कार केला आहे.

अभंग क्र. २१९८
करावा उद्धार हे तुम्हा उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥
पाववील हाक धावा म्हणऊन । करावे जतन ज्याचे तेणे ॥धृपद॥
दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसो ॥२॥
तुका म्हणे माझे कायावाचामन । दुसरे ते ध्यान करित नाही ॥३॥
अर्थ
देवा आमचा उद्धार करणे हे तुमच्या साठी उचीत आहे आम्हाला जशी धर्म नीती समजली आहे त्याप्रमाणे आम्ही वागलो आहोत. देवा ती धर्म नीती अशी आहे की आम्ही तुझ्या कानापर्यंत पोहोचेल अशा आवाजात देवा धाव, देवा धाव अशी हाक मारली आहे जसे मी माझे कर्तव्य केले तसे तु तुझे कर्तव्य कर माझा उध्दार कर कारण ज्याचे त्याचे कर्तव्य ज्याने त्याने करावे. जो आपले कर्तव्य व्यवस्थित करत नाही त्याला दोष दिलाच पाहिजे हा आम्ही भाव जाणतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी माझे कर्तव्य म्हणजे तुझे ध्यान करणे हे काया-वाचा-मनाने अगदी योग्यतेने करत आहे इतर कोणाचेही ध्यान मी करीत नाही.

अभंग क्र. २१९९
संताचे उपदेश आमुचे मस्तकी । नाही मृत्यु लोकी राहाणेंसा ॥१॥
म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धावत पांडुरंगे ॥धृपद॥
उपजली चिंता लागला उसीर । होत नाही धीर निढळ वाटे ॥२॥
तुका म्हणे पोटी रिघालेंसे भय । करू आता काय ऐसे जाले ॥३॥
अर्थ
या मृत्यूलोकांमध्ये आल्यानंतर पांडुरंगाची प्राप्ती केल्याशिवाय राहू नये हा संतांचा उपदेश आमच्या शिरावर आहे. त्यामुळे हे पांडुरंगे माझे चित्त फार तळमळत आहे तु माझ्याकडे लवकर धावत यावेस. हे पांडुरंगे तु लवकर येत नाही माझ्याकडे येण्यास तु उशीर लावला, का लावला आहे याविषयी माझ्या मनात चिंता निर्माण झाली मला आता धीर धरवत नाही माझे कोणते दैव आडवे आले आहे की काय असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा पांडुरंगा आता तुझी मला भेट होईल की नाही याविषयी भय माझ्या पोटात शिरले आहे त्यामुळे मला आता काय करू आणि काय नाही असे झाले आहे.

अभंग क्र. २२००
काळावरी घालू तरि तो सरिसा । न पुरता इच्छा दास कैसे ॥१॥
आता नाही काही उसिराचे काम । न खंडावे प्रेम नारायणा ॥धृपद॥
देणे लागे मग विलंब का आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥
तुका म्हणे होईल दर्शने निश्चिंती । गाईन ते गीती ध्यान मग ॥३॥
अर्थ
देवा तुझी भेट होण्यास काळ सध्या पोषक नाही असे म्हणून काळावर दोष घालने हे चुकीचे आहे कारण तो सर्वासाठी सारखाच आहे आणि जरी काळ अनुकूल असला तरी तुझ्या कडून आमची इच्छा पूर्ण झाली नाही तर आम्ही तुझे दास कसले ? हे नारायणा आता माझी भेट घेण्यासाठी उशीर होण्याचे काहीच कारण नाहीहे आणि माझ्याविषयी तुझे प्रेम खंडू देऊ नकोस. देवा आम्हा भक्तांना तुला कधीतरी भेट द्यावी लागेल मग असे असून देखील विलंब का लावत आहेस आम्हा भक्तांसाठी तु सुरुवाती पासून गोड आहेस आणि गोडच राहणार आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा की तुमचे दर्शन झाले मग मी निश्चिंत होईल मग मी तुमचेच गीत गायीन आणि तुमचे ध्यान करीन.

अभंग क्र. २२०१
अभंग क्र. २२०१
परउपकारे कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया ॥१॥
याजसाठी असे योजिले श्रीपति । संकल्पाचे हाती सर्व जोडी॥धृपद॥
परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥
तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झाले नेणा दुर्वासया ॥३॥
अर्थ
जे नेहमी दुसऱ्यावर पर उपकार करण्यासाठी आपली काया-वाचा-मन हे तत्पर ठेवत असतात आपले शरीर झिजवत असतातव त्याचे रक्षण भगवंताचे सुदर्शनचक्र करीत असते. यासाठीच सुदर्शन चक्राची योजना केली आहे आणि जसा मनुष्याच्या मनात संकल्प असेल त्याप्रमाणेच त्याला त्याच्या इच्छा प्राप्त होत असतात. ज्याची वाणी नेहमी दुसर्‍याची पिडा निंदा करण्यात सरसवते त्याच्या डोक्यात यमदूत खेटरे मारून त्याची पूजा करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अंबरीश राजाला शाप देणाऱ्या दुर्वास ऋषीचा आणि पांडवाचा छळ करणाऱ्या दुर्योधनाची सूदर्शनाने कशी स्थिती केली हे तुम्हाला माहित नाही का ?

अभंग क्र. २२०२
हागिल्याचे सिंके वोणवाचि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥
अतेता समय नेणता अवकळा । येऊ नये बाळा सिक धरा ॥धृपद॥
भोजनसमयी ओकाचा आठव । ठकोनिया जीव कष्टी करी ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
अर्थ
एखादे लहान मुल हागल्या नंतर उनवेच राहते त्याचे तसे पाहून एखादा वेडगळ मनुष्य ही तसाच राहतो परंतु त्याचे तसे राहणे म्हणजे अपशकुनच असते. एखादी गोष्ट योग्य वेळेत न झाल्याने अवकळाच ओढुन घेतल्यासारखे होते आणि एखादी क्रिया अशी करू नका की जेणेकरून बळेच दुराग्रह तुमच्या अंगावर येईल याची शिकवण तुम्ही मनात धरा. जेवण जेवताना काही लोक आपण ओकलो होतो, ते कसे ओकलो होतो हे आठवण करून उगाच जीवाला कष्ट करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात अभाग्याला एखादी चांगली गोष्ट किती वेळा म्हणून समजून सांगावे परंतु त्यांना ते कळतच नाही कारण त्यांना त्यांचे दुर्गुणच अनावर झालेले असतात.

अभंग क्र. २२०३
नारे तरि काय नुजेडे कोंबडे । करूनिया वेडे आग्रह दावी ॥१॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृपद॥
नेमून ठेविला करत्याने काळ । न लाहेसे बळ करू पुढे ॥२॥
तुका म्हणे देव साह्य जाल्यावरी । असंगाचे करी सर्व संग ॥३॥
अर्थ

कोंबडे जरी आरवले नाही तरी उजडायचे राहते काय पण काही वेडे लोक कोंबड्याला झाकून ठेवतात आणि आपला मूर्खपणा उघड करतात. त्याला हे कळत नाही की आपल्याला पुण्याचा विभाग मिळत आहे तो असा की कोंबडा सकाळी आरवला तर लोक लवकर उटतील परंतु जर लोकांना समजले याने कोंबडा झाकून ठेवला होता तर जग त्याची छितू करील. त्याप्रमाणेच या जग निर्मात्या देवाने आपल्याही मरणाचा काळ ठरवून ठेवलेला आहे तो पुढे ढकलता यावा यासाठी त्याचे साहाय्य घ्यावे आणि त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. तुकाराम महाराज म्हणतात देव जर साह्य झाला तर असंग व्यक्तीचे देखील तो काम पुरे करतो.

अभंग क्र. २२०४
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥
अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठली ॥धृपद॥
निरविले तेव्हा त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥
तुका म्हणे रूप ध्यावे । नाही ठावे गुणदोष ॥३॥
अर्थ
हरीचे दास सदा निर्भर (आनंदभरीत) असतात ते चिंता, आशा यांच्या रहित असतात. त्यांचा सर्व भक्तीभाव केवळ एका विठ्ठला वरच असतो. ज्यावेळी त्यांनी आपला जीवच देवाला अर्पण केलेला असतो त्यावेळी पासूनच देव त्यांच्या ठिकाणी अभेद रूपाने वास करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हरिदास केवळ सर्वत्र देवाचेच स्वरूप आहे असे मानतात कोणामध्येही ते गुण दोष पाहात नाहीत.

अभंग क्र. २२०५
वेडिया उपचार करिता सोहळे । काय सुख कळे तयासी ते ।
अंधापुढे दीप नाचती नाचणे । भक्तीभावेविण भक्ती तैसी ॥१॥
तिमाणे राखण ठेवियेले सेता । घालुनिया माथा चुना तया ।
खादले म्हणोनि सेवटी बोंबली । ठायीची भुली का नेणा रया ॥धृपद॥
मुकियापासाव सांगता पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय ।
नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय ॥२॥
हात पाय नाही करिल तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक ।
हाता नये तैसा वाया च तळमळी । भावेविण भोळी म्हणे तुका ॥३॥
अर्थ
वेड्या मनुष्याला कितीही चांगले प्रकारचे वस्त्र नेसवले, अलंकार परिधान केले तरी तो सुखसोहळा त्याला काय कळणार आहे. आंधळ्या मनुष्यापुढे अनेक प्रकारचे दीपके लावले आणि चांगला नृत्याचा कार्यक्रम केला तरी त्याला काही कळणार आहे काय, तसेच नुसती भक्ती करून उपयोग नाही तर भक्ती करताना भक्ती आणि भाव हे दोन्हीही पाहिजेत तरच भक्ती करण्याचा खरा आनंद असतो. शेतकरी एक काठी उभी करून त्यावर मडके ठेवून चुन्याने त्याला डोळे नाक तोंड काढतो आणि शेतीचे रक्षण करण्यासाठी बुजगावण म्हणून उभे करतो. परंतु तरीदेखील पक्षी येतात आणि शेतातील धान्य खातात मग शेवटी शेत मालक बोंबलत बसतो परंतु बुजगावणे व्यर्थ आहे हे त्याला सुरवातीलाच का कळत नाही. मुक्या पुढे पुरान सांगून आणि रोग्या पुढे मिष्टांअन्न ठेवून काय उपयोग आहे ? नपुंसक माणसापुढे सुंदर तरुणी जरी आणली तर त्याचा काय उपयोग होणार आहे त्याप्रमाणेच त्यांच्या वाणीत मधुरता आणि गोडवा नाही त्याचे बोलणे म्हणजे व्यर्थच ठरते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या मनुष्याला हात पायच नाहीत आण�

अभंग क्र. २२०६
मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नछत्री । भूती द्यावे सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तमयाती पोसना ॥धृपद॥
बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडखी । थीता ठके सेखी । पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संतांशी । पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी वाटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनिपाहावे वरी रंगा न भुलावे । तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी ते ॥४॥
अर्थ
एखाद्या ज्ञानी व्यक्तीने मेघ वृष्टी प्रमाणे उपदेश करावा परंतु गुरूने कधीही शिष्य करू नये. कारण शिष्यांनी कोणतेही पुण्याचे किंवा पापाचे कर्म करू त्याचा अर्धा वाटा गुरूला लाभत असतो. अधिक धनवान असेल तर त्या मनुष्याने द्रव्य म्हणजे धन एखादया अन्नछत्रा सारख्या ठिकाणी अर्पण करावे सर्व भूतमात्रांना अन्न खाण्यास द्यावे. आपण जर निपुत्रिक आहात तर एवढ्या मोठ्या धनाला वारसदार कोण असे समजून एखाद्या उत्तम जातीच्या मुलाला देखील दत्तक घेऊ नये. खडकाच्या ठिकाणी आणि जेथे ओलावा राहत नाही त्याच्या बुडखाला बीज पेरू नये. कारण अशा प्रकारची शेती शेवटी काहीच फळ देत नाही शेती करण्यासाठी ज्या दिवाना कडून ऋण घेतलेले असते तो दिवान शेवटी त्या ऋणाची फेडणी करण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागतो. गुज काही असेल तर ते संतांजवळ बोलावे आणि जशी दासी असते त्याप्रमाणे पत्नी ला राखावे. परंतु तिला जर लाड दिला तर, तिने केलेल्या कर्माचा अर्धा वाटा तिच्या पतीला प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला कोणती गोष्ट आवडली तर ती पूर्णपणे शुद्ध कसू�

अभंग क्र. २२०७
नावडावे जन नावडावा मान । करूनि प्रमाण तू चि होई ॥१॥
सोडवूनि देहसंबंध वेसने । ऐसी नारायणे कृपा कीजे॥धृपद॥
नावडावे रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायापाशी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसे ॥३॥
अर्थ
हे नारायणा मला जन आवडू नये, मला मान-सन्मान आवडू नये तुच प्रमाणभुत माझ्यासाठी होऊन राहा. या देहा संबंधी जेवढे काही म्हणून व्यसने आहेत ती सर्व सोडवण्याची कृपा नारायणाने माझ्यावर केली पाहिजे. देवा मला तुझ्या रूपा वाचून आणि तुझ्या ब्रम्ह रसावाचून इतर कोणतेही रुप किंवा रस आवडू नये. केवळ तुझ्या पाया पाशीच माझी सर्व इच्छा असावी. तुकाराम महाराज म्हणतात ये अनंता मी तुम्हाला जे काही मागितले आहे ते तुम्ही तुमच्या सत्तेने करून ठेवा.

अभंग क्र. २२०८
उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । काहीच संसार तुम्हा नाही ॥१॥
ऐसे मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥धृपद॥
निस्संग तुम्हासी राहणे एकट । नाही कटकट साहो येक ॥२॥
तुका म्हणे नाही मिळो येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही उपाधी पेक्षा वेगळे निर्विकार आहात तुम्हाला जन्ममरण रुपी संसार हा मुळीच नाही. हे नारायणा मलाही अगदी तुमच्यासारखेच एकदम करा आणि माझी सर्व वासना मुळासहीत नष्ट करा. देवा तुम्हाला निसंग आणि एकटे राहण्यास आवडते कोणत्याही प्रकारची कटकट तुम्हाला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही असे आहात जसा एखादा स्पटिक मणी सगळ्या रंगासी जुळता मिळता होतो परंतु तो सर्वापेक्षा वेगळा असतो तसेच तुमचे आहे तुम्ही सर्व जगात वास्तव्य करता खरे पण तुम्ही सर्वापेक्षा वेगळे आहात.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading