आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२२ जुलै, दिवस २०३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९५१ ते ९७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २४२५ ते २४३६
“२२ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २२ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २२ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४२५ ते २४३६ चे पारायण आपण करणार आहोत.
२२ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९५१ ते ९७५,
951-13
पै बाळ जै जेवविजे । तै घासु विसा ठायी कीजे । तैसे एकचि हेचतुर्व्याजे । कथिले आम्ही ॥951॥
मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले.
952-13
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणौनि तुझे ॥952॥
तुझे लक्ष पाहून तुझी ग्र हणशक्ती पाहून, एकाच ब्रह्माचे, एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले.
953-13
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगो ॥953॥
(हाच विचार प्रकृति व पुरुष अशी दोन प्रकारे विभागणी करून सांगतील)
आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू.
954-13
अवता चौठायी न करू । एकही म्हणौनि न सरू । आत्मानात्मया धरू । सरिसा पाडु ॥954॥
आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही. तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. (एकाच ब्रह्माचे आत्मा (पुरुष) व अनात्मा (प्रकृति) असे भाग सारखे करून सांगू.
955-13
परि तुवा येतुले करावे । मागो ते आम्हा देआवे । जे कानचि नांव ठेवावे । आपण पै गा ॥955॥
(अर्जुनाचे श्रवण =)
परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हास दिले पाहिजे. ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वत:स कानाचे नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेऊन फक्त ऐकण्याचे काम चालू दे.
956-13
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥956॥
या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नको.
957-13
ऐसेनि तो येता वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसे सांगो ॥957॥
अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून, श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृतिपुरुषाचा विभाग सांगतो ऐक.
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥13. 19॥
भावार्थ प्रकृति व पुरुष ही दोन्हीही अनादि आहेत, असे जाण. (देहेंद्रियादि) विकार आणि (सत्व इत्यादि) गुण हे प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण.
सांख्यांचा प्रकृति-पुरुष विचार
958-13
जया मार्गाते जगी । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागी । मी कपिल जाहलो ॥958॥
या मार्गाला जगामधे योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्यमार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो.
959-13
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनाते ॥959॥
तो प्रकृतिपुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले.
960-13
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैचि लागोनि प्रकृति । संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥960॥
तर दिवस आणि रा त्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी (चिकटलेली) आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे व प्रकृति ही त्यावेळेपासून (अनादि) आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
961-13
का रूप नोहे वाया । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेसी कोंडा ॥961॥
किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खर्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहेमी जडवलेलीच असते किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते.
962-13
तैसी जाण जवटे । दोन्ही इये एकवटे । प्रकृतिपुरुष प्रगटे । अनादिसिद्धे ॥962॥
त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृति-पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज.
963-13
पै क्षेत्र येणे नांवे । जे सांगितले आघवे । तेचि एथ जाणावे । प्रकृति हे गा ॥963॥
अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृति होय असे समजावे.
964-13
आणि क्षेत्रज्ञ ऐसे । जयाते म्हणितले असे । तो पुरुष हे अनारिसे । न बोलो घेई ॥964॥
आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही.
965-13
इये आनाने नांवे । परी निरूप्य आन नोहे । हे लक्षण न चुकावे । पुढतपुढती ॥965॥
ह्यास ही निरनिराळी नावे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस.
966-13
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता । प्रकृतीते समस्ता । क्रिया नाम ॥966॥
अर्जुना, केवळ सत्ता (सदत्व) तिला पुरुष असे नाव आहे. आणि (संपूर्ण) क्रियेस प्रकृति हे नाव आहे.
967-13
बुद्धि इंद्रिये अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥967॥
बुद्धि, इंद्रिये, अंत:करण इत्यादि विकारांचा समुदाय सत्वादि (सत्व, रज व तम) तिन्ही गुण.
968-13
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥968॥
हा सर्व समुदाय प्रकृतिपासून झाला आहे असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू (कारण) आहे.
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥13. 20॥
भावार्थ कार्य म्हणजे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियाकडून होणारी क्रिया, कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ, इच्छित वस्तू कर्तृत्व. इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया) या सर्वास मूळ प्रकृति आहे असे म्हणतात. आणि सुखदु:खांच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात.
969-13
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेसी आधी । मग तिया लाविती वेधी । कारणाच्या ॥969॥
(प्रकृतीच्या ठिकाणी) अगोदर इच्छा आणि बुद्धि ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग (इच्छा व बुद्धि) जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू (मिळवण्याच्या) नादी लावतात.
970-13
तेचि कारण ठाकावया । जे सूत्र धरणे उपाया । तया नांव धनंजया । कार्य पै गा ॥970॥
ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हालवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास ‘कार्य ” असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
971-13
आणि इच्छा मदाच्या थावी । लागली मनाते उठवी । ते इंद्रिये राहाटवी । हे कर्तृत्व पै गा ॥971॥
आणि मदाच्या (धुंदीच्या) आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियाकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणार्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना, कर्तृत्व असे म्हणतात.
972-13
म्हणोनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥972॥
आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृति ही मूळ आहे असे समज. असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले.
973-13
एवं तिहीचेनि समवाये । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥973॥
याप्रमाणे या तिघांच्या समुदायास प्रकृति कर्मरूप होते. परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, त्यासारखी ती बनते.
974-13
जे सत्त्वगुणे अधिष्ठिजे । ते सत्कर्म म्हणिजे । रजोगुणे निपजे । मध्यम ते ॥974॥
ज्या कर्माचा सत्वगुण अंगिकार करतो, त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे.
975-13
जे का केवळ तमे । होती जिये कर्मे । निषिद्धे अधमे । जाण तिये ॥975॥
किंबहुना जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची अधर्म्य समजावीत.
दिवस २०३ वा. २२, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४२५ ते २४३६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४२५
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणू ॥१॥
अवतार तुम्हा धराया कारणे । उद्धरावे जन जड जीव ॥धृपद॥
वाढविले सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसे तुम्ही जगी संतजन ॥३॥
अर्थ
हे संत जण हो तुम्ही मायबाप कृपावंत आहात त्यामुळे मी पतीत तुमची कीर्ति वर्णन तरी कशी करू ? तुम्ही अवतार घेता याला कारण म्हणजे जड मूढ अज्ञानी जीवाचा उद्दार करण्यासाठीच. हे संत जण हो तुम्ही अवतार घेऊन भक्ती, सुख, धर्माचरण, कुळाचार आणि विठोबाचे नाम वाढविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या झाडाच्या अंगी एक गुण आहे तो म्हणजे चंदनाच्या झाडा जवळ जे काही बोरीबाभळी इतर वृक्ष आहेत त्यांनाही तो आपल्याप्रमाणे सुगंधी करतो तसेच तुम्ही संतजन आहात तुम्ही जगामध्ये अवतार घेता आणि जगातील जड अज्ञानी जीवांना तुमच्याप्रमाणेच ब्रम्हस्वरूप करत असतात.
3:59 Sdm:
अभंग क्र. २४२६
पाठी लागे तया दवडी दुरी । घाली या बाहेरी संवसारा ॥१॥
येउनि दडे तुमच्या पायी । धावे तई छो म्हणा ॥धृपद॥
पारखियाचा वास पडे । खटबड उठी ते ॥२॥
तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊ कोणी ॥३॥
अर्थ
देवा मी ज्याच्या पाठिमागे लागतो त्याचा पाठलाग दूर पर्यंत करतो व त्याला संसाराच्या बाहेर घालवीत असतो. देवा ज्या वेळी मला उपदेश रुपी कर्म नसते त्यावेळी मी तुमच्या पाया जवळ येऊन दडून बसतो आणि तुम्ही मला छो म्हटले की मी लगेच संसारिक लोकाचा उध्दार करण्याकरता धावत जाईन. परमार्थामध्ये खरी पारख असणारे संत मुनी जण यांचा मला वास लागला की मी लगेच खडबडून उठत असतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या धन्याने मला असा धाक लावला आहे की मी मृत्युलोकातील जड जीव अज्ञानी लोकांना संसार रुपी ताक खाऊ देऊ नये आणि मी ते कोणाला खाऊ देणारच नाही.
4:00 Sdm:
अभंग क्र. २४२७
सांखळिलो प्रीती गळा । भुंके वेळा जाणोनिया ॥१॥
तुमचे मी केशीराजा । सुने या काजा पाळिलो ॥धृपद॥
आले गेले कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥
तुका म्हणे आले वारी । दुरिते दुरी नातळता ॥३॥
अर्थ
मी देवाचा पाळीव कुत्रा आहे मी देवाच्या प्रेमाच्या साखळीने बांधलो गेलो आहे आणि मी योग्य वेळ पाहूनच भुंकत असतो. हे केशी राजा तुमच्या कामा करताच मी तुमच्या जवळ पाळलेला कुत्रा आहे. कोण चांगल्या व कोण वाकड्या वाटेने आले व गेले हे मला चांगले कळते. तुकाराम महाराज म्हणतात आणि जर कोणी माझ्याकडे वाकडे वाटेने जर येताना दिसले तर मी ते दुर आहेत तोपर्यंतच त्यांना आणखी दूर करत असतो.
4:00 Sdm:
अभंग क्र. २४२८
पाळोनिया मोठे केले । त्यासी बोले ओळखी ॥१॥
जवळोनि नवजे दुरी । लाड करी कवतुक ॥धृपद॥
खून उभा विटेवर । काटींकर ठेउनिया ॥२॥
तुका म्हणे घातली वरी । झुली थोरी मोलाची ॥३॥
अर्थ
ज्या धन्याने माझे पालनपोषण करून मला मोठे केले त्याचे शब्द ऐकताच मी त्याला ओळखतो. तो माझा धनी माझ्या जवळून दुर कधीच जात नाही माझे लाड कौतुक सगळे तो पूर्ण करतो. देवाची ओळख म्हणजे जो विटेवर आपले दोन्ही कर कटेवर ठेवून उभा आहे, तुकाराम महाराज म्हणतात देवाने माझ्या अंगावर त्याची प्रेमरूपी झुली घातली आहे ती फारच मोलाची आहे.
4:01 Sdm:
अभंग क्र. २४२९
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाही काही ॥१॥
सिकविले जवळी बैसो । जेथे असो तेथे चि ॥धृपद॥
नेदी दुजे बोलो करू । गुरुगुरु न साहे ॥२॥
तुका म्हणे कृवाळिता । अंग सत्ता संगाची ॥३॥
अर्थ
देवाला भक्त रुपी कुत्र्याची फार आवड आहे व तो त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची सेवा करून घेत नाही. देवाने शिकवल्याप्रमाणे तो भक्त रुपी कुत्रा वागत असतो देवाने जिथे सांगितले तिथे बस म्हटले की तो गुपचूप तेथे बसतो. देव आपल्या लाडक्या कुत्र्याला नामावाचून इतर काहीही बोल बोलू देत नाही आणि अभिमानाने गुर गुरणे तर त्याला मुळीच सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देव आपल्या लाडक्या भक्ताचे अंग कुरवाळु लागला की त्या भक्त रुपी कुत्र्याला त्याच्या संगतीची सत्ता प्राप्त होते.
4:05 Sdm:
अभंग क्र. २४३०
शिळे खाता आला वीट । सुने धीट पाय धरी ॥१॥
कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥धृपद॥
आपुले ठायीचे घ्यावे । लाड भावे पाळावा ॥२॥
तुका म्हणे मी जुनाट सुने । मोहो आट परतला ॥३॥
अर्थ
संसारातील शिळे अन्न खाऊन खाऊन वीट आला की भक्त रुपी कुत्रा धीट होतो आणि हरीचे पाय धरतो. मग कान्होबा त्याच्या अंतकरणातील खून जाणून घेऊन भक्तीचे उन उन खास त्याला खाऊ घालत असतो. मग कान्होबाला असे वाटते की आपल्या जवळचे सर्व याला द्यावेत त्याचे सर्व लाड पुरवावे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाचा फार जुनाट कुत्रा आहे त्या मोहानेच त्याने माझे संपूर्ण अज्ञान दूर केले आहे.
4:06 Sdm:
अभंग क्र. २४३१
लागले भरते । ब्रह्मानंदाचे वरते ॥१॥
झाला हरीनामाचा तारा । सीड लागले फरारा ॥धृपद॥
बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥
तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥
अर्थ
हरिनामामुळे ब्रह्मानंदापेक्षाही आनंदाला भरती येत आहे. हा भवसागर तरुन जाण्याकरता हरिनाम रुपी जहाज तयार झाले असून त्या जहाजावर आनंदाचा फरारा असलेले शिड लागले आहे. त्या जहाजामध्ये सर्व बाळ गोपाळ बसलेले आहेत व ते देवाकडे चालले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी हरी नामाची चांगलीच वाट सापडलेली आहे.
4:07 Sdm:
अभंग क्र. २४३२
धन वित्ते कुळे । अवघियाने ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गाठी । भरला हृदय संपुटी ॥धृपद॥
अवघे चि गोड । त्याचे पुरले सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥
अर्थ
धन, वित्त आणि कुळ यापेक्षा वैष्णव हे सगळ्यापेक्षा महान आहेत. अशा महान थोर वैष्णवांच्या पदरात नारायण आहे व त्यांच्या हृदय पेटी मध्ये ही तोच आहे. वैष्णवाचे सर्व वागणे चालणे बोलणे हे गोड असून नारायण त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात सूर्याला तरी उदय अस्त आहे परंतु वैष्णवांच्या तेज्याला कधीही अस्त नाही केवळ उदयच आहे.
4:07 Sdm:
अभंग क्र. २४३३
बोलावे ते आम्ही आता अबोलणे । एकाचि वचने सकळांसी ॥१॥
मेघवृष्टी काही न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥धृपद॥
तुका म्हणे नाही समाधाने चाड । आपणा ही नाड पुढिलांसी ॥२॥
अर्थ
जे न बोलण्या सारखे आहे ते आम्ही आता उघडपणे बोलून सर्वाना एकच उपदेश करत आहोत. मेघ जसे वृष्टी करताना ठाव ठिकाणा पहात नाही सर्वासाठी एक समान वृष्टी करते त्या प्रमाणे मी उपदेश करताना सर्वाना समान करत आहे आणि ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला तो उपदेश फळ देईल. तुकाराम महाराज म्हणतात मी समाजाला उपदेश करताना कोणाला समाधान वाटावे किंवा मला समाधान वाटावे हा माझा हेतू नाही आणि मी तसे जर केले तर समोरच्यालाही त्रास आणि मलाही त्याचा त्रास होईल.
4:09 Sdm:
अभंग क्र. २४३६
मागे चिंता होती आस । केला नास या काळे ॥१॥
तुम्ही आम्हा उदासीन । भिन्नाभिन्न वारिले ॥धृपद॥
मोहजाळे दुःख वाढे । ओढे ओढे त्यास ते ॥२॥
तुका म्हणे कोण देवा । आता हेवा वाढवी ॥३॥
अर्थ
देवा मागे मला संसाराची चिंता व आस होती परंतु आता तुम्ही याचा नाश केला आहे. देवा तुम्हीच आम्हाला संसाराविषयी उदासीन केले आणि आपल्यातील भिन्न भाव नाहीसा केलास. संसारामुळे मोह उत्पन्न होतो व त्या मोहाने दुःख वाढते आणि मोह मनुष्याला संसाराकडे पुन्हा ओढत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता संसाराविषयी कोण विनाकारण हेवा वाढवेल.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















