२३ जुलै, दिवस २०४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९७६ ते १००० सार्थ तुकाराम गाथा अभंग २४३७ ते २४४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२३ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २३ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २३ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२३ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९७६ ते १०००,

976-13
ऐसेनि संतासंते । कर्मे प्रकृतीस्तव होते । तयापासोनि निर्वाळे ते । सुखदुःख गा ॥976॥
अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदु:ख होय.
977-13
असंती दुःख उपजे । सत्कर्मी सुख निफजे । तया दोहीचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥977॥
वाईट कर्मापासून दु:ख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहीचा (सुखदु:खाचा) भोग पुरुषाला होतो असे म्हणतात.
978-13
सुखदुःखे जंववरी । निफजती साचोकारी । तव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥978॥
सुख दु:ख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात, तोपर्यंत प्रकृति व्यापार करते व पुरुष भोगतो.
979-13
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगता असंगडी । जे अंबुली जोडी । आंबुला खाय ॥979॥
प्रकृतिपुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे. कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयते खातो.
980-13
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये । की आंबुली जग विये । चोज ऐके ॥980॥
या प्रकृति-पुरुषरूप नवराबायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको (प्रकृति) जग प्रसवते हे आश्चर्य नाही का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥13. 21॥
भावार्थ प्रकृतीचे ठिकाणी स्थित असलेला (प्रकृतिपरतंत्र झालेला) पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या वाईट जन्मांना कारण होय ॥13-21॥
पुरुष वर्णन


981-13
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥13-98॥
कारण की तो पुरुष अंगहीन (निराकार), पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुनापुराणा, अती म्हातार्‍यांपेक्षा म्हातारा आहे.
982-13
तया आडनांव पुरुषु । एऱ्हवी स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाही ॥982॥
त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नंपुसकही नाही. फार काय सांगावे ? अमूक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही.
983-13
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥983॥
त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काही नाही.
984-13
अर्जुना काहीचि जेथ नाही । तो प्रकृतीचा भर्ता पाही । की भोगणे ऐसयाही । सुखदुःखांचे ॥984॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे, असे समज. पण अशा नवर्‍यास (पुरुषासही) सुखदु:खे भोगावी लागतात.
985-13
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥985॥
(प्रकृती वर्णन)


तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते.
986-13
जियेते अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥986॥
ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणार्‍या गोष्टी घडविते.
987-13
मा इये प्रकृती तव । गुणमयी हेचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥987॥
मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे ? प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत.
988-13
हे प्रतिक्षणी नित्य नवी । रूपा गुणाचीच आघवी । जडातेही माजवी । इयेचा माजु ॥988॥
ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो. (म्हणजे जडाला हालचाल करावयास लावतो).
989-13
नामे इये प्रसिद्धे । स्नेहो इया स्निग्धे । इंद्रिये प्रबुद्धे । इयेचेनि ॥989॥
हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत.
990-13
कायि मन हे नपुंसक । की ते भोगवी तिन्ही लोक । ऐसे ऐसे अलौकिक । करणे इयेचे ॥990॥
मन हे नंपुसक नाही काय ? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


991-13
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचे रूप । विकार उमप । इया केले ॥991॥
ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत.
992-13
हे कामाची मांडवी । हे मोहवनीची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥992॥
ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव (आधार) आहे व ही मोहरूपी वनातील वसंतऋतु आहे व हिला दैवीमाया हे नाव प्रसिद्धच आहे.
993-13
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥993॥
ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे, ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी (हल्ला) आहे.
994-13
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥994॥
सर्व कला येथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे.
995-13
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचे वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥995॥
ही नादाची टांकसाळ आहे (म्हणजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहे), ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे ? सर्व खेळ हिचा आहे.


996-13
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हे असो अद्भुत । मोहन हे ॥996॥
जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच. सकाळ, संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे.
997-13
हे अद्वयाचे दुसरे । हे निःसंगाचे सोयरे । निराळेसि घरे । नांदत असे ॥997॥
ही प्रकृती एकाकी असणार्‍या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणार्‍या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे.
998-13
इयेते येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणौनि तया आवरी । अनावराते ॥998॥
हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे म्हणून ही त्या अनावराला (पुरुषाला) आपल्या आटोक्यात आणते.
999-13
तयाच्या तव ठायी । निपटूनि काहीचि नाही । की तया आघवेही । आपणचि होय ॥999॥
त्याच्या (पुरुषाच्या) ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. (हेच पुढे सांगतात).
1000-13
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥1000॥
त्या स्वत:सिद्ध असणार्‍या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे रहाणे व रहाण्याचे ठिकाण आपणच होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २०४ वा. २३, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४३७ ते २४४८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. २४३७
असो खटपट । आता वाउगे बोभाट ॥१॥
परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणी ॥धृपद॥
अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥
तुका म्हणे वेथा । तुह्मा कळे पंढरिनाथा ॥३॥
अर्थ
देवा आता इतर खटपट व व्यर्थ बोलणे बास झाले. देवा माझी एक विनंती तुम्ही ऐका ते म्हणजे माझे मस्तक तुमच्या चरणावर असू द्यावे. हे दातारा माझ्याकडून जे आपराध घडले त्यांना तुम्ही क्षमा करा व यापुढेही करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा तुम्हाला आमच्या सर्व व्यथा समजतात.
4:10 Sdm:

अभंग क्र. २४३८
अहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥
निवारले जाणे येणे । कोणा कोणे रुसावे ॥धृपद॥
संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥
तुका म्हणे उभयता । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
अर्थ
आहो विटेवर उभे असणाऱ्या देवा तुम्ही आमच्या आजपर्यंत खूप खटपट चुकविली आहे. तुम्ही आमच्या सर्वाचे जन्म-मरणच चुकविले आहे त्यामुळे आता आम्ही कोणी व कोणावर रुसावे. आतापर्यंत विविध प्रकारचे संकल्प करण्यातच माझे बळ खर्च झाले आहे आणि त्या संकल्पाच्या भाराने विविध प्रकारचे सुख आणि दुःख रुपी फळे निर्माण झालेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची माझी भेट केवळ लोभाच्या सत्तेमुळे झाली. नाही तर माझ्यात एवढे बळ नव्हते कि तुमची माझी भेट व्हावी.
4:10 Sdm:

अभंग क्र. २४३९
वारकरी पायापाशी । आले त्यासी विनविले ॥१॥
काय काय ते आइका । विसरो नका रंकासी ॥धृपद॥
चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥
तुका म्हणे संसारा । रुसलो खरा यासाठी ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या पाया जवळ जे वारकरी आलेले आहेत त्यासी मी विनविले आहे. त्यांच्याजवळ मी एक पत्रही दिले आहे त्या पत्रामध्ये मी काय काय लिहिलेले आहे ते ऐका, माझी पहिलीच विनंती लिहिली ती म्हणजे मला रंकाला तुम्ही विसरू नका. देवा त्याविषयीच मी सारखी चिंता करतो आणि या चिंतेनेच माझी अशी चिंताग्रस्त अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची भेट व्हावी यासाठी तर मी खरा संसारावर रुसलो आहे.
4:11 Sdm:

अभंग क्र. २४४०
जीवीचे का नेणा । परि हे आवडी नारायणा ॥१॥
वाढवावे हे उत्तर । काही लाड करकर ॥धृपद॥
कोठे वाया गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥
तुका म्हणे बाळा । असता तात्पर्य खेळा ॥३॥
अर्थ
हे नारायणा माझ्या मनात कोणती इच्छा आहे हे तुम्हाला माहित नाही काय परंतु तुम्हाला माझ्या मुखातून ती इच्छा ऐकायची आहे आणि तुम्हाला हेच आवडते. अहो तुम्ही मला सारखे बोलून माझे बोलणे वाढवता आणि लाडाने माझ्याकडून काहीतरी करकर करून घेता. देवा मी बोललेले सर्व शब्द चांगले व उत्तम असून ते कधी वायाला गेले आहेत काय ? तुकाराम महाराज म्हणतात या गोष्टीचा अर्थ असा की माझ्यासारख्या बाळाला सारखे सारखे तुम्ही बोलायला लावता आणि तुम्ही स्वतःची करमणूक करून घेता.
4:11 Sdm:

अभंग क्र. २४४१
वोढविले अंग । आता करूनि घ्यावे सांग ॥१॥
काय पूजा ते मी नेणे । जाणावे जी सर्वजाणे ॥धृपद॥
पोटा आले बाळ । त्याचे जाणावे सकळ ॥२॥
तुका म्हणे हरी । वाहावे जी कडियेवरी ॥३॥
अर्थ
देवा मी आता माझे पूर्ण शरीर तुम्हाला अर्पण केले आहे त्यामुळे त्याचा तुम्ही स्वीकार करून परिपूर्ण करून घ्यावे. देवा तुम्ही सर्व जाणते आहात तुम्हाला सर्व समजते पण मला तुमची पूजा कशी करावी तेच समजत नाही. पोटाला आलेल्या बाळाचे सर्वकाही दुखणे भाणे सुख-दुःख जाणून घेणे हे आई चे कामच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मला बालकाला तुम्ही कडेवर घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
4:12 Sdm:

अभंग क्र. २४४२
शेवटींची हे विनंती । पाय चित्ती रहावे ॥१॥
ऐसे करा कृपादान । तुम्हा मन सन्निध ॥धृपद॥
भाग्याविण कैची भेटी । नव्हे तुटी चिंतने ॥२॥
तुका म्हणे कळसा आले । हे विठ्ठले परिसावे ॥३॥
अर्थ
देवा तुमचे पाय चित्तात राहावे ही मी तुम्हाला शेवटची विनंती करत आहे. देवा माझे मन तुमच्या सान्निध्यात राहील असेच कृपादान तुम्ही माझ्यावर करा. देवा माझे भाग्य उजळल्या शिवाय तुमची भेट तरी कशी होईल परंतु नुसते केवळ तुमचे चिंतन जरी केले तरी तुमची भेट घडण्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझी विनंती ही एक कळकळीची असून ती विठ्ठलाने ऐकून पूर्ण करावी.
4:12 Sdm:

अभंग क्र. २४४३
करूनिया शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥
तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥धृपद॥
तेथे सरे शुद्ध साचे । अंतरीचे बीज ते ॥२॥
तुका म्हणे लवणकळी । पडता जळी ते होय ॥३॥
अर्थ
आपले मन शुद्ध व स्वच्छ करून नारायणाचे स्मरण करावे. तरच हा भवसिंधु तरुण जाता येईल व भवबंध तोडता येईल. अंतकरणात शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि खरे श्रद्धेचे बीज तेथेच असते. तुकाराम महाराज म्हणतात जसा लवणाचा खडा पाण्यात टाकला की तो पाणी रूपच होतो.
4:13 Sdm:

अभंग क्र. २४४४
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे काही ॥१॥
काय केलो एकदेशी । गुणदोषी संपन्न ॥धृपद॥
पडे तेथे तुझ्या पाया । करी वाया न वजते ॥२॥
तुका म्हणे विषमे सारी । ठाणे धरी जीवासी ॥३॥
अर्थ
देवा मी जिकडे पाहिल तिकडे मला देवच दिसावा असाच भक्तिभाव माझ्या ठिकाणी तु कृपा करून द्यावास. मी एकदेशी झालो असून देहालाच मी समजून मी गुणदोषाणी संपन्न झालो आहे. देवा मी ज्या ठिकाणी पाया पडेल तेथे तुमचे चरण असून माझे मस्तक तुमच्या चरणावर पडावे इतर ठिकाणी कोठेही माझे मस्तक पडून वाया जाणार नाही असे तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जिवाला विश्वातील सारे विषमता आणि भेद नाहीसे करून तुमच्याच ठिकाणी माझ्या जीवाला आश्रय देऊन त्याचा तुम्ही स्वीकार करा.
4:13 Sdm:

अभंग क्र. २४४५
सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ॥१॥
नको वाढू ऐसे काचे । दे वो साच विठ्ठला ॥धृपद॥
रडत मागे सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
अर्थ
दात्याने दान दिले व ते दान संपले तर त्या दात्याचे दान देऊन काय उपयोग होते. त्यामुळे हे विठ्ठले तु मला असे दान देऊ नकोस की जे कच्चे असेल तु खरे दान मला दे जे अविनाश असेल तेच दान तु मला द्यावे. मागे रडत येणाऱ्या मुलाचा त्याग करून पुढे जाणारी आई फार थोर असते काय ? तुकाराम महाराज म्हणतात ज्या योगाने दान देणाऱ्या दात्याची कीर्ती वाढेल असेच दान दात्याने द्यावे हीच धर्म नीती आहे.
4:14 Sdm:

अभंग क्र. २४४६
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥
त्याच्या पूर्वजा पतन । नरकी किडे होती जाण ॥धृपद॥
कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥२॥
मासा श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरा ॥३॥
तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
अर्थ
लोभावर लक्ष ठेवून लोभाचे हीत मनात बाळगून जो न्यायधीश असत्य न्याय निवाडा करतो, त्याच्या पूर्वजांचे पतन होते आणि तो स्वतः व त्याचे पूर्वज देखील नरकात किडे होऊन पडतात असे जाणावे. त्याला निश्चयानेच कोटी गोहत्या केल्याचे पातक लागत असते. स्री प्रत्येक मासाला जो विटाळ स्रर्वत असते, तोच विटाळ खोटा न्याय निवाडा करणाऱ्या न्यायाधीश आपल्या पूर्वजांना पाजीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा खोट्या न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशाला यम त्रास देऊन त्याला नक्कीच कठोर शासन करेल.
4:15 Sdm:

अभंग क्र. २४४७
देह जाईल जाईल । यासी काळबा खाईल ॥१॥
का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥धृपद॥
लोडे बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥
शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥३॥
अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥४॥
अर्थ
अरे देह कधीतरी जाईल नक्कीच जाईल याला काळ खाईल. अरे दगडा तुला अजून कसे उमजत नाही समजत नाही कसले हत्ती घोडे आणि वाडा तु घेऊन बसला आहेस ? अरे लोड गादया तक्के हे तुला तरुण पणात चांगले वाटतात परंतु पुढे वृद्धावस्‍था आली की तुझ्या फजितीला अंतपारच नाही राहणार. जसे भोरडे ( शेतात आलेली कंस खाणारे पक्षी) शेतमालकाला पूर्ण बुडवून टाकतात तसेच शरीरसंबंधाचे असणारे नाते सर्व आप्तेष्ट तु कमवलेला संपत्तीचा नाश करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे आता तरी तु जागा हो नाहीतर पुढे तुला फार मोठा काळाचा दगा पडेल.
4:15 Sdm:

अभंग क्र. २४४८
मागे बहुता जना राखिले आडणी । धावसी निर्वाणी नाम घेता ॥१॥
ऐसे ठावे झाले मज बरव्या परी । म्हणऊनि करी धावा तुझा ॥धृपद॥
माझेविशी तुज पडिला विसरु । आता काय करू पांडुरंगा ॥२॥
अझुनि का नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिले मज ॥३॥
तुका म्हणे जीव जाऊ पाहे माझा । आता केशीराजा घाली उडी ॥४॥
अर्थ
हे देवा मागे तु पुष्कळ भक्तांचे अडचणीच्या वेळी रक्षण केलेस त्यांनी तुझे नाम घेतले की त्यांचे निर्वाणीच्या वेळेस तु त्यांच्यासाठी धावून गेलास. हे मला चांगल्याच रितीने माहित झाले आहे त्यामुळेच मी तुझा धावा करीत आहे. हे पांडुरंगा तुला माझ्याविषयी मात्र आता विसर पडला आहे त्यामुळे मी आता काय करू हे तुच मला सांग. हे नारायणा तुम्हाला अजूनही माझ्याविषयी दया का येत नाही असे तुम्ही मला तुमच्यापासून दूर का धरले आहे ? तुकाराम महाराज म्हणतात हे केशीराजा आता तुझ्या वाचून माझा जीव जाऊ पाहत आहे त्यामुळे माझ्या भेटीसाठी तु लवकर उडी घालावी.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading