२७ जुलै, दिवस २०८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०७६ ते ११००, सार्थ तुकाराम गाथा अभंग २४८५ ते २४९६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२७ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २७ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २७ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४८५ ते २४९६ चे पारायण आपण करणार आहोत.
२७ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०७६ ते ११००,

1076-13
ते सुख येणेचि देहे । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्ये नोहे । विषमबुद्धी ॥1076॥
भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते).
1077-13
दीपांचिया कोडी जैसे । एकचि तेज सरिसे । तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु ॥1077॥
कोट्यवधि दिव्यात जसे एक तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र (चराचरात) भरलेला आहे
1078-13
ऐसेनि समत्वे पंडुसुता । जिये जो देखत साता । तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥1078॥
अर्जुना, अशा समत्वाने चराचराकडे पहात असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या स्वाधीन होत नाही.
1079-13
म्हणौनि तो दैवागळा । वानीत असो वेळोवेळा । जे साम्यसेजे डोळा । लागला तया ॥1079॥
म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याला अभेदभावरूपी बिछान्यावर डोळा लागला आहे. (तो अभेदभावात स्थिर झाला आहे).

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथाऽऽत्मामकर्तारं स पश्यति ॥13. 29॥
श्लोकार्थ -: :- सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय.
(आत्मा अकर्ता आहे. हे जो जाणतो तो ज्ञानी)
1080-13
आणि मनोबुद्धिप्रमुखे । कर्मेंद्रिये अशेखे । करी प्रकृतीचि हे देखे । साच जो गा ॥1080॥
आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते. असे जो खरोखर जाणतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1081-13
घरीची राहटती घरी । घर काही न करी । अभ्र धावे अंबरी । अंबर ते उगे ॥1081॥
घरातील माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही व आकशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते.
1082-13
तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणी विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1082॥
याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे (सर्व कर्मात) आत्मा हा खांबासारखा (केवल आधारभूत) असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही.
1083-13
ऐसेनि येणे निवाडे । जयाच्या जीवी उजिवडे । अकर्तयाते फुडे । देखिले तेणे ॥1083॥
अशा या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले.

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥13. 30॥
श्लोकार्थ -: भूतांचा पृथग्भाव निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच आत्म्याचाच हा विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते.
(ज्ञानी पुढे चालू)
1084-13
एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जै या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥1084॥
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल.
1085-13
लहरी जैसिया जळी । परमाणुकणिका स्थळी । रश्मीकरमंडळी । सूर्याच्या जेवी ? ॥1085॥
लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर,


1086-13
नातरी देही अवेव । मनी आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्ही एकी ॥1086॥
अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या,
1087-13
तैसे भूताकार एकाचे । हे दिठी रिगे जै साचे । तैचि ब्रह्मसंपत्तीचे । तारू लागे ॥1087॥
त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील (खरोखर अनुभवाला येईल) त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज (होडी) मिळेल.
1088-13
मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ॥1088॥
मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे ? त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल.
1089-13
येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था । ठाये ठावो प्रतीतिपथा । माजी जाहली ? ॥1089॥
अर्जुना, एवढ्याने प्रकृती-पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभावाच्या मार्गात आला. (तुला पूर्णपणे कळला).
1090-13
अमृत जैसे ये चुळा । का निधान देखिजे डोळा । तेतुला जिव्हाळा । मानावा हा ॥1090॥
अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पहावा, त्याप्रमाणे हा प्रकृतीपुरुषविचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1091-13
जी जाहलिये प्रतीती । घर बांधणे जे चित्ती । ते आता ना सुभद्रापती । इयावरी ॥1091॥
अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे (म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा) ते आताच नाही तर यानंतर
1092-13
तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल । देई मनाते वोल । मग ते घेई ॥1092॥
आता या एकदोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे. आणि मग त्या घे. (म्हणजे ऐक).
1093-13
ऐसे देवे म्हणितले । मग बोलो आदरिले । तेथे अवधानाचेचि केले । सर्वाग येरे ॥1093॥
असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले.

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥13. 31॥
श्लोकार्थ -: कौतेया, अनादि व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराचे ठिकाणी स्थित असला तरी (काही कर्म) करीत नाही. (सर्व कर्मांपासून) अलिप्त असतो
(आत्म्याचे अलिप्तत्व)आत्मा व देह वेगवेगळे आहेत.
1094-13
तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपे । जळी जळे न लिंपे । सूर्यु जैसा ॥1094॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला, तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीत असूनही, प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, (तो शुद्धच रहातो). अशा स्वरूपाचा तो आहे असे समज.
1095-13
का जे जळा आदी पाठी । तो असतुचि असे किरीटी । माजी बिंबे ते दृष्टी । आणिकांचिये ॥1095॥
कारण की अर्जुना, जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामधे तो प्रतिबिंबित होतो. ते दुसर्‍याच्या दृष्टीने. (वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही).


1096-13
तैसा आत्मा देही । आथि म्हणिपे हे काही । साचे तरी नाही । तो जेथिचा तेथे ॥1096॥
त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, असे जे म्हटले जाते, ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे.
1097-13
आरिसा मुख जैसे । बिंबलिया नाम असे । देही वसणे तैसे । आत्मतत्त्वा ॥1097॥
आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामधे आत्मतत्वाचे राहणे आहे. (देहात आत्मतत्व प्रतिबिंबरूपाने असते).
1098-13
तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गाठी । केही आहे ? ॥1098॥
त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वार्‍याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय ?
1099-13
आगी आणि पिसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा पाषाणेसी ? ॥1099॥
अग्नि आणि पीस यांना दोरा कसा घालायचा ? (म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा ?) आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा ?
1100-13
एक निघे पूर्वेकडे । एक ते पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडे । संबंधु हा ॥1100॥
एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २०८ वा. २७, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४८५ ते २४९६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २४८५
बाळाचे जीवन । माता जाणे भूक तहान ॥१॥
काय करू विनवणी । असो मस्तक चरणी ॥धृपद॥
ठेविलिये ठायी । चित्त ठेवुनि असे पायी ॥२॥
करितो हे सेवा । चिंतन सर्वा ठायी देवा ॥३॥
न्यून ते चि पुरे । घ्यावे करोनि दातारे ॥४॥
तुका म्हणे बुद्धी । अल्प असे अपराधी ॥५॥
अर्थ
लहान मुलाची तहान-भूक त्याची आईच जाणत असते त्याप्रमाणे हे देवा तू माझी माता आहेस व माझे सर्वकाही तूच जाणतेस. त्यामुळे देवा मी तुला काय विनंती तुला माझ्या अंतकरणातील सर्व काही समजत आणि माझे मस्तक सदैव तुझ्या चरणावर असो. देवा तू मला जसा ठेवशील तसा मी राहील आणि माझे चित्त तुझे पाया वर ठेवून राहील. देवा तू सर्वत्र व्यापलेला आहे हेच मी समजून तुझेच चिंतन व तुझी सेवा करीत आहे. हे देवा माझ्यात काही न्यून पणा काही कमीपणा असेल तर तो तुम्ही पुरता करून घ्यावा हे दातारा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी अल्पबुद्धी आणि अपराधी आहे.
4:46 Sdm:

अभंग क्र. २४८६
जाणतो समये । परिमित कामा नये ॥१॥
तुम्ही सांगावे ते बरे । देवा सकळ विचारे ॥धृपद॥
फुकाचिये पुसी । चिंता नाही होते ऐसी ॥२॥
तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
अर्थ
देवा वेळप्रसंगी कसे वागावे हे तर मी जाणतो परंतु हे ज्ञान मला मुक्त करण्यासाठी कामी येणार नाही. देवा सर्व विचार करून योग्य काय आहे ते तुम्हीच मला सांगा व हेच चांगले आहे. अहो जर फुकट प्रश्न विचारून माझी चिंता नाहीशी होत असेल तर तो प्रश्न मी का बर विचारू नयेत ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या चरणावर सदैव पडून आहे त्यामुळे तुम्ही मला सहाय्य करावे.
4:46 Sdm:

अभंग क्र. २४८७
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारी राउळा ॥१॥
आपुलिया शरणागता । वाहो चिंता नद्यावी ॥धृपद॥
वचना या चित्त द्यावे । असो ठावे तुम्हासी ॥२॥
तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥
अर्थ
देवाच्या द्वारात मी द्वारपाल उभे राहून अशी विनंती करतो आहे. की हे देवा तुम्हाला शरण आलेल्या भक्तांना तुम्ही चिंता करण्याची वेळ येऊ देऊ नये. देवा मी हे का बोलतो आहे तर तुमच्या द्वारा मध्ये तुम्हाला शरण आलेले भक्त उभे आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याकडे चित्त द्यावे या कारणामुळे मी बोलतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात कृपासिंधू दीनबंधू देवा मी आज तुम्हाला जी काही विनंती केली आहे ती कृपा करून तुम्ही ऐका.
4:47 Sdm: 88 अभंग नाही
4:48 Sdm:

अभंग क्र. २४८९
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
सन्निध पातलो सांडूनिया शंका । सन्मुख चि एकाएकी पुढे ॥धृपद॥
जाणविले कोठे पावे पायापाशी । केली या जिवासी साटी ह्मुण ॥२॥
तुका म्हणे माझे हाती द्या उद्धार । करी करकर म्हणवूनि ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या चरणावर माझे मस्तक ठेवीत आहे माझी तेवढी विनंती तुम्ही ऐका. देवा मी कोणत्याही प्रकारची शंका कोणत्याही प्रकारची लाज न करता एकदमच तुमच्या पुढे आलो आहे. मी माझी विनंती जर दुसऱ्याच्या हाती तुमच्या पायाजवळ पाठवली असती तर ती तिच्या पायाजवळ येते की नाही ही शंका माझ्या मनात उपस्थित झाली त्यामुळे माझ्या जिवाला मी कष्ट देऊन एकदमच तुमच्या पाया जवळ आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी फार करकर करतो असे तुम्हाला वाटते आहे ना मग एकदाचा माझा उद्धार माझ्या हाती देऊन टाका बरं.
4:49 Sdm:

अभंग क्र. २४९०
बैसलो तो कडियेवरी । नव्हे दुरी वेगळा ॥१॥
घडले हे बहुता दिसा । आता इच्छा पुरवीन ॥धृपद॥
बहु होता जाला सीण । नाही क्षण विसावा ॥२॥
दुःखी केले मीतूपणे । जवळी नेणे होते ते ॥३॥
पाहात जे होतो वास । ते चि आस पुरविली ॥४॥
तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥
अर्थ
देवा मी आता तुमच्या कडे वर बसलो आहे आता मी तुमच्यापासून दूर आणि तुमच्या पेक्षा वेगळा कधीच होणार नाही. देवा आता तुमच्या कडे वर बसण्याचा खूप दिवसांनी योग आला आहे त्यामुळे मी आता माझी इच्छा पूर्ण करून घेणार आहे. प्रपंचामध्ये मला खूप शीण झाला आहे तेथे मला एक क्षण देखील दिसावा मिळाला नाही. देवा मी तू पणा याने मला फारच दुखी केले आहे अरे तू माझ्या जवळ आहे तरी देखील मला ते समजले नाही. मी ज्याची वाट पाहत होतो ती इच्छा देवा तुम्ही पूर्ण केली. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला मायबापा मी तुमच्याशी खूप लाडाने बोलत आहे परंतु भीती वाटत आहे की तुम्ही माझ्यावर रागवता कि काय परंतु तुम्ही माझ्यावर रागवू नका बरे.
4:50 Sdm:

अभंग क्र. २४९२
सेवके करावे सांगितले काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥
काय देवा नेणो आले गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसा ॥धृपद॥
विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळे । ते दिसे या काळे अव्हेरिले ॥२॥
तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करू हरी काय सांगा ॥३॥
अर्थ
सेवकाला सांगितलेले काम करणे हा सेवकाचा धर्म आहे आणि सांगितलेल्या कामाविषयी जबाबदारी बाळगणे हा स्वामी चा धर्म आहे. परंतु देवा तुमच्या अंगी एवढा भित्रेपणा कोठून आला आहे काही समजत नाही अलीकडे तुम्ही शक्तिहीन झाल्यासारखे दिसतात. आम्ही विष्णुदास ज्याच्या बळावर निर्भर (आनंदभरीत) राहतो तेच बळ या हरीने अव्हरले आहे असे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यामुळे तुम्ही आता मला लवकरात लवकर वैकुंठाला नेण्याचे मूळ तरी पाठवा नाहीतर येथे राहून काय करू ते तरी सांगा ?
4:51 Sdm:

अभंग क्र. २४९३
खेळता निजभावे समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखाली ॥१॥
तरी लेवविला शोभे अळंकार । नाही तरी भार मानाविण ॥धृपद॥
अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे माझे ऐसे आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पीली ॥३॥
अर्थ
सर्व समर्थ राजाचे बाळसहज जरी खेळत असले तरी सर्व काही त्याच्या सत्ते खालीच असते. असे जर असेल तर त्याने परिधान केलेले अलंकार त्याला शोभून दिसतात नाहीतर त्याला लोकांमध्ये मान सन्माना च जर नसेल तर ते अलंकार म्हणजे त्याच्यासाठी केवळ ओझे आहे. त्याचे मायबाप सर्व समर्थ असतात त्यामुळे त्याला कोठेही जाण्यास खेळण्यास सर्व दिशा मोकळ्या असाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात देवा त्या बालका प्रमाणेच माझी सत्ता आहे त्यामुळेच मी माझी सेवा तुम्हाला अर्पण केली आहे.
4:51 Sdm:

अभंग क्र. २४९४
निरांजनी एकटवाणे । संग नेणे दुसरा ॥१॥
पाहा चाळविले कैसे । लावुनि पिसे गोवळे ॥धृपद॥
लपले अंगे अंग । दिला संग होता तो ॥२॥
तुका म्हणे नव्हते ठावे । झाले भावे वाटोळे ॥३॥
अर्थ
देव पहिला निःसंग होता निरंजन होता त्याला दुसऱ्याचा संग काय असतो तेच माहीत नव्हते. परंतु या गोपाळाने आम्हाला त्याच्या स्वरूपाचे कसे वेड लावले व आम्हाला कसे वेडे केले ते पहा. देवाची मला काही दिवस संगती घडली परंतु त्याने आता मायेच्या आवरणात आपले स्वरूप लपवून टाकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देव असा ठकविणारा आहे हे आम्हाला माहीत नव्हते परंतु आता माहीत झाले आहे त्याची भक्ती आम्ही करतो आहोत त्यामुळे आमचे असे वाटोळे झाले आहे.
4:52 Sdm:

अभंग क्र. २४९५
नव्हता भेटी तोचि बरे । होता चोरे नाडिले ॥१॥
अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥धृपद॥
चिंतनांचे मूळ चित्त । नेले वित्त हरूनि ॥२॥
तुका म्हणे मूळा आले । होते केले तैसे चि ॥३॥
अर्थ
जोपर्यंत या देवाची भेट माझ्याशी झाली नव्हती तोपर्यंत माझी परिस्थिती चांगली होती परंतु ज्यावेळी माझी या देवाशी भेट झाली त्यावेळी त्याने मला पुरते फसविले. त्याने माझ्या सर्व गोष्टींचा नाश केला माझा देहरूपी वाडा त्याने संपूर्ण मोकळा करून टाकला. या भवसागर आतील चिंता करणारे माझे चित्तआणि माझे धन वित्त याने चोरून नेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा बरोबर मी प्रामाणिकपणाने राहिलो परंतु माझे चांगले राहणेच माझ्या मुळशी आले कारण जसे आपण कर्म करू तसेच पुढे होत असते.

अभंग क्र. २४९६
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे॥१॥
पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥
आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥
तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥

अर्थ नाही टाका

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading