१६ जुलै, दिवस १९७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८०१ ते ८२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २३५३ ते २३६४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१६ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १६ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १६ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३५३ ते २३६४ चे पारायण आपण करणार आहोत.
१६ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८०१ ते ८२५,

801-13
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥801॥
ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो.
802-13
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागी प्रेम ॥802॥
अर्जुना, फार काय सांगावे ! ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते.
803-13
आणिकही जे समस्त । तियेचे संपत्तिजात । ते जीवाहूनि आप्त । मानी जो का ॥803॥
अरे तिची जी आणखीही चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो.
804-13
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ । हे असो केवळ । तेचि रूप ॥804॥
तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. (फार काय सांगावे) तो अज्ञानाची मूर्तीच आहे.
805-13
आणि मातलिया सागरी । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारी । आंदोळे जेवी ॥805॥
अज्ञानाची लक्षणे = द्वंद्वयुक्त
आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या-जाण्याने झोके खाते.


806-13
तेवी प्रिय वस्तु पावे । आणि सुखे जो उंचावे । तैसाचि अप्रियासवे । तळवटु घे ॥806॥
त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो.
807-13
ऐसेनि जयाचे चित्ती । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥807॥
याप्रमाणे ज्याच्या अंत:करणात अप्रिय वस्तूप्राप्तीने दु:ख व प्रिय वस्तूप्राप्तीने सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे.
808-13
आणि माझ्या ठायी भक्ती । फळालागी जया आर्ती । धनोद्देशे विरक्ती । नटणे जेवी ॥808॥
अज्ञानाची लक्षणे = व्यभिचारी भक्ती
आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते, पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे,
809-13
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसी । जावयालागी ॥809॥
अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवर्‍याच्या अंत:करणात शिरून वागते.
810-13
तैसा माते किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥810॥
अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमधे विषय ठेवतो म्हणजे जो विषयप्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


811-13
आणि भजिन्नलियासवे । तो विषो जरी न पावे । तरी सांडी म्हणे आघवे । टवाळ हे ॥811॥
आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो,
812-13
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥812॥
अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्याप्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो, तितक्या जोराने पुन्हा दुसर्‍या देवाचीही करतो.
813-13
तया गुरुमार्गा टेके । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥813॥
ज्या गुरूचा जास्त थाटमाट पहातो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्‍याचा घेत नाही.
814-13
प्राणिजातेसी निष्ठुरु । स्थावरी बहु भरु । तेवीचि नाही एकसरु । निर्वाहो जया ॥814॥
सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते,
815-13
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनी बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥815॥
माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपर्‍यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो.


816-13
नित्य आराधन माझे । काजी कुळदैवता भजे । पर्वविशेषे कीजे । पूजा आना ॥816॥
दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसर्‍याच देवतेची पूजा करतो.
817-13
माझे अधिष्ठान घरी । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरी । पितरांचा होय ॥817॥
घरात माझी स्थापना असतांनाच दुसर्‍या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्यावेळी (श्राद्ध, पक्ष वगैरे काळी) पितरांचा भक्त होतो.
818-13
एकादशीच्या दिवशी । जेतुला पाडु आम्हासी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशी ॥818॥
एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो.
819-13
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥819॥
चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे (देवी) मी तुझा भक्त आहे असे म्हणतो.
820-13
नित्य नैमित्तिके कर्मे सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारी वाढी । बहिरवा पात्री ॥820॥
नित्य कर्मे व नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


821-13
पाठी सोमवार पावे । आणि बेलेसी लिंगा धावे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥821॥
नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो.
822-13
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गावद्वारी । अहेव जैसी ॥822॥
वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वाच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच रहाते, त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा रहात नाही (म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो)
823-13
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धावतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥823॥
त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पहाशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज.
824-13
आणि एकांते चोखटे । तपोवने तीर्थे तटे । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥824॥
आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थांची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो, तो देखील अज्ञानीच आहे.
825-13
जया जनपदी सुख । गजबजेचे कवतिक । वानू आवडे लौकिक । तोहि तोची ॥825॥
ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते, तोही तोच अज्ञानी आहे.

दिवस १९७ वा. १६, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३५३ ते २३६४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३५३
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरे ॥१॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥धृपद॥
ठायीच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥
याविण आणीक असता साधन । वाहातसे आण विठोबाची ॥४॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ॥५॥
अर्थ
सर्व साधनांमध्ये नामसंकीर्तन साधन हे सर्वात सोपे असून त्याने अनेक जन्मातील पापे जळून जातात. हरी ची प्राप्ती करून घेण्यासाठी वनात जाऊन तपसाधना करण्याची गरज नाही तर केवळ घरी बसून नामसंगकीर्तन केल्याने सुखासुखी नारायण आपल्या घरी येतो. तुम्ही जिथे असाल तेथे बसूनच एकचित्त करून आवडीने अनंताला आळवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र सर्वकाळ जपावा. लोकहो नामा पेक्षा इतर सोपे साधन हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणतेही नाही हे मी विठोबाची शपथ घेऊन सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात नामसंगकीर्तन हे साधन सर्वात सोपे आहे आणि जो शहाणा म्हणजे परिपूर्ण विचारी मनुष्य आहे तोच याचा अंगीकार करत असतो.
4:56

अभंग क्र. २३५४
भाविकांचे काज अंगे देव करी । काढी धर्माघरी उच्छीष्ट ते ॥१॥
उिच्छष्ट ती फळे खाय भिल्लटीची । आवडी तयांची मोठी देवा ॥धृपद॥
काय देवा घरी न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥
अर्जुनाची घोडी धुतली अनंते । संकटे बहुते निवारिली ॥३॥
तुका म्हणे ऐसी आवडती लडिवाळे । जाणीवेचे काळे तोंड देवा ॥४॥
अर्थ
भाविकांच्या घरी देव स्वतः काम करतो म्हणूनच तर त्याने धर्मराजाच्या घरी राजसू यज्ञाच्या वेळी त्याने स्वतः उष्टी काढली. भील्लींन शबरीची उष्टी बोरे श्रीरामप्रभूचंद्रांनी खाल्ली कारण देवाला भक्तांची मोठी आवड आहे. देवाला त्याच्या स्वतःच्या घरी अन्न खाण्यासाठी मिळत नव्हते का, पण असे असले तरीदेखील त्यांनी द्रोपदीला भाजीचे पान मागितले. अर्जुनाची घोडे या आनंताने धुतले आणि त्याचे खूप पुष्कळ संकटे निवारण केले. तुकाराम महाराज म्हणतात भक्त देवाचे लाडके आवडते असतात म्हणूनच त्यांचे तो सर्व काम करतो परंतु ज्याला ज्ञानाचा अहंकार असतो त्याचे तोंड देवासाठी सदा काळेच असते.
4:57

अभंग क्र. २३५५
सांवळे रूपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी ॥१॥
डोळियांची धणी पाहाता न पुरे । तया लागी झुरे मन माझे ॥धृपद॥
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनी न देखता ॥३॥
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने । तुका म्हणे येणे गरुडध्वजे ॥४॥
अर्थ
भक्तांचे चित्त चोरणारे सावळे रुपडे जे स्वरूप आहे ते पंढरीचे दैवत असून विटेवर उभे आहे. डोळ्याने त्या सावळ्या रुपड्या स्वरूपाचा कितीही लाभ घेतला तरी माझे मनच भरत नाही त्याचे पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावे त्यासाठी माझे मन झुरते आहे. ते श्रीमुख जर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही तर माझे प्राण ह्या शरीरातून बाहेर निघू पाहत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्या नंदाच्या नंदनाने गरुड ध्वजाने माझे चित्त मोहून टाकले आहे.
4:57

अभंग क्र. २३५६
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥धृपद॥
नका शोधू मतांतरे । नुमगे खरे बुडाल ॥२॥
कलिमध्ये दास तुका । जातो लोका सांगत ॥३॥
अर्थ
जे कोणी खरे भाविक भक्त आहेत कृपा करून त्यांनी माझे बोलणे ऐका. तुम्ही तर्किकाचा संग टाकून द्या आणि पांडुरंगाचे स्मरण करत रहा. अहो तुम्ही अनेक मतमतांतरे पाहू नका तुम्हाला ते समजणार नाही पण त्या योगाने जर तुम्ही मत आणि मतांतरा च्या मागे जाल तर या भवनदीत मात्र बुडाल नक्कीच, खरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भाविकजन हो या कलियुगामध्ये मी सर्व लोकाचा दास आहे त्यामुळे मी चांगलाच उपदेश सर्व लोकांना सांगत जात आहे.
4:58

अभंग क्र. २३५७
आपुलिया आंगे तोडी मायाजाळ । ऐसे नाही बळ कोणापाशी ॥१॥
रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥धृपद॥
हर्षामर्ष जो हे नाही जो जिराले । तोवरी हे केले चार त्यांनी ॥२॥
मुक्त जालो ऐसे बोलो जाये मुखे । तुका म्हणे दुःखे बांधला तो ॥३॥
अर्थ
आपल्या सामर्थ्याने आपल्या अंगातील मायाजाळ तोडू शकेल असे बळ कोणाजवळही नाही. नाही ते जमणारच नाही, ते कोणालाही शक्य नाही फार तर फार एकादा मनुष्य आपल्या पत्नीचा मुलांचा कुटुंबाचा त्याग करेल परंतु मन आणि वाचा यांना आवरणे अतिशय कठीण जाते. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या मुखाने बोलतो की “मी मुक्त झालो आहे” तोच तर खरा दुःखाने बांधलेला आहे.
4:58

अभंग क्र. २३५८
आलिया अतीता म्हणतसा पुढे । आपुले रोकडे सत्त्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकी । हीनकर्मी लोकी म्हणावया ॥धृपद॥
दारी हाका कैसे करवते भोजन । रुची तरि अन्न कैसे देते ॥२॥
तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥३॥
अर्थ
लोकहो आपल्या दारात जर कोणी अतिथी आला आणि त्याला, “पुढे चालता हो” असे जर कोणी म्हटले तर आपले पुण्य तात्काळ नाहीसे होऊन सत्व नष्ट होते. याचकाचा अपमान करून त्याचा भार आपल्या मस्तकावर तुम्ही का घेता लोकांनी आपल्याला क्रिया नष्ट म्हणून घेण्यासाठीच असे करता कि काय ? एक घास अन्नासाठी याचक दारात हाका मारतो आणि तुम्ही आत मध्ये भोजन करता तरीही तुम्हाला ते अन्न पचते कसे काय आणि ते अन्न तुम्हाला गोडी तरी देते कासे काय ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जगाला तर आम्ही फार उदार आहोत असे आपल्या दोन्ही हाताचे ध्वज उभारून सांगता मग आता त्या उदारपणाच्या शक्तीला काय झाले आहे ?
4:58

अभंग क्र. २३५९
जेथे लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥
तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥धृपद॥
ठाव धरिला संतजनी । सुखे राहिले लोपोनि ॥२॥
तुका म्हणे वांकी । भाट जाली तिही लोकी ॥३॥
अर्थ
जेथे हरिचे चरण आहेत तेथे लक्ष्मी आणि गंगा यांचा वास असतो आणि जेथे हरी लक्ष्मी आणि गंगा यांचा वास आहे तेथील सर्व पापाचा नाश आपोआप होत असतो. म्हणूनच तर हे हरी तुझे हे पावले सुकुमार आहेत व त्या ठिकाणीच माझे मन भ्रमण म्हणजे सारखे घोंगावत आहे. त्यामुळे संतजनांनी तुझ्या सुकुमार पावलांचा ठाव धरला असून तेथेच ते सुखाने राहिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी लक्ष्मी आणि गंगा हे तुझ्या पायातील वाळे तर वेद आणि संत हे त्रिलोकात तुझी वर्णन करणारे भाटच झाले आहेत.

अभंग क्र. २३५२
पाहाता ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटो गुणदोषी । मना जतन येविशी ॥धृपद॥
त्रिविधदेह परिचारा । जनी जनार्दन खरा ॥२॥
तुका म्हणे धीरे । विण कैसे होते बरे ॥३॥
अर्थ
जर आपण या जगामध्ये काय वाईट, काय चांगले, कोणते स्थळ चांगले, कोणते स्थळ वाईट हे जर पाहत बसलो तर देव आपल्यापासून अंतरतो. मनामध्ये कोणाविषयीही वाईट गुणदोष येऊ देऊ नये याविषयी मनाला सांभाळावे. सर्वाच्या देहामध्ये राजस, तामस, सात्विक हे तीन गुण आहेत परंतु असे असून देखील सर्वाच्या देहामध्ये जनार्दन हा आहे व तोच खरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच कोणातही गुणदोष आपण पाहिला तरी धीर धरावा आणि जर आपण धीर धरला नाही तर आपले बरे तरी कसे होईल.

अभंग क्र. २३५५
सांवळे रूपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी ॥१॥
डोळियांची धणी पाहाता न पुरे । तया लागी झुरे मन माझे ॥धृपद॥
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनी न देखता ॥३॥
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने । तुका म्हणे येणे गरुडध्वजे ॥४॥
अर्थ
भक्तांचे चित्त चोरणारे सावळे रुपडे जे स्वरूप आहे ते पंढरीचे दैवत असून विटेवर उभे आहे. डोळ्याने त्या सावळ्या रुपड्या स्वरूपाचा कितीही लाभ घेतला तरी माझे मनच भरत नाही त्याचे पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावे त्यासाठी माझे मन झुरते आहे. ते श्रीमुख जर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही तर माझे प्राण ह्या शरीरातून बाहेर निघू पाहत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्या नंदाच्या नंदनाने गरुड ध्वजाने माझे चित्त मोहून टाकले आहे.
5:06

अभंग क्र. २३५६
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥धृपद॥
नका शोधू मतांतरे । नुमगे खरे बुडाल ॥२॥
कलिमध्ये दास तुका । जातो लोका सांगत ॥३॥
अर्थ
जे कोणी खरे भाविक भक्त आहेत कृपा करून त्यांनी माझे बोलणे ऐका. तुम्ही तर्किकाचा संग टाकून द्या आणि पांडुरंगाचे स्मरण करत रहा. अहो तुम्ही अनेक मतमतांतरे पाहू नका तुम्हाला ते समजणार नाही पण त्या योगाने जर तुम्ही मत आणि मतांतरा च्या मागे जाल तर या भवनदीत मात्र बुडाल नक्कीच, खरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भाविकजन हो या कलियुगामध्ये मी सर्व लोकाचा दास आहे त्यामुळे मी चांगलाच उपदेश सर्व लोकांना सांगत जात आहे.

अभंग क्र. २३५७
आपुलिया आंगे तोडी मायाजाळ । ऐसे नाही बळ कोणापाशी ॥१॥
रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥धृपद॥
हर्षामर्ष जो हे नाही जो जिराले । तोवरी हे केले चार त्यांनी ॥२॥
मुक्त जालो ऐसे बोलो जाये मुखे । तुका म्हणे दुःखे बांधला तो ॥३॥
अर्थ
आपल्या सामर्थ्याने आपल्या अंगातील मायाजाळ तोडू शकेल असे बळ कोणाजवळही नाही. नाही ते जमणारच नाही, ते कोणालाही शक्य नाही फार तर फार एकादा मनुष्य आपल्या पत्नीचा मुलांचा कुटुंबाचा त्याग करेल परंतु मन आणि वाचा यांना आवरणे अतिशय कठीण जाते. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या मुखाने बोलतो की “मी मुक्त झालो आहे” तोच तर खरा दुःखाने बांधलेला आहे.
अभंग क्र. २३५९
जेथे लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥
तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥धृपद॥
ठाव धरिला संतजनी । सुखे राहिले लोपोनि ॥२॥
तुका म्हणे वांकी । भाट जाली तिही लोकी ॥३॥
अर्थ
जेथे हरिचे चरण आहेत तेथे लक्ष्मी आणि गंगा यांचा वास असतो आणि जेथे हरी लक्ष्मी आणि गंगा यांचा वास आहे तेथील सर्व पापाचा नाश आपोआप होत असतो. म्हणूनच तर हे हरी तुझे हे पावले सुकुमार आहेत व त्या ठिकाणीच माझे मन भ्रमण म्हणजे सारखे घोंगावत आहे. त्यामुळे संतजनांनी तुझ्या सुकुमार पावलांचा ठाव धरला असून तेथेच ते सुखाने राहिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी लक्ष्मी आणि गंगा हे तुझ्या पायातील वाळे तर वेद आणि संत हे त्रिलोकात तुझी वर्णन करणारे भाटच झाले आहेत.

अभंग क्र. २३६०
रूपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहाता विठ्ठला ॥धृपद॥
कळो नये सुखदुःख । तहान हरपली भूक ॥२॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शने मागुती ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुझ्या रूपाच्या ठिकाणी माझे डोळे तर पायाच्या ठिकाणी मन स्थिरावले आहे. हे विठ्ठला मी तुला पाहताच माझा देह भाव हरपला आहे. हे विठ्ठला तुझे दर्शन झाल्यावर मला सुख-दुःख कळेनासे झाले असून माझे तहान-भूक हरवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझे मला आता आत्मस्वरूपाने दर्शन झाले त्यामुळे आता माझे मन पुन्हा परत या प्रपंचाकडे माघारी मी जाऊ देणार नाही.
5:25

अभंग क्र. २३६०
रूपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहाता विठ्ठला ॥धृपद॥
कळो नये सुखदुःख । तहान हरपली भूक ॥२॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शने मागुती ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुझ्या रूपाच्या ठिकाणी माझे डोळे तर पायाच्या ठिकाणी मन स्थिरावले आहे. हे विठ्ठला मी तुला पाहताच माझा देह भाव हरपला आहे. हे विठ्ठला तुझे दर्शन झाल्यावर मला सुख-दुःख कळेनासे झाले असून माझे तहान-भूक हरवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझे मला आता आत्मस्वरूपाने दर्शन झाले त्यामुळे आता माझे मन पुन्हा परत या प्रपंचाकडे माघारी मी जाऊ देणार नाही.
5:26

अभंग क्र. २३६१
जाणते लेकरू । माता लागे दूर धरू ॥१॥
तैसे न करी कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥धृपद॥
नाही मुक्तफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥
तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि ॥३॥
अर्थ
लेकरू थोडे जाणते झाले की आई त्याला दूर धरू लागते. त्याप्रमाणे हे कृपावंते पांडुरंगे माझे आई तसे तु मात्र करू नकोस. जसे ज्या पाण्यामध्ये मोती जन्म घेतात, परत त्या पाण्याचे त्याला दर्शनही होत नाही भेटही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसे ताकातून लोणी एकदा की वेगळे निघले की ते पुन्हा एकत्र होत नाही ते वेगवेगळे केले जाते ताकाचा त्याग केला जातो त्याप्रमाणे मला तुझ्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान झाले की सगुण स्वरूपाचा त्याग होईल परंतु असे काही माझ्याकडून होऊ देऊ नकोस.
5:26

अभंग क्र. २३६२
तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । तुजा तिही त्रिभुवनी ॥धृपद॥
पाहिली पुराणे । धांडोळिली दरुषणे ॥२॥
तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥३॥
अर्थ
हे नारायणा तुझ्या वाचून मी कुणाला शरण जाऊ ? कारण तुझ्यासारखा सर्व शक्तीवान, सामर्थ्यवान त्रिभुवनात दुसरा मला कोणीही दिसत नाही. मी सर्व पुराणे पाहिले, सर्व वेदशास्त्र धुंडाळले, दर्शनाचा ही विचार केला परंतु तुझ्या सारखा कोणी ही मला दिसला नाही. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तर देवा मी तुझ्या पायाच्या ठिकाणी जडून राहिलो आहे.
5:27

अभंग क्र. २३६३
ऐसे भाग्य कई लाहाता होईन । अवघे देखे जन ब्रम्हरूप ॥१॥
मग तया सुखा अंत नाही पार । आनंदे सागर हेलावती ॥धृपद॥
शांति क्षमा दया मूर्तीमंत अंगी । परावृत्त संगी कामादिका ॥२॥
विवेकासहित वैराग्याचे बळ । धगधगित ज्ज्वाळ अग्नी जैसा ॥३॥
भक्ती नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
अर्थ
मी असा भाग्यवान केव्हा होईल की सर्व जगच मला ब्रम्‍हरूपाने दिसेल. मला सर्व जग ब्रम्हरूप दिसू लागले की मग त्या सुखाला अंतपारच राहणार नाही माझ्या आनंदाच्या भरतीने सागरच हेलावत आहे. माझ्या अंगी शांती, दया, क्षमा ह्या मूर्तिमंत रूपाने उपस्थित असाव्यात आणि कामक्रोधादी विकारांची संगती परावृत्त झालेली असावी. धगधगित अग्निज्वाला जशा असतात त्याप्रमाणे माझ्या मध्ये ही विवेका सह वैराग्याचे बळ असावे. अलंकार हे शोभणारे असतात परंतु त्यावरही वरचढ म्हणजे मुकुटमणी असतो हे दोन्ही असले की शोभून दिसते त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी शुद्ध भक्ती असावी परंतु त्याबरोबर नवविधाही भक्ती माझ्या ठिकाणी असावी. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुझ्या वाचून माझी इच्छा पूर्ण करणारा कोण आहे ?
5:27

अभंग क्र. २३६४
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी ॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढे लाभ ॥धृपद॥
कासया पुजावी अनेक दैवते । पोटभरे तेथे लाभ नाही ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साठी ॥३॥
तुका म्हणे करी कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥
अर्थ
हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी तपाचे डोंगर व इतर कष्ट करण्याची काय गरज आहे ? कशासाठी अनेक प्रकारचे तीर्थ, क्षेत्र असलेल्या देशांमध्ये फिरावे की, जे आपल्याला पुढे लाभ होण्याची आशा दाखवितात. का म्हणून इतर देवतांची पूजा करावी कारण त्यांची पूजा केल्याने केवळ पोट भरेल परंतु ब्रम्‍हज्ञाना सारखा लाभ होणार नाही. मोक्ष प्राप्तीसाठी कष्ट का करावेत कारण तो तर पंढरीत फुकट मिळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे इतर कोणताही पसारा घालण्यापेक्षा तु हरिकीर्तन कर याने तुला खरा लाभ प्राप्त होईल.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading