१६ ऑगस्ट, दिवस २२८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ४०१ ते ४१५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७२५ ते २७३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१६ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १६ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १६ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७२५ ते २७३६ चे पारायण आपण करणार आहोत.
१६ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४०१ ते ४१५,

401-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवे चौथा । पुरुषार्थ गा ॥401॥
अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व यालाच चौथा पुरुषार्थ असेही नाव आहे.
402-14
परी माझे आराधन । ब्रह्मत्वी होय सोपान । एथ मी हन साधन । गमेन हो ॥402॥
परंतु माझी (श्रीकृष्णाची) भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी (पोहोचण्याचे) साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी (कृष्ण) साधन आहे असे कदाचित तुला वाटेल.
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥14. 27॥
श्लोकार्थ :-नित्य, अमृत, शाश्वत, धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात रहाते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥14॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रयविभागयोग नावाचा हा चौदावा अध्याय समाप्त झाला. ॥14॥
तरी झणी ऐसे । तुझ्या चित्ती पैसे । पै ब्रह्म आन नसे । मीवाचूनि ॥403॥
तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस. अरे माझ्यावाचून ब्रह्म दुसरे नाही.
अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रायो मी पांडवा । मीचि बोलिजे आघवा । शब्दी इही ॥404॥
अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी (म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी) मीच बोलला जातो.
पै मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा । तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाही ॥405॥
चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही.


अगा नित्य जे निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जे उमप । अद्वितीय ॥406॥
अर्जुना जे ब्रह्म नित्य, अचल, प्रगट, धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे. ते स्वगत सजातीय-विजातीय भेदरहित असे आहे.
विवेकु आपले काम । सारूनि ठाकी जे धाम । निष्कर्षाचे निःसीम । किंबहुना मी ॥407॥
विचार, अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून, ज्या ठिकाणी प्राप्त होतो, ते स्थान मी आहे. फार काय सांगावे ? सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे समज.
ऐसेसे हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासी ॥408॥
अहो महाराज, ऐका. अशा अशाप्रमाणे, तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला.
येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हे तूते कोणे । पुसलेनिविण वायाणे । का बोलसी ? ॥409॥
धृतराष्ट्र व संजय यांच्यातील भाष्य तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया, हे तुला कोणी विचारल्या शिवाय तू व्यर्थ का बोलतोस ?
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगे गुढी । येरु जीवी म्हणे सांडी । गोठी यिया ॥410॥
माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी शंका दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


संजयो विस्मयो मानसी । आहा करूनि रसरसी । म्हणे कैसे पा देवेसी । द्वंद्व यया ? ॥411॥
(धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून) संजय आश्चर्ययुक्त होऊन संतापून मनात म्हणाला) अहो काय आश्चर्य आहे ! याचे देवाशी कसे वैर आहे ?
तरी तो कृपाळु तुष्टो । यया विवेकु हा घोटो । मोहाचा फिटो । महारोगु ॥412॥
तरी तो कृपाळू (श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास) हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य येवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.
संजयो ऐसे चिंतिता । संवादु तो सांभाळिता । हरिखाचा येतु चित्ता । महापूरु ॥413॥
संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करत असता आणि कृष्णार्जुनांच्या संवादाचे मनन करत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला.
म्हणौनि आता येणे । उत्साहाचेनि अवतरणे । श्रीकृष्णाचे बोलणे । सांगिजैल ॥414॥
म्हणून आता या उत्साहाच्या आवेशाने तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल.
तया अक्षराआतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो । आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥415॥
त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहचवीन (तुम्हाला सांगेन). ते तुम्ही ऐका. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले.
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां गुणत्रय विभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥14॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-27॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 415॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २२८ वा. १६, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७२५ ते २७३६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७२५
ऐसे कोण पाप बळी । जे जवळी येऊ नेदी ॥१॥
तुम्हा तव होईल ठावे । नेदावे का कळो हे ॥धृपद॥
कोण झाला अंतराय । का ते पाय अंतरले ॥२॥
तुका म्हणे निमित्याचा । आला सुचा अनुभव ॥३॥
अर्थ
असे कोणते बलवंत पाप आहे की जे मला देवा तुमच्याजवळ येऊ देत नाही ? देवा तुम्हाला तर ते माहीतच आहे परंतू मला ते तुम्ही का कळू देत नाही ? देवा तुमच्यात व माझ्यात एवढे अंतर का निर्माण झाले तुमचे पाय माझ्यापासून एवढे का अंतरले आहेत ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्यात काय चूक होत आहे याचा अनुभव जर तुम्हाला आला तर तो मला सूचवा. ”
अभंग क्र. २७२६
ब्रम्हज्ञान भरोवरी । सांगे आपण न करी ॥१॥
थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ शिणवीली वैखरी ॥धृपद॥
कथा करी वरीवरी । प्रेम नसेचि अंतरी ॥२॥
तुका म्हणे कवित्व करी । मान लोभ हे अंतरी ॥३॥
अर्थ
एखादा मनुष्य ब्रम्हज्ञान सांगत असेल आणि त्याप्रमाणे तोच वागत नसेल तर, त्याच्यावर थु असो कारण ब्रम्हज्ञान सांगून त्याने आपल्या वाणीला व्यर्थ क्षीणच म्हणजे त्रास दिला आहे. तो मनुष्य वर वर मोठया सोंगा ढोंगाने भारी कथा करतो परंतू त्याच्या अंत:करणात प्रेमच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, “तो मनुष्य वर वर कवित्व तर करतो परंतू अंत:करणात आपल्याला जनमाणसामध्ये मानसन्मान धन मिळावे हा त्याच्या मनामध्ये लोभ असतो. ”
अभंग क्र. २७२७
दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊ नेदी ॥१॥
वेची धनरासी बांधले स्मशान । दारी वृंदावन द्वाड मानी ॥धृपद॥
चोरे नागविला न करी त्याची खंती । परी द्वीजा हाती नेदी रुका ॥२॥
करी पाहुणेर व्याह्याजावयासी । आल्या अतीतासी पाठीमोरा ॥३॥
तुका म्हणे जळो धिग त्याचे जिणे । भार वाही सीण धरातळी ॥४॥
अर्थ
मनुष्य दगडाच्या देवापुढे बगाडीचा नवस करतो आणि बायकोला गाडीला बांधून तिला देवापुढे उभा करतो परंतू त्या बाईला कधी हरीकथेला जाऊ देत नाही. काही मनुष्य पुष्कळ पैसे खर्च करुन आपल्या पूर्वजांचे थडगे स्मशानात बांधतात परंतू आपल्या दारामध्ये तुळशीचे वृंदावन बांधणे वाईट मानतात. चोर त्यांच्या घरात घुसून त्याला सर्व लुटून जातात परंतू त्याविषयी त्याच्या मनाला अजिबात खंत वाटत नाही याउलट आपण आणखी पैसे कमवू असे तो मनाशीच निश्चय करुन अपेक्षा करतो परंतू ब्राम्हणाच्या हातात कधी एक रुपया देखील देत नाही. घरी व्याही किंवा जावई पाहुणे म्हणून आले तर त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करतो परंतू कोणी अतिथी दिसला की त्यांना तो पाठमोरा होतो म्हणजे त्यांच्याकडे पाठ फिरवतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या जगण्याला आग लागो त्याच्या जगण्याचा धिक्कार असो तो केवळ धरतीला भार असून सर्वाना त्रासच देत फिरतो. ”
अभंग क्र. २७२८
करूनि विनवणी । माथा ठेवितो चरणी ॥१॥
होते तेचि असो द्यावे । रूप सौम्यचि बरवे ॥धृपद॥
भया भेणे तुमचा ठाव । तुमच्या कोपे कोठे जावे ॥२॥
तुका पाया लागे । दान समुदाय मागे ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या चरणावर माथा ठेवून तुम्हाला विनवणी करीत आहे. देवा ती विनवणी अशी आहे की तुमचे जे पूर्व रुप होते तेच असू दयावे परंतू तुमचे पूर्वीचे रुपच सुंदर आहे व तेच चांगले आहे. देवा तुम्ही जर उग्ररुप धारण केले तर आम्ही तुमच्याजवळ कसे यावे आणि तुम्ही जर उग्ररुप धारण करुन रागावलात तर आम्ही कोठे जावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमच्या पायाला लागून एवढे एकच दान मागत आहे की तुम्ही तुमचे पूर्वीचे रुप जे आहे तेच राहू दयावे कारण तुमचे सौम्य रूपच आम्हाला चांगले वाटते. ”
अभंग क्र. २७२९
प्रेम नये सांगता बोलता दाविता । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥
कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाही भेटी अंगसंगे ॥धृपद॥
पोटामध्ये कोण सांगितले सर्पा । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥
बोलो नेणे परी जाणे गोड क्षार । अंतरी विचार त्यासी ठावा ॥३॥
तुका म्हणे बरे विचारावे मनी । आणिक भल्यांनी पुसो नये ॥४॥
अर्थ
हरीचे प्रेम कसे असते हे सांगता येत नाही बोलता येत नाही दाखविता येत नाही त्याचा केवळ चित्ताला अनुभव येतो आणि चित्तच त्याला जाणू शकते. कासवीचे बाळ तिच्या कृपादृष्टीनेच वाढते तिच्याजवळ जाऊन त्या पिल्लाला कधीही दुधाची भेट होत नाही. सर्पीणीच्या पोटात जाऊन तिच्या पिल्लांना कुणी असे सांगितले आहे काय की तुम्ही जन्मले की लगेच लपून बसा म्हणून ? एखादा मनुष्य मुका असला तर त्याने खाल्लेला पदार्थ गोड आहे की खारट आहे हे त्याला सांगता येत नाही परंतू त्याविषयी त्याच्या अंत:करणात त्याला समजत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीप्रेम असे असते याविषयी अनुभव घेऊन त्याचा आपल्या मनाशीच विचार करावा भल्या माणसांनी ते कसे असते हे विचारु नये ? ”
अभंग क्र. २७३०
आता मी पतित ऐसा साच भावे । कळो अनुभवे आले देवा ॥१॥
काय करावे ते रोकडेंचि करी । राहिली हे उरी नाही दोघा ॥धृपद॥
येर येरा दृष्टी द्यावे या उत्तरा । यासी काय करा ग्वाही आता ॥२॥
तुका म्हणे मेलो सांगता सांगता । तेचि आले आता कळो तुम्हा ॥३॥
अर्थ
देवा मी खरोखरच पतित आहे असे मला अनुभवावरुनच कळून आले आहे. देवा आता तुम्हाला काय करायचे असेल ते खुशाल करा कारण आपल्या दोघामध्ये आता संकोच राहिला नाही. देवा आता आपण एकमेकांसमोर उभे असून आपण एकमेकास बोलण्यासही तयार आहोत मग येथे तिस-या साक्षीदाराची काय गरज आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जी गोष्ट मी सांगता सांगता मेलो ती गोष्ट आता तुम्हाला कळून आली आहे. ”
अभंग क्र. २७३१
काय तुज मागे नाही जाणवले । माझे नाही केले हित काही ॥१॥
डोळे झाकुनिया होसी अबोलणा । तेव्हा नारायणा आता कैसा ॥धृपद॥
न कळे उचित न संगता स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥
तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा । तरि का आधी देवा वारू नये ॥३॥
अर्थ
देवा तुला माझ्या दु:खाची जाणीव झाली नाही काय आणि झाली असेल तर माझे हित अजून तू काहीच केले नाहीस ? हे नारायणा अरे तू असा डोळे झाकून अबोलपणा म्हणजे गप्प का बसला आहेस तू पूर्वी कसा भक्तांचा उध्दार करण्यासाठी तत्पर होता परंतू आता कसा झाला आहेस. देवा तुला काहीही स्पष्ट सांगितल्याशिवाय समजत नाही असा तू क्रियानिष्ठ आहे हे आम्हाला माहित नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझा घात होणार आहे हे तर तुम्हाला आधीच माहित होते तर मग तुम्ही आधीच ते नाहीसे का नाही केले ? ”
अभंग क्र. २७३२
नये ऐसे बोलो कठिण उत्तरे । सलगी लेकुरे केली पुढे ॥१॥
अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया ॥धृपद॥
धरू धावे आगी पोळले ते नेणे । ओढिलिया होणे माते बाळा ॥२॥
तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशी असा तुम्ही ॥३॥
अर्थ
देवा आम्ही लेकरांनी तुझ्याशी सलगीने येऊन बोलावे आणि त्यामुळे तू आमच्याशी कठोर शब्दात बोलू नये. देवा आमच्याकडून काही अपराध घडला असेल तर आम्हाला तुम्ही क्षमा करा आणि जे उत्तम हिताचे आहे तेच तुम्ही आम्हाला शिकवा. देवा लहान मूल विस्तवाला धरु पाहते परंतू ते हातात धरल्यानंतर पोळेल हे त्याल माहित नसते ते धरायला गेले की त्याची आई त्याला मागे ओढते परंतू त्या कारणाने ते बाळ चिडून त्या मातेला मारते परंतू त्या बाळकाने मारले तरी त्याचे अपराध माता क्षमाच करते. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याने ज्याला जन्म दिला त्याचा भार जन्मदात्यावर असतो ही गोष्ट समजून घेण्याविषयी तुम्ही फारच चतुर आहात. ”
अभंग क्र. २७३३
लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥
बहु वागवीत आणिले दुरूनि । दिसांची पोसनी बहु आहे ॥धृपद॥
नाही लागो दिला आघाताचा वारा । निष्ठुर उत्तरा कोमेजना ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी । शांतवी उत्तरी अमृताच्या ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुमचे लडिवाळ आहोत म्हणून तुम्ही आमच्याशी निष्ठूर बोलू नका उलट तुम्ही आमचा आघातापासून सांभाळ करा. देवा तुम्ही खूप योनीपासून खूप दुरुन आम्हाला तुम्ही वागवित आणले आहे खूप दिवसांपासून तुम्ही आमचे पोषण करीत आहात. देवा आजपर्यंत तुम्ही आम्हाला आघाताचा वारा देखील लागू दिला नाही परंतू आता तुम्ही आमच्याशी असे निष्ठूरतेने बोलता त्यामुळे आमचे मन कोमेजते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे कृपावंत हरी तुम्ही तुमचे अमृतासारखे वचन माझ्याशी बोलून माझे मन शांत करा. ”
अभंग क्र. २७३४
आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥
जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा । हेचि गोडी आम्हा देई देवा ॥धृपद॥
काय सायुज्यता मुक्तीची हे चाड । देव भक्त कोड तेथे नाही ॥२॥
काय ते निर्गुण पाहो कैशा परी । वर्णु तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥
गोड चरणसेवा देवभक्तपणे । मज देवा झणे दुराविसी ॥४॥
जाणिवेपासूनि सोडवी सत्वर । देई चरणसेवा निरंतर ॥५॥
तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीति । सेवेविण चित्ती सार नाही ॥६॥
अर्थ
देवा मला आत्मस्थिती काय त्याविषयी विचार देखील नको आहे केवळ तुझ्या चरणाची निरंतर सेवा घडू दयावी. हे पुरुषोत्तमा जन्मोजन्मी आम्ही तुझेच दास व्हावे याविषयीच आम्हाला आवड दयावी. मला काय त्या सायुज्यमुक्तीची आवड आहे काय, कारण देवभक्तापणाचे कोड कौतुकच त्यामध्ये नाही. हे हरी तुझ्या त्या निर्गुण स्वरुपाचे काय करायचे आहे आणि ते तुझे निर्गुण स्वरुप पाहू तरी कशा पध्दतीने आणि तुझ्या त्या निर्गुण स्वरुपाची किर्ती मी वर्णन तरी कशी करु ? देवा देवभक्तपणामध्ये चरण सेवा हे फार गोड साधन आहे परंतू तू मला मुक्ती देऊन तुझ्यापासून दूर करु नकोस. देवा मला ज्ञानाच्या अभिमानापासून लवकर सोडव आणि निरंतर तुझी चरण सेवाच घडू दयावी. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा गोड पदार्थाला त्याची गोडी कळत नसते व त्यामुळे त्याला त्याची आवडही नसते त्यामुळे तुझ्या सायुज्यमुक्तीमध्ये व तुझ्या निर्गुण स्वरुपामध्ये आनंद हा मूळ स्वरुपत:च आहे त्यामुळे आनंदाचा वेगळया पध्दतीने भोग घेता येत नाही परंतू तुझी सेवा करण्यात एक वेगळाच आनंद निर्माण होतो त्यामुळे माझ्या चित्ताला तुझी चरण सेवा यावाचून दुसरे काहीही सार वाटत नाही. ”
अभंग क्र. २७३५
चाले दंडवत घाली नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनिया ॥१॥
बैसविला पदी पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरी आज्ञा त्याची ॥२॥
तुका म्हणे आहे ठायीचाचि मान । आता अनुमान कायसा तो ॥३॥
अर्थ
हे नारायणा तू आता माझ्याबरोबर चल आणि तुझे कल्याणकरीता तुझ्या भक्तांना दंडवत नमस्कार घाल. देवा एकदा की राजाने आपल्या पुत्राला राजगादीवर बसवले की त्या पुत्राची आज्ञा देखील पिता शिरसावंद्य मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे मानसन्मान देणे हे पूर्वीपासूनच चालत आले आहे आता वेगळा अनुमान का करतो आहेस ? ”
अभंग क्र. २७३६
समर्थाचे बाळ पाघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥
समर्थासी लाज आपुल्या नावाची । शरण आलियाची लागे चिंता ॥२॥
जरी तुज काही होईल उचित । तरी हा पतित तारी तुका ॥३॥
अर्थ
समर्थ माणसाचे बाळ जर वाकळे पाघरु लागले तर लोक कोणाला हसतील ? समर्थाला आपल्या नावाला कोणत्याही प्रकारचा डाग लागू नये याविषयी लाज धरावी लागते आणि त्याला शरण आलेल्या व्यक्तीची चिंता देखील व्हावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा त्याप्रमाणे तुम्ही सर्व समर्थ आहात आणि आम्ही तुमचे बाळ आहोत लेकरे आहोत जर तुम्हाला उचित वाटत असेल तर माझ्या सारख्या पतिताला तुम्ही कृपा करुन तारा. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading