१५ जुलै, दिवस १९६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७७६ ते ८०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २३४१ ते २३५२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१५ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १५ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १५ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३४१ ते २३५२ चे पारायण आपण करणार आहोत.
१५ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७७६ ते ८००,

776-13
न धरावा तो संगु । न लागावे तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥776॥
ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो.
777-13
नायकावे ते आइके । न बोलावे ते बके । परी दोष होतील हे न देखे । प्रवर्तता ॥777॥
जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पहात नाही.
778-13
आंगा मनासि रुचावे । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवे । जो करणेयाचेनि नांवे । भलतेचि करी ॥778॥
शरीरास व मनास आवडेल एवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य असो वा नसो, याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो.
779-13
परि पाप मज होईल । का नरकयातना येईल । हे काहीचि पुढील । देखेना जो ॥779॥
परंतु यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील होणार्‍या गोष्टी जो काहीच पहात नाही.
780-13
तयाचेनि आंगलगे । अज्ञान जगी दाटुगे । जे सज्ञानाही संगे । झोंबो सके ॥780॥
त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


781-13
परी असो हे आइक । अज्ञान चिन्हे आणिक । जेणे तुज सम्यक् । जाणवे ते ॥781॥
परंतु ते राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक, ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल.
782-13
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरी । नवगंधकेसरी । भ्रमरी जैशी ॥782॥
तर ताज्या, सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून रहाते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पहाशील.
783-13
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशी । जयाचे मन ॥783॥
साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, तेथून हलत नाही,
784-13
ठेला बेडूक कुंडी । मशक गुंतला शेंबुडी । जैसा ढोरु सबुडबुडी । रुतला पंकी ॥784॥
बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा जनावर जसे चिखलात पूर्णपणे फसते,
785-13
तैसे घरीहूनि निघणे । नाही जीवे मने प्राणे । जया साप होऊनि असणे । भाटी तिये ॥785॥
त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व मेल्यावर तो त्या जागेत सर्प होऊन बसतो.


786-13
प्रियोत्तमाचिया कंठी । प्रमदा घे आटी । तैशी जीवेसी कोंपटी । धरूनि ठाके ॥786॥
नवर्‍याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून रहातो.
787-13
मधुरसोद्देशे । मधुकर जचे जैसे । गृहसंगोपन तैसे । करी जो गा ॥787॥
पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो.
788-13
म्हातारपणी जाले । मा आणिक एक विपाईले । तयाचे का जेतुले । मातापितरा ॥788॥
अज्ञानाची लक्षणे = स्त्रीप्रेम
म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न, त्याचे आईबापास जितके प्रेम असते,
789-13
तेतुलेनि पाडे पार्था । घरी जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवाचूनि सर्वथा । जाणेना जो ॥789॥
अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्रीवाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही.
790-13
तैसा स्त्रीदेही जो जीवे । पडोनिया सर्वभावे । कोण मी काय करावे । काही नेणे ॥13-790॥
त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय, हे काही जो समजत नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


791-13
महापुरुषाचे चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥791॥
ब्रह्मनिष्ठांचे अंत:करण, ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात,
792-13
हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाची इंद्रिये एकमुखे । स्त्रिया केली ॥792॥
जो नुकसान, लाज पहात नाही, दुसर्‍यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते.
793-13
चित्त आराधी स्त्रीयेचे । आणि तियेचेनि छंदे नाचे । माकड गारुडियाचे । जैसे होय ॥793॥
ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो,
794-13
आपणपेही शिणवी । इष्टमित्र दुखवी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥794॥
ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्ट मित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो.
795-13
तैसा दानपुण्ये खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हो नेदी ॥795॥
त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरता दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, तिची खाच भरण्याला कमी पडू देत नाही.


796-13
पूजिती दैवते जोगावी । गुरूते बोले झकवी । मायबापा दावी । निदारपण ॥796॥
पूजल्या जाणार्‍या देवतांची बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरूला ठकवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो.
797-13
स्त्रियेच्या तरी विखी । भोगुसंपत्ती अनेकी । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥797॥
तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये (साधने) व जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो.
798-13
प्रेमाथिलेनि भक्ते । जैसेनि भजिजे कुळदैवते । तैसा एकाग्रचित्ते । स्त्री जो उपासी ॥798॥
प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्रचित्ताने करतो.
799-13
साच आणि चोख । ते स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयी जोगावणूक । तेही नाही ॥799॥
जे खरे चांगले असेल, ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक(देहरक्षण) देखील करीत नाही,
800-13
इयेते हन कोणी देखैल । इयेसी वेखासे जाईल । तरी युगचि बुडैल । ऐसे जया ॥800॥
हिला कोणी (वाकड्या दृष्टीने) पाहील हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल, तर युगांतच होईल असे ज्याला वाटते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १९६ वा. १५, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३४१ ते २३५२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३४१
सतीचे ते घेता वाण । बहु कठीण परिणामी ॥१॥
जिवासाठी गौरव वाढे । आहाच जोडे ते नव्हे ॥धृपद॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका म्हणे अंगा येता । तरी सत्ता धैर्‍याची ॥३॥
अर्थ
सतीचे वाण घेणे परिणामी खूप कठीण आहे. कारण त्यासाठी जिवावर उदार व्हावे लागते व तसे केल्यानेच गौरव प्राप्त होतो जर वरवर केवळ दांभिकपणाचे सोंग आणले तर त्यांना गौरव प्राप्त होत नाही. ज्याची दृष्टी युद्ध पाहून व युद्ध करून दृढावलेली आहे त्यानेच युद्धाच्या गोष्टी कराव्यात नाहीतर करू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात कितीही बिकट प्रसंग अंगावर आला तरी आपल्या अंगामध्ये धैर्य पाहिजे.
4:17

अभंग क्र. २३४२
आडवा तो उभा । असे दाटोनिया प्रभा ॥१॥
देव नाही एकविध । एक भाव असे शुद्ध ॥धृपद॥
भेदाभेद आटी । नाही फार कोठे तुटी ॥२॥
तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥३॥
अर्थ
देव आपल्या स्वयंप्रकाशाने आडवा-उभा या जगामध्ये सर्वत्र दाटून भरलेला आहे. देव एकविध नाही म्हणजे तो सर्वत्र वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या आकाराने व्यापलेला आहे असा जर आपला शुद्ध भक्तिभाव असेल तरच आपल्याला त्याची प्रचिती येते. जीव, जगत आणि देव यामधील भेद अभेद याच्यामध्ये वाद करत बसू नये कारण कितीही वाद केला तरी तो पूर्णत्वास जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात प्रापंचिक व्यवहाराविषयीचे बंधन तुम्ही नाहीसे करा मग तुम्हाला देवाचे यथार्थ ज्ञान होईल.
4:48

अभंग क्र. २३४३
एका बोटाची निशाणी । परीपाक नाही मनी ॥१॥
तरि ते संपादिले सोंग । कारणावाचूनिया व्यंग ॥धृपद॥
वैष्णवाचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥२॥
अतिशये पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
अर्थ
काही वैष्णव एका बोटाने कपाळाला गंध लावतात परंतु त्याचे मन शुद्ध नसेल तर, त्यांनी विनाकारण वैष्णवाचे सोंग घेतले आहे असेच म्हणावे लागेल. सर्व जग विष्णुमय आहे असे जाणणे म्हणजे खरा वैष्णवाचा हाच धर्म आहे परंतु ज्याला हे वर्म माहित नाही तो वैष्णवच नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरे तर हे पापच आहे पण मी वैष्णवांची खरे माप करीत आहे व खर्‍या वैष्णवाचे लक्षण सांगत आहे.
4:50

अभंग क्र. २३४३
एका बोटाची निशाणी । परीपाक नाही मनी ॥१॥
तरि ते संपादिले सोंग । कारणावाचूनिया व्यंग ॥धृपद॥
वैष्णवाचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥२॥
अतिशये पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
अर्थ
काही वैष्णव एका बोटाने कपाळाला गंध लावतात परंतु त्याचे मन शुद्ध नसेल तर, त्यांनी विनाकारण वैष्णवाचे सोंग घेतले आहे असेच म्हणावे लागेल. सर्व जग विष्णुमय आहे असे जाणणे म्हणजे खरा वैष्णवाचा हाच धर्म आहे परंतु ज्याला हे वर्म माहित नाही तो वैष्णवच नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरे तर हे पापच आहे पण मी वैष्णवांची खरे माप करीत आहे व खर्‍या वैष्णवाचे लक्षण सांगत आहे.
4:50

अभंग क्र. २३४४
सत्यत्वेशी घेणे भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसे ॥१॥
मग ते अवीट न भंगे साचारे । पावले विस्तारे फिरो नेणे ॥धृपद॥
वाणी वदे त्याचा कोणासी विश्वास । अभये करे दास सत्य तई ॥२॥
तुका म्हणे आधी न करी तांतडी । पायी जाली जोडी तेणे शुद्ध ॥३॥
अर्थ
भक्ताने एकदा तरी सत्य भक्तीचा अनुभव घ्यावा आणि माझ्या स्वामी कडून त्याचा गौरव व्हावा अशीच मी इच्छा करत आहे. सत्य भक्तीचा अनुभव हा अवीट असतो न भांगनारा असतो त्याचा एकदा की विस्तार झाला व खऱ्या भक्तीचे भक्ताला ज्ञान झाले की तो आपले पावले पुन्हा केव्हाही प्रपंचाकडे फिरू देत नाही. केवळ वाणीने भक्तीचा जो गौरव सांगतो त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही ज्याच्या मस्तकावर माझ्या स्वामींचा अभय हस्त असेल तोच खरा भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी शुद्ध भक्त आहे असे आधीच म्हणून घेण्याची तातडी करू नये तर खरा भक्त तेव्हाच होतो जेव्हा त्याला देवाच्या पायाचा लाभ होतो दर्शन होते.
4:51

अभंग क्र. २३४५
सर्वात्मकपण । माझे हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनी भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥धृपद॥
घेईन जन्मांतरे । हे चि करावया खरे ॥२॥
तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवू सेवा ॥३॥
अर्थ
मी सर्वात्मक आहे, आत्मरूपाने सर्वत्र व्यापक आहे अशी माझी दृष्टी झाली आहे व ती माझ्यापासून कोण हिराऊन नेइल ? असे असले तरीदेखील मला भक्तीचीच आवड आहे आणि भक्तीचाच लाभ मला व्हावा असे मला वाटत आहे. आणि हीच माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अनेक जन्म घेत राहील. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रत्येक जन्मात देवाची सेवा करीन व त्याला माझा ऋणी करून ठेवीन.
4:51

अभंग क्र. २३४६
आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गाठीसवे धुरे ॥धृपद॥
नाकेंविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
हुकुमदाज तुका । येथे कोणी फोंदो नका ॥३॥
अर्थ
कावळ्याने कितीही हंसासारखा चालण्याचा प्रयत्न केला तरी तो हंस होत नाही. त्यामुळेच हे मठाधिशांनो साधूंनो तुम्ही आपले मठ सोडून द्या तो अभिमान सोडून द्या आणि सर्वश्रेष्ठ एक हरीचीच तुम्ही भेट घ्यावी. नाक नसताना नथ घालने म्हणजे उभ्या बाजारात स्वतःची फजिती करून घेतल्या सारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात याकरता मी सांगतो हे साधूजनहो मठाधिश हो कोणीही मी वैरागी आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रेष्ठ भक्त आहे असा व्यर्थ अभिमान धरून फुंदू नका असा हुकूम मी देवाच्या वतीने तुम्हाला करीत आहे.
4:52

अभंग क्र. २३४७
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळो भाव । आला वाव अंतरीचा ॥धृपद॥
बोरामध्ये वसे अळी । अठोळीच भोवती ॥२॥
पोटासाठी वेची चणे । राजा म्हणे तोंडे मी ॥३॥
बेडकाने चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥
तुका म्हणे ऐसे आहे । काय पाहे त्यात ते ॥५॥
अर्थ
ढेकणासाठी बाज म्हणजे एक प्रकारचा गडच आहे त्याच बाजेवर चढण्यासाठी त्याला किती उतारचढ करावी लागते. मनुष्याच्या अंतरंगात कसा भेद आहे त्याच्या अंतरंगात नेमकं काय आहे हे त्याच्या बोलण्या चालण्या वरूनच लगेच लक्षात येते. बोरांमध्ये आठवळीच्या भवती आळी असती व त्या आळीला एवढेच आपले जग आहे असे वाटते त्याप्रमाणे देहा विषयी अभिमान असणाऱ्याला देह पुरताच आत्मा मर्‍यादित आहे असे वाटते. पोटासाठी हरभरा वेचणारा आपल्या तोंडाने मी राजा आहे असे म्हणून घेतो. बेडकाने केवळ चिखलच खावा त्याला समुद्र म्हणजे काय आहे हे कसे कळणार ? तुकाराम महाराज म्हणतात मी वर जेवढे काही दृष्टांत उदाहरण सांगितले आहेत तशी प्रत्येक संसारिक मनुष्याची स्थिती आहे परंतु आपल्या देहामध्ये जो सत्य पदार्थ आहे तो सत्य पदार्थ हे संसारिक आपल्या अंतरंगा मध्ये ढोकुन पाहू शकतात काय ?
4:53

अभंग क्र. २३४८
धाव धाव गरुडध्वजा । आम्हा अनाथांच्या काजा ॥१॥
बहु जालो कासावीस । म्हणोनि पाहे तुझी वास ॥धृपद॥
पाहे त्या मारगे । कोणी येते माझ्या लागे ॥२॥
असोनिया ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥
न लवावा उशीर । नेणो का हा केला धीर ॥४॥
तुका म्हणे चाली । नको चालू धाव घाली ॥५॥
अर्थ
हे गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या कामासाठी तू लवकर लवकर धाव घे. देवा मी फार कासावीस झालो आहे म्हणूनच तर मी तुझी वाट पाहत आहे. माझ्याकडे त्या मार्गाने कोणी येत आहे की काय यासाठी मी त्या मार्गाकडे सारखे पाहत आहे. देवा तुझ्यासारखा कृपाळू सखा सहाय्य करता असताना मला कष्ट व्हावे ते तुला बरे दिसते काय ? देवा मला भेट देण्यासाठी तु उशीर लावू नकोस आणि माझ्या भेटीसाठी तु एवढा धीर का धरला आहेस काय माहित. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु नेहमीच जसा चालतो तसाच चालू नकोस तर माझ्यासाठी तु धावत ये.
4:53

अभंग क्र. २३४९
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥
पान्हा घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटो दे ॥धृपद॥
अंगे अंग मेळउनी । करी धणी फेडाया ॥२॥
तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना ॥३॥
अर्थ
हे माझे गंगे माऊली पांडुरंगे, तु मला तुझा प्रेमरूपी पान्हा पाज एवढेच नाही तर तुझ्या प्रेम रूपी दुधाचा पूर माझ्यावर लोटु दे. तु माझी तृप्ती करण्याकरता आपले अंग माझ्या अंगात मिळवून ठेव. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की तुझा प्रेम रुपी पान्हा मी पीलो की मी आनंदाने उड्या मारीन व मनातील सर्व वाईट भावना बाजूला टाकून देईन.
4:54

अभंग क्र. २३५०
गजइंद्र पशु आप्ते मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥
त्यासाठी गरुड सांडुनि धावसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥धृपद॥
धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥२॥
तुका म्हणे ब्रीद बांधले यासाठी । भक्तंसी संकटी रक्षावया ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा ज्या वेळी नक्राने गजेंद्रचा पाय धरला त्यावेळी त्याच्या आप्तेष्टांनी त्याला सोडून दिले व त्यावेळी तो पशू असून देखील त्याने तुझे स्मरण केले. हे दिनानाथा त्यावेळी तु गरुडाला देखील मागे सोडून त्या गजेंद्रकडे धाव घेतलीस इतकी भक्तांवर तुझी माया आहे भक्तांसाठी इतकी तु झळ खात असतो. एकदा की वासराने हंबरडा फोडला की धेणू त्याच्यावर प्रेमाने झेप घालते त्याप्रमाणे तु गजेंद्रावर झेप घालून त्याला नक्रच्या तावडीतून सोडविले. तुकाराम महाराज म्हणतात संकटकाळी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तु आपले दीनानाथ असे ब्रीद रक्षण करून ठेवलेले आहे.
4:55

अभंग क्र. २३५१
चारी वेद जयासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥१॥
न करी आणीक साधन । कष्टसी का वायाविण ॥धृपद॥
अठरा पुराणांचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥२॥
गीता जेणे उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥३॥
तुका म्हणे सार धरी । वाचे हरीनाम उच्चारी ॥४॥
अर्थ
चारही वेद ज्याचे वर्णन करण्यासाठी जन्मले आहेत त्याचेच नांव तुम्ही कंठात धारण करा. नामस्मरणासारखे सोपे साधन सोडून इतर व्यर्थ साधने करण्याच्या भानगडी म्हणजेच इतर व्यर्थ कष्ट का करत आहेस ? आठराही पुराणांमध्ये केवळ नामाचे महत्त्व वर्णन केलेले आहेत इतर कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नाही. गीतेचा उपदेश ज्याने केला ती माऊली विटेवर उभी आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनांचे सार म्हणजे हरीचे नाम आहे व त्याच्यावर तु भक्ती धर आणि आपल्या वाचेणे हरिनाम उच्चार करत रहा.
4:56

अभंग क्र. २३५२
पाहाता ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटो गुणदोषी । मना जतन येविशी ॥धृपद॥
त्रिविधदेह परिचारा । जनी जनार्दन खरा ॥२॥
तुका म्हणे धीरे । विण कैसे होते बरे ॥३॥
अर्थ
जर आपण या जगामध्ये काय वाईट, काय चांगले, कोणते स्थळ चांगले, कोणते स्थळ वाईट हे जर पाहत बसलो तर देव आपल्यापासून अंतरतो. मनामध्ये कोणाविषयीही वाईट गुणदोष येऊ देऊ नये याविषयी मनाला सांभाळावे. सर्वाच्या देहामध्ये राजस, तामस, सात्विक हे तीन गुण आहेत परंतु असे असून देखील सर्वाच्या देहामध्ये जनार्दन हा आहे व तोच खरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच कोणातही गुणदोष आपण पाहिला तरी धीर धरावा आणि जर आपण धीर धरला नाही तर आपले बरे तरी कसे होईल.
4:56

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading