१ डिसेंबर, दिवस ३३५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११५१ ते ११७० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४००९ ते ४०२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 December
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११५१ ते ११७०,

1151-18
तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचिजोगे नव्हे । बोलाऐसे ॥1151॥
त्याप्रमाणे, अद्वैतबोधांत क्रियेला काडीचा अवसर नसला तरी, भक्ति संभवते; पण बोलून दाखविता येण्यासारखी हि गोष्ट नाही, ती स्वतःच्या अनुभवानेच पटणारी आहे 51
1152-18
तेव्हा पूर्वसंस्कार छंदे । जे काही तो अनुवादे । तेणे आळविलेनि वो दे । बोलता मीचि ॥1152॥
अशा पुरुषाच्या शारीरक्रिया पूर्वसंस्कारानुरूप सुरू असता त्या भरात ज्या नांवाने मला हाक मारील ती माझीच भक्ति होय असे समजून मो त्याच्या हाकेला उभा रहातो; पण बोलणार तोही मजवाचून अन्य कोणी नसतो. 52
1153-18
बोलतया बोलताचि भेटे । तेथे बोलिले हे न घटे । ते मौन तव गोमटे । स्तवन माझे ॥1153॥
बोलणारा आपणच; व ज्याच्यापाशी बोलला तोही आपणच; ह्या व्यवहाराला ‘बोलणे झालें ” असे म्हणता येत नाही; अशा प्रकारचे जे मौन हे माझे उत्तम स्तवन होय (अद्वैती भक्ति आहे). 53
1154-18
म्हणौनि तया बोलता । बोली बोलता मी भेटता । मौन होय तेणे तत्वता । स्तवितो माते ॥1154॥
म्हणून तो बोलणारा व त्याच्या बोलांत त्याला बोलविणारा जो मी तोच त्याला भेटणारा, अशा स्थितीला तत्त्वदृष्टया मौनस्थितीच म्हणतात; त्या तात्त्विक मौनाने तो माझे स्तवन करितो 54
1155-18
तैसेचि बुद्धी का दिठी । जे तो देखो जाय किरीटी । ते देखणे दृश्य लोटी । देखतेचि दावी ॥1155॥
त्याचप्रमाणे अर्जुन, त्याची बुद्धि अगर दृष्टि ज्या ज्या दृश्याकडे जाईल, त्या त्या ठिकाणचा दृश्यत्वधर्म नाहीसा होऊन त्या रूपाने द्रष्टा जो आपण, त्याचेच दर्शन त्याला घडतं. (इतका त्याचा सर्वात्मभाव दृढ असतो. ) 55


1156-18
आरिसया आधी जैसे । देखतेचि मुख दिसे । तयाचे देखणे तैसे । मेळवी द्रष्टे ॥1156॥
आरसा पुढे येण्यापूर्वी मुख दृष्टिरूपच असते, पण तेथवर त्याला द्रष्टेपणा नसतो; तो द्रष्टेपणा, आरसा ह्या उपाधीने आला म्हणजे त्याचेच त्याला जसे पुन्हा दर्शन होते, त्याप्रमाणे, दृश्याच्या मिषाने (वरील ओवीतील) द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन होते. 56
1157-18
दृश्य जाउनिया द्रष्टे । द्रष्टयासीचि जै भेटे । तै एकलेपणे न घटे । द्रष्टेपणही ॥1157॥
दृश्यावरील दृश्यत्व कल्पनेचा निरास होऊन जेव्हा तद्वारा द्रष्टाच द्रष्टयाला भेटतो, तेव्हा तेथे द्वैतव्यवहाराचे अभावी तोच कायतो एकटा असतो व अशा स्थितीत तो पहाणारा नसून ‘ पहाणेरूप ” असतो. 57
1158-18
तेथ स्वप्नीचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनिया । आपणचि जैसे ॥1158॥
स्वप्नातील स्त्रीला जागा होऊन आलिंगन देउ गेल्यास तेथे दोन व्यक्ति नसून आपणच एकटे एक असल्याचा जसा प्रत्यय येतो, 58
1159-18
का दोही काष्ठाचिये घृष्टी- । माजी वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥1159॥
किवा दोन काष्ठांच्या घर्षणाने उत्पन्न होणारा अग्नि त्यांचा दोन्हीपणा खाऊन आपणच जसा तद्रूप होतो 59
1160-18
नाना प्रतिबिंब हाती । घेऊ गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥1160॥
अथवा सूर्य आपले प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठी खाली अवतरला तर प्रतिबिंबाबरोबर जशी त्याची बिंबताही उरणार नाही. 1160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1161-18
तैसा मी होऊनि देखते । तो घेऊ जाय दृश्याते । तेथ दृश्य ने थिते । द्रष्टृत्वेसी ॥1161॥
त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य पाहू जातो, त्याला दृश्य म्हणून काही वेगळे आढळत नाहीच, पण त्याचा द्रष्टेपणाही दृश्याबरोबर मावळतो. 61
1162-18
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवी प्रकाश्यता । तेवी दृश्यी नाही द्रष्टृता । मी जालिया ॥1162॥
सूर्योदयाबरोबर अंधारच प्रकाशरूप होत असल्याने मुळे जसा त्यांचा प्रकाश्य प्रकाशक भाव उरत नाही, तसे, दृश्य, द्रष्टा जो मी तद्रूप झाले असता, त्याच्या ठिकाणचे दृश्यत्वही उरत नाही. (माझे द्रष्टेपणही न उरून केवल दृङमात्र मी असतों) 62
1163-18
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते ते दर्शन माझे । साचोकारे ॥1163॥
यानंतर पाहणे न पाहणे इत्यादि व्यवहारापलीकडील जी सहजस्थिति, तेच माझे खरे दर्शन होय. 63
1164-18
ते भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥1164॥
अर्जुना, कोणत्याही पदार्थाच्या भेटीनंतरही, द्रष्टा, दृश्य व दर्शन ह्या व्यवहारातीत असलेल्या अखंड दर्शनस्थि तिचा त्या क्रमयोग्याला आपल्या स्वरूपात भोग घडत असतो. 64
1165-18
आणि आकाश हे आकाशे । दाटले न ढळे जैसे । मिया आत्मेन आपणपे तैसे । जाले तया ॥1165॥
आणि आकाशने स्वस्वरूपानेच सर्व जगत् अंतर्बाह्य गच्च व्यापून टाकल्यामुळे जसे त्याचे चलनवलन संभवत नाही, तसा सर्वात्मक जो मी तद्रूप झालेला तो योगी कोणत्याही क्रियेने लिप्त होणे शक्य नाही. 65


1166-18
कल्पांती उदक उदके । रुंधिलिया वाहो ठाके । तैसा आत्मेनि मिया येके । कोंदला तो ॥1166॥
सर्व जलमय ‘कल्पांतीच्या उदकाला वाहण्यास जसा कोठे वावच नसतो, तसा सर्वव्यापक, एक, शुद्ध परमात्मा जो मी, तद्रूपच तो झाला असल्यामुळे त्याच्यावाचूनही कोठे रिता ठाव नाही. 66
1167-18
पावो आपणपया वोळघे ? । केवी वन्हि आपणपया लागे ? । आपणपा पाणी रिघे । स्नाना कैसे ? ॥1167॥
पायानेच पायावर चढणे, अग्नीनेच अग्नील पोळणे, किवा जलानेच स्नानासाठी जाणे ह्या गोष्टी घडणे शक्य आहे काय ? 67
1168-18
म्हणौनि सर्व मी जालेपणे । ठेले तया येणे जाणे । तेचि गा यात्रा करणे । अद्वया मज ॥1168॥
म्हणून, बोध दृष्ट्या, जो सर्वथैव मद्रूप झाल्यामुळे ज्याचे येणे जाणे संपले (कर्तव्यबुद्धीने ) व म्हणूनच, ती स्थिति हीच माझ्या अद्वयस्वरूपाची त्याला यात्रा घडली असे समज. 68
1169-18
पै जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाही भूमिभागु । क्रमिला तेणे ॥1169॥
जलावरील लाट कितीही वेगाने आली तरी जलाश्रयावाचून स्वतंत्रतया तिने भूभाग आक्रमण केल्याचे दिसत नाही. 69
1170-18
जे सांडावे का मांडावे । जे चालणे जेणे चालावे । ते तोयचि एक आघवे । म्हणौनिया ॥1170॥
कारण, तिची मोडतोड येणे जाणे हे सर्व एका पाण्याचेच खेळ असतात. 1170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३३५ वा. १, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४००९ ते ४०२०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ४००९
तुम्ही जावे निजमंदिरा । आम्ही जातो आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असो देई । आम्ही असो तुमचे पाई ॥धृपद॥
चित्त करी सेवा । आम्ही जातो आपुल्या गावा ॥२॥
तुका म्हणे दिशा भुललो । फिरोन पायापाशी आलो ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्या शयनगृहामध्ये जा व आम्ही आमच्या घरी जातो. हे विठोबा तुला आमच्या विषयी नेहमी लोभ म्हणजे प्रेम राहू दयावे आम्ही तुमच्या पायाजवळ नेहमी असू. देवा आम्ही आमच्या गावाला जातो परंतु आमचे चित्त नेहमी तुमचीच सेवाच करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी दिशा भुललो आहे आणि फिरुन पुन्हा तुमच्याच पायापाशी आलो आहे. ”
26/12/22, 10:09 Sdm:
अभंग क्र. ४०१०
पाहे प्रसादाची वाट । द्यावे धोवोनिया ताट ॥१॥
शेष घेउनि जाईन । तुमचे जालिया भोजन ॥धृपद॥
जालो एकसवा । तुम्हा आडुनिया देवा ॥२॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलो निश्चिंत ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या प्रसादाची वाट पाहात आहे ज्या ताटामध्ये तुम्ही भोजन केले ते ताट धुवून ते तीर्थ मला प्रसाद म्हणून दयावे. तुमचे भोजन झाले की, तुमचे शेष मी घेऊन जाईन. देवा मला आता शेष भाग मिळाला आहे त्यामुळे मी तुमच्या समोरुन बाजूला झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझे चित्त अगदी निश्चिंत करुन राहिलो आहे. ”
26/12/22, 10:10 Sdm:
अभंग क्र. ४०११
केली कटकट गाऊ नाचो नेणता । लाज नाही भय आम्हा पोटाची चिंता ॥१॥
बैसा सिणलेती पाय रगडू दातारा । जाणवू द्या वारा उब झाली शरीरा ॥धृपद॥
उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप काही न धरावा ॥२॥
तुझिये संगती येऊ करू कोल्हाळ । तुका म्हणे बाळे अवघी मिळोन गोपाळ ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्यापुढे आनंदाने नाचेन गाईन आणि अज्ञानात आम्ही जी तुमच्यापुढे बडबड केली ती तुमच्यापुढे कटकटच झाली आहे. देवा मला कोणाचीही लाज किंवा भय नाही आम्हाला तुमचे उच्चिष्ट शेष भाग प्रसाद म्हणून मिळाला आहे त्यामुळे आम्हाला पोटाची देखील चिंता नाही. हे दातारा तुम्ही खाली बसा तुम्ही फार दमला आहात तुमचे पाय आम्हाला रगडू दयावे तुमच्या शरीराला फार उब म्हणजे गरमास झाले आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला थोडासा वारा घालू दयावा. जरी आमच्याकडून तुमची सेवा करण्यास थोडा जरी उशीर झाला तरी तुम्ही इतका उशीर का झाला असे का म्हणावे कारण मातेने बाळकावर कधीही राग धरु नये. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही तुझी बालके व सर्व गोपाळ मिळून देवा तुझ्या सोबतीत राहून तुझ्या नामाचा गजर करु. ”
26/12/22, 10:10 Sdm:
अभंग क्र. ४०१२
आरुष शब्द बोलो मनी न धरावे काही । लडिवाळ बाळके तूचि आमुचि आई ॥१॥
देई गे विठाबाई प्रेमभातुके । अवघिया कवतुके लहाना थोरा सकळा ॥धृपद॥
सांडुनिया भीड धीटपणाते वाणी । घेतले पाहीजे केले लेकुरे ते कानी ॥२॥
तुका म्हणे थोडयासाठी काशाची अटी । झाली असे भेटी धुरे संवसाटी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही जरी वेडीवाकडी शब्द तुझ्याशी बोललो तरी तू आमच्या बद्दल काहीही मनामध्ये धरू नकोस कारण आम्ही तुझी लडिवाळ लेकरे आहोत आणि तू आमची आई आहेस. त्यामुळे हे विठाबाई माऊली तू तुझा प्रेमाचा खाऊ आम्हाला सर्व लहान थोरांना मोठ्या कौतुकाने द्यावा असे वाटते. देवा तुझी भीड टाकून देऊन मी तुझे वर्णन अगदी धीट पणाने केले आहे तू तुझ्या लेकरा ने केलेले वर्णन तुझ्या कानाने ऐकले पाहिजे किंवा ऐकून घेतले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यासारख्या श्रेष्ठ देवाची मला भेट झाली आहे मग मला तुझे वर्णन करता येत नाही या थोड्याशा कारणासाठी का बरे तू मला दूर लोटतो माझा तू स्वीकार कर आणि मला या संसारातून मुक्त कर.
26/12/22, 10:11 Sdm:
अभंग क्र. ४०१३
कळस वाहियेला शिरी । सहस्रनामे पूजा करी ॥१॥
पीक पिकले पिकले । घन दाटोनिया आले ॥धृपद॥
शेवटीचे दान । भागा आला नारायण ॥२॥
तुका म्हणे पोट । भरले वारला बोभाट ॥३॥
अर्थ
देवा मी माझ्या मस्तकावर कलश आणला आहे आणि सहस्रनामांनी तुझी पूजा करीत आहे. माझे परमार्थ रुपी पीक चांगलेच पिकले आहे व ते घनदाट प्रमाणात पिकले आहे. नारायण आमच्या भाग्यात आला हे आमचे शेवटचे दान आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता पोट भरले त्यामुळे सर्व प्रकारचे खटपटच निवारण झाले आहे.
26/12/22, 10:11 Sdm:
अभंग क्र. ४०१४
आड केले देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥
आता चला जाऊ घरा । नका करू उजगरा ॥धृपद॥
देवा लागलीसे निज । येथे उभ्या काय काज ॥२॥
राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥
अर्थ
आता देवाचे द्वार लावले गेले आहे त्यामुळे व्यर्थ करकर करून काय उपयोग आहे ? आता चला आपण घरी जाऊ व्यर्थ देवाला झोपेतून जागे करू नका. देवाला चांगलीच झोप लागलेली आहे मग येथे उभे राहून राहण्याचे काम आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात आपण जर यावेळी देवाजवळ व्यर्थ बडबड केली तर देवाला राग येईल मग आपली सेवा तो घेणार नाही.
26/12/22, 10:12 Sdm:
अभंग क्र. ४०१५
विठ्ठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान ।
विठ्ठल सिद्धीचे साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
विठ्ठल कुळीचे दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ।
विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥
विठ्ठल विस्तारला जनी । सप्त ही पाताळे भरूनी ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी । विठ्ठल मुनिमानसी ॥३॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा । विश्व विठ्ठले ॥४॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ।
विठ्ठलेंविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥५॥
अर्थ
विठ्ठल आमचे जीवन आहे वेदशास्त्रांच्या उत्पत्तीचे स्थान विठ्ठल आहे सर्व सिद्धींचे प्राप्ती करून घेण्याचे साधन विठ्ठल आहे आणि ध्यानविसावा देखील विठ्ठल आहे विठ्ठल आमचे कुलदैवत आहे आणि विठ्ठलच आमचे वित्त, चित्त, गोत आहे. विठ्ठलच धर्म-अर्थ-काम-मोक्ष असून त्यांचे पुण्यही तोच आहे त्यामुळे तर मला त्याच्याच गोष्टी आवडतात विठ्ठलच सर्व लोकांमध्ये विस्तारलेला आहे असून सप्त पाताळात तोच भरून आहे. विठ्ठलच सर्वत्र व्यापक आहे त्रिभुवनात आहे व मुनी जनांच्या मनातही तोच आहे. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा असून विठ्ठल कृपा करण्याविषयी अतिशय कोमल आहे. विठ्ठलच प्रेमाचा पुतळा असून त्याचाच चाळा त्याने सर्व विश्वाला लावलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच आई, बाप, चुलता आहे व विठ्ठलच भाऊ – बहीण आहे. विठ्ठला वाचून मला दुसरे कोणतेही गण गोत आवडत नाही एवढेच नाही तर विठ्ठला वाचून मला कोणीही नाही.
26/12/22, 10:12 Sdm:
अभंग क्र. ४०१६
बरवा झाला वेवसाय । पावलो चिंतिला चि ठाव । दृढ पायी राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचे जालिया दर्शन । जन्ममरण नाही आता ॥धृपद॥
बरवे जाले आलो या ठाया । होते संचित ठायीच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥२॥
जोडिले हे न सरे धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ती मधुसूदन । सम चरण देखियेला ॥३॥
जुनाट जुगादिचे नाणे । बहुता काळाचे ठेवणे । लोपले होते पारिखेपणे । ठावचळणे चुकविला ॥४॥
आता या जीवाचियासाठी । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलो जगजेठी । न लवी दिठी दुर्‍याची ॥५॥
अर्थ
देवा तुमच्या पावलाचे चिंतन करून माझा भक्तिभाव तुमच्या पायाच्या ठिकाणी एकनिष्ठ झाला हा माझा परमार्थिक व्यवसाय अतिशय चांगला झाला आहे. तुमच्या पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव दृढ राहिला आणि माझ्या जीवाला विश्रांती प्राप्त झाली सर्व शकुन फलद्रूप झाले असून सर्व शीण नाहीसा झाला आहे. देवा तुमचे मला दर्शन झाले त्यामुळे आता मला जन्म-मरणाच नाही राहिले बरे झाले मी या ठिकाणी आलो माझे पूर्व संचित चांगले होते त्यामुळे मी येथे येऊ शकलो. माझा देहभाव बदलला माझ्या शरीरावर परब्रह्माची सावली पडली मी ब्रम्‍ह रूपच झालो हे अविनाश, आनंदधन मला लाभले आहे ते केव्हाही संपणार नाही. असा तो अमूर्ति निराकार परमात्मा मी त्याचे दोन्ही समचरण मूर्तिमंत आकार रूप झालेले प्रत्यक्ष डोळ्याने देखीयले आहे. असे हे धन अतिशय पुराणिक असून खूप दिवसापासून येथे ठेवले आहे. परंतु हे नाणे परीक्षका वाचून गुप्त होते या नाण्याचे ठिकाण कोणालाही लवकर सापडले न�
26/12/22, 10:13 Sdm:
अभंग क्र. ४०१७
मी तव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्या आठविले नाही कधी । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥
नाही ऐकिले गाइले गीत । धरिली लाज सांडिले हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥धृपद॥
नाही केला करविला परोपकार । नाही दया आली पीडिता पर । करू नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥
नाही केले तीर्थाचे भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाही संतसेवा घडले दान । पूजावलोकन मुर्तीचे ॥३॥
असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावे ते काय । नये बोलू आठवू ते ॥४॥
आप आपण्या घातकर । शत्रु झालो मी दावेदार । तू तव कृपेचा सागर । उतरी पार तुका म्हणे ॥५॥
अर्थ
हे कृपानिधी मायबापा मी तर खरा अपराधी अनाथ आहे, कर्महीन आहे, मतिमंद, बुध्दीहीन आहे. कारण मी वाचेने कधीच तुझी आठवणच काढली नाही. मी हरीचे गीत कधी गायिले नाही किंवा संतांच्या मुखाने ऐकले नाही त्याविषयी लाज धरली म्हणून मी माझ्या हिताला अंतरलो आहे. संत पुराण सांगण्यास बसले तर ते मला कधीही आवडले नाही परनिंदा तर मी खूप केली आहे. मी कधीही कोणावर परोपकार केला नाही किंवा कोणाकडूनही परोपकार घडून घेतला नाही मला दुस-यांना त्रास देण्याविषयी कधीही दया आली नाही. जो व्यापार करु नये तो व्यापार केला आणि कुटूंबाचा भार वाहिला. मी कधीही तीर्थभ्रमण केले नाही पण हातापायासहीत पिंडाचे पोषण केले. माझ्या हातून कधीही संतसेवा घडली नाही, दान घडले नाही आणि शिव आणि विष्णूच्या मूर्तीचे पूजन तर कधीही माझ्या हातून घडलेच नाही. पापी, अभक्त, दुर्जन, दुष्ट लोकांची मला अंगसंगती घडली त्यामुळे माझ्याकडून अन्याय अभक�
26/12/22, 10:13 Sdm:
अभंग क्र. ४०१८
आता पावन सकळ सुखे । खादले कदा ते नखे । अवघे सरले पारिखे । सकळ देखे माहियेर ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताचीच साई । पारिखे काई ऐसे नेणिजे ॥धृपद॥
जगदाकारी जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलेचि आता । लाज आणि चिंता दुहावली ॥२॥
वावरे इच्छा वसे घरी । आपुले सत्तेचे माहेरी । करवी तैसे आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥
सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु कामे पुरविला सोस । आता उदास आपुल्याते ॥४॥
करिती कवतुक लाडे । मज बोलविती कोडे । मायबाप उत्तरे गोडे । बोले बोबडे पुढे तुका ॥५॥
अर्थ
आता मी सर्व सुखाला प्राप्त होईन जे विषयभोग मी भोगलेत ते आता कधीही डोळयाने पहाणार देखील नाही. आता सर्व परक्या भावना नाहीश्या झाल्या आणि सर्वत्र मी माझे माहेरच पाहात आहे. माझ्याजवळ विठ्ठल रखुमाई आहे बहिण, बंधू, बाप, आई हे सर्व माझ्यासाठी एक विठोबाच आहे. विठ्ठलच माझ्यासाठी सर्व गणगोतासारखा आहे. त्यामुळे मला परके असे दुसरे काहीच नाही. आता सर्व जगताच्या ठिकाणी एक आत्मसत्ताच प्रकट झाली असून माझा केवळ या देहापुरताच संबंध आहे ही संकुचित भावना म्हणजे पराधिनता नाहीसी झाली आहे. त्यामुळे सर्व काही आपलेच स्वरुप आहे हे समजले आणि या कारणामुळे लाज व चिंता हे दुरावले गेले. आता आपल्या सत्तेचे जे माहेर म्हणजे विठ्ठल त्याच्याच ठिकाणी माझ्या सर्व इच्छा वसत आहेत, नांदत आहेत. जशी माझी इच्छा आहे तसे मी करीत आहे आणि ते करताना जरी काही माझ्याकडून काही चुकले तरी मी कोणाची भीड धरीत नाही. मी आतापर्यंत खूप दिवसापासून खूप विकारांचा सासूरवास स
26/12/22, 10:14 Sdm:
अभंग क्र. ४०१९
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाही केला । हिंडता दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥
माझे स्वहित नेणती कोणी । काहीच न करिता मजवाचुनी । सज्जन तव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदिअंत ॥धृपद॥
काय सांगो गर्भीची यातना । मज भोगिता नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणाक्षणा ध्यात असे ॥२॥
मज चालता प्रयाणकाळी । असता न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळी संचिताचे ॥३॥
आता मज ऐसे करी गा देवा । काही घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवी दावा संसारे ॥४॥
अर्थ
माझा सर्व जन्म सुखाची अपेक्षा करण्यातच गेला परंतु एक क्षण देखील मुक्तीसाठी प्रयत्न केला नाही. अनेक जन्ममरणरुप योनीच्या दिशा हिंडून हिंडून माझा जीव शीण पावला आहे म्हणजे त्रासला आहे कारण माझ्या जीवाला मायेने वेढले आहे. माझे स्वहित कोणी जाणतही नाही आणि माझ्या स्वहिताविषयी माझ्यावाचून कोणी काहीच करणार नाही. माझे आप्त, इष्ट, नातेवाईक, सज्जन सोयरे हे तर केवळ माझ्या सुखाचे सोबती ते केवळ सुखाचे मान्य आहे परंतु माझा आदी व अंत कसा आहे हे कोणीही जाणत नाहीत. हे नारायणा मी गर्भामध्ये असताना काय यातना भोगल्या आहेत ते तुम्हाला काय सांगू ? गर्भामध्ये असताना मी मांस मलमूत्र यामध्ये वेढलो गेलो होतो त्यावेळी मी तुला क्षणाक्षणाला आठवित होतो. माझ्या प्रयाणकाळी म्हणजे प्राणांतकाळी माझ्याजवळ असलेले इष्ट नातेवाईक आप्तेष्ट, सगेसोयरे हे कोणीही मला दिसत नाहीत. देह ही मातीच आहे शेवटी ती मातीच्याच मध्ये एकरुप होते मातीलाच मिठी मारते आणि शेवटी केवळ एका संचिताशीस सं�
26/12/22, 10:14 Sdm:
अभंग क्र. ४०२०
अगा ये सांवळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केले कर्मभ्रष्ट । तुमचे चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये ॥धृपद॥
झालो पागिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधी सोडविसी । दृढपाशी बहु बांधलो ॥२॥
येथे तो नये आठव काही । विसावा तो क्षण एक नाही । पडिलो आणिके प्रवाही । हित तो काही दिसेचि ना ॥३॥
जीवित्व वेचलो वियोगे । हिंडता प्रवास वाउगे । काही व्याधि पीडा रोगे । केलिया भोगे तडातोडी ॥४॥
माझा मींच जालो शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्ग‍ुरु तुका म्हणे ॥५॥
अर्थ
हे सावळया सगुणा नारायणा तू म्हणजे गुणाचा ठेवाच आहेस. देवा तुम्ही आपल्या दीनभक्तांचा सांभाळ करावा ही एवढीच एक आमची विनंती तुम्ही ऐका. आमच्या उदरनिर्वाहाचे मोठे कष्ट आम्हाला आहे आणि त्या योगाने आम्ही नको ते व्यवहार करुन कर्मभ्रष्ट झालो आहोत. त्यामुळे आम्ही तुमच्या प्राप्तीचा मार्ग चुकलो आहोत आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने आम्ही नको ती वटवट करीत बसलो आहोत. संसारामुळे मी लोकाचा अंकित झालो आहे आणि आंदन दिलेल्या दासीप्रमाणे मी संसाराचा दास झालो आहे. तू मला यातून कधी सोडवशील हे मला काही कळत नाही मी तर संसाराच्या जवळ अगदी पक्का बांधला गेलो आहे. या संसारामध्ये तर तुझी आठवणच येत नाही आणि विश्रांती म्हणशील तर क्षणभर देखील संसारात नाही. अशा प्रकारे मी या संसाराच्या प्रवाहामध्ये आणखीच पडलो आहे आणि माझे हित तर येथे मला काहीच दिसत नाही. देवा जन्ममरणाच्या व्यर्थ प्रवास�

डिसेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading