७ सप्टेंबर, दिवस २५० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५२६ ते ५५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २९८९ ते ३०००

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ७ September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ७ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९८९ ते ३००० चे पारायण आपण करणार आहोत.
७ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५२६ ते ५५०,

526-15
आता अन्यथाज्ञानी । या दोनी अवस्था जया जनी । तया हरपती घनी । अज्ञानतत्त्वी ॥526॥
आता अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगात रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानात लय पावतात. 26
527-15
ते अज्ञान ज्ञानी बुडालिया । ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनिया । स्वये जळे ॥527॥
त्या अज्ञानाचा, जसा अग्नि, काष्ठ जाळून आपणही स्वतः जळतो म्हणजे स्वरूपात शांत होतो; तसा ज्ञानाने ग्रास करून ते ज्ञानही (काही कर्तव्य नाही म्हणून) मागल्या पावली निघून गेले. (शांत झालें) 27
528-15
तैसे अज्ञान ज्ञाने नेले । आपण वस्तु देऊनि गेले । ऐसे जाणणेनिवीण उरले । जाणते जे ॥528॥
ज्ञानाने समूळ अज्ञान नाहीसे होते, व अज्ञाननाशाचा क्षण तोच वस्तुप्राप्तीचा क्षण असल्याने वस्तुदर्शनही ज्ञानामुळेच होतें; व अज्ञाननाशाबरोबर ज्ञाताज्त्रयादि व्यवहाराचा लोप होत असल्याने ज्ञानाचे जीवनच जाऊन तेही अंग टाकतें. म्हणजे सामान्यज्ञानरूप किंवा द्रह्मरूप होतें; ही अवस्था जाणण्यात म्हणजे येणारी नसून स्वसंवेद्य आहे म्हणून काही निर्देशच करणे तर तेथे ‘जाणण्याशिवाय नुसते जाणणे’ म्हणजे ज्ञानमात्र स्थित असते असा उपचार करावा लागतो. 28
529-15
ते तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय का निष्कर्षु । दोहीहून आणिकु । मागिला जो ॥529॥
ही स्थिति तो उत्तम पुरुष होय. मागील क्षराक्षर पुरुषांच्या अपेक्षेने त्याला तिसरा असे म्हटले, तो शेवटचा शुद्ध परमात्मा होय. 29
530-15
सुषुप्ती आणि स्वप्ना- । पासूनि बहुवे अर्जुना । जागणे जैसे आना । बोधाचेचि ॥530॥
अर्जुना, सुषप्ति आणि स्वप्न ह्यापेक्षा जागृतीतील बोध जसा फार वेगळा असतो. 530
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


531-15
का रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवी वेगळा । उत्तमु गा ॥531॥
किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ यांहून सूर्य मंडल जसे फारच वेगळे, तसाच हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून अत्यंत वेगळा आहे. 31
532-15
हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥532॥
किंवा याहूनही, काष्ठांतीलच वन्हि जसा काष्ठाहून भिन्न असतो; तसा क्षराक्षरांत असूनही हा उत्तम पुरुष त्याहून वेगळाच आहे. 32
533-15
पै ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदा । उठी कल्पांती उदावादा । एकार्णवाचा ॥533॥
कल्पांतकाळचा एकार्णव (व्यापक समुद्र) जशी आपली मर्यादा ओलांडून नदीनद जसे सर्व एकरूप म्हणजे जलमय करितो. 33
534-15
तैसे स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजे ॥534॥
प्रलयकालच्या तेजोमय स्थितीत जसा दिवस आणि रात्र हा भेद उरत नाही, तशी, ह्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी, सुषुप्ति, स्वप्न किंवा जागृति अशा अवस्थाभेदांची गोष्टच बोलणे नको. 34
535-15
मग एकपण ना दुजे । असे नाही हे नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथे ॥535॥
मग ? ते द्वैत किं अद्वैत आहे, हे किंवा नाही काहीच सांगण्याची सोय नाही व त्रिपुटीच्या अभावी हा उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवही भयाने बुडी देऊन रहातो. 35


536-15
ऐसे आथि जे काही । ते तो उत्तम पुरुषु पाही । जे परमात्मा इही । बोलिजे नामी ॥536॥
असे जे काही तत्व आहे, तो उत्तम पुरुष जाणावा; त्यालाच परमात्मा असे म्हणतात. 36
537-15
तेही एथ न मिसळता । बोलणे जीवत्वे पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥537॥
अर्जुना, हे वर्णनही या उत्तम पुरुषस्थितीच्या बाहेर असलेला जीवभाव पत्करून करून बोलावे लागते. बुडालेल्याची वार्ता काठावरील मनुष्य सांगू शकेल, बुडालेला नव्हे. 37
538-15
तैसे विवेकाचिये कांठी । उभे ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणे वेदा ॥538॥
त्याप्रमाणे अर्जुना, विचाराच्या तीरावरच जोपर्यंत वेद उभे आहेत तोंवरच त्यास अक्षर अलीकडले, उत्तमपुरुष यांच्या हि पलीकडला ” वगैरे अलिकडच्या पलिकडल्या गोष्टी करत आल्या. 38
539-15
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । याते म्हणती परु । आत्मरूप ॥539॥
म्हणून. क्षर व अक्षरपुरुष हे‘ अवर’ म्हणजे कनिष्ठ आहेत असे पाहून ह्या उत्तम पुरुषाला ” पर ” म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा म्हणजे परमात्मा असे म्हणतात. 39
540-15
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारी । पुरुषोत्तमु ॥540॥
अर्जुना ह्याप्रमाणे परमात्मा ह्या शब्दाने पुरुषोत्तम (उत्तमपुरुष) अते सुचविले आहे असे समज. 540
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


541-15
एऱ्हवी न बोलणेचि बोलणे । जेथिचे सर्व नेणिवा जाणणे । काहीच न होनि होणे । जे वस्तु गा ॥541॥
आणखी त्या विषयी मौन धरणे हेच तद्विषयक बोलणे होय, जे कोणत्याही समजेत न येणे हेच त्याचे जाणणे ( अविजानता विज्ञातं = ज्यांनी ब्रम्ह जाणले नाही त्यानिंच खरे जाणले) ते होन्या जाण्यातले नाही असा समज हेच त्याचे होणे 41
542-15
सोऽहं तेही अस्तवले । जेथ सांगतेचि सांगणे जाले । द्रष्टत्वेसी गेले । दृश्य जेथ ॥542॥
सोऽहं ही बुद्धि जेथे मावळली व सर्वाधिष्ठानत्वामुळे सांगणाराच सांगणेरूप झाला व दृङमात्र स्वरूपनिश्चयात द्रष्टत्व लोपले व त्यामुळे दृश्यही आटलें. 42
543-15
आता बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजी कैची हे म्हणो नये प्रभा ? । जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥543॥
कोणत्याही प्रकारे ती प्रतीतीला आली नाही तरी बिंब आणि प्रतिबिंब ह्यांच्यामध्ये बिंबाची सूक्ष्म आकृति नाही असे कसे म्हणता येईल ? 43
544-15
का घ्राणा फुला दोही । द्रुती असे जे माझारिला ठायी । ते न दिसे तरी नाही । ऐसे बोलो नये ॥544॥
किंवा प्राण आणि फुले ह्या दोघांच्यामधील प्रदेशांतही त्यांचा गंध, तो आपल्यास आहे असा वाटला नाही । तरी, आहे असे म्हटले पाहिजे. 44
545-15
तैसे द्रष्टा दृश्य हे जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेचि अनुभवे तेचि पाहे । रूप तया ॥545॥
तसे द्रष्टेपणा व त्याच्याबरोबर दृश्यवस्तु ह्यांचा लोप झाल्यावर तेथे अमुक एक आहे असे कोणी म्हणावे ? पण अशीच ती वस्तु आहे हे अनुभवानेच जाणावयाचे असते किंवा अनुभवी तेच जाणोतो; असे उत्तम पुरुषाचे रूप आहे.


546-15
जो प्रकाश्येवीण प्रकाशु । ईशितव्येवीण ईशु । आपणेनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥546॥
जो प्रकाश्य वस्तूवाचून प्रकाशरूप आहे, नियम्य वस्तूवाचून जो स्वरूपतः ईश आहे व जो सर्व अवकाश व्यापून आपणच आहे. 46
547-15
जो नादे ऐकिजता नादु । स्वादे चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेचि ॥547॥
जो नादाचाही नाद (नादपणा ज्या सत्तेवर नांदतो आहे) तसाच जो स्वादाचाही स्वाद असून जो आपल्या आनंदस्वरूपानेच आनंदाचा भोग घेत असतो. 47
548-15
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथे ॥548॥
जो पूर्णतेचा अंत ( किंवा परिणाम पावलेली अगर अवतरलेली अशी मूर्त पूर्णता ) सर्वपुरुषश्रेष्ठ व विश्रांतीचेही विश्रामस्थान. 48
549-15
सुखासि सुख जोडिले । जे तेज तेजासि सांपडले । शून्यही बुडाले । महाशून्यी जिये ॥549॥
जेथे सुखालाच सुखाची जोड, तेजालाच तेजोलाभ अगर महाशून्यामध्येच शून्याचा लय. 49
550-15
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेही ग्रासूनि पुरता । जो बहुते पाडे बहुता- । पासूनि बहु ॥550॥
जो विकास संपून अवधिभूत असणारा, ग्रासाचाही ग्रास करून पूर्णत्वाने असणारा, जो सर्व बहुत्वाहुनही बहु म्हणजे श्रेष्ठ आहे. 550
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २५० वा. ७, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९८९ ते ३०००
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २९८९
विनवितो चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥
तुझे दास ऐसे जगी वाखाणिले । आता नव्हे भले मोकलिता ॥धृपद॥
माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझे ॥२॥
लोभ मोह माया आम्हा बांधविता । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥
तुका म्हणे मी तो पतितचि खरा । परि आलो दातारा शरण तुज ॥४॥
अर्थ
हे दातारा पाडूरंगा चतुरानना विश्वंभरा मी तुला विनंती करीत आहे ती कृपया तुम्ही ऐकावी. हे पाडूरंगा अरे जगाने मी तुझा भक्त आहे अशी माझी किर्ती वर्णन केली आहे गायिली आहे त्यामुळे तू जर आता माझा त्याग केला तर हे चांगले होणार नाही. अहो देवा माझे गुणदोष तुझ्यावाचून जगात कुणाला माहित आहे काय आणि तुझे नाम पतितपावन आहे त्यामुळे माझ्या पतिताला तू पावन करावेस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे दातारा मी पतित आहे हे तर खरेच आहे परंतू मी तुला शरण आलो आहे. ”
अभंग क्र. २९९०
त्राहे त्राहे त्राहे सोडवी अनंता । लागो दे ममता तुझे पायी ॥१॥
एकचि मागणे देई तुझी गोडी । न लावी आवडी आणिकाची ॥धृपद॥
तुझे गुण नाम वर्रिन पवाडे । आवडीच्या कोडे नाचो रंगी ॥२॥
बापा विठ्ठलराया हेचि देई दान । जोडती चरण जेणे तुझे ॥३॥
आवडीसारखे मागितले जरी । तुका म्हणे करी समाधान ॥४॥
अर्थ
हे अनंता मला या त्रासातुन सोडव सोडव सोडव आणि तुझ्या पायाच्या ठिकाणी मला ममता लागू दयावी. देवा मला तुझी गोडी लागू दे एवढे एकच मी मागणे तुला मागत आहे तुझ्यावाचून मला इतर कुणाचीही आवड लागू देऊ नकोस. देवा तुझे गुण नाम मी वर्णन करुन तुझे पोवाडे गायीन आणि तुझ्या आवडीच्या छंदामध्ये मी तुझ्या रंगात नाचेन. हे माझ्या बापा विठ्ठलराया जेणेकरुन तुमच्या चरणाची प्राप्ती होईल असेच दान मला तुम्ही दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी जरी तुला माझ्या आवडीचे दान मागितले आहे तरी पण ते तू मला देऊन माझे समाधान कर. ”
अभंग क्र. २९९१
सुगरणीबाई थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्ये ॥१॥
क्षीरीमध्ये हिंग दुधामध्ये बोळ । थितेचि वोंगळ नाश केला ॥धृपद॥
हिरयाचे पेटे आणीयेल्या गारा । खांदी शिरी भारा व्यर्थ वाहे ॥२॥
दळण दळोनी भरीयेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥३॥
कापुराचे सांते आणिला लसण । वागविता सीण दुःख होय ॥४॥
रत्नाचा जोहारी रत्नचि पारखी । येर देखोदेखी हाती घेती ॥५॥
तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडता थुंका तोंडावरी ॥६॥
अर्थ
एका सुंदर सुगरण बाईने संपूर्ण स्वयंपाकाचा नाश केला तो म्हणजे असा की तिने भाजीमध्येच गूळ घातला. खीरीमध्ये हिंग दुधामध्ये गूळ घालून चांगल्या साम्रगीचा तिने नाश केला. जर हिऱ्याच्या बाजारपेठेमध्ये गारगोटया आणल्या तर खांदयावर व माथ्यावर व्यर्थ भार वाहावा लागतो. दळण दळताना पाळी भरुन दळण घेतले आणि त्यामुळे झाले काय की चांगले दळण भरडल्यासारखेच दळून निघले त्यामुळे त्याचा देखील नाशच केला. कापूराबरोबर लसूण आणला आणि तो बरोबर वागविला तर त्याचा त्रास होऊन दु:ख होते. जो रत्नाचा व्यापारी आहे तो रत्नाची पारख अगदी व्यवस्थितपणे करतो परंतू ज्याला रत्नाची माहिती नाही ते मनुष्य केवळ देखो विके हातात रत्न घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, “जर दोन चांगल्या गोष्टींचा योग घडून आला तर गोष्ट चांगलीच आहे परंतू चांगला आणि वाईट या दोन गोष्टींचा योग घडून आला तर त्यांच्या तोंडावर थुंकावे. ”
अभंग क्र. २९९२
धन मेळवूनि कोटी । सवे नये रे लंगोटी ॥१॥
पाने खाशील उदंड । अंती जासी सुकल्या तोंड ॥धृपद॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटी गोवऱ्या सांगाती ॥२॥
तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ॥३॥
अर्थ
अरे तुम्ही कोटयावधी धन मिळवून ठेवा परंतू तुमच्याबरोबर साधी लंगोटी देखील येणार नाही. अरे तू आता पुष्कळ पाने खाशील परंतू सुकल्या तोंडानेच तू शेवट मरणार आहेस. अरे तू आता चांगल्या पलंगावर चांगले अंथरुन टाकून निजतोस परंतू शेवटी तुला गोवऱ्याच सोबतीला राहणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे एका रामाला तुम्ही जर विसरले तर बाकी तुम्हाला सारे श्रमच होणार आहेत. ”
अभंग क्र. २९९३
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥
कर ठेवुनिया कटी । उभा चंद्रभागे तिटी ॥धृपद॥
गळा वैजयंतीमाळा । रूप डोळस सावळा ॥२॥
तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥
अर्थ
माझा बाप दीननाथ आहे तो भक्तांची वाट पाहात आहे. तो आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून चंद्रभागेच्या तटी उभा आहे. त्याच्या गळयामध्ये वैजयंती माळ आहे आणि तो खूपच डोळस असून सावळा स्वरुपाचा आहे असे त्याचे रुप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा माझ्या दीनानाथ बापाने भक्तांना भेटण्यासाठी आपले बाहू सदा उभारलेले आहेत. ”
अभंग क्र. २९९४
माझे जीवन तुझे पाय । कृपाळुं तू माझी माय ॥१॥
नेदी दिसो किविलवाणे । पांडुरंगा तुझे तान्हे ॥धृपद॥
जन्ममरण तुजसाठी । आणीक नेणे दुजी गोठी ॥२॥
तुका म्हणे तुजविण । कोण हरील माझा सीण ॥३॥
अर्थ
देवा पाडूरंगा तू कृपाळू आहेस माझी आई आहेस आणि तुझे पाय म्हणजेच माझे जीवन आहे. हे पाडूरंगा अरे तुझ्या तान्ह्याला तू कधीही केविलवाणा दिसू देऊ नको. देवा मी जन्ममरण भोगीन केवळ तुझ्यासाठीच आणि तुझ्यावाचून दुसरी कोणतीही गोष्ट मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्यावाचून माझा शीण दुसरा कोण हरण करील ? ”
अभंग क्र. २९९५
का रे पुंड्या मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥१॥
ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट ॥धृपद॥
युगे झाली अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥
भाव देखोनि निकट । देवे सोडिले वैकुंठ ॥३॥
तुका म्हणे पुंडलिका । तूचि भक्त बळिया निका ॥४॥
अर्थ
हे पुंडलिका अरे तू भक्तीप्रेमाच्या जोरावर एवढा कसा माजला आहेस आणि त्याच्या जोरावर तू विठ्ठलाला उभे का केले आहेस ? अरे पुंडलिका तू एवढा उध्दट कसा आहेस रे प्रत्यक्ष विठ्ठल तुला भेटण्यास आले तर तू त्यांच्यापुढे वीट भिरकावली व त्यावर त्यांना रात्रंदिवस उभे केले. अरे अठ्ठाविस युगे झाली तरी देखील अजूनही तू त्यांना बस असे म्हणत नाहीस. अरे तुझा भक्तीभाव पाहून देवाने वैकुंठ सोडले. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पुंडलिका तूच एक सर्वामधे खरा आणि बलवान भक्त आहेस. ”
अभंग क्र. २९९६
तुज पाहाता समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडिली पंढरिराया ॥धृपद॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥२॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥३॥
अर्थ
देवा आता मी तुम्हाला समोर पाहिले व माझी दृष्टी माघारी फिरतच नाही. हे पंढरीराया माझे चित्त तुझ्या पायाकडे गेले आणि माझ्या चित्ताने तुझ्या पायाला मिठीच मारली. एकदाच की मीठ पाण्यामध्ये मिसळविले की ते पुन्हा वेगळे करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी माझा जीव तुमच्या पायाच्या तळाखाली बळी दिला आहे म्हणजे माझ्या जीवदशेला मी आता सोडून देऊन तुमच्या आत्मस्वरुपात मी विलीन झालो आहे जसे पाण्यात मीठ मिळविले की ते पाण्यापासून वेगळे होत नाही त्याप्रमाणे मी तुमच्या आत्मस्वरुपात एकरुप झालो आहे आता कदापीही वेगळे होऊ शकत नाही. ”
अभंग क्र. २९९७
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरे काही ॥१॥
शुद्ध का वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणे ॥धृपद॥
नाही भाव मनी नाइके वचन । आपल्या आपण नाडियेले ॥२॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥३॥
अर्थ
मूर्ख मनुष्याला उपदेश तरी किती वेळा करावा व किती करावा त्यांना काही चांगले आवडतच नाही. चांडाळ मनुष्याची वासना म्हणजे इच्छा हे शुध्द का नसतात काही कळत नाही परंतू त्याने आपले पूर्वपुण्य संचित वाईट वर्तन करुन त्याची होळीच केलेली असते. तो देवगुरु आणि वेद यांच्याविषयी खरा भक्तीभाव कधीही मनात ठेवत नाही आणि संतांनी सांगितलेले चांगले वचन तो कधीही ऐकत नाही यामुळेच तो स्वत:च्याच कर्माने नडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो अशा दुष्ट अभाविक चांडाळ मूर्ख मनुष्याला त्याच्या आईने जन्मच का दिला असेल तो रात्रंदिवस निरर्थक बडबडच करत असतो. ”
अभंग क्र. २९९८
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचे ॥धृपद॥
मान भलेपण नाही फुकासाठी । जयावरी गाठी झीज साहे ॥२॥
तुका म्हणे हे तू सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाही ॥३॥
अर्थ
समर्थाला आपल्या नामाची लाज असते, त्याला काळजी असते त्यामुळेच त्याला कोणीही शरण आले तर शरण आलेल्याचे रक्षण करण्याची काळजी चिंता त्याला असते. मग शरण आलेल्याचे गुण किंवा दोष त्याने केलेले अन्याय हे काहीही कर्म समर्थ पाहात नाहीत केवळ त्याला सुख देऊन त्याचे दु:ख निवारण करण्याचा त्रास तो सोसत असतो. मान आणि भलेपणा हा फुकट मिळत नाही तर त्यासाठी पदरच्या काही गोष्टीही झिजवाव्या लागत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा हे सर्व तू जाणतो आहेसच पण आता मी अधीर झालो की मला आता धीरच धरवत नाही. ”
अभंग क्र. २९९९
आनंदे कीर्तन कथा करी घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
मज या आवडे वैष्णवाचा संग । तेथे नाही लाग कळिकाळाचा ॥धृपद॥
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
उच्चांरिता मज दुजे वाटे लाज । उपदेशे काज आन नाही ॥३॥
तुका म्हणे मन रंगलेंसे ठायी । माझे तुझ्या पायी पांडुरंगा ॥४॥
अर्थ
आता मी हरी कीर्तन व कथा आनंदाने व हरीचा घोष करुन करत आहे कारण त्यामध्ये माझ्या आवडीचा प्रेमसुखरस आहे. मला या वैष्णवाचा संगच फार आवडतो कारण तेथे कळीकाळाला प्रवेशच मिळत नाही. अतिशय सोपा असलेला रामकृष्ण नारायण हा मंत्र माझ्या जीभेवर अतिशय चांगल्या प्रकारे बसला आहे. अहो या मंत्रावाचून दुसरा उच्चार देखील करताना मला लाज वाटते आणि या मंत्रावाचून दुसरा उपदेश करण्याचेही मला काही कारण राहिलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझे मन रंगले आहे. ”
अभंग क्र. ३०००
आता पहाशील काय माझा अंत । आलो शरणागत तुज देवा ॥१॥
करी अंगीकार राखे पायापाशी । झणी दिसो देसी केविलवाणे ॥धृपद॥
नाही आइकिली मागे ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥
तुका म्हणे आता धरी अभिमान । आहेसी तू दानशूर दाता ॥३॥
अर्थ
देवा मी तुला आता शरण आलो आहे आता माझा अंत पाहशील की काय ? देवा माझा अंगीकार तुम्ही करा तुमच्या पायापाशी मला ठेवा आणि तुमच्या या भक्ताला कधीही केविलवाणे दिसू देऊ नका बरे. देवा यापूर्वी मी अशी गोष्ट कधीही ऐकली नाही की तू शरण आलेल्या भक्तांची उपेक्षा केली आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता तरी तू माझा अभिमान धर कारण तु दानशूर दाता आहेस. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading