१५ सप्टेंबर, दिवस २५८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १२६ ते १५०+ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०८५ ते ३०९६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१५ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १५ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३०८५ ते ३०९६ चे पारायण आपण करणार आहोत.
१५ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १२६ ते १५०,

126-16
त्वचा पाये शिरी । हालेयाही फडे न करी । वसंतीही अंबरी । न होती फुले ॥126॥
सर्पाच्या कांतेच्या शिरावर पाय दिला असता ती जशी फडा वर करीत नाही, किंवा वसंत ऋतु प्राप्त झाला तरीही आकाशात जशी पुष्पे निर्माण होत नाहीत. 26
127-16
नाना रंभेचेनिही रूपे । शुकी नुठिजेचि कंदर्पे । का भस्मी वन्हि न उद्दीपे । घृतेही जेवी ॥127॥
अथवा, रंभेचे लावण्यही जसे शुकाच्या चित्तांत विषयवासना उत्पन्न करू शकले नाही, किंवा भस्मात तूप घातले तरीही जशी अग्निज्वाला उत्पन्न होत नाही. 27
128-16
तेवीचि कुमारु क्रोधे भरे । तैसिया मंत्राची बीजाक्षरे । तिये निमित्तेही अपारे । मीनलिया ॥128॥
त्याचप्रमाणे लहान मुलालाही राग येईल अशा शेलक्या शिव्या जरी कोणी दिल्या अथवा आणखींही अशी काही कारणे घडलीं. 28
129-16
परी धातयाही पाया पडता । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजविता । क्रोधोर्मी गा ॥129॥
किंवा, अर्जुना, जो मृत झाला आहे तो, जसा ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी उठत नाही. तसा काहीही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तांत ऋोध उत्पन्न होत नाही. 29
130-16
अक्रोधत्व ऐसे । नांव ते ये दशे । जाण ऐसे श्रीनिवासे । म्हणितले तया ॥130॥
अशी जी चित्ताची स्थिति तिला अक्रोधत्व असे म्हणावे असे भगवंतांनी सांगितले आहे. 130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


131-16
आता मृत्तिकात्यागे घटु । तंतुत्यागे पटु । त्यजिजे जेवी वटु । बीजत्यागे ॥131॥
आता मृत्तिकेच्या त्यागाने, तंतुत्यागाने, किंवा बीजत्यागाने जसा अनुक्रमे घट, पट व वृक्ष त्याग सहज व केल्या सारखा होतो. 31
132-16
का त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेचि चित्र । का निद्रात्यागे विचित्र । स्वप्नजाळ ॥132॥
किंवा भिंत त्यागिली असता तिजवरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखे होते, किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होते. 32
133-16
नाना जळत्यागे तरंग । वर्षात्यागे मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागे ॥133॥
किंवा जलत्यागाने तरंग, वर्षाऋतूच्या अंताने जसे मेघ किंवा धन त्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात. 33
134-16
तेवी बुद्धिमंती देही । अहंता सांडूनि पाही । सांडिजे अशेषही । संसारजात ॥134॥
त्याप्रमाणे विचारी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव त्यागिला अथवा बाधित केला असता, त्याचा सर्व संसार त्यक्तप्राय होतो. 34
135-16
तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥135॥
अशा स्थितीला ” त्याग” म्हणावे असे यज्ञभोक्ता भगवान् श्रीकृष्ण परमात्मा ह्यांनी सांगितले. ते ऐकून भाग्यवान अर्जुना पुन्हा विचारिता झाला. 35


136-16
आता शांतीचे लिंग । ते व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देई ॥136॥
देवा, शांति कशाला म्हणावे ते मला स्पष्ट करून सांग; तेव्हा देव म्हणाले, सांगतो, लक्ष देऊन श्रवण कर. 36
137-16
तरी गिळोनि ज्ञेयाते । ज्ञाता ज्ञानही माघौते । हारपे निरुते । ते शांति पै गा ॥137॥
ज्ञात्याने प्रथम सर्व ज्ञेयमात्राचा (त्याला स्वस्वरूपाहून पृथक् सत्ता नाही अशा बोधाने) ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेही पाठोपाठ जेथे लय पावते अशी जी वस्तु (ब्रह्मवस्तु) तीच शुद्ध शांति होय. 37
138-16
जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपे निबिडु । आपणचि ॥138॥
ज्याप्रमाणे प्रलयकालाचे जळ वाढू लागले म्हणजे, विश्वचा थांगपत राहू न देता, सर्व दिशा आपणच व्यापून आपल्याच स्वरूपाने केवल स्थित असते. 38
139-16
मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥139॥
व मग, उगम, प्रवाह, अगर विश्रांतिस्थान जो सागर इत्यादि व्यवहारभेद सर्व लोपून जातात, तेथे, ” सर्व जलमय आहे ” असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो व्हावा ? 39
140-16
तैसी ज्ञेया देता मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटी । मग उरे तेचि किरीटी । शांतीचे रूप ॥140॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सर्व ज्ञेय आटून गेले असता (बाधित झाले असता ) ज्ञातृत्वही आपोआपच आपल्याच ठिकाणी लयाला जाऊन केवळ ज्ञप्तिमात्र (ज्ञानमात्र) असणारी जी वस्तु, तेच शान्तीचे खरे स्वरूप होय. 140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


141-16
आता कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधी । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥141॥
आता व्याधिग्रस्त रोग्याला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपपर भाव बाळगीत नाही. 41
142-16
का चिखली रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥142॥
किंवा चिखलांत रुतलेली गाय पाहून ज्याचे अंत:करण व्यथित होते तो जसा तिचा उद्धार करतांना ती दुभती आहे की भाकड आहे ह्याचा विचार करीत बसत नाही. 42
143-16
नाना बुडतयाते सकरुणु । न पुसे अंत्यजु का ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेचि जाणे ॥143॥
किंवा बुडणाऱ्या मनुष्याची करुणा येणारा समर्थ मनुष्य जसा तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे ह्याचा विचार न करिता त्याला तीराला पोंचवून त्याचा प्राण रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य समजतो. 43
144-16
की माय वनी पापिये । उघडी केली विपाये । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥144॥
किंवा पाप्यांनी एखादी गरीब अबला अरण्यात उघडीनागडी केलेली दिसतांच तिचे शरीर आच्छादित केल्याशिवाय कोणीही शिष्ट स्वस्थ असत नाही. 44
145-16
तैसे अज्ञानप्रमादादिकी । का प्राक्तनहीन सदोखी । निंदत्वाच्या सर्वविखी । खिळिले जे ॥145॥
त्याप्रमाणे जे अज्ञान व घोर चुका ह्यांनी युक्त असून, पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वथैव निदेला पात्र आहेत. 45


146-16
तया आंगीक आपुले । देऊनिया भले । विसरविजती सले । सलती तिये ॥146॥
त्यांना स्वतःसहाय्य होऊन त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडून सुखविण्याचा प्रयत्न करतात. 46
147-16
अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥147॥
अरे, पुढील म्हणजे गाठ पडणाच्या अंगी जर काही दोष दिसले तर ते वर्ज्य करून, मग त्याच्यापाशी तो सलगी करितो. 47
148-16
जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥148॥
ज्याप्रमाणे देव पूजेनं सुशोभित करून मग प्रसन्नचित्ताने पहावा, शेतात पेरणी करून मग फलाशेने तिकडे जावे, किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशिर्वाद घ्यावा. 48
149-16
तैसे आपुलेनि गुणे । पुढिलाचे उणे । फेडुनिया पाहणे । तयाकडे ॥149॥
त्याप्रमाणे, आपल्या आंगच्या गुणांनी अगर साधनांनी पुढील व्यक्तींतील उणीव भरून काढून मग त्यांच्याकडे (आदराने) अवलोकन करावे. 49
150-16
वाचूनि न विंधिजे वर्मी । नातुडविजे अकर्मी । न बोलविजे नामी । सदोषी तिही ॥150॥
इतकेच नव्हे तर, त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असेही करू नये, 150

दिवस २५८ वा. १५, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०८५ ते ३०९६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३०८५
तन मन धन दिले पंढरिराया । आता सांगावया उरले नाही ॥१॥
अर्थचाड चिंता नाही मनी आशा । तोडियेला फासा उपाधीचा ॥२॥
तुका म्हणे एक विठोबाचे नाम । आहे जवळी दाम नाही रुका ॥३॥
अर्थ
मी माझे तन मन आणि धन पंढरीरायाला दिले आहे आता सांगण्यासाठी काहीच उरले नाही. आता कोणत्याही गोष्टीविषयी इच्छा आवड कशाचीही चिंता आणि मनात कोणत्याही गोष्टीविषयी आशा राहिलेली नाही सर्व उपाधीचा भासच मी तोडून टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझ्याजवळ केवळ एक विठोबाचे नाम आहे बाकी माझ्याजवळ कोणतेही दमडी किंवा एखादा रुका (रुपया) म्हणजे पैसे सुध्दा नाही. ”
2:57

अभंग क्र. ३०८६
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हे देवाचे धन कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे ॥धृपद॥
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
अर्थ
अहो लोकांनो या संसारात तुम्ही आलेच आहात तर मग उठा त्वरा करा आणि उदार पाडूरंगाला तुम्ही शरण जावे. अरे देह तर काळाच आहे आणि धन कुबेराचे आहे मग या मृत्यूलोकात मनुष्याचे काय आहे ? देता देवविता नेता नेवविता सर्व काही पाडूरंगच आहे मग येथे मनुष्याची कोठे सत्ता आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “मृत्यूलोकामध्ये प्राण्याला निमित्ताचा केवळ धनी केला आहे त्यामुळे त्याचाच व्यर्थ अभिमान प्राणी धरत बसला आणि त्याचा त्या कारणाने जन्म वायाला गेला. ”
2:57

अभंग क्र. ३०८७
मायावणी धाल्या धाय । गर्भ आंवतणे न पाहे ॥१॥
तैसे पूजिता वैष्णव । सुखे संतोषतो देव ॥धृपद॥
पुत्राच्या विजये । पिता सुखावत जाये ॥२॥
तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे तृषा आणि व्याधि ॥३॥
अर्थ
अहो गर्भवती स्त्रीने जर जेवण केले तर तिचा गर्भ देखील तृप्त होतो आणि तिला जेवणासाठी कोणी बोलाविले तर गर्भाला वेगळे आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. अगदी त्याप्रमाणे वैष्णवांची पूजा केली तर देव तिकडे सुखी होतो तो देखील संतुष्ट होतो. पुत्राचा विजय झाला की पिता आपोआप सुखी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्याला अमृताची सिध्दी झाली म्हणजे अमृत आपल्याला प्राप्त झाले की तृष्णा आणि व्याधी दोन्हीही नाहीसा होतात. ”
2:57

अभंग क्र. ३०८८
तुझे अंगभूत । आम्ही जाणतो समस्त ॥१॥
येरा वाटतसे जना । गुढारसे नारायणा ॥धृपद॥
ठावा थारा मारा । घरचीया संव चोरा ॥२॥
तुका म्हणे भेदा भेद । करुनि करितसे वाद ॥३॥
अर्थ
देवा सर्व तुझेच अंगीभूत आहेत हे आम्ही जाणतो. परंतू हे नारायणा इतर लोकांना हे तूझा रस फार गूढ आहे असे वाटते. जसा एखादा चोर आपल्या घरामध्ये नेहमी वावरतो परंतू आपल्याला तो चोरच आहे हे माहित नसते परंतू तो जर चोरी करण्यास आपल्या घरामध्ये आला तर त्याला कोठे लपावा कशाचा आधार घ्यावा कोठे मारा करावा हे सर्व माहित असते त्याप्रमाणे देवा आम्ही तुझ्याजवळच आहोत व तुझे सर्व रहस्य आम्हाला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्व भेदाभेद बाजूला ठेवून मी तुझ्याशी असा हा संवाद करत आहे. ”
2:57

अभंग क्र. ३०८९
तुज दिला देह । आजूनि वागवितो भय ॥१॥
ऐसा विश्वासघातकी । घडली कळता हे चुकी ॥धृपद॥
बोलतो जे तोंडे । नाही अनुभविले लंडे ॥२॥
दंड लाहे केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥
अर्थ
देवा माझा देह तुला मी अर्पण केला आहे तरी देखील अजूनही मी काळाचे भय बाळगीत आहे. देवा असा मी विश्वासघातकी आहे मला सर्व कळते की, सर्व काही तुझ्याच सत्तेने चालू आहे तरी देखील अशी चूक माझ्याकडून घडली आहे. देवा अरे मी तुझ्या अनुभवाच्या ज्या गोष्टी बाहेर सर्वाना सांगतो बोलतो प्रत्यक्ष मी लबाडानेच त्या गोष्टीचा अनुभव घेतला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला मी जो तुमच्यावर अविश्वास करण्याचा अपराध केला त्याबद्दल अपराधा बद्दल तुम्ही मला शिक्षाच केली पाहिजे. ”
2:58

अभंग क्र. ३०९०
सर्वस्वाची साटी । तरिच देवासवे गाठी ॥१॥
नाही तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥धृपद॥
द्यावे तेचि घ्यावे । म्हणउनि ज्यावे जीवे ॥२॥
तुका म्हणे उरी । मागे नूरविता बरी ॥३॥
अर्थ
सर्वस्वाचा त्याग केला तरच देवाबरोबर गाठ होते. नाहीतर ज्याला ज्या गोष्टीची इच्छा असेल त्या गोष्टीचा भोग त्याला भोगावा लागेल. जसे दयावे तसे घ्यावे या नियमाने तुम्ही निष्काम भक्ती केली तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल सकाम भक्ती केली तर तुम्हाला भोग प्राप्त होईल त्यामुळे निष्काम भक्ती करुन जीव देवाला समर्पण करुन त्याला शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की तुम्ही देवाला सर्वस्व अर्पण केले आहेस तर मग मागे माझे काही बाकी आहे असे न म्हणलेलेच चांगले. ”
2:58

अभंग क्र. ३०९१
गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ॥१॥
त्याचे भुंकणे न राहे । स्वभावासी करील काय ॥धृपद॥
श्वान शिबिके बैसविले । भुंकता न राहे उगले ॥२॥
तुका म्हणे स्वभावकर्म । काही केल्या न सुटे धर्म ॥३॥
अर्थ
गाढवाला जरी कौतुकाने घोडयासारखा श्रृंगार केला तरी त्याचे घोडे कधीही होत नाही. त्याचे बेसूरवाणे ओरडणे कधीही राहणार नाही कारण एखादयाच्या स्वभावाला कोण काय करील ? कुत्र्याला जरी पालखीत बसवले तरी ते भुंकल्याशिवाय कधीच राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याचा जसा जन्मजात जातीवंत स्वभाव असतो त्याचे कर्म आणि जातीरुप धर्म हे कधीही काही केल्या बदलत नाही. ”
2:58

अभंग क्र. ३०९२
आवडे सकळा मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥
काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥धृपद॥
दर्पण नलगे एका । ठाव नाही ज्याच्या नाका ॥२॥
तुका म्हणे खळा । उपदेशाचा काटाळा ॥३॥
अर्थ
मिष्टान्न सर्वाना आवडते परंतू रोग्याला ते विषाच्या समानच वाटते. मग त्याच्या एकटयासाठी बाकीच्यांनी ते पदार्थ किंवा जे हव्या त्या वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न केला तर ते प्रयत्न खोटे ठरणार आहेत काय ? कामे व्यर्थ ठरतील काय ? आरशाची गरज कोणासाठी नाही, ज्याच्या नाकाचा ठावठिकाणाच नाही त्याच्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात “चांगला उपदेश हा वाईट व्यक्तींना ऐकण्यासाठी कंटाळवाणे वाटते परंतू त्याच्या एकटयासाठी भल्या व्यक्तींना चांगला उपदेश करण्याचे सोडून देता येणार नाही. ”
2:58

अभंग क्र. ३०९३
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी ॥१॥
काय म्हणावे तयासी । तो केवळ पापरासि ॥धृपद॥
जो स्मरे राम नामा । तयासी म्हणती रिकामा ॥२॥
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणताती भिकारी ॥३॥
तुका म्हणे विंचाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगी ॥४॥
अर्थ
अखंड संतांची निंदा करणे हीच व अशीच दुष्टांची दुर्बुध्दी असते. अशा व्यक्तींना म्हणावे तरी काय ते केवळ पापाच्या राशीच असतात. जो रामनामाचे स्मरण करत असतो त्याला हे दुर्जन लोक म्हणतात की, “हा रिकामटेकडा आहे याला काहीही काम नाही. ” तीर्थ व्रत करणाऱ्या लोकांना हे भिकारी म्हणतात. “तुकाराम महाराज म्हणतात, “जशी विंचवाची नांगी विषारी असते अगदी तसेच दुर्जन लोकांचे सर्वांगच विषारी असते. ”
2:58

अभंग क्र. ३०९४
या रे नाचो अवघेजण । भावे आनंदे करून ॥१॥
गाऊ पंढरीचा राणा । क्षेम देऊन संतजना ॥धृपद॥
सुख फुका साठी । साधे हरीनाम बोभाटी ॥२॥
प्रेम वाटीतो उदार । देता नाही सान थोर ॥३॥
पापे पळाली बापुडी । काळ झाला देशधडी ॥४॥
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥
अर्थ
हे भक्तांनो सारेजण या आपण मिळून हरीनामाच्या भक्तीभावामध्ये आनंद करुन नाचू. पंढरीच्या रायाचे आपण गुणगान गाऊ आणि संतजणांना क्षेम आलिंगन देऊ. सुखाची प्राप्ती जर फुकट करुन घ्यायची असेल तर केवळ हरीनामाचा गजर करा. तो उदार परमात्मा सर्वाना सारख्या प्रमाणातच त्याचे प्रेम वाटतो लहान मोठा याचा विचार तो कधीही करत नाही. हरीनामाचा गजर भक्तीभावाने केल्यामुळे बिचारी पापे तर पळूनच गेली पण कळीकाळ तर देशोधडीलाच गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आजचा काळ धन्य आहे कारण आज हरीप्रेमाचा सुकाळ झाला आहे. ”
2:58

अभंग क्र. ३०९५
उपजले मनी । हे तो स्वामीची करणी ॥१॥
होईल प्रसादाचे दान । तरि हे कवुतक पाहेन ॥धृपद॥
येईल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरी ॥२॥
भक्तीप्रयोजना । प्रयोजावे बंदिजना ॥३॥
यश स्वामिचिये शिरी । दास्य करावे किंकरी ॥४॥
तुका म्हणे आळी करा । त्यासी योजावे उत्तरा ॥५॥
अर्थ
माझ्या अंत:करणामध्ये सेवा करणे हा भाव उत्पन्न झाला ही देखील माझ्या स्वामीचीच करणी आहे. जर माझा स्वामी माझ्यावर प्रसन्न होऊन मला प्रसादाचे दान देणार असेल तर मी ते कौतुकाने डोळयाने पाहीन. जर माझ्या स्वामीकडून मला अभयाचे वचन येईल तर ती आज्ञा मी शीरसावंद्य मानेन. स्वामीने आम्हा बंधूजणांना फल देण्याचे प्रयोजन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही हट्ट करणारे आहोत त्यामुळे आमचे समाधान करण्यासाठी तुम्ही आमच्याशी काहीतरी बोलण्याचे प्रयोजन करावे. ”
2:59

अभंग क्र. ३०९६
माझे मन पाहे कसून । चित्त न ढळे तुजपासून ॥१॥
कापुनि देइन शिर । पाहा कृपण की उदार ॥धृपद॥
मजवरी घाली घण । परि मी न सोडी चरण ॥२॥
तुका म्हणे अंती । तुजवाचूनि नाही गति ॥३॥
अर्थ
देवा तू कसून माझ्या मनाची परीक्षा घ्यावी आणि पाहावे की माझे चित्त तुझ्यापासून अजिबात ढळत नाही. देवा तू जर म्हटलास तर मी माझे शीर देखील तुला कापून देईल मग मी कंजूष आहे की उदार आहे हे तूच पाहा. देवा माझ्यावर घनाचे घाव जरी घातले तरी मी तुझे चरण काही सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अंत:काळी आम्हाला तुझ्यावाचून दुसरी गतीच नाही. ”

सप्टेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading