आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ सप्टेंबर, दिवस २७० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२२९ ते ३२४०
“२७ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 27 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २७ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२२९ ते ३२४० चे पारायण आपण करणार आहोत.
२७ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ४२६ ते ४५०,
426-16
सर्व दुःखा आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधले आहाती ॥426॥
ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हे अर्जुना, ध्यानात असावे. 26
427-16
का पापिया नरकभोगी । सुवावयालागी जगी । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥427॥
किंवा पापी लोकास नरकभोग घडविण्यासाठी पातकांची ही एक मोठी सभाच होय. 27
428-16
ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरी । जव हे तिन्ही अंतरी । उठती ना ॥428॥
जोपर्यंत काम, क्रोध व लोभ ह्या तीन दोषांचा चित्तांत उद्भव झाला नाही तोपर्यंतच पुराणांती वर्णलेल्या रौरव नरकादिकांच्या गोष्टी ऐकाव्या. 28
429-16
अपाय तिही आसलग । यातना इही सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥429॥
ह्यांनी अपाय प्राप्ति त्वरित होते, यातनाही सवंग होतात व ह्यांनी हानि होते असे म्हणण्यापेक्षा हे तिघे म्हणजेच ” मूर्त हानि ” होत. 29
430-16
काय बहु बोलो सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥430॥
अर्जुना, तुला फार काय सांगावे ! वर वर्णीलेल्या निकृष्टस्थितिरूप नरकाचे जे प्रवेशद्वार त्याच्या हे तीन दोष म्हणजे उंबरठाच होत. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-16
या कामक्रोधलोभा- । माजी जीवे जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥431॥
ह्या कामक्रोधलोभांना जो जीवे वाहिला तो नरकपुरीच्या सभेत सन्मानाचे पद पावेल. 31
432-16
म्हणौनि पुढत पुढती किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावीचि गा वोखटी । आघवा विषयी ॥432॥
म्हणून अर्जुना, सर्वप्रयत्ने करून ही कामादि दोषांची त्रिपुटी अत्यंत घातक म्हणून तिचा त्याग करच. 32
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् 16. 22॥
433-16
धर्मादिका चौही आंतु । पुरुषार्थाची तैचि मातु । करावी जै संघातु । सांडील हा ॥433॥
पुरुषार्थाची सीमा जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष त्यांची गोष्ट तेव्हांच बोलता की येईल ज्यावेळी हे दोषत्रय जीवांच्या पदरी नसेल. 33
434-16
हे तिन्ही जीवी जव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥434॥
हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जो वर जागे आहेत, तोपर्यंत या चार पुरुषार्थापैकी एकाची तरी प्राप्ति जीवास होईल हे ऐकण्यास माझे कान धजत नाहीत असे देवही म्हणाले. 34
435-16
जया आपणपे पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणे न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥435॥
ज्याला आपल्या हिताची इच्छा आहे व जो आत्मनाशाला भितो त्याने ह्या त्रयीचा संग सोडावा; सावध असा बरे. 35
436-16
पोटी बांधोनि पाषाण । समुद्री बाही आंगवण । का जियावया जेवण । काळकूटाचे ॥436॥
पोटाशी पाषाण बांधून बाहुंनी समुद्रतरण करू पहाणे किंवा जीवन जगविण्याकरिता काळकूट अन्न सेवन करणे. 36
437-16
इही कामक्रोधलोभेसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसी । ययाचा गा ॥437॥
ह्याप्रमाणे ह्या कामक्रोधलोभांनी कार्यसिद्धि साधण्यासारखी आहे, म्हणून त्यांच्या वाटेलाही जाऊ नकोस हो ! 37
438-16
जै कही अवचटे । हे तिकडी सांखळ तुटे । तै सुखे आपुलिये वाटे । चालो लाभे ॥438॥
जेव्हा केव्हा अकस्मात् ही तीन दुव्यांची (पायातील) सांखळी तुटेल, तेव्हा सुखाने आपले मार्गक्रमण करणे शक्य होईल. 38
439-16
त्रिदोषी सांडिले शरीर । त्रिकुटी फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसे होय ॥439॥
वात, पित्त, कफ, ह्या तीन दोषांपासून मुक्त असलेले शरीर, तीन कुटाळक्या ( चोरी, चहाडी, शिंदळकी ? ) मुक्त असलेले नगर व त्रिविध तापांपासून (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी असते. 39
440-16
तैसा कामादिकी तिघी । सांडिला सुख पावोनि जगी । संगु लाहे मोक्षमार्गी । सज्जनांचा ॥440॥
त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ ह्या तिघांपासून मुक्त असलेला जगात सुखी होऊन मोक्षमार्गदायी सज्जन संगतीचा त्यास लाभ होतो. 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-16
मग सत्संगे प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळे । जन्ममृत्यूची निमाळे । निस्तरे राने ॥441॥
मग सत्संगतीच्या जोरावर, सच्छास्त्राच्या सहाय्याने जन्ममृत्युरूप अरण्याची बिकट वाट तो चुकवू शकतो. 41
442-16
ते वेळी आत्मानंदे आघवे । जे सदा वसते बरवे । ते तैसेचि पाटण पावे । गुरुकृपेचे ॥442॥
अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान अशी जी गुरुकृपा, ती त्याला प्राप्त होते. 42
443-16
तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥443॥
व तिच्या योगे परमानंदतेची अखेरची सीमा अशी जी आत्मराज माउली तिचे अपरोक्ष (आविर्भाव) होऊन त्याचक्षणी “ आपण संसारी आहो ” अशा असलेल्या त्याच्या भ्रमाचा निरास होतो. 43
444-16
ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥444॥
ह्याप्रमाणे, कामक्रोधलोभ यांची झाडणी करून जो सिद्ध होतो, तोच अशा लाभाचा धनी होत असतो, 44
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥16. 23॥
445-16
ना हे नावडोनि काही । कामादिकांच्याचि ठायी । दाटिली जेणे डोई । आत्मचोरे ॥445॥
किंवा हे न आवडून जो आत्मवंचक कामादिकांच्या ठिकाणी डोके देऊन व्यवहरतो; 45
446-16
जो जगी समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणे ॥446॥
ज्याची सर्व जगावर समान कृपादृष्टि आहे, हित काय व अहित काय ह्यांचे मार्गदर्शन करणारा जो जणू दीपस्तंभ आहे असा जो वेद, तो ज्यांनी अप्रमाण केला. 46
447-16
न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचे ॥447॥
विधिनिषेधाची पर्वा न करिता, आपल्या हिताकडे दुर्लक्ष्य करून जो केवळ इंद्रियांचे लळे पुरे करितो. 47
448-16
कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचे असोस । वळघला रान ॥448॥
काम क्रोधादिकांची कास न सोडता जो त्यांच्या तंत्राप्रमाणे चालतो व स्वैराचाराच्या अरण्यात संचार करितो. 48
449-16
तो सुटकेचिया वाहिणी । मग पिवो न लाहे पाणी । स्वप्नीही ते कहाणी । दूरीचि तया ॥449॥
त्याला त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर आपण यावे अशी इच्छा होणे शक्य नाही, इतकेंच नव्हे, तर त्याला तसे नुसते स्वप्न पडणेही शक्य नाही. 49
450-16
आणि परत्र तव जाये । हे कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगू ॥450॥
आणि संसारबंध सुटून परलोकप्राप्ति होईल ही गोष्ट तर राहो; पण त्याला येथील भोगही सुखाने भोगत येत नाहीत. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७० वा. २७, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२२९ ते ३२४०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२२९
विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥
अंगी भरे ताठा कोणाते मानीना । साधूची छळणा स्वये करी ॥धृपद॥
साधूचे देहाचा मानी जो विटाळ । त्रैलोकी चांडाळ तोचि एक ॥२॥
संतांची जो निंदा करी मुखी जपे । खतेला सकळ पापे वज्रलेप ॥३॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥४॥
अर्थ
एखादया मनुष्याला थोडेसे ज्ञान, थोडीसी विद्या प्राप्त होते परंतू त्या ज्ञानाचा विदयेचा गर्व अगदी पराकोटीचा असतो तो मनात म्हणत असतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानी असा कोण आहे ? अभिमानाचा ताठा अंगामध्ये धरतो व त्या अभिमानाच्या ताठेमुळे कोणालाही मानीत नाही साधूचा तर तो स्वत:च छळ करतो. साधूच्या देहाचा म्हणजे साधूच्या चरणांना दंडवत करणे, साधूंना आलिंगन देण्याचा जो विटाळ मानतो तोच एक त्रैलोक्यामध्ये चांडाळ आहे. संतांची निंदा जो मुखाने करतो, व्यर्थ काहीतरी बडबड करतो त्याच्या अंगी सर्व पापे भरलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “जे असे वाईट प्रवृत्तीचे कपटी मैंद लोक असतात त्यांच्याजवळ गोविंद नाही म्हणजे नाहीच रहात. ”
3:32
अभंग क्र. ३२३०
बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे ॥१॥
व्याभिचाऱ्यापासी बैसता क्षणभरी । देखताची नारी मन धावे ॥धृ ॥.
प्रपंचाचा छंद टाकुनिया गोवा । धरावे केशवा हृदयात ॥२॥
सांडुनीया देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥३॥
तुका म्हणे तुला सांगतो मी एक । रुक्मीणीनायक मुखी गावा ॥४॥
अर्थ
चोराच्या जवळ बसल्यावर बुध्दी देखील त्याच्यासारखीच होते साधी एखादी चिंधी जरी दिसली तरी ती चोरण्याची मनाला हाव होते व मन तिकडे धावते. व्याभिचारी पुरुषाजवळ बसले असता मग ते एक क्षणभर देखील आपण बसलो तरी परस्त्री पाहिली की आपले मन त्या परस्त्रीकडे धावते. त्यामुळे प्रपंचाचा छंद व त्याचे बंधन टाकून दयावे आणि एका केशवालाच आपल्या ह्दयात धरावे. संसाराची बेडी म्हणजे बंधन टाकून दयावे आणि कीर्तनाची गोडी मनामध्ये धरावी. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मी तुला एकच साधा आणि सोपा उपाय सांगतो तो म्हणजे रुक्मिणीनायक जो पाडूरंग आहे त्याचेच नाम तू मुखाने गात राहावे. ”
3:32
अभंग क्र. ३२३१
परिसे गे सुनेबाई । नको वेचू दूध दही ॥१॥
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥धृपद॥
ऐके गोष्टी सादर बाळे । करी जतन फुटके पाळे ॥२॥
माझे हातीचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडू ॥३॥
वळवटक्षिरींचे लिंपन । नको फोडू मजवाचून ॥४॥
उखळ मुसळ जाते । माझे मन गुंतले तेथे ॥५॥
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥
भक्षी मपित आहारु । नको फारसी वरू सारू ॥७॥
सून म्हणे बहुत निके । तुम्ही यात्रेसि जावे सुखे ॥८॥
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥
सुनमुखीचे वचन कानी । ऐकोनि सासू विवंची मनी ॥१०॥
सवतीचे चाळे खोटे । म्या जावेसे इला वाटे ॥११॥
आता कासया यात्रे जाऊ । काय जाउनि तेथे पाहू ॥१२॥
मुले लेकरे घर दार । माझे येथेंचि पंढरपूर ॥१३॥
तुका म्हणे ऐसे जन । गोवियेले मायेंकरून ॥१४॥
अर्थ
पंढरपूरला निघालेल्या एका म्हाताऱ्या आजीबाईचे मन प्रपंचात गुंतले आहे व ती आपल्या सूनबाईला म्हणते सूनबाई दही दूध व्यर्थ खर्च करु नकोस ते बाजूला तूप काढण्यासाठी ठेव. इतके सांगून ती पंढरपूरला निघाली व वेशीत गेली तिला पुन्हा काहीतरी आठवले व परत घराकडे माघारी आली. आणि घरी येऊन पुन्हा म्हणाली की बाळे मी तुला पुन्हा एक गोष्ट सांगते तू ध्यान देऊन ती गोष्ट ऐक आपल्या जात्याचे फुटके पाळे आहे ना ते तू जतन करुन ठेव. मी माझ्या हातानी गोवऱ्याचा कलवड तयार केला आहे तो माझ्यावाचून तू फोडू नकोस. मी खीर करण्यासाठी शेवया तयार केल्या आहेत एका भांडयामध्ये ठेवून त्या भांडयाचे तोंड मी लिंपून ठेवले आहे त्या मी आल्यावाचून फोडू नकोस. माझे मन उखळ मुसळ जाते या ठिकाणी गुंतलेले आ�
3:32
अभंग क्र. ३२३२
पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता । सिंदळीच्या माथा तिडिक उठे ॥२॥
आमुचे ते आहे सहज बोलणे । नाही विचारून केले कोणी ॥धृपद॥
अंगे उणे त्याच्या बैसे टाळक्यात । तेणे ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥
तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी । धका खवंदासी लागतसे ॥३॥
अर्थ
पतिव्रता स्त्रीची किर्ती वर्णन करत असताना व्याभिचारी स्त्रीच्या माथ्याची तिडीक उठते. त्याप्रमाणे आमचे बोलणे देखील अगदी सहजच असते ते कोणालाही उद्देशून किंवा कोणाकडेही पाहून आम्ही बोलतच नाहीत. आम्ही काही बोललो तर ज्याच्या अंगी दोष आहे त्याच्या टाळक्यात आमचे बोलणे लगेच घुसते मग तो आमच्यावर रागावतो व क्रोधाग्नीच्या ठिणग्या आमच्यावर सारख्या गाळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादयाच्या दु:खाला धक्का लागावा व त्याने ज्याच्याकडून धक्का लागला म्हणून त्याला फडफड बोलावे त्याप्रमाणे आम्ही सहज जरी बोललो तरी दुष्ट मनुष्याला ते सहन होत नाही मग तो त्याच्या क्रोधाग्नीच्या ठिणग्या आमच्यावर गाळतो आमचे बोलणे तर सहज आहे पण दुष्टाला ते सहन होत नाही त्याला आम्ही काय करावे ? ”
3:32
अभंग क्र. ३२३३
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥१॥
आवडी आवडी कलेंवरा कलेंवरी । वरीले अंतरी ताळा पडे ॥धृपद॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडून मागे तुटी हर्षयोगे ॥२॥
तुका म्हणे एके कळते दुसरे । बरियाने बरे आहाचे आहाच ॥३॥
अर्थ
देव सगुण साकार आहे असे वाणीने तर आपण वदवावे परंतू निर्गुण निराकार आहे असा मनात अनुभव देखील घ्यावा. देहातील जीवाची जी आवड म्हणजे देवाच्या सगुण साकार रुपाविषयी आवड आणि अंतरंगातील देवाच्या निर्गुण निराकाराची आवड हे दोन्ही एक झाले की दोघाचाही एकमेकांशी ताळमेळ बसतो. खूप दिवसानी जर माता आणि पुत्र यांची भेट झाली तर ते दोघेही रडू लागतात परंतू हर्षयोगाने म्हणजेच आनंदीत होऊन ते रडतात. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया गोष्टीवरुन दुसऱ्या गोष्टी कळून येत असतात म्हणजेच आपण जर चांगले वागलो, तर आपल्याला देखील चांगले आणि वाईट वागलो तर, वाईट गोष्टी कळून येतात. ”
3:32
अभंग क्र. ३२३४
हेचि माझे चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥
आणिक नाही मागणे । राज्यचाड संपत्ती धने । जिव्हे सुख तेणे । घेता देई नाम तुझे ॥धृपद॥
तुझे रूप सर्वाठायी । देखे ऐसे प्रमे देई । ठेवावा पायी । अनुभव चित्ताचा ॥२॥
जन्ममरणाचा बाध । समूळूनि तुटो कंद । लागो हाची छंद । हरी गोविंद वाचेसी ॥३॥
कायापालटे दर्शने । अवघे कोंदाटे चैतन्य । जीवशिवखंडण । होय तरे चिंतिता ॥४॥
तुका म्हणे याची भावे । आम्ही धालो तुझ्या नावे । सुख होत जन्मे । भलतेयाती भलतैसी ॥५॥
अर्थ
आता माझ्या चित्तामध्ये हाच प्रीतीभाव राहो, तो म्हणजे असा की, विठ्ठल माझ्या सुशुप्ती, जागृती व स्वप्नात कायम राहावा. मग मला राज्य, संपत्ती, धन याविषयी आवड राहणार नाही व तसे माझे काही मागणेही नाही. जिव्हेने तुझे नाम जरी घेतले तरी माझ्या देहाला सुख होते. देवा सर्वत्र मला तुझे रुपच दिसावे असेच प्रेम तुम्ही मला दयावे. माझ्या चित्तामध्ये जो अनुभव येईल तो तुमच्या पायाजवळच ठेवावा. जन्ममरणाचा बाद होऊन त्याचा संबधच तुटून जावो. आणि माझ्या वाणीला हरी गोविंद या नामाचाच छंद लागो. देवा तुझे दर्शन झाले की माझा कायापालट होतो सर्वत्र चैतन्य आहे असा अनुभव मला येतो. देवा तुझे चिंतन केले असता जिवशिवातील खंडन होते आणि दु:स्तर असा भवसागर सहजच तरुन जाता येतो. तुकाराम महाराज म्हणतात “याच भक्तीभावाने आम्ही तुझे नाम घेतले व समाधानी झालो. मग आता आम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जातीत व कोणत्याही जागेवर जन्म जरी घ्यावा लागला तरी आम्ही सुखाने तेथे जन्म घेवू. ”
3:33
अभंग क्र. ३२३५
मौन का धरिले विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देई माझ्या ॥१॥
तू माझे संचित तूचि पूर्वपुण्य । तू माझे प्राचीन पांडुरंगा ॥धृपद॥
तू माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म । तूचि नित्यनेम नारायणा ॥२॥
कृपावचनाची वाट पाहातसे । करुणा वोरसे बोला काही ॥३॥
तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोला सर्वात्तमा मजसवे ॥४॥
अर्थ
हे विश्वाच्या जनिता तुम्ही असे मौन का धरले आहे माझ्या बोलण्याचे तुम्ही उत्तर दयावे. हे पाडूरंगा तू माझा प्राचीन आहेस तूच माझे संचित आणि तूच माझे पुर्वपुण्य आहेस. हे नारायणा तूच माझे सत्कर्म स्वधर्म आणि नित्यनेम आहेस. देवा अहो मी तुमची करुणा भाकीत आहे तुमच्या कृपावचनाची मी वाट पाहात आहे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करुन माझ्याशी काहीतरी बोला. तुकाराम महाराज म्हणतात, “हे प्रेमाच्या प्रियोत्तमा सर्वोत्तमा माझ्याशी काहीतरी तुम्ही बोला. ”
3:33
अभंग क्र. ३२३६
काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥धृपद॥
आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनिया ॥२॥
तुका म्हणे मना समर्थासी गाठी । घालावी हे मांडी थापटूनी ॥३॥
अर्थ
देवा आता तुझी भीड धरुन मी काय करु मी आता तुझी कोणतीही भीड न धरता नि:शंक मनाने तुझ्यापुढे तुझे भजन करुन माझे तोंड वाजवीत आहे. जगामध्ये शांत बसून आपले म्हणणे कोणीही ऐकणार नाही आणि जर आपण बोलण्यास लाजलो तर आपले हित कधीही होणार नाही. आता मी जीवावर उदार होऊन जसे जमेल तसे शब्द माझ्या स्वामीशी मी बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मना अरे तुला भांडायचे असेल तर क्षुद्र मनुष्याबरोबर भांडू नको तर मांडी थोपटून थेट देवाशीच भांडण कर यामुळे तुझे हीतच होईन. ”
3:33
अभंग क्र. ३२३७
भ्रतारासी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाही दुजी ॥१॥
अखंड तुमचे धंद्यावरी मन । माझे तो हेळण करिती सर्व ॥धृपद॥
जोडितसा तुम्ही खाती हेरेंचोरे । माझी तव पोरे हळहळती ॥२॥
तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥
दुष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारी कोण्या सुखे ॥४॥
भावा दीर काही धड हा न बोले । नांदों कोणा खाले कैसी आता ॥५॥
माझ्या अंगसंगे तुम्हासी विश्रांति । मग धडगति नाही तुमची ॥६॥
ठाकते ठुमकते जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥
वेगळे निघता संसार करीन । नाही तरी प्राण देते आता ॥८॥
तुका म्हणे झाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥
अर्थ
एक पत्नी आपल्या पतीशी एकातामध्ये गुजगोष्टी करताना म्हणत होती की, “माझ्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री कष्टी नसेल. ” अहो तुमचे तर नेहमी धंदयावरच लक्ष असते तुम्ही घरी नसताना सर्व माझी हेळणाच करत असतात. अहो तुम्ही धन मिळवता आणि तुमच्या जीवावर ही सर्व चोर खातात पितात परंतू माझी मुले पोरे मात्र हळहळ करतात केवळ खाण्यापिण्यासाठी. तुम्हाला जन्म दिलेली आई नेहमी माझ्यावर रागावलेलीच असते ती नेहमी माझ्याशी दुष्ट बोलते ते मला काही सहन होत नाही. अहो माझी नणंद तर फारच दुष्ट वृत्तीची आहे ती नेहमी माझा व्देष करते मग सांगा मी तुमच्याशी संसार करताना सुखाने कसे नांदावे ? अहो तुमचा भाऊ माझा दीर माझ्याशी काही धड बोलत नाही मग सांगा मी कोणाच्या खाली व कशी नांदू ? अहो तुम्ही माझ्या अंगसंगतीला आहात म्हणून तुमची विश्रांती होते मी जर येथे नसेल तर तुमची काही धडग
3:33
अभंग क्र. ३२३८
कामाचा अंकित कांतेते प्रार्थित । तू का हो दुश्चित्त निरंतर ॥१॥
माझी मायबापे बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥धृपद॥
त्यांचे जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातो तुझी आण निश्चयेंसी ॥३॥
वेगळे निघता घडीन दोरे चुडा । तू तव माझा जोडा जन्माचा की ॥४॥
ताईत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरू सीण मनी काही ॥६॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगीची कांचोळी जाळिया फुले ॥७॥
तुका म्हणे केला रांडेने गाढव । मनासवे धाव घेतलीसे ॥८॥
अर्थ
बायकोचा आधीन झालेला तो पती आपल्या पत्नीला म्हणू लागला की तू इतके दिवस इतकी दु:खी होती हे मला माहित नव्हते. पुढे तो म्हणू लागला की माझे मायबाप, बंधू, बहिण तुला एवढा त्रास देतात ना मग मी त्यांचा आताच त्याग करतो यापुढे त्यांचे तोंड जरी मी पाहीन तर मला तुझ्या हत्या केल्याचे पाप लागेल. सकाळी उठलो की लगेच वेगळा निघेन हे मी निश्चयपूर्वक तुझी शपथ घेऊन सांगतो. वेगळा निघालो की मी तुझ्या हातात बांगडया, चुडा व तुला दागीने करेन अरे तू तर माझा जन्माचा जोडा आहेस. गळयात घालण्याचे साखळी, ताईत, दुल्लडी, बाजूबंद, हातात घालण्याची जोडी, वेणीत घालण्याचे जे काही प्रकार आहेत ते सर्व प्रकार मी तुला करीन त्यामुळे तू आता मनामध्ये कोणत्याही प्रकारचा शीण धरु नकोस. अरे तुला चांगल्या भरजरीत नेसण्यासाठी साडया, अंगामध्ये घालायच्या चोळया, शेलरी चुनडी, वेणीत घालण्याच्या जाळया, फुले, खडीची नक्षीदार पातळे हे सर्व आणून देईन. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे त्य
3:33
अभंग क्र. ३२३९
उजळिता उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगी ॥१॥
एकी महाकष्टे मेळविले धन । एकासी जतन दैवयोगे ॥धृपद॥
परिमळे केले चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥
तुका म्हणे जया अंगी नामठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥
अर्थ
दीपकामध्ये वात पेटवली तरच ती प्रकाशीत होते परंतू हिऱ्याच्या अंगी प्रकाश हा स्वयंभू असतो. एकाने मोठे कष्ट करुन धन मिळवलेले असते आणि एकाला दैवयोगाने त्याच्या वडिलोपार्जित धनाचा लाभ होऊन जातो. चंदनाचा सुगंध येतो त्यावेळी हे चंदन आहे असे चिन्ह तो सुगंध देत असतो परंतू तरीही त्यामध्ये जो निवड करतो तो गाढवच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या अंगी हरीनामाचा ठसा उमटलेला आहे तो हा संसारसमुद्र सहजरित्या तरुन जातो आणि सर्वाना वंद्य होतो. ”
अभंग क्र. ३२४०
सोवळा तो झाला । अंगीकार देवे केला ॥१॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥धृपद॥
चुकला हा भार । तयाचीच येरझार ॥२॥
तुका म्हणे दास । झाला तया नाही नास ॥३॥
अर्थ
प्रत्यक्ष देवाने ज्याचा अंगीकार केला तो “सोवळा” म्हणजे सर्वापेक्षा वेगळा होऊन राहिला आहे. बाकीचे इतर लोक केवळ पोट भरण्याकरता सोवळे राहून इतर कलमे करतात व असे हे दुष्ट लोक भोजन करतात केवळ पोट पोसण्यासाठीच. ज्याचा अंगीकार देवाने केला त्याचा जन्ममरणाचा येरझार व इतर सर्व योगक्षेमाचा भारच चुकला. तुकाराम महाराज म्हणतात, “जो भक्त देवाचा झाला आहे त्याला नाश नाही तो अमरच झालेला असतो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















