१४ सप्टेंबर, दिवस २५७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १०१ ते १२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०७३ ते ३०८४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१४ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १४ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३०७३ ते ३०८४ चे पारायण आपण करणार आहोत.
१४ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १०१ ते १२५,

101-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
नातरी ठेविले देखावया । आदर कीजे दिविया । का शाखा फळे यावया । सिंपिजे मूळ ॥101॥
अंधारांतील जिन्नस सापडावा म्हणून दिव्याला जपतात; किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून खाद्यांना (फांद्याना) फळे यावी म्हणून होय. 1
102-16
हे बहु असो आरिसा । आपणपे देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥102॥
किंवा हे असो, आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा जसा वारंवार साफ करितात. 2
103-16
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागी गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणे ॥103॥
त्याप्रमाणे वेदांनीच ज्याचे प्रतिपादन केले आहे, अस जो ईश्वर त्याचे दर्शन (प्राप्ति) होण्यासाठी जो निरंतर श्रुत्यर्थाचा अभ्यास करितो. 3
104-16
तेचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र का नाममंत्र । आवर्तवणे पवित्र । पावावया तत्त्व ॥104॥
द्विजांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्रद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाममंत्रादिकांच्या आवर्तनाने करावा म्हणजे त्यांना तत्त्वज्ञान होईल. 4
105-16
पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आता तप शब्दाभिप्रावो । आईक सांगो ॥105॥
पार्था, ज्याला स्वाध्याय म्हणतात, तो देवांनी ह्याप्रमाणे सांगितला आहे. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो तो श्रवण कर. 5


106-16
तरी दाने सर्वस्व देणे । वेचणे ते व्यर्थ करणे । जैसे फळोनि स्वये सुकणे । इंद्रावणी जेवी ॥106॥
आपले सर्वस्व दान करण्यात खर्च करणे ते दान होय; नुसते वाटेल तसे द्रव्य खर्च करणे ते दान न होता व्यर्थ हानि होय. कसे तर, कडूवृंदावन वृक्ष वाटेल तेवढा फळांनी लादूनही व्यर्थ सुकून जातो. त्याप्रमाने 6
107-16
नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकी तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता ऱ्हासु । चंद्राचा जैसा ॥107॥
अथवा धूपाचा व कनकाचा अग्निप्रवेश हा जसा गुणविकासामुळे त्यांचा एकप्रकारचा उत्कर्ष होय किंवा चंद्र कलांकलांनी कृश झाला तरी पितृपक्षाचे वनस्पतीचे जसे पोषण होते. 7
108-16
तैसा स्वरूपाचिया प्रसरा – । लागी प्राणेंद्रियशरीरा । आटणी करणे जे वीरा । तेचि तप ॥108॥
त्याप्रमाणे, अर्जुना, स्वस्वरूप (ब्रह्म) प्राप्तीसाठी, प्राण, इंद्रिये, व शरीर ह्यांचा वेच करणे तेच तप होय. 8
109-16
अथवा अनारिसे । तपाचे रूप जरी असे । तरी जाण जेवी दुधी हंसे । सूदली चांचू ॥109॥
अथवा याहून अन्य असे गणले गेलेले जे तप, ती शुद्ध तप नसल्यामुळे त्यातील शुद्धाशुद्धतेला हंसक्षीरन्याय लावणं प्राप्त आहे. 9
110-16
तैसे देहजीवाचिये मिळणी । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणी । जागवीजे ॥110॥
म्हणून देह व जीव ह्यांचे तादात्म्य जन्मतःच तोडून टाकण्याकरिता ज्या विवेकाची आवश्यकता आहे तो विवेक अंतःकरणात जागा असू दे. 110


111-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पाहता आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडे । सनिद्र स्वप्न बुडे । जागणी जैसे ॥111॥
जागृतीत निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो, त्याचप्रमाणे अंतर्मुखतेने बुद्धि आत्म्याकडे वळली असता तिची विषयाकडील धाव सहजच कुंठित होते. 11
112-16
तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥112॥
त्याचप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धि ह्याप्रमाणे प्रवृत्त होते, ते, अर्जुना, तप असे म्हणतात. 12
113-16
आता बाळाच्या हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य । तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव ते ॥113॥
आता स्तन्य (आईचे अथवा गाईचे दूध) जसे बालाचे व चैतन्य जसे भूतमात्राचे कल्याण होय, त्याचप्रमाणे, सर्व प्राणिमात्रांच्याविषयी ज्याच्या ठिकाणी सौजन्य असते ते “आर्जव” होय. 13
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥16. 2॥
114-16
आणि जगाचिया सुखोद्देशे । शरीरवाचामानसे । राहाटणे ते अहिंसे । रूप जाण ॥114॥
आणि सर्व जगाला जेणकरून सुख होईल, असा कायावाचामने ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो ते ‘अहिसेचे रूप ” होय असे समज. 14
115-16
आता तीख होऊनि मवाळ । जैसे जातीचे मुकुळ । का तेज परी शीतळ । शशांकाचे ॥115॥
आता कमलकळिका जशी पाण्याचा भेद करते म्हणून तीक्ष्ण व स्पर्शाला पहावे तर अत्यंत मृदु असते किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज शीतल असते. 15


116-16
शकेदाविताचि रोग फेडू । आणि जिभे तरी नव्हे कडु । ते वोखदु नाही मा घडू । उपमा कैची ॥116॥
ज्याच्या दर्शनानेच रोगनिवृत्ति होते व जे सेवन केले असता कटु अगर अरोचक नसते असे औषधच दिसत नाही; मग ती उपमा कशी द्यावी ? 16
117-16
तरी मऊपणे बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवी फोडी कोंराळे । पाणी जैसे ॥117॥
आणि मृदुपणा पाहू गेले तर जे डोळयाच्या बुबुळालाही खुपणार नाही असे असून कठोरता पाहू गेले तर पर्वताचे कडे फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यासारखे आहे. 17
118-16
तैसे तोडावया संदेह । तीख जैसे का लोह । श्राव्यत्वे तरी माधुर्य । पायी घाली ॥118॥
त्याचप्रमाणे संदेहनिवृत्तिमध्ये जे लोखंडाच्या हत्याराप्रमाणे तीक्ष्ण असून, माधुर्यालाहि मागे टाकील असे श्रवण करितांना गोड वाटते. 18
119-16
ऐको ठाता कौतुके । कानाते निघती मुखे । जे साचारिवेचेनि बिके । ब्रह्मही भेदी ॥119॥
ज्याचे कौतुकाने ही श्रवण केले असता कानाला अधिक सेवनाची इच्छा होऊन जणू मुखेच फुटतात व सत्यत्वाच्या सामर्थ्याच्या दृष्टीने जे ब्रह्मालाही मागे टाकील अथवा हार जाणार नाही. 19
120-16
किंबहुना प्रियपणे । कोणातेही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणे । नाही कवणा ॥120॥ झकऊ
किंबहुना, प्रियपणाच्या दृष्टीने पाहू गेले त्याचे शब्द कोणालाही फसविणारे नसतात व यथार्थ असूनही ते कोणालाही खुपण्यासारखे नसतात. 120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-16
एऱ्हवी गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळी कीड । आगीचे करणे उघड । परी जळो ते साच ॥121॥
नाहीतर, फांसेपारध्याचे गायन अगर ध्वनि कानास गोड लागतो खरा; पण त्यात सत्याच लेश नसतो; किंवा अग्नि आपले कर्म चोरून नव्हे तर उघडपने करितो, पण त्या उघड अगर सत्य कर्माला काय आग लावावयाची आहे ? 21
122-16
कानी लागता महूर । अर्थे विभांडी जिव्हार । ते वाचा नव्हे सुंदर । लांवचि पा ॥122॥
वरून कानारा गोड वाटणारे, पण, अर्थदृषष्ठया काळजाला घर पाडणारे भाषण सुंदर न म्हणत ती शुद्ध मायावी राक्षसीच म्हणावी. 22
123-16
परी अहिती कोपोनि सोप । लालनी मऊ जैसे पुष्प । तिये मातेचे स्वरूप । जैसे का होय ॥123॥
परंतु अहितापासून रक्षण करण्याकरिता वरून रागाचा आव आणणारी, पण, अंतःकरणात रक्षणाविषयी पुष्पाप्रमाणे मृदु असणारी अशी आई असते. 23
124-16
तैसे श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणे जे अविकार । ते सत्य येथे ॥124॥
तसे ऐकतांना मधुर व कौतुकास्पद, परिणामी सत्य व कोणाचेही वर्म न दुखविणारे जे भाषण ते ” सत्य ” असे म्हणतात. 24
125-16
आता घालिताही पाणी । पाषाणी न निघे आणी । का मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥125॥
किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही किंवा कांजी घुसळली असता जसे लोणी निघणे शक्य नसते. 25

दिवस २५७ वा. १४, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०७३ ते ३०८४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३०७३
कान फाडूनिया मुद्रा ते घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥
पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरकलोका ॥३॥
अर्थ
काही लोक कान फाडून त्यामध्ये लाकडाच्या किंवा कासवाच्या पृष्ठांचे कर्णभूषणे घालतात व स्वत:ला जगामध्ये नाथ म्हणवितात. अनेक गावामध्ये अनेक ठिकाणामध्ये जाऊन ते फेऱ्या घालतात आणि द्रव्य मागतात परंतू भगवान शंकराला ते ओळखतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असे ढोंगी लोक स्वत:चे पोट भरण्याकरता काहीतरी उपाय शिकतात आणि शेवटी नरकाला जातात. ”
2:54

अभंग क्र. ३०७४
कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥
पाघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळे ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म । न कळेचि वर्म गोविंदाचे ॥३॥
अर्थ
कवडी कवडीसाठी काही मलंग लोक स्वत:चे डोके फोडून त्यातून रक्त काढतात. स्वत:च्या शरीरावर चर्म म्हणजे कातडे पाघरतात हातात साखळी धरतात आणि धैर्‍याने बळाने मोठयाने आरोळया मारतात. तुकाराम महाराज म्हणतात, “शरीराला कष्ट देणे हा त्याचा स्वधर्म नाही त्याला गोविंदाचे खरे वर्मच समजले नाही. ”
2:54

अभंग क्र. ३०७५
दाढी डोई मुंडी मुंडुनिया सर्व । पाघुरति बरवे वस्त्र काळे ॥१॥
उफराटी काठी घेऊनिया हाती । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥
चाळवुनी रांडा देउनिया भेष । तुका म्हणे त्यास यमदंडी ॥३॥
अर्थ
काही लोक दाढी डोके सर्व मुंडन करुन अंगावर काळी वस्त्रे परिधान करतात. उरफाटी काठी हातात घेऊन सर्वाना नास्तिकपणाचा उपदेश करतात. तुकाराम महाराम म्हणतात, “अशा प्रकारे हे लोक रांडा पोरांना आपला उपदेश करतात व त्यांनाही आपल्यासारखे करुन त्यांची फसवणूक करतात त्यामुळे यम त्या लोकांना पुढे शिक्षा देतो. ”
2:54

अभंग क्र. ३०७६
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरी ॥१॥
शिवाचे निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठी ॥धृपद॥
तुका म्हणे त्यासी नाही शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥२॥
अर्थ
काही लोक जंगम होऊन विभूती लावतात आणि घरोघरी जाऊन शंख वाजवतात. परंतू शिवाचे निर्माल्य आणि तीर्थाचे सेवन मात्र हे लोक करत नाहीत. पोटासाठी मात्र घंटा वाजवून भिक्षा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ढोंगी मनुष्याला शिव भक्तीविषयी श्रध्दा मुळीच नसते केवळ संसाराचा व्यापार चालवण्याकरता अशा प्रकारचे ढोंग हे लोक करत असतात. ”
2:54

अभंग क्र. ३०७७
लावूनिया मुद्रा बांधोनिया कंठी । हिंडे पोटासाठी देशोदेशी ॥१॥
नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण । पाहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते ॥धृपद॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥२॥
अर्थ
काही लोक संपूर्ण शरीराला विविध प्रकारच्या मुद्रा लावून कंठामध्ये तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळा घालून पोटासाठी देशोदेशी हिंडत असतात. असे हे ढोंगी लोक अंगामध्ये कोपीन घालून शुभ्र वस्त्र अंगावर पाघरतात आणि आज पक्वानाचा बेत कोठे आहे हे पाहात ते क्षेत्रस्थ फिरत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असे जे मैंद लोक आहेत त्यांच्याजवळ गोविंद कधीही राहात नाही. ”
2:55

अभंग क्र. ३०७८
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापा साचार नांव त्याचे ॥२॥
जन्मता संसार त्यजियेला शुके । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥
अर्थ
अशा प्रकारे पोटासाठी लोक विविध प्रकारचे वेष घेऊन दारोदारी हिंडत असतात आणि दान घेत असतात. अहो परमार्थासाठी संसाराचा त्याग कोण करणार आहे एखादयाचे तरी नांव सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात, “जन्मत: संसाराचा त्याग केवळ शुकाचार्यानेच केला त्यामुळे सर्वामध्ये तेच एक निर्दोष आहेत. ”
2:55

अभंग क्र. ३०७९
स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत । शेवटींचा अंत नाही कोणी ॥१॥
यमाचिये हाती बांधोनिया देती । भूषणे ही घेती काढूनिया ॥२॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥
अर्थ
स्त्री पुत्र कलत्र हे सर्व मायेच्या आधीन आहेत आपल्या शेवटी म्हणजे अंत:काळी यापैकी कोणीही उपयोगी पडणार नाही. आपण मेलो की आपल्याला यमाच्या हातात ते बांधून देतात आणि आपल्या अंगावरची जेवढी भूषणे आहेत ती सर्व काढून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे अशा या चोरांचा विश्वास तो काय, त्यामुळे तर मी तुझी कास धरली आहे. ”
2:55

अभंग क्र. ३०८०
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावाचूनिया ॥१॥
म्हणऊनि तुझे करितो चिंतन । नावडे वचन आणिकाचे ॥धृपद॥
काय ते महत्वे करावी मान्यता । तुज न देखता पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुज भेटल्यावाचूनि । न राहे त्याहून होइन वेडा ॥३॥
अर्थ
देवा मला तुझ्या दर्शनावाचून शाब्दिक ब्रम्हज्ञान लागत नाही. म्हणूनच तर मी तुझे सारखे चिंतन करतो मला तुझ्या चिंतनावाचून इतर कोणाचेही बोलणे व कोणतेही बोलणे आवडत नाही. हे देवा पाडूरंगा अरे मला तुझे दर्शनच जर झाले नाही तर मग मला लोकांमध्ये कितीही मान्यता असली किंवा कितीही महत्व असले तरी ती मान्यता काय करावी ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझे दर्शन झाल्यावाचून मी तर काही राहणार नाही, राहणार नाही हे सोड पण तुझे जर मला दर्शन झाले नाही तर मी वेडाच होईन. ”
2:55

अभंग क्र. ३०८१
तुझा म्हणवूनी दिसतो गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥
अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणी कोण पावे ॥ध्रु॥
तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥
तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगां जगदीशा पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा मी स्वत:ला तुझा दास म्हणून घेतो तुझा म्हणून घेतो तरी देखील असा दीन केविलवाणे दिसतो आहे तरी देखील तुला काहीच का वाटत नाही याचा अर्थ असा की तुला आमच्याविषयीचा मानसच सरलेला दिसत आहे. अज्ञानी बालकावर जर त्याची आई चिडली तर निर्वाणीच्या वेळी त्याच्याकडे कोण धावत जाईन ? हे विठोबा मी तुझ्यावाचून एकला परदेशी झालो आहे मला या दु:खामध्ये गोवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे जगदीशा पाडूरंगा मला तर सर्व तुझीच आशा आहे तुझ्याच आशेवर मी राहात आहे. ”

अभंग क्र. ३०८२
आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावेचि ना ॥१॥
कायविधा त्याने घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होयचि ॥२॥
तुका म्हणे माझी विसरू नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥
अर्थ
आता माझ्या या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सोबती कोण असणार आहे मी ज्या पाडूरंगाचा धावा केला तोच रुक्मिणीचा पती मला पावत नाही. या विधात्याने माझ्या नशिबात काय घातले आहे काय माहित या दु:खातून माझी सुटकाच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो पंढरीनाथा माझी चिंता तुम्हालाच करायची आहे हे तुम्ही विसरु नका आणि मला लवकर तुम्ही भेट दयावी. ”
2:56

अभंग क्र. ३०८३
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धावा पांडुरंगा ॥१॥
सिणलो बहुत करिता येरझारा । रखुमाईच्या वरा पावे वेगी ॥२॥
तुका म्हणे तू गा पतितपावन । घेई माझा शीण जन्मांतर ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा आतापर्यंत माझ्या जीवाला जन्ममृत्यू फार झाले आहेत त्यामुळे मी तुमचा धावा करीत आहे ते तू ऐक. हे रुक्मिणीच्या वरा मी अनेक प्रकारच्या जन्ममरणाच्या येरझाऱ्या घालून खूप त्रासलो आहे त्यामुळे आता लवकर मला भेट देण्यासाठी तुम्ही धाव घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा तू पतितपावन आहेस अनेक जन्मामध्ये मी अनेक प्रकारचे त्रास भोगले आहेत तरी आता माझा शीण तुम्ही कमी करा. ”
2:56

अभंग क्र. ३०८४
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी । विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझे ॥३॥
अर्थ
पंढरीसी जावे असे माझ्या मनाला वाटत आहे ही विठाबाई माझी जननी मला कधी भेटेल असेही वाटत आहे. त्यावाचून मला कोणताही सोहळा सुखाचा वाटणार नाही माझ्या अंगाला जणू अग्नीचा दाहच लागलेला आहे जणू काही असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की त्या विठाईचे मी पाय पाहीले की माझे सर्व दु:खच जाईल. ”

सप्टेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading