३ जून, दिवस १५४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६७६ ते ७०८ सार्थ तुकाराम गाथा अभंग १८३७ ते १८४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३ June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८३७ ते १८४८ चे पारायण आपण करणार आहोत.
३ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६७६ ते ७०८,

676-11
तरी विश्वात्मक रूपडे । जे दाविले आम्ही तुजपुढे । ते शंभूही परि न जोडे । तपे करिता ॥676॥
पण आम्ही तुझ्यापुढे आपले जे विश्वव्यापकरूप दाखविले, ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही
677-11
आणि अष्टांगादिसंकटी । योगी शिणताति किरीटी । परिअवसरु नाही भेटी । जयाचिये ॥677॥
आणि अत्यंत श्रमदायक अशा योगाच्या यमनियमादि अष्टांगाचा अभ्यास करताना योगी शिणतात; पण त्यांनाही ज्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही.
678-11
ते विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखो अळुमाळ । ऐसे स्मरता काळ । जातसे देवा ॥678॥
ते विश्वरूप एखादे वेळी एवढेसे तरी कसे दिसेल, असे चिंतन करिता करिताच देवांचेही आयुष्य जाते.
679-11
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळी । चातक निराळी । लागले जैसे ॥679॥
जसे ह्रदयाच्या कपाळावर आशेची अंजुली ठेऊन, चातक पक्षी आकाशाकडे सारखी दृष्टी देऊन राहतात,
680-11
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनिया सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥680॥
त्याप्रमाणे अत्यंत उत्कंठतेने देव, ज्याची भेट व्हावी म्हणून आठही प्रहर चिंतन करीत असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

681-11
परि विश्वरूपासारिखे । स्वप्नीही कोण्ही न देखे । ते प्रत्यक्ष तुवा सुखे । देखिले हे ॥681॥
पण विश्वरूपासारखे कोणाच्या स्वप्नातही पाहण्यात येत नाही. ते विश्वरूप तू अनायासे प्रत्यक्ष पाहिलेस.

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥11-53॥

अर्थ ज्याप्रकारे तू मला पाहिलेस, त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही
682-11
पै उपायासि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदी ॥682॥
हे उत्तम योद्ध्या ! येथे येण्याकरिता कर्मरूप साधनांना मार्ग नाही, सहाही शास्त्रांसह वेदांनी माघार घेतली.
683-11
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥683॥
हे धनुर्धारी अर्जुना ! माझ्या विश्वरूपाकडे येण्याकरिता नानाप्रकारच्या तपांच्या समुदायांचाही लाग नाही.
684-11
आणि दानादि कीर कानडे । मी यज्ञीही तैसा न सापडे । जैसेनि का सुरवाडे । देखिला तुवा ॥684॥
आणि ज्याप्रमाणे तू विश्वरूपाला उत्तम रीतीने पाहिलेस, तसे ते विश्वरूप दानादिकांनी खरोखर प्राप्त होणे कठीण असून, तसा मी यज्ञादिकांनीही प्राप्त होत नाही.
685-11
तैसा मी एकीचि परि । आंतुडे गा अवधारी । जरी भक्ति येऊनि वरी । चित्ताते गा ॥685॥
माझ्या प्रेमभक्तीने चित्ताला वरले – म्हणजे माझी प्रेमभक्ती चित्ताला उत्पन्न झाली – तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते.
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥11. 54॥

अर्थ पण हे शत्रुनाशना अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तियोगाने जाणणे, पहाणे आणि मत्स्वरूपाने माझ्यामधे लीन होणे शक्य आहे. ॥11-54

686-11
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावाचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥686॥
पण ती भक्ती अशी आहे, ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वीवाचून दुसरी गतीच ठाऊक नसते.
687-11
का सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्राते गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥687॥
ज्याप्रमाणे जलसंपत्ती घेऊन, गंगा अनन्यगतिक होऊन समुद्राला मिळते व मिळाल्यानंतरही मिळतच राहते.
688-11
तैसे सर्वभावसंभारे । न धरत प्रेम एकसरे । मजमाजी संचरे । मीचि होऊनि ॥688॥
त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावून व सर्व प्रेमसंबंधाचा समुदाय घेऊन, खंड न पडता, माझे ठिकाणी एकसारखे प्रेम होत राहते.
689-11
आणि तेवीचि मी ऐसा । थडिये माझारी सरिसा । क्षीराब्धि का जैसा । क्षीराचाचि ॥689॥
आणि त्याचप्रमाणे मीही असा आहे की, जसा क्षीरसागर काठाशी व मध्ये एकसारखा दुधाचाच असतो.
690-11
तैसे मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरी । भजनासि का दुसरी । परीचि नाही ॥690॥
तसेच मजपासून मुंगीपर्यंत किंबहुना संपूर्ण चराचर विश्वात, भजण्याकरिता – म्हणजे प्रेम करण्याकरिता माझ्यावाचून निराळी वस्तूच नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

691-11
तयाचि क्षणासवे । एवंविध मी जाणवे । जाणितला तरी स्वभावे । दृष्टही होय ॥691॥
ज्याक्षणी, असे माझे प्रेम जडते, त्याक्षणीच मी याप्रमाणे विश्वव्यापक आहे, असा जाणला जातो आणि जाणला गेलो की, सहजच विश्वरूपाने प्रत्यक्ष होतो.
692-11
मग इंधनी अग्नि उद्दीपे । आणि इंधन हे भाष हारपे । ते अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवी ॥692॥
मग लाकडाचे ठिकाणी अग्नी प्रगट झाला असता, ‘लाकूड’ हा शब्द नाहीसा होतो व ते लाकूड मूर्तिमंत अग्नीच होते.
693-11
का उदय न कीजे तेजाकारे । तव गगनचि होऊनि असे आंधारे । मग उदईलिया एकसरे । प्रकाशु होय ॥693॥
किंवा जोपर्यंत सूर्यच प्रकाशरूपाने आपला उदय करीत नाही, तोपर्यंत आकाशच काळोखरुप होऊन राहते आणि सूर्य प्रकाशल्याबरोबर, मग ते आकाश एकसारखे प्रकाशच होऊन राहते.
694-11
तैसे माझिये साक्षात्कारी । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपी अवधारी । द्वैत जाय ॥694॥
त्याप्रमाणे (माझ्या प्रेमभक्तीने) माझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता, अहंकारावर येणे समूळ नाहीसे होते आणि अहंकार नाहीसा झाला की, द्वैत मुळीच भासत नाही.
695-11
मग मी तो हे आघवे । एक मीचि आथी स्वभावे । किंबहुना सामावे । समरसे तो ॥695॥
मग ‘मी’ व ‘तो’ हे सर्व स्वभावतः मीच एक होऊन राहतो. इतकेच नव्हे तर, तो माझे ठिकाणी समरस ऐक्य पावतो.

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः॥
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥11. 55॥
अर्थ हे पांडवा, मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्याचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त संसारसंगररहित, सर्व भूतांचे ठिकाणी मित्रभाव असलेला, असा जो पुरुष असेल तो मजप्रत येतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥11॥

अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूपदर्शनयोग नावाचा हा अकरावा अध्याय समाप्त झाला. ॥11॥
696-11
जो मजचि एकालागी । कर्मे वाहातसे आंगी । जया मीवाचोनि जगी । गोमटे नाही ॥696॥
जो केवळ एका माझ्याकरिताच शरीरादिकांनी होणारी कर्मे करीत असतो, ज्याला माझ्यावाचून जगात काहीच गोड वाटत नाही किंवा आवडत नाही.
697-11
दृष्टादृष्ट सकळ । जयाचे मीचि केवळ । जेणे जिणयाचे फळ । मजचि नाम ठेविले ॥697॥
ज्याचे जिवंतपणीचे व मरणानंतरचे प्राप्तव्य केवळ मीच एक आहे आणि माझी प्राप्ती होणे, हेच ज्याला जीविताचे फळ आहे असे वाटते. ]
698-11
मग भूते हे भा ष विसरला । जे दिठी मीचि आहे सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥698॥
अशा माझ्या प्रेमामुळे जो माझ्याहून दुसरे प्राणी आहेत ही भाषाच विसरला, आपल्या दृष्टीत ज्याने मलाच भरून ठेवले, म्हणून ज्याला कोणी वैरीच उरला नाही आणि जो सर्वत्र माझेच भजन करतो.
699-11
ऐसा जो भक्तु होये । तयाचे त्रिधातुक हे जै जाये । तै मीचि हौनि ठाये । पांडवा गा ॥699॥
असा जो माझा भक्त आहे, त्याचे हे वातपित्तकफात्मक शरीर नाहीसे झाले असता, बा अर्जुना ! तो मीच होऊन राहतो. (पंचभौतिक देह हा भ्रांतिजन्य असून, दृष्टिसृष्टिवादानुसार त्याचे ज्ञान होते तोपर्यंतच त्याचे अस्तित्व असते आणि त्याचा विसर पडला की त्याचे अस्तित्व नाहीसे होते. भगवंताच्या निःसीम प्रेमामुळे भक्तांना देहाचा विसर पडतो व ते भगवंताशी पूर्ण ऐक्य पावतात; पण अज्ञानी लोकांना त्यांचा देह दिसतो तोपर्यंत, त्यांच्या ठिकाणी देव व भक्त असा भेद दिसून येतो, तोही त्याचे शरीर पडल्यानंतर नाहीसा होऊन ते केवळ भगवत्स्वरूपच होऊन राहतात. )
700-11
ऐसे जगदुदरदोंदिले । तेणे करुणारसरसाळे । संजयो म्हणे बोलिले । श्रीकृष्णदेवे ॥700॥
जगत् साठविल्यामुळे पोट मोठे असलेले व करुणारसाने रसाळ असलेले श्रीकृष्णदेव याप्रमाणे बोलले, असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

701-11
ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगी ॥701॥
यानंतर तो पांडूचा कुमार अर्जुन आनंदसंपदेने संपन्न झाला व तोच एकटा जगामध्ये श्रीकृष्णचरणाची थोरवी जाणणारा चतुर होता. (जगाचे उत्पत्तिस्थितीलयरूप तटस्थलक्षणात्मक भगवान श्रीकृष्ण असून, ज्ञानरूप स्वरूपलक्षणात्मकही श्रीकृष्णरूपच आहे; म्हणून श्रीकृष्णाची दोन्ही रुपे पूर्णब्रह्मच आहेत आणि बीजवृक्षाप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप यांचा संबंध असून, दोघात, स्वरूपाचे दृष्टीने काही फरक नसला तरी, बाहेर स्वाभाविक व निःसीम आत्मप्रेमसुखाचा लाभ, एका श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणीच होतो; विश्वरूपाचे ठिकाणी होत नाही. अर्थात विश्वरूपापेक्षा तेच अधिक प्रिय होय, असा श्रीकृष्णाच्या चरणाचा महिमा, प्रत्यक्ष अनुभविण्याचे चातुर्य, अर्जुनाचे ठिकाणीच माऊलींना दिसले; म्हणून माऊलींनी अर्जुनाला ” श्रीकृष्णचरणचतुर ” हे विशेषण दिले. )
702-11
तेणे देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्ती । तव विश्वरूपाहूनि कृष्णाकृती । देखिला लाभु ॥702॥
त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा त्याला विश्वरूपापेक्षा सगुण श्रीकृष्णमूर्तीचेच ठिकाणी सुखाचा विशेष लाभ दिसून आला.
703-11
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवे । जे व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥703॥
पण व्यापक विश्वरूपाहून एकदेशी श्रीकृष्णस्वरूप अधिक लाभदायक किंवा श्रेष्ठ असू शकत नाही, असे म्हणून भगवंतांनी त्याच्या या अनुभवाला मान्यता दिली नाही.
704-11
हेचि समर्थावयालागी । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥704॥
आणि आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भगवंतांनी एक दोन उपपत्ती किंवा दृष्टान्तही अर्जुनाला सांगितले.
705-11
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्ती आहे म्हणतु । तरि होय बरवे दोन्ही आंतु । ते पुढती पुसो ॥705॥
सुभद्रापती अर्जुन, त्या उपपत्ती ऐकून मनात म्हणू लागला की, दोन्ही मूर्तीमध्ये चांगली लाभदायक कोणती, हे आपण भगवंताला पुढे विचारू.

706-11
ऐसा आलोचु करूनि जीवी । आता पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढे कथा ॥706॥
असा मनात विचार करून आता तो श्रीगुरुला प्रश्न विचारण्याची जी सुंदर पध्दती स्विकारील, ती कथा पुढे ऐका.
707-11
प्रांजळ ओवीप्रबंधे । गोष्टी सांगिजेल विनोदे । ते परिसा आनंदे । ज्ञानदेवो म्हणे ॥707॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीनिवृत्तिनाथांच्या चरणप्रसादाने, सरळ ओवीप्रबंधांत ती गोष्ट मी सहज लीलेने सांगणार आहे, ती ऐका.
708-11
भरोनि सद्भावाची अंजुळी । मिया वोंवियाफुले मोकळी । अर्पिली अंघ्रियुगुली । विश्वरूपाच्या ॥708॥
ओवीरूपी मोकळी फुले, मी प्रेमभावाच्या ओंजळीमध्ये भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरूपदर्शनयोगोनाम एकदशोऽध्यायः ॥11॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 55॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 708॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १५४ वा, ३, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८३७ ते १८४८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १८३७
असो मागे जाले । पुढे गोड ते चांगले ॥१॥
आता माझे मनी । काही अपराध न मनी ॥धृपद॥
नेदी अवसान । करी नामचे चिंतन ॥२॥
तुका म्हणे बोले । तुज आधीच गोविले ॥३॥
अर्थ

देवा, मागे जे झाले ते असो, आता यापुढे तरी माझ्या सेवेचा शेवट गोड झाला तर ते चांगले होईल, आजवर जे माझ्याकडून अपराध घडले, ते यापुढे मनात आणू नका. नामाचे चिंतन करीत असता मध्येच त्या चिंतनाला विराम देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या वचनाने तुला अगोदरच बांधून टाकीत आहे. याचे कारण, यापुढे तरी तू माझ्या चांगल्या वर्तनाविषयी काळजी घेशील.

अभंग क्र. १८३८
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृपद॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिसा सिंधू ॥२॥
सारसांसी निशी । ध्यान रवीच्या प्रकाशी ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसे धेनूलागी वत्स ॥४॥
पतिव्रते जिणे । भ्रताराच्या वर्त्तमाने ॥५॥
कृपणाचे धन । लोभ्या लागी जैसे मन ॥६॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
अर्थ

आई जर जवळ नसेल तर बालकाला कोणताही सुख सोहळा असेल तरी तो आवडत नाही. हे पंढरीनाथा तुझ्या वाचून अगदी माझ्या चित्तातही तसेच झाले आहे. चातक पक्षी पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असतो. त्याच्या समोर सागर किंवा नद्या जरी भरून वाहत असल्या तरीही त्याला त्याची आवड नसते. सारस पक्षाला रात्रीच्या वेळी असे वाटते की, केव्हा एकदा सूर्य प्रकाश पडेल याचेच ध्यान लागत रहात असते. पाण्यावाचून मासा जगू शकत नाही आणि गाय आपल्या वासराकडे ज्याप्रमाणे ओढ घेते अगदी त्याप्रमाणेच देवा मला तुझी ओढ लागली आहे. पतिव्रता स्त्रीला आपला पती आपल्या बरोबर असल्यावरच ज्या प्रमाणेच सुखं वाटते, कृपण माणसाचे म्हणजे कंजूस माणसाचे मन जसे धना वाचून तरफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्या प्रमाणे माझे झाले आहे तुझ्या वाचून माझे प्राण राहणार आहेत काय ?

अभंग क्र. १८३९
तुजऐसा कोणी न देखे उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥
शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागता त्यास अढळ देसी ॥धृपद॥
धावसी आडणी ऐकोनिया धावा । कइवारे देवा भक्ताचिया ॥२॥
दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरी आपुलिया ॥३॥
तुका म्हणे तुज वाणू कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडे ॥४॥
अर्थ

पांडुरंगा, अभय दान देण्यात तुझ्यासारखा उदार आणि शूर कोणीही पाहिला नाही. जे तुला शरण येतात तु त्यांच्या गुणदोषाचा विचार करीत नाहीस ; आणि काहीही न मागता सढळ हाताने त्यांना तू अढळपद देतोस. संकटप्रसंगी भक्तांचा धावा ऐकून, त्यांचा कैवार घेऊन धाव घेतोस. हे हरी, आपल्या नामाचे महत्व राखण्याच्या अभिमानाने कोट्यावधी कल्पपर्यंतही भोगून न संपणा-या भक्तांच्या पापाना जाळून टाकतोस. तुकाराम महाराज म्हणतात, हरी, तुझ्या अनंत गुणाचे वर्णन कसे बरे करू ! कारण, मला एक मुख आहे ; आणि आयुष्य थोडे आहे.

अभंग क्र. १८४०
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगो मी या जगामाजी आता ॥१॥
जतन हे माझे करूनि संचित । दिले अवचित आणूनिया ॥धृपद॥
घडल्या दोषाचे न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥
नव्हते ठाउके आइकिले नाही । न मगता पाही दान दिले ॥३॥
तुका म्हणे याच्या उपकारासाठी । नाही माझे गाठी काही एंक ॥४॥
अर्थ

हे पांडुरंगा तुझे माझ्यावर उपकार आहेत हे जगाला मी सांगू तरी कसे ? तू आज पर्यंत माझे पूर्व पुण्याचे संचित जतन करून ठेवले आणि अवचितच माझ्या हातात आणून दिले आहे. माझ्याकुन घडलेल्या दोषाच्या भरिला तू माझे पुर्वपुण्य घातले नाहीस त्यामुळेच माझे पूर्वपुण्य जसेच्या तसे राहून मी मनुष्य देहाला आलो हिच तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा आहे देवा. देवा मला जे दान कधी माहीत नव्हते, कधी जे दान मी ऐकलेही नाही, कधी जे दान मी पाहिले नाही ते दान तु मला दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला परंतु त्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्या पदरात काहीच नाही.
, :

अभंग क्र. १८४३
आता नको चुको आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥१॥
आचरावे दोष हे आम्हा उचित । तारावे पतित तुमचे ते ॥धृपद॥
आह्मी तो आपुले केलेसे जतन । घडो तुम्हाकून घडेल ते ॥२॥
तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडो देसी ॥३॥
अर्थ

हे रुक्मिणीच्या कांता कृपाळू तू आपले कर्तव्य करण्यास आता चुकू नकोस. अहो आम्ही दोष करावे आणि आमच्याकडून त्याचे कदाचित आचारणही व्हावे असे होऊ शकते परंतु तुम्ही पतितपावन आहात तुम्ही पतीतांना तारावे हे तुमचे कर्तव्यच आहे देवा. आम्ही आमचे कार्य केले आहे आता तुमच्याकडून काय घडेल ते घडो. तुकाराम महाराज म्हणतात हे विठोबा राया तू चतुरांचाही राजा आहेस तुझे जे कर्तव्य आहे त्याची परंपरा तु का मोडू देतोस ?
, :

अभंग क्र. १८४४
मुखे बोलावे ते जीविंचे जाणसी । विदित पायापाशी सर्व आहे ॥१॥
आता हेचि भले भाकावी करुणा । विनियोग तो जाणा तुह्मी याचा ॥धृपद॥
आपले तो येथे केले नव्हे काही । साधनाचा वांही पडो नये ॥२॥
तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळा कोण चिंता करी ॥३॥
अर्थ

आम्ही मुखाने काय बोलणार आहोत हे आमच्या अंतकरणातील तुम्ही आधीच जाणता देवा आणि त्या विषयी सर्व माहिती मी तुमच्या पाया पाशी विदीत केली आहे. आता हेच चांगले की तुमची करुणा भाकावी आणि त्याचा पुढे काय विनियोग आहे हे तर तुम्ही जाणता आहात. आम्ही काही करावे तर करूनही न केल्यासारखेच आहे त्यामुळे मी आता कोणत्याही साधनाच्या प्रवाहामध्ये पडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही हा देहरूपी पिंड तुला केव्हाच अर्पण केला आहे त्यामुळे त्याची आता वेळोवेळी कोण चिंता करते आहे.
, :

अभंग क्र. १८४५
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा कर्त्याचे लाघव । प्रारब्धे भाव दाखविले ॥धृपद॥
लोभालोभ एका धनाचिये ठायी । आणिकाची सोई चाड नाही ॥२॥
तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे ते चि सार यथाकाळे ॥३॥
अर्थ

कामातूर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा लाज वाटत नाही तो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही शरीर सुखापुढे तो आपले शरीर देखील तृणाप्रमाणे मानतो. त्याचे हे असे चाळे पाहून खरे तर नवल वाटते परंतु त्याच्या प्रारब्धाने त्याच्या ठिकाणी कामभाव उत्पन्न केलेला असतो. कामातूर झालेला माणूस जसा भोग सुखासाठी तरफडतो आणि जसा धनासाठी आसुसलेला मनुष्य वेडा होतो त्या दोघाचेही सामानच कार्य असते त्यांना इतरांची काहीच चिंता वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला भूक लागल्यामुळे त्या मणुष्याला अन्न चांगले आहे की खराब आहे याचा काहीच विचार येत नाही त्यावेळी ते अन्न चांगलेच आहे असे समजून तो अन्न खात असतो.
, :

अभंग क्र. १८४६
बांधी सोडी हे तो धन्याचिये हाती । हेंकडे गोविती आपणा बळे ॥१॥
भुललियासी नाही देहाचा आठव । धोतऱ्याने भाव पालटिला ॥धृपद॥
घरात रिघावे दाराचिये सोई । भिंतीसवे डोई घेऊनि फोडी ॥२॥
तुका म्हणे देवा गेली विसरोन । आता वर्म कोण दावी यांसी ॥३॥
अर्थ

बंधनात पडणे किंवा त्यातून सुटका करून घेणे हे ब्रह्मांडाचा जो धणी आहे त्याच्या हातात आहे परंतु हेक्कड मनुष्याला हे कळत नाही त्यामुळे तो स्वतः अडचणीत पडतो. जो धोत्र्याची बी खातो त्याला त्याच्या देहाचे देखील भान राहत नाही तो भ्रमिष्ट होतो त्यामुळे त्याच्या मनाचा भाव पलटतो. तो भ्रमिष्ट झालेल्या मनुष्य भिंतीला दरवाजा आहे असे समजून तेथून घरात प्रवेश करण्यास जातो परंतु तेथे भिंत असल्यामुळे त्या भिंतीला धडकून स्वतःचे डोके फोडून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे भ्रमिष्ट झालेली काही मनुष्य देवाला विसरून गेले आहेत आता त्यामुळे त्यांना परमार्थातील खरे रहस्य कोण दाखवील.
, :

अभंग क्र. १८४७
कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥१॥
कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥धृपद॥
कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥२॥
कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥३॥
सर्वा ठायी तूचि सर्व ही जालासी । तुका म्हणे यासी दुजे नाही ॥४॥
अर्थ

हे कृपावंता या जगामध्ये कोण जन्म घेणारा आहे आणि कोण जन्म देणारा आहे ही काही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता या जगामध्ये कोण दाता आहे आणि कोण मागणार आहे ही तुझी माया मला काही कळत नाही. हे कृपावंता या जगामध्ये कोण बघणार आहे आणि कोण भागविणारा आहे ही तुझी माया मला काही कळत नाहीहे कृपावंता या जगामध्ये कोणाला रूप आहे आणि कोण अरूप आहे ही तुझी माया मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी माया जर बाजूला काढून सारली तर जगामध्ये सर्व ठिकाणी तूच आहेस असेच लक्षात येते तुझ्या वाचून येते दुसरे कोणीही नाही हे कळून येते.

अभंग क्र. १८४८
जेथे देखे तेथे तुझीच पाउले । विश्व अवघे कोंदाटले ।
रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळे ते काय उरले ।
जाता लोटांगणी अवघीच मेदिनी । सकळ देव पाट जाले ।
सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमे असे धाले ॥१॥
अवघा आम्हा तूच जालासी देवा । संसार हेवा कामधंदा ।
न लगे जाणे कोठे काहीच करणे । मुखी नाम ध्यान सदा ॥धृपद॥
वाचा बोले ते तुझेचि गुणवाद । मंत्रजप कथा स्तुति ।
भोजन सारू ठायी फल तांबुल काही । पूजा नैवेद्य तुज होती ।
चालता प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति ।
देखोन दृष्टी परस्परे गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ती ॥२॥
जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघे गंगाजळ जाले ।
महाल मंदिरे माड्या तनघरे । झोपड्या अवघी देव देवाइले ।
ऐके कानी त्या हरीनाम ध्वनी । नाना शब्द होत जाले ।
तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखे धालो रे ॥३॥
अर्थ

देवा मी जिकडे पाहतो तिकडे तुझीच पावले आहे व अवगे विश्वच त्याने कोंडले आहे. सर्व रूप गुण नाम हे मेघ श्याम रूपच आहेत या वाचून दुसरे काय उरले आहे. मी ज्या धरती वरून चालतो, लोटांगण घालतो ती सर्व देवाला बसायचा पाठच आहे. सदासर्वकाळ मला सुदिन सोहळा झाला आहे असेच वाटते कारण माझे चित्त हरी प्रेमाने भरून गेले आहे तृप्त झाले आहे. देवा आम्हाला संसारातील सर्व काम धंदा हेवा तूच झाला आहेस. त्यामुळे आम्हाला कुठे जावा लागत नाही किंवा काही करावे लागत नाही आमच्या मुखामध्ये तुझे नाम आणि तुझे ध्यान आमच्या चित्तामध्ये सर्व काळ चालू असते. मी वाचेणे जे काही बोलत आहे ते तुझे पूर्णवाद मंत्र जप कथा स्तुतीच होत असते. मी ज्या ठ�
, :

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading