ग्रामगीता अध्याय विसावा – 20 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय विसावा – २०
Gram Gita Chapter 20
ओवी संख्या :- ११२
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 20

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय विसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २०
Gram Gita chapter twenty beginning

—-🕉ग्रामगीता अध्याय २० महीलोन्नती

महीलोन्नती
ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचे राष्ट्र आजचे संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥
विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकावरि ॥२॥
” जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उध्दरी । ” ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥
मातेच्या स्वभावे पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन । स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचे मोठेपण । ऐसे आहे ॥४॥
म्हणती जरी ” बाप तैसा लेक ” । परि माऊलीचे महत्त्व अधिक । मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुले चारित्र्याने ॥५॥
पुरूष सर्वकाही करी । परि बांधला राहे घराबाहेरी । सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥
उत्तम महिला हेचि करी । आपुले घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वाशी ॥७॥
याच गुणे ” मातृदेवो भव ” । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥
प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथी ॥९॥
काही पुराणी सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरी ॥१०॥

वियोगाने वैराग्य दृढ करावे । मन इंद्रियसुखातूनि परतवावे । म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यात ॥११॥
वैराग्यात न कथिले दोषविरोधा । नसली साधनात आपदा । कीर्तीत नसली काही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥
म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचे नश्वरत्व ओंगळपण । हे वैराग्यार्थ केले कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥
जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावे । लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसे म्हणोनि ॥१४॥
हे पुरुषास कथिले स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयी तिचे पोटी । तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयासि शास्त्र म्हणे ॥१५॥
परि छीः छीः नेहमीच म्हटले । तरि पालनपोषणचि बिघडले । संसारचक्रचि थांबोनि गेले । त्यातूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥
म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिले । महिलेविण विश्व न चाले । काय होते पुरुषाने केले ? अभद्र झाले घर सारे ॥१७॥
घरचा उत्तम कामधंदा । हे महिलेचेचि लक्षण सदा । आलिया-गेलियासि आपदा । महिला असता न वाटे ॥१८॥
खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणे बारीक कार्या । करू जाणती उत्तम भार्या । न कंटाळता काळजीने ॥१९॥
पुरुष-हृदया नाकळे जेवढे । स्त्रियेचे समजणे तितुके गाढे । तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥

सर्वागीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । जे जे ठरवील ते सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥
जगात असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥
देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥
माऊलीचे स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । माऊलीचे उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोका ॥२४॥
संती माऊलीचे रूप धरिले । तरीच ते देवपणासि पावले । नाना साधने करोनि फिरले । त्यांना न गवसले देवरूप ॥२५॥
ते हे स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥
स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचे लक्षचि न जाय । तेवढे शिक्षण मुलाबाळास ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥
पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । दोघांचे स्वभाव मिळताक्षणी । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥
उत्तम पुरुषासवे उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥
जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । हे मी पाहिले घरी अपार । प्रसंग येता जाण्याचे ॥३०॥

निरीक्षोनि जी जी घरे पाहिली । तेथे सरसता अनुभवा आली । चातुर्य-लक्षणे अधिक दिसली । महिलांमाजी ॥३१॥
मानवी स्वभावाचे अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचे अनुसंधान । स्त्रियांचे ठायी ॥३२॥
स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण । संसारचक्रे ॥३३॥
म्हणजे पुरुषाचे काहीच नाही । ऐसे म्हणणे नोहे काही । सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥
हे सर्व जरी सांगितले । तरी त्यात भावनेनेचि रंग भरले । कारण, मी नाही अनुभवले । सुखदुःख संसाराचे ॥३५॥
माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजे ते ते बोललो ॥३६॥
परि यातूनि एकचि घ्यावे । स्त्रियेसि कोठे अव्हेरावे । कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावे हे तारतम्ये ॥३७॥
कोठे वागवावे मित्रभावे । कोठे देवी म्हणोनि पुजावे । कोठे वैरिणीसारखे बघावे । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥
हे ज्या पुरुषांना नाही कळले । ते जरी रानीवनी पळाले । तरी काय होते केले । सोंग ऐसे वरपंगी ? ॥३९॥
ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडे पडले हे ॥४०॥
केवळ आपुल्या वृत्तीकरिता । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । तेथे माऊलीपणाचिया माथा । दोष देता पाप लागे ॥४१॥
म्हणोनि वैराग्ये स्त्री अव्हेरली । त्यांनी विवेके साधना केली । त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥
परि हे एकांगीपणे नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥
हीन-दुबळे केले स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झाले जग सारे ॥४४॥
कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । त्याने घरोघरी शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥
म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । हे म्हणणे शोभेना शहाण्याते । स्वार्थांधतेचे ॥४६॥
म्हणती स्त्री ही कार्यात धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतीत पाडावा खंड । ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥
वास्तविक दोन्ही संस्कारे जन्मती । अपुल्या प्रयत्नेच उन्नत होती । शेवटी उध्दारही तिच्याच हाती । असे तियेचा ॥४८॥
काय देवे देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥
काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? नाना विद्याकला भेद । यात प्रवीण कितीतरी ॥५०॥

काय स्त्रियांनी युध्द नाही केले ? पतिपुत्रा नाही प्रोत्साहन दिले ? काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥
हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । त्यांचे करावे तेवढे कौतुक । थोडेचि आहे ॥५२॥
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥
परि तिचे लक्ष कोणीकडे न्यावे । काय संस्कार तिच्यात भरावे । काय शिकवोनि तयार करावे । हे आहे संगतीहाती ॥५४॥
संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । तिच्यात वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडासहि ॥५५॥
प्राण देईल आपुल्या हाते । परि भ्रष्ट न होईल लोभे-भये ते । ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषे ॥५६॥
त्यासाठी तिला तैसेचि ठेवावे । सुसंगति द्यावी आणि शिकवावे । नातेगोते सर्व तैसेचि राखावे । स्त्रीचेप्रति ॥५७॥
अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतीची राहणी । कार्यी चपल, सावध जीवनी । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥
काही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥
तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥
परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । लोक स्त्रियांचे जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥
काही लग्न होता गुंतविती घरी । नसे बोलण्याचीहि उजागरी । ” चूल आणि मूल ” हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥
काही घरातचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजाती । जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥
मुलीने सदा लपोनि राहावे । मुलाने गावी रागरंग पाहावे । ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हा ॥६४॥
अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजी उत्तम भाषण देते । तुलाहि शहाणपण शिकवू जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥
ऐसे असता दाबून ठेवावे । आजच्या युगी शोभा न पावे । जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूना ॥६६॥
ईश्वरानेचि निर्मिले हे सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । मुलांनीच काय केले सर्वत्र । राहाया पुढे जगामाजी ? ॥६७॥
वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधी । विधवा होता विवाह-बंदी । निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥
काही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावे हे ॥६९॥
आपुला झाकोनि दुबळेपणा । करावी दुसर्‍याची विटंबना । हा तो आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥

संन्यास घेणे असेल विधवेला । तरि वनी आश्रमी ठेवावे तिला । सेवाशिबिरी अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छे ॥७१॥
आपण खावे ल्यावे साजिरे । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । त्याहूनि तिचे मरणे बरे । होते पति-चितेमाजी ॥७२॥
तिने वृत्तीने राहावे उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥
विधवेसि मानावे अभद्र । मुलगी जन्मता ती दळभद्र । वय वाढता समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥
जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असू शकते कुमारी । अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥
स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही काही बेरडी । हे म्हणणे नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥
नियमन असावे ते सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघासि । विशाल करावे विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥
समाजी जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांसी असावा व्यवहार । किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजी ॥७८॥
येथेच समाजाचे चुकले । एकास उचलोनि दुसर्‍यास दाबले । याचे कटुफळ भोगणे आले । कितीतरी स्थानी ॥७९॥
परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । कुरण वाढू द्यावे ढोरांसाठी पुढे । तैसे झाले समाजाचे ॥८०॥
यास पाहिजे आता वळविले । ठिकठिकाणी शिक्षण दिले । मुलीमहिलांचे जीवन जागविले । तरीच जगले गावराज्य ॥८१॥
शहाण्यांनी हे विसरू नये । गावी सर्वाची करावी सोय । जेणे पुरुषांचे तैसेचि स्त्रियांचे होय । उत्थान आता ॥८२॥
तरीच ग्राम शोभू लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागे । जेणे स्वर्गचि उतरेल कार्यायोगे । विकासाच्या ॥८३॥
महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसे शिक्षण खास । जरि दिले जाईल त्यास । तरीच भावी जग पालटे ॥८४॥
महिलांचे उच्चतम शिक्षण । शिक्षणात असावे जीवनाचे स्थान । जीवनात असावे स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचे ॥८५॥
समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । लिहिता-वाचता येईल एवढे । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥
तैसीच शिकवावी टापटीप । गाणे बोलणे वागणे अनुरूप । घर पाहताचि कळावे आपोआप । कैसी येथील महिला ते ॥८७॥
मुलीबाळीस उत्तम ठेवणे । हे तो मातापित्यांचे कर्तव्य प्रमुखपणे । त्यानेच राष्ट्राचे फेडील पारणे । घर संताने आपुलिया ॥८८॥
मी पाहिले मुले फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥
ऐसे समाजी न व्हावे । मुलांपरीच मुलींना शिकवावे । त्यांचे स्थानमान नेहमी असावे । सहकारितेचे ॥९०॥

मुलास विविध उच्च ज्ञान द्यावे । तैसेचि मुलींनाहि शिकवावे । हेळसांड करू नये हे जाणावे । समाजाने ॥९१॥
परि स्वतंत्र असावे मुलीचे शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । जेथे होते दोघांचे मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥
विचारे जे जे काही होते । त्यात योजनाबध्दता राहते । अविचाराने जाता मोहपंथे । धोका मागुता पावती ॥९३॥
म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावे । दोन्ही रथचक्रा सारखे करावे । शक्तियुक्तींनी भरावे । गाव सारे आपुले ॥९४॥
परंतु नेहमी भयभीत करावे । प्रत्येकाचे स्थान भिन्न ठेवावे । मग स्वभावास वळण कोणी द्यावे । संसर्ग येता ? ॥९५॥
स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्पराच्या मना । यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधे ॥९६॥
शिक्षणात अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्पराची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्ता । वळण द्यावे नैतिकतेचे ॥९७॥
दोघांनाहि आपुले ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । एरव्ही पिंजर्‍यात जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥
म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगे । जरि नैतिकभाव राहती जागे । शिक्षणी जागृति ठेवणे सर्वागे । काम नेत्या वडिलांचे ॥९९॥
शिक्षणी सांभाळोनि तनुमन । करावे मुळीबाळीस विद्वान । अंगी असावे शौर्य पूर्ण । ब्रीद आपुले रक्षाया ॥१००॥
जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । तेव्हा महिलात असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥
जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनी ॥१०२॥
पुरुषांचे जैसे स्फूर्तिस्थान । तैसेचि महिलांचे असावे उन्नतिभुवन । त्यात सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥
दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥
उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंती-पुण्यतिथी पर्व तयांचे । वाचनालयादिक महिलाविभागाचे । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥
स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥
माझे म्हणणे श्रोतयाते । जे जे सुख असेल पुरुषाते । महिलांसीहि असावे अभिन्नपणे ते । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥
सर्व सोयी पुरुषांकरिता । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । हे कोण बोलते शास्त्र आता ? द्यावे हाता झुगारोनि ॥१०८॥
पुरुष उन्नतीस चढला । परि काहीच न कळे महिलेला । तरि तो गावहि एक कल्ली झाला । नशीबी आला र्‍हास त्रास ॥१०९॥
म्हणोनि रथाची दोन्ही चाके । मजबूत करावी कातोनि सारखे । तरीच संसारगाडी सुखे । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥
आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुता । ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥

ग्रामगीता अध्याय विसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading