आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय सोळावा – 16 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय पंधरावा – १६ Gram Gita Chapter 16- 16 ओवी संख्या :- १९९ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १६
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सोळावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १६
Gram Gita Chapter Sixteen Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय १६ वेष – वैभव
वेष – वैभव
ईश्वरास मान्य जे सत्कार्य । जे सांगोनि गेले संतवर्य । ते आचरणे यातचि सौंदर्य । खर्या जीवनाचे ॥१॥
सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनासि ॥२॥
ऐसे सात्विक करणे जीवन । ही नव्हे अंधश्रध्देची खूण । सात्विकता निसर्गनियमास धरून । ऐसा अनुभव जाणत्यांचा ॥३॥
सात्विकतेने आरोग्य लाभे । शांतिसुख दास होऊनि राबे । जीवन सर्वप्रकारे शोभे । प्रभावी सौंदर्याने ॥४॥
स्वैराचार हीन विचार । राजस-तामस आहार-विहार । दिनचर्येत नाही ताळतंत्र । त्याचे इह-पर सुख नाशे ॥५॥
चहा-चिवडा-चिरूटांचे दास । आपल्या तनुमनधनाचा नाश । करोनि बिघडविती जीवनास । गावच्याहि ॥६॥
सात्विक सरळ ठेविता जीवन । ते होय सुंदर आरोग्यपूर्ण । सात्विकचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ॥७॥
काही भडक वेषभूषा करिती । कपडयावरि किती कपडे घालती । आत लुकडे परि वरोनि शृंगारिती । शरीरे आपुली ॥८॥
तोंडाचे खोडके दिसती हाडे । छातीची खोली दाखवी लाकडे । काय होते घालोनी कपडे । गर्भरेशमीहि ? ॥९॥
उगीच करिती थाटमाट । कपाळी अत्तराचा मळवट । पावडर कंगवा आरसा चिरूट । खिशामाजी ॥१०॥
व्यसन तोंडाचे खोडके करी । तेल लाविती वरचेवरी । केश फिरवोनि म्हणती साजरी । दिसतो आम्ही ॥११॥
अंग निस्तेज जीर्ण झाले । खरूज गजकर्णादिके भरले । भारी कपडे घालोनि झाकिले । सौंदर्यासाठी ॥१२॥
कशाचे हे सौंदर्य पण । ज्यातूनि न जाय सूर्यकिरण । ब्रह्मचर्याचेहि नाहीत कण । शरीरामाजी ॥१३॥
चालतांना पढती आढया । बोट लावता खाती तनघडया । बाता करिती बडया बडया । आम्ही शौकीन म्हणोनि ॥१४॥
रडयासारिखी निघते वाचा । औषधावाचूनि न होय शौच्या । बोटांत आंगठया हिरकणीच्या । मिरवोनि काय ? ॥१५॥
निस्तेज शृंगारिले प्रेत । की भुजाण उभे केले शेतात । एकटाचि विचित्र दिसे चारचौघात । ऐसी नको वेषभूषा ॥१६॥
अथवा भरजरी कपडे घातले । परि ते स्वच्छचि नाही केले । सोवळे म्हणवोनि पुन:पुन्हा नेसले । तेच ते पीतांबर ॥१७॥
ऐसी कला कासया करावी । जी हास्यास्पद आणि बाधकहि व्हावी । आपुली साधीच राहणी ठेवावी । ऐपतीपरी ॥१८॥
अंगी गुणसौंदर्य भरावे । सुंदर सात्विक कपडे करावे । खादी-ग्रामोद्यागाचेचि ल्यावे । लेणे आपुल्यापरी ॥१९॥
नेहमी स्वच्छ धुतलेले असावे । एकाचि वस्त्रे अंग झाकावे । निसर्गाचे हवा किरण लागावे । शरीरालागी ॥२०॥
एकावरि एक आच्छादन । ते थंड देशांचे अंधानुरण । शरीरा लागता सूर्यकिरण । औषधिगुण अंगी येती ॥२१॥
सोनेमोती रेशीम-जरी । सौंदर्यप्रसाधने बहुपरी । त्या सर्वाहूनि शतपटीने बरी । आरोग्याची टवटवी ॥२२॥
सौंदर्य असावे रक्तशुध्दीचे । ओजपूर्ण ब्रह्मचर्याचे । नीटनेटके वागण्याचे । घरीदारी उत्तम ॥२३॥
कला दाखवावी बळकट स्नायूंची । उंच छातीची ताठ शरीराची । आरोग्याची बाणेदारपणाची । सर्वागांनी आदर्श ॥२४॥
वेषभूषेची चढाओढ । आज जीवनास झाली अत्यंत जड । गरजा, चिंता, रोगांची वाढ । यात कसले मोठेपण ? ॥२५॥
बाह्य वस्तूंचे भडकपण । हे आतल्या उणीवेचे प्रदर्शन । महत्त्वास चढता बाह्य आवरण । मोल घटे मानवतेचे ॥२६॥
मानव मानवतेने शोभावा । गांधीवेष लाजवी वैभवा । श्रीकृष्णाचा मोरमुकुट पावा । वेड लावी विश्वाला ॥२७॥
हे जाणोनिया अंतरी । सात्विक व्हावे आहार-विहारी । तेणे घर-गाव-देशसेवाहि बरी । साधतसे सहजचि ॥२८॥
लोकापुढे राही आदर्श । समानतेचा उसळे हर्ष । ग्रामोद्योगांचाहि उत्कर्ष । आपैसाचि होय गावी ॥२९॥
येथे श्रोता करी शंका सादर । साधी राहणी उच्च विचार । हे जरी ऋषिजीवनाचे सूत्र । तरी ते आज ना चाले ॥३०॥
किंमती कपडे भडक राहणी । छाप पाडिती आज जनी । साधा सात्विक राहे पडोनि । मागच्या मागे ॥३१॥
विष्णूचा पीतांबर पाहून । सागरे लक्ष्मी केली अर्पण । शंकराची चिरगुटे बघून । दिले हलाहल तैसे होय ॥३२॥
आज पैसे खर्चता सर्व मिळते । न्याय मिळतो सत्ताहि मिळते । कीर्तिसन्मान थोरपण मिळते । ऐसा अनुभव सर्वाचा ॥३३॥
मित्रा ! हाचि भ्रमिष्ट अनुभव । लोकांना सांगतो धनचि देव । या सूत्रानेचि दु:खे सर्व । आज वाढली जीवनात ॥३४॥
सर्व हेचि चालती समजोनि । जैसी स्पर्धाचि लागली जनी । तोरा दाविती एक-एकाहूनि । जाती पतनी अधिकाधिक ॥३५॥
कापसाहूनि सफेद वसने । सोन्याहूनिहि पिवळे दागिने । शिखर गाठले कृत्रिमतेने । नित्य नव्या हौसेसाठी ॥३६॥
स्वच्छता आणि पवित्रता । शुध्दता आणि नैसर्गिकता । याहूनि प्रिय झाली कृत्रिमता । सुशिक्षितता तीच वाटे ॥३७॥
स्नान न करता फवारा घ्यावा । कपडयावरि अत्तरांचा शिडकावा । मळ साचो परि सुंदर दिसावा । कपडा नवा घडोघडी ॥३८॥
नवी फॅशन थाटमाट । यांची वाढतचि गेली चट । शिवता पन्नासाचा कोट । लागे पँटहि तोलाचा ॥३९॥
ह्या गरजा वाढतचि जाती । तेथे न पुरे कुबेर-संपत्ति । मग बापुढे कामगार करिती । काय तेथे ? ॥४०॥
कोणी खाती लाचलुचपती । कोणी उघडचि डाके देती । अन्याय अत्याचार वाढती । पैशासाठी ॥४१॥
कोणी सरळपणे चालती । ते यांमाजी रगडले जाती । मग त्यांचीहि भांबावे वृत्ति । वाढे अशांति चहूकडे ॥४२॥
कोणी घरी उपास काढिती । मुलाबाळा दूध न देती । परि बाह्य डौल उत्तम ठेविती । मोठेपणा मिरवाया ॥४३॥
कोणी म्हणती यावाचून । न चाले धंदा न मिळे धन । परि हे सर्वासीच गेले समजोन । वर्म एकमेकांचे ॥४४॥
मग का अट्टाहास करावा ? जाणोनि सन्मार्ग का न धरावा ? परि तो मार्गहि नाही ठावा । वेड लागले धनाचे ॥४५॥
म्हणती पैशांनीच सर्व होते । मोक्ष मिळतो, राज्य मिळते । संत मिळती, कीर्ति मिळते । देवाचे होते पूजनहि ॥४६॥
परि हे म्हणणे वेडयासारखे । पैशांनीच सखे होती पारखे । पैशासाठीच जगी वाखे । घाली नरकी पैसाचि ॥४७॥
पैसा नियमांनी मिळविला । तारतम्याने खर्ची घातला । तरीच सौख्य देतो जीवाला । जीवनामाजी ॥४८॥
नाहीतरि पैसा जहर । शांति न लाभू दे क्षणभर । माणसासि बनवितो वानर । चंचल चित्त करोनिया ॥४९॥
चिंता लावितो कमावितांना । पशूसारिखे कष्ट नाना । जाळतो तनुमना जीवना । सर्वकाळ मानवाच्या ॥५०॥ .
चिंता थोर रक्षणाची । चोरभय अग्निभयादिकांची । लालसा वाढे उपभोगाची । माणूस होय पशुजैसा ॥५१॥
असला दिसला त्यासि पैसा । जीव होतो कासाविसा । वाटे खर्च करावा कैसा । झोप त्यासि लागेना ॥५२॥
आला पगार खर्च झाला । सिनेमा तमाशे पाहण्यात गेला । त्यातूनि उरला काही, त्याला । उत्तम मार्ग लागेना ॥५३॥
दारू, गांज्यादिक पितो । काही पैसा सट्टयात जातो । काही विभागणीस लागतो । व्यभिचाराच्या ॥५४॥
काही उन्मादाच्या भरी । झगडा करता मार्गावरि । वकिलांची घरे भरी । ” शाहजोग आम्ही ” म्हणावया ॥५५॥
काही खाण्यात आले बाष्कळ । मग उठले पोट, कपाळ । डॉक्टर-वैद्यांची झाली धावपळ । पैसा गेला त्यासाठी ॥५६॥
काही दाखवाया मोठेपण । देती पार्टी, बिदागी, दान । हसता हसता फसती घेवोन । बेगर्जी वस्तु ॥५७॥
काही लोक कमाई करिती । त्यांची त्यांनाच न पुरे पुरती । खर्च वाढता कर्ज घेती । धोका भोगती जाणोनिया ॥५८॥
जैसा कर्ज घेवोनि खर्च करी । तैसा कमाईस लक्ष न घरी । तेणे संकटे येती घरीदारी । मग विचारी ” काय करू ? ” ॥५९॥
पुढे जीवा लागली हळहळ । लोटता न लोटे पुढचा काळ । म्हणोनि बुध्दि झाली चंचळ । चोरीचहाडी करावया ॥६०॥
अक्कल नाही आमदानीची । समज नाही मोजमापाची । जीभ चटकली खाण्यापिण्याची । धरला मार्ग चोरीचा ॥६१॥
कलंक लागला घराण्यावरि । आईबापाची बदनामी पुरी । पुत्र निघाले ऐसे वैरी । उत्तम कोणी म्हणेना ॥६२॥
हौसेसाठी सोडला धर्म । किळसवाणे करिती उद्यम । नाना प्रकारे व्यभिचारकर्म । करिती आणि करविती ॥६३॥
कोणी धनिक राक्षसचि असती । पैसा देवोनि गुलाम करिती । पाप करिती करवोनि घेती । आपणासाठी ॥६४॥
कोणी फसवोनि धन कमाविती । आपणचि उपभोग भोगती । त्यांचीहि शेवटी होते फजीती । ऐकिली कीर्ति बहुतांची ॥६५॥
काहींना जवानीचा चढे तोरा । लग्ने करिती दहाबारा । सरला पैसा आणि बोजवारा । कोणी थारा देईना ॥६६॥
मग खाती बायका तोडोनि । म्हणती पैसा आणा कोठोनि । काय खावे घरी बसोनि ? लग्न केले कासया ? ॥६७॥
काही चढले चढविता मनी । विचार दिला सगळा सोडोनि । घरेदारे बसले समर्पोनि । वेश्या ठेवोनि घरामाजी ॥६८॥
हा झाला वानरासमान । लोक न पाहती याचे वदन । आप्त हासती दुरून-दुरून । करणी याची पाहोनिया ॥६९॥
काही धनासाठी दत्तक घेती । परि भांडता कवडी न उरे हाती । उरली तरि दत्तक-मित्र उडविती । संपत्ति सारी ॥७०॥
कोणी टोलेजंग नवसचि केला । जरि देवा ! पुत्र झाला । पुत्राभारंभार देईन तुला । सोनेचांदी, म्हणोनिया ॥७१॥
काहींना प्रथमचि मुले झाली । त्यांनी गावोगावी मिठाई वाटली । इस्टेट सारी गमविली । हर्ष होता पोराचा ॥७२॥
जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी । तेव्हा हात कपाळी देवोनि रडी । आता उरली नाही कवडी । भीक मागे लोकासि ॥७३॥
काही सज्जन यातूनि वाचले । परि घरीच पैसे उधळोनि दिले । मुलामुलींचे लग्न केले । धन खोविले बारूदखानी ॥७४॥
टोलेजंग दिला मंडप । नाही पाहिले मोजमाप । पंगती बसल्या आपोआप । लाडूजिलेबी बासुंदीच्या ॥७५॥
काही देखीसेखी करू लागले । व्रतबंध संस्कारादि भले । होते पैसे सर्व खोविले । वाढदिवशी पुत्रांच्या ॥७६॥
काहीनी वडिलांची पुण्यतिथी केली । पुंजी सारी गमाविली । शेवटी रोटीहि देईल कुठली । नांव घेवोनि वडिलांचे ? ॥७७॥
काही सज्जन यातूनि वाचले । परि घरी सणवारादि केले । होते-नव्हते पैसे घातले । दिवाळी-दसरा-होळीमाजी ॥७८॥
काही मानव ऐसे असती । जे वाईट कामी पैसा न घालिती । परि प्रतिष्ठेसाठी मरमरती । पैसा देवोनि गाठीचा ॥७९॥
शेतात खटा असोत नव्वद । परि एका तासासाठी करिती फिर्याद । सारी इस्टेट होवो बरबाद । परि लढती एका शिवीसाठी ॥८०॥
कोणी नांव व्हावे लोकातरी । म्हणोनि साहेबास मेजवानी करी । नाना पक्वान्ने नजराणे परीपरी । पाहिजे ते ते पुरवावे ॥८१॥
काहीनी घरेदारेहि विकली । प्रतिष्ठा स्थापावयासि आपुली । पुढे भिकारी होवोनि मेली । मुलेबाळे त्यांची ॥८२॥
काही लढले निवडणूक । पैसा गमावोनि झाले खाक । नाही उरले लौकिकी नाक । घेतला शोक विकतचा ॥८३॥
काहीनी विकली शेतीभाती । बंगले बांधले सडकेवरती । शहरी मौज भोगली, अंती । पोटा अन्न मिळेना ॥८४॥
कोणी व्यापारासाठी घर बांधिले । पैसे त्यातचि संपोनि गेले । पुढे खाण्याचे फजीते झाले । व्यापार काही सुचेना ॥८५॥
कोणी देश-विदेश पाहती । नाना वस्तूंचा संग्रह करिती । शेवटी त्यांचीहि झाली फजीती । गोष्टी उरल्या बडयाबडया ॥८६॥
कोणा साधूची लागली झळ । घरी बुवांची चाले वर्दळ । चमत्कार करिती म्हणे सकळ । पैसे उधळी त्यालागी ॥८७॥
करी सेवा देई दक्षणा । मिष्टान्ने खाऊ घाली नाना । भरजरी वस्त्रपात्रादि दाना । करोनि झाला भिकारी ॥८८॥
मग बुवासीच म्हणे धन सांगा । लागला मागे करोनि त्रागा । गाठ पडली ठगा-ठगा । झाला शेवटी निराश ॥८९॥
बुवा दक्षिणेपुरता गोड बोलला । ती संपतांच घर विसरला । कोण पुसतो धनहीनाला ? नाश झाला शेवटी ॥९०॥
भक्ति चमत्कारादिसाठी । म्हणोनि झाली फजीती मोठी । घरदारहि लावोनि नेले पाठी । लुबाडले ढोंगी बुवांनी ॥९१॥
काही तीर्थधामावरि गेले । घरचे डबोले जवळचि आणिले । चोरागुंडादिकांनी ठोकले । पैसे नेले लुटोनि ॥९२॥
झाले बिचारे केविलवाणी । भीक मागत आले परतोनि । ऐसी केली पैशाधेल्यांनी । स्थिति अनेकांची ॥९३॥
सुविचारावाचोनि काही । पैसा सत्कारणी लागत नाही । धन वाढता मन वाढत जाई । घटता संवयी न घटती ॥९४॥
जीवनासि आवश्यक धन । सर्व कार्याचे प्रारंभसाधन । प्रपंची पदोपदी पाहिजे सुवर्ण । परि विचारधन आधी हवे ॥९५॥
नाहीतरि माणुसकीचे पडे विस्मरण । अंगी वाढती हीन गुण । लोक तोंडापुरते म्हणती सज्जन । पाठ फिरविता धिक्कातिरी ॥९६॥
शेवटी मनुष्याचा निर्मळ व्यवहार । हाचि ठेवतो हृदयी आदर । जो परस्पराच्या हिताचा विचार । आत्मत्वाने चालवी ॥९७॥
मनुष्यधर्म म्हणोनि सर्व करावे । परि भिकारीच न व्हावे । जीवन कर्तव्यशील राहावे । ऐसेचि करावे सत्कर्म ॥९८॥
जे टिकेल ते करणे बरे । ज्यासि सज्जन म्हणती साजिरे । कंजूषीहि न करणे बरे ! उधळपट्टीहि न व्हावी ॥९९॥
ऐपत पाहोनि प्रसंग करावे । प्रसंगी कदर्यु न बनावे । परि पैसेहि न उधळावे । भीक लागेल ऐशापरी ॥१००॥
लौकिकासाठी भिकारी न व्हावे । अंथरूण पाहून पाय पसरावे । प्रसंग शोभे ऐसे करावे । टिकाऊ परिणाम लक्षूनि ॥१०१॥
मनुष्य भावनेच्या आहारी जातो । तेव्हा तारतम्यचि सोडतो । काहीहि विचित्र करीत सुटतो । ” हौसेला मोल नाही ” म्हणोनि ॥१०२॥
परिणामांची पर्वा न करिता । व्यर्थचि दाखवितो उदारता । घरी धनसंपत्ति नसता । कर्ज काढोनि हौस करी ॥१०३॥
पुढे आपुला करोनि नाश । भिकेस लावी मुलाबाळास । नाही कोणाचाचि विकास । ऐसे कासया करावे ? ॥१०४॥
रोज न्यायाने मिळवावे धन । थोडे थोडे करावे जतन । काही खर्चावे त्यातून । प्रसंगासाठी संसारी ॥१०५॥
योग्य अतिथींचा करावा आदर । त्यासहि द्यावी भाकरीत भाकर । आपुल्यापरीने करावा सत्कार । आलियाचा ॥१०६॥
दुसर्याच्या दु:खात दु:खी व्हावे । त्याच्या आनंदी सुख मानावे । प्रसंगी आपणासि वगळिता यावे । न्यायी बुध्दीने ॥१०७॥
आपण कमवावे आपण खावे । परि उरले ते गाव-कार्यी लावावे । कमीत कमी खर्चात जावे । नेटकेपणे ॥१०८॥
कमावणे ती नव्हे श्रीमंती । बचत केली तीच संपत्ति । यानेच संपन्न होई व्यक्ति । वाढे श्रीमंती गावाची ॥१०९॥
थोडया थोडयातचि अधिक खर्चे । काटकसरीने रोज वाचे । थेंबे थेंबे तळे साचे । मग ते मना शांति देई ॥११०॥
तिळातिळातचि तेल पूर्ण । क्षणाक्षणाने बनले जीवन । कणाकणाने साचे धनधान्य । कामी येई प्रसंगी ॥१११॥
अधिक न घ्यावा एकहि घास । तेणे नशीबी नये उपास । थोडा त्रास अधिक विकास । शेवट गोड याचि मार्गे ॥११२॥
ऐसे वर्तन व्हावे गावी । गरजांची धाव कमी करावी । अनासक्ति वाढवावी । प्रत्येकाने अनुक्रमे ॥११३॥
काटकसरीचे करिता वर्तन । अपार वांचेल गावी धन । त्याने गाव होईल नंदनवन । सर्वतोपरी ॥११४॥
गावासि सत्ययुग आणावा । त्याच्या सुखे स्वर्ग मानावा । आपुल्या इंद्रियांच्या चवा । सोडूनि द्याव्या थोडथोडया ॥११५॥
मग जाणोनिया आत्मरंग । राहावे नित्यानंदस्वरूपी दंग । तेव्हाचि जीव होय अभंग । अमर स्थानी शेवटच्या ॥११६॥
सम्यक आचार सम्यक विचार । संग्रामाचा आदर्श थोर । साधु-संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे ॥११७॥
शुध्द आचार-विचारांचे फळ । व्यक्तिसवेचि गाव सोज्ज्वळ । गावी सुखे नांदतील सकळ । तुकडया म्हणे ॥११८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । कथिली साधी राहणी संयमयुक्त । सोळावा अध्याय संपूर्ण ॥११९॥
ग्रामगीता अध्याय सोळावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















