ग्रामगीता अध्याय पंधरावा – 15 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय पंधरावा – 15
Gram Gita Chapter 15 – 15
ओवी संख्या :- ९६
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १५

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय पंधरावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १५
Gram Gita Chapter Fifteenth Commencement


—-🕉ग्रामगीता अध्याय १५ गोवंश – सुधार

गोवंश – सुधार
एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठले ताकलोणी सकळांला । गोमातेचे ? ॥१॥
दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचे म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥
कोठे गायी राहिल्या आता ? तुरळक दिसती विकता वाचता । वधती चपलाजोडयाकरिता । वासरेहि करोडो ॥३॥
गोपालांचा देश भारत । आला गायीगुरे पूजीत । परंतु गायी झाल्या खात । लक्षचि नाही तयांकडे ॥४॥
त्यातील काही कसाब घेती । काही दुसरीकडे नेती । उरल्या त्या कचरा असती । गायी सार्‍या ॥५॥
चारापाणी अति महाग । नाही व्यवस्थेसाठी मार्ग । मानवचि अर्धपोटी, मग । गायी कैशा पाळाव्या ? ॥६॥
ऐकोनि त्याचे विशद विवरण । म्हणालो तुमचे म्हणणे मान्य । परि यात आपुलाचि संपूर्ण । दोष आहे ॥७॥
भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥८॥
म्हणोनि गोवंश सुखी होता । तोवरि नव्हती दरिद्रता । नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥९॥
गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । पेवे भरती गावागावास । धान्याची तेव्हा ॥१०॥

भूमि आणि जनावरे । हीच उत्पत्तीची कोठारे । एकाची अनेक होती खिल्लारे । जोडधंदा हा घरोघरी ॥११॥
घरोघरी दूधदुभते । अन्नधान्यासि सहायक ते । आबालवृध्द राहत होते । सशक्त आणि निरोगी ॥१२॥
म्हणोनि गायीगुरा ” गोधन ” । ऐसे सत्य नामाभिधान । सुखी होता भारत संपूर्ण । गोवंशा सुखवोनिया ॥१३॥
परि पुढे झाले दुर्लक्ष । काही भोवला राज्यपक्ष । गायी होऊनि बसल्या भक्ष्य । वाढले दुर्भिक्ष त्यागुणे ॥१४॥
आपण दुधाळ म्हशीकडे गेलो । चहाकॉफी आदि पिऊ लागलो । म्हणोनि गायीसमेत मुकलो । सर्वस्वासि ॥१५॥
प्राणी खावोन एकदा तोषला । तो नित्यासाठी त्यास मुकला । मग कुठले दुभते, संतान, खतादि त्याला ? ऐसे केले वेडयापरी ॥१६॥
गायी विकोनि पोट भरले । मग नित्यासाठी खाईल कुठले ? पोट बांधोनि गायीस पोषिले । त्यासि लाभले सौख्य पुढे ॥१७॥
” गोरक्षणी स्वरक्षण ” । ऐसे पूर्वजांचे कथन । म्हणोनीच गायींकरिता प्राण । दिले अनेक शूरांनी ॥१८॥
श्रीकृष्ण आणि शिवशंकर । वसिष्ठ आणि दत्तदिगंबर । दिलीप, शिवाजी गोसेवा-तत्पर । संत अपार गोभक्त ॥१९॥
ज्यांनी त्यागिले सर्वस्वास । करतली भिक्षा तरुतली वास । ऐसे निष्काम गुरुहि गोसेवेस । न विसंबती कदापि ॥२०॥

गायीच्या शरीरांत सर्व । कल्पिले जे देवीदेव । तयांचा हाचि असे भाव । गाय अधिष्ठान देशाचे ॥२१॥
तिच्या शेणाने पिके शेती । शेती देई सुखसंपत्ति । म्हणोनिच शेणामाजी लक्ष्मीची वसती । वर्णिली असे ॥२२॥
गोरसाने आरोग्य शरीरी । मग कोठे राहिला धन्वंतरी ? सत्वांश मिळता बुध्दि गोजिरी । सरस्वती ही गोदुग्धी ॥२३॥
उदररोगांचे नाशक । सत्वांश देई गायीचे ताक । तुपाने शांत डोळे मस्तक । चंद्रसूर्य जणू नेत्री ॥२४॥
गाय जिवंत आरोग्यधाम । तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम । राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम । गोसेवेयोगे ॥२५॥
म्हणोनि सकलांचे कर्तव्य आहे । जेणे गोवंश सुधारणा होय । ऐसा करावा काही उपाय । सर्वतोपरी ॥२६॥
कसाब आपुल्या गावातूनि । गायी नेती बघता नयनी । दु:ख व्हावे सकलांच्या मनी । परतवाव्या त्या गायी ॥२७॥
ऐसे दलाल हाकोनि द्यावे । अथवा अन्य कामी लावावे । परोपरीने सुमार्गी वळवावे । घेते-देते सर्वचि ॥२८॥
विकणारासि समजावावे । एवढयाने का श्रीमंती पावे ? मरे तो घरी खतमूत घ्यावे । तरी फळे सेवा गायीची ॥२९॥
द्वारी सकाळी गाय हंबरली । गोमूत्र देवोनिया उठली । म्हणजे समजावी पवित्रता झाली । जागेमाजी ॥३०॥

ज्याचे घरी शेती आहे । त्याने अवश्यचि पाळावी गाय । मळमूत्र सर्व उपयोगी राहे । ऐसी गाय माऊली ती ॥३१॥
गाय माऊली आईसमान । तिची निगा असावी पूर्ण । न करावी गोमाशांची खाण । अथवा सांपळा हाडांचा ॥३२॥
घालोनि चारा पेंड चुरी । गाय करावी हत्तीपरी । प्रेमे गोंजारोनि घरोघरी । गाय प्रसन्न ठेवावी ॥३३॥
गावी असावा आदर्श सांड । बैल निपजावया धिप्पाड । सुंदर होईल शेतीसि जोड । वाहावया बैलांची ॥३४॥
उत्तम गायी सुंदर सांड । पाहता आनंद वाटे उदंड । दूध पिवोनि मुले प्रचंड । शक्ति दाविती ॥३५॥
तेचि खरे सात्विक सौंदर्य । मुले गोंजारिती वत्स गाय । दूध पूवोनि राहती तन्मय । खेळीमेळी ॥३६॥
गोवंशाचे दूध वाढे । तरीच संतान उन्नतीस चढे । खाऊ घालोनि लाडू पेढे । उगीच पोटे वाढती ॥३७॥
कृत्रिम दूध-लोणी काही । गोरसतुल्य ठरणार नाही । नाना रोग वाढती देही । न कळता कृत्रिमतेने ॥३८॥
सर्वथैव यंत्रांनीच काही । शेती सुखकर होणार नाही । गावची संपत्ति गावी राही । सुगम तो मार्ग उत्तम ॥३९॥
यासाठी गायीगुरांची जोपासना । घरोघरी ठेवावा गोवत्सठाणा । प्रसन्न दिसावे पशू नाना । उत्तम लाभावे दूधदही ॥४०॥
दुधादह्याची योग्य पूर्ति । व्हावी आपुल्या गावाप्रति । घरोघरी गायीवासरे असती । तेचि गाव भाग्यशाली ॥४१॥
जो आपुल्या घरी गाय न ठेवी । तयासाठी गोरक्षणे असावी । गरीबांची तेथे सोय व्हावी । उत्तम लाभावा गोरस ॥४२॥
काही ठिकाणी गोरक्षणे करिती । मरतुकडया गायी जमविती । त्यांच्या नांवाने पैसे खाती । गायी मारती उपवासी ॥४३॥
ऐसे नको गोरक्षण । जे दुखवी मानवी मन । राहावी गायी-सांड पाहोन । प्रसन्न जनता सर्वदा ॥४४॥
गोरक्षणे दहीदुधाची सोय व्हावी । लोकी सुखसंपन्नता यावी । कोरडी गोपूजाच न करावी । घरोघरी अथवा गावी ॥४५॥
उत्तम चारापेंड देऊन । वाढवावे गायीचे वजन । आदर्श गायी वळू ठेवोन । उत्तम गोधन वाढवावे ॥४६॥
गावी सुंदर गायीचा तांडा । चराया गोचरभूमि उदंडा । नदी तळे विहिरीचा आखाडा । भव्य जैसा ॥४७॥
उत्तम ऐसा देवसांड । मुबलक चरावा चारा-बिवड । बीजारोपणी दूधकावड । देती गायी ॥४८॥
हेचि खरे गोरक्षण । नाहीतरि कसाबभुवन । उगीच गायी वाडयात कोंडून । गोरक्षण का होई ? ॥४९॥
गायीस नसे चराऊ जमीन । तरि मोकळी पाडावी सरकाराकडोन । अथवा गावी करावी अर्पण । जमीनदारांनी ॥५०॥

गोरक्षणाचा व्हावा अभ्यास । नाना प्रयोग सावकाश । कैसे पुढे गेले अन्य देश । ती माहिती द्यावी सर्वा ॥५१॥
गोवंशाच्या रोगनिवारणा । गावी ठेवावा दवाखाना । लाभ मिळावा सर्वाना । प्रतिबंधकता समजावी ॥५२॥
गावोगावी व्हावी गो-उपासना । गोसेवा गोदुग्धमंदिर स्थापना । रुचि लावावी थोरांलहाना । गोदुग्धाची परोपरी ॥५३॥
सर्व करावे जे जे करणे । परि सुधारावे सात्विक खाणे । त्यावाचोनि सदबुध्दि येणे । कठिणचि वाटे ॥५४॥
सात्विक खाद्यपेयांविण काही । गावी आरोग्य येणार नाही । उत्तम शक्ति नसता देही । संपत्तिहि कैची ? ॥५५॥
उत्तम दूध उत्तम सांड । उत्तम शेती उत्तम बिवड । उत्तम कामगार प्रचंड । शक्तिशाली ॥५६॥
ऐसे ज्यांनी गाव केले । तेचि आज प्रतिष्ठा पावले । एरव्ही तोरा करोनि मेले । निकामी ते ॥५७॥
निकामियाची व्यर्थ संपत्ति । निकामियाची व्यर्थ शक्ति । नाना मार्गे संपोनि अंती । दु:ख देई जीवासि ॥५८॥
खूप सत्वमय खावोनि अन्न । मेद घेतला वाढवोन । तेथे रोगांची फौज निर्माण । होतसे दु:ख द्यावया ॥५९॥
म्हणोनि केले पाहिजे काम । आरोग्यदायी कुणी व्यायाम । अंगांतोनि निघता घाम । नष्ट होती रोगजंतु ॥६०॥
व्यायाम आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठेवावे सूत्र । आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरी ॥६१॥
व्यायामाविण सात्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन । व्यायामे होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ॥६२॥
व्यायामे जडत्व जाई दुरी । व्यायामे अंगी राहे तरतरी । रक्तव्यवस्था उत्तम शरीरी । वाढे विचारी सजीवपण ॥६३॥
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु । व्यायामहीना पित्त कफ वायु । जर्जर करिती अत्यंत ॥६४॥
व्यायामे वाढे प्रतिकारशक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति । व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ॥६५॥
ऐसा व्यायाम सर्वाकरिता । असे उपयुक्त पाहता । ही नव्हे केवळ एकांगी संथा । पहिलवानांची ॥६६॥
कोणी व्यायामामागेच लागले । ते मल्ल-पहिलवान झाले । लोका दिपवोनि सामर्थ्य दाविले । देह-शक्तीचे ॥६७॥
त्यात कोणी बक्षिसासाठी । करिती जीवनाची आटाआटी । पैशांसाठी मारापिटी । करिती कोणी ॥६८
देह झिजवावा सेवेस्तव । सत्यमार्गे रक्षावे गाव । दुर्बळासि उचलावे हेचि वैभव । मल्लविद्येचे ॥६९॥
परि इकडे नाही ध्यान । नष्ट करोनिया मिष्टान्न । शक्ति खर्चिती दुष्कर्मी पूर्ण । ऐसे व्यायामी कितीतरी ॥७०॥

कोणाच्या भरदार देहावरि । कपडे मुलायम जरतारी । आपुल्याच खाद्य खुराकीची करी । सर्वदा चिंता ॥७१॥
गावसेवेचे काम आले । तेथे पुढारीपण दिले । तरि तोंडचि त्याचे चाले । स्वये न करी एकहि ॥७२॥
कपडयास न पडावी वळी । म्हणोनि दुरुनीच सांभाळी । कामे करिती माणसे सगळी । परि तो जागचा हालेना ॥७३॥
असेल कुस्तीमाजी बरवा । परि जो प्रसंगी कामी न यावा । तो मल्ल म्हणोनि गौरवावा । कोणत्या न्याये ? ॥७४॥
तोचि खरा पहिलवान । जो देह-उन्नति साधूनि पूर्ण । सेवेसाठी अर्पितो जीवन । हनुमंतापरी ॥७५॥
नुसते दंडमोंढे मारणे । कुस्ती जिंकणे, चणे पचविणे । थोरालहानांस तंबी देणे । नव्हती लक्षणे व्यायामाची ॥७६॥
साधाया सेवेचा उपक्रम । कराया जीवनाचे काम । जो शक्ति दे तोच व्यायाम । आवश्यक सर्वा ॥७७॥
व्यायाममंदिरातचि काही । व्यायाम होतो ऐसे नाही । उत्पादनासि सहायक होई । तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा ॥७८॥
हाते घेवोनि दंड मारणे । त्याहूनि उत्तम पाणी ओढणे । दळणे, फोडणे, जमीन खोदणे । आरोग्यदायी ॥७९॥
जीवनाचा अमोल वेळ । घालवोनि खेळती तकलादी खेळ । त्यापेक्षा परिश्रमाचे फळ । उत्तम सर्वतोपरी ॥८०॥
दळणकांडणादिके उत्तम । मिळे आरोग्यकारी व्यायाम । देह विशेष राही कार्यक्षम । ऐसा सत्वांशहि लाभे ॥८१॥
वाचेल बरीचशी संपत्ति । देशात वाढेल श्रमाची शक्ति । सर्व कार्याची होईल पूर्ति । गावीच या मार्गाने ॥८२॥
होवोनिया लोकसेवा । आरोग्याचा लाभेल मेवा । गावास लाभे सुखाचा ठेवा । अडचण कोठे कशाची ? ॥८३॥
आपुली शेती आपुल्या कष्टे । शेणमूत्रादि घालोनि गोमटे । करिता ऐसी आदर्श नेटे । उत्पन्नासी वाण नुरे ॥८४॥
आबालवृध्द नरनारी । यासाठी झटतील घरोघरी । तरि सर्व सुखे संसारी । लाभतील त्यांना ॥८५॥
लाभेल व्यायामाचे फळ कामामाजीच सकळ । निसर्गचि देईल आरोग्यबळ । सर्व लोका ॥८६॥
वनस्पति आदींचा सहवास । सूर्यकिरणातील सत्वांश । शुध्द हवेतील श्रम सर्वास । अमृतापरी लाभदायी ॥८७॥
मग गाव असो की शहर । तेथे रोगांचा न राहे संचार । एक-एक व्यक्ति करील आचार । ऐसा जरी ॥८८॥
व्यसने आळस दुराचार । यापासोनि राहिला दूर । ऐसा एकेक घटक सुंदर । पाहिजे गावी ॥८९॥
सदगुण जेथे जेथे दिसती । ते उचलोनि आणावे अनुभवाप्रति । यानेच उन्नत होईल व्यक्ति । जीवन सुधारेल गावाचे ॥९०॥
जीवन लाभावे उज्जवलतेचे । तरि सर्व कामधाम असावे सोयीचे । जे जे कराल ते चालावे साचे । त्याच मार्गी ॥९१॥
भोजनस्थानी निद्रास्थानी । सभास्थानी उधोगस्थानी । विशेष प्रसंगी सहजस्थानी । सदविचारेचि वर्तावे ॥९२॥
संस्कार आणि शुध्दबुध्दता । आरोग्य आणि पवित्रता । यावरि लक्ष ठेवोनि सात्विकता । बिंबवावी जीवनी ॥९३॥
याकरिता बोललो काही दिनचर्या । आहारविहारादि कार्या । ग्रामस्थांनी अनुभवोनिया । उध्दार करावा जीवनाचा ॥९४॥
ऐसे करावे एकेक कार्य । जेणे गावी नांदेल सात्विक सौंदर्य । यातचि स्वर्गीय सुखाचे माधुर्य । तुकडया म्हणे ॥९५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । गोरसव्यायामसेवन कथित । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥९६॥

ग्रामगीता अध्याय पंधरावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading