आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय नववा – 9 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय | ओवी संख्या |
|---|---|---|
| ग्रामगीता अध्याय नववा- 9 Gram Gita Chapter ९ – 9 | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book | १२५ |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने | हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉 ग्रामगीता अध्याय ९ सेवा- सामर्थ्य
सेवा-सामर्थ्य
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय नववा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ९
Chapter Nine of Gram Gita begins
—-🕉 ग्रामगीता अध्याय ९ सेवा- सामर्थ्य
सेवा-सामर्थ्य
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतियांनी विचारिले । प्रचारकार्याचे महत्त्व कळले । परि हे सर्वासीच साधेल भले । ऐसे नाही ॥१॥
आदर्श प्रचारक मिळणे कठीण । मिळाले तरी टिकणे कठीण । आमुच्यासाठी दुजा मार्ग कोण । ग्रामोन्नतीचा ? ॥३॥
तरी ऐका याचे उत्तर । मी एक गाव पाहिले सुंदर । शिस्त शांतता व्यवस्था घरोघर । लोक निर्व्यसनी तेथीचे ॥३॥
पाहूनि वाटले आश्चर्य । शोधिले, कुणाचे हे कार्य ? कोणा प्रचारकाचे चातुर्य । फळा आले ? ॥४॥
तव तो नेता आला समोर । लोकांनी त्याची करिता पुकार । म्हणे मी आपुला सेवक साचार । होतो वर्गांत एकदा ॥५॥
त्यासि पाहता नवल वाटले । कैसे याने हे कार्य केले ? ज्यासि बोलताहि नये चांगले । कलाकुशलता नाही अंगी ॥६॥
दिसे बिचारा साधाभोळा । परि हृदयी कार्याचा जिव्हाळा । हवा-हवाच वाटे सकळा । सेवागुणे ॥७॥
प्रचार न करिताहि सेवा । आकर्षित करू शके गावा । हाचि रहस्यबोध बरवा । मिळे याठायी ॥८॥
सेवा शब्दाविणहि बोलकी । सर्व लोका करोनि सुखी । त्यांचे हृदय सहज जिंकी । आत्मीयता वाढवी ॥९॥
नाना साधनी केला प्रचार । त्याने जरी होतो संस्कार । तरी सेवेविण निर्धार । न राहे टिकोनि जनांचा ॥१०॥
सेवेने मन हाती घ्यावे । तरीच ते उकलोनि वळविता यावे । नुसत्या उपदेशाच्या प्रभावे । कार्य न टिके जीवनी ॥११॥
अहो उत्तम प्रचारक नाही बोलला । तरी आवडे त्याचे वर्तन लोकाला । मोह पाडी गावकर्याला । सेवापप्रेमे त्याचे ॥१३॥
तो जव जव मार्गी चाले । कार्य करी पाउलापाउले । लोक पाहताचि नम्र झाले । दिसती त्यासि ॥१३॥
तो नसेल जरी बोलका । व्याख्याता उपदेशक नेटका । तरी वक्त्यापंडितांहूनि लोका । वजन तयाचे ॥१४॥
ऐसेचि लोक गाव सुधारती । देशाचे नांव उज्ज्वल करिती । नसेना कोणा त्यांची माहिती । सुगंध उधळती वनपुष्पे ॥१५॥
मोठे महाल उभारिले । पाहावयास उंच दिसले । तरी ते दगडावरि ठाकले । पायाच्याचि ॥१६॥
पाईक दगड काही दिसेना । परि महत्त्व त्यासचि असे जाणा । तैसे सेवेचे महत्त्व राष्ट्र-उत्थाना । सर्वतोपरी ॥१७॥
ज्याची सेवा करील प्राणी । त्याचे मन घेई मोहूनि । लंगोटीहि देईल सोडूनि । उदारपणे तो ॥१८॥
सुंदर गायन मृगा ऐकविले । त्याचे हृदय प्रसन्न झाले । मग नकळे त्या सर्वस्वहि घेतले । ऐसे होते ॥१९॥
सेवेने अंगी सामर्थ्य येते । जे जे बोलाल तेचि घडते । हस्तेंपरहस्ते सर्वचि होते । काम त्याचे ॥२०॥
लोकास एकदा भरंवसा आला । म्हणजे सेवा रूजू झाली भगवंताला । मग काय उणे त्याला ? मागेल ते ये धावोनिया ॥२१॥
सेवकास संकल्प करणे पुरे । इच्छा होता घरी अवतरे । वाटेल त्या मार्गे सारे । घडे मनासारिखे ॥२३॥
परि ते नसे उपभोगास्तव । ऐसे सेवक मानील सदैव । तोचि भोगिल सेवेचे वैभव । शेवटवरि ॥२३॥
ज्यासि उपभोग-वासना झाली । त्याची सेवाचि संपली । पुढे पुढे निंदा झाली । होईल ऐसे ॥२४॥
परि जो सेवाचि मानतो धन । काही अपेक्षा न ठेवोन । तो झाला शेवटी भगवान । पुजू लागले घरोघरी ॥२५॥
लोक धनवानांना पुसेना । लोक सत्तेला ओळखीना । परि सेवाधार्याचे चरणा । पुजू लागती जीवाने ॥२६॥
जगात जेवढे पूज्यपुरूष झाले । ते सर्व सेवेनेचि गौरव पावले । सेवा सोडताचि राक्षस ठरले । मारले गेले देवाकरवी ॥२७॥
संत दामाजीने सेवा केली । प्रसंगी धान्यकोठारे लुटविली । देवावेहि कदर केली । फेडले ऋण येवोनि ॥२८॥
येथे देवाने फेडले ऋण । म्हणजे मुखी थाटले नारायण । पुरविले बेदरी जाऊनि धन । भलतियाने ॥२९॥
कोणा मुखी काय ठाके । हे कोण सांगेल कौतुके ? जरि कर्म असेल निके । जनसेवेचे ॥३०॥
सर्व कर्मे व्रते करोनि । तीर्थाटनी वनी फिरोनि । करावी लागते सेवाच जनी । सत्कीर्तीसाठी ॥३१॥
तीर्थी दान सत्पात्रभोजन । यज्ञादिकी खर्चावे अन्नधन । त्यात सेवादृष्टीनेच सांगितले पुण्य । येरव्ही मिथ्या ॥३३॥
ज्यसि जरूरी त्यासि न द्यावे । पवित्र स्थान म्हणोनि उधळावे । तरि तेणे पुण्य कधी न पावे । जनसेवेचे ॥३३॥
तीर्थ समजती पुण्याची खाणी । आणि पापमय गावीचे प्राणी । त्यासि तीर्थींहि धोंडापाणी । सांगितले संती ॥३४॥
काशीच्या गंगेची कावडी । ओतावी तहानेल्या जीवाचे तोंडी । यातचि तीर्थाहूनि पुण्यकोडी । सांगती नाथ ॥३५॥
आपण झिजोनि अंगे स्वता । जीवजंतूंसि द्यावी प्रसन्नता । सुखी करावी गावींची जनता । हीच सेवा पुण्यकर ॥३६॥
ऐसी सेवा जया घडे । तुटे संसाराचे बिरडे । सखा भगवंत हृदयी जोडे । अंतर पडेना यासि ॥३७॥
सेवा हीच धनसंपत्ति खरी । न सरे जन्मजन्मांतरी । वाढवी विश्वभिमान अंतरी । ग्रामपूजन सेवामय ॥३८॥
म्हणोनि म्हणतो सेवा करा । उत्तम हाचि मार्ग बरा । आपुल्या जन्मासि उध्दरा । गावासहित ॥३९॥
जरि कराल सेवा ऐसी । तरीच उध्दराल जीवासि । उन्नत कराल गावासि । सर्वतोपरी ॥४०॥
येरव्ही सर्वचि करिती सेवा । कोणी कुटुंबसेवा कोणी लोकसेवा । परि त्याने ग्रामोध्दार का न व्हावा । तेहि सांगो ॥४१॥
सेवेसाठी सर्वचि तत्पर । चालला सेवेनेच व्यवहार । या सेवेचे नाना प्रकार । परि वर्म वेगळेचि ॥४३॥
” आमुच्या गावाचा मी पाटील । म्हणोनि करितो सेवा बहाल ” । म्हणवितो ऐसा सेवक खुशाल । परि राबवी गरिबाला ॥४३॥
ज्याची बैलजोडी उपाशी । आतावरि गेली होती कामासि । परि दया न येता म्हणे त्यासि । जुंप गाडी साहेबासाठी ॥४४॥
दुपारवरि काम केले । घरी जेवावयासहि नाही गेले । तरी बोलावून घातले । बिगारीसाठी ॥४५॥
जोडी माणसे मारूनि उपाशी । खूश करतो साहेबासि । याची आपुली सेवा ऐसी । साहेब म्हणे धन्य तया ॥४६॥
आमुच्या घरी झाले लग्न । परि गावकर्यासि भासले विघ्न । खाती चोरपोर झपाटून । कष्ट करणारे मेले घरी ॥४७॥
गावी मेजवानीच्या घातल्या पंगती । सेठ सावकार जमवोनि अति । केली गोरगरिबांची माती । कदर नाही तयांची ॥४८॥
” चलबे साली ” म्हणोनिया । जमा केल्या आयाबाया । घरचे काम टाकूनिया । बिगार केली रात्रंदिनी ॥४९॥
शेवटी कामे सुंदर झाली । शाबासकी जहागिरदारा मिळाली । कामे करणारी उपाशी पाठविली । हेहि एक सेवा असे ॥५०॥
साहेब येतो आमुच्या गावी । म्हणोनि रात्र जागवावी । मरे-मरेतो करावी । गाव-दुरुस्ती लोकांनी ॥५१॥
याने तोंडपाटिलकी करावी । कपडयास वळी पडो न द्यावी । शेवटी शाबासकी यानेच घ्यावी । जनता सगळी दूरचि ॥५३॥
गाव केले अति सुंदर । राबवोनि नारीनर । तेथे नांव एकल्याचे थोर । ” सेवाशील नेता ” म्हणोनि ॥५३॥
एकाने खूप धन लाविले । गावी उत्तम देवूळ केले । उदार म्हणोनि नांव गाजले । परि नाही कळले वर्म त्याचे ॥५४॥
आधी लुटले जनलोकासि । जमा केल्या धनाच्या राशी । मग बांधिले देवुळासि । शीग काही उतरेना ॥५५॥
चोरी करूनि धनी झाला । दान देण्यात शूर ठरला । बिचारा गरीब तसाचि मेला । कळला नाही कष्ट करूनि ॥५६॥
म्हणती सेवकाचे फोटो लावा । आदर्श सामोरीच दिसावा । हीहि आहे उदंड सेवा । भिकारी म्हणती अन्नदाता ॥५७॥
काही देवाचे भजन करती । मनी प्रतिष्ठेची हाव धरिती । भोळया भाळया लुबाडिती । ” आम्ही सेवक ” म्हणोनिया ॥५८॥
मनात येईल तेवढी वर्गणी । गोळा करावी चहूंबाजूंनी । ” सेवेसाठी बांधू धर्मशाळा ” म्हणोनि । शेवटी राहावे आपणचि ॥५९॥
जमा करावा आधी फंड । ज्ञान सांगोनिया उदंड । जनसेवेचे कार्य प्रचंड । तपशीलवार रेखाटूनि ॥६०॥
दावूनि त्याचे फायदे नाना । उत्तेजित करावे लोकांना । शेवटी सेवेच्या नांवे धिंगाणा । स्वार्थाचाचि चालतसे ॥६१॥
काहीजण यज्ञयागादि करिती । विश्वशांतीचे ध्येय बोलती । आपणचि मेजवानी झोडती । सेवक सगळे म्हणवोनि ॥६३॥
लोकासि व्हावी मदत उत्तम । म्हणोनि करिती धर्मार्थ कार्यक्रम । त्यात चैन करूनि वाढवावे नाम । ऐसेहि सेवक असती काही ॥६३॥
सेवा आपुल्या हौसेसाठी । नाही तरि कोण करी आटाआटी ? प्रतिष्ठा होतांच समाधान पोटी । मानती प्राणी ॥६४॥
काही जनांनी सेवा केली । नांव न निघता झुगारून दिली । उलटी भांडणे माजविली । ” आपुले काय ? ” म्हणोनि ॥६५॥
काहीनी धंदा उभा केला । सेवेने दिपविले थोरामोठयांना । आतूनि नष्ट केले लोकजीवनाला । भ्रष्ट वस्तु पुरवोनिया ॥६६॥
एक तमासगीर मजसी भेटला । त्याने वेश्या जमवोनि नाच केला । म्हणे मी सेवा अर्पावयाला । झटतो आहे जनतेसि ॥६७॥
कोणी काळाबाजार लाचलुचपती । यांचेहि बुध्दीने समर्थन देती । लोकांची अडचण हातोहाती । भागवू म्हणती सेवाचि ही ॥६८॥
एकाने भिकारी जमा केले । गावोगावी सोडूनि दिले । त्यांचे पैसे हिरावूनि घेतले । सेवा केली म्हणोनिया ॥६९॥
कोणी कोणी सेवा करी । तनमन लावोनि हवे तोवरि । फोटो काढण्यापुरती चाकरी । पुढे फरारी होताति ॥७०॥
काही सेवेस्तव प्रवासा गेले । चारीकडोनि फिरोनि आले । पुढे बिचारे घरी बसले । मतलब झाला म्हणोनिया ॥७१॥
काहीनी लोका चेतविले । सेवा म्हणोनि तट पाडले । आपण आतूनि मिळोनि गेले । स्वार्थ साधला म्हणोनिया ॥७३॥
एकाने जनता घ्याया हाती । सेवाव्रताची केली प्रगति । शेवटी घेतली सत्ता हाती । सेवा घडावी म्हणोनिया ॥७३॥
गेली सेवेत वर्षे किती । आता अधिकार व्हावा म्हणती । शेवटी लोकास पिळूनि खाती । करू प्रगति म्हणोनिया ॥७४॥
काहीनी सेवा आरंभिली । सेवा घेण्यातचि वेळ गेली । ज्याची सेवा हाती घेतली । त्याचेच मोडले कंबरडे ॥७५॥
सेवा करायासि साधू आले । नवरदेवापरी तोरा चाले । सेवेऐवजी जडचि झाले । पारडे यांचे ॥७६॥
आजवरि जन ऐसेचि फसले । म्हणोनि पाहिजे सावधान केले । विचाराविणा जे सेवाकार्य चाले । घातुक झाले ते सर्व ॥७७॥
ऐसी नसावी सेवा कोणाची । सेवेने वृध्दि व्हावी सहकार्याची । गरज पुरवावी परस्पराची । लोभ न ठेविता ॥७८॥
सर्वास व्हावे समाधान । सेवक-सेवाभावियासि पूर्ण । घेता देता दोघेजण । संतुष्ट व्हावेत सेवेने ॥७९॥
सेवा नसावी वरपंग दांभिक । आत एक बाहेर एक । सेवा नसावी कृत्रिम सुरेख । कागदी फुलांपरी ॥८०॥
सेवा नसावी प्रतिष्ठेपुरती । सेवक नव्हे तो जो आपस्वार्थी । बिघडविल जनजीवनाची शांति । दुष्परिणामी सेवेने ॥८१॥
खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म । परस्पराच्या सुखाचे वर्म । समजोनि करील जो त्याग-उद्यम । तोचि सेवाभावी समजा वा ॥८३॥
ज्याने आपुले घर विसरावे । त्यानेच ” गाव माझे ” म्हणावे । तोचि करील जीवे भावे । सेवा आपल्या गावाची ॥८३॥
ज्यासि घरची आवडनिवड । तो घालू न शके लोकहिताची सांगड । जरी बोलका असेल गोडधड । तरी लोक त्याचे न ऐकती ॥८४॥
ज्याचा घरचा स्वार्थ वाढला । त्यासि लोकसेवा व्यवसाय झाला । ऐसे दिसता जनतेला । कोण मानील भावाने ? ॥८५॥
स्वार्थासाठी बुवा बने । स्वार्थासाठी नेता होणे । स्वार्थासाठी प्राणहि देणे घेणे । सर्वचि करिती बिचारे ॥८६॥
परि यातून जो निघाला । निष्काम सेवा कराया लागला । तोचि सेवक म्हणोनि चमकला । सर्व लोकी ॥८७॥
म्हणोनि कार्यकर्त्यांने हे ओळखावे । आपुले स्वार्थ आवरोनि घ्यावे । तरीच पाऊल पुढे टाकावे । सेवेसाठी ॥८८॥
सूर्य सकळांची सेवा करी । बदला न मागे तिळभरी । सातत्याने चाले तयाची चाकरी । सेवाभावे ॥८९॥
वृक्ष सर्वाची सेवा करितो । छाया पुष्पे फळे देतो । शेवटी प्राण तोहि कार्या लावितो । सेवेसाठी ॥९०॥
मागे काहीनी सेवा केली । धनधान्यराज्येहि अर्पिली । शेवटी देह देवोनीहि पूर्ति केली । सेवेची त्यांनी ॥९१॥
त्यांच्या सेवेची पुराणे झाली । त्यांची कीर्ति स्फूर्तिरूपा आली । ती आपणहि पाहिजे अंगीकारिली । सेवा कराया ॥९३॥
सेवेचे अनंत प्रकार । ते समजोनि करावी निरंतर । आपणासि साधेल तो व्यवहार । सेवाभावाने करावा ॥९३॥
अन्नसेवा धनसेवा । श्रमसेवा ज्ञानसेवा । शेवटी ते प्राणसेवा । औषधादि रूपे ॥९४॥
व्यवहारसेवा सदधर्मसेवा । सर्वात मोठी आत्मसेवा । आत्मसेवेतचि सर्व सेवा । साधती सत्य ॥९५॥
आत्मसेवा नव्हे इंद्रियसेवा । तो आहे निर्मल ज्ञानठेवा । गाव तितुका उन्नत करावा । सत्संगतीने ॥९६॥
सेवा म्हणजे एक नव्हे । प्रत्येक कार्य सेवामय आहे । परि त्यात व्यक्तिभावे न साहे । संग्रहवृत्ति ॥९७॥
अपरिग्रह सर्वतोपरी । हेचि सेवा आहे खरोखरी । त्याहिपेक्षा आणिक सरोबरी । आहे सेवेची ॥९८॥
आपण भूमिसमान राहावे । दीनहीना वरि उचलावे । त्यातचि समाधान मानीत जावे । सेवकाने ॥९९॥
आपण द्यावे आपण द्यावे । हेचि अंतरी जपत राहावे । आपुले कष्ट अर्पोनि सेवावे । यज्ञशेष जैसे ॥१००॥
कष्ट व्हावे सर्वा त्यापरी । यशहि वाटावे सर्वाचे घरी । आपण काहीच नाही, चतुरी । मानावे ऐसे ॥१०१॥
प्रतिष्ठेसाठी सेवानोहे । ती स्वाभाविक हौसचि आहे । आत्मसमाधान हेचि राहे । पूर्ण फळ तियेचे ॥१०३॥
आम्ही सर्व गाव साफ केले । सर्वाच्या मनी सुख वाटले । सर्व लोक आनंदित झाले । हीच त्याची पूर्णता ॥१०३॥
आमुच्या गावी थोर आले । म्हणोनि गाव सुंदर सजविले । परि करणारांचेचि नांव पुढे केले । तोचि खरा सेवक ॥१०४॥
नाहीतरि कष्टासि दडे मागे । नांव होता पुढे धाव घे । लोक हासती नाना रंगे । टिंगल करोनि नेत्याची ॥१०५॥
ज्यासि आहे प्रलोभन । ईर्षा रागद्वेष जाण । त्याची सेवा विडंबन । समजा खर्या सेवेचे ॥१०६॥
जो दुसर्यासि उत्तम करितो । त्यातचि आनंद मानतो । तोचि सेवक मी समजतो । येत्या युगाचा ॥१०७॥
प्रत्येक जीवाचा हाचि विकास । सर्वाभूती समजावे आपणास । तैसेचि साधावे व्यवहारास । आपणासि नमवोनिया ॥१०८॥
सर्वाचा भार आपणावरि । तीच-समजावी सेवा खरी । हे कठिण व्रत न साधे जरी । आपले ओझे तरी नसावे ॥१०९॥
आपल्या आल्याचा न पडो धाक । आपल्या गेल्याचा होवो शोक । ऐसा मोहनी-वृत्तीचा सेवक । पाहिजे गावी ॥११०॥
नाहीतरि सेवक आला घरा । धाक पडला रांडापोरा । आता कोठोनि याची व्यवस्था करा ? म्हणती आम्ही गरीब ॥१११॥
वास्तविक सेवक येता घरा । मिळावा सर्व घरासि सहारा । आनंद वाटावा लहानथोरा । खेळीमेळी तयाच्या ॥११३॥
सेवाभावी आला गावी । तेव्हा दसरा-दिवाळीच वाटावी । सर्वाची मने संतोषावी । सहकार्याने ॥११३॥
ऐसा सेवक असावा आदर्शवान । राहणी बोलणी, करील भजन । सदासर्वदा सत्कार्यी मन । सेवकाचे ॥११४॥
अडीअडचणी लोक सांगे । सेवक पुरवोनि देई अंगे । ऐसे जीवजनांचे अनंत प्रसंगे । काम करी सेवक तो ॥११५॥ . प
्रयत्न करी नानापरी । दुर्गुण काढावया बाहेरी । तारतम्य ठेवोनि अंतरी । तेचि असे सेवाकार्य ॥११६॥
त्यास आपुले ठावेचि नाही । जे जे करील ती सेवाचि सर्वहि । कामे करोनिहि वाचा नाही । स्वार्थसुखाची ॥११७॥
घरी दारी सर्वदुरी । सेवकाचे प्रेम सर्वावरि । तरीच तो प्रचार करी । आदर्शाचा कृतीने ॥११८॥ .
गावी असोत पक्ष पंथ । भिन्न जाती मते अनंत । ती सर्वचि गुंफिली जातील सूत्रात । सेवेच्या एका ॥११९॥
ऐसाचि सेवक जनतेने पाळावा । त्याचि मार्गे गाव उत्तम करावा । सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा । सेवकाने ॥१२०॥
ऐशा सेवकाची अति जरूरी । सेवक पाहिजे घरोघरी । सेवकावाचूनि कुटुंब, नगरी । उत्तम नव्हे ॥१२१॥
म्हणोनि बोलिलो बोल । सेवाकार्य महाप्रबल । सेवक मिळता सुखी होईल । गाव सारे ॥१२३॥
श्रोतेहो ! समजा याचे महत्त्व । सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व । हृदयी पटवोनि घ्या तत्त्व । निघा सेवा करावया ॥१२३॥
त्यासि कला कुशलता नको काही । प्रांजळ जिव्हाळाचि यशदायी । लागा लागा या मार्गी सर्वहि । तुकडया म्हणे ॥१२४॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । सेवासाधना वर्णिली येथ । नववा अध्याय संपूर्ण ॥१२५॥ ॥
ग्रामगीता अध्याय नववा समाप्त
सदगुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

