आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय सदोतीसावा – 37 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय सदोतीसावा – 37 Gram Gita Chapter 37 ओवी संख्या :- १०४ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 37
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सदोतीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३७
Gram Gita chapter thirty seven beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 37 आत्मानुभव
आत्मानुभव
” अनुभव ” ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला । आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हा ॥१॥
केले प्रयत्न तुम्ही कोण ? कैसे गेले तुमचे जीवन ? खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ? ॥२॥
मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश । आपुल्या कर्तव्ये पद त्यास । प्राप्त होय हवे ते ॥३॥
करणी करिता विवेके पूर्ण । नरचि होय नारायण । प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥
ज्यासि करू आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति । साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥
आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार । संत, ग्रंथ काय, अवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥
बुडते जग त्यासि जागवी । संकटे स्फूर्ति देती नवी । अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥
मनी आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ । आपुले आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥
सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय । वाट चालता निर्भय । मुक्काम पावे ठायीच ॥९॥
आपुल्या अंगी प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला । खाणीत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्ने जन ॥१०॥
मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरी । कमल चढे देवावरि । चिखली जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥
हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगीच देवपण । हे संतग्रंथांचे सत्यचि कथन । जाणावे श्रोती ॥१२॥
तुम्ही विचारिले माझे जीवन । म्हणोनि करितो थोडे कथन । जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥
हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी । ऐसेचि प्रत्यया येई शेवटी । साधकाच्या ॥१४॥
देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडले मलीन । ते साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥
ऐसी साधने निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र । ते अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेच सूत्र उन्नतीचे ॥१६॥
या उन्नतिमार्गी जो लागला । विवेके अंतरी जागला । तो स्वये उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसी ॥१७॥
हे प्रयत्नाचे शुध्द महिमान । ऐकोनि मीहि केले साधन । ते कळाया करितो वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥
लहान ऐशा गावामाजी । मागासलेल्या जनसमाजी । उपासाचीच लाभे रोजी । ऐशा ठायी जन्मलो ॥१९॥
घरी दारिद्रयाचे वरदान । परि भावभक्तीची नसे वाण । ऐकत सुसंस्कारांचे गान । सोशीत कष्ट वाढलो ॥२०॥
अंतरी जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचे रूप । अल्लडपणे साहोनि ताप । सर्वामाजी वावरलो ॥२१॥
ऐकिले श्रवणी थोडे कीर्तन । त्यावेळी होते आर्तपण । धृवप्रल्हादाचे आख्यान । मना वाटे ऐकावे ॥२२॥
काही ऐकिली संतचर्चा । काही कथा ऐकिल्या पुराणीच्या । काही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगे ॥२३॥
झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्ती मुद्राध्यान । ते सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥
महत्त्वाचे सांगावे वाटते । साधकाला मिळेल आइते । आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥
काही संगतीचे लाभले फळ । आले आत्मचिंतनासि बळ । देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयी दृढ ऐसी ॥२६॥
पुढे कल्पना सरसावली । धृवानेच का तपस्या केली ? आपणासहि का न घडली । पाहिजे तैसी ? ॥२७॥
काय करावे वाटे मनी । कैसे ध्यान करावे नेत्र लावोनि । कोणा विचारावे, समाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ? ॥२८॥
मग बळेचि रानी जावे । वृक्षाखाली ध्यान धरावे । कधी मूर्तिपूजनचि करावे । मंदिरामाजी ॥२९॥
कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रे पूजावी ती । भजन करावे अहोराती । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥
ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय । धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजी ॥३१॥
परि झाले नाही समाधान । चित्त उडे मधून मधून । तशांतचि करावे कीर्तन । तळमळोनि ॥३२॥
आपणचि मना समजावावे । आपणचि समाधान मानावे । गावे नाचावे बोलत जावे । आपल्याशीच एकांती ॥३३॥
परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे । कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥
म्हणोनि निघालो घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन । कधी कधी विसरो देहभान । चिंतेत देवदर्शनाच्या ॥३५॥
राहिलो वनी, घोर रानी । रानवट लोकी, धनिकाभुवनी । अनेक अनुभव आले जीवनी । स्फुरले मनी सदभाव ॥३६॥
काही योगाचे साधन । थोडे अध्यात्म-वाचन । विशेष विश्वनिरीक्षण । केले मनन सर्वकाळ ॥३७॥
भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रते, महाप्रसंग । नाना कार्ये, साधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥
केले बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन । पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यात ॥३९॥
नाना मंदिरे, देवालये । संस्था, आश्रम, वाचनालये । दरी कंदरी होऊनि निर्भय । पाहिली स्थाने ॥४०॥
भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची । रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशी-भेषी ॥४१॥
पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे । वैराग्यांचे, महानुभवाचे । वारकर्यांसहित ॥४२॥
प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा । सायकल, मोटार, विमानाचा । सर्वकाही ॥४३॥
पाहिले सागर, भव्य स्थाने । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, राने । हिमालयासहित अति उंचपणे । गगनभेदी ॥४४॥
निसर्गाची दृश्ये अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव । सुखसाधने ज्ञानसाधने सर्व । पाहिली लोकी ॥४५॥
हे सर्वकाही पाहूनि पूर्ण । नाहीच झाले शांत मन । शेवटी घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजी ॥४६॥
बहिर्मुख दृष्टीने पाहता । समाधान न लागे हाता । हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वासि ॥४७॥
विश्व कोण मी कोण ? यांचे मुळात एकपण । ते जाणता विचारे पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥
एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरी बर्फ-तुकडयांसमान । त्यावरि सजले विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥
मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचे हे विशालपण । ओळखी होता कळले पूर्ण । अद्वैतपण सर्वाचे ॥५०॥
मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालो सावकाश । जे जे दिसे या दृष्टीस । ते ते भासे आपणचि ॥५१॥
वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ? हर्ष न समाये, मनाचे । मोठेपणी आतलाचि ॥५२॥
मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत । सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळो आले ॥५३॥
अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार । अनंत ब्रह्मांडे विश्वाकार । संचले असती ॥५४॥
माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटी । पोटपाठहि नाही शेवटी । तेचि तत्त्व मी ॥५५॥
ब्रह्म म्हणती सर्वात मोठे । परि ही भाषा परकी वाटे । अनुभव घेता वेगळे न भेटे । ब्रह्मपण आटे आपणात ॥५६॥
प्रथम गाव-मंदिर मोठे वाटले । मग तीर्थाटन मोठे झाले । आणि पुढे निसर्गरूप दिसू लागले । मोठे मोठे ॥५७॥
परि त्याच्या मुळाचा अनुभव घेता । मोठा कळलाच नाही कोणता । हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥
मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि । पाहता पाहणे दुरी सारोनि । कळला एकपणी जवळचि तो ॥५९॥
तेथेचि झाले पूर्ण साधन । मग दिसो लागले एकचिपण । सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेचि ॥६०॥
भिकारी आणि धनवान । हे तो संकुचित भावे दोन । विकास होता न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥
नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद । प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायी समरूपे ॥६२॥
जन्मणे मरणे झाला खेळ । सुखदु:ख सर्व झाले शीतळ । संकटे येता वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥
आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपे व्यापला । जे जे करणे असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥
यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यातूनि आसक्तीचा उच्छेद । इच्छेविरहीत आनंद । सर्वासाठी निर्विषय ॥६५॥
नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा । जे असेल जैसे तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥
हे सर्व कासयाने झाले ? यासाठी काय साधन केले ? कासयाने द्वैतपण मुरले । आपणामाजी ? ॥६७॥
हे आठवता भान येते । साक्षित्वरूपे पाहता कळते । अंतरंगी विचारिता वळते । कार्यमर्म सर्वकाही ॥६८॥
बुध्दीसि स्वातंत्र्य दिले । जैसे जे दिसले ते विचारिले । त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आले देहभावा ॥६९॥
आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावे भिन्नपण ? ऐसा होता झाले सावधान । ज्ञानमार्ग सर्वकाही ॥७०॥
ऐसा जीवेचि मंत्र धरिला । न कळे कोणी वरदहस्त ठेविला । परि सदभावे मी नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानी ॥७१॥
बहिरंग बोध नाही केला । स्वयेचि श्रध्दाभावे घेतला । अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥
परि अंतरी कळले मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम । आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजी ॥७३॥
हे कळावयासि संगति लागे । संगतियोगे भावना जागे । भावना जागता अंतरंगे । दिसे मुळीचे आत्मरूप ॥७४॥
मग जे जे मागे पाहिले । ते ते सर्व सहज झाले । स्वाभाविकपणचि अंगी आले । स्वरूपानुभवे ॥७५॥
स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति । नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजी ॥७३॥
अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण । हेच स्वरूपाचे लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जे ॥७७॥
परि हे प्रथम कळले नव्हते । म्हणोनि धुंडिले स्थानमानाते । नवल तोवरि वाटले होते । न लक्षिता स्वरूपस्थिति ॥७८॥
जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली । पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥
राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी । संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणे ॥८०॥
आपुला आनंद पैसावला । सुखवू पाहे दु:खिताला । निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥
परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेत विरू लागली । दुसर्यांची सुखदु:खे झाली । आपणाऐसी सहजचि ॥८२॥
मग माघारली पूजामंदिरे । दिसू लागली जिवंत शरीरे । यानेच दिसे सर्वाचे बरे । देवकृपा व्हावयासि ॥८३॥
जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासे । धाविनो करी आपणाऐसे । एकचि अंग समजोनि ॥८४॥
जव अंतरी आत्मा कळला । तव आपल्यातचि विश्व पाहो लागला । जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥
मग अनंत उदरे अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त । दिसे विराटरूप महासमर्थ । ठायीच्या ठायी ॥८६॥
ही दृष्टि सर्वासचि आहे । परि विचारे उघडील तोचि पाहे । तो अनुभवमार्ग सांगती लवलाहे । संतसज्जन ॥८७॥
जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे । तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेता ॥८८॥
नुरे जीवाचे जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण । आनंदाचे शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चये ॥८९॥
मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ । आत्मरूपे विश्व सकळ । अनुभवा ये एकपणे ॥९०॥
जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता । उरला उपकारापुरता । सर्वाचिया आत्मभावे ॥९१॥
त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा । मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारी ? ॥९२॥
तो जे करी ते ईश्वरपूजन । बोलेल तेचि वेदवचन । त्यांच्या शब्दे आंदोलन । करिती जन सदभावे ॥९३॥
सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता । इशारा होता मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यी ॥९४॥
त्याच्या संदेशाचे बळ । गावी करी प्रेमाचा सुकाळ । सुखी होती लोक सकळ । गावोगावीचे ॥९५॥
त्याच्या ज्ञाने भारले अज्ञजन । ते ज्ञानियासि देतील शिकवण । झुंजती काळाशी दारूण । स्त्रिया मुलेहि ॥९६॥
हे आत्मविकासाचे बळ । मानवी प्रयत्नाचेचि फळ । देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥
मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरी । मग दिसेल याच शरीरी । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥
लाभता अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन । गावी ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गाव सारे ॥९९॥
तो प्रलोभनी कोठे फसेना । रागद्वेषेहि गोंधळेना । त्याच्या सहवासेचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥
ऐसा सेवकचि पाया जगाचा । गावचा रत्ननिधिच तो साचा । अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥
प्रयत्ने मानव होई देव । प्रयत्ने स्वर्गतुल्य होई गाव । संतांच्याहि अभेदभक्तीचे वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नी ॥१०२॥
ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवे । नांदेल ग्राम, विश्व, वैभवे । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत । स्वानुभवे कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥
ग्रामगीता अध्याय सदोतीसावा समाप्त
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















