ग्रामगीता अध्याय अठरावा – 18 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय पंधरावा – १८
Gram Gita Chapter 18
ओवी संख्या :- १०८
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय अठरावा

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय अठरावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १८
Gram Gita Chapter Eighteen Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय १८ श्रम – संपत्ती


श्रम – संपत्ती
एक श्रोता प्रश्न विचारी । आम्ही ऐकिले गीतेमाझारी । कर्ममय असे सृष्टि सारी । न करताहि कर्म घडे ॥१॥
सर्वासचि लागले कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म । तेथे काम करावे मुद्दाम । हे बोलणे विपरीत ॥२॥
आपण म्हणता परिश्रम करा । येणे पोषण होईल अहंकारा । सहज चालेल तोचि बरा । व्यवहार लोकी ॥३॥
ही श्रोतियाची शंका । भ्रमवीत आली नित्य लोका । परि ही नव्हे गीतेची भूमिका । निर्भेळ ऐसी ॥४॥
कर्ममय विश्व आहे । कोण रिकामा बसला राहे ? प्रत्येक जण करीतचि जाय । काहीतरि कर्म ॥५॥
परि त्या कर्माचे अनेक प्रकार । काही शुध्द निषिध्द मिश्र । काही विधियुक्त काही पवित्र । निष्काम कर्म ॥६॥
काही देहेंद्रियांसाठी । काही निपजती मनाच्या पोटी । काही विवेकबुध्दीने गोमटी । निपजती कर्मे ॥७॥
काही कर्मे स्वत:करिता काही कुटुंबाचीया हिता । काही कर्मे गावा लोकांकरिता । सेवाधर्मरूप ॥८॥
आपल्या देहाचे करणे काम । हा कसला आला महाधर्म ? । हे आहे नित्यकर्म । सहजचि घडणारे ॥९॥
तैसेचि प्रसंगाविशेषे काही । करणे सणोत्सवादि सर्वहि । त्यातहि विशेष ऐसे नाही । नैमित्तिक कर्मी ॥१०॥

नित्यनैमित्तिक कर्मे सहज । ती करणे आवश्यक काज । न करिता विस्कटेल समाज । परि करणे नव्हे महाधर्म ॥११॥
तैसेचि पोटासाठी करणे काम । हे नव्हेत पुण्यपरिश्रम । उरल्या वेळी जे सेवाकर्म । त्यासि धर्म बोलती ॥१२॥
तेचि माणुसकीचे कर्म । जे दुसर्‍यांसाठी केले श्रम । एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले ॥१३॥
निषिध्द आणि सकाम कर्म । तैसेचि त्यागूनि अहं-मम । जगासाठी करावेत श्रम । ईश्वरार्पण बुध्दीने ॥१४॥
हेचि गीतेची शिकवणूक । वारंवार निश्चयात्मक । जेणे सर्वेश्वराचे पूजन सम्यक । तेचि कर्म गीतामान्य ॥१५॥
एरव्ही कामाविण कोणी नाही । हे मजसीहि कळे नि:संशयी । परि त्यासि काम आज न म्हणो काही । जे न उत्पादन वाढवी ॥१६॥
जनतारूप जनार्दनाची । ज्यात सेवा न होई साची । त्यास गीताप्रिय कर्माची । पदवी आम्ही न देऊ ॥१७॥
आज भरपूर उत्पादन । हेचि जनसेवेचे साधन । त्यासाठी झटेल जो जो जन । गीता कळली तयासि ॥१८॥
मंदिरी बैसोनि नाक दाबावे । त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे । दु:खितासि प्रेमे पाणी पाजावे । हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि ॥१९॥
एक हात खोदावी जमीन । हे पूजनाहूनि पूजन । परिणाम शेकडो व्याख्यानांहून । अधिक तयाचा ॥२०॥

श्रमिकास जेणे लाभेल अन्न । ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहून । एरव्ही गीतेचे नांव सांगून । भलते समर्थन करू नये ॥२१॥
एक नौजवान आळसे निजला । म्हणे हेहि पाहिजे शरीराला । म्हणोनि तो सारखाचि झोपला । फक्त उठला भोजनासि ॥२२॥
भोजन झाल्यावरि पुन्हा पडला । कैसा आवडेल घरच्या लोकाला ? कोणी थट्टामस्करी करू लागला । म्हणे हेहि कामचि आहे की ॥२३॥
एक सावकारीचे घाशी लिखाण । एक झगडयाचे चालवी प्रकरण । कोणी उपद्रव करी हाती धरोन । लोक हरप्रकारे ॥२४॥
असले काम जरी बंद पडले । तरी माझ्यामते काही न अडले । परि निर्वाहाचे उत्पादनचि शांतले । कैसे चालेल जीवन ? ॥२५॥
म्हणोनि सर्वानी काम करावे । ग्रामाचे धन वाढवावे । येथे गरीब-श्रीमंत न पाहावे । कामासाठी ॥२६॥
श्रीसंत गोरा राबे अंगे । देवहि माती तुडवू लागे । तेथे श्रीमंत आळसे वागे । हे महापाप ॥२७॥
यावरि बोले एक श्रोता । नाही गरीब मजुरासीच काम पाहता । बेकारांचा वाढतो जत्था । तेथे श्रीमंता काम कोठे ॥२८॥
श्रोतियाची ही विचारसरणी । आहे भ्रमाची पोसणी । सारा देश दीन-दरिद्री अज्ञानी । तेथे काम न दिसे तया ॥२९॥
पुन:पुन्हा जन्मा यावे । मातृभूमीसि सुखी करावे । ऐसे थोर म्हणती जीवेभावे । तेथे काम न दिसे तया ॥३०॥

देशात कामाचा उभा डोंगर । दारिद्रयदु:खाचा वाहतो पूर । अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार । त्यांचे दु:ख का न दिसे ? ॥३१॥
येथे विश्रांतीसि नाही वेळ । निरंतर कार्यकर्ते प्रबळ । पाहिजेत ठायींठायी सकळ । काम ऐसे देशापुढे ॥३२॥
परि ज्यांना होणे आहे साहेब । लोकांवरि कसावया रुबाब । न कष्टता इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार ॥३३॥
शिक्षणाचा द्यावा उपयोग । करोनि प्रचार आणि प्रयोग । तव ते स्वत:चि बनती रोग । समाजाच्या जीवनी ॥३४॥
एका बाजूने शिक्षित-श्रीमंतांचे । तैसेचि झाले मजूर-गरिबांचे । शिथिलता आळस दोघांचे । घरी थाटला दिसताहे ॥३५॥
जेव्हा पोटासि भूक लागे । तेव्हाचि घरोघरी काम मागे । नाहीतरि आळसा घेवोनि संगे । खुशाल पडे झोपडीमाजी ॥३६॥
सकाळी आठ वाजतांचे काम पूर्ण । दहा वाजता उठे घरातून । नाही कामावरि मन । चुथडा करी कामाचा ॥३७॥
म्हणे श्रीमंतासि काय झाले ? ते काय भिकेसि लागले ? काय होते काम न केले । तरी आमुचे नुकसान ? ॥३८॥
कामासाठी हात उचलेना । तोंडी सारखा वाचाळपणा । मजूरी न देता धिंगाणा । घालितसे लोकांपाशी ॥३९॥
ऐसे करणे आहे चुकीचे । पैसे कसून घ्यावेत कामाचे । परि कामचुकार होणे हे आमुचे । ब्रीद नव्हे सर्वथा ॥४०॥

मजूर सकाळी पाहिजे उठला । नित्यविधिकर्मातून निपटला । घरकाम करोनि निघाला । पाहिजे तत्काळ कामासि ॥४१॥
जेव्हा कामाची वाजेल घंटा । मजूर चालला चारी वाटा । उद्योगांचा चालला सपाटा । ऐसे व्हावे ॥४२॥
मजुरावरीच आहे उत्पादन । उत्पादनचि मुख्य ग्रामाचे धन । तयामाजी करणे कुचरपण । वेडेपणाचे ॥४३॥
मजूर इकडे कार्यनिष्ठा न जाणे । श्रीमंत तिकडे आळशी बने । म्हणोनि झाले कंटाळवाणे । जीवन आता देशाचे ॥४४॥
उत्पादनाची गति खुंटली । उपभोगाची भावना वाढली । काय करील भूमाता भली । मशागत नसता जमिनीची ? ॥४५॥
यासि सर्वचि असती जबाबदार । शक्ति संपत्ति विचार प्रचार । हे एकहि नाही ताळयावर । म्हणोनि ग्राम ओसाडले ॥४६॥
श्रीमंता आपुले न वाटे काम । गरीबा उत्पादनाचे नाही प्रेम । शिक्षिता हीन वाटतो परिश्रम । यानेच आली शिथिलता ॥४७॥
ऐसे न व्हावे आता पुढती । सर्वानी सुधारावयास पाहिजे मति । म्हणोनि आहे माझी विनंति । सकळाप्रति आग्रहाची ॥४८॥
जे जे ज्याचेनि काम बने । त्याने ते सेवा म्हणोनि साधणे । आपुलेहि बरे करणे । गावासि होणे भूषणावह ॥४९॥
जो जो पोटापाण्याचे काम न करी । उत्पादनासि ना सुधारी । त्यास विरोध करावा, विचारी । माणसाने गावाच्या ॥५०॥
श्रमनिष्ठेचा करावा प्रचार । सर्वास आपुलकी वाटे पुरेपूर । ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गावचे उत्पादन वाढवोनि ॥५१॥
गावचे वाढवाया उत्पन्न । गावी कराया नवनिर्माण । काय करावे ऐसा प्रश्न । वारंवार ऐकू येई ॥५२॥
त्यासि उपाय हाचि प्रथम । कामगार करिती जे श्रम । त्यांची शक्ति वाचे तिला काम । द्यावे सहायक दुसरेहि ॥५३॥
आणि इतरांचा वेळ कितीतरी । जाई व्यर्थचि गावी घरी । कामी लाविता तो निर्धारी । काया पालटेल गावाची ॥५४॥
कच्ची सामुग्री गावच्या भागी । ती पुरेपूर आणावी उपयोगी । शोध करोनि नाना प्रयोगी । माती करावी सोन्यासम ॥५५॥
अन्य देशीच्या तरुणासि वेड । नित्य नवे संशोधन प्रचंड । तैसी धुंद चढावी अखंड । गावच्या शिक्षित तरुणा ॥५६॥
गावचे कलावंत निपुण । त्यांना द्यावे उत्तेजन । नवनव्या वस्तु कराव्या निर्माण । उपयोगाच्या जीवनासि ॥५७॥
उद्योगे यंत्रेहि निर्मावी । परदेशा भीक न मागावी । आपणचि करोनि भोगावी । वैभवे सारी ॥५८॥
चरखाटकळी पासून उद्योग । अन्न धान्यादिकांचे प्रयोग । घरेदारे सर्व सुयोग । आपणचि निर्मावे ॥५९॥
प्रत्येक घरी जोडधंदा । सर्व स्त्रीपुरुष याचि छंदा । दूर करावया आपदा । जीवनाच्या लागावे ॥६०॥


कोणी पिशव्या कोणी नवारी । कोणी खादी विणतो घरी । कोणी चपला चामडियाच्या करी । मेल्या जनावरांच्या ॥६१॥
कोणी चटया कोणी आसने । कोणी खुर्च्या कोणी खेळणे । कोणी बादल्या पलंग गोणे । साबणहि घरी करी ॥६२॥
कोणी सुंदर मडके घडवी । कुंडया फुल-पात्रे बरवी । कोणी कवेलू मजबूत दावी । करोनिया सुंदरसे ॥६३॥
कोणी सुंदर विटा करी । कोणी फाडी फोडी बरी । सर्व हे आपापल्या परी । घरोघरी कार्यरत ॥६४॥
कोणी बैलांचा साज करी । कोणी रंग शोधी परोपरी । प्रत्येकजण काहीतरी । करितचि आहे ॥६५॥
ऐसे हे सर्व गाव । जोडधंद्यांनी भरीव । जराहि नाही उणीव । कोणेपरी कोठे ॥६६॥
ऐसी असावी कलाकुसरी । उद्योगधंदे घरोघरी । जराहि न दिसेल बेकारी । वाढली कोठे ॥६७॥
त्यासचि म्हणावी सुंदर कला । एरव्ही अवकळेची धर्मशाला । उसणे आणोनि सजविला । आपुला नवरदेव ॥६८॥
जो जो धंदा गावी नसला । प्रोत्साहन मिळावे त्या कार्याला । परि तो पाहिजे योग्य ठरला । गावाच्यासाठी ॥६९॥
गावचे उद्योग मागासले । त्यास शिक्षणाने पुन्हा उजळिले । ऐसे असावे सुधारले । गाव आमुचे ॥७०॥
नसतील त्या वस्तु निर्माव्या । येत नसता शिकोनि घ्याव्या । घरोघरी त्याच दिसाव्या । गावच्या वस्तु ॥७१॥
आपुल्या गावी जे जे होते । आपणचि वस्तु वापरावी ते । तेणे गावीचे धन गावीच राहते । शक्ति वाढते गावाची ॥७२॥
चांभार गावी उपाशी मरे । जोडयासाठी शिक्षित शहरी फिरे । केवढी गावाची कदर करणारे । बुध्दिमंत हे ! ॥७३॥
गावी विणकर फुटाने फाकती । यासि हवी मलमलची धोती । वा रे यांची देशभक्ति ! गाव मारिती शौकासाठी ॥७४॥
कोणी म्हणती आमुचा पैसा । आम्ही खर्चू हवा तैसा । गाव-द्रोही समजावा ऐसा । आपस्वार्थी मानव ॥७५॥
गावचे कलावान मागासले । म्हणोनि न पाहिजे उपाशी मारिले । बाह्य वस्तूंनी आपणचि सजले । भूषण नव्हे दूषण ते ॥७६॥
देशात एकटा ताजमहाल । त्यावरूनि न ठरे देशाचा हाल । घरोघरी लोक जरि कंगाल । तरि ते मोजमाप कशाचे ? ॥७७॥
गावी एक कुस्तीगीर महान । आणि बाकीचे लकडी पहेलवान । तरी ते गाव शरीरबलाने पूर्ण । म्हणता नये कधीहि ॥७८॥
मोजके थोरपुरुष होऊनि जाती । इतरांची पातळी नयेचि वरती । तव ती समाजाची प्रगति । कैसी म्हणावी जाणत्याने ? ॥७९॥
यासाठी प्रत्येक घटक सज्ञान । पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न । तरीच ते गाव आदर्शाचे भूषण । मिरवू शके ॥८०॥
म्हणोनि प्रत्येकाने आपुल्या गावी । ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी । त्यात सुधारणाहि घडवावी । उन्नति व्हाया कलावंतांची ॥८१॥
ऐसे सर्वचि उद्योगधंदे । चालवावेत गावीच आनंदे । नांदावेत सकळ लोक स्वच्छदे । सुखसमाधाने ॥८२॥
गावी असावे वस्तुप्रदर्शन । आपुल्याच गावी झाले निर्माण । बी बियाणे, शेती-उद्योग-सामान । तयामाजी ठेवावे ॥८३॥
खेळणी लेणी जीवनोद्यमे । लाकडी लोहारी बेलदारी कामे । कुंभारी, विणकरी, उत्तम चर्मे । असावी तेथे ॥८४॥
असावे सुंदर एक घर । त्यामाजी वस्तू विविध सुंदर । आम्हीच निर्मिलेल्यांचा भर । असावा तेथे ॥८५॥
गावी जे मालधन निर्माण होते । बघावया लोकांनी यावे तेथे । योग्य किंमती देवोनि ते ते । घ्यावे सामान तयांनी ॥८६॥
गावी असावी उद्योग-समिति । जी सतत करील उद्योग-उन्नति । गावाचे आर्थिक जीवन हाती । घेवोनि लावील सोय जी ॥८७॥
गावचिया धनिकांकडोनि । संपत्तीचा वाटा मिळवोनि । सर्वाच्या हितासाठी रात्रंदिनी । उपयोग करावा तयाचा ॥८८॥
काही असती जमीनदार । तेचि गावचे अर्थभांडार । त्यांना सर्व कारभार । सोपवाया लावावा मजूरावरि ॥८९॥
किंवा धनिक जरी ना वळे । शेतकरी-मजुरांच्याचि बळे । थेंबे थेंबे साचवावे तळे । त्यांच्या अल्प ठेवीचे ॥९०॥

त्यातूनि निर्माण करावा वस्तुसंग्रह । सर्वाना उपयोगी भांडारगृह । सर्वा मिळोनि चालवावे नि:संदेह । दुकान सर्व वस्तूंचे ॥९१॥
त्यात असावी सर्वाची मालकी । हुशार किसानांची ठेवावी चालकी । सर्वाच्या अनुमतीने व्यापार-एकी । करावी गावी ॥९२॥
एक असावे धान्यभांडार । चालावया गावचे व्यवहार । त्यात असावे सर्व जनतेचे शेअर । सोयीसारखे ॥९३॥
प्रसंगी त्यातूनचि धान्य न्यावे । सर्वामिळोनि कर ठरवावे । प्रसंगी सर्वानी वाटून घ्यावे । उत्तम रीती ॥९४॥ .
त्यातूनचि करावी गावची सेवा । उणीव पडेल ज्या कष्टी जीवा । अथवा ग्रामसुधारणेस लावावा । वाढवा त्याचा ॥९५॥
गावी चालते सवाई-दिढी । त्यास याने बसेल अढी । ग्रामनिधीची उघडता पेढी । थंडावेल व्यापारी-सावकारी ॥९६॥
गावी आवश्यक तेलघाणी । शुध्द तेलादिकांची निशाणी । गावची कामे सर्व मिळोनि । गावीच करावी उपयुक्तशी ॥९७॥
उद्योगहीनांना उद्योग द्यावे । कामे देवोनि सुखी करावे । आपणासमान पाहिजे बरवे । केले त्यासि सुखवस्तु ॥९८॥
काम ज्याने ज्याने करावे । त्याने हक्काने पोटभरि खावे । लागेल तेवढे मागावे । हे तो आहे प्रामाणिक ॥९९॥
जयास न मिळे कामधाम । त्याने समितीस सुचवावे नाम । ग्रामसेवाधिकारी उद्यम । देईल त्यासि ॥१००॥
काम देणे कर्तव्यचि त्याचे । जमा असतील फंड गावाचे । त्यातूनि पुरवावे मोल कामाचे । उपयोगी ऐशा ॥१०१॥
मजुरा मजुरी पूर्ण द्यावी । जेणे मुलेबाळे सुखे जगवी । तैसीच उत्पन्ने वाढवोनि घ्यावी । गावामाजी ॥१०२॥
याने सर्वास मिळेल सुख मिटेल जीवनाची भूक । ग्रामराज्य होईल सुरेख । आर्थिकतेने समृध्द ॥१०३॥
यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार । कलावंत शेतकरी कामगार । सर्वानी मिळोनि ग्रामोध्दार । करावा ग्रामोद्योगांनी ॥१०४॥
शहराकडे चालला प्रवाह । तो थांबवाया नि:संदेह । सर्वाचा गावीच होईल निर्वाह । ऐसी योजना करावी ॥१०५॥
खेडेचि शहराचे जनक । शहर भोवते खेडे उत्पादक । शहराकडे न जाता लोक । धावावे उलट खेडयाकडे ॥१०६॥
ऐसी करावी ग्रामसेवा । हेचि कर्म आवडे देवा । संशय काही मनी न धरावा । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । ग्रामोद्योगांचा कथिला तत्त्वार्थ । अठरावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

ग्रामगीता अध्याय अठरावा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading