आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा – 27 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा – 27 Gram Gita Chapter 27 ओवी संख्या :- १०० | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 27
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २७
Gram Gita chapter twenty-seventh beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 27
सामुदायिक प्रार्थना
सामुदायिक प्रार्थना
मूर्तिपूजा नामजप । यांची मूळतत्त्वे उज्जवलरूप । परंतु त्यांचा विपर्यास खूप । जाहला लोकी ॥१॥
देवीदेव दिसती जिकडे तिकडे । सांदी-बिदीचे गोटे खडे । कोणी न बघती तयांकडे । आवडीने ॥२॥
नेमकी प्रभावशाली मूर्ति । जी बघताचि देई स्फूर्ति । होईल तात्त्विकतेची पूर्ति । ऐसी दिसे क्वचितचि ॥३॥
तेथेहि भाविकतेचा अतिरेक । जेणे बुध्दिमान होती नास्तिक । म्हणती हा गोंधळ असे घातक । भक्तीच्या नांवे ॥४॥
मूर्ति जयाचे स्मारक । त्याच्या गुणाकर्माची नाही भूक । मूर्तीच देव ठरवोनि लोक । करिती अति वेडेचार ॥५॥
कोठे काकड आरती शेजारती । चाले पंचपदी पूजा पोथी । नाही शिस्त गांभीर्य शांति । सात्विक वृत्ति स्फुरेचि ना ॥६॥
एक जाती एक येती । मधेच वाकडे उभे राहती । फुले अक्षता कशाहि फेकती । मंत्रपुष्पांजलीच्या ॥७॥
नगारा जातो एकीकडे । टाळ-घंटयांचा गोंधळ उडे । टाळया कसल्या, गारपीट पडे । ऐसेचि वाटे ॥८॥
असल्या बाजाराने काही । उपासनातत्त्व साधत नाही । तेथे शिस्त शांति सात्विकता येई । तरीच लाभ सर्वासि ॥९॥
याचसाठी सामुदायिक प्रार्थना । हा मार्ग दाविला जना । हीच आजची उपासना । सर्वाचिया हिताची ॥१०॥
श्रोती विचारिला होता प्रश्न । पंथ भेद मिटाया उपाय कोण ? कैसे राहील ग्रामजीवन । एकजुटीचे ? ॥११॥
नाना पंथ असती गावी । भिन्न देव-पूजक वैष्णव-गोसावी । नाना जाती-जमाती एकत्वी । कैशापरी वागतील ? ॥१२॥
त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा । जेथे धर्म-पंथ-संत-देव नाना । एकासनी विराजती ॥१३॥
हा झरा राहिला नित्य शुध्द । तरि गाव होईल सदा सुबुध्द । आणि सामुदायिकतेने समृध्द । सर्व प्रकारे ॥१४॥
यावरि श्रोती प्रश्न केला । कैसे करावे सामुदायिक प्रार्थनेला ? जेणे सामुदायिकता गावाला । प्राप्त होय ॥१५॥
सदभावे गावातील जन । करोनिया एक मन । कैसे करितील कार्य पूर्ण । सामुदायिक प्रार्थनेचे ? ॥१६॥
प्रार्थनी कोणता देव योजावा । जो सर्वासीच मान्य बरवा ? गावाचा जेणे समन्वय व्हावा । कैसा ठेवावा पाठ तेथे ? ॥१७॥
मित्रा ! ऐकिले तुझे प्रश्न । तू बोललासि विचार करून । वेगळेपणाची आहे अडचण । गावोगावी सर्वाच्या ॥१८॥
वस्तुत: छोटी देव-देवळे । वगळोनि सर्वानी एके वेळे । एकाच देवुळी जमावे भावबळे । प्रशांत ऐशा ॥१९॥
विसरोनि आपुला वेगळेपणा । करावी तेथे उपासना । परि हे नये बहुतांच्या मना । म्हणती आमुचे तेचि थोर ॥२०॥
अनेक मंदिरे अनेक देवता । विचारे लोका न पटे एकता । त्यातूनि एक निवडाल कोणता । प्रश्नचि पडे ॥२१॥
हाचि प्रश्न संतांपुढती । पूर्वीहि होता जव पंथ लढती । म्हणोनीच विठ्ठल ब्रह्ममूर्ति । ठेविला त्यांनी सर्वापुढे ॥२२॥
सर्व पंथांच्या संतसज्जनी । केली एकी तये स्थानी । ज्ञानप्रेमज्योति पेटविली भुवनी । महाराष्ट्राच्या ॥२३॥
बंगाली तामस भक्तिप्रथा । सुधाराया उजळिली कृष्णकथा । चैतन्यप्रभूने भाविका-पंडिता । विविध पंथा एक केले ॥२४॥
धकाधकीचा काळ पाहिला । संती उपास्यात बदल केला । तुलसीदासे रामदासे दाविला । राम कोदंडधारी ॥२५॥
यापरी देश-कालप्रसंगे । संघटनकेंद्र निवडावे लागे । आजच्या काळी जुळवाया धागे । कोणते रूप निवडावे ? ॥२६॥
याचा मागे मी विचार केला । अधिकाधिक अनुभव घेतला । शेवटी निश्चयाने निवडला । गुरुदेव माझा ॥२७॥
मी जरी ” गुरुदेव माझा ” म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला । तो सर्व प्राणिमात्राचा झाला । कल्याणकारी ॥२८॥
त्यास नाही पंथपक्ष । सर्वदेशी तो सर्वसाक्ष । सर्व देवादिकाचा अध्यक्ष । सदगुरुराजा ॥२९॥
त्यासि सर्वचि मानव सखे । देश-विदेशीचे एकसारखे । नाही धर्म भिन्न त्यांचे निके । एकचि सत्य सर्वामाजी ॥३०॥
जैसा आत्मा नाही भिन्न झाला । तैसाचि गुरुदेव संचला । कोणी आकाशाचा तुकडा पाडिला । ऐसे नाही ॥३१॥
सत्य सर्वाचेचि सत्य असते । असत्य ते असत्यचि होते । तैसेचि गुरुदेव सर्वाचे ते । एकचि राहती सर्वस्वी ॥३२॥
वैदिक असो वा त्याहूनि इतर । सर्वचि पंथी गुरुदेवाचा आदर । इस्लाम, ख्रिस्तादि धर्मीहि थोर । गुरुदेव-भक्ति ॥३३॥
पंथ-प्रचारक गुरु वेगळे । त्यात असते द्वैताचे काळे । स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे । ते पावती ज्ञानयोगे ॥३४॥
गुरु हाडामासांचा नोहे । गुरु नव्हे जाति-संप्रदाय । गुरु शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे । अनुभवियाचे ॥३५॥
हे ज्ञान ज्यासि लाभले । ज्याचे मन विश्वाकार झाले । पंथ-पक्ष-धर्म संपले । ज्याच्या ठायी सर्वचि ॥३६॥
तो सर्वाचा झाला सखा । मानवमात्राचा पाठीराखा । कोणत्याहि भाषेने पारखा । तरी पावे तयासि ॥३७॥
करी सदभावना उत्पन्न । दीनदु:खितांचे पालन । मलीन मार्गाचे करी खंडण । कायावाचामनाने ॥३८॥
म्हणोनीच थोरांनी कथिले । गुरुचि ब्रह्मा विष्णु झाले । महेश्वरहि गुरुचि बोलिले । याच सामर्थ्ये ॥३९॥
गुरुचि साक्षात ब्रह्म कथिला । सर्वास व्यापोनि गुरुचि उरला । ऐसा देव म्हणोनि प्रार्थिला । गुरुदेव माझा ॥४०॥
महापुरुष वेगळाले । परि गुरुत्वी मिळोनि गुरुचि झाले । व्यक्तिपण धर्मपणहि मुराले । गुरु-स्वरुपी ॥४१॥
त्याचे पूजन गंधाने नोहे । त्याचे मंदिर विशाल आहे । विशालतेला मर्यादा राहे । परि गुरु त्याहुनि अमर्याद ॥४२॥
भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण । सर्व पृथ्वी जयाचे आसन । चंद्रसूर्य नंदादीप जाण । गुरुदेवाचे ॥४३॥
त्यातचि धर्म-पंथ सामावती । तोचि वेष्टिला सर्वाभवती । त्याचेवाचूनि नाही रिती । जागा कोणी ॥४४॥
त्याचे ज्ञान झालिया जीवा । कोठे द्वेष-कलह-हेवा ? सुखशांतीचा लाभे विसावा । सर्वाठायी ॥४५॥
म्हणोनि हेचि व्हावया ज्ञान । विशाल मने रचिले साधन । सामुदायिक प्रार्थनेचे स्थान । सामुदायिकपणास्तव ॥४६॥
तेथे सामुदायिक देव कल्पावा । पुढे कार्यातचि अनुभवीत जावा । मग विश्वाकार पहावा । गुरुदेव माझा ॥४७॥
हे झाले गुरुदेवाचे वर्णन । आता ऐका प्रार्थना-साधन । गाव व्हावया उन्नत पूर्ण । तैसेचि स्थान शोधावे ॥४८॥
विशाल मंदिर या गुरुदेवचौक । जेथे बसतील जन सकळीक । महिला, पुरुष, मुले भाविक । सदभावाने सायंकाळी ॥४९॥
प्रथम अधिकारी सेवकाने । घेवोनि हातामाजी झाडणे । त्वरित करावे मैदान निर्दळवाणे । प्रार्थनेसाठी ॥५०॥
येता प्रत्येक गुरुवार । जाऊनि फिरावे घरोघर । बोलवावी प्रार्थनास्थानी सत्वर । जनता सारी ॥५१॥ .
आईबाई सकळ सज्जन । मुलेबाळे वृध्द-तरुण । देवोनिया निमंत्रण । बोलवावे प्रार्थनेसि ॥५२॥
गावी सर्वासि निरोप द्यावा । परस्परे समाज सारा जुळवा । येतांना घोंगडी गोणपाट आणावा । आपापला म्हणोनि ॥५३॥
सकळांनी करावी बिछायत । सर्वाना रांगेत बसवावे शांत । सदभावना वाढे सकळांच्या मनात । प्रार्थनेची ॥५४॥
सात्विक असावे वातावरण । अतिशांत ऐसे गंभीरपण । सर्वानी करावे बंद संभाषण । तया स्थानी ॥५५॥
आधी पुढे मांडावे अधिष्ठान । त्यावरि आच्छादावे सुंदर आसन । आपुल्याच गावी केलेले पूर्ण । कलाकुसरीने खादीचे ॥५६॥
वरि ठेवावा तकिया साजिरा । जैसा कोणी बसतोच आसनी बरा । दिसावा ऐसा मोहक पसारा । सात्विकतेचा ॥५७॥
जवळचि बसावे सूचक, गायक । तिसरे भाषण देणारे भाविक । दुसर्या बाजूने पुजारी, पाठक । नामधून म्हणावया ॥५८॥
ऐसा प्रार्थनेचा संच झाला । चहुबाजूंनी सेवकगण बसला । पाठीमागे संरक्षक दिसला । उभा तेथे ॥५९॥
तयाचे काम शांतता राखणे । भोवताली गलबला थांबवणे । सर्वाना शिस्तीमाजी बसवणे । हळुवारपणाने ॥६०॥
जे कोणी येतील मागाहून । त्यांना बसवावे क्रमाने पूर्ण । मग करावे घंटीवादन । दोनचि ठोके ॥६१॥
उभा राही अधिष्ठानापुढे पुजारी । लावी शांतिने धूपदीपिका बरी । मग सूचक उभा राहतो सामोरी । सूचना द्याया प्रार्थनेची ॥६२॥
सर्वामिळोनि पाठ करवी । एकस्वरे शांतता भरवी । ऐसी प्रार्थना लावील चवी । अंत:करण मोहावया ॥६३॥
सहज लागेल तिकडे ध्यान । ऐसे चालावे प्रार्थनी गायन । पुढे होईल नामस्मरण । गुरुदेवाचे ॥६४॥
ज्यात असेल कुणीहि नाम । निवारोनि भेदभ्रम । सर्व धर्मी भाव सम । राखावया सर्वाचा ॥६५॥
हे संपता भाषणासाठी । देईल सूचक सूचना ओठी । मग भाषणाधिकारी शेवटी । देईल भाषण सदभावे ॥६६॥
” आपण सर्व एकचि आहो । मग भिन्नपण कासया पाहो ? सर्वाशी सहकार्य करा हो ! कुटुंबापरी ॥६७॥
मानव विश्वकुटुंबाचा घटक । ऐसे समजोनि वर्तावे सम्यक । शक्ति द्यावया प्रार्थावी भाक । शक्तिवंतापुढे ॥६८॥
सर्व संत एकचि असती । सर्व देव एकचि निश्चिती । सर्वाचे संदेश ऐकता पावती । एकचि तत्त्व सर्वहि ॥६९॥
म्हणोनि सर्वानी सहकार्य करावे । जैसे ज्याकडोनि बनेल बरवे । संसारा स्वर्गासमान बनवावे । आपुल्यापरी ॥७०॥
हेचि सांगावे प्रार्थनेवरि । यातचि आहे सेवा ईश्वरी । याहूनि भिन्न नाही कुसरी । परमार्थाची ” ॥७१॥
हे भाषण झालिया पूर्ण । मग शान्तिपाठ सर्वानी करोन । करावे एकनिष्ठेने नमन । एकाच पध्दतीने ॥७२॥
सूचकाने सूचना द्यावी । सर्व मंडळी उभी करावी । जयजयघोषे दूमदुमवावी । ऊर्वि अवघी ॥७३॥
गुरुदेवाचा जयजयकार । त्यात ये सर्वदेवनमस्कार । ऐसे प्रार्थनेचे तत्त्व सुंदर । बोलिलो तुम्हा ॥७४॥
चौकी प्रार्थना संपल्यावरि । आपापली घोंगडी पासोडी बरी । उचलूनि न्यावी आपुल्या घरी । सेवा पुरी करोनिया ॥७५॥
येथे प्रार्थनापाठ नाही बोलिला । तो विषय अन्य ग्रंथी आला । म्हणोनि येथे नाही विवरिला । पहावा ” सक्रियपाठी ” ॥७६॥
मित्रहो ! ऐका माझे वचन । जरि व्हावे वाटे गावाचे कल्याण । तरि सामुदायिक प्रार्थना-साधन । सोडू नका कधीहि ॥७७॥
एवढे अनुभवे सांगोनि ठेवितो । प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो । यानेच स्वर्ग मोक्षहि पावतो । समाज अपुला ॥७८॥
आमचा देव समाजी वसतो । समाजाकरिता सर्व करतो । सर्वास व्यापूनि राहतो । प्रार्थनेच्या आसनी ॥७९॥
तो भेटतो जनकार्यानी । आम्ही केली प्रार्थना म्हणोनि । भरली भावना आत्मा ओतोनि । प्रार्थनी या ॥८०॥
आपण होता प्रश्न पुसला । म्हणोनि ऐसा विस्तार केला । प्रार्थनी तल्लीन होताचि देव कळला । विशाल स्वरूपी ॥८१॥
त्या मूलतत्त्वाचा जो अनुभव । ज्ञानगम्य विश्वात्मक देव । तोचि मानिला गुरुदेव । प्रार्थनी आम्ही ॥८२॥
त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरि । मूर्तीच हवी असेल जरि । कल्पावी आपापल्या इच्छेपरी । कोणत्याहि देवाची ॥८३॥
देव गुरुदेवात सामावले । भक्त तेवढे प्रार्थनी एक झाले । मानवतेचे मंदिर उघडले । विश्वामाजी या रूपे ॥८४॥
एकाची प्रार्थना अनेक मिळाया । अनेकांची प्रार्थना अनंत कळाया । अनंत तत्त्वी एकत्व पावावया । प्रार्थना आहे ॥८५॥
हे समजोनीच हा मार्ग धरिला । आदर द्याया भिन्नधर्मपंथांला । पूज्य मानावया सर्व संतांला । प्रार्थनेमाजी ॥८६॥
यासाठी व्यापक प्रार्थना मांडली । उपासकांची वेली गुंफली । कळावया सर्व धर्माची खोली । मूळरूपे ॥८७॥
वेदउपनिषदांची प्रार्थना । ” सुख हो सर्वचि प्राणीजना ” । सर्वाची उन्नति हीच धारणा । प्रार्थनेमाजी ऋषींची ॥८८॥
येशूख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वासाठी शांति मागितली । सहनशक्तीची देवता पावली । तयालागी ॥८९॥
महंमदाने केली प्रार्थना । विखुरला इस्लाम कराया शहाणा । संघटित केले त्याने स्वजना । तया काळी ॥९०॥
पावित्र्य शिकविले झरतुष्ट्राने । संयम शिकविला महावीराने । अहिंसक संघ वाढविला बुध्दाने । प्रार्थनेद्वारे ॥९१॥
संतांचे नामसंकीर्तन । ते सामुदायिक प्रार्थनेचेचि रूप जाण । सर्व देव-स्मरणे करोनि संघटन । दिले ज्ञान सर्व जना ॥९२॥
कलियुगी भक्ति-महिमान । भजन आणि नामसंकीर्तन । यज्ञांत श्रेष्ठ नामजपयज्ञ । प्रार्थनेते आले ते सारे ॥९३॥
मूर्तिउपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण । प्रार्थनी सर्वचि साधे साधन । सर्व जनांसी ॥९४॥
शिस्त, शांति, गांभीर्यादि गण । उठण्या-बसण्या-बोलण्याचे ज्ञान । लाभे मानव्याचे शिक्षण । प्रार्थनेमाजी ॥९५॥
प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा । भेदकल्पना जाती रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजी ॥९६॥
” सर्वचि आपण बंधुजन ” हा भाव वाढ घे मनोमन । गावाची स्वर्गीयता असे अवलंबून । याचवरि ॥९७॥
सकळांस कळाया ही संस्कृति । उपदेश द्यावा प्रार्थनेअंती । ही नित्य ठेवावी चालीरीति । गावी आपुल्या ॥९८॥
ही प्रार्थना गावी राही जागती । तरि जिवंत राहील गावसंस्कृति । सामुदायिकतेची दीपज्योति । प्रकाशेल सर्वकाळ ॥९९॥
विश्वी होऊ शकेल शांतता । तेथे गावाची कोण कथा ? सामुदायिक प्रार्थनाच करील एकता । नित्यासाठी, तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । कथिली प्रार्थना ग्रामोध्दारार्थ । सत्ताविसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥
ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















