आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय तेहेतिसावा- 33 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय तेहेतिसावा – 33 Gram Gita Chapter 33 ओवी संख्या :- १०७ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 33
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय तेहेतिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३३
Gram Gita Chapter thirty-three Commencement
—-🕉ग्रामगीता अध्याय 33 अवतार कार्य
अवतार कार्य
श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगे मिळे संतपण । ऐसे झाले निरूपण । हे तो जीवा पटेना ॥१॥
संत देवाचे अवतार । आम्ही गावचे गवार । कैसे त्यांच्या बरोबर । व्हावे आम्ही ? अशक्य हे ! ॥२॥
याचे ऐका समाधान । जग झाले ईश्वरापासोन । नर तोचि नारायण । दाविली खूण संतांनी ॥३॥
जन्मासि आला तोचि अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र । त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती सत्कर्मे ॥४॥
कोणी आपुले पोटचि भरी । कोणी कुटुंबाचे पोषण करी । कोणी गावाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥
कोणी होती प्रांतव्यापी । प्रांताकरिता कष्टी-तपी । जनाकरिता वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥
हे अवतार साधारण । यापुढे विशेष अवताराचे लक्षण । जो मिरवी देशाचे भूषण । शरीरी स्वये ॥७॥
” माझा देशचि माझे घर । देश दु:खी जणु माझेचि शरीर । त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया ” ॥८॥
ऐसे ज्याने मनी धरिले । किंबहुना कार्ये अनुभवा आले । अनेक आपत्तींनी उजळले । सत्कार्य ज्याचे ॥९॥
त्यासि म्हणावा अवतार । जो करी सज्जन-चिंता निरंतर । दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥
जगाचे उद्दिष्ट आहे सत्य । तिकडे जग करावे प्रवृत्त । ऐसे ज्याचे ज्याचे कृत्य । तोचि अवतार निश्चये ॥११॥
षडगुण ऐश्वर्याच्या प्रमाणात । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यात । ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न ॥१२॥
या अवताराचे पंथ दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन । एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा भावभक्तीने वळवी ॥१३॥
धर्मनीति सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली । सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती देवावतार ॥१४॥
देव-अवतार नित्य नसती । ते महाप्रसंगी पुढे येती । संत-अवतार नेहमी चालती । लोकी सुनीति वाढवाया ॥१५॥
काही अवतारांची महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा । प्रकट करण्या मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥
ज्यांचा जैसा अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार । मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवे पडताति ॥१७॥
कोणी भक्ति शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी । कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता लोकी ॥१८॥
अखेर मानवांची उन्नति करणे । तया राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणे । हेचि संतांचे असते लेणे । सर्वतोपरी ॥१९॥
वाउगा संकल्पचि नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला । त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार म्हणो आम्ही ॥२०॥
कोणी कुटुंबासि त्रस्त करी । कोणी गावाचे होती वैरी । कोणी देशात उपद्रव करी । पाखांडपंथी ॥२१॥
जो देशद्रोही धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगता न समजला । सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगे ॥२२॥
काही केल्या न सुधारे । शिरले क्रूरवृत्तीचे वारे । सज्जनांचे मनहि थरारे । ज्याच्या धाके ॥२३॥
त्याची झाली परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा । पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपाये ॥२४॥
ते दुर्जन राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार । त्यांना दंड द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥
ऐसे हे नेहमीच चालते । जैसे जन्ममरण-रहाट फिरते । तैसेचि संत-देव येताति ते । भूमीवरि ॥२६॥
राक्षसी आणि देववृत्ति । रूपांतरे खेळते जगती । संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥
येथे श्रोत्यांनी प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला । तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥
काय ठावे नव्हते त्याचे गुण ? का दिले शक्तीचे वरदान ? आम्हा न कळे हे पुराण । कैसे आहे सांगा की ॥२९॥
याचे ऐकावे उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार । त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि ॥३०॥
त्याचिया गुणकर्मे मिळाले वरदान । ते सहन न झाले मागाहून । त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने ॥३१॥
प्रथम हाती आली सत्ता । मग भुलला तो भगवंता । लागला उपभोगाच्या पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥
त्याची राखती संत मर्जी । तव तो अधिकचि चढे समाजी । जनतेमनी वाढताहि नाराजी । पर्वा न करी अहंकारे ॥३३॥
भरावया पापांचा रांजण । त्यासि देती प्रोत्साहन । जेणे त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया उधळीपरी ॥३४॥
कितीहि साधुसंत समजाविती । परि न वळे त्याची मति । म्हणोनि देवावताराहाती । कार्य आले तयाचे ॥३५॥
देव-अवतार समजाविती । नाना योजना करूनि पाहती । शेवटी शस्त्र धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥
त्याच्या मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून । म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि निर्वाणीचा ॥३७॥
ऐसे ज्याने ज्याने केले । दु:ख जगाचे निवारिले । ते सर्व अवतारचि ठरले । पुराणे झाली तयांची ॥३८॥
तैसे कोणी करी अजून । त्यांची गुणकर्मे पाहून । पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तया ॥३९॥
तुलसीदास आधी आसक्त । ते वैराग्ये झाले महाभक्त । रामकथा गावोनि तारिले जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥
कोणी भिन्न देवा अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति । पुढे पुढे कळेल तयांप्रति । पायर्या अवतार-कार्याच्या ॥४१॥
कोणा म्हसोबा खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचे करी पूजन । कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥
कोणी दश अवतार मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती । कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस ॥४३॥
कोणी बुध्द-अवतार पूजती । कोणी दत-अवतारा भजती । कोणी येशु ईशपुत्रावतार समजती । जगती झाला ॥४४॥
कोणी म्हणे महंमद प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार । लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगो ? ॥४५॥
याचे एकचि कारण । जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण । तोचि अवतार मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥
कोणी ब्राह्मा-विष्णु-हर । यासि मानिती खरे अवतार । कोणी म्हणती देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥
देव आहे आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्ती । त्यासि जाणणे यातचि उन्नति । मानवाची ॥४८॥
ऐसी भिन्न लोकांची भिन्न मते । सत्य सर्वातचि उणेपुरे ते । परि संगति कैसी लावावी याते । विसरोनि गेले ॥४९॥
जे जे पुरुष थोर झाले । त्यासि अवतारचि संबोधिले । ज्यांचे ज्यांना चारित्र्य पटले । त्यांनी मानले त्यालागी ॥५०॥
जुने ते सोने विशेष ठरले । येथे कोणाचेचि नाही चुकले । परि ज्यांनी सत्य अनुभवले । तेचि पावले देव-पदा ॥५१॥
कोणी म्हणती देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व । हे म्हणणे आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥
गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचे महत्त्व काय देवाअंतरी ? हे पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥
देवास वैकुंठ गर्भ सारिखे । येणे-जाणे स्वाभाविके । सुखदु:खे एकाचि कौतुके । राहती तयापुढे ॥५४॥
योनीद्वारे जरी प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला । म्हणोनीच तो अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥
एरव्ही जन्ममरण सकला सारिखे । सहनशक्ति अधिकारभेद राखे । जैसे जयाचे स्थानमान देखे । तैसे निके नाम तया ॥५६॥
सर्व अवतार मानवीच असती । परि अधिकाराऐसे कार्य करिती । त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा ॥५७॥
अनेक जन्मांची संस्कार-संगति । घेवोनि येताति सांगाती । उध्दराया जड जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥
परि मानवीच कार्य करणे । मानवी मार्गानेचि येणे-जाणे । मानवांच्या भूषणापरी मिरविणे । अवताराचे ॥५९॥
मानवे सर्व प्राणिमात्रा सुखवावे । सर्व कार्य सुरळीत चालवावे । एक असोनि अनंत व्हावे । उल्हास हाचि अंतरी ॥६०॥
हे समजोनि जो वर्तला । तोचि अवतार शेवटी ठरला । ज्याने पृथ्वीचा संबंध जोडला । एकसूत्री प्रयत्ने ॥६१॥
ज्यांनी सर्व विश्व सूत्रात गोविले । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले । तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चये ॥६२॥
म्हणोनि अवतार हा उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद । विश्वात्मभावे स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही मानतो ॥६३॥
तोचि सर्वासि एक करी । एक करोनि अनेकत्वी वावरी । त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची ॥६४॥
एवढी विशाल ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा । विश्वाचिया मतभेदांना । मिटवू शके जो ॥६५॥
तोचि शेवटचा अवतार । महामानव विकासकेंद्र । आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥
निश्चय व्हावा श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा । मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥
देवताची करावी उपासना । उपासकासीच ये अवतारपणा । ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥
यात एकचि तारतम्य पहावे । मानवा कोणाचेनि सुख पावे । कोण समाजकार्य करी बरवे । जनमानस रंगवोनि ॥६९॥
तोचि समजावा महाभला । जो जनहितार्थी लागला । दैवी शक्तीचा सागर भरला । अंगी ज्याच्या ॥७०॥
अवतारासि सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे । बोलिजे तैसेचि कार्य कीजे । अवतार तो या जनी ॥७१॥
ऐशा शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती । देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजी ॥७२॥
शांति-अवतार क्रांति-अवतार । या दोघांचे कार्य भिन्न सर्वत्र । एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥
दोघांचीहि असे जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरी । आपणहि व्हावे अवतारी । त्यांचिया ऐसे निर्धारे ॥७४॥
नाहीतरि अरत्र ना परत्र । हेहि म्हणता ये अवतार-वैचित्र्य । परंतु अवतार तो अवतारकार्य । करावयासि ॥७५॥
मानवधर्मासि उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण । करणे हेचि अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥
ज्यांनी जगाची सेवा केली । त्यासीच अवतार पदवी लाभली । त्यावाचूनि अवतार बोली । ही तो आपुल्या भावनेची ॥७७॥
सेवेएवढे महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि । ह्या सर्व साधनी सफलता ही । सेवेनेचि होतसे ॥७८॥
देव-देवता जगी आली । जपतपे करू लागली । परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोवरि ॥७९॥
जेव्हा सेवाकार्य प्रकट केले । अनंत जीव संतुष्ट झाले । तेव्हाचि अवतार तया मानिले । भूलोकी या ॥८०॥
रामचंद्रे राज्य त्यागिले । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखी ॥८१॥
श्रीकृष्णे कंस मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला । सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो ॥८२॥
ऐसे सेवाकार्य केले ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे । त्या कार्यलीला आठवती जीवेप्राणे । सर्वतोपरी ॥८३॥
आठवती तेहि अवतार होती । तैसी करिता सेवाकृति । परि कोरडी सहानुभूति । ही तो नव्हे उध्दारक ॥८४॥
ज्यांनी सेवाकार्यासि जीवन दिले । स्वानंदी बुडोनि जगा तारिले । तेचि संत आणि अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥
साधुसंते सेवा केली । अनंत हृदये संतोषविली । व्यवहार-उपासनेने दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥
साधुसंते सेवा केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली । तैसी सेवा पाहिजे घडली । आपणासीहि ॥८७॥
एक संत जन्मास आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला । परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥
याचे कारण आम्ही लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक । नमस्कार करायाचे कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥
लोक करिती त्यांचा उत्सव । गाती मनोभावे गौरव । परन्तु तैसा सेवाभाव । अंगी न आणिती आपुल्या ॥९०॥
देव घेतील अवतार । म्हणोनि वाट पाहती उतराया भार । हा दुबळेपणाचा विचार । शिरला थोर या लोकी ॥९१॥
अरे ! हे सर्व आता विसरावे । संती सांगितले तेचि करावे । मानवाने मानवा सुधारावे । याहूनि पुण्य कोणते ? ॥९२॥
हे पवित्र अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय । का न करावे टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥
कोणी रोगराईने मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरे ? परि सेवा करिता प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरे कीर्ति गाती ॥९४॥
म्हणोनि बोललो सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा । घेवोनि अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥
नका अज्ञानामाजी दडू । नका बायकापोरांसाठी रडू । नका स्वार्थासाठी अडू । निघा मानवसेवा साधाया ॥९६॥
जो आपुल्या स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला । तोचि अवतारकार्यी लागला । मानतो आम्ही ॥९७॥
यासाठी करा आपुली उन्नति । सेवा देवोनि गावाप्रति । गावापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावे ॥९८॥
आपली समज वाढवावी । पैस तेवढी कामे करावी । म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥
सेवेतचि आहे देवभक्ति । कार्य करण्यातचि राष्ट्रशक्ति । यानेच मिळे शेवटी मुक्ति । अवतारदीप्ति अंगी येई ॥१००॥
कोणालाहि न वाटावे अवघड । कैसे अवतारकार्य प्रचंड । पावता नये ऐसे उदंड । नाहीच काही ग्रामजनहो ! ॥१०१॥
तैसे भयचि वगळावे । म्हणोनि बोलिलो साध्या भावे । तुकडया म्हणे समजोनि घ्यावे । तारतम्याने मर्म याचे ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥
ग्रामगीता अध्याय तेहेतिसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















