ग्रामगीता अध्याय सतरावा – 17 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय सतरावा – १७
Gram Gita Chapter 17
ओवी संख्या :- ११६
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १७

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सतरावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १७
Gram Gita Chapter Seventeenth Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय १७ गरिबी – श्रीमंती

गरिबी – श्रीमंती
श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गावी आहे संपत्ति । परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसे झाले ॥१॥
विकास कार्याचा कोठला ? गावी वाद बळावला । धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥
समाज या दोहोभागी विभागला । एक न मानी एकाला । परस्परावरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥
आता काय करावी योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना ! कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥४॥
ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा । त्यावाचूनि गावाचा । मूळपायाचि ढासळे ॥५!!
श्रीमंत-गरीबांचा वाद । गावास करील बरबाद । म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥
देवाघरी एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी । ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥
मूलसिध्दांती भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि । समज येता दोघासहि । भेद काही दिसेना ॥८॥
खेळाकरिता दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढू लागले । आपसात वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥
एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे । मग खेळणेहि थांबले इतरांचे । एकाचिया लोभामुळे ॥१०॥

ऐसेचि आहे संसाराचे । घरचे आणि समाजाचे । तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञाने आणि लोभाने ॥११॥
कामाकरिता जाति केली । काम विसरून जातचि धरली । जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥१२॥
ऐसेचि झाले अर्थव्यवस्थेचे । हिस्सेदार सर्वचि धनाचे । पण काहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥१३॥
एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी । ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥
एकापाशी ठेव ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली । कुणाची ठेव ही बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥
देवळामाजी पुजारी ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला । बायकापोरासाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा ॥१६॥
कोणी तीर्थी सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले । पुढे व्यापाराचे साधनचि केले । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥
एकाकडे दिली खूप जमीन । गावे वसवोनि त्यांना द्याया वाटून । परि तोचि बसला गबर होऊन । राबणारासि पिळोनि ॥१८॥
धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला । आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥
ऐसेचि झाले गरीबी-श्रीमंतीचे । कष्ट करणारे झाले दूरचे । पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥२०॥

श्रमणारापदरी मोजके माप । उरला गल्ला आपोआप । तो स्वये उपभोगणे हे महापाप । परि ठरविला न्याय्य हक्क ॥२१॥
खोटयासि दिले खरे नांव । पैशांनी पैशांचे वाढले वैभव । म्हणती ही पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकाचा ? ॥२२॥
आता काही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? । फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केले ॥२३॥
हजारोंचे जीवन पिळावे । तेणे त्यांच्यात रोग वाढावे । मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥२४॥
पाहता आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर । तैसेचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥
हा तो राहतो महाली शहरी । मुले गाडी नेती सिनेमादारी । शिकती व्यभिचार व्यसने चोरी । लुटती कारभारी खेडुता ॥२६॥
काहीनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली । काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जाता श्रमिकाचा ॥२७॥
गावातील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे । आयुष्य सरल्या कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥
ऐसे अधिक धन जमविले । समाजी कामी नाही आले । ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥
ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरा पोट भरून । तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥३०॥

भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान । परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचे ! ॥३१॥
कित्येकांचे जनावरी वागणे । सरंजामशाहीने वजन टाकणे । धाकदडपणाने कामे घेणे । घातक होईल यापुढे ॥३२॥
गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती । परि यांची लागली नेत्रपाती । काही केल्या उघडेना ॥३३॥
यासि उपाय करावा काही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही । कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावे समज द्याया ॥३४॥
यासहि कोणी न घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक । मग रक्तक्रांतीची ऐकू ये हाक । वाढे धाक मनस्वी ॥३५॥
कोणी घर फोडोनि चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती । कोणी भरदिवसा कापिती । मुलाबाळासहीत ॥३६॥
ही पाळीच का येऊ द्यावी ? म्हणोनि काही योजना शोधावी । गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवी । राहतील ऐसी ॥३७॥
परस्पराचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा । कोणासहि राग न उदभवावा । ऐसे करावे गावाने ॥३८॥
तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम । एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥
मुळी जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना । सर्वा मिळोनीच हा आपुल्या स्थाना । बनतो सन्माना घ्यावया ॥४०॥

कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचे काम । काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥
सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी । कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥
लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरे-पडवी । ऐसे न करिता हा गोसावी । राहता कोठे ? ॥४३॥
चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रे पुरवी । नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥
शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे । सर्वाच्या श्रमे घर आनंदे । साजवी हा आपुल्यासाठी ॥४५॥
सर्वाचे हात सर्वासि लागे । सर्वास जगविती गुंतले धागे । हे समजोनि जो गावी वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥४६॥
परि यात भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला । म्हणे पैसे देतो आम्ही सकला । म्हणोनि कामे करिती हे ॥४७॥
खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला । काम न करिता, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥४८॥
खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती । तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥४९॥
रानी असोत लाकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया । श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥
खरे याचे तारतम्यज्ञान । सर्वानी असावे समजोन । वाहावा सर्वाचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म धनिकाचा ॥५१॥
गावी जे जे श्रीमंत असती । तयांचे धन गावची संपत्ति । समजोनि वागावे या रीती । मदत द्यायासि प्रसंगी ॥५२॥
आपणापाशी अधिक असे । शेजार्‍यासि पुरवावे हर्षे । सर्व मिळोनि राहावे सरिसे । गावधर्म म्हणोनिया ॥५३॥
धन हे गरीबांचे रक्त । समजोनि वागोत श्रीमंत । श्रम ही गावाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥५४॥
ऐसे केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गावचे दोन्ही । यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावे ॥५५॥
आणि सावध असावे सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार । जनतेमाजी भराभर । वारे शिरवावे शिक्षणाचे ॥५६॥
लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी । सर्वास पाहाया समानपणी । लावावे प्रत्यक्ष कृतीने ॥५७॥
शब्दात नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण । फूट पाडिती ते द्यावेत हाकोन । गावचे भेदी ॥५८॥
नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावे आटपोनि । मग रचना करावी समानगुणी । इमान जागी ठेवोनिया ॥५९॥
जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे । हा भेद मिटविणे काम निके । त्याचेचि असे राजधर्मे ॥६०॥

पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला । मग कोण पुसे कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥
संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले । मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥
जनतेचा मग वालीच नाही । ती चेतता मग आगचि सर्वहि । भस्म होईल सगळी मही । हाहा:कारे ॥६३॥
सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली । तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावे लागेल सर्वासि ॥६४॥
मग हे ऐसे का होऊ द्यावे ? सकळांनी आधीच जागृत व्हावे । आपुल्या परीने सावरावे । कार्य नीट गावाचे ॥६५॥
उत्तम व्यवहारे धन घ्यावे । उत्तम कार्यासाठी लावीत जावे । जेणे परस्पराचे कल्याण व्हावे । तैसेचि करावे व्यवहार ॥६६॥
ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गावचि व्याजे बुडवावा । प्रसंग पडताहि न द्यावा । साथ लोका ॥६७॥
अविचाराने न उधळावे धन । फसवोनि न घ्यावे गरीबांपासून । दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥
न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास । विरोधचि करू नये यास । कोणी कोणा ॥६९॥
सगळयांनी मिळोनि वागावे । सर्वाचे समजोनि कार्य करावे । श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनी ॥७०॥
ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि । ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥७१॥
याचे समाजासि मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन । त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळी ॥७२॥
समाजात जेव्हा धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति । आपोआपचि मिटेल भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥
तेचि करितील परिवर्तन । समाजात उत्तम ज्ञानकण । पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥
ऐसी सुबुध्दता सगळयात यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी । नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजी ॥७५॥
हे समजणेचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे । तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥
म्हणोनि माझे एवढेचि सांगणे । वाढवा सामाजिक वृत्तीचे लेणे । मिरवा सामुदायिकतेची भूषणे । लोकामाजी ॥७७॥
नुसते श्रीमंत सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति । तरी तेवढयाने ही भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥
ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा । श्रमणारांच्या निवारावे कष्टा । स्वत: श्रम करोनिया ॥७९॥
सर्वानी सर्वासि पूरक व्हावे । ऐसे धर्माचे सूत्र बरवे । हे काय तुम्हासि सांगावे ? शहाणे जनहो ! ॥८०॥

त्याअभावी बिघडली गाव-स्थिति । कोणी जनावरासम राबती । कोणी नाजुक होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥
कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हा कमी ? कमाई केली वडिले नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥
हे तयांचे महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण । यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥
न करिता काजकाम । पावेल कोणा जीवा आराम ? सर्व धावतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥
म्हणोनि सांगणे उद्योगा शिका । पराधीन राहू नका । आपुल्या हक्काचा हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥
आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारू नका फजीती । म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥
सर्व तर्‍हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावे शहाण्यापरी । पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥
हे जव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण । नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणा ॥८८॥
म्हणतील आम्ही कष्ट करावे । तुम्ही आरामात राहावे । सांगता ” समानतेने ठेवावे ” । कोण म्हणेल पुढारी ? ॥८९॥
सर्वावरि सारखेच प्रेम । मग सर्वाकरिता एकचि नियम । सर्वानी करावेत परिश्रम । अपापल्या परीनी ॥९०॥
एकाने करावे काम । दुसर्‍याने करावा आराम । हे तो आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥
दुनिया आहे कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची । जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी नियमाने ॥९२॥
ऐसी आहे आजची प्रवृत्ति । पाहिजे हेचि समाजा प्रति । त्यात थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ? ॥९३॥
विद्वानाने शिक्षिताने । महंताने श्रीमंताने । कष्ट कराया मुद्दाम लागणे । हेचि मोठेपणाचे ॥९४॥
तेणे सर्वास होईल सुकर । कामे करितील जन भराभर । लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥
कामात पडले बुध्दिमान । तेणे प्रत्यक्षात येईल ज्ञान । शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा ॥९६॥
एरव्ही उद्योगाविण जे भोगणे । ते मानवासि लाजिरवाणे । आळशासि खाणेपिणे । देणे असे महापाप ॥९७॥
श्रमाने अंगी हीनता येते । ऐसे बोलती कोणी एक ते । समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥
आपुले करावयासि काम । का वाटावी लाजशरम ? उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥
जयास जैसी अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति । घेऊनि तेचि शिक्षण सुमति । यावे पुढती तयाने ॥१००॥

कामे सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान । श्रीकृष्णे सिध्द केले उच्छिष्टे काढून । ओढिली ढोरे विठ्ठले ॥१०१॥
कोणाचीच योग्यता कमी नाही । सर्वचि कामे आवश्यक ही । म्हणोनि कामाचा बदला सर्वाहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥
एक शेतीकामाचा कामगार । एक बेलदार सुतार लोहार । शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त ॥१०३॥
कोणी भंगी-काम करी । कोणी वैद्य नाम घरी । कोणी देवालयी सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥
कोणी बुध्दिवंत पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे । जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली त्यापरी ॥१०५॥
परि सर्वाना सर्वाचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार । कोण ब्राह्मण कोण महार ? कामामाजी सारिखे ॥१०६॥
येथे कामात उच्च-नीचता । कोणे ठरवावी व्यवहारत: ? प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानी ठेवितसे ॥१०७॥
आहे सर्वाचीच गरज । सर्वकाळ सहजासहज । एक नसता जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥
दोर घेवोनि साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा । एक तुटता तार कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥
तैसी आहे कामाची गति । काम असावे सर्वाप्रति । तरीच जगेल ही क्षिती । सारखेपणी राबता ॥११०॥
ज्याचा असेल जो जो बाणा । तो लावावा देश-कारणा । जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेचि पुरवावे तयाने ॥१११॥
ज्यासि पुरेल जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री । श्रम करावे आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशी ॥११२॥
ऐसे गावी कराल काम । तेणेच पावेल आत्माराम । लाभेल संतोषाचे निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥
अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्‍यांनो ! पंडितांनो ! । सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हाक आली क्रांतीची ॥११४॥
गावागावासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । श्रमसंपत्तिमहत्त्व कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥

ग्रामगीता अध्याय सतरावा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading