आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय तिसावा- 30 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय तिसावा – 30 Gram Gita Chapter 30 ओवी संख्या :- १०१ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 30
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय तिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३०
Gram Gita Chapter Thirtieth Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 30 भजन प्रभाव
भजन प्रभाव
एक श्रोता करी प्रश्न । भजनी देवाचे गुणगान । त्यासि बनविता प्रचाराचे साधन । पावित्र्य मग कैसे उरे ? ॥१॥
भजनासि हे ऐसे वळण । देवोनि चुकविता आपण । साध्या गोष्टीहि शिकविता त्यातून । हे तो न पटे धार्मिका ॥२॥
याचे ऐकावे उत्तर । धर्म म्हणजे धारणा सुंदर । त्यात सर्वचि अंगांचा विचार । जीवनाच्या ॥३॥
कलीयुगी भजन कीर्तनभक्ति । यामाजी बोलिली विशेष शक्ति । ती नव्हे एकांगी संतउक्ति । केवळ मुक्ति मिळवाया ॥४॥
आमुचे संपूर्णचि जीवन । सुधारू शके कीर्तनभजन । वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा जन्मल्या ॥५॥
समाजरचना गावरचना । विवाहादि संस्कार राज्ययोजना । औषधि, शेती, कलादि नाना । वेदस्मृतींत वर्णिल्या ॥६॥
पुरातन संस्कृत वेदकाळ । त्यातूनि जन्मला पुराणकाळ । पुढे प्राकृतजना कळावया सरळ । संत-भजने अवतरली ॥७॥
साधुसंती लिहिले नामभजन । भावभक्ति हृदयी धरून । बोध कळावया जनतेलागून । सहजासहजी सर्वचि ॥८॥
काही वेदान्तरूपके कथिली । काही वैराग्यभावे बोलिली । काही सलगीची भजने केली । साधुसंती विनोदे ॥९॥
काही रचिले भजन-भारूड । बहुरूपी, गोंधळी, जोहार, गारूड । पाईक, मातंग, गावगुंड । रूपके समाज-जीवनाची ॥१०॥
काही केले लीला-लाघव । गौळणी, गोपाळ, देवीदेव । समाजसुधारणेचा गौरव । वर्णिला काही ॥११॥
जैसा प्रसंग आला सामोरी । तैसीच भजने केली बहुपरी । हे कळावया वर्म अपुरी । बुध्दि झाली लोकांची ॥१२॥
वाईट भावना नाशावया । लोकी कर्तव्यशीलता यावया । समाज सुस्थितीत नांदावया । भजने केली संतांनी ॥१३॥
सौरी विराण्याहि गाऊनि । लोकांवरि पाडिली मोहिनी । बिघडल्या जना आपुलेसे करोनि । जागृत केले समाजा ॥१४॥
गाऊनि नाचूनि नाना रीती । भावभक्ति भरोनि गीती । त्यातूनि केली जनजागृति । शहाणे केले संतांनी ॥१५॥
संत तुकाराम, नामदेव । शेखमहंमद, ज्ञानदेव । चैतन्य प्रभु, नानकदेव । जना, मीरा, मुक्ताबाई ॥१६॥
कबीर, तुलसीदास, रामानंद । सूरदास, दादू, ब्रह्मानंद । नरसी, देवनाथ, परमानंद । संत झाले असंख्य ॥१७॥
ऐसे कितीतरी संत झाले । ज्यांनी अभंग-भजनादि कथिले । कित्येक जन उध्दरोनि गेले । नामभजने तयाच्या ॥१८॥
ज्यांची ऐकता भजन-वाणी । जाय गगनमंडळ भेदोनि । झाले, आहेत, होतील अजूनि । संत-सज्जन यापरी ॥१९॥
म्हणोनि बोलिले सकळ लोका । ” भजन-मार्ग सोडू नका ” । परि भजनी तारतम्य शिका । म्हणायाचे हेचि असे ॥२०॥
राम झाले कृष्ण झाले । संत, पुढारी, सर्वचि झाले । परि आज काय पाहिजे केले । हेचि कथिले तयांनी ॥२१॥
जगाची नित्य बदलती गति । आज कोणती उद्या कोणती । कोणते बोल कोणाप्रति । सांगावे कधी कळावे हे ॥२२॥
मुडदा स्मशानी चालला । तेथे काय करावे शृंगाररसाला ? पाहिजे वैराग्यभाव वाढविला । भजनमार्गे ॥२३॥
भजनी लग्नकार्यासि बोलाविला । त्याने स्मशानीचा रस वर्णिला । लोक म्हणतील काढा याला । काय बरळतो या स्थानी ? ॥२४॥
तैसेचि देवुळी केले भजन । गायिले स्त्रीसौंदर्य शृंगारपूर्ण । जन पाहतील हसून । वेडयापरी समजोनिया ॥२५॥
रणांगणी भजनी नेला । वीरास म्हणे सोडा शत्रूला । काय करिता मिथ्या गलबला । ऐसे बोलिल्या कोण ऐके ? ॥२६॥
हे सर्व जयाने जाणावे । तेणेचि भजनभाव वर्णावे । शहाणे करूनि सोडावे । भोळेजन सर्व ॥२७॥
समाज झाला रूढिबध्द । तेथे सांगावे सिध्दांत शुध्द । समाजकार्याहि करावे विशद । वेळ पडेल त्यापरी ॥२८॥
प्रसंग पाहोनि उपदेशावे । सत्य तत्त्व ते न सोडावे । सत्यचि गोड करोनि सांगावे । वेळकाळादि पाहोनि ॥२९॥
ऐसेचि समजोनि संतजने । केले ग्रंथ गीते भजने । तैसेचि आज पाहिजे नव्याने । वर्णिले सारे ॥३०॥
सर्व पंथांचा समन्वय । सर्व जातींचा मेळ होय । ऐशाचि भजनांनी लागेल सोय । आमुच्या गावाची ॥३१॥
हे जरी मागे संतांनी कथिले । परि आज पाहिजे पुढे वर्णिले । वर्णन करणारेच भ्रमांत पडले । मग ते मेले जनलोक ॥३२॥
कोणी ब्रह्मज्ञानाची भजने गाती । अर्थाविणेच वाचती म्हणती । उगीच दंभ अंगी आणती । आपण ज्ञानी म्हणोनिया ॥३३॥
घेऊनि संतांचे पाठांतर । आपणचि बनती महात्मा सुंदर । निभवाया पोटाचा व्यवहार । आयुष्यभरी ॥३४॥
कोणी गौळणींत रंगोनि नाचती । वेष धरोनि दंढार करिती । अर्थ सोडोनि मजा मारिती । विषयांधभावे ॥३५॥
ऐसी ऐकता कृष्णलीला । जनमनी भाव वेगळा झाला । वाटे हा तमाशाचि बनविला । देवादिकाचा ॥३६॥
कोणी रागरागिणी गाती । शब्द तोडोनि अर्थाची माती । पाहिजे तसे बनवोनि घेती । शब्द भजनाचे ॥३७॥
कोणी पाठांतर खूप करिती । ताल-बेताल करोनि गाती । चीड येते ऐकता चित्ती । अर्थ अनर्थ सगळाचि ॥३८॥
काही गाती अति सुंदर । ताल कुशल आलाप मधुर । तेथे अर्थाचा नसे अंकुर । भजनभाव जागेना ॥३९॥
कोणी भजन करावया आधी । गांजा-तंबाकूची पाहती संधि । चहाप्रसादाविण न होई गर्दी । भजनकर्यांची ॥४०॥
काही म्हणती आमुचे भजन वेगळे । ते तुम्हासि कैसे कळे ? त्यासि पाहिजे गुरुदेव-हस्तकमळे । डोक्यावरि ॥४१॥
काही सांप्रदायिक भजनी असती । ते आपुलीच शेखी मिरविती । माळ-तंदुरीसाठी भांडती । शत्रु जैसे जन्मांतरीचे ॥४२॥
काही खंजरीसाठी रागे भरती । काही स्पर्धेने पुढे येती । परि समाधान नाही चित्ती । तिळभरी कोणाचिया ॥४३॥
काही म्हणती दुसर्या संताचे । भजन नका बोलू मंडपी आमुचे । आमुचे भजन संप्रदायाचे । आमुच्याच साठी ॥४४॥
मित्रहो ! आता ऐसे करणे । सोडोनि द्यावे जीवेप्राणे । कोणत्याहि संतांची सदवचने । म्हणावी प्रेम धरोनि ॥४५॥
ज्या भजनाचा अर्थ न कळे । ते भजन न म्हणावे आपुल्या बळे । ज्याने समाजात परिणाम सगळे । व्यर्थ होती ॥४६॥
भजने करावी गाव-जागृति । हृदयजागृति कार्यजागृति । सर्वानी लागावे सत्कर्माप्रति । ऐसे लोका सांगावे ॥४७॥
भजन म्हणणाराचि आळसी । काय सांगेल जनतेसि ? करोनि घेईल आपुली हसी । ऐसे कोणा न करावे ॥४८॥
जे जे करावे ते समजोनि । पाऊल न टाकावे विचारावाचोनि । विचारचि नेतो मोक्षभुवनी । ऐसी साक्ष थोरांची ॥४९
विचाराविण देवभक्ति केली । तेथेहि दिसे फजीती झाली । लोक म्हणती लोभे फैलाविली । देवपूजा दांभिकाने ॥५०॥
रात्रभरि केले भजन । पडला खाटली बिमार होऊन । मग कोठले नामस्मरण । ” अरे बापा ” ओरडतो ॥५१॥
अभ्यासावाचूनि उपास केला । दोनदिवसा पित्तवात उमळला । मग सहा महिने खातचि गेला । दवापाणी मोसंबी ॥५२॥
ऐसे कासयासि करावे ? तारतम्य सोडोनि द्यावे । मग तो भोग भोगीत राहावे । आयुष्यभरि ? ॥५३॥
मनुष्याने बुध्दि वापरावी । अनुभवियाची सल्ला घ्यावी । अति सर्वत्रचि वर्जावी । अभ्यासे करावी आत्मोन्नति ॥५४॥
समाजी जेणे हानि घडे । ते सुधारावयाचे पोवाडे । वाजवावे संतांचे चौघडे । विचाराने गर्जोनि ॥५५॥
त्यांचेहि करू अनंत प्रकार । रुचिभेदाचा जाणूनि व्यवहार । परि मूळचे सिध्दान्त थोर । सोडू नेदू कोणासि ॥५६॥
आधुनिक बसवू चाली । जेणे लक्ष वेधेल आसुच्या बोली । परि दाखवू संतांनी केली । तेचि वाणी या काळी ॥५७॥
भजनांचे असोत अनंत प्रकार । मागचे पुढचे काही विचार । परि संतांचे काव्य अति थोर । उमटोनि निघे बाहेरी ॥५८॥
परि संतांची भजने दुकान थोर । तेथे अमोलिक वस्तु अपार । त्यातूनि निवडोनि सारासार । देऊ पात्र पाहोनि ॥५९॥
संतभजनी देवभक्तीच नाही । जीवनाचे सर्व दृष्टान्तहि । प्रसंगी शिव्या देवोनीहि । समजाविले त्यांनी ॥६०॥
मीराबाईची प्रेमभजने । सूरदासाची लीलाकवने । तैसीच गोस्वामींची जीवनदर्शने । उपदेशगाणे कबीराचे ॥६१॥
ते सर्वचि प्रिय देवा । जेणे घडे जीवांची सेवा । हे जाणोनि समाज जागवावा । भजनप्रकारे या काळी ॥६२॥
काहीनी राममंत्र सांगितला । त्यातूनि समाज जागविला । काहीनी दत्तमंत्र शिकविला । लोक केले सेवाभावी ॥६३॥
कृष्णरंगी रंगली मीरा । राज्यवैभव वाटे कचरा । छंद लागला घराघरा । तिच्या प्रभावे भक्तीचा ॥६४॥
चैतन्याची गर्जता वाणी । अनिष्ट रूढया गेल्या पळोनि । पावन झाली श्रीकृष्ण-भजनी । बंगालभूमि त्याकाळी ॥६५॥
कबीर, नानकदेवादिकांनी । भजने केली विदेशी फिरूनि । विवेकानंद-रामतीर्थांनी । केले प्रभावित जग जैसे ॥६६॥
ऐसे अनेक मार्गी झाले । परि ते आज अपुरेच पडले । देशापुरतेहि नाही व्यापले । समाजा सुमार्गी लावाया ॥६७॥
त्यांची पडली आज उणी । मानव राहिले मागासल्यापणी । याची कराया भरपाई अजूनि । प्रचारक पाहिजे सेवाभावी ॥६८॥
तोचि उत्तम प्रचारक । ओळखे वेळप्रसंग सम्यक । मार्ग सांगतो लायक । लोका हाक देवोनिया ॥६९॥
म्हणे आमुचे काही नव्हे । संती कथिले जैसे बरवे । तेचि विशद करोनि सांगावे । हाचि धर्म भजनियांचा ॥७०॥
भजनासनी भजनी बैसला । जनलोकांच्या दृष्टीस आला । पाहती लोक सदभावे त्याला । गंभीर दिसला पाहिजे तो ॥७१
साधी राहणी सात्विक लेणी । विनम्र हावभाव-निशाणी । शुध्द बोल प्रेमळ वाणी । पाहिजे भजनी लोकांची ॥७२॥
कपाळावरि आठया पडल्या । वेडयावाकडया बाहुल्या फिरल्या । हेकडे तोंड मुद्रा फाकल्या । ऐसे कधी न व्हावे ॥७३॥
मनात असावा नितांत आदर । वृत्तींत असावा भाविक गहिवर । रोमांच उठावेत अंगावर । भजनियाच्या ॥७४॥
असावी कोमल रसाळ वाणी । उच्चारिता जावी हृदय भेदोनि । जागृत व्हावे ऐकताच प्राणी । लागावे ध्यानी सुजनांच्या ॥७५॥
भजने म्हणावी सरळ सात्विक । गोड आवाज ओजस्वी रसिक । तालबध्द मधुर नि:शंक । अर्थपूर्ण निर्भयपणे ॥७६॥
ऐशाचि पावन प्रचारासाठी । संती केली आटाआटी । जना कळावी ओठाओठी । भाषा त्यांची म्हणोनि ॥७७॥
आमुचा देशचि भाविकभक्त । त्याचा विश्वास भजनासक्त । देवधर्म म्हणताचि चढते रक्त । अंगी त्याच्या ॥७८॥
हिरण्यकश्यपूसि नामाची चीड । परि नारदाचिया भजनी ओढ । ऐसेच आहे भजनाचे गूढ । नागहि होई शांत तेथे ॥७९॥
म्हणोनि भजनाचे महत्त्व । भाषणासि येते गौणत्व । हे समजोनि संतांनी तत्त्व । भजन केले प्रेमाने ॥८०॥
भाषणात भरले समाजकारण । धर्मकारण राजकारण । लोककारण विज्ञानकारण । रुक्ष वाटे ते सर्वा ॥८१॥
लोक समजती भजनाची भावना । अर्थ सांगता सुगंध सुवर्णा । चमत्कारे बदलावा जमाना । तैसे होते भजनाने ॥८२॥
भजनाची वाजली खंजरी । थाप पडली मृदंगावरि । झाली जनता वेडीबावरी । ऐकावया भजनासि ॥८३॥
लोक पाहती चातकावाणी । कधी निघेल दुसरी वाणी । ऐसा समाज जाता मोहूनि । गाव होई जागृत ॥८४॥
आपुल्या गावी व्हावे भजन । जेणे जागृत होती वृध्द-तरुण । स्त्रियामुली सकळ सज्जन । कार्य करिती ग्रामाचे ॥८५॥
प्रत्येकाच्या तोंडी गीते । ” आपुले गावचि सुधारू पुरते । हेचि सांगितले भगवंते । ग्रंथामाजी ” म्हणती सारे ॥८६॥
गुराखी ढोरकी शेत-मजूर । दुकानदार शिंपी सुतार लोहार । दळणी कांडणी घरोघर । गाती भजने उल्हासे ॥८७॥
म्हणती ” या रे सगळयांनो ! या । एकेक काम हाती घ्या । गावची सुधारणा करूया । आपुल्यापरी ” ॥८८॥
हेचि स्फूर्ति जागवाया संती । केली भजनमालिकेची प्रगति । समाधान लाभावया लोकांप्रति । सेवागुणे सुसंस्कारे ॥८९॥
आज सेवेची नोकरी झाली । भजनावरीच जिंदगी चालविली । याने साधनांची किंमतचि उडाली । जाहला तो पोटधर्म ॥९०॥
वीणा चिपळया झाल्या भिकारी । पोटास्तव फिरती दारोदारी । त्या मागची संत-तपस्या सारी । लुप्त झाली वाटे जणू ॥९१॥
यासि फिरूनि दुरुस्त करावे । सुसंस्कारे लोक भरावे । घरोघरी रोपटे पेरावे । सेवावृत्तीचे ॥९२॥
एक सेवक सेवेसि लागला । हजारो लोकासि मार्ग दिसला । मानवजातीचा पांग फेडला । ऐसे व्हावे निश्चये ॥९३॥
हनुमंत जेव्हा भावनेने चेतला । राममंत्र घेवोनि निघाला । कार्य सिध्दचि करोनि आला । उल्हासे श्रीरामाचे ॥९४॥
तैसेचि आपण आज करावे । भजनादि साधना सुधारावे । गावोगावींच्या लोकी भरावे । बंधुप्रेम त्याद्वारे ॥९५॥
सर्वाभूती प्रेमभाव । यातूनचि सेवेचा उदभव । चारित्र्याचा वाढे गौरव । संस्कार होता भजनांचे ॥९६॥
भजनांची चालता परंपरा । जना मिळे सत्प्रवृत्तींचा झरा । लोकशिक्षणाचा यापरी दुसरा । उपाय नाही सात्विक ॥९७॥
म्हणोनि विनवितो गावकर्यांनो ! तरुण मुलांनो ! वृध्दजनांनो ! सगळेचि प्रेमळ गीते म्हणो । करा ऐसा प्रचार ॥९८॥
वाणी रंगू द्या हरिनामाची । चटक लागू द्या सत्कर्मांची । चीड येऊ द्या दुर्व्यसनांची । सर्व जना या द्वारे ॥९९॥
जतन करा गावसंस्कृति । होऊ द्या भजने जनजागृति । जनता-विद्यापीठ हे निश्चिती । तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । भजनसाधना ग्रामहितार्थ । तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥
ग्रामगीता अध्याय तिसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















