ग्रामगीता अध्याय तिसरा – 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय तिसरा – ३
Gram Gita Chapter ३ – 3
ओवी संख्या :- १०९
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ३ आश्रम धर्म
आश्रम धर्म

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय तिसरा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita Chapter III Beginning


—-🕉ग्रामगीता अध्याय ३ आश्रम ध


आश्रम धर्म
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला । पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचे उत्तर आहे सोपे । जग चाले कोणाच्या प्रतापे ? आपुलेच रडे आपणा न संपे । म्हणे जगाचे कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हास याची चिंता कशाला ? ते पाहू द्या निर्मीत्याला । तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा । वृत्ति आठवे विषयचाळा । तरि सांभाळा गृहधर्म ॥५॥
चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमे सांभाळिले वीर्य । तरि याने का खुंटेल कार्य । संसाराचे ? ॥६॥
मुलगा जरा वयात आला । हवे तैसे वागू लागला । बाळपणीच भोगी तारूण्याला । जन्म गेला दुःखी मग ॥७॥
ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर । यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥
त्याचे जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप । त्यांचे संतान म्हणजे शाप । संसारासि ॥९॥
संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा । यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥

संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा । म्हणोनि ब्रह्मचार्‍याने साधावा । गृहस्थाश्रम ॥११॥
ध्यानी घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम । ज्याने व्यक्ति -गाव -राष्ट्र उत्तम । धारणेत चाले ॥१२॥
इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हाती । पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावे या मार्गी ॥१३॥
येरव्ही लग्न केलेचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे । ऐसा आग्रह धरतील जे । ते व्यर्थवादी ॥१४॥
जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण । त्याने केलेचि पाहिजे लग्न । ऐसे नाही ॥१५॥
परि संसार न करिता विरागी होय । त्यासि आहे महाभय । सेवासाधनाहि कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥
मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वती चढावे । आधंळ्याने युध्द करावे । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥
हे साधणे सोपे नाही । तैसीच ही निसर्गाशी लढाई । म्हणोनि त्याचा राजमार्ग तोहि । कथिला धर्मे ॥१८॥
मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । शक्तियुक्तींनी उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥
घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरी प्रगटले ओजवीर्य । निसर्गेचि झाले अनिवार्य । लग्न करणे ॥२०॥

न जाणो लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार । म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥
योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर । करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥
गृहस्थाचा काय धर्म । कोणते आचरण काय वर्म । कैसे आचरावे कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥
आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी । पत्नी येता आपुल्या घरी । घरचि लागे साधावे ॥२४॥
मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर । म्हणोनि सावध – सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥
निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा । धर्म साधावा कुटुंब -राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥
प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपे विकास केला । तेणे घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥
कैसे घडेल उद्योग करणे । आपुला सर्वाचा निर्वाह साधणे । लग्नसंस्कारे लाविली बंधने । समाजधर्माची ॥२८॥
एकपत्नीव्रता घ्यावे । वाईट कुणाकडे न बघावे । हेच निश्चयाने शिकवावे । लागे तया ॥२९॥
काही घडता दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर । म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥

याच कारणासि जपावे । सात्विक मार्गा अवलंबावे । संती सांगितले जे बरवे । तेचि करावे सर्वथा ॥३१॥
एकांती लोकाती स्त्री पाहोन । होऊ न द्यावे वृत्तीचे उत्थान । प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोवू नये कुमार्गी ॥३२॥
एका पत्नीसि शास्त्रे नेमिले । ऐशा गृहस्थाश्रमी राहिले । तरी तो ब्रह्मचारीच म्हणविले । पाहिजे आम्ही ॥३३॥
गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयी वागला । तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥
त्यासाठी उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समागम । येरव्ही आपले व्रतनियम । दोघांनीहि आचरावे ॥३५॥
संतानाकरिताच वीर्य देणे । येरव्ही आपुले ब्रीद रक्षिणे । ऐसे साधले जीवन ज्याने । महान तपस्वी ॥३६॥
अहो ! लग्न जरी केले । तरी विषय -दास्य नाही सांगितले । जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥
जिंकावया कामवृत्ति । पत्नी, नव्हे वाढवाया ती । उत्तममार्गे मिळवावी संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥
जीवन -शक्ति एक झाली । तेणे सुकीर्ति प्रकाश पावली । सतकार्य -कळी उमलो लागली । ऐसे व्हावे ॥३९॥
सुख व्हावे मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरासि । वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वाना ॥४०॥

मोकळे बोलणे गोजिरवाणे । चाल चालणे चारित्र्याने । जीवन कंठणे उज्ज्वलतेने । थोरामोठयांचे पाहूनि ॥४१॥
संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचे करणे अध्ययन । यानेच फिटेल ॠषिॠण । गृहस्थाचे ॥४२॥
संतान करावे आदर्श साचे । तरि ॠण फिटे मातापित्याचे । अथवा आपणचि नाम वाढवावे तयांचे । देशसेवेने ॥४३॥
विश्वी देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा । प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥
यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वाचे जीवन । संतोषवावे दीन दुःखी जन । सेवाभावे ॥४५॥
उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा, ग्रामसेवा । ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वासि ॥४६॥
गृहस्थाश्रमी ऐसे वर्तले । अतिमहत्त्व जीवना आले । साधुसंती गौरविले । ऐशा गृहस्थाश्रम ॥४७॥
असो कोणताहि आश्रम । त्यात मुख्य असे संयम । विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥
गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचे पारणे फिटले । पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥
आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश । सुख व्हावे पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥
आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास । दुसर्‍याच्या सुखार्थ भोगी त्रास । हे शिक्षण गृहधर्मी ॥५१॥
त्याच्या गुणात आपुले भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान । तो वाईट होता दुषण । लागेल आम्हा ॥५२॥
ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावे लागे त्यासाठी कष्टी । प्रसंग पडता उठाउठी । धावूनि झेली स्वतःवरि ॥५३॥
परि आपुल्या पुत्राकारणे । कोणावरि अन्याय न करणे । आपुल्या ऐसीच समजणे । मुले सर्वाची ॥५४॥
सर्वाकरिताच झटावे । ऐसे व्यापकपण साधावे । हेच गृहस्थाश्रमी शिकावे । लागे तत्व ॥५५॥
पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि । पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥
पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला । तिसरा होताचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥
न संपता मग यातना । भोगाव्या लागताति नाना । वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारे ॥५८॥
ऐसे जयाने साधले । त्यासीच ” पुरूष ” म्हणणे शोभले । येरव्ही ते विषयी झाले । गधे घोडे वानर ॥५९॥
मी तो ऐसे नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले । त्यास साठ पुत्र झाले । ते राहिले शेतावरि ॥६०॥
एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी । लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥
असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । सगळया आयुष्याची दुर्दशा । वासनेपायी ॥६२॥
काही दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वाचे नागविती । ही तो आहे पशुवृत्ति । गृहस्थाश्रम म्हणो नये ॥६३॥
पुरुषा बहुपत्नीचा अधिकार । स्त्रियांनी का न करावे चार ? हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥
एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति । त्या माऊलीची कोण गति । देव जाणे ॥६५॥
हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा । म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥
एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली । तरीच दोघांनाहि लाभली । शांति संसारी ॥६७॥
संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान । ऐसी गाठी बांधोनि खूण । विचारे सुख साधावे ॥६८॥
दोघांचे व्हावे एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण । होता आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥
यावरि श्रोती विचारले । संतानासाठी लग्न नेमिले । परि एका स्त्रियेसि संतान न झाले । म्हणूनि केले दुजे लग्न ॥७०॥

त्यासि निषधिले आपण । आता सांगा न होता संतान । कैसे फिटू शकेल ऋण । देशाचे आणि वडिलांचे ? ॥७१॥
लग्न केलियाहि वरि । पुत्र न होता उदरी । म्हणती त्यास अधोगति सारी । प्राप्त होते ॥७२॥
याचे उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा । सेवेने ज्ञानाने मुक्तिसुखा । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥
पुत्र न होताचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक । तरले ऋषिमुनि संत देख । बुडाली अनेक श्वानसूकरे ॥७४॥
” निपुत्रिकास अधोगति ” । ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती । त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥
भारती ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला । महत्त्व न द्यावे लग्नकार्याला । ऐसे झाले ॥७६॥
ज्याने त्याने तप करावे । ऐसे धरले बहुतांच्या जीवे । म्हणोनि हे बंधन घालावे । लागले ग्रंथकर्त्या ॥७७॥
पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी । ऐसेहि बोलिले निर्धारी । ग्रंथामाजी ॥७८॥
यातूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार । पुत्र नसताहि होतो उध्दार । प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥
समाजाच्या उनत्तीचे सुत्र । खंडू न द्यावे सर्वत्र । यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥
” पापपुण्य आपुले आपणा । पुत्रबंधु न तारी कोणा । ” ही ग्रंथांची सत्य घोषणा । विसरू नये कोणीहि ॥८१॥
एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला । सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥
असेल मुलासाठी धन । करावे सत्कार्यासि अर्पण । यात भावना ठेवू नये भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥
आपुले घरचि नव्हे घर । विश्व आपुले मकान सूंदर । हेचि शिकावया असे संसार । उध्दार तो याच मार्गे ॥८४॥
ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुले शोधोनि अंतर । दूरदृष्टीचा साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥
मन काढावे घरातूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि । पुत्र नसता गावास अर्पूनि । देशाटनी निघावे ॥८६॥
निघावे पत्नीस घेऊनि । जी धर्मअर्थकामी सांगातिणी । ती जरि साथ न दे मोक्षसाधनी । पुत्राजवळी राहू द्यावे ॥८७॥
पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनी वर्जावा भोग । दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥
कार्य संपले संसाराचे । पुढील जीवन वानप्रस्थाचे । मिळोनी तपाचे सदवर्तनाचे । धडे पाळावे दोघांनी ॥८९॥
पाहावी विशाल स्थाने मंदिरे । तीर्थे वने मुनि -कुटीरे । अनासक्त व्हावया मने शरीरे । चित्त लावावे सत्कार्यी ॥९०॥
सर्वकार्यासि वाहून घ्यावे । अध्यात्मभावा अनुभवीत जावे । आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥
सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गावाची अवदशा । काम करावे भरूनि हर्षा । सर्वासाठी अंतरी ॥९२॥
शिक्षणसंस्था, आश्रमसंस्था । सत्संगसंस्था परमार्थसंस्था । यांची करावी सर्व व्यवस्था । शांतीसाठी ॥९३॥
अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगी । आश्रम चालवावे जागजागी । त्यांच्या सेवेचे ॥९४॥
गृहस्थाना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थे लक्ष द्यावे । मुलाबाळासि संगोपावे । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥
द्यावे जीवनाचे शिक्षण । जेणे कार्यकर्ते निघतील पूर्ण । सर्वागीण उन्न्तीचे ज्ञान । द्यावे तया आश्रमस्थानी ॥९६॥
हे कार्य वानप्रस्थाने करावे । घरादारांचे बंध तोडावे । अनासक्तीने वागावे । सेवेसाठी सर्वाच्या ॥९७॥
नुरता संसारात वासना । वैराग्य येते सहज वर्तना । उरले ते हेचि कार्य जाणा । शिक्षण द्यावे सर्वासि ॥९८॥
ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा । हेचि अनुभवावया जीवभावा । वानप्रस्थ आश्रम ॥९९॥
तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम । व्हावया वासनेचा उपशम । अंतरामाजी ॥१००॥

पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम । अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥
जेव्हा घरातूनि मन निघाले । सर्वदेशी होऊनि सेवे लागले । संन्यासवृत्तीने क्रमे साधले । परमात्म्य अंगी ॥१०२॥
संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटी स्थितप्रज्ञता कैसी । प्राण गेल्याहि आसक्क्तीसि । स्पर्श मुळी होईना ॥१०३॥
वानप्रस्थी संसार त्यागला । संन्यस्ती स्वरूप योग झाला । परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥
कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ । प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजी ॥१०५॥
ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली । याचि देही त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥
तो सकळा झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक । जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥
हेचि सत्य -धर्माचे ध्येय । हेचि सर्व कर्मांचे श्रेय । सर्व ग्रंथाचे हेचि तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत । तिन्ही आश्रम निरूपिले येथ ।
तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥


ग्रामगीता अध्याय तिसरा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading