आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा- 28 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा– 28 Gram Gita Chapter 28 ओवी संख्या :- १०९ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 28
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २८
Gram Gita chapter twenty-eighth beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 28 प्रार्थना व विश्वधर्म
प्रार्थना व विश्वधर्म
सर्व धर्माचा समन्वय । विश्वशान्तीचा उपाय । लोकसुधारणेचे विद्यालय । सामुदायिक प्रार्थना ॥१॥
ऐसे झाले प्रतिपादन । परि आमुचा ऐका प्रश्न । सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील एक कैसे ? ॥२॥
कैसा रुचेल एक पाठ ? प्रत्येकाची वेगळीच वाट । कैसे बसतील एकवट । भक्त भिन्न देवाचे ? ॥३॥ .
दुसर्या धर्मीयांमाजी बसता । झाली वाटे धर्मभ्रष्टता । यासाठी उपाय सांगा कोणता । सामुदायिकतेसि ? ॥४॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । संक्षेपे करितो उपाय कथन । लोका पटवावे तत्त्वज्ञान । सदधर्माचे नानापरी ॥५॥
जगी दिसती विभिन्न धर्म । परि सर्वाचे एकचि वर्म । विश्वधारणेचा मार्ग उत्तम । सदधर्म तोचि ॥६॥
व्हावी विश्वाची उत्तम धारणा । शांति लाभावी सर्वजना । या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना । केले धर्मप्रवर्तकांनी ॥७॥
” सर्व विश्व आर्य करीन ” । ” तिन्ही लोक आनंदे भरीन ” । हे संतऋषींचे विशाल बंधुपण । नव्हते स्वार्थासाठी ॥८॥
लोक प्रतिमापूजक नसावे । त्यांनी एका ईश्वरासि प्रार्थावे । हा महंमदाचा उपदेश नव्हे । एकाच देशासाठी ॥९॥
येशू ख्रिस्ताने प्रेमपाठ दिला । प्राणहि पणास लावला । तेथे अन्य मानव नाही वगळला । कळपातूनि देवाच्या ॥१०॥
बुध्द आणि महावीर । श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र । यांनाहि सर्वाचीच फिकीर । विश्व सुखी होवो म्हणोनि ॥११॥
त्या त्या देशधर्माच्या संती । हीच व्यापक धरोनि वृत्ति । विशाल मानवसमाजाप्रति । सेवा दिली आपुली ॥१२॥
अन्य देशांचे आणि भाषांचे । झालेले आणि होणारे साचे । थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचे । आपुल्या ग्रंथी ॥१३॥
धर्मभ्रष्टतेची कल्पना । ही मान्यचि नव्हती धर्माचार्यांना । सर्व विश्वाचीच त्यांना । काळजी होती समान ॥१४॥
सर्व विश्वाचा एकचि देव । त्याची मुले सर्वचि जीव । जरी वेगवेगळे दिले नांव । तरी भाव हाचि त्यांचा ॥१५॥
हिंदूंचा देव हिंदुत्व धरी । मुसलमानांचा मुस्लिम करी । ख्रिश्चनाचा ख्रिस्त्यांनाचि तारी । ऐसे म्हणणे आकुंचित ॥१६॥
सर्वात उच्च ऐसी भावना । जगच्चालकाची कल्पना । तेथे कैचा उरे भिन्नपणा ? आप-पर कोण ? ॥१७॥
भिन्न मार्ग-मार्गी असती । परि देव नाही भिन्नस्थिती । मूळ धर्माचीहि नाही गति । भिन्नत्वाची ॥१८॥
सर्वचि म्हणती जगत सारे । केले आमच्या ईश्वरे । धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारे । दिला आम्हा ॥१९॥
ऐसे सर्वाधिपति ईश्वर । काय जगी असती शंभर ? एकचि जगच्चालक परमेश्वर । तोचि सर्वाचा ॥२०॥
अल्ला, गॉड, अर्हत, देव । अहूरमज्द, निर्वाण, शिव । परमेश्वरासि ठेवा नांव । एक गुरुदेव तोचि माझा ॥२१॥
जगासि सुखी उन्नत करावे । हेचि त्या जगन्नियंत्या रुचावे । मग धर्माचे रूप याहूनि असावे । भिन्न कैसे ? ॥२२॥
आपणाऐसे सर्वाचे सुखदु:ख । जाणोनि वागावे उपकारक । सर्व धर्मी हाचि आदेश एक । दुमदुमताहे ॥२३॥
यांचा करू जाता विचार । सर्व पंथधर्म भक्तिप्रकार । एकतत्त्वी कळती साचार । भेद भक्तांनी का घ्यावा ? ॥२४॥
ज्याची बुध्दि अल्पबल । ते घरात करिती घरकुल । परि हे विश्व एकचि दल । मानवाचे ॥२५॥
एकचि भूमि सर्वाकरिता । एकचि हवापाणी, सुख-व्यथा । पंचभूतांचीच सर्वथा । शरीरे सर्वाची ॥२६॥
एकचि जीवनाचे मूळ । एकचि शेवटचे स्थळ । एकचि सेवाधर्म निर्मळ । नाना रूपी ॥२७॥
सर्वाच्या नेत्री एकचि ज्योति । सर्वाच्या अंगी एकचि शक्ति । सर्वाठायी एकाचीच व्याप्ति । तेथे भिन्न कोण आले ? ॥२८॥
मुस्लिम ख्रिस्ती जमात काही । आकाशातून आली नाही । त्यांचे पूर्वीहि होती मही । मानवांनी नटलेली ॥२९॥
एकाचे जग देवाने केले । आणि एकासि भुतांनी जीवन दिले । ऐसे मानता जग वेगळाले । दिसेना पंथधर्मांचे ॥३०॥
धर्मात नाही हिंदु मुसलमान । धर्मात नाही पारशी-खिश्चन । धर्मात नाही शिख-जैन । पाहता मुळी ॥३१॥
लोक धर्मांची व्याख्याच विसरले । धर्मे हिंदु मुसलमान झाले । मूळचे मानवपणहि आपुले । हरविले त्यांनी ॥३२॥
देशभाषेचे बुरखे घातले । हवापाण्याने रिवाज बदलले । त्या बहिरंगासीच धर्म म्हणो लागले । अल्पज्ञानी ॥३३॥
देशाचारी राहणी झाली । हवापाण्यापरी विशेषता आली । उत्पादनापरी आरंभिली । भोजन-व्यवस्था ॥३४॥
म्हणोनि काय मानवत्वहि बदलले ? सत्यसिध्दान्ती अंतर पडले ? पाप-दु:खहि उचित वाटले । उलटे कोणा ? ॥३५॥
हे म्हणणे मला आवडेना । मी एकचि मानतो सर्वाना । आधी मानवता सर्वाचा बाणा । पंथभेदांना स्थान मग ॥३६॥
भिन्न राहणी भिन्न उपासना । म्हणोनि का पारखा मानवपणा ? जरी भिन्न पध्दतींनी केली प्रार्थना । तरी काय झाले ? ॥३७॥
एकाचि सागराची वाफ । होऊनि आली पाणीरूप । थेंब कामे करोनि खूप । जातील शेवटी एका स्थळी ॥३८॥
तैसेचि आहे मानवाचे । मानव कोणत्याहि धर्माचे । परंतु समाजरचनेसाठी त्यांचे । महत्त्व सारिखे ॥३९॥
आदि-अंती सर्वचि एक । मध्ये समाजसेवेचे कौतुक । त्याचेहि मूल्य समान देख । मानवधर्म-दृष्टीने ॥४०॥
धर्म सांगे पुजारी व्हावे । धर्मचि सांगे भंगी व्हावे । धर्म म्हणतो गावे-नाचावे । सर्वासाठी ॥४१॥
ऐसे वेगवेगळे कर्म केले । तरी परकेपण नाही ठेविले । सर्व मिळोनि एक झाले । तोचि धर्म ॥४२॥
धर्मामाजी सर्व येते । परंतु तारतम्य पाहिजे तेथे । मानवाशी होय विद्रोह ते । न करावे धर्म म्हणे ॥४३॥
धर्माची आखणी मानवता । मानवतेसाठी करावी व्यवस्था । कोठेहि होता अव्यवस्था । धावोनि जावे ॥४४॥
ही व्यवस्था जेव्हा अपुरी पडली । तेव्हाचि गट वृत्ति निर्माण झाली । व्यक्तिमत्वाची प्रलोभने वाढली । भिन्न मार्गांनी ॥४५॥
विश्वाचे ऐसे झाले तुकडे । कोणीहि गेला कोणीकडे । नांवरूप धरोनि वेडेवाकडे । फुटला धर्म ॥४६॥
देशकालादिकासि बघून । केली साधने निर्माण । त्या फांद्यांनाचि धर्मवृक्ष मानून । आखणी झाली गटांची ॥४७॥
म्हणोनि पडले विभिन्न नाम । हिंदु-मुसलमान-ख्रिश्चन धर्म । जैन-शिख-महानुभाव-ब्राह्म । नामे धर्मामाजी ॥४८॥
अजोनि खुंटली नाही संख्या । जेवढी पंथसंप्रदाय-व्याख्या । सर्वासीच धर्मनामाअख्या । पुढे लागे ॥४९॥
घराघराचा अलग धर्म । धर्म एकेक व्यवहारकर्म । ” आपले जगणे ” हेचि सत्याचे वर्म । ऐसा भ्रम जाहला ॥५०॥
ऐसी जव वाढली प्रथा । तव झाली सर्वासीच व्यथा । मग म्हणती विरोधी धर्मपंथा । केले पाहिजे शासन ॥५१॥
हे आवराया निर्मिली सत्ता । सामदामदंडभेद-प्रथा । हा राजधर्महि लावण्यासि व्यवस्था । मानवांची ॥५२॥
जे धर्ममार्गी संघटित झाले । त्यांनी न्यायसत्र आरंभिले । आपापल्या परीनी केले । स्थापन राज्य ॥५३॥
राज्य केले धर्मासाठी । परि उपभोगचि लागला पाठी । लागली अहंतेची आटाआटी । आसक्तीमुळे ॥५४॥
मग धर्मचि वगळून गेला । राजकारण धर्म झाला । त्यासाठी गलबला वाढला । सर्व देशी ॥५५॥
विसरोनि सेवाधर्माचे अधिष्ठान । राज्य करावे हेचि मोठेपण । राबवावे मानवा पूर्ण । ऐसे झाले ॥५६॥
मग मानवाच्या सुखासाठी । मानव द्यावेत बळी संकटी । पडली ऐसीच राहटी । लोकामाजी ॥५७॥
गेले प्रेमाचे समजावणे । लागले तलवारीस धार देणे । जो करील हिंसा अधिकतेने । तो विजयी ठरला धर्मवान ॥५८॥
सत्ताबळ संख्याबळ । त्यावरि धर्म ठरला प्रबळ । तेथे सत्याचे फुटले कपाळ । शक्तियोगे ठरता धर्म ॥५९॥
मग धर्मचि झाले हतियार । धर्माकरिता युध्द संहार । धर्मयुध्दाचे बंड थोर । वाढले लोकी ॥६०॥
सत्य त्याग सेवेसि कोणी पुसेना । आपुलीच मते मिरविती नाना । ऐसा हा झाला धिंगाणा । पृथ्वीवरि ॥६१॥
बिघडोनि गेली धर्माची रीति । ती सुधारावया अपुरी शक्ति । म्हणोनि देवादिकांनाहि हाती । शस्त्रे धरावी लागली ॥६२॥
ते धर्मयुध्द न्यायाचे होते । उन्मत्तता मुळीच नसे जेथे । ” बळी तो कान पिळी ” हे तेथे । लावणे हा अधर्म ॥६३॥
न्यायदानात द्वेषपाप नसते । परि जेव्हा आसक्ति देशाची घेरते । तेव्हा माणसाची बुध्दि जाते । विनाशाप्रति ॥६४॥ .
मग युध्द राष्ट्राची अरेरावी । घमेंड कुटिलतेच्या उठाठेवी । अधर्म तो जरि असेल युध्दचवी । कोणाचीहि अन्यायी ॥६५॥
माणूस माणसासि मारी । अपराध नसता दमन करी । ते युध्दहि परि दुराचारी । बोलिले शास्त्री धर्माचेहि ॥६६॥
हा न्याय जेव्हा सकळांना कळे । तेव्हा थांबे युध्दाचे वारे सगळे । मानवसमाज माणुसकीशी मिळे । न्यायदेवतेपुढे ॥६७॥
जे युध्दांचे तेचि लहान झगडयांचे । तैसेचि कुटुंबांमधील कलहांचे । हे सारे प्रदर्शन अज्ञानाचे । वेगळाल्यापरी ॥६८॥
धर्म, पंथ आणि पक्ष, देश । यांच्या नशेचा अभिनिवेश । धर्मवेडे करोनि मानवास । न्यायमार्गे जाऊ नेदी ॥६९॥
जेव्हा मुसलमान राज्य करी । तेव्हा देवळे पाडोनि मशिदी उभारी । आपण शहाणे म्हणोनि वाजवी भेरी । लौकिकामाजी ॥७०॥
त्याची सत्ता विलया गेली । तेव्हा हिंदूने मसजिद पाडली । आपलीशी करोनि सोडली । दुसर्या पंथी ॥७१॥
जेव्हा ख्रिश्चनाचे बंड आले । तेव्हा त्याने चर्च वाढवले । आपुले जाळे पसरोनि दिले । मनमाने त्यांनी ॥७२॥
रागद्वेषांचे समाधान । अभिलाषापूर्तीचे साधन । म्हणोनि केले युध्द वा दमन । सूडबुध्दीने ॥७३॥
हा तो नव्हे धर्मविचार । हा आहे शक्तीचा व्यवहार । धर्मात मान्य नाहीच संहार । निरपराध मानवांचा ॥७४॥
धर्मात आहे सुव्यवस्था । शांति, बुध्दि, न्यायप्रियता । अहिंसेने समजाविता । होतो धर्म श्रेष्ठ ऐसा ॥७५॥
मानव मानवासाठी कष्टतो । दुसर्याच्या सुखी सुखावे, श्रेष्ठ तो । परि मानवास मानव संहारतो । अधर्म याहूनि कोणता ? ॥७६॥
हेचि जयांना अंतरी कळले । तेचि महामानव समजले गेले । मग कोणतेहि पंथ धर्म जरी असले । सर्व चांगले आम्हालागी ॥७७॥
सर्वचि धर्मपंथांचे देव । धर्मप्रवर्तक महामानव । यांचा ऐसाचि असे भाव । व्हावे मानव सर्व सुखी ॥७८॥
जगी नांदावी सुखशांति । सर्वानी आचरावी बंधुप्रीति । यासाठीच झटले असती । महापुरुष अभेदत्वे ॥७९॥
धरोनि हाचि विशाल हेत । कालानुसार काढिले पंथ । केला उपदेश लिहिले ग्रंथ । परोपरी त्यांनी ॥८०॥
याचसाठी आजवरि झाली । कुराणे पुराणे धर्ममतेहि भली । परि अहूनिहि नाही आकळली । खोली याची सर्वाना ॥८१॥
पूर्वीपासूनि प्रयत्न झाले । न कळणारांनी विरोधिले । अजूनहि प्रयत्न चालले । याचि मार्गाचे ॥८२॥
आम्ही आहोत प्रयत्नवादी । देवादिकांचे विशाल संवादी । जगासि तैसी लाभो सदबुध्दि । म्हणोनि प्रार्थना आरंभिली ॥८ll
यात नवीन नाही गोविले । पूर्वीच्या धर्माचे हृदगत भले । तेचि एकत्र करोनि ठेविले । वेगळया स्वरूपे ॥८४॥
सर्वचि थोरांचे थोर विचार । सर्वाच्या पध्दतींचा सार । करोनि ठेविला गुच्छाकार । समाजापुढे ॥८५॥
ज्यात परस्पराचे समाधान । जेणे सकलांचे सुंदर जीवन । तेचि साधावया अनुसंधान । प्रार्थना केली ॥८६॥
समन्वयकारी प्रार्थनापाठ । ही नव्हे पोलादी चौकट । येथे प्रत्येकासि वाव असे स्पष्ट । आपुले गोवाया ॥८७॥
तात्त्विकता कुठूनहि घ्यावी । आपुलीच ” एक टांग ” नसावी । सर्वाच्या समाधानाची ठेवावी । सहनशील बुध्दि ॥८८॥
ऐसी प्रार्थनाच शान्ति-प्रभावी । शान्तीसाठी विशालता हवी । विशालतेसाठी सोय व्हावी । परस्पराची ॥८९॥
परस्पराच्या हृदयासि स्पर्शता । जवळ येईल आत्मीयता । तेणेचि विश्वासि प्रेमे जिंकता । होईल प्राप्ति सुखशांतीची ॥९०॥
धर्म-पंथ-देशांचे भांडण । न मिटे ऐक्य-प्रेमाविण । ते प्रेम साधाया प्रार्थनेसमान । पातळी नाही उत्तम ॥९१॥
सर्वचि धर्मी प्रार्थनातत्व । सात्विकतेतचि टिकाऊ एकत्व । याचे जाणोनिया महत्त्व । आणावे सर्वा एके ठायी ॥९२
परस्पराचा संबंध नव्हता । म्हणोनि पध्दतीत बदल होता । त्यास आता जवळ आणता । पाप कैसे ? ॥९३॥
सर्व विश्वाची एकचि प्रार्थना । सर्व विश्वाचा एकचि बाणा । सर्व विश्वातचि एकपणा । का न यावा ? ॥९४ll
न येण्याचे एकचि कारण । आकुंचित आमुचे ज्ञान । म्हणोनि आपापल्या परीने मंडण । केले असे धर्मांचेहि ॥९५॥
देवापासूनि एक होती । तेचि विशाल मन करिती । अल्प ज्ञानियापाशी फजीती । मानवधर्माची ॥९६॥
ते समजती भ्रष्टाकार । इतर तुच्छ आपण थोर । त्यांना स्वत:चाहि धर्म-विचार । कळला नाही ॥९७॥
प्रार्थनी सर्वानी फड मांडावे । प्रार्थना संपताचि वितंडावे । ते प्रार्थी नव्हेत पेंढारी म्हणावे । स्वार्थी ऐसे ॥९८॥
लोक स्वार्थांनी दुरावले । आपसात लढू लागले । ते उपासनेने जवळ आले । होईल ऐसे ॥९९॥
त्यासाठी त्यांना ज्ञान द्यावे । धर्मसमानत्व शिकवावे । न पटे तोवरि प्रार्थनेसि लावावे । स्वधर्माच्याचि ॥१००॥
भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली । परि प्रार्थनातत्त्वे प्रतिपादिली । तरी आदरभावना सर्वत्र वाढली । होईल ऐसे ॥१०१॥
याने तयार होईल भूमिका । प्रत्येक धर्म आपणासारिखा । तेणे विश्व शान्तिसुखा । पावेल एक होऊनि ॥१०२॥
म्हणोनि धरिली ही साधना । साधा सामुदायिक प्रार्थना । सामुदायिक होण्याचीच धारणा । आरंभिली सात्विक ॥१०३॥
ईश्वराची जी मनोकामना । एकापसोनि अनेकपणा । अनेकान्तरी एकत्व भावना । उपभोगावी या द्वारे ॥१०४॥
सर्वानी चहूकडोनि यत्न करावे । आपल्यापरीने जवळ यावे । सिध्दान्तांचे गोडवे गावे । म्हणजे वेळ न लागे ॥१०५॥
सिध्दान्तरूप तत्त्वज्ञान । लोकामाजी रुजविल्याविण । न होय पंथद्वेषादिकांचे उच्चाटन । नेहमीकरिता ॥१०६॥
सामुदायिक प्रार्थनारूपे । हे तत्त्व रुजविणे असे सोपे । म्हणोनि लागा खटाटोपे । कार्यासि या गावोगाव ॥१०७॥
गावोगावी धर्मसमभाव । मग आपैसेचि सुखावे विश्व । पृथ्वीसि लाभेल स्वर्ग-गौरव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । धर्मसमन्वय कथिला येथ । अठ्ठाविसावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















