ग्रामगीता अध्याय एकोणिसावा – 19 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय एकोणिसावा- १९
Gram Gita Chapter 19
ओवी संख्या :- १११
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 19

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय एकोणिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १९
Gram Gita Chapter Nineteenth Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय १९ जीवन – शिक्षण

जीवन – शिक्षण
श्रोतियाने केला प्रश्न । खेडे शहराहूनि महान । ऐसे म्हणतो आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥
शहरात आहे उच्च शिक्षण । ते खेडयात पावेल कोण ? कोणी आला जरी शिकोन । तरी येथे होतो गावंढळ ॥२॥
” नगरामाजी नागरचि होइजे ” । यासाठी शहरचि विद्यार्थ्या पाहिजे । खेडयामाजी ” नांगरचि वाहिजे ” । ऐसे होते ॥३॥
ऐका ऐसी जयांची भावना । लक्ष द्यावे त्यांनी या वचना । येथे शिक्षणाची मूळ कल्पना । तीच चुकली आपुली ॥४॥
दिखाऊ कपडे कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट । हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट । ध्यानी घ्यावे नीट हे आधी ॥५॥
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामी नये बापाची संथा । बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥६॥
व्हावे मोठे बाबूसाहेब । काम जुजबी पैसा खूब । मोठी पदवी दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोचि नये ॥७॥
हे सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावे शिक्षण । जेणे गावाचे वाढेल भूषण । सर्वतोपरी ॥८॥
नुसते नको उच्च शिक्षण । हे तो गेले मागील युगी लपोन । आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥९॥
शिक्षणातचि जीवनाचे काम । दोन्हीची सांगड व्हावी उत्तम । चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी ॥१०॥

मुलात एखादा तरी असावा गुण । ज्याने पोट भरेल त्यात निपुण । नये संसारामाजी अडचण । कोणत्याहि परी ॥११॥
जीवनाच्या गरजा संपूर्ण । निर्वाहाचे एकेक साधन । संबंधित विषयांचे समग्र ज्ञान । यांचा अंतर्भाव शिक्षणी ॥१२॥
नदी तलाव आणि विहिरी । यात पोहणे नानापरी । आपत्ति येता धावोनि तारी । ऐसे शिक्षण असावे ॥१३॥
गावी भोजनाचे असती प्रसंग । स्वयंपाक करता यावा यथासांग । हेहि कला शिकवावी सप्रयोग । मुलांमुलींसि ॥१४॥
असले शिक्षण वाटते साधारण । परि याचे जीवनात अग्रस्थान । नाहीतरि जगावे जनावरासमान । होईल स्वयंपाक न येता ॥१५॥
मुलगी बहु शिकली शाळेमाझारी । परि स्वयंपाक करता नये घरी । काय करावी विद्याचातुरी ? कामाविण लंगडी ती ॥१६॥
अशिक्षित स्वयंपाक करोनि खाई । सुशिक्षित चणे फाकीत राही । दोरास घालता नये वंधाहि । जेथे तेथे पराधीन ॥१७॥
मुलास पंगत वाढता नये । घरचे पाणी भरता नये । आपुल्याच तोर्‍यामध्ये राहे । तरि ते व्यर्थ ज्ञान त्याचे ॥१८॥
घरी ज्याची उणीव पडे । मुलगा धावोनि पुरवी कोडे । धडाडीने कर्म करण्या धडपडे । तरीच शिक्षण कामाचे ॥१९॥
विद्येअंगी व्हावा विनय । विद्या करी स्वतंत्र निर्भय । शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन-जय करावया ॥२०॥

याचसाठी शिक्षण घेणे । की जीवन जगता यावे सुंदरपणे । दुबळेपण घेतले आंदणे । शिक्षण त्यासि म्हणो नये ॥२१॥
गावावर आली गुंडांची धाड । विद्यार्थी दारे लाविती धडाधड । वाडवडिलांच्या अब्रूची धिंड । काय शिक्षण कामाचे ? ॥२२॥
म्हणोनि पाहिजेत बलवान मुले । कुस्ती मल्लखांब खेळणारे भले । धडाडीने प्रतिकारार्थ धजले । तरीच शिक्षण उपयोगी ॥२३॥
ऋषिकालीन ऐसी प्रथा । शिक्षणात होती जीवन-संथा । याकरिता आश्रमांची व्यवस्था । होती पूर्वी ॥२४॥
धनुर्विद्या मल्लविद्या । आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या । उत्तमोत्तम चौदा विद्या । शिकवीत होते आचार्य ॥२५॥
चित्रकला चर्मकला । रांगोळियांचीहि उत्तम कला । बुरडकाम कुंभारकामादि सकला । चौसष्ट कला नानापरी ॥२६॥
संगीतशास्त्र स्वयंपाकशास्त्र । गृह स्थापनेचे सुंदर तंत्र । अश्वपरीक्षा रत्नपरीक्षादि समग्र । जीवनविद्या शिक्षणी ॥२७॥
ऐसी प्रथा पूर्वी होती । आता उच्च ज्ञान घेवोनि येती । परि गावची न सुधारवे शेती । गावच्या उपलब्ध साधनांनी ॥२८॥
शिक्षण झाले वैभवस्थानी । मग गावचे जीवन न बसे मनी । उच्च ज्ञान आणावे साध्या जीवनी । कैसे तेहि कळेना ॥२९
त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालये । गावीच आणावी निश्चये । जी ग्रामजीवन सजवितील चातुर्ये । शिकवोनि जना ॥३०॥

मुलांना शिकवाव्या नाना कला । चापल्य ध्येयनिष्ठादि सकला । गावचि सांभाळू शकेल आपुला । ऐसे द्यावे शिक्षण ॥३१॥
गावासि कैसे आदर्श करावे । याचेचि शिक्षण प्रामुख्ये द्यावे । सक्रियतेने करावयासि लावावे । विद्यार्जनी ॥३२॥
सहकार्याची प्रबल भावना । हेचि शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा । सहकार्यावाचोनि शिक्षणा । महत्त्व नाही ॥३३॥
व्हावे परस्पराशी पूरक । हेचि आहे शिक्षणाचे कौतुक । व्यक्तिनिष्ठतेने भयाण दु:ख । मानव-जीवनी ॥३४॥
जनसेवेचे प्रमाणपत्र । त्यासि महत्त्व यावे सर्वत्र । उद्याचे राष्ट्र आजचे कन्यापुत्र । समजोनि त्यांना सुधारावे ॥३५॥
गावचे सर्वात मुख्य पुत्रधन । त्याचे संरक्षावे चरित्रधन । तेणे गावाचे वाढेल महिमान । चारित्र्यापरी उज्ज्वल ॥३६॥
आपणासि वाटे जैसे गाव व्हावे । तैसेचि बालकांना शिकवावे । शहाणे करोनि सोडावे । विद्याशिक्षणे सर्वचि ॥३७॥
बाळपणीच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई । वळविल्याहि न वळती काही । इंद्रिये त्यांची ॥३८॥
मग तो राही आंगठाछाप । कोणीहि त्याला द्यावी थाप । आयुष्यभरी कष्ट-संताप । भोगीतसे आंधळयापरी ॥३९॥
त्यासि बंद उन्नतीची द्वारे । आयुष्य जाय हमालीत सारे । किसान परि कळेना गोजिरे । शेतीचेहि नवे ज्ञान ॥४०॥

नाही अवजारात सुधारणा । सुधारू न शके पिके नाना । घाण्याच्या बैलापरी धिंगाणा । जीवनाचा त्याच्या ॥४१॥
वडिलाने मुलगा नाही शिकविला । तोहि पापांचा भागीदार झाला । जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला । तैसेचि शिक्षण देणे अगत्याचे ॥४२॥
जरि आपुल्याने व्यवस्था नव्हे । तरि देशोध्दारक संस्थेसि सोपवावे । परि मुलास पतित न ठेवावे । अशिक्षितपणे कधीहि ॥४३॥
आईबापांनी अंगावरि । मुले ठेवू नयेत निरंतरी । सोपवावी बालकांच्या विद्यामंदिरी । रक्षक असतील जे त्यांना ॥४४॥
जन्म देण्याचे काम मातापित्यांचे । शिक्षणाचे काम विद्यागुरूंचे । तेथे आसक्तीने पुत्रधन देशाचे । बिघडवू नये लाडवोनि ॥४५॥
आईबापांचा प्रेमळ चाळा । पुरवी लहान मुलांचा आळा । मुलगा होतो ठोंब्या-भोपळा । अतिलाडाने निकामी ॥४६॥
हे तो विद्यागुरु साहेना । अथवा शिक्षिका चालू देईना । मुलास वळवावे कैसे त्यांना । माहीत असते मानसशास्त्र ॥४७॥
म्हणोनि सर्व गावाने मिळून । काढावे शिशुसंगोपन । बाईबुवास शिक्षण देऊन । नेमावे त्या कार्यासि ॥४८॥
असावे गावीच विद्याभुवन । बालोद्यान शिशुसंगोपन । मुले बाळपणीच त्यात ठेवोनि । वळण द्यावे साजेसे ॥४९॥
आईबापास फुरसत नाही । कामास जाता अडचण येई । मुलाबाळांची आबाळ होई । हे सर्व मिटे विद्याश्रमे ॥५०॥

याचेचि त्यांना असावे शिक्षण । कैसे करावे बालसंगोपन । आपले काम द्यावे नेमून । मुलामुलींना कैशापरी ॥५१॥
कोठेहि मुलांना लहानपणी । व्यसने लागू न द्यावी कोणी । लागताचि घ्यावी झाडणी । शिक्षका-पालकांची ॥५२॥
नाहीतरि एककल्ली । शिक्षण घेवोनि वृत्ति केली । आपण फसोनि दुसर्‍यांची फसविली । मुलेबाले, ऐसे न हो ॥५३॥
म्हणे मी शिक्षणकार्यी लागलो । पवित्र गुरुजी मुलांचा झालो । परि व्यसनांचा अवतार बनलो । म्हणोनि मना धिक्कारीना ॥५४॥
मुलास म्हणे सद्वर्तनी राहा । आपण बिडी पिण्यात वाजवी दहा । मग उष्णतेने बोलतो पहा । साजरा रेलगाडीपरी ॥५५॥
ओळखोनि गावाची जबाबदारी । शिक्षक जिव्हाळयाने काम करी । तरीच गाव होय स्वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ॥५६॥
घरीदारी उत्तम पाठ मिळे । जे जे पाहिजे ते ते कळे । तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे । काम केल्या विकासाचे ॥५७॥
जीवन-विकासाचे शिक्षण । गावीच असावे सर्वसंपन्न । आपुल्याचि ग्रामरचनेचे आयोजन । शोभवाया शिकवावे ॥५८॥
पाठशाळा असावी सुंदर । जेथे मुलीमुले होती साक्षर । काम करावयासि तत्पर । शिकती जेथे प्रत्यक्ष ॥५९॥
सुंदर गाणे बोलणे वागणे । टापटिपीने घरी राहणे । आपले काम आपण करणे । शिकवावे तया ॥६०॥
ऐसे करिता होईल प्रगति । मुले उत्तम विद्यार्थी बनती । थोरथोर उद्योगधंदेहि शिकती । पुढे पुढे ॥६१॥
विद्यार्थी कार्याने सुरवात करी । त्यातचि गणितशास्त्रादि सांवरी । नाहीतरी वाचनपठणचि परोपरी । काही करवेना अंगाने ॥६२॥
म्हणोनि अभ्यासाबरोबरी । सक्रिय करू द्यावी तयारी । मुलगा सर्व कामे करी । जीवनाची आपुल्या ॥६३॥
तो पुढे ज्यात दिसे निष्णात । त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत । होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात । गर्क त्याला ॥६४॥
ऐसे जीवन आणि शिक्षण । यांचे साधावे गठबंधन । प्रथमपासूनचि सर्वागीण । शिक्षण द्यावे तारतम्ये ॥६५॥
जीवनाचे प्रत्येक अंग । शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग । काम करावायची चांग । लाज नसावी विद्यार्थ्या ॥६६॥
मुलगा वरोनि दिसे शिक्षित । काम करताहि दिसे निष्णात । कामाची लाजचि नाही ज्यात । जन्मास आली ॥६७॥
करितो शेताचे निंदण । उपणणे, उतारी, नांगरण । शेण काढावयासहि उत्सुक मन । दिसे जयाचे ॥६८॥
सर्व तर्‍हेचा उद्योगधंदा । कराया लागला मुलगा छंदा । वाढला अभिमान गावचा बंदा । तयार झाला म्हणोनिया ॥६९॥
ऐसी घ्यावी गावे काळजी । मुलांच्या अज्ञानपणामाजी । तरीच गावाचा उत्कर्ष सहजी । होईल तेणे ॥७०॥

अवधी धरला अठरा वर्षांचा । पांग फेडील हजारो पिढयांचा । नमुना बनेल उत्तम गावाचा । विद्यार्जने ॥७१॥
जीवनाचे उज्ज्वल अंग । मुले शिकतील होवोनि दंग । वाढेल गावाचा रागरंग । म्हणाल तैसा ॥७२॥
आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील । गावाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी ॥७३॥
म्हणोनि म्हणतो बालधन । ठेवा गावकर्‍यांनो ! जपून । कोण सांगेल निघतील रत्न । किती गावी ॥७४॥
ईश्वराचे जन्म देणे । आईबापासि निमित्त करणे । विद्यागुरूंचे शिकवणे । भाग्य बने गावाचे ॥७५॥
या कोवळया कळयांमाजी । लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी । विकसता प्रकटतील समाजी । शेकडो महापुरुष ॥७६॥
कितीक होतील सेवाभावी । कित्येक चतुर कलावैभवी । उद्योगधंद्यांनी रंगवी । ग्रामासि आपुल्या ॥७७॥
कित्येक निर्मितील यंत्रागार । कित्येक होतील इतिहासकार । कित्येक होतील सल्लाचतुर । गावी आपुल्या ॥७८॥
कित्येक होतील राजकारणी । कित्येक होतील तत्त्वज्ञानी । कित्येक देतील भूषण मिळवोनि । क्रीडांगणी गावासाठी ॥८०॥
कित्येक संत-उपदेशक । कित्येक वीर-संरक्षक । कित्येक व्यापारनिपुण, सेवक । हरकामी ऐसे ॥८१॥
ऐसा हा साजेल गाव-संच । सर्व गुणांचा आदर्श उच्च । कोणी न दिसेल जीव नीच । आपुल्या गावी संस्कारे ॥८२॥
गावचे राज्य गावचि करी । कोणाचीच न चाले हुशारी । आमुचे आम्हीच सर्वतोपरी । नांदू गावी ॥८३॥
प्रेमे सर्वचि करू सेवा । जेणे सर्व गावासि लाभ बरवा । मग ऐसा कोण उरेल ठेवा । जो न लाभे खेडयामाजी ? ॥८४॥
खेडयात उपजले ज्ञानेश्वरादि । काय उणी त्यांची बळबुध्दि ? श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी । हालवी सूत्रे खेडयातूनि ॥८५॥
म्हणोनि मित्रहो ! ऐका निश्चिती । गावीच मुलांचे शिक्षण घ्या हाती । पांग फिटेल जन्मजाती । सुखी होतील सकळ जन ॥८६॥
कोणी म्हणती जातचि मूर्ख । मुले कैसी निघतील चलाख ? काही जाती मुळातचि चोख । हुशार असती शिक्षणी ॥८७॥
ही कल्पनाहि चूक असे । भेद मुळामाजी नसे । तो परंपरागुणे भासे । वातावरणाच्या योगे ॥८८॥
एकाचा बाप न्यायाधिकारी । काका करतो प्रोफेसरी । मामा कथाकीर्तन करी । मग तो हुशार का नोहे ? ॥८९॥
भोवती बुध्दिवंतांचा मेळावा । खावया सत्त्वशील मेवा । घरीदारी सहवास बरवा । त्याची उन्नति सहजचि ॥९०॥

बाप गुराखी आणतो मोळी । चुलता विकतो बांगडयाचोळी । मामा सरकारी नोकरी सांभाळी । परि तो शिपाई-चपराशी ॥९१॥
खावयासि कळणाकोंडा । संगतीस ढोरांचा तांडा । परि तो अभ्यासे पुढे जाय थोडा । तरी कौतुक का न करावे ? ॥९२॥
त्याला सहवास उत्तम द्यावा । दर्जा जीवनाचा वाढवावा । त्याने समाज होईल नवा । ज्ञानवंतांचा निर्माण ॥९३॥
हे होण्यास पाहिजे शिक्षण । शिक्षणाशिवाय व्यर्थचि भाषण । हे कळेल तेव्हाचि जन । सुशिक्षित होतील ॥९४॥
नाहीतरि पूर्वजांनी मूर्खपण केले । ते मुलाबाळास भोगणे आले । लौकरि सुधारेना एकदा चुकले । दोष चाले कुळी सार्‍या ॥९५॥
घराण्यात एकाने पाप करावे । पिढीजात पुढेहि तेचि भोवे । ऐसे चालू आहे हे स्वभावे । लोकामाजी ॥९६॥
मागील कलंक धुण्यासाठी । पुढे घडावे पुण्य गाठी । तरीच सुटते बदनामी पाठी । लागलेली सारी ॥९७॥
एकाने सदगुण आचरिले । नांव त्याचे दिगंतरी गेले । पुढे पुत्र वांढाळ झाले । तरी कीर्ति मुरेना ॥९८॥
खपती सारे मागील नांवे । जो तो म्हणे वडिलांस बघावे । कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे । घराण्यामाजी ॥९९॥
परि त्याहूनि घडले पाप अधिक । नांवाचा वाजा झाला आणिक । मग न विचारी मागील कौतुक । ” काय झाले ” कोणीहि ॥१००॥

चाले तीच परंपरा । जोवरि विशेष न घडे पुत्रपौत्रा । ऐसीच आहे नामयात्रा । इहलोकीची ॥१०१॥
एक एकवीस कुळे उध्दरितो । एक बेचाळीस कुळे बदनाम करतो । सारांश, विशेष घडल्यावरीच होतो । पालट नांवा ॥१०२॥
रावण पवित्र ब्रह्मकुळीचा । राक्षस ठरे वंशचि त्याचा । विश्वमित्र राजर्षीचा । ब्रह्मर्षि होय विशेषत्वे ॥१०३॥
ऐसा विशेष कृतीचा महिमा । जाणोनि करावे परिश्रमा । उध्दरावे आपल्या कुळा ग्रामा । शिक्षण देवोनि नेटाने ॥१०४॥
गोरगरीबांची मुले असती । ज्यासि नाही शिक्षणाची शक्ति । त्यासि सरकार वा जनपदाहाती । देवोनि शिक्षण पुरवावे ॥१०५॥
असतील भिकार्‍यांची मुले । शिक्षण देवोनि करावे चांगले । पुण्य लाभेल पांग फेडले । त्यांचे म्हणोनि गावासि ॥१०६॥
असोत गरीब किंवा धनिक । मुलास विद्या शिकवाव्या अनेक । गावाने संपत्ति पुरवावी अधिक । याच मार्गी ॥१०७॥
यातचि वेचावे खूप धन । करावे पूर्वजांचिया नांवाने दान । विद्यालये झालिया पवित्र संपन्न । गाव होईल स्वर्गपुरी ॥१०८॥
आदर्श होतील विद्यार्थीगण । गावाचे पालटेल जीवन । कोठेच न उरेल गावंढळपण । टिकाऊ परिवर्तन या मार्गे ॥१०९॥
विद्यामोले ऐसे चढता । येईल भाग्य गावाचे हाता । तुकडयादास म्हणे तत्त्वता । विसरू नका हा मूळमंत्र ॥११०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ । एकोणिसावा अध्याय संपूर्ण ॥१११॥

ग्रामगीता अध्याय एकोणिसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading