४ फेब्रुवारी, दिवस ३५, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०९ ते ४२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“४ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक ४ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

201-3
पतंगा दीपी आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवी विषयाचरण । आत्मघाता ॥201॥
पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याचक्षणी त्याला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेणे, हे माणसाच्या नाशाला कारणीभूत होते.
(विषयाला आलिंगन देणे, त्याचा उपभोग घेण्याचा विचार सुद्धा उत्पनं होणे)
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥3. 33॥

ज्ञानी आपल्या स्वभावाला अनुसरून वागत असतात. महाभूते देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात. मग या विषयात कोणाचा हट्ट काय करेल ?
202-3
म्हणोनि इंद्रिये एके । जाणतेनि पुरुखे । लाळावी ना कौतुके । आदिकरूनि ॥202॥
म्हणून जाणकार, कोणीहि शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत.
203-3
हा गा सर्पेंसी खेळो येईल । की व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥203॥
अरे, विषारी सर्पबरोबर कधी खेळता येईल काय ? किंवा वाघाशी ठेवलेली संगत काधि निटपणे शेवटास जाईल काय ? तूच सांग आता. हलाहल विष प्राशन केले, तर ते पचेल काय ?
204-3
देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥204॥
सहज खेळता खेळता आग लागली आणि ती भडकली (ज्वाला भडकल्या) तर ती अटोपत नाही, (सावरता येत नाही), त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांचा लळा जर लागला (त्यांचे लाड केले), तर त्याचा परिणाम कधीहि चांगला होत नाही.
205-3
एर्‍हवी तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । का नाना भोगरचना । मेळवावी ॥205॥
हे अर्जुना ! एरव्ही सहज विचार करून पहिले, तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन असलेले दिसून येते (परतंत्र असलेल्या शरीराकरिता). तर मग या शरीराकरिता नाना प्रकारचे भोग का म्हणून जमवावेत ?


206-3
आपण सायासेंकरूनि बहुते । सकळहि समृद्धिजाते । उदोअस्तु या देहाते । प्रतिपाळावे का ॥206॥
आपण अतिशय कष्ट करून मिळवलेली सर्व संपत्ती, समृद्धी खर्च करून (उत्पत्ती व नाश) नाश पावणाऱ्या या शरीराचे पालन का बरे करावे ?
207-3
सर्वस्वे शिणोनि एथे । अर्जवावी संपत्तिजाते । तेणे स्वधर्मु सांडुनी देहाते । पोखावे काई ॥207॥
देहाला नाना प्रकारचे कष्ट देऊन, दमून – भागून संपत्ती मिळवावी आणि स्वधर्मचा त्याग करून, नाश पावणाऱ्या या देहाचे पोषण करीत राहावे, हे योग्य आहे काय ?
208-3
मग हे तव पांचमेळावा । शेखी अनुसरेल पंचत्वा । ते वेळी केला के गिंवसावा । शीणु आपुला ॥208॥
हे शरीर पंचमहाभूते एकत्र येऊन तयार झाले आहे व ते शेवटी पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. त्यावेळी आपण केलेले एव्हढे कष्ट कोठे बरे शोधून काढावेत ?
209-3
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणे उघडी नागवण । यालागी एथ अंतःकरण । देयावे ना ॥209॥
म्हणून फक्त देहाचे पोषण करणे, हे उघड उघड आपले मोठे नुकसान आहे (हे शरीर नश्वर आहे हे जाणून सुद्धा), याकरिता (मनुष्याने) तू देहाच्या पोषणाकडेच अंतःकरणापासून लक्ष देऊ नकोस.
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥3. 34॥
भावार्थ :-

प्रत्येक इंद्रियांची अनुकूल-प्रतिकूल विषयाविषयी (आवड – नावड) राग – द्वेष ही ठरलेली आहेत. मनुष्याने त्या राग – द्वेषाच्या अधीन होऊ नये (ताब्यात जाऊ नये). कारण ते परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू आहेत.
210-3
एर्‍हवी इंद्रियाचिया अर्था – । सारिखा विषयो पोखिता । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥210॥
एरव्ही, इद्रियांच्या इच्छेप्रमाणे सेवन केले (आचरण केले), तर मनाला संतोष प्राप्त होतो, हे खरे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-3
परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु । जव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥211॥
परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे; तो चोर गावाची सीमा पार करेपर्यंत गप्प असतो आणि वनात (एकटे आहोत असे समजता क्षणी) घात करून पैसे काडून घेतो.
212-3
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारिता । प्राणु हरी ॥212॥
बाबारे ! विष वरून मधुर वाटेल, मनात ते प्राशन करण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल; परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते प्राणघातक आहे.
213-3
देखे इंद्रियी कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळी मीनु आमिषे । भुलविजे गा ॥213॥
पाहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बरोबर भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची तीव्र लालसा मनुष्यास खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते.
214-3
परी तयामाजि गळु आहे । जो प्राणाते घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणे ॥214॥
परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, तो आपला नाश करेल, हे त्या माशाला (आमिषाने तो गळ झाकला गेल्यामुळे) ज्याप्रमाणे कळत नाही,
215-3
तैसे अभिलाषे येणे कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥215॥
त्याप्रमाणे विषयांची लालसा निर्माण झाली, की मानवाची तशीच अवस्था होते. जर विषयांची तीव्र इच्छा धरली, तर मानवाला क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते.


216-3
जैसा कवळोनिया पारधी । घातेचिये संधी । आणि मृगाते बुद्धीं । साधावया ॥216॥
ज्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरिणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून एके ठिकाणी बरोबर आणत असतो, (मराच्या कचाटीत)
217-3
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणे ॥217॥
विषयांच्या सुखाचा देखील प्रकार असाच आहे. म्हणून तू विषयांची संगती करू नकोस. पार्था ! विषयांच्या मागे लागलास तर काम, क्रोध निर्माण होतात आणि हे दोन्ही (परमार्थाच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आहेत) घात करणारे आहेत.
218-3
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासो नेदी ॥218॥
म्हणून विषय इच्छेला थाराच देऊ नये. त्यांची मनातही आठवण आणू नये. स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नकोस.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥3. 35॥
भावार्थ :-

सुलभ पद्धतीने आचरिलेल्या परम धर्मापेक्षा, स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा (आचरण्यास कठीण) असला, तरी स्वधर्मच कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे, स्वधर्मात मरण आले; तरी चांगले.
219-3
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि का कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखे ॥219॥
असे पाहा की, आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय.
220-3
येरू आचारु जो परावा । तो देखता कीर बरवा । परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥
दुसऱ्याचा धर्म जरी दिसावयास चांगला असला, तरी आचरण करणार्यांनी आपल्या विहित कर्माचेच आचरण करावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


221-3
सांगे शूद्रघरी आघवी । पक्वाने आहाति बरवी । ती द्विजे केवी सेवावी । दुर्बळु जरी जाहला ॥221॥
(स्वधर्माचे आचरण करणारा) ब्रम्हज्ञान जाणणारा मनुष्य जरी गरीब असला, तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्ये कशी बरे सेवन करावीत. ? सांग.
222-3
हे अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवी इच्छिजे । अथवा इच्छिलेही पाविजे । विचारी पा ॥222॥
असे अनुचित कर्म कसे बरे करावे ? जे ग्रहण करण्यास योग्य नाही, त्याची (त्या अन्नाची) इच्छा कशी करावी ? अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला, तरी त्याचे सेवन करावे का ? याचा तू विचार कर.
223-3
तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । असती आपुली तणारे । मोडावी केवी ॥223॥
दुसऱ्याची पांढरीशुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात ?
224-3
हे असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली । तरी भोगिता तेचि भली । जियापरी ॥224॥
हे असू दे. आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली तरी, ज्याप्रमाणे तिच्याबरोबर सुखाने संसार करावा हे चांगले;
225-3
तेवी आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु । तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥225॥
त्याप्रमाणे आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला, तसेच करताना कितीही आपत्ती आली, तरी आपला स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे.

दिवस ३५ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०९ ते ४२०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 409
आपुले मागता । काय नाही आम्हा सत्ता ॥१॥
परि या लौकिकाकारणे । उरी ठेविली बोलणे ॥धृपद॥
येचि आता घडी । करू बैसो तेची फडी ॥२॥
तुका म्हणे करितो तुला । ठाव नाहीसे विठ्ठला ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुम्हाला काही मागत आहोत तर ते आमचेच मागत आहोत आणि ते देखील आम्हाला मागायची सत्ता नाही की काय ? परंतु देवा आम्ही तुला जबरदस्ती करून ती गोष्ट मागितली तर तुझा अपमान होईल या लौकिकामुळे आम्ही आमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती मनातच ठेवली आहे. परंतु देवा आता याच घटकेला बसून आपल्यात काय निर्णय असेल त्याचा निकाल लावू. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला आता मी तुझा ठावठिकाणा नाहीसा करतो म्हणजे तुला चांगले समजेल. (म्हणजेच या अभंगात महाराज म्हणतात की देव नाम व रूप याच्याही पलीकडे आहे आणि तो ते मी जाणत आहे. )
अभंग क्र. 410
असो आता किती । तुज यावे काकुलती ॥१॥
माझे प्रारब्ध हे गाढे । तू बापुडे तयापुढे ॥धृपद॥
सोडवीन आता । ब्रीदे तुझे पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । गांढयाचे कान पिळी ॥३॥
अर्थ
देवा आता तुला किती वेळा काकुळतीला यावे ? माझे प्रारब्ध फारच बलवान आहे त्या पुढे तू सुद्धा दुबळा ठरतोस. हे पंढरीनाथा तू आता धारण केले तुझे पतितपावन दीनदयाला दिनबंधू हि ब्रिदे मी तुला सोडून द्यायला लगीन. तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो (गांढ्याचे) दुर्बळाचे कान पिळतो, असा नियमाच आहे.
अभंग क्र. 411
काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्व साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥धृपद॥
योगायाग तपे । केली तयाने अमुपे ॥२॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्री अक्षरी सोपा ॥३॥
अर्थ
एका विठ्ठलाचे नाम चिंतन केले असता काय एक होत नाही ? सर्व काही चिंतनाने प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. ते भवसागरातून तरुण नेते. त्याने असंख्य तपे व व्रते केल्याचे आणि याग करण्याचे पुण्य मिळते. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून भक्तजन हो, विठ्ठल हा तीन अक्षरी नाम जप तुम्ही श्रद्धेने करा.
अभंग क्र. 412
हो का दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेसहित ॥धृपद॥
नसो भाव चित्ती । हरीचे गुण गाता गीती ॥२॥
करी अनाचार । वाचे हरीनामउच्चार ॥३॥
हो का भलते कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥
म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥
अर्थ
जरी एखादा दुराचारी मनुष्य असेल परंतु अनु तापाने तो वाचेने विठ्ठल नामाचा उच्चार करत असेल, तर, त्याचा मी सर्वथा दास आहे. हरीचे गुणानुवाद गाताना प्रथम प्रथम तीव्र भावभक्ती चित्तात नसेलही तरी नाम घ्याच. अनाचार करणारासुद्धा जर वाचेने हरिनामाचा उच्चार करीत असेल, त्याचे कुळ अशुद्ध असेल तरी, त्याने काही बाधा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्याला हरीचा दास म्हणवितो, धन्यच आहे.
अभंग क्र. 413
हाकेसरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवाचून ॥धृपद॥
करिता आठव । धावोनिया घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गाता । नामे द्यावी सायुज्यता ॥३॥
अर्थ
भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रकट झाले. अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई माऊलीहून दुसरी कोण आहे ? तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचेनाम गीतात आळवावे. त्याने सायुज्य मुक्ती मिळते.
अभंग क्र. 414
लोह चुंबकाच्या बळे । उभे राहिले निराळे ॥१॥
तैसा तूचि आम्हाठायी । खेळतोसी अंतर्बाही ॥धृपद॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वाचवी मोहरा ॥२॥
तुका म्हणे अधीलपणे । नेली लाकडे चंदने ॥३॥
अर्थ
चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा तू आमच्या आकर्षणाने आताही व बाहेरही उभा राहतोस. दोरा जळणारा आहे, पण तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून टाकला तर तो जळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षांचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो.
अभंग क्र. 415
डोई वाढवूनि केश । भूते आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हति संतजन । तेथे नाही आत्मखुण ॥धृपद॥
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥२॥
तुका म्हणे मैंद । नाही त्यापासी गोविंद ॥३॥
अर्थ
असे अनेक लोक आहेत की जे डोक्यावर केस वाढतात व अंगामध्ये भुताचा संचार आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत, कारण ती आत्मानुभवाची खूण नसते. काही लोक, पुरुष आणि बायका जमुन अनेक प्रकारचे शकून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात पण असल्या लबाड, (मैंद) डोंगी माणसाजवळ गोविंद राहत नाही.
अभंग क्र. 416
गाढवाचे घोडे । आम्ही करू दृष्टीपुढे ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥धृपद॥
सोंगसंपादनी । तरि करू शुद्ध वाणी ॥२॥
तुका म्हणे खळ । करू समयी निर्मळ ॥३॥
अर्थ
गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू. म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू. असा मनुष्य वारंवार वाहणा चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो. जरी असा मनुष्य ढोंगी पाणाने वागत असला तरी त्याची वाणी सुद्धा आम्ही शुध्द करू. तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला, खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू.
अभंग क्र. 417
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसर्‍याचे काज ॥धृपद॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥
पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥
माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
अर्थ
महाराज म्हणतात ज्या वेळी मला संसाराची काहीच चिंता नव्हती त्याचवेळी माझा बाप मेला, माझी बायको मेली मुक्त झाली, सुटली मी पण सुटलो. फार बरे झाले देवाने मला माये पासून सोडविले. माझा पोरगा मेला ते हि बरे झाल. देवाने माये पासूनच सोडवले. तुकाराम महाराज म्हणतात माझी आई माझ्या समक्षच वारली तेही बरे झाले तिचे कसे होईल हि चिंता देखील हरली.
अभंग क्र. 418
न लगे मरावे । ऐसा ठाव दिला देवे ॥१॥
माझ्या उपकारासाठी । वागविला म्हणु कंठी ॥धृपद॥
घरी दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥
तुका म्हणे एके ठायी । केले माझे तुझे नाही ॥३॥
अर्थ
देवाने मला अशा ठिकाणी आश्रय दिला आहे की जेथे मरणच नाही. त्याचे असे माझ्यावर उपकार असल्यामुळे मी त्याला माझ्या कंठात धारण केले आहे. हरीने आपल्या पूर्णतेच्या घरी मला आश्रय दिला, त्यामुळे बाकी सर्व पोकळ वाटू लागलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाने त्याचे आणि माझे असे ऐक्य केले कि तेथे माझे आणि तुझे हि भाषाच नाही.
अभंग क्र. 419
नाही लाग माग । न देखेसे झाले जग ॥१॥
आता बैसोनिया खावे । दिले आइते या देवे ॥धृपद॥
निवारिले भय । नाही दुसऱ्याची सोय ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायाचे काम नाही ॥३॥
अर्थ
ज्या ठिकाणी जाऊन मला जगच दिसणार नाही आणि ज्या मार्गाचा मागमूसही कोणाला लागणार नाही अशा ठिकाणी देवाने मला बसविले आहे (सच्चिदानंदपद) . अशी हि आयती स्वरूप देणगी देवाने दिल्या मुळे आता मी जगाच्याजागीच बसून तो आनंद उपभोगतो. त्या ठिकाणी भय मुळीच नाही कारण भयाचे मुळ म्हणजे द्वैत, त्याचा तेथे संबंधच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता बोलण्याचे कामच उरले नाही
अभंग क्र. 420
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हेचि आता लागे करावे जतन । तुझे थोरपण तुज देवा ॥धृपद॥
होउनी निर्भर राहिलो निश्चिंत । पावनपतित नाम तुझे ॥२॥
करिता तुज होय डोंगराची राई । न लागता काही पात्या पाते ॥३॥
तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारिता मशक मज दीना ॥४॥
अर्थ
देवा मी तुझा अंकित दास आहे असे सर्वच लहानथोर म्हणत आहेत. देवा आता तुला हा आपला मोठे पणा राखला पाहिजे. पतितपावन असे तुझे नांव आहे. हे जाणून मी निश्चिंत पणे राहिलो आहे. तुझा पराक्रम असा आहे कि, पापणी लावते न लावते तेवढ्यात तू डोंगराची राई करशील (मोठे पापही नष्ट करशील) . तुकाराम महाराज म्हणतात मी तर ऐखाद्या मशका प्रमाणे शुल्लक आहे, दिन आहे असे असताना मला तरणे तुला अश्यक्य आहे का ?

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading