२४ फेब्रुवारी, दिवस ५५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ६४९ ते ६६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक २४ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

26-6
ऐसे हळुवारपण जरी येईल । तरीच हे उपेगा जाइल । एरव्ही आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥26॥
असे जर ब्रम्हस्वरूपाशी एकरूप होता येईल, तरच मी सांगितलेल्या निरुपणाचा उपयोग होईल; नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे, अशी अवस्था होईल.
27-6
परी ते असो आता आघवे । नलगे श्रोतयाते कडसावे । जे एथ अधिकारिये स्वभावे । निष्कामकामु ॥27॥
परंतु आता हे सर्व असु दे. श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रह्मची इच्छा करणारे अधिकारसंपन्न श्रोते आहेत,
28-6
जिही आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी । ते वाचुनी एथीची गोडी । नेणती आणिक ॥28॥
ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने, संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे, अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्मातील अमृतमधुर गोडी समजू शकणार नाहीत.
29-6
जैसा वायसी चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृती नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजे । चकोराचे ॥29॥
ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्रांतून प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयामध्ये आसक्त लोकास हे प्रतिपादन समजणार नाही; आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे चकोराचे खाद्य आहे,
30-6
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गावो । म्हणौनि बोलावया विषय पहाहो । विशेषे नाही ॥30॥
त्याप्रमाणे जे अध्यात्मज्ञानी / आत्मज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रन्थ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे बाह्य विषयातच रमणारे अज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे, म्हणून याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-6
परी अनुवादलो मी प्रसंगे । ते सज्जनी उपसाहावे लागे । आता सांगेन काय श्रीरंगे । निरोपिले जे ॥31॥
प्रसंगाने मी जे बोललो, त्याबद्दल सज्जनांनी मला क्षमा करावी, आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले, ते मी सांगेन.
32-6
ते बुध्दीही आकळिता सांकडे । म्हणऊनि बोली विपाये सापडे । परि निवृत्तिकृपादीपउजियेडे । देखेन मी ॥32॥
ते परब्रम्ह बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, परंतु शब्दातअधिकारसंपन्न पुरुषास सापडेल. परंतु मी सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपाप्रकाशात परब्रम्ह प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वाना सांगेन.
33-6
जे दिठीही न पविजे । ते दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥33॥
जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले, तर जे दृष्टीला दिसत नाही, ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते.
34-6
ना तरी जे धातुवादाही न जोडे । ते लोहीचि पंधरे सापडे । जरी दैवयोगे चढे । परिसु हाता ॥34॥
जर दैवयोगाने हातात परीस आला, तर किमयागारास जे न मिळणारे, ते सोने लोखंडात सापडते.
35-6
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करिता काय आपु नोहे । म्हणौनि ते अपार माते आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥35॥
त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती कृपा अपार / अलोट आहे.


36-6
तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवी ॥36॥
त्या सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने मी बोलू शकेन. ब्रम्ह हे अरुप असले, तरी मी त्याचे स्वरूप दाखवीण. ते अतेंद्रिय खरे; परंतु ते इंद्रियकडुन भोगवीन.
37-6
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥37॥
हे पाहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात;
38-6
म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आता ॥38॥
म्हणून त्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात. जो सर्वसंग परित्याग करणाऱ्यांच्या सोबती आहे, तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे.
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥6. 1॥
भावार्थ :-

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करता विहित कर्म करतो, तो संन्यासी व योगी आहे. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी नाही.
39-6
आइके योगी आणि संन्यासी जनी । हे एकचि सिनाने झणी मानी । एऱ्हवी विचारिजती जव दोन्ही । तव एकचि ते ॥39॥
हे अर्जुना ! ऎक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत, असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पहिले, तर दोन्ही एकच आहेत.
40-6
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहाता ब्रह्मी नाही अवकाशु । दोहीमाजी ॥40॥
संन्यास आणि योग या दोन नावांचा भ्रम टाकून दिला, तर योग संन्यास व संन्यास तोच योग होय. तत्वतः जाणले, तर ब्रम्हस्वरूपाच्या ठिकाणी या दोघात भेदाला अवकाश / अंतर नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-6
जैसे नामाचेनि अनारिसपणे । एका पुरुषाते बोलावणे । का दोही मार्गी जाणे । एकचि ठाया ॥41॥
ज्याप्रमाणे (अण्णा, काका, बाबा किंवा दादा) एकाच पुरुषास वेगवेगळ्या नावानी हाक मारतात, किंवा काही ठिकाणी दोन मार्ग असतात; पण दोन्ही मार्गानी एकाच स्थानास आपण पोहचतो,
42-6
नातरी एकचि उदक सहजे । परी सिनाना घटी भरिजे । तैसे भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचे ॥42॥
किंवा स्वभावतः सर्व पाणी एकच असते; परंतु निरनिराळ्या घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे साधनमार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापूरता आहे.
43-6
आइके सकळ संमते जगी । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्मे करुनि रागी । नोहेचि फळी ॥43॥
हे अर्जुना ! ऎक. जो सत्कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगी योगी होय. हे सर्व संत – म्हणतांना मान्य आहे.
44-6
जैसी मही हे उद्भिजे । जनी अहंबुध्दीवीण सहजे । आणि तेथीची तिये बीजे । अपेक्षीना ॥44॥
ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्ष वेलींना जन्म देते; पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो, तसेच वृक्षाला लागलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही,
45-6
तैसा अन्वयाचेनि आधारे । जातीचेनि अनुकारे । जे जेणे अवसरे । करणे पावे ॥45॥
त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्मप्रमाणे ज्या काळी जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे,


46-6
ते तैसेचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरी । आणि बुध्दीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥46॥
ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या अपेक्षेकडे जाऊ देत नाही,
47-6
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसी । तोचि भरवसेनिसी । योगीश्वरु ॥47॥
हे अर्जुना ! ऎक. असा जो पुरुष, तोच संन्यासी आणि निःसंशय योगीराज आहे असे समज.
48-6
वाचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयाते म्हणे हे सांडीन बध्दक । तरी टांकोटांकी आणिक । मांडिचि तो ॥48॥
याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म, त्याला बंधनकारक म्हणतो, तो पहिले कर्म त्यागताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो.
(दुसरे कर्म करण्याचे आरंभीतो)
49-6
जैसा क्षाळुनिया लेपु एकु । सवेचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वाया ॥49॥
जसे अंगाला लावलेला एक लेप धुऊन ताबडतोब दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे जो आग्रही असतो, तो व्यर्थच विवंचना करत बसतो. (कष्टात पडतो)
50-6
गृहस्थाश्रमाचे वोझे । कपाळी आधीच आहे सहजे । की तेचि संन्याससवा ठेविजे । सरिसे पुढती ॥50॥
आधीच डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला, तर त्याचबरोबर पुनः संन्यास – आश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ५५ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६४९ ते ६६०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ६४९
करी ऐसे जागे । वेळोवेळा पाया लागे ॥१॥
प्रेम झोंबे कंठी । देह धरणिये लोटी ॥धृपद॥
राहो लोकाचार । पडे अवघा विसर ॥२॥
तुका म्हणे ध्यावे । तुज व्यभिचारभावे ॥३॥
अर्थ
कायम तुझ्या पाया पडून तुला आम्ही जागे करतो. तुझे प्रेम आमच्या कंठात ठसलेले राहो. माझा देह कायम तुम्हाला लोटांगण घालो. आता माझा लोकाचार नाहीसा होवो, मला सर्वाचा विसर पडो. तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभू मला तुझे व्यभिचार भावाने ध्यान घडो.
अभंग क्र. ६५०
टाळ दिंडी हाती । वैकुंठीचे ते सांगाती ॥१॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥धृपद॥
जाती सादावीत । तेथे असो द्यावे चित्त ॥२॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥
अर्थ
टाळ विणा हे वैकुंठाचे मार्ग आहे. ज्यांना कोणाला वैकुंठाला जायचे आहे त्यांनी हरीच्या दासा बरोबर त्यांच्या सोबत जावे. व पुण्याची शिदोरी लवकर तयार करावी ते सर्वाना साद देत आहेत तिकडे सर्वानी लक्ष द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व वैष्णव विठ्ठलाचे नांव मोठ मोठ्याने घेत व गात जात आहेत.
अभंग क्र. ६५१
वाया जातो देवा । नेणे भक्ती करू सेवा ॥१॥
आता जोडोनिया हात । उभा राहिलो निवांत ॥धृपद॥
करावे ते काय । न कळे अवलोकितो पाय ॥२॥
तुका म्हणे दान । दिले पदरी घेईन ॥३॥
अर्थ
हे, देवा मी वाया जात आहे. मला भक्ती व सेवा कशी करावी ते कळत नाही. आता तुमच्या पुढे हात जोडून मि निवांत उभा आहे. आणखी काय करावे ते कळत नाही म्हणून तुमचे पाय अवलोकित आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या प्रकारचे दान माझ्या पदरात घालाल ते दान मी घेईन.
अभंग क्र. ६५२
जीवीचा जिव्हाळा । पाहो आपुलिया डोळा ॥१॥
आम्हा विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥धृपद॥
पुंडलिकाचे पाठी । उभा हात ठेवुनि कटी ॥२॥
तुका म्हणे चित्ती । वाहू रखुमाईचा पती ॥३॥
अर्थ
जीवाच्या जिव्हाळ्याला आम्ही डोळ्याने पाहू. आम्हाल विठ्ठल हा एकच देव आहे बाकी सर्व व्यर्थ आहे. तो पुंडलिकाच्या पाठीशी कटेवर हात ठेऊन उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात रखुमाईचा पती विठ्ठल आम्ही आमच्या चित्ता मध्ये धरून राहू.
अभंग क्र. ६५३
जीव खादला दैवते । माझा येणे महाभूते । झोंबले निरुते । काही करिता न सुटे ॥१॥
आता करू काय । न चले करिता उपाय । तुम्हा आम्हा सये । विघडाविघड केली ॥धृपद॥
बोलता दुश्चिती । मी वो पडियेले भ्रांती । आठव हा चित्ती । न ये म्हणता मी माझे ॥२॥
भलतेचि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळे । आपपर सारिखे ॥३॥
नका बोलो सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहे । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥
तुम्हा आम्हा भेटी । नाही जाली जीवेसाठी । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥५॥
अर्थ
व्दैत रुपी बुद्धीला अव्दैत रूपी बुद्धी म्हणते, महाभूत रूपी विष्णू दैवताने माझा जीव खाल्ला आहे अशाप्रकारचे भूत माझ्या अंगाला लागले आहे ते काही केल्या माझ्या शरीराला सोडत नाही. ते भूत काही केल्या माझ्यापासून वेगळेच होत नाही त्याच्यापुढे काही उपायही चालत नाही. या महाभूताने तुझा (व्दैतबुद्धे) व आमचा विघडा विघड केला म्हणजे वियोग केला आहे. असे बोलताना अरे मी भ्रांतीत पडलो मला मी म्हणण्याचे सुद्धा भान राहिले नाही. मी भलतेच बरळतो आहे. लोकापासून मी वेगळा झालो आहे, मला माझे मुल बाळ काही आठवत नाही. सये (व्दैतबुद्धे) तू मुळीच बोलू नको कारण मला एक शब्दही सहन नाही. वाचा खुंटोनी (बंद) करून ज्यांना इथे बसायचे असेल त्यांनी राहावे. तुकाराम महाराज म्हणतात तुझी व माझी भेट यापुढे होणारच नाही. तुम्ही निट पहा, माझा जीवच हरी रूप झाला आहे हरी माझ्या नेहमी दृष्टी जवळ आहे हे तुम्हाला दिसून येईल.
अभंग क्र. ६५४
माझे आराधन । पंढरपुरीचे निधान ॥१॥
तया एकाविण दुजे । काही नेणे पंढरीराजे ॥धृपद॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायीचा ॥२॥
तुका म्हणे आता । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
अर्थ
माझे आराध्य द्वैवत हे पंढरपूरचा विठ्ठल हाच आहे. त्या एक पंढरीराया वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही. मी विठ्ठलाचा दास आहे, त्याच्या ठिकाणी मी अंकित आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता काही झाले तरी माझ्या बुद्धीत कोणताही अथवा कुठलाही पालट होणार नाही.
अभंग क्र. ६५५
आता आम्हा हेचि काम । वाचे गाऊ तुझे नाम । वाहुनिया टाळी प्रेम । सुखे आनंदे नाचावे ॥१॥
अवघी जाली आराणूक । मागे पुढे सकिळक । त्रिपुटीचे दुःख । प्रारब्ध सारिले ॥धृपद॥
गोदातटे निर्मळे । देव देवांची देवळे । संत महंत मेळे । दिवस जाय सुखाचा ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाही मज चिंता । योगक्षेम माथा । भार तुझ्या घातला ॥३॥
अभंग क्र. ६५६
चोरटे सुने मारिले टाळे । केंउ करी परि न संडी चाळे ॥१॥
ऐसे एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥धृपद॥
नाक गेले तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारी ॥२॥
तुका म्हणे कर्म बळिवंत गाढे । नेदी तया पुढे मागे सरो ॥३॥
अर्थ
चोरट्या कुत्र्याला कितीही मारले तरी ते मोठ्याने ओरडते, परंतु आपले चाळे ते सोडत नाही. देवा, अश्या प्रकारचे जे दुराचारी असतात ते आपल्या जीवाचा स्वतःच घात करून घेत असतात. त्यांचे नाक कापले तरी त्यांना काही फरक पडत नाही. फजित खोर होऊन दारोदारी हिंडत असतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे कर्म हे फार बलवान असते त्यांना ते चांगल्या मार्गाकडे सरू देत नाही.
अभंग क्र. ६५७
मुनि मुक्त झाले भेणे गर्भवासा । आम्हा विष्णुदासा सुलभ तो ॥१॥
अवघाचि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥धृपद॥
पुराणी उपदेश साधन उद्भट । आम्हा सोपी वाट वैकुंठाची ॥२॥
तुका म्हणे जना सकळांसहित । घेऊ अखंडित प्रेमसुख ॥३॥
अर्थ
मुनी ऋषी हे गर्भावासाच्या भेणे मुक्ती मार्गाला लागले, परंतु आम्हा विषाणू दासांना हा गर्भवास अतिशय सोपा आहे. आमचा सर्व संसार हा ब्रम्हरूप झाल आहे, म्हणून आमचे पूर्ण जीवन विठ्ठल रूप होऊन गेले आहे. पुराणात वैकुंठ प्राप्तीच्या अवघड साधना सांगितल्या आहे. मात्र आम्हाला वैकुंठाची वाट अतिशय सोपी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व लोकासहित ईश्वराच्या प्रेमाचा आंनद अखंड पणे अनुभवत राहू.
अभंग क्र. ६५८
न करावी स्तुति माझी संतजनी । होईल या वचनी अभिमान ॥१॥
भारे भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥
अर्थ
माझी तुम्ही संत जनांनी स्तुती (मी साधू आहे) करू नये, त्यामुळे मला अभिमान होईल. या भाराने मला भवनदी तून पार होता येणार नाही. तसेच तुम्हा संत सज्जनांचे पाय दुरावतील. तुकाराम महाराज म्हणतात माझी स्तुती केली तर मला गर्व होईल आणि त्यामुळे विठ्ठलाचा आणि माझा वियोग होईल.
अभंग क्र. ६५९
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हाती संतजनी ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे । उत्तरेन खरे भवनदी ॥३॥
अर्थ
हे संतजन हो तुमच्या दासांचाही दास मला करा. हाच आशीर्वाद माल द्यावा. नवविधा भक्तीचे जे वर्णन आहे जी बोलली जाते ती भक्ती तुम्ही माझ्या कडून करून घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाच्या आधारे मी भवनदी सहज तरुन जाईल.
अभंग क्र. ६६०
चोरटे काचे निघाले चोरी । आपले तैसे पारखे घरी ॥१॥
नाही नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥धृपद॥
बुद्धीहीन नये काहीचि कारणा । तयासवे जाणा तेचि सुख ॥२॥
तुका म्हणे नाही ठाउके वर्म । तयासी ते कर्म वोढवले ॥३॥
अर्थ
एक साधा चोर चोरी करण्यास निघाला, तो स्वतःच्या घरात जसा वावरतो तसे दुसऱ्याच्या घरी वावरू लागला. त्यामुळे त्या घराचा मालक जागा झाला. त्यामुळे चोराचा काहीही फायदा झाला नाही. उलट मालकाने कान, हात, पाय काढून त्याची फजिती केली. त्याप्रमाणे अज्ञानी माणसाच्या सान्निध्यात राहून काही सुख मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपल्या कामातील वर्म समजत नाही, त्याला त्याचे कर्म फार दुखः कारक होते.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading